आरोग्य परामर्श

 डॉ. संदीप मेहता, बीएलके सुपरस्पेशालि हॉस्पिटल,नवीदिल्ली

प्रश्न : मी ४७ वर्षांची नोकरदार स्त्री आहे. मी वयाच्या ४२व्या वर्षीच रजोनिवृत्त झाले आहे. पण तेव्हापासून कूस बदलल्यावर मला स्तनांमध्ये वेदना जाणवते. मला कोणत्या प्रकारची तपासणी करायला हवीय?

उत्तर : याला मस्टाल्जिया म्हटलं जातं. स्तनांमध्ये वेदना स्तनरोगाचं कोणतंही लक्षण असू शकतं. तुम्ही एखाद्या तज्ज्ञ कॅन्सर सर्जनकडून तुमच्या स्तनांची तपासणी करून घ्यायला हवीय. जर तुमचे स्तन कडक झाले असून तुमच्या डॉक्टरांना तपासणीदरम्यान एखादी गाठ वगैरे दिसत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रेस्टचा एमआरआय करणं जास्त योग्य ठरेल.

प्रश्न : मी ३७ वर्षांची गृहिणी आहे. गेल्या सहा वर्षांपासून मी गर्भनिरोधक गोळ्या खात आहे. पण मी असं ऐकलं आहे की अशा गोळ्यांचं सेवन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. हे सत्य आहे का?

उत्तर : पाच वर्षांपेक्षा जास्त काळापासून गर्भनिरोधक गोळ्या खाणाऱ्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असतो. खरंतर अलीकडे गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये हार्मोन्सचं प्रमाण कमी ठेवलं जातं. त्यामुळे याचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. पण ज्या स्त्रियांच्या कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास राहिला आहे तिने अशा गोळ्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

प्रश्न : दोन वर्षांपूर्वी माझ्या बहिणीचं ओव्हरियन कॅन्सरमुळे निधन झालं होतं. तिला २ मुली. एक १६ वर्षांची आणि एक १० वर्षांची आहे. डॉक्टर सांगतात की जर आईला कॅन्सर झाला आहे तर मुलांनाही कॅन्सर होण्याची शक्यता असते. म्हणूनच जर भविष्यात अशा कुठच्या धोक्यापासून बचावयाचं असेल तर आम्ही काय करायला हवं?

उत्तर : मुलींना ओव्हरियन कॅन्सरची भीती (सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत ३ ते ६ पट) जास्त असते. दोन्ही मुलींसाठी सद्या एकच सल्ला आहे की त्यांनी दरवर्षी सीए १२५ची तपासणी करत राहावं आणि ओव्हरियन कॅन्सरची तपासणी करण्यासाठी ट्रांसवेजिनल अल्ट्रासाउंड करून घ्यावा. त्यांनी बीआरसीए १ आणि बीआरसीए २ सारखी अेनेटिक म्यूटेशन तपासणीही करून घ्यायला हवी. जर याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर अपत्य जन्माला न घालण्याचा निर्णय घेऊन त्यांना याचा धोका कमी करणाऱ्या साल्पिंगो उफोरेक्टोमिया (या सर्जिकल प्रक्रियेत स्त्रीची ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूब्स काढून टाकल्या जातात) वरही विचार करायला हवाय. अशाप्रकारच्या तपासणीचा सल्ला सामान्यपणे ३०-३५ वर्षांच्या स्त्रीला दिला जातो. पण तुम्ही तुमच्या बहिणीच्या मुलींचा हा सर्जिकल उपचार त्यांची आई ओव्हरियन कॅन्सरने ग्रस्त झाल्याच्या वयापेक्षा १० वर्षं कमी वयातही करून घेऊ शकता. त्या कमी वयात हा धोका कमी करण्यासाठी आपली ओव्हरी काढू शकतात.

प्रश्न : लहानपणी भाजल्यानंतर कोणाला नंतर कॅन्सर होऊ शकतो का? जर होय, तर यापासून बचावण्याचं पहिलं पाऊल काय असायला हवंय?

उत्तर : भाजल्यामुळे अस्थायी डाग पडतात, ज्यामुळे अशी त्वचा आकसली किंवा ताणली जाते आणि त्याची हालचाल सीमित होऊन जाते. जसं की, टाचा किंवा गुडघ्यांच्या सांध्यामध्ये अनेक वर्षांनी कॅन्सरची जखम बनण्याची शक्यता निर्माण होते. भाजल्यामुळे त्वचेला झालेल्या अपायांवर उपचार करण्यासाठी बचावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर स्किन ग्राफ्टिंग किंवा फ्लॅप करणं आहे.

प्रश्न : प्रत्येकाला एचपीव्ही लस टोचून घ्यायला हवीय का? ही लस टोचून घेतल्याचा काही धोकाही आहे का?

उत्तर : एचपीव्ही पुरुष आणि स्त्रियांमध्ये आनुवंशिक गाठीचं मुख्य कारण असतं. हे स्त्रियांच्या गर्भाशय, गुप्तांग आणि योनिमार्गाच्या कॅन्सरचंही कारण ठरतं. पुरुषांना लिंग कॅन्सर आणि स्त्री व पुरुष दोघांना यामुळे गुदद्वार आणि गळ्याचाही कॅन्सर होऊ शकतो. यापैकी अनेक रोगांपासून एचपीव्ही लस घेऊन बचावलं जाऊ शकतं.

एचपीव्ही लस ११-१२ वर्षांच्या मुलामुलींना घेण्याचा सल्ला दिला जातो. किशोरावस्थेच्या आधीचं वय लस घेण्यासाठी सर्वात योग्य असतं. कारण पहिल्यांदा यौन संपर्कात येणं आणि वायरसच्या पहिल्या संपर्कात येण्याच्या खूप आधी ही लस फारच प्रभावीपणे काम करते. किशोरावस्था ओलांडणारे आणि   तारुण्यावस्थेत पोहोचणाऱ्यांनाही एचपीव्ही लसीचा फायदा होऊ शकतो. मग ते सेक्सुअलरीत्या सक्रिय असले तरी ही लस त्यांना एचपीव्हीच्या सर्वात सामान्य टाइपपासूनही वाचवेल.

एचपीव्हीचे जवळजवळ ४० वेगवेगळे प्रकार आहेत. मुली वयाच्या सव्वीसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात तर मुलं वयाच्या एकविसाव्या वर्षांपर्यंत ही लस घेऊ शकतात.

गृहशोभिकेचा सल्ला

मी २१ वर्षांची तरुणी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी आपल्या प्रियकरासमवेत त्याच्या फ्लॅटवर जात असे. आमच्यात शारीरिक संबंध बनले. या काळात बॉयफ्रेंडने आवश्यक खबरदारी घेतली नाही, उलट माझ्?या वारंवार आग्रह केल्यानंतर तो माझ्यावर रागावयाचा. मला त्यास गमवायचे नव्हते म्हणून मी विवश होते. परंतु आता मला भीती वाटत आहे की मी यामुळे गरोदर तर होणार नाही ना. मी पुढे काय करावे?

संबंध बनवल्यानंतर जर मासिक पाळी आली नसेल तर तुम्ही घाबरायला हवं. मासिक पाळी आली नसल्यास आपण गर्भधारणा चाचणी किट वापरुन परीक्षण करू शकता. आपण स्वत:देखील घरीच हे परीक्षण करू शकता. किटमध्ये तपासणी केल्यावर दोन लाल रेषा दिसल्या तर तुम्ही तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुमचे आणि तुमच्या प्रियकरामधील नाते गहन असेल तर लवकरच तुम्हा दोघांनी लग्न केले पाहिजे. जर तुमचा प्रियकर लग्नासाठी तयार नसेल तर मग त्याचे नाही म्हणण्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्याकडून स्वत: भावनिकरित्या ब्लॅकमेल होणे टाळा. आपण आपल्या इच्छेने संबंध बनवत असल्यास प्रोटेक्शन वापरा.

मी २४ वर्षांची स्त्री आहे. माझे लग्न ३ महिन्यापूर्वी झाले आहे, लग्नापूर्वी माझे दुसऱ्यावर प्रेम होते. कुटुंबातील सदस्यांच्या दबावाखाली माझे लग्न झाले. माझा नवरा खुल्या विचारांचा आहे. त्यांनी आमचे संबंध समजून घेण्यासाठी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले. या ३ महिन्यांत आमच्यात कोणतेही संबंध नव्हते, परंतु आता मला वाटते की आमच्यातील अंतर संपुष्टात यावे. कृपया योग्य सल्ला द्या?

