मुलांमध्ये बचतीची सवय रूजवा

* राजेश शर्मा

गोष्टीचे महत्त्व समजल्यानंतर योग्य दिशेने चालत हे कार्य सहज केले जाऊ शकते. जर आपल्या मुलास बालपणातच बचतीचे महत्त्व समजले असेल तर तो आपल्या आयुष्यातील मोठयाहून मोठया समस्येस सहज सामोरे जाऊ शकेन. जे पालक बालपणातच आपल्या मुलांमध्ये बचत करण्याची सवय रुजवतात, ते त्यांचे भविष्य सुरक्षित करतात. बचतीचे महत्त्व समजल्यानंतर त्यांना पैशाचे मूल्य माहित होते आणि नंतर त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो. आजच आपल्या मुलांना याविषयीची शिकवण देण्यास प्रारंभ करा.

पैशाचे मूल्य समजावून सांगा : महागाईच्या या युगात मुलांना पैशाचे मूल्य माहित असणे महत्वाचे आहे. आपण त्यांना समजावून सांगावे की पैसे कमवण्यासाठी आपण दिवसभर खूप मेहनत करता. त्यांना हेदेखील पटवून देण्याचा प्रयत्न करा की त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी आपण दिवसातून बरेच तास पैसे जमविण्यासाठी राबता. तसेच त्यांना हेही समजावून सांगा की पैशाचा अपव्यय करण्याची सवय त्यांना कर्जाच्या सापळयात अडकवू शकते.

प्रत्येक मागणी पूर्ण करू नका : प्रत्येक पालक आपल्या जिवापेक्षा आपल्या मुलांवर अधिक प्रेम करतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू इच्छितात. परंतु आपल्या मुलांनी शिस्तीत रहावे आणि कष्टाने मिळवलेल्या पैशाचे मूल्य समजावे असे आपणास वाटत असेल तर त्यांच्या प्रत्येक लहान-मोठया मागणीची त्वरित पूर्तता करणे त्यांच्या भविष्यासाठी योग्य ठरणार नाही. जर आपण असे पालक असाल, जे आपल्या मुलांची प्रत्येक लहान-मोठी मागणी त्वरित पूर्ण करतात, तर आपल्याला आपली सवय बदलण्याची आवश्यकता आहे, कारण नंतर आपली ही वृत्ती आपल्याच मुलांसाठी एक समस्या बनू शकते. ते हट्टी बनू शकतात, अनुशासनहीन होऊ शकतात, आपल्या गरजांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे ते गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकू शकतात. आपण मुलांना लहानपणापासूनच गरज आणि ऐषो-आरामामध्ये फरक करायला शिकवायला हवे.

मुलांना पिगी बँक द्या : आपल्याकडे येणारे पाहुणे माघारी परतांना निश्चितपणे आपल्या मुलांना पैसे देत असतील. मुलांना त्यांच्या नानी, आजी, काका आणि मामाकडूनही थोडे-फार पैसे मिळतच असतात. तुम्हीही त्यांना पॉकेटमनी देता. आपली मुले हा पैसा वाचवतात की सर्व खर्च करतात? जर मुले पैसे वाचवत असतील, तर निश्चिंत रहा, त्यांचे भविष्य सुरक्षित आहे, परंतु जर सर्व पैसे मौजमजेत किंवा आवडीच्या वस्तू खरेदी करण्यात उधळत असतील तर ही सवय त्यांच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते. जर आपणास वाटत असेल की आपल्या मुलांनी पैसे वाचवणे शिकावे तर लहानपणापासूनच त्यांना पैशाचा योग्य वापर करण्यास शिकवा. त्यांना सांगा की काही पैसे खर्च करा आणि काही बचत करा. बचतीबद्दल आकर्षित करण्यासाठी आपण त्यांना कार्टून कॅरेक्टरची पिग्गी बँक खरेदी करून द्या. पिग्गी बँकेत पैसे टाकत राहिल्यामुळे बचत करण्याची सवय सहज विकसित केली जाऊ शकते.

बचत खाते उघडा : आपण आपल्या मुलांना बचतीच्या सवयीचे फायदे सांगायला हवे. दरमहा त्यांचे बचत केलेले पैसे कसे गुंतविले जाऊ शकतात हे आपण त्यांना सांगू शकता. त्यांना आपल्याबरोबर बँकेत घेऊन जा आणि नियमानुसार त्यांचे खाते उघडा. आजकाल बँकांमध्ये मुलांच्या नावावर बँक खाती उघडण्याची सुविधा आहे. त्यांना आपल्या खात्यात पैसे जमा करण्यास शिकवा. त्यांची आजची लहान बचत उद्याची मोठी गरज पूर्ण करू शकते.

उधळपट्टीचे तोटे समजावून सांगा : बरीच मुले पेन्सिल, कागद, रबर किंवा इतर वस्तू वाया घालवतात. पेन्सिल थोडी छोटी झाली नाही की लगेच डस्टबिनमध्ये फेंकतात किंवा वहीच्या पानांवर १-१ ओळ लिहून उर्वरित पृष्ठ रिक्त सोडतात. आपण त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करा की झाडे तोडून कागद बनविला जातो आणि जर त्यांनी कागद वाया घालवला तर ते एक नवीन झाड कापण्याची तयारी करत आहेत. झाडांपासून आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होतो, म्हणून ते असणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे कथेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांची वस्तू वाया घालवण्याची सवय सुधारा.

वाया घालवण्याचे तोटे समजावून सांगा : तुमच्या मुलांची बिस्किटे, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, पिझ्झा-बर्गर, मोमोज किंवा खेळण्यांचा हट्ट पूर्ण करता-करता तुमचे घरगुती बजेट बिघडते. फास्ट फूडच्या सवयीमुळे मुलांचे आरोग्यही बिघडते. ते हट्टी, चरबीयुक्त शरीराचे आणि आळशी बनतात. त्यांना असे वाटू लागते की त्यांनी जे काही मागितले ते आपण नक्कीच पूर्ण कराल. मुलांना हे सांगा की आपण किती कष्टाने पैसे कमावतात. त्यांना समजावून सांगा की पैसे नसल्यास आपली सर्व महत्त्वाची कामे थांबली जातील. यामध्ये मुलांची शालेय फी, आजी-आजोबांची औषधे, पाळीव प्राण्याचे खाणे-पिणे, वीज-पाणी, किराणा इ. ची बिले समाविष्ट करा. मुले नेहमी त्यांच्या पाळीव प्राण्याशी किंवा आजी-आजोबांशी खूप जोडले गेलेले असतात, ते त्यांचा खर्च थांबला गेल्याची गोष्ट सहजपणे समजू शकतात आणि स्वत:मध्ये बचत करण्याची सवय विकसित करू शकतात.

घराचे बजेट तयार करण्यात मुलांनाही सामील करा : जर आपण आपल्या जोडीदारासह किंवा पालकांसह घराचे मासिक बजेट बनवत असाल तर या प्रक्रियेत आता आपल्या मुलांनादेखील सामील करा. आपली चिंता, पैशांची समस्या किंवा कर्जाची योग्य परिस्थिती समजल्यानंतर काही महिन्यांत कदाचित आपली मुले वायफळ खर्चाची सवय सोडतील. ते त्यांचा पॉकेटमनी वाचवतील आणि घरातील खर्चात मदत करण्यास सुरुवात करतील. हे एक चांगले चिन्ह आहे.

बचतीच्या पैशातून भेटवस्तू मिळवून  द्या : मुलांच्या बचतीच्या पैशातून त्यांच्याच गरजेच्या वस्तू खरेदी करा. असे असू शकते की मूल आपल्या घरामध्ये बऱ्याच काळापासून टेबल लँपसाठी आग्रह धरत असेल किंवा अभ्यासासाठी स्वतंत्र टेबल चेअर, स्टोरी बुक, व्हिडिओ गेम्स इत्यादीची मागणी करत असेल, तेव्हा त्याला या गोष्टी त्याच्याच बचतीच्या पैशातून मिळवून द्या. असे केल्याने त्याच्यामध्ये बचत करण्याचा उत्साह वाढेल आणि मग तो त्याच्या पैशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जीवापाड काळजीदेखील घेईल.

मुलांना सर्जनशील बनवा : घरातील जुन्या वस्तूंपासून काहीतरी उपयुक्त वस्तू बनवून मुलांना दाखवा आणि त्यानंतर त्यांनाही तसे करण्यास प्रेरित करा. मुले कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्यांपासून पेन स्टँड बनविणे, आईस्क्रीम स्टिकपासून दिवे बनविणे किंवा तुटलेल्या खेळण्यांपासून हस्तकला बनविणे यासारख्या मजेदार गोष्टी करतात. त्यांना त्यांच्या जुन्या गोष्टी पुन्हा वापरण्यास शिकवा, पेन्सिल किंवा रबर पूर्ण संपल्यावरच त्यांना नवीन पेन्सिल किंवा रबर वापरायला सांगा. जर पेन्सिल लहान झाली असेल तर ती जुन्या पेनच्या पुढे घाला आणि वापरायला द्या. रद्दी झालेल्या वस्तूंपासून नवीन आणि आकर्षक गोष्टी कशा तयार केल्या जाऊ शकतात हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. यामुळे ते सर्जनशीलदेखील होतील आणि त्याचवेळी त्यांच्यात बालपणापासूनच वस्तूंना महत्त्व देण्याची गुणवत्तादेखील विकसित होईल.

