मान्सून स्पेशल : साजश्रृंगार पावसाळ्यातील

* प्रतिनिधी

पावसाळयाच्या दिवसांत जास्त मेकअप करणे जोखमीचे असते. कारण या दिवसांत मेकअप खराब होण्याची भीती असते. म्हणूनच पावसाळयाच्या दिवसांत हलका आणि वॉटरप्रूफ मेकअप केला पाहिजे. चेहऱ्यावर वॉटरप्रूफ फाउंडेशन, न दिसणारी लिपस्टिक आणि वॉटरप्रूफ आयलायनर इ. चा वापर केला पाहिजे. असे प्रॉडक्टच पावसाळयाच्या दिवसांत आवश्यक असतात. इथे आम्ही काही मेकअप टिप्स सांगत आहोत, ज्या पावसाळयाच्या दिवसांत मेकअप करताना आपल्याला उपयोगी ठरू शकतील.

चेहऱ्यावरील ऑइल स्वच्छ करा

सर्वप्रथम आपला चेहरा पाण्याने चांगल्याप्रकारे धुवा आणि ५-१० मिनिटे चेहऱ्याला आइस क्युब लावा. त्यामुळे चेहऱ्याचे तेल निघून जाईल आणि मेकअप दीर्घकाळ टिकेल.

ऑयली आणि ड्राय त्वचेसाठी

ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी बर्फाने मालीश केल्यानंतर टोनरचा वापर करून पाहा. त्यामुळे त्वचेत ओलावा येईल. शिवाय ज्यांची त्वचा ऑयली आहे, त्या अॅस्ट्रिजंटचा वापर करू शकतात.

बेस तयार करा

मेकअपचा बेस तयार करण्यासाठी फाउंडेशनचा वापर करू नका.

डोळयांसाठी

डोळयांना हलकासा आयलायनर लावा, त्यावर हलका ब्राउन, पिंक किंवा पेस्टल रंगाच्या आयशॅडोचा वापर करा. त्यानंतर वॉटरप्रूफ मस्कारा लावा.

ओठांसाठी

ओठांवर सॉफ्ट मॅटी लिपस्टिक लावा. अशाप्रकारची लिपस्टिकच पावसाळी मोसमात उत्तम ठरते. मात्र ओठांवर शाइन आणण्यासाठी तुम्ही पिंक ग्लॉसचा वापरही करू शकता.

वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावा

पावसाळयाच्या दिवसांत वॉटरप्रूफ मॉइश्चरायजर लावणे टाळू नका. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर हलका मेकअपच करा.

आपली हेअरस्टाईल सहजसोपी असावी

जर पावसाळयाच्या दिवसांत जास्त स्टायलिश हेअरस्टाईल ठेवाल, तर केस भिजल्यानंतर ते सोडविणे मुश्कील होऊ शकते किंवा केस तुटण्याची सर्वात जास्त भीती असते. पावसाळयात बँड किंवा लेअर हेअर स्टाईलला प्राधान्य द्या.

चमकदार ज्वेलरी टाळा

पावसाळयाच्या दिवसांत चमकदार ज्वेलरी शक्यतो टाळा. स्टोन ज्वेलरीचा जास्त वापर करा. हलके दागिने पावसाळयात आरामदायक असतात.

लाइट मेकअप करा

आपणाला जर सर्वांत उठून दिसायचे असेल, तर लाइट मेकअप आणि लाइट शेड्सचा वापर करा. उदा. पिंक, ब्राउन किंवा पिच रंगांचा.

आयब्रो पेन्सिलचा वापर टाळा

पावसाळयाच्या दिवसांत आपले आयब्रो नेहमी सेट ठेवा आणि आयब्रो पोन्सिलचा वापर चुकूनही करू नका. या दिवसांत पेन्सिलचा रंग ओघळण्याची शक्यता असते.

केस रोज धुवा

या दिवसांत आपले केस नियमितपणे धुवा, तसेच कोंडयापासून संरक्षणासाठी नियमितपणे मालीशही करा. केसांची देखभाल करा. पावसाळयाच्या दिवसांत केसांना एक्स्ट्रा केअरची आवश्यकता असते.

कॉटनचे कपडे वापरा

पावसाळयाच्या दिवसांत जीन्सचा वापर करू नका. हलके कॉटनचे कपडे वापरा. उदा. कॅप्री, कॉटन पँट किंवा थ्री फोर्थ इ.

सफेद कपडे टाळा

या दिवसांत सफेद कपडे वापरणे टाळा. कारण सफेद कपडे लवकर खराब होतात. म्हणून डार्क रंगाचे कपडे वापरा.

सँडल किंवा चप्पल वापरा

या दिवसांत लेदरचे शूज व सँडल वापरणे टाळा. हलके आणि मजबूत सँडल व चप्पल वापरा. शक्य असेल, तर स्नीकर्सच वापरा.

महिलांमध्ये वाढतंय मद्यपान

*  मदन कोथुनिया

गेल्या काही वर्षांपासून स्त्रियांमध्ये पिण्याची फॅशन वेगाने वाढू लागलीए, ज्याचं एक खास कारण म्हणजे दारूच्या कंपन्यांनी दारू पिणाऱ्या स्त्रियांना आधुनिक, स्वतंत्र व पुरुषांच्या बरोबरीच्या म्हणून प्रचलित करणं आहे. बिअर, शँपेन इत्यादी गोष्टी जुन्या झाल्या आहेत. आता तर दारूचे विविध ब्रॅण्ड बाजारात सहजपणे उपलब्ध आहेत. व्होडका, वाइन, व्हिस्की इत्यादींचे कॉकटेल महाविद्यालयीन तरुणी व गृहिणींमध्ये खूपच प्रचलित झालेत. त्या किट्टी पार्ट्या, लग्नाचा वाढदिवस इत्यादी प्रसंगी पिण्यास व पाजण्यास अजिबात संकोचत नाहीत.

दारू सेवनाच्या जुन्या परंपरांमध्ये पूर्वी दारू पिणाऱ्या स्त्रिया २ विपरीत वर्गांशी संबंधित होत्या. पहिल्या वर्गात झोपडपट्टयांमध्ये राहाणारे दलित, वेश्या येतात, ज्यांच्यासाठी नशा हे उपजीविकेचं साधन राहिलंय, तर दुसऱ्या वर्गात पाश्चिमात्य सभ्यतेने प्रेरित आणि भौतिक सुखवस्तूंच्या मुबलकतेमुळे व्यावसायिक समाजातील स्त्रिया येतात, ज्या लेट नाइट पार्ट्या अथवा पतीसोबत एक्झिक्यूटिव्ह पार्ट्यांमध्ये पिण्याला स्टेट्स सिंबल समजतात. आता एक तिसरा नवीन वर्ग महाविद्यालयीन तरुणींचा आहे, ज्या रात्री उशिरापर्यंत डान्स फ्लोअरवर थिरकण्यासाठी नशेच्या अधीन होतात.

