कथा * शकुंतला सिन्हा

देवेंद्र ऊर्फ देवचं पोस्टिंग त्यावेळी झारखंड राज्यातल्या जमशेदपूरच्या टाटा स्टील इंडस्ट्रीजमध्ये होतं. तो इंजिनीयर होता. मुळचा पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातला, पण त्याच्या वडिलांचा जमशेदपूरला बिझनेस होता. जमशेदपूरला टाटा नगरी म्हणतात. तिथल्या बिष्ठुपुर भागातच त्यांचं कापड दुकान होतं.

देवचं शिक्षण तिथंच झालेले. इंजिनीयरिंग रांचीतून केलं. कॅम्पस इंटरव्हयूमध्ये लगेच नोकरीही मिळाली. तीही टाटा स्टीलमध्येच. इतर दोन तीन ऑफर्स होत्या त्याला, पण इथल्या रेखीव वसाहती, दलमा टेकडी, स्वर्णरेखा नदी अन् ज्युबिली पार्कचंही आकर्षण होतंच. शिवाय आईवडिलही होतेच.

खरकाई नदीच्या पलीकडे आदित्यपुरला त्याच्या वडिलांची मोठी हवेली होती. पण कंपनीनं त्याला इथंच ऑफिसर्स फ्लॅट्समध्ये एक छानसा फ्लॅट दिला होता. त्याला शिफ्ट ड्यूटी असायची. बऱ्याचदा रात्रपाळी करावी लागे. त्यामुळे त्यानं इथंच राहणं पसंद केलं होतं. त्यामुळे त्याचे आईवडिलही हवेलीचा काही भाग भाड्यानं देऊन इथंच त्याच्या फ्लॅटवर राहायला आले होते.

याच दरम्यान टाटा स्टीलच्या आधुनिकीकरणाचा प्रोजेक्ट आला. जपानच्या निप्पोन स्टीलच्या तांत्रिक सहयोगानं टाटा कंपनी आपल्या फोल्ड रोलिंग मिल आणि कंटिन्यूअस कास्टिंग शॉपच्या निर्मितीत गुंतली होती. देव सुरूवातीपासूनच या प्रोजेक्टमध्ये होता. जपानहून निप्पोन कंपनीनं काही टेक्निकल एक्सपर्र्ट्सही टाटा नगरीला पाठवले होते. ही मंडळी टाटा स्टीलच्या वर्कर्स आणि इंजिनीयर्सना टे्निंग देण्यासाठी आलेली होती. त्याच्यासोबत काही दुभाषीही होते. जे जपानीचं इंग्रजीत भाषांतर करून इथल्या लोकांना समजावून सांगत होते. त्या टीममध्येच अंजूही होती. जपानी व इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. वीस वर्षांची सुंदर तरुणी, मुख्य म्हणजे तिचे फीचर्स जपानी वाटत नव्हते. जवळजवळ सहा महिने हे सर्व तिथे राहिले. या दरम्यान अंजू व देवची चांगली ओळख झाली होती. देव तिला भारतीय पदार्थ खाऊ घालायचा. कधीतरी तीही त्याला जपानी पदार्थ करून खाऊ घालायची. इथलं काम संपवून ती सहा महिन्यांनी जपानला निघून गेली.

तिला निरोप द्यायला देव कोलकत्त्याच्या विमानतळावरही गेला होता. त्यानं तिला एक संगमरवरी ताजमहाल अन् बौद्धगयेतील बुद्ध मंदिराचा फोटो भेट म्हणून दिला. ही भेट बघून अंजूला खूप आनंद झाला. निरोप घेताना शेकहॅण्ड करत देवने म्हटलं ‘‘बाय...बाय...’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...