पॉकेट मनी कमवा : आपल्या मुलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनी व्यतिरिक्त त्यांना स्वत:ही पॉकेटमनी कमविण्यास प्रोत्साहित करा. हे कोणत्याही प्रकारे शक्य आहे. काही घरगुती कामे केल्यावर त्यांना बक्षीस म्हणून काही रुपये देऊ शकता. खोली साफ केल्यावर किंवा भावंडांसाठी गृहपाठ केल्यावरही, आपण त्यांना भेटस्वरूप काही पैसे देऊ शकता, जे त्यांनी त्यांच्या पिग्गी बँकेत घालावेत. कोणत्या कामासाठी किती पैसे निश्चिंत करावे लागतील हे कामाच्या अडचणीवर अवलंबून असावे. पैसे मिळवून मुले खूप उत्साही होतात आणि त्यांना श्रमाचे महत्त्व आणि पैशाचे मोलदेखील कळते.

बचतीसाठी बक्षीस : जेव्हा आपल्या मुलास त्याचे आर्थिक लक्ष्य प्राप्त होईल तेव्हा त्याला पुरस्कार देण्याविषयी अवश्य विचार करा. आपण इच्छित असल्यास या कामगिरीवर त्याला एखादा नवीन ड्रेस खरेदी करून द्या किंवा त्याला केक किंवा आइस्क्रीमवर खाण्यासाठी न्या. आपण मुलाने बचत केलेल्या पैशांच्या बरोबरीने पैसे मिळवून त्याच्या खात्यात जमा करू शकता. यामुळे त्याचा उत्साह वाढेल आणि अधिकाधिक बचत करण्यासाठी तो प्रेरित होईल.

हेच पुरूषत्व आहे का?

* सुधा गोयल 

कोणत्याही वयोगटातील स्त्रीपासून आनंद मिळेल असा कुठलाच क्षण कुठल्याच वयोगटातील पुरुषाला गमवायचा नसतो. तिच्याशी गप्पा मारुन, तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीतून किंवा तिला स्पर्श करुन तो स्वत:चे भरपूर मनोरंजन करुन घेत असतो आणि असा समज करुन घेतो की, त्याने स्त्रीला मूर्ख बनवून आपले पुरुषत्व दाखवून दिले. स्त्री केवळ मनोरंजनासाठी किंवा मजा घेण्यासाठी आहे, असे त्याला वाटते. स्त्रीची असहायता पुरुषाच्या कथित मजेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते आणि तो अधिकच मजा घेऊ लागतो.

सुशिक्षित पुरुष सभ्यतेच्या वेषात स्वत:ला शांत ठेवण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो. पण त्याला यश मिळत नाही. काही प्रसंगी, त्याच्या सभ्यतेचा मुखवटा गळून पडतोच. त्यामुळेच तर विनयभंग आणि बलात्काराच्या बऱ्याच घटना या तथाकथित सुशिक्षित समाजात घडलेल्या दिसतात. द्विअर्थी बोलण्यातून, डोळयांमधील अश्लील इशाऱ्यांतून, हावभावातून, अश्लील संवादातून हे सर्व घडत असते. अशावेळी त्यांच्यात आणि कमी शिकलेल्या, अशिक्षितांमध्ये काहीच फरक उरत नाही. प्रत्येक पुरुष केवळ आपली आई, बहीण, पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठेवू इच्छितो, मात्र अन्य स्त्रियांना एखादी बाजारातील वस्तू समजतो.

घाणेरडी वृत्ती

स्त्रीच्या नजरेत जितकी असहायता दिसेल तितकीच तिची मजा घेण्याची वृत्ती पुरुषांमध्ये वाढते. प्रसंगी आई, बहीण आणि मुलीच्या शरीराचे लचके तोडायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आता तर अशा घटना सर्वांसमोर येतही आहेत. मर्यादा आणि संस्कारांच्या नावाखाली स्त्री तग धरू शकत नाही. टिकतात ती केवळ नाती. म्हणूनच तर एखाद्याची आई, बहीण किंवा मुलगी ही कुणा दुसऱ्याच्या मनोरंजनाचे साधन ठरते.

कार्यालयात जिथे स्त्री-पुरुष एकत्र काम करतात तिथे अशी मजा घेणे सामान्य बाब आहे. पांढऱ्या केसांचे वृद्ध आणि प्रौढ पुरुषही लंपटपणा करताना दिसतात. बागेत अशा वृद्धांचे टोळके फिरायला आलेल्या महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी करताना दिसतात. त्यांना बारकाईने न्यहाळून मजा घेतात.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे द्वितीय श्रेणी महिला कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा आनंद टाळीवर टाळी देवून, पान चावून किंवा पानाची पिचकारी उडवून सामूहिकरित्या लूटतात. उदाहरणार्थ ब्राचा हुक निघाला, साडी खांद्यावरुन सरकली, आंबाडा सुटला किंवा अचानक पर्स खाली पडून उघडली आणि ती उचलताना खाली वाकलेल्या तिच्या ब्लाउजमधून आत डोकवायला मिळाले की त्यांना आनंद होतो. कोणत्या स्त्रीला पीरियड आले आहेत आणि कोणाच्या पीरियडची तारीख काय आहे, यावरून तर ऑफिसमध्ये पैजही लावली जाते. जणू स्त्री त्यांच्या पुढयात विवस्त्रच फिरत असते.

कुप्रथांच्या नावाखाली शोषण

देशाच्या ग्रामीण भागात अजूनही तेथील प्रथेनुसार, मुलीचे लग्न मुलाच्या शर्टासोबत लावून दिले जाते. म्हणजेच मुलीचे महत्त्व शर्टा इतकेही नसते. किती क्रुर थट्टा आहे ही? राजपुतांच्या काळात, राजामहाराजांच्य वेळी युद्धावर गेलेल्या राजपूत राजाचे लग्न त्याच्या गैरहजेरीत त्याची कटयार किंवा तलवारीसोबत लावून दिले जात असे. त्यावेळीही एक हास्यास्पद परिस्थिती होती, ती म्हणजे हे लग्न पुजारी लावून देत असत, जे स्वत:ला विद्वान समजत.

हा कसला समाज आहे जो याच समाजाचा एक भाग असलेल्या स्त्रीसोबत इतक्या निष्ठूरपणे वागतो. नवरा गैरहजर असतानाही लग्न लावण्याची इतकी घाई कशासाठी? स्त्रीच्या स्त्रीत्वाला नेस्तानाबूत करुन नेमके काय सिद्ध होते? इतिहासात कधीच (मातृसत्ता असतानाही) एखाद्या पुरुषाचे लग्न मुलीच्या साडी किंवा चोळीशी लावून देण्यात आले नाही. पुरुषांसोबत असे निष्ठूरपणे कधीच वागण्यात आले नाही. परंतु महिला शिक्षणाच्या नावाखाली आजही अशा कुप्रथा मजा घेऊन वाचल्या जातात. आजही मुलीचा मृत्यू झाल्यास अश्रू ढाळले जात नाहीत.

माणूस ही जगातली सर्वश्रेष्ठ रचना म्हणून ओळखला जातो. कारण त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता आहे, बुद्धी आणि विवेक आहे. तरीही यातील केवळ एका वर्गाच्या सुखासाठी, भोगविलासासाठी अगदी सहजपणे एखाद्या स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहिले जाते. विविध युक्त्या लढवून पुरुष स्त्रीला आपल्या जाळयात फसवतो, गुरफटून टाकतो. इतकी हीन प्रवृत्ती तर पशू समजल्या जाणाऱ्या जनावरांमध्येही नसते. प्राणी हे प्राण्यांना प्राणीच मानतात, मग तो नर असो की मादी. मग माणसाच्या या पाशवी प्रवृत्तीला काय म्हणायचे? हा प्रश्न त्या प्रत्येक माणसासाठी आहे, ज्याला खरे पुरुषत्व म्हणजे काय हे माहीत आहे.

कधी सुधारणार समाज?

एकटी राहणारी अविवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा कुमारिका, जिचा कोणाशी काहीही संबंध नाही, ती समाजात केवळ खेळणे किंवा मनोरंजनाची वस्तू बनून जाते. तिचे दु:ख, अश्रू हे सर्व हरवून जाते. ती स्वत: मूल्यहिन ठरते. उरते ते फक्त शरीर आणि तसेही स्त्रीचे शरीर संवेदनशूल्य समजले जाते. त्याचा हवा तेव्हा वापर केला जातो.

जत्रा, सार्वजनिक जागी, गर्दीच्या ठिकाणी पुरुष स्त्रीची मजा घेतात. तिच्या छातीवर मारणे, नितंबावर चिमटा काढणे, स्कार्फ किंवा साडी ओढणे, अशी अश्लील कृत्ये सर्रास केली जातात. तरी बरे, आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्याची प्रथा नाही. नदी, कालवे किंवा तलावाच्या काठावर स्नान करून कपडे बदलणाऱ्या स्त्रियांना अनेक जण लपून पाहतात. अंधारात शौचास बसलेल्या महिलेवर वाहनाची लाईट मारून ट्रक किंवा बसचालक मजा घेताना अनेकदा दिसतात.

बसमध्ये अचानक ब्रेक लावून महिला प्रवाशाला पुरुष प्रवाशाच्या अंगावर पडायला भाग पाडणे, महिला प्रवाशाच्या सीटवर टेकून उभे राहून इतर प्रवाशांना तिकीट देणे, हे सर्व नित्याचेच झाले आहे.

