* प्रतिनिधी
- मी एक ५२ वर्षांची स्त्री आहे. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला ५ वर्षे झाली आहेत. माझे गेल्या काही महिन्यांपासून २७ वर्षांच्या अविवाहित पुरुषाशी शारीरिक संबंध आहेत. तो माझी खूप काळजी घेतो आणि आम्ही दोघे परस्पर संमतीने लैंगिक संबंध बनवतो. मला त्याच्याबरोबर समाधान वाटते आणि तो केवळ सेक्समध्येच नव्हे तर दु:खातदेखील नेहमी सहकार्य करतो. तो खूप जोमदारदेखील आहे पण सेक्स करताना त्याला कंडोम लावायला आवडत नाही. तथापि, मी कुटुंब नियोजन केले आहे. यात काही धोका तर नाही ना? कृपया सल्ला द्या?
आपल्या लैंगिक जोडीदाराचा लैंगिक संबंधादरम्यान कंडोम न वापरल्याने कौटुंबिक नियोजनाशी कोणताही संबंध नाही. लैंगिक संबंधात गर्भधारणेसाठी वाव असेल याची शक्यताही फारच कमी आहे. परंतु कंडोम केवळ गर्भनिरोधकच नव्हे तर लैंगिक संसर्गापासून बचाव करण्याचे एक चांगले साधन देखील मानले जाते.
सेक्स पार्टनरला सेक्स दरम्यान कंडोम वापरण्यास सांगा. याद्वारे आपण दोघेही लैंगिक संसर्गापासून वाचाल आणि तणावमुक्त होऊन लैंगिक संबंधाचा आनंद घेऊ शकाल.
- मी २८ वर्षांची महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले. लग्नानंतर सासरी आल्यावर २-३ दिवसांतच समजले की नवरा ‘मम्माज बॉय’ आहे. ते कोणतीही कामे केवळ आईला विचारून करतात आणि ते माझ्या एकाही गोष्टीशी सहमत होत नाहीत. माझ्या सासूच स्वयंपाकापासून ते पडद्याच्या रंगापर्यंतची निवड करतात आणि माझ्या शब्दांना थोडेही महत्त्व देत नाहीत. यामुळे मी खूप तणावात असते. काय करावे हे समजत नाही?
आपण नुकतेच विवाहित झाला आहात. आपले पती समजूतदार आहेत आणि म्हणूनच त्याला अचानक आपल्या आईकडे दुर्लक्ष करून तुमच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देणे योग्य वाटत नसेल. यामुळे घरात अनावश्यक तणाव निर्माण होईल.
कालांतराने आपण हळूहळू घरात आपले स्थान बनवावे. आपल्या सासूला, सासू नव्हे तर आई समजावे. त्यांच्या मोकळया वेळेत त्यांच्याबरोबर बसा, टीव्ही पहा, खरेदी करायला जा, त्यांचा आवडता ड्रेस त्यांना खरेदी करून द्या. घरातील कामात मदत करा.