कथा * मीना संभूस

‘‘निक्की, आता कसं वाटतंय?’’ नर्सनं निक्कीच्या रूममध्ये येत विचारलं.

‘‘सिस्टर गुडमॉर्निंग,’’ थकलेल्या स्वरात थोडं हसून निक्कीनं म्हटलं.

‘‘गुड मॉर्निंग...आता कसं वाटतंय?’’ सिस्टरनं पुन्हा विचारलं.

‘‘तसं बरं वाटतंय, पण...फार थकल्यासारखं झालंय.’’ कुशीवर वळत निक्कीनं म्हटलं.

तिला आलेला थकवा शारीरिक व मानसिकही होता...तिच्या बाबतीत घडायला नको ते घडलं होतं.

‘‘विश्रांती घे. लवकरच बरं वाटेल...आता डॉक्टर साहेब येतील. त्यांना ही सांग...ते औषध देतील.’’ तिच्या गालावर प्रेमानं थोपटून नर्सनं समजावलं अन् ती निघून गेली.

निक्की विचार करत होती, तिच्या या अवस्थेला जबाबदार कोण? ती? तिची आई की आईचं तिच्या भाच्यावरचं आंधळं प्रेम? कदाचित आईचं अन् माझंही चुकलंच! माझ्यासारख्याच इतर मुलीही अशा त्रासातून जात असतील. आपलं कोण अन् परकं कोण कसं ओळखायचं? सख्ख्या नात्यातली माणसंच अब्रूवर उठतात तर इतरांबद्दल विश्वास कसा वाटणार? खरं तर मी आईलाही किती आडून आडून सांगायचा प्रयत्न करत होते पण तिनं समजून घेतलं नाही. मीही कमी पडले.?थोडं धाडस करून बाबांना सांगायला हवं होतं...लाटणं किंवा केरसुणी घेऊन मोहितलाही मारायला हवं होतं...आज मी इथं अशी हॉस्पिटलमध्ये आहे. बाबांना डिप्रेशन आलंय...आणि आईचे रडून रडून डोळे सुजले आहेत.

निक्कीला तो दिवस आठवला...त्या दिवशी तिची आई आशा आनंदानं गाणं गुणगुणत काय काय पदार्थ तयार करत होती. घरभर खमंग वास दरवळत होता.

शाळेतून घरी परतलेल्या निकितानं विचारलं, ‘‘आई, आज काय आहे? काय काय केलंयस तू? किती छान वास सुटलाय...कुणी पाहुणे यायचे आहेत का?’’

‘‘अगं, मोहित येतोय. तुझा मावसभाऊ. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा...अगदी लहान होता तेव्हा खूप खेळवलं आहे मी त्याला...आता मोठा झालाय...’’ अभिमानानं आशा म्हणाली.

‘‘पण तो का येतोय?’’ निक्कीनं विचारलं.

‘‘मोहितला डॉक्टर व्हायचंय. त्याला इथल्या कॉलेजात अॅडमिशन मिळालं आहे. ताईनं म्हटलं होतं, तो होस्टेलमध्ये राहील म्हणून. पण मीच म्हटलं की त्याची सख्खी मावशी गावात असताना होस्टेलमध्ये कशाला?’’ आशानं सांगितलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...