संस्कृती आणि संस्कारांच्या नावाखाली महिलांसाठी वेगळे निकर्ष तयार करण्यात आले आहेत. जे काम केल्याने समाजाची गुन्हेगार आहे असे समजून त्या स्त्रीकडे पाहिले जाते तेच काम पुरुष मात्र ताठ मानेने करू शकतो. धुळीत पडल्याने स्त्री गलिच्छ होते, कारण तिच्या कपडयांना लागलेली धूळ झटकण्याची परवानगी समाज तिला देत नाही. अशा या दुतोंडी सामाजिक मर्यादांच्या पाशातून स्त्री कधी मुक्त होणार?

Monsoon Special : 5 टिपा ज्यामुळे पावसात नुकसान कमी होईल

* गृहशोभिका टीम

पावसाळा आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. दिल्ली मुंबईसारखी शहरे पावसामुळे गजबजली आहेत. ग्रामीण भागात चांगल्या शेतीसाठी पाऊस आवश्यक असला तरी अतिवृष्टी आणि पाणी साचल्याने पीक खराब होते. त्यामुळे शेतकऱ्याला पैशाच्या बाबतीत मोठा फटका बसतो. याशिवाय पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने तुमच्या गाडीचे आणि घराचेही नुकसान होऊ शकते. आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचवू शकता.

घरासाठी मालमत्ता विमा घ्या

अतिवृष्टीमुळे अनेक वेळा पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरते. याशिवाय पुरात घराचे नुकसान होण्याबरोबरच घरात ठेवलेल्या टीव्ही, फ्रीज, कुलर या वस्तूंचेही नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी मालमत्ता विमा काढावा. मालमत्तेच्या विम्याने, तुम्ही पावसामुळे तुमच्या घराच्या किंवा मालमत्तेच्या झालेल्या नुकसानासाठी दावा करू शकता.

आग विमादेखील आवश्यक आहे

पावसाळ्यात शॉर्टसर्किटची शक्यताही वाढते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने तुमच्या घराचे व दुकानाचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत घराच्या विम्यासोबतच घराचा आणि दुकानाचा अग्निविमाही घ्यावा. विमा कंपन्या होम इन्शुरन्ससोबत फायर इन्शुरन्स घेऊन प्रीमियम मोठ्या प्रमाणात कमी करतात.

मोटर विमा

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होते. याशिवाय रस्त्यावर पाणी साचल्याने तुमच्या कारचेही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या कारचा मोटार विमादेखील घ्यावा. या हवामानात अचानक गाडी कुठेही बिघडू शकते. अनेक विमा कंपन्या मोटार विमा संरक्षण अंतर्गत कॉल सेंटरच्या मदतीने 24 तास दुरुस्तीसाठी मेकॅनिकची सेवादेखील प्रदान करतात. अशा परिस्थितीत जर तुमची गाडी काही अज्ञात ठिकाणी बिघडली तर ही सेवा तुमच्यासाठी खूप सोयीची ठरू शकते.

जीवन विमा

काही वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. अशी कोणतीही दुर्घटना घडल्यास, जीवन विमा संरक्षण असणे आवश्यक आहे. यामुळे किमान तुमच्या कुटुंबाला एकरकमी रक्कम मिळेल आणि तुमच्या अनुपस्थितीत त्यांच्यासाठी येणाऱ्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

पिकांसाठी हवामान विमा

साधारणपणे शेतीसाठी पाऊस आवश्यक असतो. परंतु शेतात पाणी तुंबून किंवा पाणी भरून गेल्यास शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा परिस्थितीत प्रतिकूल हवामानापासून तुमचे पीक वाचवायचे असेल, तर हवामान विमा यामध्ये खूप प्रभावी ठरू शकतो.

Monsoon Special : जेणेकरून रिमझिम पावसाचा मनमोकळा आनंद घ्या

* अनुजा, त्वचारोगतज्ज्ञ

कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी आपण सर्वजण पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असतो. या रोमँटिक सीझनची मजा खरोखरच अनोखी आहे, पण या ऋतूतील पावसामुळे तुम्हाला आरोग्य, फिटनेस, कपड्यांची शैली, त्वचा आणि केस यांच्या समस्यांनाही सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी, येथे तज्ञांनी दिलेल्या खास टिप्स आहेत :

पाऊस आणि फिटनेस

पावसाळा हा आनंददायी आणि आनंददायी असतो, परंतु पावसामुळे फिटनेसप्रेमी जॉगिंग, लांब चालणे आणि व्यायाम इत्यादींवर बंधने घालतात. मात्र या ऋतूत व्यायाम न सोडता व्यायामाचे वेळापत्रक अधिक काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे.

पावसामुळे आपण बाहेर व्यायाम करायला किंवा जिमला जायला कचरतो. कधी-कधी लोक टीव्हीवर फिटनेसचे कार्यक्रम पाहून घरीच मनाचा व्यायाम करतात. पण चुकीचा व्यायाम केल्याने स्नायू दुखू शकतात. म्हणूनच जिममध्ये जाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण आपण जिममध्ये योग्य प्रकारे व्यायाम करू शकतो.

रोज जिमला जाता येत नसले तरी आठवड्यातून किमान ५ दिवस तरी नियमित जावे. व्यायामानंतर योग्य प्रमाणात प्रोटीन घेणेदेखील आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल, तर फिटनेस आणि आहार यांचा योग्य तोल राखणे खूप गरजेचे आहे.

जर वजन वाढत असेल तर व्यायामशाळेत योगासने, पॉवर योगा किंवा साल्सा डान्स करून तुम्ही वाढते वजन नियंत्रणात ठेवू शकता. आज जिममध्ये जाणे ही केवळ सेलिब्रिटींचीच नाही तर सर्वसामान्यांचीही गरज बनली आहे. व्यायामाने बॉडी टोनिंग होते आणि वजन नियंत्रणात राहते.

आजच्या तरुणींना वाटतं की जीममध्ये कार्डिओ करून आपण आपल्या शरीराला आकारात आणू शकतो, पण शरीराच्या आकारासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि विश्रांती आवश्यक आहे. पावसाळ्यात या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा आणखीनच आल्हाददायक होईल.

कापूस हा उत्तम पर्याय आहे

पावसाळ्यात फ्रेश राहण्यासाठी कपड्यांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. यावेळी तापमानात जास्त आर्द्रता असते आणि ही आर्द्रता फक्त सुती कपड्यांद्वारे शोषली जाते. त्यामुळे या हंगामात सुती कपड्यांची निवड सर्वोत्तम आहे. सध्या पावसाळ्यासाठी बाजारात हलक्या कापसाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे निवडता, पण पावसाळ्यात तुम्ही गडद रंगाचे कपडे निवडू शकता.

पावसाळ्यात सर्वत्र चिखल, पाणी आणि घाण असते. तरीही बस किंवा ट्रेनने प्रवास करावा लागतो. गडद रंगाच्या कपड्यांवर धूळ आणि मातीचे डाग दिसत नाहीत, जे या हंगामात कपड्यांवर बरेचदा आढळतात. सुती कपड्यांसोबत तुम्ही सिंथेटिक कपडेदेखील निवडू शकता कारण सिंथेटिक कपडे ओले झाल्यावर लवकर सुकतात. पावसात डेनिम आणि लोकरीचे कपडे अजिबात वापरू नका. त्‍यांना सुकण्‍यासही बराच वेळ लागतो आणि त्‍यांतून ओलावाचा वास येत राहतो.

पावसाळ्यात कार्यक्रमात किंवा लग्नसमारंभात साडी नेसायची असेल तर फ्लोरल प्रिंट आणि डिझायनर वर्कची सिंथेटिक साडी नेसता येते. हलके वजनाचे आणि रंगहीन दागिनेदेखील घाला. पावसाळ्यात कपड्यांसोबत मेकअपकडे विशेष लक्ष द्या. पावडर, कुमकुम ऐवजी वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट वापरा. जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही त्यांना मोकळे सोडू शकता. केस लांब असल्यास, आपण पोनीटेल बांधू शकता आणि ते दुमडू शकता.

त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे

पहिल्या पावसात भिजत रिमझिम पावसाचा आनंद लुटायचा असतो. पण यापासून दूर राहायला हवे, कारण सुरुवातीच्या पावसात अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

या ऋतूत लोकांना समजते की सूर्य नाही, मग सनस्क्रीन लावण्याची काय गरज आहे? पण हे खरे नाही. या ऋतूत सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच तुम्ही सकाळी सनस्क्रीन लावा आणि 3-4 तासांनंतर पुन्हा सनस्क्रीन लावा.

काही लोकांचा असा विश्वास आहे की या ऋतूमध्ये त्वचेची आणि केसांची काळजी घेण्याची विशेष गरज नसते. पण पावसात सूर्यप्रकाश नसतो आणि थंडीही जाणवत नाही, त्यामुळे पावसाळ्यात त्वचेत आणि केसांमध्ये बरेच बदल होत राहतात.

कधी त्वचा तेलकट होते तर कधी कोरडी. याशिवाय त्वचाही निस्तेज होऊ लागते. घाम आणि तेलामुळे आणि चेहऱ्यावरील धुळीमुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या वाढते. या ऋतूमध्ये त्वचेला चिकटपणा आल्याने काहींना मॉइश्चरायझर लावण्याची गरजच समजत नाही, मात्र नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

पावसात स्वच्छताही खूप महत्त्वाची असते. साफ केल्यानंतर अल्कोहोल फ्री टोनर वापरा. या ऋतूमध्य आर्द्रतेमुळे त्वचेची छिद्रे आपोआप उघडतात. त्यामुळे धूळ साचल्याने पिंपल्सची समस्या वाढते. म्हणूनच साफ केल्यानंतर टोनिंग आवश्यक आहे. हे उघडे छिद्र बंद करते.

