एकटा जीव सदाशिव

– सुमन बाजपेयी

‘‘बिचारी ३५ वर्षांची झाली. पण अजून सिंगल आहे.’’

‘‘दिसायला तर सुंदर आहे. मोठी अधिकारी आहे. काय माहीत अजून लग्न का नाही झालं?’’

सोमा आपल्या सोसायटीत शिरताच हे शब्द तिच्या कानावर पडले. खरंतर या गप्पा तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिला आता याची सवय झाली होती. पण तरीही कधीकधी तिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतात? तिला तिचं आयुष्य शांततेने जगू का देत नाहीत? तिच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवलं जातं. जसं काही सिंगल असणं हा गुन्हाच आहे. तिने स्वत:हून असं

आयुष्य निवडलं असेल तर समाजाला याचा त्रास का होतो? तिचं तर सगळं छान चाललंय.

आपल्या मोठ्या बहिणीचं फसलेलं लग्न पाहूनच सोमाने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. किती बंधनं आहेत तिच्यावर. कोणतंही काम ती आपल्या पतीच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. सोमाने रीनाला निरखून पाहिलं. पस्तीशीतही ती साठीतली दिसत होती.

सोमासारख्या सिंगल विमेन आजकाल कमी नाहीत. कारण त्या आपल्या मर्जीने लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. मग एखादवेळेस लग्न नाही जरी झालं तरी एकटयाने आनंदात जगता येतं. पण जगण्याची पद्धत माहीत असायला हवी.

सोमा म्हणते, ‘‘लग्न झालंच पाहिजे असं काही नाही. काहीवेळा असं होतं की इच्छा असूनही योग्य जोडीदार न मिळाल्याने तुम्ही लग्न करू शकत नाही. कोणी आवडलंच तरी त्या व्यक्तिसोबत संपूर्ण आयुष्य काढता येण्याची खात्री नसते. माझ्यासोबतही

असंच काहीसं झालं. हे खरं आहे की प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे. पण तुम्हाला कोणी जोडीदार मिळाला नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही सुखी नाही. फक्त समाजाला तसं वाटत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे असं मानणं चुकीचं आहे. लग्न म्हणजेच सर्वस्व नाही. आयुष्यात अनेक शक्यता असतात. फक्त त्या शोधणं आणि त्यांचा योग्य वापर करणं जमलं पाहिजे.’’

तुमचे मित्र, नातेवाईक, आईवडिल, भावंडं आणि समान यांना कायम असं वाटतं की तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्ही दु:खी आहात. त्यामुळे ते तुम्हाला सेटल होण्याचा सल्ला देतात. तुम्हाला लग्न करायचं नसेल किंवा तुमच्या एकटं राहण्याचं कारण काहीही असलं तरीही तुम्ही हेच मानून चाला की तुम्ही एकट्यानेही खूश राहू शकता. एकटं राहण्याचा निर्णय तेव्हाच घ्या, जेव्हा तुमच्या मनाची पूर्ण तयारी असेल.

बंधनमुक्त होण्याचा आनंद लुटा : लग्न झालं म्हणजे तुम्ही सुखीच राहाल असं काही नाही. जबाबदाऱ्यांसोबत अडचणीही आपोआप येतात. सिंगल असाल तर ना

कोणती जबाबदारी, ना कसली कमिटमेंट. मग आयुष्य साजरं करा. एखाद्या कपलला हातात हात घालून बसलेलं पाहून नाराज होऊ नका. स्वत:साठी जगा आणि मोकळा श्वास घ्या. सिंगल स्टेटसचा त्रास करून घेण्यापेक्षा तुमच्यावर कोणंतंही बंधन नाही याचा आनंद माना, तुम्ही कधीही कुठेही येऊजाऊ शकता. यासाठी फक्त स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगा आणि लोकांचं बोलणं ऐकून दु:खी होणं किंवा काही प्रतिक्रिया देणं बंद करा.

स्वत:ला वेळ द्या : तुम्हाला स्वत:साठी खूप वेळ मिळेल. विवाहित स्त्रियांच्या मनात जी अपराधीपणाची भावना असते, ती तुमच्या मनात नसेल. नवरा, मुलं, घर-कुटुंब यामुळे महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. पण सिंगल असण्याचा फायदा हा आहे की तुम्ही स्वत:ला वेळ देऊ शकता. सजा, फिरा आणि आवडतं गाणं ऐका वा पुस्तक वाचा. कोणी अडवणार नाही. शिवाय एकटेपणाची भावना मनात डोकावणारही नाही. स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि स्वत:ला घडवता येतं. कोणती आशा-अपेक्षा नसल्याने विरोधाभास, हेवा यांना स्थान नसते.

सोशल व्हा : स्वत:चं सोशल सर्कल बनवा. हे आवश्यक आहे कारण कंटाळा आला की पार्टीला किंवा रेस्टॉरन्टमध्ये जाता येईल. कितीही सोशल झालात तरी कोणावरही अवलंबून राहू नका की कोणी सोबत आलं तरच सिनेमा बघायला जाल किंवा लंचला जाल. कोणाच्या सोबतीची कशासाठी अपेक्षा ठेवायची? पण तरीही आपला आवाका कशासाठी वाढवत राहा. जेणेकरून गरजेच्यावेळी नि:संकोचपणे मदत मागता येईल.

संपूर्ण लक्ष करिअरवर द्या : सिंगल असाल तर करिअरवर व्यवस्थित लक्ष देऊ शकता. मेट्रो सिटीमधल्या मुली करिअर करण्यासाठी आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकटं राहणंच पसंत करतात.

एका एमएनसीमध्ये काम करणारी ३७ वर्षीय अनुभा सांगते, ‘‘मी ठरवून लग्न केलं नाही. मी सुरूवातीपासूनच माझ्या करिअरबाबत आग्रही होते आणि मला माहीत होतं की लग्नानंतर तडजोड करावी लागेल. कदाचित नोकरी सोडावी लागेल. मधे ब्रेक घेतल्याने करिअर ग्राफवर परिणाम होतो आणि प्रत्येकवेळी नव्याने सुरूवात

करावी लागते. आधीची मेहनत वाया जाते. त्यामुळे मी माझं सगळं लक्ष करिअरवर केंद्रित केलं आणि आज मी यशस्वी आहे. माझ्या या यशाचा मी संपूर्ण आनंद घेते.’’