या विषयाबाबत जेष्ठ मानसोपचार डॉ. शकुंतला यादव सांगतात, ‘‘व्यावसायिक वर्गातील स्त्रियांमध्ये पिणं एक स्टेट्स सिंबल झालंय. त्या पिण्याने स्वत:ला पुरुषांच्या बरोबरीने समजतात. भौतिक सुखाच्या प्रचुरतेमुळे पुरुष पिऊ शकतो, तर त्या का नाही? हिच धारणा त्यांना पिण्यासाठी प्रेरित करते.’’

अलीकडेच जयपूरच्या बिडला सभागृहात सिकोईडिकोन संस्थेद्वारे ‘स्त्रिया आणि नशा’ विषयावर आयोजित विचार परिसंवादाच्या अहवालानुसार नशेबाज महिलांची चकित करणारी आकडेवारी समोर आली. यानुसार सर्वाधिक दारूचं सेवन करणाऱ्या स्त्रियांचं वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान आढळलंय. ४२ टक्के नोकरदार स्त्रिया, ३१ टक्के एकेकट्या राहाणाऱ्या स्त्रिया, ३२ टक्के घटस्फोटित आणि ८० टक्के देहव्यापाराशी संबंधित स्त्रिया दारूबरोबरच इतर व्यसनांच्या अधीन आहेत.

आता प्रश्न असा निर्माण होतो की शेवटी असं कोणतं कारण आहे की विभिन्न वर्गातील स्त्रिया कळतनकळत स्वत:ला यामध्ये का गुंतवून घेत आहेत?

सिकोईडिकोन संस्थेच्या विचार संवादानुसार, दलित, वेश्या, श्रमजीवी व मजूर वर्गातील स्त्रिया आपलं अज्ञान, अशिक्षा, आर्थिक व सामाजिक स्तरानुसार घरातच स्वस्त देशी दारू, ताडीमाडी इत्यादी पितात. असुरक्षित भविष्यामुळे पलायनवादी विचारसरणी यांना या दलदलीत ढकलते.

तर व्यावसायिक कुटुंबातील स्त्रिया दारूचे २-३ घोट घशातून जाताच आत्मविश्वासू, चपळ, स्मार्ट, स्वत:ला अधिक शिष्ट व संयमी समजू लागतात. याबरोबरच मनात अनेक संभ्रम साठवून ठेवत असल्यामुळेदेखील नशेकडे आकर्षित होतात. जसं दारूमुळे सेक्स व फोरप्लेमध्ये अधिक उत्तेजना आणि अधिक वेळ स्टॅमिना राहाणं वगैरे. स्वत:ला अधिक अॅडव्हान्स, वेस्टर्न आणि सेक्स अपीलिंग बनविण्यासाठीदेखील कॉकटेलचा ग्लास ओठांना लावल्यानेदेखील व्यावसायिक स्त्रियांना फरक पडत नाही.

कॉलेजची पार्टी असो वा लेडीज पार्ट्या, फ्रूट ज्यूस, कोला इत्यादीसोबत कॉकटेल वा बिअरची प्रथा आधुनिक काळात जोरात सुरू आहे. एवढंच नाही तर, मोठमोठे केकशॉप्स असो वा फ्रूट ज्यूस कॉर्नर कुठेही फ्रूट बिअर मिळणं सर्वसामान्य झालंय. या कारणामुळेच चव चांगली असल्यामुळे एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला आग्रह करते. नंतर एकदा का चव लागली की पार्ट्यांमध्ये दारूच्या ग्लासाकडे हात स्वत:हून वळतो.

मुलांवर वाढतंय दुष्परिणाम

मुलं आपले वडील दारुडे असल्याचं सत्य कबूल करतात, परंतु आईला बिअर, दारू पिताना पाहू शकत नाहीत. ज्या कुटुंबातील मुलं आपल्या आईला असं करताना पाहातात, ती लहानपणापासून किशोरावस्थेच्या पायरीपर्यंत पोहोचता पोहाचता आपल्या १७व्या, १८व्या बर्थ डे पार्टीत बिअर, शॅम्पेनच्या बाटल्या खोलायला घाबरत नाहीत.

खरं म्हणजे, मूल आपल्या आईकडून अधिक अपेक्षा ठेवतं. याच कारणामुळे त्यांच्या मनात आईची बनलेली छबी आईच्या जरादेखील चुकीच्या वागणुकीचे शितोंडे सहन करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ते आईकडे उपेक्षित नजरेने पाहातात.

या प्रकरणात एसएमएस मेडिकल कॉलेज व इस्पितळात कार्यरत असणारे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शिव गौतम सांगतात, ‘‘माणूस दारू पितो ती क्षणभराच्या आनंदासाठी आणि त्याबदल्यात त्याला आयुष्यभराचा त्रास मिळतो. जर आपण दारू कायमची नाकारली तरच आपण तणाव दूर करण्याचे सार्थक उपाय शोधू शकतो. तेव्हा आपल्याला आयुष्यभराचं सुख मिळू शकेल.’’

दारू देई अनारोग्य

दारू पिण्याच्या क्षणभराच्या आनंदाचे वाईट परिणाम समोर येतात, याचा पुरुषांपेक्षा स्त्रियांवर अधिक वाईट परिणाम होतो. इंग्लंडमधील रॉयल मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार स्त्रियांना दारूमुळे पुरुषांपेक्षा अधिक गंभीर आजार होतात. स्त्री आणि पुरुष समप्रमाणात दारू पीत असले तरी स्त्रीच्या रक्तात दारूचं घट्ट प्रमाण एकत्र होतं आणि रक्ताभिसरणाची प्रक्रिया हळूहळू होऊ लागते. परिणामी कॅन्सर, हृदयरोग इत्यादी रूपात आजार समोर येऊ लागतात.