या ऋतूत सूर्य ढगांमध्ये लपला असला तरी अतिनील किरण सक्रिय राहतात. यासाठी लाइटनिंग एजंट आणि लॅक्टिक अॅसिड असलेले मॉइश्चरायझर वापरा आणि तुमच्या आहारात सॅलड, भाज्या सूपचा समावेश करा. त्वचेच्या पोषणासाठी पाण्याची गरज असते, त्यामुळे दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पावसात जास्त तहान लागत नाही, पण शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून भरपूर पाणी प्यावे, ही गोष्ट लक्षात ठेवा.

या रोमँटिक पावसाळी हंगामाचा आनंद घ्या परंतु तो आणखी आनंददायक बनवा.

Monsoon Special : या पावसाळ्याला ‘आमची मुंबई’ म्हणा

* गृहशोभिका टीम

मुंबई, महाराष्ट्र

मुंबईत जूनमध्येच पावसाळा सुरू होत असला तरी त्याचा प्रभाव ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत राहतो. या दरम्यान मुंबईतील बदलत्या हवामानामुळे तुमच्या आत एक नवीन ताजेपणा भरून येतो.

मरीन ड्राइव्ह

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मरिन ड्राइव्हचा इतिहास खूप जुना आहे. काँक्रीटचा हा रस्ता 1920 मध्ये बांधण्यात आला होता. समुद्रकिनारी तीन किलोमीटर परिसरात बांधलेला हा रस्ता दक्षिण मुंबईच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात इथे येणे हे प्रत्येकासाठी अविस्मरणीय स्वप्नासारखे असते. या मोसमात जगभरातील बहुतांश पर्यटक मरीन ड्राइव्हवर फिरताना दिसतात. येथील खास आकर्षण म्हणजे समुद्राच्या उगवत्या आणि पडणाऱ्या लाटा, ज्या लोकांना खूप आकर्षित करतात. मरीन ड्राइव्ह नरिमन पॉइंट ते मलबार हिल मार्गे चौपाटी या परिसरात आहे. मुंबईची लोकल ट्रेन पकडून तुम्ही या ठिकाणाचा आनंद घेऊ शकता.

गेटवे ऑफ इंडिया

मुंबई ज्या ऐतिहासिक वास्तूसाठी प्रसिद्ध आहे ते गेटवे ऑफ इंडिया आहे. हे स्मारक दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर परिसरात अरबी समुद्रातील बंदरावर आहे. ब्रिटीश राजवटीत बांधलेले हे स्मारक नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. या ठिकाणी वर्षभर गर्दी होत असली तरी पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी तुम्हाला चर्च गेट रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल.

हाजी अली दर्गा

हाजी अलीचा दर्गाही मुंबईतील सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. या दर्ग्यात सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांची समाधी आहे, ज्याची स्थापना 1431 मध्ये झाली होती. हाजी अलीचा दर्गा मुंबईच्या वरळी किनार्‍याजवळ एका छोट्या बेटावर आहे, ज्याचे सौंदर्य दुरूनही पाहता येते. येथे जाण्यासाठी तुम्हाला मुंबई लोकल ट्रेनमधून महालक्ष्मी मंदिर रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल.

वरळी सी-फेस

पावसाळा शिगेला पोहोचला की वरळीच्या सी-फेसचे वातावरण नजरेसमोर निर्माण होते. येथील उंच भरती पर्यटकांना आकर्षित करते. तुम्ही ट्रेन किंवा बसने इथे सहज पोहोचू शकता.

जुहू बीच

वांद्रेपासून सुमारे 30 मिनिटांच्या अंतरावर, जुहू बीच हा मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध बीच आहे. मुंबई आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची ही पहिली पसंती आहे. पावभाजीसाठी हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. पावसाळ्यात जुहूमधील टॉप हॉटेल्स पर्यटकांना अनेक सवलती देतात. मुंबई लोकल ट्रेनने वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकावर पोहोचून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता.

Monsoon Special : पावसाळ्यात मुलांची देखभाल

* प्राची माहेश्वरी

उन्हाळ्यानंतर पावसाचे आगमन तनामनाला प्रफुल्लित करते. अशावेळी कडक उन्हापासून आपली सुटका तर होते, परंतु पावसाळयाचे हे दिवस आपल्यासोबत अनेक आरोग्यासंबंधी समस्या घेऊन येतात. खासकरून घरातल्या लहानग्यांसाठी.

अर्थात, लहान मुले स्वत:ची काळजी स्वत: घेण्यास असमर्थ असतात. त्यामुळे त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवर असते. म्हणूनच पावसाळा सुरू होताच, आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्यांनी मुलांच्या आरोग्याबाबत जराही बेफिकीर राहू नये.

स्वच्छता : पावसाळयाच्या दिवसांत घराच्या आजूबाजूच्या सफाईबरोबरच घराच्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. कुठेही पाणी साचू देऊ नका. कारण जमा झालेल्या पाण्यात डास-माश्या, किडे-जंतू निर्माण होतात. त्यामुळे डायरिया, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया व त्वचेसंबंधी आजार पसरण्याची भीती असते. परंतु लहान मुले जर यांच्या विळख्यात सापडली, तर त्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण होऊन बसते.

आहाराची काळजी

पावसाळयाच्या दिवसांत मुलांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना हलके, ताजे व सुपाच्य पदार्थ द्यावेत. मोसमी फळांचे सेवनही जरूर करायला लावा. हिरव्या भाज्या व ताजी फळं स्वच्छ पाण्याने चांगल्याप्रकारे धुऊनच मुलांना खायला द्या.

स्वच्छ पाणी : दूषित पाणी पावसाळयाच्या दिवसांतील आजाराचे मुख्य कारण बनते. म्हणूनच मुलांना स्वच्छ पाणीच प्यायला द्या. पिण्याचे पाणी १०-१५ मिनिटे उकळून स्वच्छ भांडयात झाकून ठेवा. जेव्हा घराबाहेर जाल, तेव्हा पाण्याची बाटली जरूर आपल्यासोबत ठेवा.

विशेष देखभाल : मुलांना आंघोळ घालतानाही स्वच्छ पाण्याचा वापर करा. घाणेरडया पाण्याने अंघोळ घातल्याने त्वचेसंबंधी आजार होतात. अंघोळ घातल्यानंतर त्यांना व्यवस्थित कोरडे करून सुके कपडे घाला. ओले कपडे चुकूनही घालू नका. केसही चांगल्याप्रकारे पुसा. मुले जेव्हाही पावसात भिजतील, तेव्हा त्यांना लगेच स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून कोरडे कपडे घाला.

पावसाळयात मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही विशेष गोष्टींची काळजी घेणे फायदेशीर ठरते. जसे की :

बालरोगतज्ज्ञा डॉ. सुप्रिया शर्मांच्या मतानुसार, मुलांना व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, आयर्न तिन्ही गोष्टी समान प्रमाणात अवश्य द्या. कारण या तीन गोष्टींच्या सेवनामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, जी त्यांचे पावसाळयातील डायरिया, व्हायरल, आय फ्लू यांसारख्या आजारांपासून संरक्षण करते.

* मुलांना आधीच सांगून ठेवा की, बाहेरून येताच, सर्वप्रथम आपला चेहरा स्वच्छ पाण्याने अवश्य धुवा. कारण विषाणू मुख्यत: डोळे, नाक, तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

* रात्री मुलांसाठी मच्छरदाणीचा वापर करा. मुले जेव्हाही घराबाहेर जातील, तेव्हा त्यांचे डासांपासून संरक्षण होण्यासाठी मॉस्किटो स्ट्रिप लावूनच घराबाहेर पाठवा.

* मुलांना सूप, ज्यूस, कॉफी, चहा व हळद मिसळलेले दूध प्यायला द्या. बाहेरच्या पदार्थांऐवजी पापड, चिप्स, भजी इ. पदार्थ घरीच बनवून खायला द्या. त्यामुळे मुलांच्या चवीतही बदल होईल.

* मुले पावसात भिजल्यानंतर त्यांच्या छातीला यूकलिप्टस ऑइलने जरूर मालीश करा. त्यामुळे मुलांना मोकळा श्वास घेता येईल व छातीत कफ होणार नाही.

महिलेच्या माथी प्रत्येक दोषाची जबाबदारी

* रोचिका अरुण शर्मा

आजही स्त्रियांसमोर सामाजिक तसेच धार्मिक बंधने अशा प्रकारे आवासून उभी आहेत की ती कधीही त्यांना गिळंकृत करतील. अनेक योजना येतात, लेख लिहिले जातात, कथा तयार होतात, स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी ‘महिला दिवस’ही साजरा केला जातो. प्रत्यक्षात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत समाज आणि धर्माच्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे महिला घराच्या चार भिंतींआड उसासे टाकत कशाबशा जगत आहेत.

कुमारी मुलगी आणि विधवा दोष

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. झुणझुणवाला यांच्या २५ वर्षीय मुलीचे लग्न ठरवले जात होते. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही. मिठाई कधी देणार, असे झुणझुणवाला यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मिठाई खाऊ घालायला आम्ही तयार आहोत, पण मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. त्यामुळे कुठलेच स्थळ जमत नाही.’’

