* सोमा घोष

इंजिनिअरिंग करणारा तरुण कधी काय करेल हे कोणालाच माहिती नसतं. अनेक इंजिनिअरिंग करणारी तरुण मंडळी ही कला माध्यमात चांगलीच रुजली असून याच पैकी एक म्हणजे रोहन शिंदे हा तरुण फोटोग्राफर. इंजिनिअरिंग झाल्यानंतर अचानक फोटोग्राफीकडे वळलेला रोहन सध्या जगातल्या टॉप वेडिंग फोटोग्राफर्स पैकी एक आहे.

शालेय आणि कॉलेज शिक्षण झाल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या आग्रहा खातर रोहनने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. पण इंजिनिअर बनून फक्त नोकरी करावी असं त्याला कधीच वाटलं नाही. इंजिनिअरिंग झाल्यानंतर एकदा रोहन एका फोटो प्रदर्शनात गेला असता तेथील फोटोस नी त्याला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. प्रदर्शनातील फोटो बघून त्याने फोटोग्राफीकडे वळायचं ठरवलं. आई वडिलांची समजूत काढून त्याने फोटोग्राफी मध्येच करियर करायचं ठरवलं, म्हणून त्याने फोटोग्राफीचं प्राथमिक शिक्षण सुद्धा घेतलं. फोटोग्राफीची आवड म्हणून त्याने अनेक फोटोग्राफर्सबरोबर त्याने सहाय्यक म्हणून काम केलं. हे सगळं करत असताना फोटोग्राफीमध्ये तो अनेक प्रयोग करू पाहत होता. गेली ३ वर्ष तो फोटोग्राफी करत असून. यावर्षी 'वॉल मॅग' या राष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफी संस्थेतर्फे भारतातील सर्वोत्कृष्ट वेडिंग फोटोग्राफरस पैकी एक म्हणून त्याचा गौरव केला असून वेड वॉर या जागतिक पातळीवर फोटोग्राफीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुरस्काराचा रोहन दोनदा मानकरी ठरला आहे. रोहन सध्याच्या काळातसुद्धा फोटोग्राफी मध्ये वेगळे प्रयत्न करत असून अवघ्या २२ वर्षाचा हा फोटोग्राफर जागतिक कीर्ती करत आहे.

'फोटोग्राफी ही फार संवेदनशील गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातले महत्वाचे क्षण हे सहज आणि सुंदर टिपणं गरजेचं आहे. तेच मी करत आलो आहे. माझ्या या तीन वर्षाच्या मेहनतीत मला अनेकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं असलं तरी माझं फोटोग्राफी वरचं प्रेम कधीच कमी झालं नाही. यापुढे अजून वेगळे प्रयोग आणि वेगळ्या युक्त्या लावून फोटोग्राफी करायची आहे.'

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...