‘अल्कोहोल अॅण्ड फर्टिलिटी अमंग वूमन’ पुस्तकानुसार १९९६ मध्ये ८५ हजार नर्सेसच्या मदतीने एक जागतिक शोध पूर्ण करण्यात आला. अभ्यासानंतर परिणाम असा निघाला की ५० वर्षं वा त्यापेक्षा अधिक वयाच्या स्त्रियांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो आणि आनुवंशिकरित्या हृदयरोगाच्या आजाराचा त्रास होतो. या आजारामुळे मरणाऱ्या स्त्रियांमध्ये अजून एक बाब समोर आली ती म्हणजे त्या आठवड्यातून २-३ वेळा दारू प्यायच्या. ३४ ते ३९ वयातील स्त्रियांना रक्तवाहिन्यांचा त्रास होता. याव्यतिरिक्त ज्या स्त्रिया दररोज दारू पित होत्या, त्यांच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता १०० टक्के आढळली.

महिला आणि पुरुषांनी समप्रमाणात दारूचं सेवन केले तरी दोघांमध्ये विभिन्न परिणाम दिसून येतात, महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक चरबी असते ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार शरीराला घेरून टाकतात.

अधिक मद्यापान केल्यामुळे महिलांच्या प्रसूतीवर परिणाम होतो. कोल्ड जेनसनने लिहिलेल्या पुस्तकात ‘डज मॉडरेट अल्कोहोल कंजेप्शन अफेट फर्टिलिटी’मध्ये शोधानुसार काही प्रमाणातील दारूचं सेवनदेखील महिलांच्या प्रजननशक्तीसाठी घातक ठरतं.

गर्भवती महिलांना दारूच्या सेवनामुळे अधिक त्रास होतो. प्रसूतीनंतर बाळाची मंदबुद्धी व अपंगत्वाबद्दल समजतं, परंतु प्रसूतीच्या अगोदर भ्रूण परीक्षणांच्या दरम्यान डॉक्टरांना अल्कोहोल रिलेट मल्टीपल कोजीनेटल अॅबनॉर्मलीचं खूपच संशोधन केल्यानंतरच समजू शकतं.

पाजणारं आणि त्यावर कमावणारं सरकार

भारतीय घटनेच्या कलम ४९ नुसार राज्याने आपल्या जनतेस पोषक अन्न आणि जीवनस्तर उंचावणं व जनस्वास्थ्यासारख्या सुधारणेला आपलं प्रारंभिक कर्तव्य समजावं आणि मादक पेय आणि नशेची औषधं, जी आरोग्यासाठी घातक आहेत त्यावर बंदी घालावी.

कायदा बनल्यानंतर अनेक राज्यांत दारूबंदी अधिक प्रमाणात झाली होती, परंतु काळाबरोबर मद्यनिषेधसंबंधी नीती व कार्यक्रमात हळूहळू शिथिलता आली. काही राज्यांमध्येच हा कायदा राहिला. आंध्र प्रदेशात दारूबंदी होती, परंतु लोक चोरीने शेजारच्या राज्यांतून मागवू लागले. परिणामी शेजारच्या राज्यांतून महसूल वाढू लागला. त्यामुळे दिवाळखोरी होताच दारूबंदी हटविण्यात आली. आता जरी गुजरातमध्ये दारूबंदी असली तरी, तिथलेच लोक अधिक दारू पितात.

खरंतर पूर्णपणे दारूबंदी लागू करण्याच्या मार्गात दोन गंभीर अडचणी आहेत. ती लागू करण्यात अडचणी आणि दारू पिण्याची तळमळ. परंतु ही गोष्ट कधीही नाकारू शकत नाही की दारूने सरकारला सर्वाधिक महसूल मिळतो. खरंतर पाणी, वीज यातूनदेखील महसूल मिळतो, परंतु जेवढ्या सहजतेने नशेचे कर वसूल केले जातात, तसे इतर केले जात नाहीत.

खरंतर फॅशन आणि आधुनिकता दाखविण्याच्या विविध पद्धती आहेत. फॅशन दाखविण्यासाठी गरजेचं नाहीए की दारूचे दोन घोट गळ्यातून उतरायला हवेत आणि वाईट सवयींचा स्वीकार करावा. प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व उजळल्यास नक्कीच तुम्हाला फॅशनेबल म्हणून मान्यता मिळेल.

भेट देऊन प्रेम प्रकट करा

* अमरजीत साहिवाल

‘हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना,’ तू माझ्या रोमारोमांत वसतोस आणि म्हणूनच मी जगत आहे, ‘तू एक शब्द असेल ज्याचा अर्थ आहे आनंद,’ ‘तुला काय सांगू, तू माझा आधार आहेस, तुझ्या प्रेमातच माझं अस्तित्त्व आहे…’

जसजसा फेब्रुवारी महिना जवळ येऊ लागतो, प्रेमी जोडपी आपल्या जोडीदाराला व्हॅलेंटाइनच्या भेटवस्तूवर काहीशा अशाच ओळी लिहून देत असतात. कारण त्यांच्यासाठी तर हे दिवस आनंद, आशा आणि उमेद घेऊन येत असतात.

मग या तुम्हीदेखील थोडे रोमॅण्टिक होऊन हे जाणून घ्या की व्हॅलेंटाइन डे नक्की काय आहे, ज्याने भारताच्या धरतीवर हळुवारपणे पाऊल टाकून मग हळूहळू सर्व तरुणांना आपल्या मोहपाशात घेतलं.

हा उत्सव साजरा करण्याची पद्धत आणि रीतिभाती फारच रोमांचक आणि विलक्षण होत्या. इतिहासाची पानं उलटली तर म्हटलं जातं की व्हॅलेंटाइन डे, हा एका अशा माणसाच्या बलिदानाचा दिवस आहे ज्याने प्रेम केलं आणि प्रेम करणाऱ्यांना एका पवित्र बंधनामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळात क्लोडियम हा रोमचा शासक होता जो खूपच क्रूर आणि कडक स्वभावाचा होता. त्याने आपल्या शासनकाळात सर्व शिपायांवर असं बंधन टाकलं होतं की कोणी आपल्या प्रेयसीला भेटणारही नाही आणि लग्नही करणार नाही. पण व्हॅलेंटाइनने राजाच्या मर्जीच्या विरुद्ध प्रेमी जोडप्यांचं लपूनछपून लग्न लावलं आणि प्रेम करणाऱ्यांचं मीलन करून दिलं किंवा असं म्हटलं तरी चालेल की तो प्रेमाचा देवता झाला. मात्र क्लोडियमला हे सगळं सहन झालं नाही आणि त्याने व्हॅलेंटाइनला मृत्युदंड दिला. ही गोष्ट १४ फेब्रुवारी, ईसवी सन् २६९ची आहे.