कसला दोष? असे विचारताच म्हणाल्या, मुलाकडच्यांनी भटाला मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी सांगितले की, पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार मुलीला वैधव्य योग आहे. लग्नानंतर काही वर्षांतच ती विधवा होईल. असे असताना कोण आपल्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून देईल? त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठया स्पष्ट दिसत होत्या.

अविवाहित मुलीला मंगळ दोष

पुण्यात राहणारी स्मिता सांगते की, तिचे लग्न वय उलटून गेल्यावर झाले, कारण तिच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. असे म्हटले जाते की, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न मंगळ असलेल्या मुलाशीच लावून द्यावे लागते, तरच ते यशस्वी होऊ शकते. तसे न झाल्यास दोघांपैकी एकाचा मृत्यू किंवा घटस्फोट होतो. अशा मुलाच्या शोधात अनेकदा मंगळ असलेल्या मुली वय होऊनही कुमारिकाच राहतात किंवा मंगळ दोष दूर करण्यासाठी पूजा अथवा उपाय सांगितले जातात. ते केल्यानंतरच अशा मुलींचे लग्न होते. शिवाय वय वाढूनही लग्न होत नसेल तर समाजाचे टोमणे ठरलेलेच असतात.

घटस्फोटित स्त्री

हैदराबादमध्ये राहणाऱ्या संजनाचा लग्नाच्या ५ वर्षांनंतर वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना मुलगा होता. मुलाला त्यांनी स्वत:कडे ठेवले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने पुनर्विवाह केला. त्या मात्र ५० वर्षांच्या झाल्या तरी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्या स्वत: आयटी इंडस्ट्रीत कामाला आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.

पुनर्विवाहाबाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आता या वयात माझ्याशी कोण लग्न करणार? जेव्हा तरुण होते तेव्हा एका मुलाची आई असल्यामुळे माझ्याशी कोण लग्न करणार होते? दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी कोण कशाला घेईल?’’

अशा प्रकारची कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील जिथे मुलीच्या पत्रिकेत दोष असल्याचे सांगून तिला नाईलाजाने एकाकी, असहाय जीवन जगायला लावले जाते.

विधवा स्त्री

अशाच प्रकारे एक प्रकरण पाहायला मिळाले जिथे एका सुशिक्षित, सुंदर, स्मार्ट महिलेच्या नवऱ्याचा कमी वयातच मृत्यू झाला. नवरा सरकारी नोकरीत असल्यामुळे तिला त्याच्या मृत्यूपश्चात चांगले पैसे मिळाले. तिला लहान बाळही होते.

काही कारणांमुळे सासरच्या माणसांचा आधार न मिळाल्याने ती माहेरी राहू लागली. माहेरी भाऊ-वहिनीला तिचे तिथे राहणे आवडत नव्हते. आईवडिलांनी सुशिक्षित, चांगला कमावणारा, घटस्फोटित मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. पुढे तिच्या मुलावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला मिळालेल्या पैशांवर तिच्या नव्या सासूचा डोळा होता. विधवा, त्यात एका मुलाची आई तरीही तुझ्याशी लग्न केले, असे टोमणे, भांडण झाल्यावर तिला सतत नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागत होते. रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून अखेर तिने स्वत:च घटस्फोट घेतला.

येथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ती विधवा झाली यात तिचा दोष काय? मुलगा लग्नानंतर झाला होता. दुसरा नवरा मात्र घटस्फोटित होता. त्याचे किंवा त्याच्या घरच्यांचे वागणे चांगले नसेल म्हणून कदाचित त्याच्या बायकोने घटस्फोट घेतला असेल. यात त्याची चूक असू शकते. तरीही महिलेलाच सतत विधवा झाल्याचा दोष देणे कितपत योग्य आहे?

ती सुशिक्षित, हुशार होती म्हणून तिचा पुनर्विवाह होऊ शकला आणि दुसऱ्या नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती घटस्फोट घेऊ शकली. तिच्या जागी गावातली, कमी शिकलेली, आर्थिकदृष्टया असहाय मुलगी असती तर तिला जगणे कठीण झाले असते.

सक्षम वीरांगणा

अशाच प्रकारचे आणखी एका महिलेचे उदाहरण आहे, जिचा नवरा सैन्यात होता आणि शहीद झाला. ती महिला सुशिक्षित आहे. तिला एक मुलगा आहे. तिला तिच्या पतीच्या निधनानंतर सैन्यात नोकरी मिळाली. त्यामुळे ती आर्थिकदृष्टया सक्षम आहे. मुलाला तिने प्रेमाने, चांगले संस्कार देऊन वाढवले.

तिला अनेकदा वाईट वाटते, कारण सर्व काही असूनही तिला एकाकी जीवन जगावे लागत आहे. तिला कुठेतरी छानशा ठिकाणी फिरायला जावेसे वाटते, पण कशी आणि कोणाबरोबर जाणार, कारण कमी वयातच पतीचे निधन झाले होते. सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न तिनेही बघितले होते. पतीच्या हातात हात घालून आणि छानसे कपडे घालून एखाद्या सिने अभिनेत्रीप्रमाणे फिरण्याची तिचीही इच्छा होती. तिलाही तिचे खूप सारे सुंदर फोटो काढायचे होते.

सोशल मीडियाचे युग आहे. स्वत:चे फोटो इतरांसोबत शेअर करावे, असे तिलाही वाटत होते. मात्र पती नसल्यामुळे ती मन मारून जगत होती. वय झाल्यावर पतीचे निधन झाले असते तर कदाचित तिचा या सर्व गोष्टींचा आंनद उपभोगून झाला असता. हौस पूर्ण झाली असती. मुलगा लहान असल्यामुळे ती एकटी पडली. मुलाला घेऊन कोणाबरोबर फिरायला जाणार होती, कारण कोणीही नातेवाईक किंवा मित्राला त्याच्या कुटुंबासोबत फिरायला अशी एखादी स्त्री आलेली आवडत नाही. शिवाय कोणीही तिची जबाबदारी घ्यायला तयार नसते.

परितक्ती स्त्री

असेच एक उदाहरण आहे परितक्त्या स्त्रीचे, जिला तिच्या नवऱ्याने भांडण करून घरातून हाकलून दिले. तिची ५ वर्षांची मुलगीही नाईलाजाने आपल्या आईसोबत आजोळी आली. ती महिला माहेरी आल्यानंतर नोकरी करू लागली. आईवडिलांनी विचार केला की, कधीपर्यंत ते तिला आधार देणार? त्यांचेही वय झाले होते. त्यामुळे त्यांनी नातीला तिच्या वडिलांच्या आईवडिलांकडे पाठवले. त्यांना वाटले की, मुलीला आईची गरज भासेलच तेव्हा सासरची मंडळी सुनेला बोलावून घेतील. पण तसे काहीच झाले नाही. अखेर मुलीच्या आईवडिलांनी तिला घटस्फोट मिळवून दिला आणि एका अशा माणसाशी लग्न लावून दिले ज्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याची २ मुले आणि वृद्ध, आजारी आई होती.

हे लग्न झाले, पण ती महिला तिच्या मुलीला स्वत:सोबत ठेवू शकली नाही. जेव्हा ती दुसऱ्या नवऱ्याच्या दोन मुलांना सांभाळत असेल तेव्हा तिला पोटच्या मुलीची आठवण येत नसेल का? त्या ५ वर्षांच्या मुलीवर अन्याय झाला नाही का?

महिलेचे दोन्ही पती त्यांचे आयुष्य अगदी मनासारखे जगत होते. या प्रकरणात मला असे वाटते की, दुसऱ्या लग्नात त्या महिलेला पत्नीचा नाही तर घर सांभाळणाऱ्या बाईचा दर्जा देण्यात आला होता. असे नसते तर दुसऱ्या नवऱ्याने तिच्या मुलीचा स्वीकार केला असता. आई-मुलींची ताटातूट झाली नसती.

पत्रिकेतील दोष आणि उपाय

अनेकदा असेही पाहायला मिळते की, मुलीच्या पत्रिकेत दोष दाखवला जातो. त्यानंतर एखादी पूजा, यज्ञ, होमहवन करून दोषाचे निवारण केले जाते. त्यानंतरच तिच्या लग्नाची पुढची बोलणी केली जातात.

अशाच प्रकारे विधवा महिलांसाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे त्यांचे जीवन लाचार, दयनीय, नरक बनते. एखाद्या महिलेचे विधवा होणे हा तिच्यासाठी शाप ठरतो.

वैदिक ज्योतिष कुंडलीनुसार, विवाह, वैवाहिक जीवन आणि वैवाहिक स्थितीसाठी सप्तम भावाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार विवाहानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या परिस्थितीची जाणीव  स्त्री-पुरुष दोघांनाही करून देण्यात येते. पण डोळयावर अंधश्रद्धेची कापडे लावून बुरसटलेल्या प्रथांच्या जास्त अधीन गेल्यास वैवाहिक जीवनातील सुखाला गालबोट लागते.

सप्तम भावाच्या अभ्यासानुसार, या भावातील मंगळ आणि पाप ग्रह मुलीच्या पत्रिकेत असल्यास विधवा योग येतो.

वेगवेगळे भाव, पत्रिकेतील चंद्र्राचे स्थान आणि राहूच्या दशेनुसार मुलगी विधवा होणार, हे निश्चित होते.

पत्रिकेतील काही दोषांमुळे एखादी स्त्री लग्नानंतर ७-८ वर्षांच्या आतच विधवा होते. लग्न आणि सप्तम या दोन्ही घरात पाप ग्रह असतील तर लग्नानंतर ७ व्या वर्षी नवऱ्याचे निधन होते.

