* नसीम अन्सारी कोचर
उन्हाळयाचा ऋतू सुरु होताच डासांची भुणभुण सुरु होते आणि पावसाळयात तर यांची संख्या खूपच जास्त वाढते. संध्याकाळ होताच डासांचा त्रास सगळ्यांसाठी मोठी समस्या बनते. यांना पळवून लावायला कडुलिंबाचा पाला जाळला जातो, कुठे स्प्रे शिंपडण्यात येतो, तर कुठे मॉस्किटो कोईल लावण्यात येते. सरकारसुद्धा डासांपासून सुटका व्हावी म्हणून शहरात निरनिराळे उपक्रम राबवते. गल्लीबोळात डास मारण्याच्या औषधांची फवारणी आणि धूर निघणारी गाडी फिरवली जाते, नाले खड्डे आणि साठलेल्या पाण्याच्या जागा स्वच्छ केल्या जातात. तरीही डासांचा त्रास कमी होत नाही. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजाराने लोक त्रस्त असतात.
कोईल, स्प्रे यासारखी उत्पादने तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, हे सांगू शकत नाही. घरात ते सतत पेटवून ठेवणे शक्य नसते. पण टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला घरातील डासांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर बस्स काही रोपं खरेदी करा आणि आपल्या बाल्कनी, अंगण, बगीचा आणि बैठकीत त्यांना छान सजवून ठेवा. बघा की कशा चमत्कारिक पद्धतीने डास आणि माशा तुमच्या घरातून गायब होतात ते. ही रोपं ना केवळ आपल्या घरात डासांचे आगमन थांबवते तर यांच्यामुळे पसरणाऱ्या आजारांनासुद्धा तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवते.
या जाणून घेऊ या जादूच्या सुगंधित रोपटयांबाबत :
लेमनग्रास : ही एक जडीबुटी आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव सिंबोपोगन साइझेटस आहे. यात उपस्थित असलेल्या लिंबाच्या सुवासामुळे याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हे एक बारमाही गवत आहे, भारत आणि आशियाच्या उष्णकटीबंधीय भागात उगवते, प्रत्येक घरात लेमनग्रासचा वापर त्याच्या सुवासामुळे केला जातो. चहाच्या स्वरूपात याचे खूप सेवन केले जाते. साधारणत: लेमन ग्रासचा वापर सुवासासोबत डास नाहीसे करण्याच्या अनेक औषधांमध्येसुद्धा केला जातो. याचा मनमोहक आणि ताजेतवाने करणारा सुवास जसा एकीकडे ताण नाहीसा करून तुमचा मूड फ्रेश करण्याचेसुद्धा काम करतो, तसाच दुसरीकडे डाससुद्धा यांच्या सुवासाने दूर पळतात. मग आजच लेमनग्रासचे रोप आपल्या बाल्कनी आणि बैठकित आणून ठेवा आणि मग बघा कसे डास तुमच्या घरात डोकावायलासुद्धा घाबरतात ते.