हे नातं समजून घेण्यासाठी तुमच्या पतीने तुम्हाला पूर्ण वेळ दिला ही एक उत्तम गोष्ट आहे. आता आपणास समजले आहे की आपले सध्याचे कुटुंब आपले पतीच आहेत. त्यांच्यापासून अंतर मिटविण्यासाठी हे उत्तम होईल की आपण आपल्या पतीबरोबर फिरायला जा, त्यांना पुरेसा वेळ द्या. जर तसे झाले नाही तर आपल्या पतीबरोबर रोमँटिक होण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासाठी आश्चर्यकारक योजना बनवा. रात्री आपल्या बेडरूममध्ये फुले व मेणबत्त्या सजवा. स्वत:ला हॉट आणि मादक बनवा. यादरम्यान असे कपडे घाला, जे आपले सौंदर्य वाढवतील. तर मग पती तुमच्या प्रेमात कुठल्या सीमेपर्यंत स्वत:ला हरवतो ते पहा.

मी २४ वर्षांची तरुणी आहे. लग्नाआधी माझे १-२ बॉयफ्रेंड्सबरोबर लैंगिक संबंध होते. त्यावेळी माझी २ वेळा गर्भधारणाही झाली. मग मी औषध खाऊन गर्भपात करून घेतला. आता माझ्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत, पण अद्याप मी गर्भधारणा करू शकले नाही. यामागे पूर्वी औषधे घेण्याचे काही कारण आहे का? कृपया मला मार्गदर्शन करा की मी भविष्यात आई होईन की नाही?

भुतकाळ विसरा. पूर्वी जे घडले त्याच्या भीतीतून स्वत:ला मुक्त करा. योग्य आहार घ्या आणि व्यायाम करा व डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरोदरपणास उपयुक्त औषधे घ्या. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.

मी २० वर्षांची मुलगी आहे. मला एक मुलगा आवडतो, तोही माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे पण मला आता माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मग लग्न करायचं आहे. तो लग्नासाठी खूप दबाव आणत आहे आणि मी नकार दिल्यावर त्याने माझ्याशी बोलणेही थांबवले आहे. मी काय करू?

तुम्ही एकदम बरोबर आहात. आजकाल मुलींनी सर्वप्रथम त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यासाठी आपल्या प्रियकराला समजावण्याचा प्रयत्न करा. जर तो सहमत नसेल तर हीच वेळ आहे आपण शिकण्याची, म्हणजे करिअर करण्याची. तुमचे करिअर बॉयफ्रेंडपेक्षा महत्त्वाची आहे. आता जर तुम्ही फक्त आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले तर ते अधिक चांगले होईल.

माझा प्रियकर खूप संशयी आहे. प्रत्येक क्षणी माझ्यावर लक्ष ठेवतो आणि माझे कोणत्याही मुलाशी बोलणे त्यास आवडत नाही. खरेतर मी त्याला सर्व काही सांगते. सुरुवातीला मला असे वाटायचे की तो माझी काळजी घेतो, पण आता मला या नात्याने गुदमरल्यासारखे वाटते. मला नेहमी प्रश्न विचारणे, यामुळे मी कळसूत्री बाहुलीसारखे बनले आहे. जेव्हा मी ब्रेकअपबद्दल बोलते तेव्हा तो मला भावनिक ब्लॅकमेल करतो. मला हे सर्व संपवायचे आहे. मी काय करू?

ज्या व्यक्तिबद्दल आपणास आतापासूनच माहीत आहे की संशय घेणे त्याच्या स्वभावामध्ये आहे, तो आपल्याला गुलाम बनवू इच्छित आहे आणि आपल्या स्वातंत्र्याच्या मार्गामध्ये खूप मोठा अडथळा ठरू शकतो, तर अशा व्यक्तिबरोबर आयुष्यात खूप लांबचा प्रवास केला जाऊ शकत नाही.

जेव्हा आपण या नात्यात शांती आणि आनंद मिळवू शकत नसाल तर मग सारे आयुष्य त्याच्याबरोबर राहून तडफडण्यापेक्षा चांगले हे आहे की आपण आताच त्याच्यापासून विभक्त होण्याचे ठरवायला हवे.

त्याच्या भावनिक गोष्टी आपल्याला असा निर्णय घेण्यास थांबवतील, परंतु आपण आपल्या निर्णयावर ठाम रहायला हवे. हळूहळू तोदेखील समजेल आणि योग्य अंतर ठेवेल. जर तरीही तो सहमत नसेल तर संपूर्ण गोष्ट आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगा.

आरोग्य परामर्श

* रिता बक्षी, स्त्रीरोग तज्ज्ञ, इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर

प्रश्न : मी ५३ वर्षीय महिला आहे. माझा मेनोपॉज अजून आला नाही आहे. मला माहीत करून घ्यायचे आहे की शरीर या बदलाकडे वाटचाल करत आहे का?

उत्तर : मेनापॉजचे सरासरी वय ४५ ते ५५ वर्ष असते, म्हणून शक्यता आहे की तुमचीसुद्धा या बदलाकडे वाटचाल होत असावी. असे आवश्यक नाही की सगळयाच महिलांचा मेनापॉज या वयात यायला हवा. अनेक अशी कारणं आहेत जी याला प्रभावित करतात. जसे ताण, दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार इत्यादी. जर तुम्हाला काही लक्षणं जसे योनीमार्गाचा शुष्कपणा, त्वचा कोमेजणे, पोटावर सूज, थकवा आणि मूड स्विंग अनेकदा जाणवत असेल तर, शक्यता आहे की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहे. असे होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि एखाद्या स्त्री रोगतज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मी ४८ वर्षांची महिला आहे. मी कामेच्छा प्रबळ होण्यासाठी सप्लीमेंट घेऊ शकते का? ४-५ वर्षांपूर्वी आंशिक हिस्टे्रक्टॉमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्यात मेनोपॉजची लक्षणं जाणवत आहेत. मला असे वाटते की सर्वात स्पष्ट लक्षण सेक्स ड्राइव्ह कमी होणे हे आहे. सांगा मी काय करू?

उत्तर : लिबीडो म्हणजे कामेच्छा कमी होणे, मेनोपॉजदरम्यान अत्यंत सामान्य असते आणि यात अनेक गोष्टी आपले योगदान देत असतात. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होणे हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. हार्मोनल चेंज शरीरावर मोठा ताण आणतो, म्हणून ऊर्जेचा स्तर कमी होतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे आपल्या मन:स्थितीला प्रभावित करु शकते. यासाठी जडीबुटी, मॅका आणि ब्लॅक रास्पबेरीचे सेवन लाभकारक होऊ शकते.

प्रश्न : मी ४० वर्षीय महिला आहे आणि माझा मेनोपॉज काळ सुरु झाला आहे. लवकर मेनोपॉज आल्याने माझ्या पोटावर खूप ब्लॉटिंग होत आहे. मी काय करू?

उत्तर : मेनोपॉजमध्ये सूज, ब्लॉटिंग अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा त्रास इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एस्ट्रोजन हार्मोनचा खालावता स्तर, पचनाला प्रभावित करू शकतो, ज्यामुळे सर्व काही मंदगतीत चालते. यामुळे सूज येते. खालावता एस्ट्रोजनचा स्तर कार्बोहायड्रेटच्या पचनावरसुद्धा परिणाम करू शकतो, ज्यामुळे स्टार्च आणि शुगरचे पचन होणे आणखी कठीण जाते व यामुळे अनेकदा थकवासुद्धा जाणवू शकतो.

रोज नियमित चालणे तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल. यामुळे तुमची पचनशक्ती बळकट होईल. याशिवाय खोल श्वास घ्या आणि शरीराला टोन करा. पास्ता, केक, बिस्कीट आणि पांढरे तांदूळ खाणे टाळा. जर दीर्घ काळ हे दुखणे बरे झाले नाही तर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा.

प्रश्न : माझा मेनोपॉज सुरु झाला आहे. मी फॅमिली प्लॅनिंगबाबत सतर्क असायला हवे का?

उत्तर : तुमचा मेनापॉज आताच सुरु झाला आहे. त्यामुळे शक्यता आहे की १ वर्षांपासून तुमची मासिक पाळी आली नसेल. अशावेळी जेव्हा महिलेची वर्षभर मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्यांनी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कंडोम वगैरेचा वापर करायला हवा. मेनोपॉजनंतरसुद्धा स्त्रियांमध्ये लैंगिक संक्रमणाची जोखीम कमी करण्यासाठी कंडोम इत्यादीचा वापर करत रहायला हवे.

प्रश्न : तीन महिन्यांपासून माझी मासिक पाळी आली नाही आहे. आता एकदम एक आठवडयापासून ब्लीडींग होते आहे. हे बरोबर आहे की चूक आणि अशा परिस्थिती मी काय करायला हवे?