अशा प्रकारचे अनेक योग आणि दशा ज्योतिषांनी वेळोवेळी लिहिले आणि सांगितले. आता तर ही माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

फक्त एवढेच नाही तर अशा माहितीसोबत वेगवेगळया शहरात राहणाऱ्या महिलांची त्यांच्या नावासह त्यांच्या पत्रिकेतील दोष आणि विधवा होण्याच्या योगाची माहितीही देण्यात आली आहे. जेणेकरून हे सत्य असल्याची लोकांची खात्री होईल आणि पत्रिका पाहण्यावर त्यांचा विश्वास बसेल.

या सर्वांव्यतिरिक्त इंटरनेटवर मेनका गांधी आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेचा उल्लेख करण्यात आलाय. हेदेखील सांगितले आहे की, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानानंतर किती कमी वयात त्यांना वैधव्य येणार हे समजले होते आणि तसेच घडले. सोबतच असेही सांगण्यात आले आहे की, जर शनी, मंगळासाठी उपाय केला तर वैधव्य योग टाळता येऊ शकतो.

विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत

धर्मग्रंथांमध्ये ज्या प्रमाणे स्त्रीसाठी पतिव्रता धर्म आहे त्याचप्रमाणे विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत असते. या व्रतानुसार, विधवा स्त्रीने कशा प्रकारे जीवन जगावे, हे निश्चित करण्यात आले आहे.

* विधवा स्त्रीने पुरुषासोबत किंवा तिच्या माहेरीच रहायला हवे.

* विधवा स्त्रीने साजशृंगार, दागिने घालणे किंवा केस धुणे सोडून द्यायला हवे.

* विधवा स्त्रीने दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस अन्नाचा त्याग करावा.

* विधवा स्त्रीने आंबट-गोड खाऊ नये. फक्त साधे अन्न खावे.

* सार्वजनिक कार्यक्रम, शुभकार्य, विवाह, गृहप्रवेशावेळी तिने हजर राहू नये.

* विधवा स्त्रीने शंकराची उपासना करावी. आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्यासाठी उपवास करावेत.

* विधवेसोबत विवाह करणारा नरकात जातो.

* याशिवाय जर एखादी महिला विधवा नसेल पण तिचा पती परदेशात गेला असेल तर तिनेही विधवा व्रताचेच पालन करावे.

व्हिडीओही उपलब्ध

पत्रिका, ज्योतिष, विधवा व्रत इत्यादींवर लेख उपलब्ध आहेत. सोबतच असे व्हिडीओही आहेत ज्यात विधवा स्त्रीने पुनर्विवाह करावा की नाही, हे सांगितले आहे.

विधवा स्त्रीच्या हातून कोणतेही शुभकार्य का केले जात नाही? विधवा स्त्रीने सफेद साडीच का नेसावी? घरातील दोषांमुळेही स्त्री विधवा कशी होते? इत्यादी माहिती या व्हिडीओतून मिळते.

स्त्रीला आशीर्वाद दिला जातो, ‘अखंड सौभाग्यवती भव’ म्हणजे जोपर्यंत ती जिवंत राहील तिचे सौभाग्य अबाधित रहावे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, असा आशीर्वाद एखाद्या पुरुषाला दिला जात नाही, कारण पत्नी मेल्यास त्या पुरुषाला पुनर्विवाहाचा अधिकार असतो. त्याला २-३ मुले असली तरी एखादी स्त्री त्याच्याशी लग्न करतेच. याउलट जर एखादी स्त्री विधवा झाली तर आपला समाज आणि धर्म तिच्यावर असे काही आघात करतो की, तिचे जगणे जणू नरक होते.

विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, जर पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचा दोष स्त्रीच्या पत्रिकेतील ग्रहांना दिला जातो. प्रत्यक्षात हा आपल्या समाजातील बुरसटलेल्या नियमांचा दोष नाही का? हा दोष निवारण्यासाठी उपाय का असू नयेत?

आज एकीकडे आपण विज्ञानातील नवीन शोध, प्रगतीच्या गप्पा मारतो. मग दुसरीकडे विधवा, परितक्त्या, अविवाहित स्त्रीच्या जीवनातील सुधारणेचा विचार दाबून का टाकला जातो. अशा महिलांवर मन मारून जगण्याची वेळ का येते? प्रत्यक्षात फक्त व्यासपीठांवर कायक्रमांचे आयोजन करून काहीच होणार नाही, तर उदार अंतकरणाने त्यांना चांगल्या प्रकारे जगण्याचा हक्क देणे गरजेचे आहे. कारण त्या जशा आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, पण माणूस तर त्याही आहेत.

मुलांमध्ये बचतीची सवय रूजवा

* राजेश शर्मा

गोष्टीचे महत्त्व समजल्यानंतर योग्य दिशेने चालत हे कार्य सहज केले जाऊ शकते. जर आपल्या मुलास बालपणातच बचतीचे महत्त्व समजले असेल तर तो आपल्या आयुष्यातील मोठयाहून मोठया समस्येस सहज सामोरे जाऊ शकेन. जे पालक बालपणातच आपल्या मुलांमध्ये बचत करण्याची सवय रुजवतात, ते त्यांचे भविष्य सुरक्षित करतात. बचतीचे महत्त्व समजल्यानंतर त्यांना पैशाचे मूल्य माहित होते आणि नंतर त्यांच्या खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होतो. आजच आपल्या मुलांना याविषयीची शिकवण देण्यास प्रारंभ करा.

पैशाचे मूल्य समजावून सांगा : महागाईच्या या युगात मुलांना पैशाचे मूल्य माहित असणे महत्वाचे आहे. आपण त्यांना समजावून सांगावे की पैसे कमवण्यासाठी आपण दिवसभर खूप मेहनत करता. त्यांना हेदेखील पटवून देण्याचा प्रयत्न करा की त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी आपण दिवसातून बरेच तास पैसे जमविण्यासाठी राबता. तसेच त्यांना हेही समजावून सांगा की पैशाचा अपव्यय करण्याची सवय त्यांना कर्जाच्या सापळयात अडकवू शकते.

प्रत्येक मागणी पूर्ण करू नका : प्रत्येक पालक आपल्या जिवापेक्षा आपल्या मुलांवर अधिक प्रेम करतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू इच्छितात. परंतु आपल्या मुलांनी शिस्तीत रहावे आणि कष्टाने मिळवलेल्या पैशाचे मूल्य समजावे असे आपणास वाटत असेल तर त्यांच्या प्रत्येक लहान-मोठया मागणीची त्वरित पूर्तता करणे त्यांच्या भविष्यासाठी योग्य ठरणार नाही. जर आपण असे पालक असाल, जे आपल्या मुलांची प्रत्येक लहान-मोठी मागणी त्वरित पूर्ण करतात, तर आपल्याला आपली सवय बदलण्याची आवश्यकता आहे, कारण नंतर आपली ही वृत्ती आपल्याच मुलांसाठी एक समस्या बनू शकते. ते हट्टी बनू शकतात, अनुशासनहीन होऊ शकतात, आपल्या गरजांवर नियंत्रण न ठेवल्यामुळे ते गुन्हेगारी कारवायांमध्ये अडकू शकतात. आपण मुलांना लहानपणापासूनच गरज आणि ऐषो-आरामामध्ये फरक करायला शिकवायला हवे.

मुलांना पिगी बँक द्या : आपल्याकडे येणारे पाहुणे माघारी परतांना निश्चितपणे आपल्या मुलांना पैसे देत असतील. मुलांना त्यांच्या नानी, आजी, काका आणि मामाकडूनही थोडे-फार पैसे मिळतच असतात. तुम्हीही त्यांना पॉकेटमनी देता. आपली मुले हा पैसा वाचवतात की सर्व खर्च करतात? जर मुले पैसे वाचवत असतील, तर निश्चिंत रहा, त्यांचे भविष्य सुरक्षित आहे, परंतु जर सर्व पैसे मौजमजेत किंवा आवडीच्या वस्तू खरेदी करण्यात उधळत असतील तर ही सवय त्यांच्यासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते. जर आपणास वाटत असेल की आपल्या मुलांनी पैसे वाचवणे शिकावे तर लहानपणापासूनच त्यांना पैशाचा योग्य वापर करण्यास शिकवा. त्यांना सांगा की काही पैसे खर्च करा आणि काही बचत करा. बचतीबद्दल आकर्षित करण्यासाठी आपण त्यांना कार्टून कॅरेक्टरची पिग्गी बँक खरेदी करून द्या. पिग्गी बँकेत पैसे टाकत राहिल्यामुळे बचत करण्याची सवय सहज विकसित केली जाऊ शकते.

बचत खाते उघडा : आपण आपल्या मुलांना बचतीच्या सवयीचे फायदे सांगायला हवे. दरमहा त्यांचे बचत केलेले पैसे कसे गुंतविले जाऊ शकतात हे आपण त्यांना सांगू शकता. त्यांना आपल्याबरोबर बँकेत घेऊन जा आणि नियमानुसार त्यांचे खाते उघडा. आजकाल बँकांमध्ये मुलांच्या नावावर बँक खाती उघडण्याची सुविधा आहे. त्यांना आपल्या खात्यात पैसे जमा करण्यास शिकवा. त्यांची आजची लहान बचत उद्याची मोठी गरज पूर्ण करू शकते.

