कथा * राकेश भराडे

आयुषीनं उदासपणे आपल्या बेडरूमवरून नजर फिरवली. कपाटं, ड्रेसिंग टेबल, डबलबेड, इथं तिथं पसरलेले कपडे...सगळ्यांवरच एक उदास सावट पसरलं होतं. तिच्या मनाप्रमाणेच या निर्जीव वस्तूही दु:खानं झाकोळून रडत होत्या.

खोलीत शांतता पसरली होती. तिला या शांततेची भीती वाटली नाही, पण एक तऱ्हेची निराशा दाटून आली. जितका अधिक विचार ती करत होती, तेवढीच निराशा अधिक गडद होत होती.

केवळ बेडरूमच नाही तर संपूर्ण फ्लॅट तिनं खूप मनापासून, खपून सजवला होता. स्वत:साठी अन् प्रियकरासाठीही. त्यावेळी डोळ्यात सप्तरंगी स्वप्नं होती. त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठीच तिनं हे धाडसी पाऊल उचललं होतं. लग्न न करताही ती प्रतीकबरोबर रहायला तयार झाली होती.

आज मात्र तो उत्साह पार मावळला होता. असं का झालं हे तिला कळत नव्हतं. तिनं तर पूर्ण निष्ठेनं समर्पण केलं होतं. आत्यंतिक विश्वासानं आपला देह, आपलं मन त्याला दिलं होतं. पण त्याचं प्रेम मात्र खोटं होतं. तो प्रेमाचा केवळ देखावा होता. त्याला तिचं तारूण्य हवं होतं. त्यासाठीच त्यानं तिला अगदी बेमालूमपणे आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तिच्या देहाचा पुरेपूर उपभोग घेतलाच शिवाय तिचाच पैसा वापरून चैनही केली. आता हे तिला कळतंय, पण आता उपयोग काय?

एमबीएचा अभ्यास दोघांनी एकाच कॉलेजात केलेला. यादरम्यान त्यांच्यात ओळख, मैत्री अन् प्रेम निर्माण झालं. एक दिवस प्रतीकनं तिला विचारलं,

‘‘आयुषी, माझ्याबरोबर बाहेर येतेस?’’

‘‘कुठं?’’

‘‘तू म्हणशील तिथं...’’

‘‘तुझी स्वत:ची काहीच इच्छा नाही?’’

‘‘आहे ना. पण तुझ्या सहमतीनंच मी सगळं करणार?’’

‘‘चल तर मग...’’ ती पटकन् उठली.

त्यानंतर ती प्रतीकच्या बोलण्यावागण्यावर इतकी भाळली की त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होती.

नोकरी मिळताच एकत्र रहायचं त्यांनी ठरवलं होतं. एकमेकांवाचून जगणं त्यांना अशक्य वाटत होतं. प्रयत्न करून दोघांनी एकाच कंपनीत नोकरी मिळवली. अन् मागचा पुढचा विचार न करता ती दोघं एकत्र रहायला लागली. दोघांचेही आईवडिल त्यांच्या गावी, या शहरापासून बरेच दूर असायचे. पण आपला असा स्वतंत्र संसार थाटून ती दोघं खूपच आनंदात होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...