उत्तर : अनेक महिलांमध्ये कितीतरी महीने एवढेच नाहीतर वर्षभरसुद्धा मासिक पाळी येत नाही आणि नंतर परत सुरु होते. हा बदल तेव्हाच होतो जेव्हा हार्मोन, ताण, अती व्यायाम, आहारात बदल होतो. अशा परिस्थितिचा सामना करण्यासाठी तुम्ही थोडया दिवसांसाठी आयर्न टॉनिकचा आधार घ्या. जर तरीही या समस्येतून सुटका झाली नाही तर लवकरात लवकर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटा.

प्रश्न : मेनोपॉजच्या काळात मी कसा आहार घ्यायला हवा? मी खूप ठिकाणी याबाबत वाचले आहे, पण अजूनपर्यंत एखाद्या योग्य आहारापर्यंत पोहोचले नाही. कृपया सांगा की या परिवर्तनादरम्यान कसा आहार घ्यायला हवा?

उत्तर : मेनोपॉज संपूर्ण शरीरावर फार मोठा परिणाम करत असतो. म्हणून जितकी जास्त तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्याल तेवढे उत्तम. ताजी फळं, ब्राऊन राईस, मोड आलेली कडधान्य असलेला आहार आपल्या जेवणात जास्त समाविष्ट करा. गव्हाच्या पिठाचे सेवन कमी करा, कारण काही महिलांमध्ये गव्हाचे पचन करण्याची प्रक्रिया मंदावते आणि वजन वाढू लागते. आपल्या आहारात जास्त प्रथिने आणि जर तुम्ही शाकाहारी नसाल तर मांस आणि मासेसुद्धा खाऊ शकता. जर शाकाहारी असाल तर दररोज प्रोटीन शेक पिऊ शकता. पण हे निश्चित करा की यात साखर कमी वा नसल्यातच जमा असावी.

प्रश्न : मी ५७ वर्षाची आहे. मेनोपॉजमुळे माझ्या चेहऱ्यावर खूप केस उगवत आहेत. मला सांगा की मी काय करायला हवे?

उत्तर : मेनोपॉजचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. नकोसे केस उगवणे यापैकी एक आहे. बॉटनिकल सप्लिमेंट्स मेनोपॉजच्या भक्ष्य असलेल्या महिलांमध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण नियंत्रित करते.

सौंदर्य समस्या

* शंकाचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा, यांच्याकडून

माझ्या डोक्यावर खूप कमी केस आहेत. ते पातळ, मऊ आणि तेलकट आहेत. स्विमिंग केल्यानंतर केस निर्जीव आणि कोरडे होतात. त्यांना निरोगी राखण्यासाठी मी काय करू? कृपया हेसुद्धा सांगा की हेअरस्टाइल करताना केसांमध्ये बाउन्स आणण्यासाठी काय केलं पाहिजे?

स्विमिंग पूलमध्ये पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. यामुळे केस निर्जीव आणि कोरडे बनतात. जेव्हा तुम्ही शॉम्पूने केस धुवाल तेव्हा केसाच्या टोकांना कंडीशनर नक्की लावा. केस लहानपणापासूनच पातळ असतील तर काही उपाय करणं कठीण आहे.

हवं तर काही घरगुती करू शकता. दह्यामध्ये मेथी पावडर, आवळा आणि शिकेकाई भिजवून घ्या. या मिश्रणामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं तेल घालून उकळून घ्या. जेव्हा हे लिक्विड अर्ध होईल, तेव्हा ते गाळून त्याने केसांना मालिश करा. यांसह प्रथिनयुक्त आहार घ्या. याशिवाय हेअरस्टाइल करण्याआधी केसांना जेल मूज लावा. त्यानंतर सगळे केस पुढे घेऊन फ्लॅट फणीने केस विंचरा. मग केस मागे घेऊन झाडा. असं केल्याने केसांमध्ये बाउन्स येईल. स्काल्पपासून वर बोटे फिरवल्यानेही केस बाउन्सी होतात.

मी २४ वर्षांची आहे. माझ्या हाताच्या आणि मानेच्या काही भागात टॅनिंग झालं आहे. काही अँटी टॅनिंग क्रिम्स वापरून पाहिल्या. पण काहीच फरक पडला नाही. कृपया सांगा मी काय करू?

तुम्ही २० दिवसांतून एकदा ब्लिच करून घेऊ शकता. यामुळे टॅनिंग निघून जाईल आणि त्वचासुद्धा सॉफ्ट होईल. घरगुती उपाय म्हणून ओट्समध्ये पाइनअॅप्पल ज्यूस आणि स्ट्रॉबेरी पल्प मिसळून हात आणि मानेवर स्क्रब करा. पाइनअॅप्पल ज्यूसमुळे रंग उजळेल आणि स्ट्रॉबेरीमुळे त्वचा चमकेल.

माझं वय १९ वर्षं आहे. माझी त्वचा खूप तेलकट आहे. कडक ऊन असल्यावर चेहरा मेकअपनंतर एक-दोन तासांतच काळा पडू लागतो आणि चिकट होतो. कृपया काहीतरी घरगुती उपाय सांगावा?

तुम्ही मेकअपच्या फक्त वॉटरप्रुफ प्रोडक्ट्सचाच वापर करा. यामुळे मेकअप उतरणार नाही आणि चेहरा फ्रेश दिसेल. याशिवाय पर्समध्ये टू वे केक किंवा लूज पावडर टचअपसाठी ठेवू शकता. एक चमचा मुलतानी मातीमध्ये नारळ पाणी घालून ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. या पॅकमुळे पोर्स बंद होतील आणि घामही येणार नाही.

माझं वय २० वर्षं आहे. माझे केस दाट आहेत, पण खूप कोरडे आणि द्विमुखी आहेत. मी हेअर स्पा आणि हेअर कटही वरचेवर करते. पण काहीच फरक पडत नाही. कृपया काहीतरी घरगुती उपचार सांगा?

केस जास्त स्ट्राँग केमिकलयुक्त शॉम्पूने धुतल्यामुळे आणि योग्य पोषण न मिळाल्याने केस द्विमुखी आणि कोरडे होतात. यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा आवळा किंवा भृंगराज तेलाने मालिश करा. प्रत्येकवेळी केस धुतल्यावर कंडीशनर लावा आणि केसांना माइल्ड हर्बल शॉम्पूनेच धुवा. द्विमुखी केस एखाद्या ब्यूटीपार्लमध्ये जाऊन कापून घ्या. द्विमुखी आणि कोरड्या केसांचं कारण कुपोषणही असते. त्यामुळे योग्य प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घ्या.

मी २४ वर्षांची आहे. माझी नखं पिवळी दिसतात. मला नेहमी त्यावर नेलपेंट लावून ठेवावी लागते, सुरूवातीला नखे थोडीफार पिवळी दिसत होती. आता जास्त पिवळी दिसत आहेत आणि कुरुप वाटत आहेत. त्यांचा खरा रंग कसा परत आणता येईल?

शरीरात कॅल्शिअम आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे नखं पिवळी पडू शकतात. तुमच्या आहारात दूध कमी असेल तर त्याचं प्रमाण वाढवा. शक्य असेल तर रोज एक अंडं खा. जर तुम्ही कॅल्शिअमयुक्त आहार योग्य प्रमाणात घेत असाल तर ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त आहाराचेही योग्य सेवन करा. शरीरात कॅल्शिअम नीट मिसळण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व आवश्यक आहे. नखांचा पिवळेपणा वाढत असेल तर नेलपेंट चांगल्या दर्जाची वापरा. निकृष्ट दर्जाच्या नेलपेंटचा रंग नखांवर उरतो आणि नखं पिवळी दिसू लागतात. याशिवाय नेलपेंट लावण्याआधी नखांवर बेस कोट लावा.

माझं वय २५ वर्षं आहे. माझी त्वचा खूप कोरडी आहे. मेकअप करूनही काही फरक पडत नाही. कृपया सांगा मी काय करू?