उधळपट्टीचे तोटे समजावून सांगा : बरीच मुले पेन्सिल, कागद, रबर किंवा इतर वस्तू वाया घालवतात. पेन्सिल थोडी छोटी झाली नाही की लगेच डस्टबिनमध्ये फेंकतात किंवा वहीच्या पानांवर १-१ ओळ लिहून उर्वरित पृष्ठ रिक्त सोडतात. आपण त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करा की झाडे तोडून कागद बनविला जातो आणि जर त्यांनी कागद वाया घालवला तर ते एक नवीन झाड कापण्याची तयारी करत आहेत. झाडांपासून आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध होतो, म्हणून ते असणे महत्वाचे आहे. अशा प्रकारे कथेच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांची वस्तू वाया घालवण्याची सवय सुधारा.

वाया घालवण्याचे तोटे समजावून सांगा : तुमच्या मुलांची बिस्किटे, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, पिझ्झा-बर्गर, मोमोज किंवा खेळण्यांचा हट्ट पूर्ण करता-करता तुमचे घरगुती बजेट बिघडते. फास्ट फूडच्या सवयीमुळे मुलांचे आरोग्यही बिघडते. ते हट्टी, चरबीयुक्त शरीराचे आणि आळशी बनतात. त्यांना असे वाटू लागते की त्यांनी जे काही मागितले ते आपण नक्कीच पूर्ण कराल. मुलांना हे सांगा की आपण किती कष्टाने पैसे कमावतात. त्यांना समजावून सांगा की पैसे नसल्यास आपली सर्व महत्त्वाची कामे थांबली जातील. यामध्ये मुलांची शालेय फी, आजी-आजोबांची औषधे, पाळीव प्राण्याचे खाणे-पिणे, वीज-पाणी, किराणा इ. ची बिले समाविष्ट करा. मुले नेहमी त्यांच्या पाळीव प्राण्याशी किंवा आजी-आजोबांशी खूप जोडले गेलेले असतात, ते त्यांचा खर्च थांबला गेल्याची गोष्ट सहजपणे समजू शकतात आणि स्वत:मध्ये बचत करण्याची सवय विकसित करू शकतात.

घराचे बजेट तयार करण्यात मुलांनाही सामील करा : जर आपण आपल्या जोडीदारासह किंवा पालकांसह घराचे मासिक बजेट बनवत असाल तर या प्रक्रियेत आता आपल्या मुलांनादेखील सामील करा. आपली चिंता, पैशांची समस्या किंवा कर्जाची योग्य परिस्थिती समजल्यानंतर काही महिन्यांत कदाचित आपली मुले वायफळ खर्चाची सवय सोडतील. ते त्यांचा पॉकेटमनी वाचवतील आणि घरातील खर्चात मदत करण्यास सुरुवात करतील. हे एक चांगले चिन्ह आहे.

बचतीच्या पैशातून भेटवस्तू मिळवून द्या : मुलांच्या बचतीच्या पैशातून त्यांच्याच गरजेच्या वस्तू खरेदी करा. असे असू शकते की मूल आपल्या घरामध्ये बऱ्याच काळापासून टेबल लँपसाठी आग्रह धरत असेल किंवा अभ्यासासाठी स्वतंत्र टेबल चेअर, स्टोरी बुक, व्हिडिओ गेम्स इत्यादीची मागणी करत असेल, तेव्हा त्याला या गोष्टी त्याच्याच बचतीच्या पैशातून मिळवून द्या. असे केल्याने त्याच्यामध्ये बचत करण्याचा उत्साह वाढेल आणि मग तो त्याच्या पैशातून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जीवापाड काळजीदेखील घेईल.

मुलांना सर्जनशील बनवा : घरातील जुन्या वस्तूंपासून काहीतरी उपयुक्त वस्तू बनवून मुलांना दाखवा आणि त्यानंतर त्यांनाही तसे करण्यास प्रेरित करा. मुले कोल्डड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्यांपासून पेन स्टँड बनविणे, आईस्क्रीम स्टिकपासून दिवे बनविणे किंवा तुटलेल्या खेळण्यांपासून हस्तकला बनविणे यासारख्या मजेदार गोष्टी करतात. त्यांना त्यांच्या जुन्या गोष्टी पुन्हा वापरण्यास शिकवा, पेन्सिल किंवा रबर पूर्ण संपल्यावरच त्यांना नवीन पेन्सिल किंवा रबर वापरायला सांगा. जर पेन्सिल लहान झाली असेल तर ती जुन्या पेनच्या पुढे घाला आणि वापरायला द्या. रद्दी झालेल्या वस्तूंपासून नवीन आणि आकर्षक गोष्टी कशा तयार केल्या जाऊ शकतात हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. यामुळे ते सर्जनशीलदेखील होतील आणि त्याचवेळी त्यांच्यात बालपणापासूनच वस्तूंना महत्त्व देण्याची गुणवत्तादेखील विकसित होईल.

पॉकेट मनी कमवा : आपल्या मुलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनी व्यतिरिक्त त्यांना स्वत:ही पॉकेटमनी कमविण्यास प्रोत्साहित करा. हे कोणत्याही प्रकारे शक्य आहे. काही घरगुती कामे केल्यावर त्यांना बक्षीस म्हणून काही रुपये देऊ शकता. खोली साफ केल्यावर किंवा भावंडांसाठी गृहपाठ केल्यावरही, आपण त्यांना भेटस्वरूप काही पैसे देऊ शकता, जे त्यांनी त्यांच्या पिग्गी बँकेत घालावेत. कोणत्या कामासाठी किती पैसे निश्चिंत करावे लागतील हे कामाच्या अडचणीवर अवलंबून असावे. पैसे मिळवून मुले खूप उत्साही होतात आणि त्यांना श्रमाचे महत्त्व आणि पैशाचे मोलदेखील कळते.

बचतीसाठी बक्षीस : जेव्हा आपल्या मुलास त्याचे आर्थिक लक्ष्य प्राप्त होईल तेव्हा त्याला पुरस्कार देण्याविषयी अवश्य विचार करा. आपण इच्छित असल्यास या कामगिरीवर त्याला एखादा नवीन ड्रेस खरेदी करून द्या किंवा त्याला केक किंवा आइस्क्रीमवर खाण्यासाठी न्या. आपण मुलाने बचत केलेल्या पैशांच्या बरोबरीने पैसे मिळवून त्याच्या खात्यात जमा करू शकता. यामुळे त्याचा उत्साह वाढेल आणि अधिकाधिक बचत करण्यासाठी तो प्रेरित होईल.

माझे सुरेख सासर

* दीपा पांडेय

आपल्याकडे मुलींना सातत्याने सांगितले जाते की तुझे काय ते नखरे सासरी जाऊन पूर्ण कर, आम्ही म्हणून हे सगळं सहन करतोय. जेव्हा तू सासरी जाशील, तेव्हा समजेल. सासूची सर्व उठाठेव करावी लागेल ना, तेव्हा तुझे डोकं ठिकाणावर येईल. यामुळे मुलींच्या मनात सासरबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होते. मग माहेरून सासरी पाठवणी झाल्यावर ती विविध प्रश्न घेऊन सासरी पाऊल ठेवते.

पण जेव्हा आधुनिक विचारसरणीची सासू खुल्या मनाने स्वागत करते, तेव्हा त्यांच्या सुप्त इच्छांना वाव मिळतो.

त्या आपल्या नोकरी, व्यवसायात सासूचा सहयोग पाहून भावुक होऊन जातात. सासू-सुनेचे पारंपरिक रूप काळाच्या मागे पडून त्याला मैत्रीचे स्वरुप प्राप्त झालेले आहे, जिथे दोघींच्या विचारांतून प्रत्येक समस्येवर तोडगा काढला जातो. अन् घरातील अन्य सदस्यांना याचा सुगावाही लागत नाही.

सासू-सुनेचं अतूट नाते

सासू-सुनाच्या अशा काही जोडयांशी तुमची भेट घालून देणार आहोत, ज्या दूधात साखर मिसळल्यासारख्या एकमेकांत एकरुप झालेल्या आहेत.

मिनाक्षी पाठक एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे आणि मिडीया कॉलनी, गाझियाबादमध्ये राहते. तिचे या नात्याविषयी म्हणणे आहे, ‘‘माझ्या नोकरी करण्याला माझ्या सासूचा संपूर्ण पाठिंबा आहे. एकीकडे माझ्या मैत्रिणी जेवणाच्या सुट्टीमध्ये आपल्या सासूवर टिका-टिपण्णी करत असतात. दुसरीकडे मी मात्र निशिचंत असते. माझ्या सासूच्या छत्रछायेत मुले असतात, जी त्यावेळी शाळेतून येऊन जेवून झोपी गेलेली असतात. एवढेच नाही तर माझ्या सासू माझ्या पेहरावाला घेऊन काहीच रोक-टोक करत नाही. उलट त्याच मला नव-नवीन गोष्टी करायला सांगत असतात. मला माझ्या मनाप्रमाणे वेशभूषा धारण करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.’’

मिनाक्षीच्या सासूचे म्हणणे काय ते ही तिने सांगितले, ‘‘माझ्या मुली लग्न करून दुसऱ्या शहरात गेलेल्या आहेत. परंतु ही मुलगी माझ्यासोबत असते. जी माझा आहार, औषधे, छोटया-मोठया समस्येची पूर्ण काळजी घेते. घरी येणाऱ्या माझ्या मैत्रिणींचे छान स्वागत करते. असे सर्व असताना मला माझ्या मुलीकडून कसली तक्रार असेल.’’

