कथा * उषा साने

बऱ्याच वर्षांनंतर मी माझे फेसबूक अकाउंट उघडले, तितक्यात चॅटिंग विंडोमध्ये ‘हाय’ असे ब्लिंक झाले. सुरुवातीला मी लक्ष दिले नाही, मात्र सतत ब्लिंक होतच राहिल्यामुळे मनात विचार आला की, कोणीतरी बोलण्यासाठी आतूर झाले आहे. नक्कीच ती व्यक्ती माझ्या फेसबूकवरील मित्रपरिवारापैकी होती. बोलण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याचे नाव कौशल होते. मी बोलणे टाळले. कारण मला चॅटिंगची आवड नव्हती. पण समोरची व्यक्ती धीट होती. थोडया वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मेसेज पाठवला. ‘तुम्ही कशा आहात मॅडम...?’ या प्रश्नाचे उत्तर न देणे शिष्टाचाराला धरून नव्हते. त्यामुळे मनात नसतानाही ‘बरी आहे,’ असे मी लिहिले. त्याला पुढे बोलू न देण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्याकडे वेळ नाही, असे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा मेसेज आला, ‘कामात आहात का मॅडम...?’ माझ्या ‘हो’ अशा त्रोटक उत्तरानंतर त्याने परत मेसेज पाठवला, ‘बरं... पुन्हा केव्हा तरी बोलूयात मॅडम’ मीही ‘हो’ म्हणून सुटकेचा श्वास टाकला. तेवढयात दारावरची घंटी वाजली. घडयाळात पाहिले तर संध्याकाळचे ६ वाजले होते. वाटले की, राजीव कामावरून आला असेल.

जसा मी दरवाजा उघडला तसे, ‘‘काय सुरू आहे मॅडम...?’’ राजीवने विचारले. मला चिडवायची इच्छा झाल्यास तो मला मॅडम म्हणतो. त्याला माहीत आहे की, मॅडम म्हटलेले मला अजिबात आवडत नाही.

‘‘काही विशेष नाही. फक्त नेटवर सर्फिंग करत होते...’’ मी थोडेसे चिडूनच उत्तर दिले. राजीव हसला. तो हसला की मी राग विसरून जायचे. माझा राग कसा घालवायचा, हे राजीवला बरोबर माहीत होते. म्हणूनच मला चिडवल्यानंतर तो अनेकदा असाच मिस्किल हसायचा.

‘‘बरं, आले घातलेली गरमागरम चहा आणि चहासोबत गरमागरम भजी मिळाली तर आपला दिवस, म्हणजे संध्याकाळ मस्त होईल...’’ त्याच्या अशा बोलण्यावर मला हसू आले. बाहेर खरोखरंच पाऊस पडत होता. घरात असल्यामुळे माझ्या ते लक्षात आले नव्हते. मी चहा, भजीची तयारी करू लागले आणि राजीव हात-पाय धुवायला गेला. आपल्या दोघांची आवडीची जागा असलेल्या बाल्कनीत चहा पिऊया, असे तो म्हणाला. तो खूपच आनंदी दिसत होता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...