सिंगल वूमन करिअरमध्ये जास्त यशस्वी असतात हे आता सिद्ध झालं आहे आणि आजकाल खासगी कंपन्या त्यांनाच प्राधान्य देत आहेत. कारण त्या कामासाठी जास्त वेळ देतात आणि जास्त फोकस्ड असतात. त्या मन लावून काम करतात.

छंद जोपासा : सिंगल असाल तर संपूर्ण वेळ तुमचा असतो आणि यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. बागकाम करा, बाइक चालवा किंवा गेम्सखेळा. तुम्ही हवं ते करू शकता, कोणाच्याही हस्तक्षेपाविना. कोणी असं म्हणणार नाही की हे काय वय आहे का हे सगळं करायचं? पेंटिंग करा किंवा एखादा कोर्स करा. तुम्ही एखादा तरी छंद जोपासू शकाल. स्वत:ला नवनव्या गोष्टींबद्दल अपडेट ठेवा.

आपल्या मनाचं ऐका : सायकलिंग टे्रकिंग करा. वीकेंडला लाँग राइड्सवर जा किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं

हेच तुमचं ध्येय असायला हवं. तुम्हाला लोकांनाही हेच दाखवायचं आहे की सिंगल असूनही तुम्ही किती खूश आहात.

सोलो ट्रिपवर जा : फिरायला कोणाला नाही आवडत? कोणी अडवलंय तुम्हाला? निघा, आपल्या आवडत्या ठिकाणी, तुम्हाला हवं तसं ट्रेकिंग करायला किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये आराम करायला. खरंच तुम्हाला मजा येईल. हे नक्की करू, ते नक्की करू, अशी कसलीच किटकिट नाही. म्युझिक फेस्टिव्हलला जा किंवा नाटक पाहा. कोणीही अडवणार नाही. विवाहित महिला हे सगळं करण्याचा विचारही करू शकत नाहीत.

खरेदी करा : तुम्ही कमवत असाल तर स्वत:वर खर्च करा. स्वत:च्या पैशांनी खरेदी करण्याची मजाच वेगळी असते. स्वत:वर पैसे खर्च करताना कोणता अपराध भाव मनात नसेल, जे हवं ते खरेदी करू शकता आणि काही खरेदी करण्यासाठी कोणाचाही दबाव नसेल. जे आवडेल ते खरेदी करण्याची मोकळीक असेल. सतत इतर कुणाची तरी किंवा नवऱ्याची परवानगी घेण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार खा-प्या आणि मजा करा.

तडजोड नको : तुम्हाला कोणासाठीही आपल्या आनंदात तडजोड करावी लागणार नाही, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात. पण यात वाईट काय आहे. थोडं स्वार्थी असण्याचीही गरज आहे. कारण आयुष्य तडजोडीच्या चक्रात अडकते तेव्हा सुख कमी  दु:खच जास्त जाणवते. कुढत जगण्याचा काय फायदा? स्वत: निर्णय घ्या. अखेरीस तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून का असावा? आयुष्य मोकळेपणाने जगा.

दांपत्य जीवनातील ९ वचनं

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

बदलत्या काळाबरोबर बदलही आवश्यक आहे. आजच्या युगात दांपत्य विशेषकरून नवविवाहित जोडप्यांना आपल्या वैवाहिक जीवनाच्या आनंदासाठी आपल्या भावना आणि विचारांचा अंदाज थोडा बदलायलाच हवा. पूर्वी विवाहाचा अर्थ फक्त प्रेम आणि त्याग होता, ज्यात बहुतेकदा स्त्रियाच पती आणि त्याच्या घर-कुटुंबासाठी समर्पित राहण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानत असत आणि त्याग व कर्तव्याची मूर्ती बनून सारे जीवन आनंदाने व्यतित करायच्या. घरकुटुंबात यामुळेच त्यांना सन्मानही मिळत असे.

पुरुष पण अशी पत्नी मिळाल्याने आनंदीत व्हायचे. त्यांची मानसिकताही स्त्रियांप्रति हीच होती. पण आज परिस्थिती बदललेली आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही ही गोष्ट समजली आहे. आज स्त्रियाही पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत, प्रगती साधत आहेत.

वर-वधू लग्नाच्या वेळेस रीती-रिवाजाच्या नावावर ७ वचने घेतात आणि बहुतेक खूप लवकर विसरूनही जातात.परंतु दांपत्य सर्वेक्षणाच्या आधारावर निष्कर्षाच्या रूपातील या वचनांचा विवाहानंतरही स्विकार करा, यांना लक्षात ठेवा आणि निभवासुद्धा. दोघांनाही एकमेकांच्या कामात सहकार्याच्या रूपाने ताळमेळ बसवून चालण्याची आवश्यकता आहे, ज्यातून सगळयांच्या विचार-विमर्शातून निघालेली ही खालील वचने मोठया कामाची आहेत :