व्हॅलेंटाइनची एक मैत्रीण होती जी जेलरची मुलगी होती, तिला मृत्युपूर्वी व्हॅलेंटाइनने एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतरपासून दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइनच्या स्मृत्यार्थ साजरा केला जात आहे आणि त्याला नाव दिलंय व्हॅलेंटाइन डे.

सुरुवातीला या दिवशी लोक प्रेमपूर्ण पत्र लिहायचे पण नंतर आपल्या प्रियजनाला पत्रासोबत भेटवस्तू देण्याचंही चलन सुरू झालं आणि आज तर बाजार याच्याशी निगडित भेटवस्तूंनी भरून गेला आहे.

मग या जाणून घेऊया यावेळी कोणत्या खास भेटवस्तू दिल्या जातात आणि त्यांचं काय महत्त्व आहे.

गुलाब : प्रेम व्यक्त करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे लाल गुलाब. पण ही गोष्टदेखील लक्षात ठेवा की प्रेमीजनांना दिल्या जाणाऱ्या गुलाबांची संख्याही काहीतरी सांगते. जसं की प्रेम व्यक्त करण्यासाठी एकच गुलाब पुरेसं आहे. जर आभार मानत असाल तर अभिनंदनासाठी २५ आणि विना अटीच्या प्रेमासाठी ५० गुलाबांचा सुवासिक फुलांचा गुच्छ योग्य ठरतो. बस्स, अट ही आहे की, ते तुम्ही लव्हर्स नॉटमध्ये बांधून द्या.

हृदय/हार्ट : व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी बाजारात असंख्य गुलाब तर मिळतातच शिवाय हृदयाच्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आणि गिफ्ट आयटमही पाहायला मिळतात. पूर्वी कामदेवाच्या तीरद्वारे बांधलेलं हृदय रतिसाठी प्रेमाच्या अभिव्यक्तचं फार सुंदर माध्यम होतं. प्रेम करणाऱ्यांना व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी हृदयाच्या शेपमध्ये बनलेले कार्ड्स आणि शोपीस, टेडी बियर, पाउच, इअररिंग्स, रिंग्स, ज्वेलरी बॉक्स, सिरॅमिक कॉफी मग, कुशन कव्हर, पिलो कव्हर आणि शोपीस मिळतील.

कबूतराचं जोडपं : ‘तुझ्याविना मी जगू शकणार नाही,’ ‘तुझ्यापासून दुरावण्यापूर्वी मला मरण यावं,’ अशा प्रकारचे प्रेमपूर्ण संवाद प्रेमीजन कायम एकमेकांना बोलत राहातात. कदाचित हे फारच कमी लोकांना माहीत असेल की नर आणि मादी कबूतर अशाच प्रेमाची साक्ष असतात, की त्यांच्यापैकी कोणाही एकाचा मृत्यू झाला तर दुसरा नवीन साथीदाराचा शोध घेत नाही. प्रेम म्हणजे समर्पण असतं. प्रेम आणि त्याच्या प्रती संपूर्ण आस्था दर्शवण्यासाठी शॉपिंग मॉल्स आणि गिफ्ट शॉप्समध्ये अशा कबूतरांची जोडपी असलेले वेगवेगळ्या मुद्रेचे गिफ्ट आयटमही पाहायला मिळतात.

मॅपल लीफ : कॅनडा येथील राष्ट्रीय वृक्ष मॅपल ट्रीची पानं आजही जपानी आणि चीनी सभ्यतेमध्ये प्रेमाला प्रतिबिंबित करतात. ही पानं गोड असतात. कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं. अमेरिकेत अनेक प्रेमी जोडपी खरं प्रेम मिळवण्यासाठी आपल्या बेडखाली जमिनीवर मॅपलची पानं ठेवतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मॅपल पानं असलेले अनेक कार्ड्स पाहायला मिळतील. त्यावर काही रोमॅण्टिक शेर लिहिलेले असतात किंवा तीरद्वारे बांधलेलं हृदय असतं.

ट्यूलिप फ्लॉवर : कुठेकुठे लग्नाच्या अकराव्या वाढदिवसाचं प्रतीक ट्यूलिप फ्लॉवरला मानतात. ट्यूलिप फ्लॉवरच्या मधोमध असलेल्या काळ्या मखमली भागाला प्रियकराचं हृदय समजलं जातं. प्रेमीजनांची पहिली पसंत समजलं जाणारं ट्यूलिप फूल प्रसिद्ध प्रेमी जोडपं शीरीफरहादच्या प्रेमाचं प्रतीक समजलं जातं. असं सांगतात फरहाद जो तुर्कीचा रहिवासी होता तो शीरीवर अतिशय प्रेम करायचा. जेव्हा फरहादला कळलं की शीरी या जगात राहिली नाही तेव्हा तो वेड्यासारखा डोंगराच्या शिखरावर चढला आणि प्रेमात वेडा होऊन त्या शिखरावरून त्याने उडी मारली. मग जिथे जिथे त्याच्या रक्ताचे थेंब पडले, तिथे तिथे लाल ट्यूलिपची फुलं उमलली. बस्स, तेव्हापासून हे प्रेमात पडलेल्या प्रेमीजनांसाठी प्रेमाचं प्रतीक बनलं.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी प्रेमी जोडपी प्रेमात जगण्यामरण्यासाठी ट्यूलिप भेट करतात.

डायमंड/हिरा : प्रेम व्यक्त करण्यासाठी हिऱ्यापेक्षा उत्तम भेट काय असू शकते. प्रेम हे अमर असतं. हे व्यक्त करण्यासाठी हिरा एक अनुपम भेट आहे. ग्रीक संस्कृतीत तर हिऱ्यांना देवतांचे ओघळलेले अश्रू समजलं जातं. रोमन संस्कृतीत याला आकाशातून तुटलेला तारा म्हटलं जातं.

दुकानदार अशा प्रकारच्या भ्रामक समजुतींना अधिकच उत्तेजन देतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दागिन्यांच्या दुकानांवर भेट देण्यासाठी हिरा घेणाऱ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. असंही म्हटलं जातं की जो हिरा घालतो त्याच्या वागणुकीत एक स्थैर्य आणि संतुलन झळकतं. प्रेयसीला इम्प्रेस करण्याचा उत्तम दिवस आहे व्हॅलेंटाइन डे आणि उत्तम भेटवस्तू आहे हिरा.

