* दीपान्विता राय बॅनर्जी
निराचा नवरा तिच्या पदरात ३ वर्षाच्या मुलीला सोडून २ वर्षानंतर परत येतो सांगून नव्या नोकरीनिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला, पण काही महिन्यातच त्याने तिथे दुसरे लग्न केले आणि मग नीराला पतिपासून वेगळे व्हायचा पर्याय स्वीकारावा लागला.
नीराने आयुष्यातील नवी आव्हानं स्वीकारून आपल्या मुलीचे पालनपोषण करत इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स करून नोकरी पत्करली. घटस्फोटाची जी रक्कम मिळाली, ती बँकेत जमा केली. अशाप्रकारे तिचे जीवन आरामात व्यतित होऊ लागले.
हो, जर चाळीशीत जोडीदाराचा आधार सुटला तरीसुद्धा आर्थिक स्थैर्य असेल तर जगण्याची उमेद कायम असते, पण आरामात सरणाऱ्या जीवनात एखादा चुकीचा निर्णय उलथापालथ घडवू शकतो.
काही असेच नीराच्या बाबतीतही घडले. चांगली नोकरी करून आणि घटस्फोटाच्या रकमेत तिचे आयुष्य मजेत जात होते, पण आपल्या भावाच्या सांगण्यावरून नीराने आपले इंटीरियरचे दुकान उघडले. पण बाजाराच्या स्थितीचा अचूक अंदाज न लावल्याने आणि चौकशी न करता महागडया दराने कर्ज काढल्याने तिला कर्जाचे हप्ते भरणे कठीण जाऊ लागले, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये राहू लागली. मग नुकसान सहन करून तिला दुकान बंद करावे लागले.
व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या
एकल महिलेची जबाबदारी तिची स्वत:चीच असते आणि याशिवाय मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारीसुद्धा असेल तर तिने कोणताही निर्णय सारासार विचार करूनच घ्यायला हवा. सादर आहेत या संबंधित काही टीप्स :
* सर्वात आधी स्वत:ला कणखर बनवा, खचून जाऊ नका.
* स्वत:च स्वत:चे गुरु बना. आपली इच्छाशक्ती प्रबळ बनवा व आपली आर्थिक स्थिती मजबूत बनवायचा प्रयत्न करा.
* नोकरी करा अथवा व्यवसाय, आपल्या मिळकतीचा उपयोग अशाप्रकारे करा की जगण्याचे स्वातंत्र्य कायम राहिल.
* नोकरी अथवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर बाजाराच्या स्थितीकडे अवश्य लक्ष ठेवा, कारण बाजारातील नफातोटा हा एक महत्वपूर्ण मुद्दा आहे.
* जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करत असाल, तर त्या संस्थांबाबत माहिती मिळवत राहा, ज्या गरज भासल्यास कर्ज उपलब्ध करून देऊ शकतील. कमी व्याजाच्या स्किम्स, इन्सेन्टिव्ह वगैरे यांची अचूक माहिती ठेवा. व्यवसायात प्रत्येक क्षणाला चातुर्य आणि सतर्कतेची गरज असते.