  1. जे माझे आहे ते तुझेही : लखनौऊचे आर्किटेक्ट सुहास आणि त्यांची पत्नी सीमामध्ये सुरुवातीला छोटया-छोटया गोष्टींवरून नेहमी भांडणे होत. सीमा म्हणते, ‘‘जसे माहेरून मिळालेल्या महाग बेड कव्हर, क्रॉकरी इत्यादीचा जेव्हा सुहास आपल्या मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी उपयोग करायचे, तेव्हा मला अजिबात आवडायचे नाही. त्याचप्रमाणे त्यांनाही माझे नातेवाईक, मैत्रिणींद्वारे त्यांचे म्युझिक सिस्टम किंवा पुस्तके हाताळणे एकदम असह्य व्हायचे. नंतर एके दिवशी आम्ही ठरवले की जर आपण एक आहोत तर एकमेकांच्या वस्तूंचा उपयोग का नाही करायचा. त्यादिवसापासून सगळा परकेपणा दूर झाला.
  1. जसे मला आपले आई-बाबा,भाऊ-बहिण,मित्र-नातेवाईक प्रिय आहेत, तसेच तुम्हालाही आपले :
  • जयपुरचे डॉ. राजेश आणि त्यांची होममेकर पत्नी इशाने या गोष्टीचा खुलासा केला की पती-पत्नी दोघांच्या कुटुंबाचा, नातेवाईकांचा घरात समान आदर होणे आवश्यक आहे. राजेशने आपली बहिण रिमाच्या घरी आपली व आपल्या आई-बाबांची पुन्हा-पुन्हा अपमानित होण्याची घटना सांगितली. बहिण आपल्या पतिकडून होणाऱ्या अपमानजनक व्यवहारामुळे दु:खी असायची. यामुळे त्यांचे आपसातील नाते कधी गोड झाले नाही. ही तर चुकीची अपेक्षा आहे की फक्त पत्नीने पतिच्या घरच्यांचे प्रेमाने स्वागत करायचे आणि पतिने तिच्या माहेरच्या लोकांचा आदर न करता जेव्हा-तेव्हा अपमान करायचा. पतिचेही तेवढेच कर्तव्य आहे. पत्नी अर्धांगिनी आहे, जीवनसाथी आहे, गुलाम नाही.
  1. जशा माझ्या गरजा आवश्यक तशाच तुमच्याही : सुजाता एका कॉर्पोरेट ऑफिसात काम करते. नेहमी तिला घरी येण्यास उशीर होतो. घरी असतानाही तिला कधी-कधी ऑफिसचे काम करावे लागते. यावर पती विशाल चिडचिड करत असे. एके दिवशी सुजाताने त्याला बसवून चांगल्याप्रकारे समजावले की विशाल मी लग्नाच्या अगोदरच तुम्हाला सांगितले होते, तेव्हा तर तुम्हाला माझ्या चांगल्या पॅकेजपुढे सर्व स्वीकार होते. जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस मीटिंगमधून उशिरा येता तेव्हा तर माझी काही हरकत नसते. तर मग तुम्ही का समजून घेत नाही? मी नोकरी सोडू शकत नाही. आईचे प्रत्येक महिन्याला ब्लड ट्रान्सफ्युजन मी थांबवू शकत नाही. नि:संदेह तुम्ही मला सोडू शकता. माझी यालाही काही हरकत नाही. मी डिवोर्ससाठी तयार आहे. मी उद्याच दुसरीकडे कोठे शिप्ट होईल.
  2. आपल्या सवयी, छंद, संस्कार जसे माझे तसेच तुमचे : पती-पत्नी वेगवेगळया परिवारातून, वेगवेगळया वातावरणातून येतात पण दुसऱ्याकडून आपल्यासारखे आचरण व राहणीमानाची अपेक्षा करतात किंवा वेगळे पाहून टर उडवतात तर हे योग्य नाही, त्यापेक्षा याचे समाधान शोधणे योग्य असते. स्कूल टीचर दीप्ती आपल्या बँक मैनेजर पती शिखरला अनवाणी पायांनी घरात फिरल्यानंतर अंथरुणात घुसण्याने वैतागत असे. तर शिखर तिचे बाहेरून कोठून आल्यावर कपडे चेंज करून अंथरुणावर टाकणे पसंत नव्हते. शेवटी एके दिवशी बसून दोघांनी समस्येचे समाधान शोधले. आता पायांच्या अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी शेखरने कार्पेट अंथरले तर दीप्तीनेही शिखरचे बघून कपडे व्यवस्थित हँग करायला सुरूवात केली. त्यांचे जीवन पुन्हा सुरेल सुरावट बनली.
  3. दुसऱ्यांच्या समोर एकमेकांचे दोष किंवा टर उडवायची नाही : दिल्लीच्या ग्रेटर कैलाश येथील माला पहिल्यांदा विवाहानंतर विमानयात्रा करत होती. पती अंश व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचा एक मित्रही पत्नीसहित त्यांच्याबरोबर होता. सर्व एका तिसऱ्या मित्राच्या लग्नाला जात होते. बेल्ट बांधण्याची सूचना झाली तर मालाने घाईत जवळच्या सीटचा बेल्ट उचलला आणि लावण्याचा प्रयत्न करू लागली. हे पाहून अंश हसू लागला, ‘‘अक्कल चरायला गेली आहे काय? एवढेपण कळत नाही.’’ हे बघून सर्व हसू लागले. तेव्हा मालाला खूप वाईट वाटले. मग ती म्हणाली, ‘‘तुम्हाला हसण्याऐवजी माझी मदत करायला हवी होती किंवा यांच्यासारखी श्रीमंत घरातील पत्नी आणयला हवी होती.’’ अंशला आपली चुक कळाली की त्याने असे बोलायला नको होते.

अशाचप्रकारे बरेली निवासी गीताचे भाऊ-वहिनी तिला भेटण्यासाठी आले. तेव्हा पती दिपक बाटलीनेच पाणी पित होता. त्याने गीताच्या भावालाही तीच पाण्याची बाटली ऑफर केली.

‘‘थांबा, मी ग्लास आणते. आमच्या येथे कोणी अडाण्यासारखे पाणी पित नाही,’’ गीता म्हणाली.

दिपकला तिचे म्हणणे खटकले. म्हणाला, ‘‘आणि आमच्या येथेही पतिशी असे कोणी बोलत नाही.’’

भावाने गीताला टोकले व विषय सांभाळला, नंतर दोघांनी एकमेकांना सॉरी म्हटले आणि दुसऱ्यांच्या समोर एकमेकांची टर न उडवण्याचे आणि दोष न काढायचे वचन दिले.

  1. जशी माझी सामाजिक बांधिलकी तशीच तुमचीही : दीपांकरची पत्नी जया लग्नाच्या आधीपासूनच फार सामाजिक होती. सर्वांच्या सुखदु:खात, सणासुदीच्या प्रसंगी सामील होत आली होती. ऑफिस असो किंवा शेजारी, नातेवाईक सगळयांशी मिळून-मिसळून राहायची. आणि अजूनही राहत आहे. दीपांकरही तिला सहकार्य करतो, त्यामुळे जयासुद्धा दीपांकरच्या सामजिक नातेबंधांची काळजी घेते.
  2. जशी मला काही स्पेस हवी तशीच तुम्हालाही : पारुलने सांगितले संपूर्ण दिवस तर ती पती रवीमागे हात धुवून लागत नाही. काही वेळ त्याला एकटे सोडते, जेणेकरून तो आपले काही काम करू शकेल. पतिसुद्धा या गोष्टीची काळजी घेतो की मला स्पेस मिळावी.दोघांमध्ये या गोष्टीवरून वाद होत नाही. दुसऱ्या दिवसाचा होमवर्कही सहज होतो. सोबत असल्यावर छान पटतं.
  3. जसे माझे काही सिक्रेट्स न सांगण्यासारखे, माझी इच्छा तशीच तुझीही : लग्नाच्या आधी काय झाले होते पतीबरोबर किंवा पत्नीबरोबर वा त्यांच्या घर-कुटुंबात. जर ही गोष्ट कोणी सांगू इच्छित नसेल तर ठीक आहे, खोदून-खोदून का विचारावे? शंकेत वा संभ्रमात राहणे व्यर्थ आहे. कॉलेजचे इंग्रजीचे प्रोफेसर डॉ. नगेंद्र आणि त्यांची हिंदीची प्रोफेसर पत्नी नीलमचे हेच मत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नात्याच्या वाढीसाठी हे आवश्यक आहे. वर्तमान बघावे, एकमेकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवावा.
  4. पॉकेटमनीच्या खर्चावर अडवणूक नको : ‘‘आमच्या दोघांच्या छान जीवनाचा हाच तर सरळ फंडा आहे. घरखर्च आम्ही सहमतीने सारखा शेअर करतो आणि पॉकेटमनीवर एकमेकांना रोखत नाही,’’ स्टेट बँक कर्मचारी प्रिया आणि तिच्या असिस्टंट मॅनेजर पती करणने आपल्या गमतीशीर गोष्टीने अजून एक महत्वाचे वचनही सांगून टाकले. तर मग आता विलंब कशाचा. लग्नाच्या वेळेस ७ वचने घेतली होती, तर लग्नानंतरही पती-पत्नी दोघांनी ही वचनं आत्मसात करावी आणि प्रेमाने हे नाते निभवावे.