आणखी काही उदाहरणे

वैशाली, गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एम.बी.ए श्वेता नागोईचे म्हणणे आहे, ‘‘मी स्वतचा व्यवसाय करण्यास इच्छुक होते. परंतु मला माझ्या माहेरी यासाठी परवानगी मिळाली नाही. परंतु सासरी मात्र सासूच्या सहयोगी वृत्तीमुळे मी आज आर्टिफिशीअल ज्वेलरीचा व्यवसाय घरी बसून करू शकते. माझ्या छोटया मुलाकडे त्याच लक्ष देतात.

‘‘लोक म्हणतात की सासू कधीच आई होऊ शकत नाही. पण हे अजिबातच खरे नाही. जर आपण प्रत्येक नात्याला मान-सन्मान दिला तर प्रत्येक सासू-सूना या मायलेकी बनू शकतात.’’

श्वेताच्या सासूचे म्हणणे आहे , ‘‘मी माझ्या सूनेच्या पेहरावात तसेच इतर कामात हस्तक्षेप करत नाही. मला वाटते की मोठयांचा मनापासून मान ठेवला पाहिजे फक्त दिखावा करण्यासाठी नाही. माझी सूनही माझा मान ठेवते आणि मी ही तिच्या आत्मनिर्भरतेचा पूर्ण सन्मान करते.’’

फरीदाबादची रहिवाशी तनु खुराना ही शासकीय संस्थेत सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. ती या नात्याबाबत खूप भावुक आहे. ‘‘मी ब्राह्मण कुटुंबातून प्रेम विवाह करून पंजाबी कुटुंबात आलेली आहे. येथील आहार, आधुनिक जीवनशैली माझ्या पारंपरिक कुटुंबापेक्षा खूप वेगळी आहे.

‘‘पण माझ्या सासूच्या सहयोगाने मी सासरच्या रंगात रंगून गेले आहे. कारण इथे नोकरीवरून माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नाही. जर कधी मला ऑफिसला जाण्यास उशीर झाला तर माझी सासू माझ्यासाठी नाश्ता बनवून ठेवते. जर आम्ही दोघे पती-पत्नी लेट नाईट पार्टी करण्यासाठी गेलो तरीही माझ्या सासूला कसलीच हरकत नसते.’’

तेथेच तनुच्या सासू किरण, खुराना सांगतात, ‘‘माझे तीन मुलगे आहेत. मुलगी असावी अशी इच्छा होती, जी माझ्या मोठया सुनेच्या म्हणजेच तनुच्या रुपात पूर्ण केली. तनुची सजण्याची आवड पाहून मला आनंद होतो. आम्ही दोघी मिळून ब्युटी पार्लर, शॉपिंग इ. ठिकाणी एकत्र जातो.’’

नात्यातील समजूतदारपणा

नीतूच्या सासूबाई चंदा गौतम म्हणतात, ‘‘जेथे मला घरातील जेष्ठ व्यक्ती म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घ्यावी लागते, तेथेच कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहभागी होणे गरजेचे आहे. नीतू माझा मान राखते आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी माझा सल्ला घेते.’’

गृहिणी चहक मोर्दिया म्हणते, ‘‘मी ग्वाल्हेरच्या विभक्त कुटुंबातून संयुक्त कुटुंबात दुसऱ्या क्रमांकाची सून झाले. सासरी आले तेव्हा मनात भीती होती की मी सर्वांना खूश ठेवू शकेन की नाही. पण सासूने सर्व घरातील गोष्टी इतक्या प्रेमाने आणि धीराने शिकवल्या की मी आज एक कुशल गृहिणी बनले आहे. माझे संपूर्ण कुटुंब माझ्यावर खूप प्रेम करते. आम्ही एकत्र सहलीलादेखील जातो. माझी सासू विनाकारण रोक-टोक करत नाही. मला त्यांची ही गोष्ट आवडते.’’

तेथेच चहकच्या सासूबाई मोर्दिया म्हणतात, ‘‘सुनेमधील नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड पाहून मलाही तिला नवीन गोष्टींची माहिती द्यायला आवडते. ती खूपच लवकर येथील प्रथा-परंपरा शिकल्या. मुले आपल्या संसारात सुखी राहू देत हीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांनी या वयात मज्जा-मस्ती करायची नाही तर मग कधी करणार?’’

या दोघींच्या बोलण्याचा असाच निष्कर्ष निघतो की सासरी जेव्हा सूनेचा सामना सासूशी होतो तेव्हा लहानपणापासून मनात बसवलेली भीतिच वरचढ ठरू लागते.

पण जेव्हा तिच सासू सुनेचा हात पकडून धीराने तिला संसारातील पाठ शिकवते, सूनेला तिच्या आवडीनुसार व्यवसाय, नोकरी करण्याची मुभा देते, तिला मदत करते, तेव्हा सूनेच्या मनीचे मोर नाचू लागतात, तिचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती म्हणते, ‘‘सुरेख माझे सासर आहे…’’

मदर्स डे स्पेशल : आईचा आनंदही गरजेचा

* गरिमा पंकज

नुकतेच मेट्रो आणि अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या १,२०० महिलांचे मॉम्सप्रेसो नावाच्या कंपनीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात असे समोर आले की, ७० टक्के माता त्यांच्या जीवनात आनंदी नाहीत. ५९ टक्के माता वैवाहिक जीवनात सुखी नाहीत तर ७३ टक्के मातांना असे वाटते की, मुलांच्या नजरेत त्या स्वत:ला चांगली आई म्हणून सिद्ध करू शकत नाहीत.

जरा विचार करा, मातृत्वाचा प्रवास कितीतरी अवघड असतो. ९ महिन्यांपर्यंत अधूनमधून पोटात प्रचंड वेदना, छातीत जळजळ, उलटया, पाठदुखी, कफ, व्हेरिकोस व्हेन्ससारखे आजार आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ सहन कराव्या लागणाऱ्या प्रसूती कळा. एवढया सगळया त्रासानंतर एका महिलेला मातृत्वाचा आनंद मिळतो. ती बाळाला जीवन आणि पतीला पिता बनण्याचे सुख देते.

आई झाल्यावरही ती मुलासोबत रात्रभर जागते. काहीही न खातापिता सतत काम करत असते. बाळाला दूध पाजते, त्याचे लंगोट बदलते, त्याला आंघोळ घालते, पण २४ तास काम करणाऱ्या आईच्या सुखाचा विचार घरातील किती लोक करतात?

का निराश आहेत माता?

खरंतर २०-२५ वर्षांपूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबात मुलांकडे लक्ष द्यायला कोणीतरी असायचेच. आजच्या तांत्रिक विकासाच्या आणि वाढत्या स्पर्धेच्या या युगात कुटुंब छोटी झाली आहेत. याचा अर्थ आईपुढील आव्हाने आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.

घरात वडील भलेही जास्त शिकलेले असले, आई कामाला जात असेल तरीही मुलाला शिकवण्याची, त्याचा गृहपाठ करून घेण्याची जबाबदारी आईचीच असते. मुलाच्या काळजीमुळे आई सतत तणावाखाली वावरत असते. जसे की, मुलाकडून होत असलेला गॅजेट्स आणि इंटरनेटचा जास्त वापर, त्याचे खाण्या-पिण्याचे नखरे, त्याला शिस्त लावणे, त्याच्या परीक्षा यामुळे आई सतत चिंतेत असते.

पेप्सिकोच्या सीईओ इंदिरा नुयी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘माझ्या लग्नाला ३४ वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. मला २ मुली आहेत. दर दिवशी सकाळी तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की, तुम्हाला आज पत्नीची जबाबदारी पार पाडायला महत्त्व द्यायचे आहे की आईची जबाबदारी पार पाडायला प्राधान्य द्यायचे आहे. प्रत्यक्षात अनेकदा तुम्हाला या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कितीतरी निर्णय संयमाने घ्यावे लागतात. तरीही आज जर तुम्ही माझ्या मुलींना माझ्याबद्दल विचारले तर मला वाटत नाही की, त्या मी एक उत्तम आई आहे असे सांगतील.’’

चला माहीत करून घेऊया की, आईच्या आनंदाच्या मार्गात कोणकोणते अडथळे असतात :

पती आणि मुलांचे सहकार्य : सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षभरात २७ टक्के मातांचे त्यांच्या कुटुंबाने कुठल्याच प्रकारचे कौतुक केले नाही. जर एखादी आई आपल्या मुलांसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत सतत वेगवेगळी कामे करत असेल, सतत कष्ट करत असेल तर आपल्या पत्नीसोबत ठामपणे उभे राहण्याची जबाबदारी पतीचे नाही का? आईला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा, तिला प्रेम आणि आदर द्यायला हवा, असा विचार तिच्या मुलांनी करायला नको का?

स्वत:साठी वेळ : पती, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांना कसे आनंदी ठेवावे, याची चिंता महिलांना सतत सतावत असते. स्वत:च्या आनंदाकडे मात्र त्या नेहमीच दुर्लक्ष करतात.

कुठलेही नाते तेव्हाच मजबूत होते जेव्हा त्याचा पाया भक्कम असतो. महिला जेव्हा एखाद्या कुटुंबाचा घटक बनते तेव्हा त्यासाठी तिला कितीतरी तडजोड करावी लागते. पती आणि सासू-सासऱ्यांनी याचा विचार करायला हवा की, अतिशय कष्टाने घराला सुखी करणाऱ्या आईच्या अस्तित्वाला महत्त्व द्यायलाच हवे. तिच्या जीवनाशी संबंधित निर्णय तिलाच घ्यायला द्यायला हवेत. तिच्या सुखाची, आनंदाची काळजी घ्यायला हवी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें