* डॉ. सुरेंद्र मोहन

आधी तुम्हाला ‘ही’ अन् ‘शी’ ची ओळख करून द्यायली हवी. ‘ही’ म्हणजे हिमांशु एम.एन.सीमध्ये मोठ्या हुद्यावर काम करतो, सतत विमानानं फिरत असतो.

‘शी’ म्हणजे शिल्पा. सुंदर दिसणारी एक सज्जन बाई आहे. सक्सेसफुल होममेकर अन् सक्सेसफुल फॅशन डिझायनर आहे. फारच बिझी असते. तिचं आपल्या घरावर अन् व्यवसायावर खूप प्रेम आहे. तिचं रूटीन ठरलेलं आहे. प्रत्येकवेळी ती कामात असते, पण प्रत्येक कामासाठी ती वेळ काढते. शी इज ग्रेट.

शिल्पा हिमांशुची भेट मुंबई, कोलकात्ता फ्लाइटच्यावेळी एअरपोर्टवर झाली. सुंदर स्मार्ट शिल्पा हिमांशुला आवडली. दाट केसांचा, सडपातळ बांध्याचा, उंच, देखणा हिमांशु शिल्पालाही पसंत पडला. बरेच दिवस त्यांचं डेटिंग चाललं अन् मग दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं त्यांचं लग्न झालं.

कोलकात्त्याच्या एका मोठ्या रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. वाढतं वय शिल्पाकडे बघून जाणवत नाही. हिमांशु मात्र वयस्कर वाटू लागलाय. वजन अव्वाच्या सव्वा वाढलंय. ढेरी ज्या वेगानं वाढली, तेवढ्याच झपाट्यानं डोक्यावरच्या केसांनीही रजा घेतली. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आनुंवशिक म्हणूनही आल्या आहेत.

‘‘शिलू हिमूचं काही बरं चाललेलं नाहीए...’’ मोनानं दिव्याला ब्रेकिंग न्यूज सांगितली.

मोनाला चित्रपट तारे तारकांबद्दलच्या बातम्या विशेषत: त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या बातम्यांमध्ये विशेष इंटरेस्ट होता. छिद्र दिसलं की डोकावणं अन् फट दिसली की कान लावणं हे तिचं आवडते छंद होते.

‘‘तुला कसं कळलं? बातमी पक्की आहे ना?’’ दिव्या पूर्ण बातमी जाणून घेणारी होती.

‘‘अगं, माझी मेड म्हणजे मोलकरीण गौरी सध्या शिल्पाकडे काम करतेय, कारण तिची मेड गावी गेलीय. तर गौरीनं सांगितलं, दोघं नवरा बायको वेगवेगळे झोपतात. तिनं काही तरी डिव्होर्स असं ऐकलं, बाकी सगळं इंग्लिशमध्ये होतं ते तिला नीटसं समजलं नाही.’’ मोना म्हणाली.

‘‘शिल्पा मॅडम, आता फॅशन सेलिब्रेटी झाल्यात ना?...बिच्चारा हिमांशु...शिल्पाला त्यानं केवढा सपोर्ट केला होता,’’ दिव्यानं हिमांशुची बाजू घेतली.

‘‘शिल्पानं स्वत:ला चांगलं मेंटेन केलंय. राहतेही अगदी टिपटॉप...आता त्यांची जोडी फारच विजोड दिसते,’’ मोनाने शिल्पाची कड घेतली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...