हार्टशेपच्या भेटवस्तू : प्रेम व्यक्त करण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे हृदयाचा आकार असलेली कोणतीही भेटवस्तू देणं. हृदयांपासून हृदयाची गोष्ट बोला. बाजारात रेशीम किंवा वेलव्हेट कपड्यांपासून बनलेल्या हृदयाच्या आकाराचे लहानमोठे गिफ्ट बॉक्स किंवा डब्या मिळतात. बाजारातून घ्यायचं नसेल तर आपल्या कल्पनेला उंच भरारी द्या आणि मनापासून साजरा करा व्हॅलेंटाइन डे…

अनपेक्षित भेटवस्तू जिंकेल मन

* सोमा घोष

सुभाष आणि स्नेहाचं लग्न होऊन ८ वर्षं झाली. त्यांच्या जीवनात असे अनेक प्रसंग आले की, ज्यावेळी त्यांनी एकमेकांना अनपेक्षितपणे भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित केलं होतं. ते दिवस अजूनही त्यांना आठवतात. सुभाषला तो दिवस अजून आठवतो, ज्यावेळी त्याच्याजवळ त्याच्या नातेवाइकाच्या लग्नाला जाण्यासाठी नवे कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते. सुभाषने निराश होऊन जुने कपडेच घालून जाण्याचं मनात ठरविलं होतं. परंतु लग्नाचा दिवस जवळ आल्यावर स्नेहाने आपल्या जमवलेल्या पैशांतून त्याच्यासाठी नवे कपडे खरेदी केले व त्याला भेट दिले. हे सुभाषला अनपेक्षित होतं व ही गोष्ट आजही आठवल्यानंतर सुभाषच्या डोळ्यांत पाणी येतं. अशी अनपेक्षित भेटवस्तू परस्परांतील प्रेम द्विगुणित करते. भेटवस्तू देणाऱ्यात व घेणाऱ्यात एक प्रकारचा नवा उत्साह संचारतो आणि एकमेकांतील स्नेहबंध अधिकच दृढ बनतात.

भेटवस्तू देणंघेणं

भेटवस्तू देण्याघेण्यामुळे आपल्या जीवनात अधिक आनंद येतो. आपापसांतील नाती दृढ होण्यामध्ये तिची प्रमुख भूमिका असते. भेटवस्तू एकमेकांविषयीचं प्रेम, आदर व सद्भावना व्यक्त करतात. त्यातसुद्धा जर अनपेक्षित भेटवस्तू मिळाली तर मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन काय करावं? कारण यामुळे व्यक्तिला अपूर्व सुख मिळतं. रंगमंचांवर काम करणारी मंजुळा म्हणते, ‘‘माझ्या पतीकडून मला नेहमीच अनपेक्षित भेटवस्तू मिळाली आहे, जिचं मोल माझ्या दृष्टीने खूपच अधिक आहे. कारण यावरूनच त्यांची माझ्याविषयीची आत्मीयता दिसून येते.’’

तुम्हाला तुमचा पती जर अनपेक्षित भेटवस्तू देत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की, तुम्ही तुमच्या पतीला मनापासून आवडता.

उद्योजिका लीना सांगते, ‘‘लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मला माझ्या पतीने ज्वेलरीच्या दुकानात नेऊन एक सोन्याचं ब्रेसलेट खरेदी केलं, पण त्याची ऑर्डर त्यांनी आधीच नोंदविली होती. त्यावेळी मी आश्चर्यचकित झाले. मला असं वाटतं की, अनपेक्षित भेटवस्तू देऊन तुम्ही आपल्या रागावलेल्या जोडीदाराला मनवू शकता किंवा जोडीदाराचा गैरसमजही दूर करू शकता.

भेटवस्तू निवडताना

एका पाहाणीत दिसून आलं की, अनपेक्षित भेटवस्तू केवळ एक साधी वस्तू नसते, तर तुमच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचं ते प्रतीक असतं. परंतु तुम्ही जेव्हा जोडीदाराला अनपेक्षित भेटवस्तू द्याल त्यावेळी पक्कं लक्षात घ्या की, ती वस्तू त्याच्या उपयोगाची आहे की नाही व तुम्हा दोघांची अधिक जवळीक त्याने साधेल की नाही?

काही वेळेला अगदी विचार करून दिलेली वस्तूसुद्धा त्यावेळी तुमच्या जोडीदारास जरुरीची वाटत नाही अथवा त्याला ती तितकीशी पसंत पडत नाही. अशा वेळी तुमचे पैसेही अनाठायी खर्च होतात व जोडीदारास वस्तूही आवडत नाही. यासाठी जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे नीट लक्ष द्या.

अनपेक्षित भेटवस्तूमध्ये किमतीला तितकंसं महत्त्व नसतं. फक्त प्रेम व आत्मीयतेला महत्त्व असतं म्हणून गिफ्ट खरेदी करणाऱ्याला गिफ्ट घेताना पूर्ण उत्साहाने खरेदी करावी लागते आणि हेसुद्धा दर्शवायला हवं की ही भेटवस्तू त्याच्या दृष्टीने कशी अनमोल आहे.

एका कंपनीत काम करणाऱ्या पूनमला तिचा पती ती प्रत्येक वेळी रागावल्यानंतर अनपेक्षित भेटवस्तू देऊनच खूष करतो.

भेटवस्तू अनमोल आहे हेच खरं. पण कोणती भेटवस्तू व त्याची निवड कशा तऱ्हेने करावी हे जाणून घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही एखादी भेटवस्तू जोडीदाराला देता तेव्हा त्याची प्रतिक्रिया तुम्हाला लगेचच दिसून येते. यामुळे आपला जोडीदार पती असो अथवा पत्नी तिची अथवा त्याची पसंती वा नापसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे व त्यानुसारच भेटवस्तूची निवड केली पाहिजे.

काही अनपेक्षित भेटवस्तू

* फोटो अल्बम : जोडीदाराच्या बालपणीच्या फोटोंसह, मित्रमैत्रिणींबरोबरचे फोटो (एखाद्या घटनेशी संबंधित) अशा तऱ्हेने एकत्र केलेले फोटो लावलेला अल्बम.

* ग्रीटिंग कार्ड : जे तुम्ही स्वत: बनवलेलं अथवा खरेदी केलेलं असेल. त्यामध्ये चांगलं चित्रसुद्धा तुम्ही लावू शकता.

* सोन्याचांदीच्या वस्तू तर सर्वांनाच आवडतात. परंतु जोडीदाराच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष पुरवून त्यांची खरेदी करावी.