जेव्हा आईवडिल घरी येतात

* रीता गुप्ता

मी माझ्या शेजारी राहणाऱ्या कविताला काही दिवसांपासून खूप व्यस्त पहात होते. ती मार्केटमध्येही खूप फिरत होती. दररोज आम्ही संध्याकाळी एकत्र फिरायचो, पण तिच्या व्यस्ततेमुळे ती आजकाल येत नव्हती, म्हणून पार्कमध्ये खेळत असलेली तिच्या मुलीला काव्याला, मी बोलावून विचारलेच, ‘‘काव्या, खूप दिवसांपासून तुझी आई दिसत नाही. सर्व काही ठीक तर आहे ना? ’’

‘‘काकू, आजी-आजोबा माझ्या घरी येत आहेत. आई त्यांच्या येण्याची तयारी करत आहे,’’ काव्याने सांगितले.

‘‘का कुणास ठाऊक पण माझ्या घरी’’ हे शब्द बऱ्याच वेळेपर्यंत मनात हातोडीसारखे वाजत राहिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कविताचा नवरा कामेश दिसला. कदाचित तो स्टेशनवरून त्याच्या आईवडिलांना घेऊन येत होता. त्यानंतर सुमारे १० दिवस कविता अजिबात दिसली नाही. तिने कार्यालयातूनही सुट्टी घेतली होती. संध्याकाळचा वॉकही बंदच होता तिचा.

एक दिवस मी तिच्या सासू-सासऱ्यांना आणि तिला भेटायला तिच्या घरी पोहोचले. सासू-सासरे ड्रॉईंग रूममध्ये बसले होते. गोंधळलेल्या अवस्थेत स्वयंपाकघर आणि इतर खोल्यांमध्ये कविता धावत होती. मी तिच्या सासू-सासऱ्यांशी बोलू लागले.

भेदभाव का

‘‘आमच्या येण्याने कविताचे काम वाढते. मला वाईट वाटते,’’ तिचे सासरे म्हणाले.

‘‘खरंच, मलाही काही काम करू देत नाही, नुसतेच पाहुणे बनवून ठेवले आहे,’’ तिची सासू म्हणाली.

त्या लोकांच्या संभाषणातून असे वाटले की ते लवकरच परतणार आहेत, जेणेकरून कविता तिच्या कार्यालयात जाऊ शकेल. मी तेथून निघाले तेव्हा कविता मला गेटपर्यंत सोडायला आली. मग मी विचारले, ‘‘त्यांच्याबरोबर पाहुण्यांसारखे का वागते, दोघे अद्याप इतकेही म्हातारे किंवा असहाय नाहीत?’’

‘‘नाही बाबा, मला माझ्या सासू-सासऱ्यांकडून काहीही करून घ्यायचं नाही. माझ्या बहिणीने तिच्या सासूला तिच्याकडे राहायला आल्यावर काहीतरी करायला सांगितले. तेव्हा राईचा पर्वत झाला होता आणि माझ्या पतीचीही हीच इच्छा आहे की मी त्यांची सेवा करावी. पण ही वेगळी गोष्ट आहे की मी आता त्यांच्या परत जाण्याची वाट पाहत आहे,’’ कविता तिच्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाली.

कविताने तिच्या सासरच्या माणसांच्या भेटीचे ओझे का घेतले, असा विचार करण्यास मला भाग पाडले. ते आपल्या मुलगा-सूनेसह राहण्यास आले आहेत आपले घर समान, पण त्यांच्याबरोबर पाहुण्यांसारखी वागणूक केली जाते. मला तिची मुलगी काव्याचे ‘‘माझ्या घरी’’ आजी-आजोबा येत आहेत हे विधान आठवले, प्रत्यक्षात घर तर त्यांचेच आहे अर्थात सर्वांचे.

एक वेगळी रचना

चित्राचा आणखी एक पैलू असतो, जेव्हा सून सासू-सासऱ्यांच्या आगमनाला तिच्या विसंगती आणि कटुतेने नात्यात अप्रियता भरते. माझ्या मावशीला सांधेदुखीचा त्रास असायचा. जेव्हा तिला तिचे दैनंदिन काम करण्यातही अडचण येऊ लागली, तेव्हा ती काकांसमवेत आपल्या मुलाकडे गेली. पण महिन्याच्या अखेरीस ती परत आपल्या घराचे कुलूप उघडताना दिसली. तिथे मुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील घराच्या पायऱ्या चढणे-उतरणे वेदनादायक होते आणि तेथे ती अपेक्षेनुसार घरगुती कामे करण्यासही असमर्थ होती.

विकसित देशांमध्ये वृद्धांसाठी सरकारकडून बरेच काही उपलब्ध असते, जेणेकरुन ते त्यांच्या मुलांशिवायदेखील चांगले जीवन जगू शकतील, परंतु परदेशांच्या विपरीत आपल्या देशातले पालक अगदी वृद्धावस्थेपर्यंत मुलांची काळजी घेतात. मध्यमवर्गीय पालकांच्या आयुष्याचा हेतू म्हणजे मुलांना सेटल करणे असतो. जेव्हा तिच मुले स्थिरस्थावर होतात, ते स्वत:चा घर-संसार थाटतात, त्यानंतर ते पालकांना बाहेरील लोक म्हणून समजू लागतात. मुलगा-सून असो किंवा मुलगी-जावई सहजपणे पालकांचे आगमन स्वीकारू का शकत नाहीत? त्यांची जगण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या दिनक्रमानुसार त्यांना आदराने का वागवले जाऊ शकत नाही? हे तेच आहेत, जे न बोलता आपल्या गरजा समजून घेत होते.

