कथा * संजीव जाधव

भक्तांनो, हे शरीर नश्वर आहे. यात असलेला आत्मा तेवढा शाश्वत आहे. त्याचं परमात्म्याशी मिलन होणं हाच परमानंद आहे. पण यांच्या मिलनात काम, क्रोध, लोभ, मोह असे अनेक अडसर आहेत. हे अडसर जेव्हा तुम्ही ओलांडू शकाल त्याच क्षणी तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालू लागाल...’’ स्वामी दिव्यानंदांची ओजस्वी वाणी श्रोत्यांना खिळवून ठेवत होती.

महानगरातल्या सर्वात महागड्या, सर्व सोयींनी युक्त वातानुकूलित हॉलमध्ये उंच व्यासपीठावर स्वामी विराजमान होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी ते अधिकच भव्य दिसत होते. माथ्यावर केशर चंदनाचा टिळा, गळ्यात रूद्राक्षाच्या माळा, बोटात झगमगणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व भारदस्त वाटत होतं.

लोकांमध्ये चर्चा असायची की स्वामीजींना सिद्धी प्राप्त आहेत. ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी होते, त्यांची सर्व दु:ख दूर होतात. संपूर्ण शहरात स्वामीजींची मोठमोठी पोस्टर्स लावलेली होती. दूरदूरच्या गावांमधून लोक स्वामींच्या दर्शनाला अन् प्रवचनं ऐकायला येत असत. प्रवचनांना प्रचंड गर्दी व्हायची. गर्दीतही स्वामींच्या सिद्धींची अन् चमत्कारांचीच चर्चा असे.

दिवसातून तीनदा स्वामींचं दर्शन आणि प्रवचन असायचं. आत्ताचं हे त्यांचं दिवसातलं शेवटचं प्रवचन होतं. संपूर्ण हॉलमध्ये रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. व्यासपीठ गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं होतं. सुंदर सुवास दरवळत होता.

स्वामींच्या पायांवर डोकं टेकवून आशिर्वाद घेणाऱ्यांची रांग लागली होती. आश्रमातले स्वामींचे स्वयंसेवक भक्तांना अधिकाधिक देणगी अर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.

रात्रीचे नऊ वाजून गेलेले. स्वामींनी हात उंचावून सर्व भक्तांना आशिर्वाद दिला. त्यांच्या जयजयकारानं संपूर्ण हॉल दुमदुमला. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून स्वामीजी उठले अन् आपल्या निवासाकडे निघाले. हळूहळू सर्व भक्त पांगले. स्वामींचे दोन विश्वासपात्र शिष्य श्रद्धानंद महाराज आणि सत्यानंद महाराज यांनी सर्व स्वयंसेवकांनाही निरोप दिला आणि हॉलचा मुख्य दरवाजा बंद केला.

‘‘चला, आता आजची मजूरी एकत्र करूयात.’’ आपल्या भगव्या कफनीच्या बाह्या वर सारत श्रद्धानंद महाराज म्हणाले.

‘‘दिवसभर या मूर्ख भक्तांच्या स्वागत सत्कारात इतकं दमायला होतं ना की आता अगदी पूर्ण विश्रांती घ्यावी असं वाटायला लागतं...आता पटापट हे काम आटोपून घेऊयात,’’ हात ताणून आळस देत सत्यानंद महाराज बोलले.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...