* प्रवासाचं ट्रॅव्हल वाउचर.

* जरुरीचं सामान, रेसिपी बुक, पुस्तकं, घरसजावटीच्या वस्तू किंवा काही अशा वस्तू ज्याची अपेक्षा तुमच्या जोडीदाराने कधीच केली नसेल. सरळच आहे की, त्यायोगे तो अगदी संतुष्ट होईल व त्याचा अंशत: फायदा तुम्हालाही मिळेल.

जेव्हा भेटवस्तू द्यायची असेल

* एखादं नवपरिणीत जोडपं एखाद्या नव्या शहरात जाणार असेल तर त्यांना त्यांच्या नव्या घरासाठी उपयुक्त वस्तू जशा की, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव, इस्त्री, फूड प्रोसेसर याप्रमाणे गृहोपयोगी उपकरणं भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

* फर्नीचरसुद्धा एक उत्तम भेटवस्तू होऊ शकते. त्यांच्या घरासाठी डायनिंग सेट, सोफा सेट इत्यादी सामान देऊ शकता. त्यांचं घर किती मोठं आहे याचा विचार करूनच निर्णय घ्या.

* क्रॉकरी व कटलरीसुद्धा नवदाम्पत्यांसाठी चांगल्या भेटवस्तू होऊ शकतात.

* नवदाम्पत्यांसाठी काही वेगळं म्हणून, घड्याळ, परफ्यूमसुद्धा देऊ शकता.

* याव्यतिरिक्त सजावट म्हणून काचेच्या वस्तू, अॅण्टिकपीस, ऑइलपेंटिंग, नाइट लॅम्प, फोटोफ्रेम इत्यादी भेटवस्तूंचासुद्धा तुम्ही विचार करू शकता.

* प्रवासी सामान नवदाम्पत्यांसाठी चांगली भेटवस्तू होऊ शकते. कित्येक प्रकारच्या सूटकेसेस, व्हॅनिटी केस यामधून तुम्ही निवड करू शकता.

* ब्लँकेट, ब्रेडशीट इत्यादी वस्तूसुद्धा भेट म्हणून देऊ शकता. हवामानानुसार या वस्तूसुद्धा योग्य वेळी देऊ शकता.

व्हॅलेंटाइन डे ला निवडाल डेटिंग ड्रेस अन् मेकअप

– गरिमा पंकज

व्हॅलेंटाइन डे एक अशी उत्तम संधी आहे, जेव्हा वातावरण रंग आणि रोमान्सने सुगंधित झालेले असते. आपण १६ ते ७६ कोणत्याही वयाचे असाल, या दिवशी आपल्या पती किंवा बॉयफ्रेंडसोबत रोमांचक डेटवर जा आणि यासाठी थोड्या वेगळ्या पध्दतीने तयार व्हायला विसरू नका, जेणेकरून ही डेट आपल्यासाठी अविस्मरणीय बनेल.

पेहराव असावा खास

या संदर्भात सादर आहेत, अॅलिगेंजा रिज्युव्हिनेशन क्लीनिक अँड अॅम्पायर ऑफ मेकओव्हर्सच्या फाउंडर आशमीन मुंजालच्या काही खास टीस :

्रेस असावा खास : आपण बॉयफ्रेंडसोबत डेटवर जात असाल, तर शॉर्ट् फ्लेयर्ड ड्रेसची निवड करा. हा आपल्याला गर्लिक लुक देईल. विवाहित असाल, तर सुंदर साडी उत्तम पर्याय आहे, जी फेमिनीन लुक देते. फ्लोरल प्रिंटेड, जॉर्जेट फेब्रिकमध्ये लाइट पिंक किंवा रेड कलरची साडी अगदी यशराजच्या फिल्म हिरोइनींरखी तुम्हाला रोमान्सच्या रंग आणि जाणिवांनी भारून टाकेल. जॉर्जेटची साडी हलकी आणि कंफर्टेबल असते. याउलट हेवी वर्कवाली साडी नेसल्यावर आपण तिच सांभाळत राहाल.

सेम कलर थीम : आपली इच्छा असल्यास आपण आपल्या जीवनसाथीसोबत सेम कलर थीम ट्राय करू शकता. आजकाल मेड फॉर इच अदर टीशर्टस्/ड्रेसेसही मिळतात. ते घालून आपण आपल्या जीवनसाथीसोबत चालाल, तर आपल्याला संपूर्णतेची जाणीव होईलच, पण पाहणारेही आपल्या बाँडिंगचे चाहते होतील.

क्रिएटीव्हिटी : अशा वेळी आपण शाल किंवा पूर्ण बाह्यांचे पेहराव घालणे टाळा. साडी नेसायची असेल तर ब्लाउजसह एक्स्पेरीमेंट करा. हॉल्टरनेक, नूडल्स स्ट्रॅपी, किंवा स्वीटहार्ट नेकवाले ड्रेसेस खूप आकर्षक वाटतील.

बॉडी शेप : पेहरावांची निवड करताना आपल्या बॉडीचा शेपही लक्षात ठेवा. जर आपली हाइट अधिक असेल, तर लाँग फ्लोइंग अनारकली सूट किंवा गाउन छान वाटेल आणि जर हाइट कमी असेल, तर वनपीस ड्रेस किंवा मिडी चांगली दिसेल.

मॅक्स फॅशनच्या डिझायनर कामाक्षी कौलच्या मतानुसार, व्हॅलेंटाइन डेला वापरा काहीतरी ट्रेंडी आणि स्टाइलिश. उदा:

अॅडव्हेंचर डेटसाठी ड्रेस : जर आपण आउटडोर व्हॅलेंटाइन डे प्लान केला असेल म्हणजे एखाद्या ट्रीपला जाऊन किंवा स्पोर्टी इव्हेंटमध्ये भाग घेत त्या दिवसाचा आनंद घ्यायचा असेल, तर आपल्यासाठी जीन्स आणि टॉप उत्तम पर्याय आहे. जीन्स वावरायला कंफर्टेबल असते. त्यावर चिक टॉप आणि लेदरचे जॅकेट स्मार्टनेस वाढवेल. डार्क वॉश स्किनीज, टॉल रायडिंग बूट आणि कलर ब्लॉक स्वेटरमध्येही आपण स्मार्ट लुकसह अॅडव्हेंचरस डेटचा आनंद घेऊ शकता.