आपली सामाजिक रचनाच अशी आहे की प्रत्येकजण आपापसात जोडलेला असतो. संयुक्त कुटुंबांची एक वेगळी रचना असते. येथे आम्ही अशा पालकांचा उल्लेख करीत आहोत, जे वर्ष ६ महिन्यांतून एकदा आपल्या मुलाला भेटायला जातात. काही दिवस किंवा महिने २ महिन्यांसाठी. अशा परिस्थितीत मुलांनी या गोष्टी लक्षात घेतल्यास आपापसांत भेटणे, एकत्र येऊन राहणे आनंददायक होईल.

स्वत:ही विचार करा

हे खरे आहे की ते त्यांच्या जागी आनंदी आहेत, परंतु तरीही ते निरोगी आहेत तोपर्यंत मुलांनी शक्य तितक्या लवकर त्यांना बोलावणे हे मुलांचे कर्तव्य आहे. ३-४ वर्षात एक वेळा बोलावण्याऐवजी ३-४ महिन्यांत बोलावत राहा, मग भलेही थोडया दिवसांसाठीच का होईना, कारण प्रेम निरंतर परस्पर संवादातून टिकते आणि ५-६ दिवसांच्या आगमनासाठी त्यांना कोणतीही विशेष तयारी करावी लागणार नाही.

ते ‘तुमच्या घरात’ नव्हे तर ‘आपल्या घरात’ येतात. त्यांना आणि तुमच्या मुलांनादेखील या कल्पनेचा आभास करून द्यावा. घरात लहान किंवा मोठे असल्याने फारसा फरक पडत नाही, जितका हृदयाच्या संकुचितपणामुळे पडतो. हे बऱ्याचदा नातवंडांना म्हणतांना ऐकले जाते की आजोबा माझ्या खोलीत झोपतात. कितीतरी वेळा रात्री उशिरापर्यंत प्रकाश चालू ठेवल्याने जेव्हा आजी हस्तक्षेप करते, तेव्हा नात म्हणते ओह, आजी तू कधी जाणार? जेव्हा आपल्या मुलांनी असे म्हटले असेल तेव्हा आपल्या पालकांच्या हृदयावर काय परिणाम होईल याचा विचार करा. ही आपलीच चूक आहे की आपण आपल्या मुलांच्या मनात असे विचार भरले आहेत की आजी-आजोबा बाहेरचे लोक आहेत आणि घर फक्त आपले आणि आपल्या मुलांचे आहे. विचार करा उद्या तुमच्या मुलांच्या आयुष्यात तुम्हीदेखील अशाचप्रकारे उपेक्षित असाल.

काळजी घ्या

जर आपण हे ऐकले असेल की मुलांनी असे म्हटले आहे तर ताबडतोब आई-वडिलांसमोर हे स्पष्ट करा की तुम्ही आपल्या आईवडिलांच्या घरात नव्हे तर आजी-आजोबांच्या घरात राहत आहात.

जेव्हा ते येतात तेव्हा आपला नित्यक्रम बदलू नका, तर आपल्या दिनचर्येनुसार त्यांना सेट करा. अन्यथा त्यांचे येणे आणि राहणे लवकरच ओझे वाटू लागेल.

तुम्ही जे काही खाल, तेच त्यांनाही खायला द्या. होय, जर आरोग्याची कोणती समस्या असल्यास आपण त्यानुसार काही बदल केले पाहिजेत. नवीन पिढीचे खाणे-पिणे आपल्या जुन्या पिढीपेक्षा पूर्णपणे बदलले आहे. रोटी-भाजी आणि डाळ-भात खाणारे पालक कधीतरीच बर्गर-पिझ्झा खाऊ शकतील. म्हणूनच त्यांच्या चवीनुसार आणि आरोग्यानुसार भोजनाची व्यवस्था अवश्य करा. हेदेखील आपले कर्तव्य आहे. वाढत्या वयासह त्यांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार मिळत आहे की नाही हे पाहा.

हुशारीने वागा

फारच शांत राहणे किंवा जास्त बोलणे चांगले नाही. जेव्हा पालक एकत्र असतात तेव्हा त्यांच्यासाठी थोडा वेळ अवश्य ठेवा, कारण ते तुमच्यासाठीच येथे आले आहेत. एकत्र फेरफटका मारा किंवा सुट्टीच्या दिवशी कुठेतरी एकत्रित फिरायला जा. काही आपल्या दैनंदिन गोष्टी सामायिक करा, काही त्यांचे ऐका.

त्यांच्या बदलत्या सवयींचे निरीक्षण करा. कोणत्या आजाराची लक्षणे तर नाहीत ना? आवश्यक असल्यास डॉक्टरांना भेटा. जरा आठवा की आई कसे आपल्या चेहऱ्याकडे पाहत आपल्या समस्या समजून घेई.

जर भेटगाठ लवकर-लवकर होत राहिली तर त्यांचे आजार आपल्याला वेळेआधीच समजतील आणि त्यांच्या समस्या वाढण्यापूर्वीच आपण वेळेवर त्यांच्यावर उपचार करून घेऊ शकाल.

आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांशी जोडलेले असू द्या. मुलांनी त्यांच्या वृद्ध होत असलेल्या आजी-आजोबांना समजून घेणे फार महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्याप्रति संवेदनशील असले पाहिजेत. ही गोष्ट त्यांना एक चांगली व्यक्ति होण्यास मदत करेल. उद्या आपली मुलेदेखील आपले म्हातारपण सहजपणे स्वीकारतील.

काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा. जेव्हा २ भांडी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात टक्कर होणे नैसर्गिक असते. छोटया गोष्टी छोटया समजून संपवल्या गेल्या पाहिजेत.

