मी २० वर्षीय तरूण आहे. मी सुरुवातीपासूनच खूप अंतर्मुख स्वभावाचा आहे. खूप कमी लोकांशी माझी मैत्री आहे. अर्थात, कुटुंबातही आईवडिलांशिवाय दुसरं कोणीही नाहीए आणि ते दोघंही नोकरदार आहेत. त्यामुळे घरीही मी जास्त वेळ एकटाच असतो. साहजिकच याच कारणामुळे मी लोकांत पटकन मिसळत नाही. माझी छबी शाळा आणि कॉलेजमध्ये एक अभ्यासू किंवा असं म्हणा की पुस्तकातील किडा अशीच राहिली आहे. माझ्यासोबतची मुले कॉलेजमध्ये मौजमस्ती करत असत. नवनवीन गर्लफ्रेंड्स ठेवत असत. उलट माझे या गोष्टीकडे कधी कलच नव्हता. घरातल्यांचीही इच्छा होती की मी चांगले ग्रेड्स मिळवावे. मी त्यांची इच्छा पूर्ण करण्यात गुंतलो आहे.
गेल्या महिन्यात कुणास ठाऊक कसे, एका मुलीचे फ्रेंडशिप प्रपोजल मी कसं स्वीकार केलं, तेही फेसबुकवर. काही दिवसांच्या मैत्रीतच आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आम्ही रोज भेटू लागलो होतो.
एके दिवशी तिने डिनरची फर्माइश केली आणि त्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये संबंधही ठेवले. माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता. त्यामुळे मी एवढा कामोत्तेजित झालो होतो की सुरक्षेसाठी कंडोमचाही वापर केला नाही.
आठवड्याभरापूर्वी एका मित्राद्वारे कळलं की माझ्या या मैत्रिणीने अनेक लोकांशी संबंध ठेवले आहेत. हे सत्य कळल्यानंतर मी तिला भेटणं बंद केलं. सर्व संबंध संपवून टाकले. अगदी चॅटिंग, फोन वगैरेही. परंतु या गोष्टीबाबत खूप काळजीत आहे की त्या मुलीशी संबंध ठेवल्यामुळे मला एड्स तर होणार नाही ना?
त्या मुलीशी संबंध तोडून आपण समजदारपणाचे काम केले आहे. अशा प्रकारच्या मुली सरळसाध्या तरुणांना फसवून ऐश करतात आणि अनेकदा त्याबदल्यात लैंगिक रोगांची भेटही देतात.
मी ४२ वर्षीय विवाहित आहे. विवाहाला १६ वर्षे झाली आहेत. २ मुलं आहेत. सुखी आणि संपन्न दाम्पत्य जीवन आहे. ३ महिने आधीपर्यंत मी स्वत:ला एक यशस्वी गृहिणी आणि पतिची प्रेयसी समजत होते, पण एके दिवशी कळलं की पती जेव्हा अनेक दिवसांसाठी टूरवर जातात, तेव्हा तिथे (मुंबईत) कुठल्यातरी कॉलगर्लबरोबर मजा करतात.