‘‘सांसों की जरूरत है जैसे जिंदगी के लिए, बस एक सनम चाहिए आशिकी के लिए...’’ एफएमवर वाजत असलेल्या ‘आशिकी’ चित्रपटाच्या या गाण्याने मला अचानक तनूची आठवण आली.

ती जेव्हा कधी एका नव्या प्रेमळ नात्यात अडकायची तेव्हा हेच गाणे गुणगुणायची. मनमौजी... फुलपाखरू... फटाकडी... अशी कितीतरी नावे लोकांनी तिला ठेवली होती. पण ती मात्र ‘पालथ्या घडयावर पाणी’ अशाच अविर्भावात वावरत असे. लोकांनी काहीही म्हटले तरी त्याचा तिच्यावर परिणाम होत नसे. स्वत:च्या अटी-शर्थींनुसार, स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागणारी तनू लोकांसाठी मात्र एक कोडे होती. पण मला माहिती होते की, ती खुल्या पुस्तकासारखी आहे. फक्त ते वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडया संयमाची गरज होती.

असे म्हणतात की, चांगली पुस्तके आणि चांगली माणसे समजून घ्यायला थोडा जास्त वेळ लागतोच... तनूच्या बाबतही असे म्हणता येईल की, ती नेमकी कशी आहे, हे जरा उशिरानेच समजते.

तनू माझ्या बालपणीची मैत्रीण होती. शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत आणि त्यानंतर नोकरीला लागल्यावरही... ती तिचे प्रत्येक गुपित मला सांगत असे. तिच्या हृदयाच्या छोटयाशा नभांगणात कितीतरी इच्छा, अपेक्षांचे पाखरू स्वत:च्या पंखात असलेल्या बळापेक्षाही कितीतरी मोठी झेप घेण्यासाठी आतूर झाले होते. एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचे तिचे अश्रू क्षणार्धात संपत असे. या मुलीला नेमके काय हवे आहे, हे कधीकधी माझ्याही आकलनापलीकडचे होते.

८ वीत असताना पहिल्यांदा जेव्हा तिने मला सांगितले होते की, ती आमचा वर्गमित्र असलेल्या रवीच्या प्रेमात पडली आहे तेव्हा तिच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हेच मला समजेनासे झाले. रवीसोबत गप्पा मारणे, खेळणे, मौजमजा करणे तिला मनापासून आवडते, असे तनूने मला सांगितले. तेव्हा तर कदाचित प्रेमाचा नेमका अर्थ काय, हेही आम्हाला नीटसे समजत नव्हते. तरीही न जाणो कशाच्या शोधात ही वेडी मुलगी त्या अनोळख्या मार्गावरून पुढे चालली होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...