अंतर संपवा

सासू-सुनेच्या नात्याला सर्वात जास्त कलंकित केले जाते, परंतु सत्य हे आहे की त्या दोघीही एकाच व्यक्तिवर प्रेम करतात आणि म्हणूनच ही वर्चस्वाची लढाई बनून जाते. मुलाची हुशारी आणि समजुतदारपणामुळे येणाऱ्या दिवसाचा संघर्ष टाळता येतो. पण या कारणास्तव एकत्र येणे थांबवणे म्हणजे नात्यांची हत्या करणे आहे. सोबत आल्याने, एकत्रित राहिल्याने एकमेकांना हळूहळू समजण्यास मदत होईल. समस्या केवळ भेटून सोडविली जाईल, अंतर संपल्यानंतरच जवळीक वाढेल.

आई-वडील ती माणसे आहेत, ज्यांनी आपले पालन-पोषण करून वाढविले. जेव्हा ते आपले पालन- पोषण करू शकतात तेव्हा ते स्वत:चेदेखील करू शकतात. आता ते निरोगी आहेत, एकटे राहण्यास सक्षम आहेत, तेव्हा आपले हे कर्तव्य आहे की आपण नेहमीच एकत्र येण्याची संधी शोधत राहावी. त्यांना नेहमी आपल्याकडे बोलवा आणि त्यांना आदर व प्रेम द्या. उद्या जेव्हा ते अशक्त होतील, आपल्याबरोबर राहण्यास विवश असतील तेव्हा त्यांना ताळमेळ बसवण्यात काही अडचण येऊ नये. प्रेमळपणे घालविलेले हे छोटे-छोटे क्षण नंतर त्यांच्या मुळांसाठी खत म्हणून काम करतील.

नाती कळसूत्री बाहुल्यांसारखी असतात, ज्यांची दोरी आपल्या परस्पर विचारांत, समंजसपणात, सुसंवादांत आणि सुलभतेत असते. भारतीय सामाजिक रचनादेखील काहीशी अशीच आहे की दूर राहा किंवा जवळ, सगळे राहतात नेहमी एकमेकांच्या हृदयात आणि मनामध्येच.

पतिच्या सहयोगीसुद्धा बना

* शैलेंद्र सिंह

नेहाचे लग्न होऊन ५ वर्ष उलटलीत. ती तिच्या पतीसोबत इतकी खुश होती की तिला कशाचेही भान नसायचे. तिचा पती तिला समजावत असे, तेव्हा ती म्हणत असे की तू असताना मला हे सगळे समजून घ्यायची काय गरज आहे. त्यामुळे राकेशला स्वत:चे बरेचसे काम स्वत:लाच सांभाळावे लागायचे. सगळे पैशांचे हिशोब तो स्वत:च ठेवायचा. तिला पैसे तेवढेच हवे असायचे, जेवढे तिला खर्चाला लागायचे.

अचानक राकेशला काही काळ सरकारी कामासाठी परदेशी जावे लागले. सुरुवातीला तर नेहा खुश होती की तिलाही जायला मिळेल. पण जेव्हा सरकारने परवानगी नाकारली, तेव्हा तिला घरी एकटे राहावे लागले. आता घराची सगळी जबाबदारी नेहावरच आली. पण तिने कधी घरातले काम समजून घेतले नव्हते. त्यामुळे तिच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. कधी एलआयसी पॉलिसी, कधी वीज, पाण्याचे बिल भरण्यात अडचण. नेहाच्या आता लक्षात येऊ लागले की ही कामं जर तिने आधीच शिकून घेतली असती तर तिला आता इतके कठीण गेले नसते.

नेहापेक्षाही जास्त कठीण परिस्थितीत सीमा फसली होती. तीसुद्धा घरातील कामाकडे लक्ष देत नव्हती. एक दिवस तिच्या पतीचा अपघात झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. आता सीमाला कळत नव्हते की आजारासाठी पैसे कुठून आणायचे, कारण तिला माहीतच नव्हते की बँकेचे पासबुक कुठे ठेवले आहे, एटीएमचा पिन काय आहे. ती संकटात सापडली होती. जवळ पैसे असुनूही तिला नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे पैसे मागावे लागले होते. शॉपिंग, किटी पार्टंयामध्ये मैत्रिणींमध्ये दंग असलेल्या सीमाला आता जाणवू लागले की आधीपासूनच जर तिने ही कामं समजून घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.

नेहा, सीमाच्या उलट रश्मी आपल्या पतीची सगळी कामं स्वत: सांभाळते. तिचा नवरा आपला सगळा पगार त्यांच्या जॉईंट अकाउंटमध्ये टाकतो. त्यातून सगळे काम रश्मी स्वत: करते. तिच्या नवऱ्याचे सगळे लक्ष नोकरीत असते. त्यामुळे त्याला नोकरीत पदोन्नतीही मिळत आहे. त्याच्या मार्गात कोणत्याही अडचणी नाहीत. रश्मीलाही लहानसहान कामांसाठी नवऱ्याची वाट बघत बसावी लागत नाही. दोघांचीही गाडी जीवनाच्या मार्गावर सुसाट पळत आहे. जी पत्नी पतीची सहयोगी बनून त्याला मदत करते ती नवऱ्यालाही आवडते.

जीवनात अशी परिस्थिती केव्हाही कोणाच्याही समोर उभी राहू शकते. यासाठी आवश्यक आहे की घरातील सगळे कामकाज समजून घ्या. विशेषत: आर्थिक व्यवहार समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पत्नी पतीला आवडतेच, पण तिने त्याची सहयोगी बनून रहायला हवे. यात वाईट असे काहीच नाही. जर सगळे नेहमीसारखेच चालू असेल तर, तुमच्या अशा सहयोगी बनण्याने पतीवरचा कामाचा भार हलका होतो आणि त्याला करिअरसंबंधी काम पूर्ण करायला वेळ मिळतो.

तुम्हीसुद्धा या टीप्सकडे लक्ष देऊन आपल्या पतीची प्रिय बनण्यासोबतच सहयोगी बनू शकता :

* घरातील अत्यावश्यक गरजांच्या वेगवेगळया फाईल्स बनवा. जसे टेलिफोन बिल, मोबाईल बिल, हाऊस टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, बँकेत जमा पैसे, इन्कमटॅक्स इत्यादीच्या फाईल्स बनवा. याबाबतचा लहानमोठा कागद त्यात ठेवा, अनेकदा एखादा कागद वेळेत न मिळाल्यानेसुद्धा नुकसान होऊ शकते.

* तुम्ही बॅँकेत जे पैसे जमा करता त्याची सगळी माहिती तुमच्याजवळ असायला हवी. म्हणून बँकेचे पासबुक अपडेट ठेवा. याचप्रकारे चेकबूकचाही संपूर्ण हिशोब ठेवा. याचा हिशोब ठेवा की तुम्ही केव्हा, कोणाच्या नावे, किती रकमेचा चेक लिहिला आणि चेक लिहिल्यावर बँकेत किती रक्कम उरली आहे? हे लक्षात ठेवल्यास चेक बाउंस होण्याची भीती राहात नाही. तुमच्याजवळ किती पैसे आहेत ही माहितीही तुम्हाला मिळत राहते.

* हाऊस टॅक्स, वीज, पाणी ,फोन यांची बिलं तुम्ही स्वत:च भरा. यांच्या वेगवेगळया फाईल्स बनवा. भरलेल्या बिलांच्या पावत्या आणि बिलाची प्रत त्यात लावून ठेवा. यामुळे हिशोबात कुठे गडबड आढळली तर सहज मिळते आणि दुरुस्त केली जाऊ शकते.

* जे सामान तुम्ही घरात वापरता, त्याच्या सर्व्हिस स्टेशनचा दूरध्वनी क्रमांक आपल्याजवळ ठेवा. यासाठी एक डायरी बनवा. लहानलहान कागदाचे तुकडे असतील तर ते हरवण्याची संभावना असते. याशिवाय पोलीस, फायर, दवाखाना, पाण्याचे कार्यालय असे दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे असायला हवेत, जेणेकरून गरज भासल्यास त्यांना फोन करून बोलावता येईल.

* जेव्हा तुम्ही एखादे नवीन सामान खरेदी कराल, तेव्हा त्याची पावती, गॅरंटी कार्ड व त्यासंबंधित इतर कागद फाईलमध्ये ठेवा म्हणजे गरज भासल्यास कामी येतील. जेव्हा कधीकधी सामान खराब होते तेव्हा आपल्याला नेमके आठवते की याचे गॅरंटीकार्ड कुठे ठेवले आहे.

* जर तुम्ही कर्ज काढले असेल तर त्याचीही फाईल बनवा, ज्यात कर्ज केव्हा काढले? त्याचा व्याजाचा दर किती आहे? हफ्त्याच्या रूपात बँकेतून दरमहा किती रक्कम कापली जात आहे? याचीही माहिती मिळवत रहा. कर्जाचा हप्ता बँकेकडे वेळेत सुपूर्त करा आणि त्याच्या पावत्या फाईलमध्ये ठेवा. अत्यावश्यक कागदांच्या फोटोकॉपीज काढून ठेवा. मूळ प्रत हरवल्यास फोटोकॉपीने काम पुढे सुरु राहू शकते.

* जर पतीच्या ऑफिसचे कागद घरी राहिलेत तर तेसुद्धा नीट सांभाळून ठेवा. असा विचार करू नका की ऑफिसच्या कागदांचे तुम्हाला काय करायचे.

* जर पतीने  कोणाला उधार पैसे दिले तर त्याचीही एक वेगळी फाईल करा, जेणेकरून कोणाकडून किती पैसे घ्यायचे आहेत हे कळत राहील. अशी अनेक कामं करून तुम्ही आपल्या पतीची सहयोगी बनू शकता.

प्रेम वाढवणाऱ्या विलक्षण भेंटवस्तु

प्रतिनिधी

सणसमारंभ म्हटलं की वस्तूंची देवाणघेवाण ही आलीच. भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीमुळेच नात्यांमध्ये जवळीकता वाढते आणि आपुलकीची जाणीव होते. अशात तुम्ही तुमचं खास नातं म्हणजे आपल्या प्रिय पत्नीला कसं विसरू शकता बरं? भेटवस्तू तर तुम्ही अनेक दिल्या असतील पण या सणासुदीला आपल्या बेटर हाफला द्या अशा काही भेटवस्तू, ज्याने तुमचा सणसमांरभ प्रेमाच्या घट्ट नात्याने उजळून निघेल.

दागिने

लहानमोठ्या प्रसंगाला तुम्ही सोन्याचे दागिने तर आपल्या पत्नीला भेट म्हणून देतच असाल. पण यावेळेस तुम्ही व्हाइट गोल्ड, प्लॅटिनम, डायमंड किंवा पर्ल सेट भेट म्हणून द्या. यामुळे आपल्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये नवीन प्रकारची स्टायलिश आणि ट्रेण्डी ज्वेलरी वाढल्याने तुमच्या लाइफ पार्टनरच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमलेल. आणि मग दागिने तर स्त्रियांची पहिली पसंत असतेच ना.

ट्रेडमिल

तुम्ही जर तुमच्या लाइफ पार्टनरला फिटनेस आणि हेल्थची भेट देऊ इच्छित असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे. ट्रेडमिलवर वर्कआउट केल्याने त्यांना अनेक फायदे होतील. ट्रेडमिलवर वर्कआउट केल्याने स्ट्रेसपासून तर मुक्तता मिळतेच, ऑक्सिजनचं प्रमाणही वाढतं. ट्रेडमिलवर धावल्याने त्यांचं हृदयही स्वस्थ राहील. ट्रेडमिलवर वर्कआउट केल्याने घाम सुटतो, ज्यामुळे त्वचेचे पोर्स उघडतात आणि त्वचेतील टॉक्सिंस बाहेर निघून जातात. याने त्वचा चमकदार बनते. शरीरातील अधिक फॅट बर्न करण्यातही १०-१५ मिनिटांचा ट्रेडमिल वर्कआउट पुरेसा असतो. शिवाय वर्कआउट शरीराचा मॅटाबॉलिज्मही वाढवतो, ज्यामुळे तुमची पत्नी कायम ऐनर्जेटिक राहील.

ट्रेडमिल विकत घेताना लक्षात ठेवा :

* ते मोटराइज्ड असावं.

* बर्न होणारी कॅलरी त्याच्या मॉनिटरवर दिसावी.

* शॉकर सिस्टमची क्वालिटी चांगली असावी.

* स्टेबलायजर कनेक्टेड असावं जेणेकरून लाइट गेल्यावर ते एकदमच बंद होऊ नये.

* बेल्ट आणि बेल्टला मूव करणारा डेक चांगल्या मेटरियलचा असावा.

* साइड बार्स असावेत, जेणेकरून बॅलन्स बिघडल्यावर सपोर्ट मिळेल.

