कथा * मधु शर्मा कटिहा

अभिनव जाताच अनन्या शांतपणे खाटेवर पहुडली. आठवडाभराकरिता ऑफिसच्या कामासाठी अभिनव लखनऊला निघाला होता. पण जातेवेळी नेहमीप्रमाणेच रुक्षपणे ‘निघतो’ एवढेच बोलून गेला. किती आठवण आली होती तिला अभिनवची जेव्हा तो मागच्या महिन्यात गोव्याला गेला होता. त्यावेळी अनन्या त्याची आतुरतेने वाट पाहात होती. त्याच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होती. इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून काही पदार्थही बनवायला शिकली होती.

जेव्हा अभिनव घरी आला तेव्हा नोकराकडून स्वयंपाक बनवून न घेता तिने स्वत:च्या हाताने त्याच्यासाठी कोफ्ते आणि खुसखुशीत पराठे बनविले. जेवण झाल्यावर अभिनय हसून तिला ‘धन्यवाद’ म्हणाला तेव्हा अनन्याला खूपच छान वाटले होते.

या वेळेस तिला अशी अपेक्षा होती की, अभिनव बऱ्याच सूचना देऊन जाईल. जसे की, या वेळेस माझी जास्त आठवण काढत बसू नकोस... स्वत:साठी चांगले जेवण बनवून जेवत जा... रात्री उशिरापर्यंत जागू नकोस वगैरे वगैरे. पण अभिनव नेहमीप्रमाणे फक्त ‘निघतो’ एवढेच सांगून टॅक्सीत जाऊन बसला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मनात असे विचार चक्र सुरू असतानाच अनन्याचा डोळा लागला. त्यानंतर मोबाईलची रिंग वाजली आणि ती जागी झाली.

‘‘नुकतीच फ्लाईट लँड झाली आहे,’’ अभिनवचा फोन होता.

‘‘बरं... आता आणखी काही वेळ लागेल ना विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी? त्यानंतर ऑफिसच्या गेस्ट हाऊसला पोहोचण्यासाठी आणखी १ तास लागेल... तुम्ही ऑफिसमध्ये सांगून गाडीची व्यवस्था करून घेतली आहे ना? रात्री टॅक्सीने जाणे धोकादायक असते... स्वत:ची काळजी घ्या,’’ अनन्याला नेहमीप्रमाणेच अभिनवची काळजी वाटत होती. तिच्यापासून दूर गेलेल्या अभिनवशी बोलण्यासाठी ती काही ना काही बहाणा शोधत असे.

‘‘बरं ठीक आहे,’’ असे मोघम बोलत अभिनवने फोन कट केला.

अनन्याला रडू आले. ती विचार करू लागली की, अभिनव नक्कीच आणखी थोडा वेळ बोलू शकत होता... लग्नाला फक्त ६ महिने झाले आहेत, एवढयातच अभिनव मला कंटाळला आहे असे वाटते... दिव्याचे लग्नही आमच्या लग्नाच्या वेळेसच झाले होते. ते दोघे अजूनही प्रत्येक दिवस हनिमूनसारखाच मजेत घालवत आहेत. त्या दिवशी ती बाजारात नवऱ्याच्या हातात हात घालून मिरवत होती... आणि एक मी आहे जिला अभिनवला खुश ठेवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करावे लागत आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...