मेकअपने कोरड्या त्वचेवर काहीही परिणाम होत नाही. मेकअप करण्याआधी तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ धुवून तिला काही मिनिटे मॉश्चरायज करा. याशिवाय ३-४ बदाम रात्रभर दूधात भिजवून ठेवा. सकाळी ते किसून त्यात केओलिन पावडर आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून स्क्रब करा, यामुळे त्वचा नरिश आणि मॉश्चराइज होईल.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर श्वेता गोस्वामी

प्रश्न : माझं वय ३४ वर्षं आहे. मला एक ५ वर्षांचा मुलगादेखील आहे. मला पीरिएड्सनंतर हलकासा घट्ट असा पांढरा पाण्यासारखा डिस्चार्ज व्हायचा. वारंवार लघवीला जावं लागायचं. डॉक्टरांना दाखविल्यानंतर समजलं की तांदळाच्या दाण्यासारख्या मूतखड्याची तक्रार आहे, ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे बरं झाल्यानंतर मला पुन्हा आई व्हायचंय. परंतु माझा मुलगा जेव्हा दीड वर्षांचा होता तेव्हा मी गर्भपात केला होता. तेव्हापासून मी गर्भवती झालेली नाही. मला लवकरच दुसरं मूल हवंय. पुन्हा आई होण्यासाठी मी कोणते उपचार करून घ्यायला हवेत? माझं पहिलं मूल सिझेरियनने झालं होतं?

उत्तर : तुम्ही आता गर्भवती होऊ शकता परंतु सुरक्षित गर्भधारणेसाठी मूतखडा काढायला हवा. कदाचित तुमची फॅलोपियन टयूब बंद झाली असावी ज्यामुळे तुम्ही गर्भपातानंतर गर्भवती होऊ शकला नाहीत. यासाठी तुम्हाला एक्स रे, ज्याला एलएसजी म्हणतात, ते करायला हवं. यामुळे तुम्हाला लॅप्रोस्कोपीची गरज आहे का आयवीएफची ते समजेल.

तुमच्या पतींच्या सेमेनचीदेखील तपासणी करून घ्या. तुमचे रिपोर्ट नॉर्मल असतील तसंच तुमची फॅलोपियन ट्यूब उघडी असेल तर इंट्रायूट्रीन इंसेमिनेशन करू शकता. हे सर्व करायला अधिक खर्च येत नाही. ३ ते ६ सायकलमध्ये हे पूर्ण होऊ शकतं. जर आययूआय टेस्ट फेल झाली तर तुम्ही आयवीएफ पद्धतीचा अवलंब करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे उपचार एखाद्या खास फर्टिलिटी सेंटरमधूच करुन घ्या.

प्रश्न : मी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. आता मी आणि माझे पती परिवार नियोजनासाठी तयार नाही आहोत. मला हे जाणून घ्यायचंय की जर मी गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन सुरू केले तर माझ्या पतींनादेखील कंडोमचा वापर करावा लागेल का?

उत्तर : जन्म नियंत्रक क्रिया म्हणजेच गर्भनियंत्रक गोळी आययूएस वा गर्भनिरोधक इंजेक्शन इत्यादी नको असलेला गर्भ रोखण्यात प्रभावी आहे. परंतु हे सर्व यौनरोग वा यौनसंक्रमणपासून कोणत्याही प्रकारचं संरक्षण देत नाहीत तर कंडोमपासून यौनरोगांपासून संरक्षण होतं आणि नको असलेल्या गर्भ समस्येचंदेखील निराकरण होतं. म्हणून सुरक्षित यौनसंबंधांसाठी कंडोमचा वापर करणं योग्य ठरेल.

प्रश्न : माझं वय २४ वर्षं आहे. मी एका कन्सल्ट्न्सीमध्ये काम करते. माझ्या प्रियकरासोबत माझे शारीरिकसंबंध होते. यासाठी आम्ही सुरक्षेचीदेखील खास काळजी घ्यायचो. परंतु मला अजूनही भीती वाटते. कृपया मदत करा.

उत्तर : तुम्ही एका चांगल्या स्त्री-रोगतज्ज्ञांकडे जा आणि तुमची तपासणी करून घ्या. तुमच्या गर्भावस्थेची चाचणीदेखील केली जाऊ शकते.

प्रश्न : मी ३३ वर्षांची असून मी आणि माझे पती बाळासाठी प्रयत्न करत आहोत. माझ्या मासिकपाळीची तारीख उलटून पाच दिवस झाले आहेत. मी प्रेगनन्सी टेस्ट करू शकते का?

उत्तर : नॉर्मल यूरिन प्रेगनन्सी टेस्ट पीरिएड मिस झाल्याच्या १५ दिवसांनंतरच करायला हवी तेव्हाच पिझटिव रिझल्ट येतो. परंतु तुमच्याजवळ दुसरा ऑप्शनदेखील आहे की तुम्ही ब्लड बीएचसीजीची टेस्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही प्रेग्नण्ट आहात की नाही ते समजेल.

प्रश्न : मी ३९ वर्षांची आहे. गेल्या ३ महिन्यांपासून मी नोवेलॉन औषध घेतेय; कारण माझ्या उजव्या ओवरीमध्ये सिस्ट आहे. या औषधांनी सिस्ट जाईल का? कृपया मला गर्भधारणा होण्यासाठी कोणती ट्रीटमेण्ट घ्यायला हवी तेदेखील सांगा?

उत्तर : तुम्हाला सोनोग्राफी करून घ्यायला हवी. यामुळे तुमच्या सिस्टच्या आकाराची माहिती मिळेल आणि एकदा फर्टिलिटी स्पेशालिस्टलादेखील दाखवायला हवं. त्यामुळे ते तुम्हाला सायकल प्लॅन करण्यात तुम्हाला मदत करू शकतील आणि लॅप्रोस्कोपीच्या मदतीने तुम्हाला तुमच्या रिप्रोडक्टिव ऑर्गनच्या कंडीशनची माहिती मिळेल.

प्रश्न : माझे वय ३० वर्षं आहे. मी शारीरिकरित्या निरोगी आहे आणि माझ्या वैद्यकीय तपासण्यादेखील करून घेतल्या आहेत. तरीदेखील नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करू शकत नाहीए. बीजाणूंशिवायदेखील पीरिएड्स येऊ शकतात?

उत्तर : होय, असं होऊ शकतं की बीजांडाशिवायदेखील पीरिएड येऊ शकतो. तुम्हाला जर नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन फॉलिकल्सची वाढ आणि बीजांडासंबंधित तपासणी करून घ्यायला हवी.

प्रश्न : माझं वय ३० वर्षं असून पतींचं वय ३३ वर्षं आहे. आम्ही दोघेही निरोगी आहोत. आम्ही गेल्या दीड वर्षांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु गर्भधारणा होत नाहीए. माझं मॅसुरेशन सायकलदेखील सामान्य आहे. कृपया योग्य सल्ला द्या.

उत्तर : कधीकधी बाळाच्या जन्मापासून त्रास उद्भवू शकतो. तरीदेखील तुम्ही दोघांनी एकदा स्त्री-रोगतज्ज्ञांना दाखवायला हवं आणि तुमच्या बीजांडाच्या दिवसांबद्दल माहिती घ्यायला हवी. एकदा तुमच्या पतींची टेस्टदेखील करून घ्या.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

  • माझी त्वचा ऑईली आहे. मी हिवाळयात सनस्क्रीन लावणे योग्य ठरेल का?

ऋतू कोणताही असो, युवी किरणांचा परिणाम आपल्या त्वचेवर होतच असतो. अनेकदा उन्हापासून संरक्षण करायला सामान्य उपाय आपण अंगीकारल्यावर त्वचेवर त्याचा परिणाम होतो. यापासून वाचण्याचा एकच उपाय आहे की घराबाहेर निघण्याआधी सनस्क्रीन क्रीम अथवा लोशनचा वापर अवश्य करा. तुम्ही सनस्क्रीनचा वापर न करता तीव्र उन्हात गेलात तर त्वचा होरपळण्याची शक्यता १५ पट अधिक वाढते.

  • माझे वय २८ वर्ष आहे. मला घरातच पेडिक्यूर करायची कृती माहीत करून घ्यायची आहे?

पेडिक्योर करायला सर्वात आधी तुम्ही नेलपॉलिश काढा. त्यानंतर कोमट पाण्यात तेल किंवा बाथ सॉल्ट मिसळून त्यात पाय भिजवा तुम्हाला हवे असेल तर घरात असलेले शाम्पूसुद्धा वापरू शकता. आता पाय पाण्याबाहेर काढा आणि नेलकटरने ओल्या आणि नाजूक नखांना चौकोनी आकारात कापा. याने तुमच्या नखांचा आकार छान दिसेल. प्युमिकस्टोन तुमच्या पायांवर जिथे कडक त्वचा असेल तिथे घासा जेणेकरून अशी त्वचा निघून जाईल. त्यानंतर चांगल्या प्रतीचे फूट क्रीम आणि फूट स्क्रबने संपूर्ण पायाला मसाज करा. स्क्रब घरीसुद्धा बनवू शकता. यासाठी २ चमचे साखर, १ चमचा जैतुन तेल, १ चमचा मध, १ चमचा लिंबाचा रस आणि २ चमचे बाजारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ एकत्र करून स्क्रबप्रमाणे वापरा. आता पाय एखाद्या स्वच्छ टॉवेलने पुसून कोरडे करा. आता तुम्हाला जे नेलपॉलिश आवडते ते लावा. पाय सुंदर आणि कोमल वाटू लागतील.

  • एलोवेराच्या पानांऐवजी ताजे एलोवेरा जेल रोज वापरले जाऊ शकते का? जर हो, तर याचे काय फायदे आहेत?

तुम्ही असं करू शकता. याने पिंपल्स आणि टॅनिंग नाहीसे होते. गळणारे केस आणि केसातील कोंडयापासून मुक्ती मिळते. हे नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यास तुम्हाला मदत करेल. हे एक उत्तम मॉइश्चरायजर आहे. कोणत्याही त्वचेच्या प्रकारात तुम्ही हे वापरू शकता. फक्त तुम्हाला याची अॅलर्जी होता कामा नये.

  • माझी नखं पिवळी दिसू लागली आहेत. मी यांची नैसर्गिक चमक परत कशी आणू?

नखांना चमकदार बनवण्यासाठी १ लहान चमचा जिलेटीन गरम पाण्यात टाका. पाणी थंड होऊ द्या. यात सिट्रिक ज्यूस टाका. नंतर नखं स्वच्छ करून पाण्यात बेकिंग सोडा मिसळा आणि १५ मिनीटं हात यात टाकून ठेवा. यानंतर कापसाच्या बोळयाने पुसा. याने पिवळेपणा नाहीसा होईल. डिटर्जंट आणि साबणाच्या वापरानंतर नखांना रोज मसाज क्रीम लावा. क्रिम लावल्यावर कापसाने हळुवार पुसा. रात्री झोपण्याआधी कोणत्याही तेलाने हातांना हलका मसाज करा.

  • माझे वय २१ वर्ष आहे. माझ्या चेहऱ्यावर ५ वर्षांपासून अॅक्ने आहेत आणि कपाळावर काळपटपणा आला आहे. काही उपाय सांगा?

जेवणात जास्त स्निग्ध पदार्थ, खुप गोड, स्टार्च, मसाले यांचे प्रमाण मर्यादित ठेवा. फायबरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन करा. असे पदार्थ आपल्या जेवणात घ्या, ज्यात झिंक भरपुर प्रमाणात असेल. आंबट पदार्थ जसे लो फॅट दही भरपुर प्रमाणात खा. प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि आयोडीन मीठ कमी वापरा. रोज कमीतकमी ८-१० ग्लास पाणी प्या. शक्य तितके त्वचेला ऑयली होऊ देऊ नका. केसांना स्वच्छ ठेवा, अॅक्नेसाठी हर्बल साबण वापरा, ज्यात सल्फर असेल. त्वचेला चांगले धुवा, परंतु जास्त चोळू नका. जास्त चोळल्यास अॅक्ने पसरतात. पोटॅशियमयुक्त केळाचे साल खूपच पररिणामकारक असते. हे चेहऱ्यावर चोळल्यास ना केवळ डाग नाहीसे होतील तर ओपन पोअर्ससुद्धा हळूहळू भरू लागतील.

  • बदलत्या ऋतूमुळे माझे पाय खूप ड्राय होत आहेत. खरंतर मी मॉइश्चरायजर लावते कृपया काही घरगुती उपाय सांगा, ज्याने माझ्या पायाची त्वचा नैसर्गिक उपायांनी मुलायम होईल?

पायांची स्वच्छता नियमित करायला हवी. यासाठी तुम्ही  स्वच्छतेशिवाय पेडिक्योरसुद्धा करू शकता. एका स्वच्छ टबमध्ये कोमट पाणी टाका. त्यानंतर आपल्या आवडीचे क्रीम किंवा मीठ या पाण्यात टाका. तुमच्या पायाची त्वचा रुक्ष आहे, म्हणून त्यात ऑलिव्ह ऑइलसुद्धा टाकू शकता. मिठाने पायाची त्वचा मऊ पडते. ऑलिव्ह ऑइल एका मॉइश्चरायजरप्रमाणे काम करते. कमीतकमी १०-१५ मिनिटं पाय पाण्यात ठेवल्यावर बाहेर काढा. पायांच्या बोटांमध्ये साबण लागून राहणार नाही याकडे लक्ष ठेवा. या नंतर बॉडी स्क्रबरने स्क्रब करा. स्क्रब केल्यावर थंड पाण्याने पाय चांगले स्वच्छ करा. कोल्ड क्रीमने पायांना हळुवार मसाज करा.

  • माझे वय २२ वर्षं आहे. माझी त्वचा ऑयली आहे. मी माझ्या त्वचेनुसार कोणत्या प्रकारचे फेशियल करायला हवे?

ऑयली त्वचेसाठी  मॉइश्चरायजर आणि क्रीमयुक्त फेशियल अजिबात योग्य नसते. अशा त्वचेसाठी सगळयात आधी स्क्रबने क्लिंजिंग करा आणि नंतर टोनिंग. जर चेहऱ्यावरील पोअर्स फार मोठे असतील तर तुमच्यासाठी पर्ल आणि सिल्वर फेशियल सर्वात चांगले ठरेल

गृहशोभिकेचा सल्ला

 

मी २० वर्षीय तरूण आहे. मी सुरुवातीपासूनच खूप अंतर्मुख स्वभावाचा आहे. खूप कमी लोकांशी माझी मैत्री आहे. अर्थात, कुटुंबातही आईवडिलांशिवाय दुसरं कोणीही नाहीए आणि ते दोघंही नोकरदार आहेत. त्यामुळे घरीही मी जास्त वेळ एकटाच असतो. साहजिकच याच कारणामुळे मी लोकांत पटकन मिसळत नाही. माझी छबी शाळा आणि कॉलेजमध्ये एक अभ्यासू किंवा असं म्हणा की पुस्तकातील किडा अशीच राहिली आहे. माझ्यासोबतची मुले कॉलेजमध्ये मौजमस्ती करत असत. नवनवीन गर्लफ्रेंड्स ठेवत असत. उलट माझे या गोष्टीकडे कधी कलच नव्हता. घरातल्यांचीही इच्छा होती की मी चांगले ग्रेड्स मिळवावे. मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यात गुंतलो आहे.

गेल्या महिन्यात कुणास ठाऊक कसे, एका मुलीचे फ्रेंडशिप प्रपोजल मी कसं स्वीकार केलं, तेही फेसबुकवर. काही दिवसांच्या मैत्रीतच आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आम्ही रोज भेटू लागलो होतो.

एके दिवशी तिने डिनरची फर्माइश केली आणि त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये संबंधही ठेवले. माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता. त्यामुळे मी एवढा कामोत्तेजित झालो होतो की सुरक्षेसाठी कंडोमचाही वापर केला नाही.

आठवड्याभरापूर्वी एका मित्राद्वारे कळलं की माझ्या या मैत्रिणीने अनेक लोकांशी संबंध ठेवले आहेत. हे सत्य कळल्यानंतर मी तिला भेटणं बंद केलं. सर्व संबंध संपवून टाकले. अगदी चॅटिंग, फोन वगैरेही. परंतु या गोष्टीबाबत खूप काळजीत आहे की त्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे मला एड्स तर होणार नाही ना?

त्या मुलीशी संबंध तोडून आपण समजदारपणाचे काम केले आहे. अशा प्रकारच्या मुली सरळसाध्या तरुणांना फसवून ऐश करतात आणि अनेकदा त्याबदल्यात लैंगिक रोगांची भेटही देतात.

मी ४२ वर्षीय विवाहित आहे. विवाहाला १६ वर्षे झाली आहेत. २ मुलं आहेत. सुखी आणि संपन्न दाम्पत्य जीवन आहे. ३ महिने आधीपर्यंत मी स्वत:ला एक यशस्वी गृहिणी आणि पतिची प्रेयसी समजत होते,   पण एके दिवशी कळलं की पती जेव्हा अनेक दिवसांसाठी टूरवर जातात, तेव्हा तिथे (मुंबईत) कुठल्यातरी कॉलगर्लबरोबर मजा करतात.

आता हे सत्य कळल्यावर माझी झोपच उडाली आहे. मला स्वत:चाच राग येऊ लागला आहे. मी ज्या पतिवर डोळे झाकून विश्वास ठेवत राहिले, त्यांनी माझा विश्वासघात केला. मी त्यांच्याशी याबाबत काही बोलले नाहीए, पण मनातल्या मनात कुढत आहे. मला कळत नाहीए की या स्थितीत स्वत:ला कशी सावरू? माझ्या पतिने चिडलेला मूड आणि काळजीत असलेला चेहरा पाहून अनेकदा विचारलं, पण तब्येत बरी नसल्याचे सांगत टाळलं. कृपया मला सांगा, मी काय करू?

तुमचं काळजीत पडणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही काळजीत किंवा तणावग्रस्त होऊन समस्या संपणार नाही. त्यासाठी आपल्याला स्वत:ला प्रयत्न करावे लागतील. पतिला समोर बसवून त्यांच्याशी बोला. त्यांना समजवा की अशा प्रकारचे वागणे अनुचित तर आहेच, पण त्यांच्या स्वत:च्या हिताचेही नाही. कॉलगर्ल्सचे अनेक पुरुषांशी संबंध असतात आणि त्यांच्याशी संबंध बनवल्याने एड्ससारखा आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे त्यांनी या व्यभिचारापासून दूर राहिले पाहिजे. त्यांना प्रेमाने, रागाने कसेही समजावा आणि हेही सांगा की जर त्यांनी ही गोष्ट संपवली नाही, तर तुम्ही त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणार नाहीत.

मी बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे आणि अॅक्टर बनायची इच्छा आहे. मी नाटकात काम करतो. मोठमोठ्या ऑडिटोरियम्समध्ये शो केले आहेत. अॅक्टर बनण्यासाठी मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घ्यायला हवा का? जर तसे असेल, तर त्यासाठी मला काय करायला हवं आणि त्या प्रशिक्षणानंतर मी अॅक्टर बनू शकेन का?

आपली ही चांगली हॉबी आहे. जर भविष्यात तुम्हाला यातच करियर करायचं असेल, तर बीएचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण आपल्या या मनपसंत कोर्ससाठी अॅडमिशन घेऊ शकता. याच्या माहितीबद्दलचा प्रश्न आहे, तर ती तुम्हाला इंटरनेटवर मिळू शकेल. आपल्याला सावध करतोय की अन्य क्षेत्रांच्या तुलनेत या क्षेत्रात प्रतिस्पर्धी खूप आहेत. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.

मी २४ वर्षीय तरुणी आहे. पतिचे वय २६ वर्षे आहे. आम्ही दोघांना सेक्सबाबत मुळीच ज्ञान नाही. विवाहाला ६ महिने झाले आहेत. तरीही आम्ही अजून नीटपणे सहवासाचे सुख घेतलेले नाहीए. पती जेव्हाही सहवासासाठी प्रवृत्त होतात,  मला भीतिमुळे सामान्य वाटत नाही. पती सहवास तर करतात, पण त्यांना वाटतं की ते बलात्कार करत आहेत. काय करू, जेणेकरून आम्हीही इतर दाम्पत्यांप्रमाणे सेक्सचा आनंद घेऊ शकू?

आपण विवाहितांसाठीचे सेक्स या विषयावर चांगले पुस्तक वाचले पाहिजे. त्यानंतर आपल्याला माहिती मिळेल की कसे संबंध बनवावेत. त्याबरोबरच सहवासासाठी प्रवृत्त होण्यापूर्वी आपण दोघांनी प्रणय, आलिंगन, चुंबन इ. रतिक्रीडा केल्या पाहिजेत. त्यामुळे कामोत्तेजना वाढते. त्यानंतर तुम्ही सहवास केल्यास आपल्याला जरूर सुख मिळेल. अर्थात, आपण आपल्या मनात काही पूर्वग्रह ठेवू नये.

लग्नाआधी कॉन्ट्रासेप्टिव पिल्स घ्यावेत की नाही

* सीमा ठाकूर

किशोरावस्थेत अनेकदा किशोरवयीन विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होऊन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक असतात. प्रेमाच्या नावाखाली सेक्स करतात, पण अज्ञानामुळे आवश्यक काळजी घेत नाहीत. परिणामी विविध प्रकारच्या लैंगिक आजारांचे शिकार होतात.

आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी १५ ते १९ वर्षांपर्यंतच्या १.६ कोटी मुली गर्भधारण करतात. या छोटया वयात गर्भधारणा करण्याचे सर्वात मोठे कारण त्यांचे अल्पज्ञान आणि प्रगल्भतेचा अभाव आहे. प्रोटेक्शनशिवाय सेक्स केल्याने सेक्शुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन सर्व्हायकल कॅन्सर आणि हायपरटेंशनसारखे आजार होण्याचा धोका असतो. हे आजार मुलगा व मुलगी दोघांनाही होऊ शकतात.

किशोरवयीनांमध्ये प्रेगनन्सी आणि असुरक्षित सेक्समुळे होणाऱ्या आजारांबाबत मूलचंद हॉस्पिटल, दिल्लीच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीता वर्मा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी किशोरवयीनांच्या वापरासाठी कॉन्ट्रासेप्टिव पिल्स आणि त्याच्या धोक्यांबाबत सविस्तर माहिती दिली :

कॉन्ट्रासेप्टिव पिल्स काय आहेत आणि त्या कधी व कशा घ्यायच्या?

या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव आहेत. यांना पोस्ट कोर्डल आणि मॉर्निंग आफ्टर पिल असेही म्हणतात. आय पिल एक हार्मोन आहे. याचा चांगला परिणाम तेव्हाच होतो, जेव्हा त्या सेक्सच्या १ तासाच्या आसपास घेतात. यांना ७२ तासांत दोनदा म्हणजे २४ तासांच्या कालावधीत घेतले जाते. इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिवची तेव्हा गरज असते, जेव्हा मुलीसोबत बलात्कार झालेला असतो. नको असलेल्या गर्भधारणेची भीती असेल किंवा कंडोम फाटले असेल. लोक विथड्रॉल टेक्निकचाही वापर करतात. यात जर अंडरएज इजॅक्यूलेशन झाले तर या पिलचा वापर करतात. पीरियड अनियमित असतील आणि तुम्ही सुरक्षेबाबत चिंतित असाल तर अशा स्थितीतही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव पिल्सची गरज असते.

एखाद्या मुलीला याची सवय झाली तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात?

नाही. याची सवय होऊ देऊ नका. याचे अनेक साईड इफेक्ट आहेत. मुलगी किशोरवयीन असेल तर सर्वात आधी तिला सेक्स एज्युकेशन असायला हवे. आजकाल ते नेटवरही उपलब्ध आहे. ८वी आणि ९वी इयत्तेच्या पुस्तकातही याची माहिती देण्यात आली आहे. मुलींना माहीत असायला हवे की या पिल कशाप्रकारे काम करतात. याचे डोस हेवी असतात. याचा मासिक चक्रावर परिणाम होतो. ते अनियमित होते. याशिवाय उलटया आणि चक्कर येणे, स्तनात दुखणे, पोटदुखी आणि अवेळी रक्तस्त्राव होऊ शकतो. जर तुम्ही सेक्शुअली अॅक्टिव्ह असाल तर तुम्ही कॉन्ट्रासेप्टिवचा प्रयोग केवळ इमर्जन्सीतच करायला हवा. याच्या साइड इफेक्टमध्ये सर्वात मोठा धोका ट्यूब प्रेगनन्सीचा आहे. म्हणून जर इमर्जन्सी असे म्हटले जात आहे तर केवळ इमर्जन्सीतच वापर करा. तसेही हे ९० टक्के परिणामकारक आहे. १०० टक्के नाही.

लग्नापूर्वी या पिलचा वापर केल्यास लग्नानंतर गर्भधारणेत काही अडचण निर्माण होते का?

मुलीने सातत्याने याचा वापर केला असेल तर नक्कीच परिणाम होईल. कधीतरी घेतल्यास हरकत नाही. त्यामुळे मासिकचक्रावर परिणाम झाला असेल तर त्रास होणे स्वाभाविक आहे, कारण तुम्ही ओवुलेशन प्रोसेस म्हणजे अंडे बनण्याची प्रक्रिया प्रभावित केली आहे. आय पिलचा जास्त वापर ट्यूब जे अंडे पकडून वर्बिलिटीला रिस्ट्रेट करते. त्यामुळे तुम्ही लग्नाआधी प्रत्येक वेळी ओवुलेशनला डिस्टर्ब केले असेल तर लग्नानंतर गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात.

बाजारात कोणत्या प्रकारच्या कॉन्ट्रासेप्टिव पिल आहेत, ज्यांचा वापर करता येईल?

भारतात फक्त पिल उपलब्ध आहेत, ज्या लिवोनोगेरट्रल आहेत. यात एक टॅब्लेट ७५० मायक्रोग्रॅमची असते. या २ टॅब्लेट २४ तासांच्या अंतरानंतर घेतल्या जातात. भारतात १५०० मायक्रोग्रॅमची टॅब्लेट अद्याप उपलब्ध नाही, कारण याचा डोस अत्यंत हेवी असतो. सध्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिवमध्ये आणखी एक औषध अंडर ट्रायल आहे, ज्याला यूलीप्रिस्टल म्हणतात. पण हे अद्याप अंडर ट्रायल असल्यामुळे याचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

या पिलशिवाय दुसरा चांगला पर्याय आहे का?

या पिल इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव तर आहेतच, याशिवाय आणखी अनेक बर्थ कंट्रोल आहेत. सर्वात चांगले कंडोमच आहेत. ते अनेक संसर्गजन्य आजारांपासून वाचवते आणि याच्या वापरामुळे इन्फेक्शनही होत नाही. याव्यतिरिक्त अन्य बर्थ कंट्रोल अॅप्लिकेशनही बाजारात आहेत, ज्यांचा वापर करता येईल, जसे की वेजिनल टॅब्लेट्स. यांचा वापर कंडोमसोबत करावा. फर्टाइल पीरियडमध्ये सेक्स केल्यास कंडोम आणि वेजिनल टॅब्लेट्स दोघांचा वापर करावा. आजकाल ओवुलेशन जाणून घेण्यासाठी किट्सही उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा. वेजिनल टॅब्लेट्स आणि कंडोम एकत्र वापरा.

कंडोम १०० टक्के सुरक्षित आहे का?

हो, जर याचा वापर योग्य प्रकारे केला तर हे बेस्ट कॉट्रासेप्शन आहे. मुली सेक्सदरम्यान वेजिनल टॅब्लेट्सचाही वापर करू शकतात, ज्यामुळे सुरक्षा डबल होईल.

जर आई होण्याच्या भीतिने मुलीने एकाऐवजी २ किंवा ३ टॅब्लेट्स खाल्ल्या तर याचे काय दुष्परिणाम होतील?

नाही, जे डोस जसे सांगितलेत तसेच घ्यावेत. औषधे स्किप करू नका आणि वेळेआधी किंवा जास्तही घेऊ नका. आय पिल घेतल्यानंतर ३ आठवडयांनंतरही सेक्सदरम्यान कंडोम वापरले नाही तर ट्यूब प्रेगनन्सीची शक्यता असते. ३ आठवड्यांपर्यंत पीरियड्स न आल्यास प्रेगनन्सी टेस्ट करा.

जर या पिलमुळे मुलीला त्रास होत असेल आणि याबाबत घरातल्यांना न सांगता ती गप्प राहात असेल तर याचे दूरगामी दुष्परिणाम होऊ शकतात का?

एखादी मुलगी सेक्शुअली अॅक्टिव्ह असेल आणि एखाद्या मुलासोबत सेक्स करू शकत असेल तर गुपचूप जाऊन डॉक्टरांशी कंसल्टही करू शकते. मुलगी कमावती असेल आणि शिकलेली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काय हरकत आहे? काहीही झाले तरी घरातल्यांपासून कुठलाही त्रास लपवू नये. कुणा ना कुणाशी तरी नक्की शेअर करायला हवे. पैसे नसतील तर सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर मोफत सल्ला देतात.

या पिलमुळे ट्यूब प्रेगनन्सीचा धोका असतो, जो जीवघेणा ठरू शकतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुरक्षित असूनही आय पिलमुळे गर्भाशयाबाहेरची प्रेगनन्सी होऊ शकते ज्यामुळे मुलीचा जीव धोक्यात येऊ शकतो.

तरुणांना सुरक्षित सेक्ससंबंधी काय सल्ला देऊ इच्छिता?

तरुणांना हे सांगायचे आहे की जर ते १८ वर्षांहून मोठे आहेत आणि सेक्स करत असतील तर यात काही गैर नाही, पण कंडोमचा वापर करायलाच हवा. असुरक्षित सेक्स एचआयव्ही, एसटीआय व सर्व्हायकल कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे कारण ठरू शकते. लव, अफेअर, सेक्स व फिजिकल रिलेशनशिप आपल्या जागी आहे आणि सुरक्षा आपल्या जागी. लाजू नका, उलट योग्य सल्ला घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

प्रश्न. मी २४ वर्षीय महिला आहे आणि ३ वर्षांच्या मुलीची आई आहे. मला पुढील २-३ वर्षांपर्यंत मूल नकोय. मी महिला कंडोमबाबत ऐकले आहे, पण त्याचा कधी वापर केला नाही. कृपया सांगा की महिला कंडोम काय आहे आणि किती सुरक्षित आहे?

उत्तर. सेक्सला रोमांचक आणि आनंददायी बनवण्यासाठी आजकाल बाजारात पुरुष कंडोमच नव्हे, तर महिला कंडोमही उपलब्ध आहेत. सुरक्षित सेक्ससाठी पुरुषच नव्हे, महिलाही याचा वापर करू शकतात.

महिला कंडोम गर्भनिरोधक म्हणून केवळ उत्तम पर्यायच नव्हे, तर सेक्सला सोपे आणि चिंतामुक्तही बनवतो. याबरोबरच लैंगिक संपर्कामुळे होणाऱ्या अनेक रोगांपासून संरक्षणासाठीसुध्दा सहायक असतो.

महिला कंडोम लांबट पॉलियुथेनची एक पिशवी असते, जी संबंध ठेवताना लावली जाते. याचा वापर करणे सहजसोपे असते. ही दोन्ही काठांनी लवचिक असते आणि यात सिलिकॉनवर आधारित चिकट स्त्राव लावलेला असतो. जेणेकरून सेक्स संबंधाच्या वेळी जास्त आनंद मिळेल.

पिशवीच्या कडेला लवचिक रिंग असते, जी वेजाइनाच्या आत टाकली जाते आणि पिशवीची मोकळ्या काठाची रिंग वेजाइनाच्या बाहेर असते. सामान्यपणे याचा काही साइड इफेक्ट नसतो. महिला कंडोमचा वापर सोपा आहे आणि हा पूर्णपणे सुरक्षितही आहे.

 प्रश्न. मी ३५ वर्षीय अविवाहित तरुणी आहे आणि एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लग्न करू शकले नाही किंवा असं म्हणा की माझी छोटी बहीण आणि छोट्या भावालाही शिकवून लायक बनवलं आणि बहिणीचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. अचानक वडील वारल्यानंतर जबाबदाऱ्या पार पाडत वेळ कधी निघून गेली कळलंच नाही. कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीत. त्यांनी अनेकदा लग्न करण्यासाठी माझ्यावर दबावही टाकला, पण प्रत्येक वेळी मी नकार दिला. इकडे १-२ वर्षांपासून मी एका मुलाच्या संपर्कात आहे. तो चांगल्या नोकरीला आहे, पण माझ्यापेक्षा २-३ वर्षे छोटा आहे. तो खूप चांगला आणि केयरिंग आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, पण मला या नातेसंबंधांबाबत भीती वाटते की घरातील लोक नाराज झाले तर. खरं आम्ही उच्च जातीचे आहोत आणि मुलगा मागास जातीतील. आई, भाऊ-बहिणीच्या नजरेत मी आदर्श आहे. अशा वेळी माझ्या लग्नाचा निर्णय योग्य राहील का? याबाबत मी घरात बोलू शकते का?

उत्तर. आजच्या मुली कोणापेक्षाही कमी नाहीत, हे आपण सिध्द केलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ज्याप्रकारे आपण कुशलतेने घराची जबाबदारी पार पाडली आहे, ती कौतुकास्पद आहे, पण तुम्ही स्वत:बाबत काहीच विचार केला नाही, हे दुर्दैव.

अजून वेळ जाण्यापूर्वी आपण लग्न केलं पाहिजे. मुलगा आपल्याला पसंत आहे आणि त्याला आपल्याशी लग्न करायची इच्छा आहे, तर ही चांगली गोष्ट आहे.

राहिला प्रश्न त्याच्या जातीचा तर आपण शिकलेल्या व जागरूक आहात. उच्च-नीच जाती, अस्पृश्यतासारख्या जुनाट परंपरांपासून स्वत:ला बाहेर काढा.

पत्रात आपण असं म्हटलेय की आपल्या कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीएत आणि आपल्यावर लग्नासाठी दबावही टाकत आहेत, तर सरळ आहे, आपल्या आनंदासाठी त्यांची या लग्नाला काही हरकत असणार नाही. जर कुटुंबातील लोक तयार झालेच नाहीत, तर आपण कोर्टमॅरेज करू शकता.

 प्रश्न.  मी ३२ वर्षीय घटस्फोटित महिला आहे. मी सुरुवातीपासूनच मुक्त विचारांची राहिले आहे आणि स्वत:चं आयुष्य मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवते. इकडे १-२ वर्षांपासून मी अनेक पुरुषांच्या संपर्कात राहिले. त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही बनले. गेल्या काही दिवसांपासून मला वेजाइनामध्ये खाज येते आणि नंतर तिथे लाल रॅशेसही होतात. १-२ वेळा मेडिकल स्टोरमधून औषध घेऊनही लावलं, पण काही फायदा झाला नाही. कृपया मी काय करू सांगा?

उत्तर. प्रत्येक महिलेला आपले आयुष्य आपल्या पध्दतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. नोकरी, पेहराव, खाणे-पिणे, एवढेच नव्हे, तर सेक्स संबंधांबाबतही महिला पहिल्यापेक्षा अधिक मोकळ्या झाल्या आहेत. आपला मुक्तपणे जगण्यावर विश्वास आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण यावेळी काळजी घेणेही आवश्यक आहे.

आपण आपल्या पत्रात हे सांगितलं नाहीए की, ज्या पुरुषांशी आपले सेक्स संबंध आले, त्यांनी आवश्यक सुरक्षा म्हणजेच कंडोमचा वापर केला होता की नाही? सेक्स संबंध तेव्हाच आनंददायक बनू शकतात, जेव्हा त्यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल. एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवताना कंडोमचा वापर फुकटात अनेक रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचण्याची सोपी पध्दत आहे.

जर वेजाइनामध्ये खाज अथवा जळजळ होत असेल, तर शक्य आहे की हे इन्फेक्शनमुळे होत आहे. त्यामुळे तपासणी केल्याशिवाय एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचणे सध्या योग्य होणार नाही. आपण एखाद्या विशेषज्ञ डॉक्टरांना भेटणे उत्तम होईल, जेणेकरून इन्फेक्शन अजून पसरणार नाही.

लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर्ससोबत संबंध ठेवणे अनेक लैंगिक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे.

आरोग्य परामर्श

* डॉ. श्वेता गोस्वामी, गायनोकॉलॉजिस्ट, जे. पी. हॉस्पिटल

प्रश्न. माझं वय २६ वर्षे आहे. प्रत्येक मासिक पाळी जवळपास ४ दिवस आधीच येते आणि त्यादरम्यान संपूर्ण शरीरात खूप वेदना होतात. सांगा, काय करू?

उत्तर. अनियमित मासिक पाळीची अनेक कारणे असू शकतात. उदा. अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, अति व्यायाम करणे, नशापान करणे, कुपोषण, अति तणाव, अधिक औषधांचे सेवन किंवा मग हार्मोनल असंतुलन. तपासणी केल्यानंतरच असे का होतेय, याचे योग्य निदान करता येईल. मासिक पाळीच्या काळात ब्लडप्रेशर चेक करा.

डॉक्टरांना आपल्या प्रत्येक समस्येबाबत सांगा. संकोच करू नका. त्यांच्याकडून आहाराबाबत माहिती घ्या. तेलकट व डबाबंद पदार्थ, चिप्स, केक, बिस्किटे, गोड पेय इ.चं अधिक सेवन करू नका. योग्य मासिकपाळीसाठी आरोग्यपूर्ण आहार गरजेचा आहे. धान्ये, मोसमी फळे, भाज्या, बदाम-पिस्ते, कमी फॅट्स असलेल्या दुधाने बनलेले पदार्थही आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करा. दिवसाची सुरुवात १-२ ग्लास पाण्याने करा. संपूर्ण दिवसभरात ८-१० ग्लास पाणी जरूर प्या. स्त्रीरोग तज्ज्ञांकडून आपली हार्मोनल तपासणी जरूर करवून घ्या.

प्रश्न. माझं वय २७ वर्षे आहे. पाळी येण्यापूर्वी पोटाच्या डाव्या बाजूला खूप वेदना होतात. याचे काय कारण असेल?

उत्तर. बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि खाण्या-पिण्यातील बदलामुळे नेहमीच महिलांना पाळीच्या काळात खूप वेदना होण्याची समस्या खूप सामान्य गोष्ट आहे. मासिकपाळी अनियमित असण्यानेही महिन्याचे ते दिवस खूप वेदनादायी असतात.

आपल्याला पोटाच्या विशिष्ट भागात वेदना होत असतील, तर याची तपासणी करणे आवश्यक आहे. अंडाशयातील गाठही वेदनेचे कारण बनते. अल्ट्रासाउंड करणेही आवश्यक आहे. संपूर्ण तपासणी केल्यानंतरच काही सांगता येईल

प्रश्न. माझं वय २४ वर्षे आहे. माझे माझ्या प्रियकराशी शारीरिक संबंध आले आहेत. अर्थात, आम्ही संबंधाच्या काळात सुरक्षेची काळजी घेत होतो. तरीही मला भीती वाटते की कुठे समस्या निर्माण होऊ नये. सांगा काय करू?

उत्तर. आपण गायनोकोलॉजिस्टकडून आपली तपासणी करून घ्या. आपल्या गर्भावस्थेची तपासणीही केली जाऊ शकते. त्याचबरोबर, आपल्याला हा सल्लाही देतो की भविष्यात स्वत:ला कधी अशा कृत्यात सामील करू नका.

प्रश्न. माझं वय २९ वर्षे आहे. माझी मासिकपाळी अनियमित आहे. त्याचबरोबर त्या दिवसांत खूप वेदनाही होतात. मी पीसीओएसने पीडित आहे का आणि मी आई बनू शकते का?

उत्तर. जर आपली पाळी अनियमित आहे व खूप जास्त गरमी लागण्याची आणि घाम येण्याची समस्या आहे, तर लवकरात लवकर एखाद्या फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्या. रक्ततपासणीत आपला फॉल्यिक्यूल स्टिम्यूलेटिंग हार्मोन २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला पीओएफचा धोका असू शकतो.

अर्थात, ही समस्या आनुवंशिक आहे. परंतु पर्यावरण आणि जीवनशैली उदा. धूम्रपान, दारूचं सेवन, दीर्घ आजारपण उदा. थायरॉइड, रेडियो थेरपी किंवा किमोथेरपी इ.ही याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे संपूर्ण तपासणी खूप आवश्यक आहे.

प्रश्न. माझं वय ३१ वर्षे आहे. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत, पण आम्हाला अजूनही संतानप्राप्ती झाली नाही. आम्ही तपासणी करण्याची गरज आहे का?

उत्तर. गर्भधारणा न होण्याची अनेक कारणे असू शकतात. आपण व आपल्या जोडीदाराने संपूर्ण तपासणी करून घेतली पाहिजे. जर इन्फर्टिलिटीचे कारण पतिमध्ये आढळले, तर याचा अर्थ असा आहे की ही समस्या आवश्यकतेपेक्षा कमी शुक्राणूंच्या निर्मितीशी संबंधित आहे. दुसरं कारण हेही असू शकते की पतिमध्ये शुक्राणूंची पुरेशी निर्मिती तर होते, पण ते आपल्या अंडाणूंपर्यंत पोहोचत नाहीत. महिलांमध्ये स्त्रीबीज जनन चक्रात समस्याही इन्फर्टिलिटीचे खूप मोठे कारण असते.

या समस्येमुळे महिलेमध्ये आवश्यक असलेल्या बीजांड निर्मिती होत नाही किंवा मग बीजांड निर्मिती प्रक्रियेमध्ये गडबड होऊ शकते. ज्या महिला थायरॉइडच्या समस्येतून जात आहेत, त्यांच्यामध्ये स्त्रीबीज जनन प्रक्रिया बाधित होते आणि त्यांच्यात गर्भधारणा होणे थोडे कठीण होते. परंतु कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी संपूर्ण तपासणी खूप आवश्यक आहे.

प्रश्न. माझ्या पत्नीच्या ओव्हरीमध्ये ७ सेंटीमीटरचे सिस्ट आहे. प्रेग्नंसीला ११ आठवडे झाले आहेत. आता होमियोपॅथिक औषधे चालू आहेत. कृपया सांगा कोणते औषध घेतले पाहिजे?

उत्तर. सिस्ट या अशा गाठी असतात, ज्या महिलांच्या गर्भाशयात किंवा त्याच्या आजूबाजूला निर्माण होतात. तसेही १६ ते ५० वर्षांपर्यंतच्या महिला कधीही या आजाराच्या विळख्यात सापडू शकतात. या गाठी वेगवेगळ्या आकाराच्या असतात. यांचा आकार तेव्हाच वाढतो, जेव्हा अॅस्ट्रोजनची पातळी वाढू लागते. उदा. गर्भावस्थेच्या काळात. यांचा आकार तेव्हा घटू लागतो, जेव्हा अॅस्ट्रोजनची पातळी घटू लागते. उदा. मोनोपॉजनंतर. एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडून संपूर्ण चेकअप करून घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें