कहानी के बाकी भाग पढ़ने के लिए यहां क्लिक करें

(पहिला भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

फोनच्या घंटीमुळे डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं मी बेडवर आहे...आपल्याच हॉस्पिटलच्या रूममध्ये. मी इथं केव्हा अन् कशी आले ते आठवेना. पुन्हा फोनची घंटी वाजली अन् लख्खकन् वीज चमकावी तसं सगळं आठवलं. मी दुपारी सगळी वर्तमानपत्रं घेऊन बसले होते. त्या सगळ्या वृत्तपत्रातून माझ्या लेकीचे अन् जावयाचे फोटो आले होते. दोन दिवसांपूर्वीच आम्ही तिचा साखरपुडा खूप थाटात केला होता. त्या समारंभाला राज्यपालही आले होते. फोटो त्यांच्या सोबतचा होता. शहरातील नामांकित डॉक्टरांच्या लेकीचा साखरपुडा शरद यांच्याबरोबर झाला. दोघेही आयएएस होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत. अशी फोटो ओळही छापलेली होती.

फोटोत मी व माझे पतीही होतो. मला खूप समाधान आणि अभिमानही वाटत असतानाच फोन वाजला. मी रिसीव्हर उचलला, तेव्हा पलीकडून कर्कश्श आवाजात कुणीतरी ओरडलं. ‘‘माझ्या पोरीला आपली म्हणवून गर्वानं फुगली’ आहेस. ती माझी लेक आहे. ते माझं रक्त आहे. मी सांगतोय येऊन तिला सत्य काय आहे ते...’’

एवढं ऐकलं अन् रिसीव्हर माझ्या हातून गळून पडला अन् मी बेशुद्ध पडले. ती आत्ता शुद्धीवर येते आहे. थोडी मान वळवून बघितलं तर माझा हल्लीच डॉक्टर झालेला मुलगा तिथंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलेला दिसला.

मुलगी...दिसली नाही. बाप रे! ती कुठं असेल? तो दुष्ट माणूस तिला भेटून तर गेला नाही ना? माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा...माझ्या आयुष्याचा आधार...माझं सर्वस्व आहे माझी मुलगी...पण तो म्हणत होता ती त्याची आहे...तिच्या धमन्यांमधून त्याचं रक्त वाढतंय म्हणाला खरंय का ते?

पाऊस पडायला लागल्याचं आवाजावरून जाणवलं...पावसाच्या आवाजानं मन थेट भूतकाळात जाऊन पोहोचलं.

बाबांशी खूप वाद घालून, भांडूनच मी आमच्या छोट्या गावातून आयएएस होण्याच्या जिद्दीनं दिल्लीला आले होते. कोचिंग छान सुरू होतं. दुपारी दोन तास मधे वेळ असायचा. त्या वेळात मी जवळच्याच एका हॉटेलात लंच आटोपून पुन्हा क्लासला जायचे. त्या दिवशीही मी लंचसाठी निघाले अन् अवचित खूपच जोराचा पाऊस आला. जवळच्याच एका बंगल्याचं फाटक उघडं दिसलं अन् मी पळतच त्या घराच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिले. अन् मग मनात आलं की घरातल्या लोकांना माझं इथं असं येऊन उभं राहणं खटकणार तर नाही? पण पाऊस जोरात होता काय करू?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...