ज्वेलरी आणि एक्सेसरीज : आशमीन मुंजाल सांगते की यावेळी कधी हेवी ज्वेलरी घालू नका. हलकी ज्वेलरी आणि मोकळे केस आपल्याला वेगळा आकर्षक लुक प्रदान करतील. केस नॅचरल लुकमध्ये ठेवा. वाटल्यास कलर्स, रिबाँडिंग, परमनेंट वेव्ह इ. करून अगदी वेगळे दिसा. थोडेसे स्टाईलिश दिसण्यासाठी सनग्लासेस, हलक्या हिल्स, कलरफुल बँगल्स, स्कार्फ, नेलआर्ट, नेल एक्सटेंशन इ. चांगले पर्याय आहेत.

लाँग जॅकेट किंवा कॅप : आजकाल लाँग जॅकेटचा जमाना आहे. हा स्टायलिश दिसण्याबरोबरच प्रत्येक प्रकारच्या ड्रेसवर शोभूनही दिसते. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सामान्य कुर्तीसोबतही याचा वापर करून आपण स्टायलिश लुक मिळवू शकता.

प्लाजो किंवा धोती पँट : प्लाजो आणि धोतीपँट कुर्तीसोबत घातलात, तर अगदी डिफरंट लुक मिळतो. आपली इच्छा असेल तर जुन्या कुर्तीला बेलबॉटम जीन्ससह घालू शकता.

इनोव्हेटिव्ह ब्लाउज : क्लासिक साडी ब्लाउजऐवजी थोडेसे नवीन एक्सपेरीमेंट करा. एका जुन्या क्रॉप टॉपला साडी किंवा धोतीपँटसह ब्लाउजप्रमाणे घालून आपण स्टायलिश आणि डिफरंट दिसू शकता.

सीक्वेंस : सीक्वेंस आणि लेयर्स नेहमी स्टाईलमध्ये राहिले आहेत. जेव्हा गोष्ट व्हॅलेंटाइन डेची असेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? एम्ब्रॉयडर्ड स्लिप किंवा कोल्ड शोल्डर टॉपसह डेनिम किंवा मग लेदरची पँट रात्री उशिरापर्यंत वापरली जाऊ शकते.

पहिली परदेश यात्रा बनवा संस्मरणीय

* गृहशोभिका टीम

आम्ही प्रवासातल्या चांगली-वाईट अनुभवांसाठी तयार असाल तर नवीन गोष्टी ट्राय करायला बिलकुल घाबरू नका. पहिल्यांदाच देशाबाहेर जाताना अशा कित्येक गोष्टींचा सामना करावा लागतो, ज्या तुम्ही कधीच केलेल्या नसतात. अशावेळेस कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवून तुम्ही बनू शकता स्मार्ट ट्रॅव्हलर,जाणून घेऊ आज याबाबत.

हॉटेलऐवजी हॉस्टेलमध्ये थांबा आणि खूप सामान पॅक करू नका

पहिल्यांदाच परदेशात जात असाल तर प्रत्येक बाबतीत जागरूक असणं खूप जरुरी आहे, ज्यात बजेटचाही समावेश असतो. अशावेळेस तुम्ही हॉटेलमध्ये उतरण्यापेक्षा होस्टेलवर उतरणं योग्य ठरेल, जे की फक्त बजेटच्याच दृष्टीनं योग्य नाही तर तुम्हाला वेगवेगळया देशातून आलेल्या इतरही प्रवाशांना भेटायची संधी मिळते. जी अनुभवाशिवाय तुमच्या प्रवासातही कित्येकदा फायदेशीर ठरते. हॉटेल लक्झरीच्या बाबतीत फार टेंशन घ्यायची गरज नाही, कारण तुमचा जास्तीत जास्त वेळ फिरण्यात जातो. याशिवाय तुमच्याजवळ जितकं कमी सामान असेल, तितकं तुम्हाला एका जागेवरून दुसरीकडे मुव्ह व्हायचे चान्सेस जास्त असतात.

२-३ दिवसांपेक्षा जास्त बुकिंग करू नका आणि पत्ता जरूर लिहून घ्या

असं यासाठी की नवीन जागेत खूप पर्याय माहीत नसतात. काही दिवस राहिल्यावर जर तुम्हाला दुसरा चांगला पर्याय मिळाला तर तुम्ही सहज चेक आउट करून मुव्ह होऊ शकता. याशिवाय तुम्ही जिथे उतरता आहेत तिथला पत्ता डायरीत लिहून ठेवा किंवा प्रिंट आउट जवळ ठेवा, कारण जर फोनची बॅटरी लो असेल आणि फोन चार्ज करायला मिळाला नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो.

लोकल रेस्टॉरंटमध्ये खाण्याची मजा अनुभवा

खाणंपिणं कोणत्याही देशाचं कल्चर जाणून घेण्याचं व समजून घ्यायचं उत्तम माध्यम आहे म्हणून हे कोणत्याही प्रकारे टाळू नका. जिथे मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये तुमच्या मनाप्रमाणे आणि काही खास डिशेज मेनूत बघायला आणि खायला मिळतात, तिथे स्ट्रीट फूड आणि लोकल रेस्टारंटमध्ये तुम्ही निरनिराळया चवींची मजा लुटू शकता.

खूप कॅश सोबत घेऊ नका

तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डने कॅश काढू शकता आणि जर तुमच्याजवळ कार्ड नसेल तर प्रीपेड ट्रॅव्हल कार्डचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे, ज्याला एक्टिवेट व्हायला फक्त एक दिवस लागतो. परंतु जिथे फिरायला जाणार असाल, त्या देशाचं चलन जरुर बाळगा, जे इमरजंसीत कामी येईल.

एअरपोर्ट टॅक्सी ऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्ट घ्या

एअरपोर्ट टॅक्सीचे पैसे कित्येकदा हॉटेल बुकिंगमधेच समाविष्ट असतात. परंतु तुम्ही हे बजेटमधून कॅन्सल करून थोडे पैसे वाचवू शकता. बाहेरच्या देशात खाजगी टॅक्सिपेक्षा पब्लिक ट्रान्सपोर्ट स्वस्त आणि मस्त आहे. याशिवाय पब्लिक ट्रान्सपोर्टमधील लोकांशी बोलून तुम्ही अजून काही फिरण्याच्या जागा माहिती करून घेऊ शकता.

एअरपोर्टवर सिमकार्ड विकत घेणं टाळा

दुसऱ्या देशात जाऊन सिम कार्ड विकत घेणं फार जरुरी असतं, मग ते एअरपोर्टवर घेण्याऐवजी लोकल किंवा सुपरमार्केटमधून घ्या. हे तुम्हाला कमी पैशात मिळेल. एअरपोर्टवर याची किंमत खूप जास्त असते. तशी तुम्ही सिमसाठी आजूबाजूच्या लोकांची मदतही घेऊ शकता.

सौंदर्य समस्या

ब्यूटि एक्सपर्ट इशिका तनेजा द्वारा

मी माझ्या केसांच्या कलरसाठी पावसाळ्यात काय काळजी घेऊ?

जर केस पावसात भिजले असतील तर धुवून ताबडतोब केस कोरडे करा, कारण पावसाचे पाणी प्रदूषणयुक्त असते. ज्यामुळे कलर आणि केस दोन्ही खराब होऊ शकतात. केस धुण्यासाठी कलरसेव्ह शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करा. म्हणजे केसांचा कलर जास्त काळपर्यंत टिकू शकेल. केस धुतल्यानंतर त्यांना सीरम जरूर लावावे. असं केल्याने क्युटिकल्स बंद होतील, तसेच केस सॉफ्ट व सिल्कीसुद्धा होतील. तसेच सीरमच्या वापरामुळे कलरलासुद्धा चमक येईल. पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्याने केसांचे क्युटिकल्स उघडत असतात. त्यामुळे डॅमेज होण्याची शक्यता वाढते. केसांना डॅमेजपासून वाचवण्यासाठी एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून कलर्ड हेअरस्पा करवून घेत जा. याबरोबरच स्टाइलिंग करत असताना केसांना अॅन्टीह्यूमिडिटी प्रॉडक्टचा वापर करावा. यामुळे केसांचे बाहेरच्या ओलाव्यापासून रक्षण होईल. ज्यामुळे कलर सुरक्षित राहिल. तसेच हेअरस्टाइलही जास्त वेळ टिकून राहिल.

माझे वय ३६ वर्षं आहे. माझ्या मानेवर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. गळ्याच्या व चेहऱ्याच्या रंगातही खूपच फरक दिसतो. कृपया काही उपाय सुचवा.

जर त्वचेला पोषण मिळाले नाही तर सुरकुत्या येऊ शकतात. यासाठी चेहऱ्याच्याबरोबरीनेच मानेलाही नरिशमेट द्या. रात्री झोपण्याआधी एएचए क्रिमने चेहऱ्याचा व मानेचा मसाज करावा. रोज सकाळी अंघोळीआधी व्हिटामिन ई तेलाचे काही थेंब आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळून मानेवर लावावे. १५ ते २० मिनिटांनी थंड पाण्याने धुऊन घ्या. क्लिनिकल ट्रिटमेंटच्या रूपात लेजरच्या सिटिंग्ज व कोलोजन मास्कही लावू शकता. जेव्हा फेशिअल करून घ्याल तेव्हा मानेचा मसाजही करून घ्या. मानेचा रंग उजळावा म्हणून कच्च्या पपईची फोड मानेला चोळावी.

मी प्रायव्हेट जॉब करते. त्वचेची चमक वाढवण्यासाठी रोज बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. असे काही उपाय सांगा, ज्यामुळे माझी त्वचा चमकदार दिसू शकेल.

पार्लरमध्ये जाऊन रोज कोणीच बॉडी पॉलिशिंग करून घेऊ शकत नाही. पण त्वचेचा चमकदारपणा टिकावा म्हणून तुम्ही घरीसुद्धा त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी दिवसाआड बॉडी स्क्रब करू शकता. यासाठी चोकरमध्ये साय व चिमूटभर हळद घालून पूर्ण शरीरावर लावून नंतर हलक्या हाताने चोळून पाण्याने धुवून घ्या. याबरोबरच रोज अंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा. याशिवाय दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी जरूर प्यावे. तसेच प्रथिनयुक्त आहार घ्यावा.

मी २० वर्षांची आहे. मला खूप घाम येतो. ज्यामुळे दुर्गंधीही येते. त्यामुळे खूपच लाजिरवाणे वाटते. दिवसातून २-३ वेळा कपडे बदलावे लागतात. एखादे हर्बल लोशन किंवा काही उपाय सुचवा.

घामाच्या समस्येपासून वाचण्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता.    याशिवाय शरीरावर मुलतानी मातीचा पॅकही लावू शकता. असे केल्याने त्वचेची रंध्र होतील व घाम येणार नाही. रोज रात्री अंघोळीच्या पाण्यात लिंबाचे साल घालून ठेवावे. सकाळी त्या पाण्याने अंघोळ करावी. असे केल्याने पूर्ण दिवसभर ताजेतवाने वाटत राहिल.

मेकअप अॅप्लीकेशनसाठी योग्य पर्याय काय आह  बोट की ब्रश. यामुळे फिनिशिंगमध्ये काही फरक पडतो का?

बोट आणि ब्रश दोघांचीही आपापली अशी वेगळी कार्य आहेत. जेव्हा चेहऱ्यावर तुम्ही बोटाच्या सहाय्याने मेकअप करता, तेव्हा त्यातील हीटमुळे ते चेहऱ्यावर व्यवस्थित मर्ज होते आणि चेहऱ्याला फ्लालैस लुक मिळतो. तर ब्रशने चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांना परफेक्शन दिले जाते. लिप ब्रशने ओठ, लाइनर ब्रशने डोळे, एअरब्रश इफेक्टने बेसला परफेक्ट ब्लेंड करून फ्लालैस लुक दिला जातो. बाहेर पडताना फक्त कॉटन किंवा शिफॉन फॅब्रिकचे फुलस्लिव्हज कपडे घालण्याचा प्रयत्न करा.

माझ्या हाताच्या नखांची मागील त्वचा निघत राहते ही माझी समस्या आहे. ज्यामुळे रक्त निघते व वेदनाही खूप होतात. बरे झाल्यानंतर तेथील त्वचा काळी पडते जे दिसायला खूपच वाईट दिसते. असे होऊ नये म्हणून उपाय सुचवा.

तुम्ही एखादी चांगल्या दर्जाची क्यूटिकल क्रिम किंवा ऑलिव्ह ऑईल कोमट करून आपली नखे व त्याच्या आसपास मसाज करावा. न्यूटिकल्स स्वत: काढू नयेत. एखाद्या पार्लरमध्ये जाऊन मेनीक्योर करून घ्यावे. तिथे तंज्ज्ञांकडून सोप्या पद्धतीने काढले जातील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें