* आशा लागू
‘‘अगं रागिणी, २ वाजलेत. घरी जायचं नाहीए का? ५ वाजता परत स्पेशल ड्युटीसाठीही यायचं आहे,’’ सहकारी नेहाच्या आवाजाने रागिणीची तंद्री भंगली. दिवाळीत स्पेशल ड्युटी लावल्याची ऑफिस ऑर्डर हातात घेऊन रागिणी गेल्या दिवाळीच्या काळरात्रीच्या काळोखात भटकत होती. जी तिच्या मनातील काळोखाला अजून काळाकुट्ट करत होती. द्वेषाची एक काळी सावली तिच्यात पसरली होती. त्यामुळे पाहता-पाहता सणाचा सगळा आनंद, सर्व उत्साह लोप पावला. रागिणी निराश मनाने नेहासोबत चेंबरच्या बाहेर निघाली.
असं नव्हतं की तिला प्रकाशाचा त्रास होत होता. एक काळ होता, जेव्हा तिलाही दिव्यांचा सण खूप आवडत होता. घरात सर्वात लहान आणि लाडकी असलेली रागिणी नवरात्र सुरू झाल्यानंतर आईसोबत दिवाळीच्या तयारीलाही लागत असे. संपूर्ण घराची साफसफाई करणे, जुने भंगार, वर्षभर न वापरलेले सामान, छोटे झालेले कपडे आणि रद्दी इ. बाजूला काढणे व त्यानंतर घराच्या सजावटीसाठी नवीन सामान खरेदी करणे तिचा आवडता छंद होता. या सर्व कामात तुळशीबाई व पूजाही तिला मदत करत असत आणि सर्व काम हसत-खेळत पूर्ण होत असे.
दिवाळीच्या सफाई अभियानात अनेकदा स्टोरमधून जुनी खेळणी आणि कपडे निघत असत. ते रागिणी व पूजा घालून पाहत असत आणि आईला दाखवत. कधी तुटलेल्या खेळण्यांनी खेळून जुने दिवस पुन्हा जगत असत...आई कधी चिडत असे, कधी हसत असे. एकूणच हसत-खेळत दिवाळीच्या स्वागताची तयारी केली जात असे.
‘‘पूजा त्यांची घरातील नोकराणी तुळशीबाईंची एकुलती एक मुलगी होती आणि दोघी मायलेकी छतावर बनलेल्या छोट्याशा खोलीत राहत होत्या. पूजाच्या वडिलांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला होता. पतिच्या मृत्यूनंतर तरुण विधवा तुळशीबाईंवर त्यांच्या झोपडपट्टीतील प्रत्येक पुरुष वाईट नजर ठेवू लागला, तेव्हा तिने रागिणीची आई शीलाकडे त्यांच्या घरी राहण्याची परवानगी मागितली. शीलाला तशीही एका फुल टाईम मोलकरणीची गरज होती. तिने आनंदाने होकार दिला. तेव्हापासून या संपूर्ण दुनियेत रागिणीचे कुटुंबच त्यांचे कुटुंब झाले. पूजा रागिणीपेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान होती. सुंदर, गुटगुटीत पूजा तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे भासत असे आणि ती तिला बाहुलीप्रमाणेच नटवत असे, केस विंचरत असे आणि तिच्यासोबत खेळत असे.