स्कूटी

तुम्ही तुमच्या पत्नीला स्कूटीचं युनीक गिफ्टही देऊ शकता. स्कूटीमुळे त्यांचा आत्मविश्वासच वाढणार नाही तर त्या आत्मनिर्भरही होतील. मुलांना शाळेत नेणंआणणं असो, ब्यूटी पार्लरला जाणं असो वा घरातील इतर कामं पूर्ण करायची असो. तुमचं हे युनिक गिफ्ट त्यांना खूप उपयोगी पडेल. आणि मग जेव्हा जेव्हा त्या स्कूटी वापरतील तेव्हा तेव्हा त्या मनोमन तुमचे आभारही मानतील.

वेइंग मशीन

तुम्हाला जर तुमची पत्नी स्लिमट्रिम आणि मॉडलसारखी दिसावी असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना भेट द्या वेइंग मशीन. जेणेकरून त्याच्या वापराने त्या आपल्या वाढणाऱ्या किंवा कमी होणाऱ्या वजनावर लक्ष ठेवून स्लिमट्रिम राहातील. आता बाजारात ऑटो ऑन एण्ड ऑफ फॅसिलिटीच्या प्लास्टिक आणि ग्लास प्लेट फार्मच्या अनेक वेइंग मशीन्स मिळतात ज्यामध्ये एलईडी इंडिकेटर लाइट, मॅक्द्ब्रिमम वेट कॅपेसिटी डिजिटल, एलसिडी डिस्पले यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. वापर करून वजनावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं आणि बीएमआयचं निर्धारण करून डाएट प्लान बनवला जाऊ शकतो. या भेटवस्तूचा वापर करून तुमची पत्नी कायम फिट एण्ड हेल्दी दिसेल.

एअरकंडीशनर

जेव्हा बाहरेचं वातावरण गरम असेल तेव्हा बेडरूमचा मूड थंड करण्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीला एसी गिफ्ट करू शकता. कोणत्याही मोसमात तुम्ही एसी गिफ्ट केला, तरी अधूनमधून एकाएकी उसळणाऱ्या गरमीच्या त्रासापासून हा भेट दिलेला एसी त्यांचा मूड चांगला राखेल आणि त्या कायम दिसतील फ्रेश आणि आनंदी, ज्याचं संपूर्ण श्रेय मिळेल तुम्हाला. आता बाजारात विंडो एसी आणि स्प्लिट एसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय विंडो एसीबद्दल म्हणावं तर ते १ टन ते १.५ टनच्या वैरिएट्समध्ये मिळतात. शिवाय आता बाजारात २ स्टार ते ५ स्टार पर्यंतचे एसी मिळतात, जे परफेक्ट कूलिंग देण्याबरोबरच पॉवर सेवर्सचंही काम करतात.

किचन टेलिव्हिजन

तुम्ही तुमच्या पत्नीला किचनमध्ये आपल्या आवडीचे पदार्थ बनवताना आपल्या आवडीचे चित्रपट आणि कार्यक्रम पाहाण्याचीही संधी देऊ शकता आणि तेही किचन टेलिव्हिजन गिफ्ट करून. विश्वास ठेवा, हे त्यांच्यासाठी एक सुखद सरप्राइज ठरेल. बाजारात एलईडी, एचडी आणि एलसीडी टेलिव्हिजन १५ इंच, १६ इंच इत्यादी अनेक साइजमध्ये मिळतात. यामुळे जेवण बनवताना त्यांचा कोणत्याही मालिकेचा भाग मिस होणार नाही आणि यासाठी त्या कायम तुमचे आभार मानतील. हा तुमच्या दोघांमधील प्रेमाची केमिस्ट्री आणखीन जास्त स्ट्राँग करेल.

सिक्योरिटी सिस्टम

तुमच्या जीवनात तुमच्या पत्नीपेक्षा जास्त महत्वाचं आणखीन काय असेल बरं? मग तुम्ही तिच्या संरक्षणाबाबत दुर्लक्ष कसं करू शकता? मात्र, यावेळेस तुम्ही तुमच्या पत्नीला द्या संरक्षणाची भेट, म्हणजे सिक्योरिटी सिस्टमची गिफ्ट. ही सिक्योरिटी सिस्टम सिक्योरिटी गार्डपेक्षाही जास्त उत्तमरीत्या तुमच्या पत्नीचं संरक्षण करेल. ही सिक्योरिटी सिस्टम लावून तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता. स्मोक इंडिकेटर, आगीपासून संरक्षण, अनोळखी लोकांना ओळखल्यानंतर घरामध्ये एण्ट्री करणाऱ्या या सिक्योरिटी सिस्टममध्ये फिंगर प्रिण्ट लॉक्स, बिन चावीचे दार उघडण्याची सोय म्हणजे डुप्लीकेट चावी बनवण्याचं ऑप्शनच नसणार. व्हिडीओ डोर फोन, टू वे कम्यूनिकेशन, स्पीकर सिस्टम, आतून इलेक्ट्रॉनिक लॉक उघडण्याची सोय इत्यादी बरंच काही असतं.

आयटी गॅजेट्स

तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची पत्नी टेक्नोसेवी असावी, टेक्नोलॉजीच्या नवनवीन गॅजेट्सने ती अपडेटेड असावी तर यासाठी यावेळेस तुम्ही त्यांना आयटी गॅजेट्सची भेटवस्तू, भेट म्हणून देऊ शकता. जसं की स्मार्ट फोन, आयपॅड, टॅबलेट, लॅपटॉप, हॅण्डीकॅम, जीपीएस फिटनेस टे्रनर यासारखे गॅजेट्स मार्केटमध्ये सहज मिळतात. तुम्हाला जर तुमचे सुंदर क्षण टिपून ठेवायचे असतील तर हॅण्डीकॅम एक चांगलं गिफ्ट ऑप्शन ठरेल.

जीपीएस फिटनेस ट्रेकर

या गॅजेटमध्ये स्मार्ट एमपी ३ प्लेयर आहे, जे स्वेटप्रूफ आणि स्टायलिश आहे. यामध्ये जीपीएस हार्ट रेट कॅपेबिलिटी आहे. हे ऐण्ड्रॉयड बेस आहे. हा तुमची रनिंग एक्टिविटी आणि याचा जीपीएस तुमचं अंतर मोजण्याचं काम करतं. हे गॅजेट तुमच्या पत्नीला फिट ठेवण्यात मदत करेल.

हवं तर तुम्ही तुमच्या पत्नीला आयपॉडही भेट देऊ शकता, ज्यात त्यांच्या आवडीची गाणी असतील. नक्कीच हे गिफ्ट मिळाल्याने त्या खूपच रोमाण्टिक होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें