* रिता बक्षी, स्त्रीरोग तज्ज्ञ, इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर
प्रश्न : मी ५३ वर्षीय महिला आहे. माझा मेनोपॉज अजून आला नाही आहे. मला माहीत करून घ्यायचे आहे की शरीर या बदलाकडे वाटचाल करत आहे का?
उत्तर : मेनापॉजचे सरासरी वय ४५ ते ५५ वर्ष असते, म्हणून शक्यता आहे की तुमचीसुद्धा या बदलाकडे वाटचाल होत असावी. असे आवश्यक नाही की सगळयाच महिलांचा मेनापॉज या वयात यायला हवा. अनेक अशी कारणं आहेत जी याला प्रभावित करतात. जसे ताण, दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार इत्यादी. जर तुम्हाला काही लक्षणं जसे योनीमार्गाचा शुष्कपणा, त्वचा कोमेजणे, पोटावर सूज, थकवा आणि मूड स्विंग अनेकदा जाणवत असेल तर, शक्यता आहे की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहे. असे होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि एखाद्या स्त्री रोगतज्ज्ञाला भेटा.
प्रश्न : मी ४८ वर्षांची महिला आहे. मी कामेच्छा प्रबळ होण्यासाठी सप्लीमेंट घेऊ शकते का? ४-५ वर्षांपूर्वी आंशिक हिस्टे्रक्टॉमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्यात मेनोपॉजची लक्षणं जाणवत आहेत. मला असे वाटते की सर्वात स्पष्ट लक्षण सेक्स ड्राइव्ह कमी होणे हे आहे. सांगा मी काय करू?
उत्तर : लिबीडो म्हणजे कामेच्छा कमी होणे, मेनोपॉजदरम्यान अत्यंत सामान्य असते आणि यात अनेक गोष्टी आपले योगदान देत असतात. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होणे हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. हार्मोनल चेंज शरीरावर मोठा ताण आणतो, म्हणून ऊर्जेचा स्तर कमी होतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे आपल्या मन:स्थितीला प्रभावित करु शकते. यासाठी जडीबुटी, मॅका आणि ब्लॅक रास्पबेरीचे सेवन लाभकारक होऊ शकते.
प्रश्न : मी ४० वर्षीय महिला आहे आणि माझा मेनोपॉज काळ सुरु झाला आहे. लवकर मेनोपॉज आल्याने माझ्या पोटावर खूप ब्लॉटिंग होत आहे. मी काय करू?
उत्तर : मेनोपॉजमध्ये सूज, ब्लॉटिंग अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा त्रास इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एस्ट्रोजन हार्मोनचा खालावता स्तर, पचनाला प्रभावित करू शकतो, ज्यामुळे सर्व काही मंदगतीत चालते. यामुळे सूज येते. खालावता एस्ट्रोजनचा स्तर कार्बोहायड्रेटच्या पचनावरसुद्धा परिणाम करू शकतो, ज्यामुळे स्टार्च आणि शुगरचे पचन होणे आणखी कठीण जाते व यामुळे अनेकदा थकवासुद्धा जाणवू शकतो.