बदलत आहे खाण्यापिण्याच्या समजुती

* शिखर चंद जैन

अलीकडच्या काही वर्षांत खाण्यापिण्याशी निगडित अनेक समजुती प्रचलित झाल्या आहेत पण त्यामध्ये आता नवीन शास्त्रोक्त रिसर्च आणि विचारांमुळे बरेच बदल घडत आहेत. वर्षांनुवर्षांचा अनुभव आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्यानंतर आता शास्त्रज्ञ पुन्हा त्याच गोष्टींवर परतले आहेत जे पूर्वी आपले पूर्वज म्हणायचे. जसं की नेहमी स्वस्थ राहाण्यासाठी ते तूप, दूध, दही, कडधान्य, नैसर्गिक तेल (रिफाइंडरहित), कच्च्या भाज्या, फळं इत्यादींचं सेवन करायला सांगायचे, तसंच आता हेल्थ एक्सपर्टही म्हणू लागले आहेत.

मग या, जाणून घेऊया अलीकडचे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या सर्वेक्षणात, खाण्यापिण्याच्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल काय काय म्हटलं गेलं आहे.

शेकमध्ये दुधाचा वापर

पूर्वधारणा : लाभदायक.

तज्ज्ञांचं मत : आयुर्वेदानुसार दुधाबरोबर आंबा, केळी, नारळ, बोर, अक्रोड, डाळिंब, फणस आणि आवळ्याचा वापर करू नये. आयुर्वेद ग्रंथांमध्ये याला आहाराच्या विरूद्ध म्हटलं गेलं आहे. अशा प्रकारचं सेवन केल्याने बेशुद्धी, पोटफुगी, जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी भरणं, भगंदर, रक्ताची कमतरता, शरीर सुकणे, ताप, जुनी सर्दी, नपुंसकता आणि आंधळेपणा यांसारखे रोग होऊ शकतात.

लोणी

पूर्वधारणा : लोणी अपायकारक असतं. म्हणून शक्यतो हे खाणं टाळलं पाहिजे. त्याच्याऐवजी लो फॅट असलेलं पॉलीअनसॅचुरेटेड स्प्रेड घ्या.

नवीन सल्ला : ‘‘कमी प्रमाणात लोणी खाणं फायदेशीर ठरतं. कमी प्रमाणात डेरी फॅट घेतल्याने कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : सामान्य प्रमाणात.

अंडी

पूर्वधारणा : अंड्यांमध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल असतं.

नवीन सल्ला : ‘‘अंडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. डाएटरी कोलेस्ट्रॉलने रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही. यामध्ये न्यूट्रीएंट आणि व्हिटॅमिन असतात,’’ मेल बेकमॅन, सीनियर व्याख्याता न्यूट्रीशन, बर्मिंघम सिटी यूनिव्हर्सिटी.

किती घ्यावं : आठवड्यातून ३-४ वेळा.

दूध

पूर्वधारणा : दूध कायम सेमीस्किम्ड किंवा स्किम्ड (मलईरहित) घ्यावं.

नवीन सल्ला : फुल फॅट दुधामध्ये हेल्दी फॅट असतात, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. फॅट म्हणजे ते अन्न अपायकारक असतं हे जरुरी नाही.

किती घ्यावं : दिवसभरात साधारणपणे अर्धा लीटर.

ब्रेड

पूर्वधारणा : ब्रेड आरोग्यासाठी चांगला असतो.

नवीन सल्ला : ‘‘फक्त होलग्रेन ब्रेडच चांगला असतो. मैद्यापासून निर्मित ब्रेड अपायकारक असतो. कायम लेबल वाचूनच ब्रेड घ्या,’’ मेल बेकमॅन, वरिष्ठ पोषणतज्ज्ञ.

किती घ्यावं : दिवसभरात २-४ स्लाइस खाणंच योग्य ठरतं.

ऑलिव्ह ऑइल

पूर्वधारणा : ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी खूप चांगलं असतं.

नवीन सल्ला : ‘‘ऑलिव्ह ऑइल कोशिंबिरीवर तर ठीक आहे, पण हे फ्राय करण्यासाठी वापरल्यावर हे कार्सनोजेनिक (कॅन्सरकारी) होऊ शकतं. फ्राइंगसाठी रेपसीड ऑइल चांगलं असतं. याचेही अनेक फायदे आहेत,’’ डॉ. ग्लेनीज जोन्स, न्यूट्रीशनिस्ट.

किती घ्यावं : ‘‘दिवसभरात एक मोठा चमचा; पण फ्राइंगसाठी नाही.’’

फ्रूट ज्यूस

पूर्वधारणा : फळांचा रस आरोग्यासाठी खूप चांगला असतो.

नवीन सल्ला : डबाबंद फळांचा रस साखरेने भरलेला असतो. त्यामध्ये नैसर्गिक रंग आणि चव असण्याचीही शक्यता असते. अनेक फ्रूट ज्यूसमध्ये तर सॉफ्ट डिंकसारखं शुगर कंटेंट असतं.
किती घ्यावं : डबाबंद अजिबात घेऊ नका. ताज्या फळांचा रस तेही स्वत: बनवून घ्या.

कार्बोहायडे्रट

पूर्वधारणा : दिवसभरात जेवणामध्ये ५० टक्के कार्बोहायडे्रट सामील करावं.

नवीन सल्ला : ‘‘ब्राउन कार्बोहायडे्रट चांगले असतात. पण पांढरे खूपच अपायकारक असतात. कार्बोहायडे्रट घ्या, पण अख्ख्या धान्याच्या रूपात. पांढरा स्पॅगेरी, ब्रेड, तांदूळ हे सगळं चांगलं नाही,’’ मेल बॅकमॅन, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ.

किती घ्यावं : होलग्रेन कार्बोहायडे्रट दिवसभरातील अन्नाच्या ५० टक्के असावं.

योगर्ट

पूर्वधारणा : दही कायम लो फॅटचं घ्यावं.

नवीन सल्ला : ‘‘फुल फॅट जास्त चांगलं असतं. फुल फॅट योगर्टने डायबिटीज आणि हार्ट डिसीझचा धोका कमी असतो. फुल फॅट योगर्टने वेट लॉस करण्यासाठी मदत मिळते,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : नियमितपणे फुल फॅट योगर्ट घ्यावं.

सुपर फूड

पूर्वधारणा : सुपर फूडसारखी कोणतीच गोष्ट नाही.

नवीन सल्ला : ‘‘काही विशेष आहार, जसं की फळं आणि भाज्या भरपूर पोषक असतात, पालक आणि बीटसारख्या तर व्हिटॅमिन आणि मायक्रो न्यूट्रीएंटने पुरेपूर असतात,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : हवं तितकं खा.

डार्क चॉकलेट

पूर्वधारणा : चॉकलेट आरोग्यास अपायकारक असतं.

नवीन सल्ला : डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर असतं. एका नवीन सर्वेक्षणानुसार डार्क चॉकलेटचं कमी प्रमाण खाल्ल्याने ब्लडप्रेशर कमी होतं. पण मिल्क चॉकलेट खाऊ नका. कारण त्यामध्ये कोकोआ कमी आणि फॅट व शुगर जास्त असतं.

किती घ्यावं : ७० टक्के कोकोआ असलेल्या डार्क चॉकलेटचे २ तुकडे पुरेसे असतात.

जेवणानंतर पाणी आणि मिठाई खाणं

पूर्वधारणा : कसलीच हरकत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला : आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी प्यायल्याने शरीर बारीक होतं, तर जेवणानंतर पाणी प्यायल्याने शरीर लठ्ठ होतं. जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी पिणं योग्य ठरतं. त्याचबरोबर जेवताना सर्वात आधी गोड पदार्थ, त्यानंतर आंबट आणि खारट पदार्थ आणि सर्वात शेवटी तिखट, कडवट आणि तुरट पदार्थ खावेत. त्याने जेवण चांगल्या प्रकारे पचतं. आहाराच्या सुरुवातीला फळामध्ये पेयद्रव्य आणि सर्वात शेवटी खायच्या वस्तू घ्याव्यात.

दुधाबरोबर फरसाण

पूर्वधारणा : चालतं.

तज्ज्ञाचा सल्ला : आयुर्वेदात दुधाबरोबर मिठाचं सेवन निषेध आहे. फरसाण, बिस्किटं, भजी आणि इतर तेलकट, खारवलेले पदार्थ दुधाबरोबर खाऊ नयेत. असे बरेच पदार्थ बनवताना क्षार म्हणजे खायच्या सोड्याचा वापर होतो. त्यामुळे केवळ केस आणि डोळ्यांवरच परिणाम होत नाही तर आयुर्वेदानुसार खाण्याच्या सोड्यामुळे पुरुषाची पौरूष शक्ती जितकी कमी होते तितकी इतर कोणत्याच पदार्थाने होत नाही.

मध आणि पाण्याचं सेवन

पूर्वधारणा : फायदेशीर.

तज्ज्ञाचा सल्ला : मध गरम पाण्यात मिसळून पिण्याचा अर्थ आहे रोगांना आमंत्रण देणं. मध कधीही गरम वस्तूबरोबर सेवन करणं आहाराच्या विरूद्ध असतं. ताज्या पाण्यात जुनं मध मिसळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो. समप्रमाणात देशी तूप आणि मध पिणंही आहाराच्या विरुद्ध असतं.

ब्रेकफास्ट सीरियल्स

पूर्वधारणा : डबाबंद, ईजी टू यूज ब्रेकफास्ट सीरियल सकाळच्या नाश्त्याचे चांगले पर्याय आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला : डबाबंद सीरियल्समध्ये हाय फ्रक्टोस कॉर्न सिरपचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याच प्रोसेड फूडमध्ये स्वीटनर म्हणून याचा वापर केला जातो. ज्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. अगदीच नाइलाज असेल तरच प्रोसेस्ड फूडचा वापर करा.

कनोला ऑइल

पूर्वधारणा : हे शरीरासाठी फायदेशीर असतं.

तज्ज्ञांचा सल्ला : न्यूट्रीशनिस्ट सांगतात की, हे एक जेनेटिकली मॉडीफाइड तेल आहे, म्हणून हे आरोग्यासाठी चांगलं नाही. याच्या रिफाइनिंग प्रोसेससाठी भरपूर केमिकलचा वापर केला जातो जो शरीरासाठी फारच अपायकारक असतो. उत्तम पर्याय म्हणून राईचं तेल, बदामाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल (कोल्ड प्रेस्ड) याचा वापर करावा.

बेडशीट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

*प्रतिभा अग्निहोत्री

आमचा पलंग हा घराचा एक भाग आहे जिथे आपल्याला सर्वात जास्त आराम वाटतो. स्वच्छ अंथरूण केवळ घराच्या सौंदर्यात भरच घालत नाही, तर बाहेरून थकून आलेल्या व्यक्तीलाही आकर्षित करते. बेडशीट हा बेडचा मुख्य भाग आहे. सुबकपणे घातलेली सुरकुत्या मुक्त बेडशीट बेड तसेच संपूर्ण खोली आकर्षक बनवते. बेडशीट्स म्हणजे चादरी लहान आणि मोठ्या सर्व घरात आवश्यक असतात आणि प्रत्येकजण त्यांच्या बजेटनुसार ते खरेदी करतो.

प्रामुख्याने 2 प्रकारची पत्रके एकल आणि दुहेरी आहेत. आजकाल कॉटन, सिंथेटिक, फर, वूलन, सिल्क, पॅच वर्क, पेंट आणि एम्ब्रोयडरी शीट्स ट्रेंडमध्ये आहेत. त्यांची श्रेणी 300-400 ते 4-5 हजारांपर्यंत सुरू होते. चादर निःसंशयपणे आमच्या खोलीचे स्वरूप बदलतो. असे असले तरी, दिवाळीला आम्ही घरासाठी नवीन पत्रके खरेदी करतो, म्हणून या वेळी जेव्हा तुम्ही नवीन पत्रके खरेदी करायला जाल तेव्हा खालील गोष्टी लक्षात ठेवा-

ड्रेस योग्य आहे

साधारणपणे, कापसाला बेडशीट्ससाठी सर्वात योग्य फॅब्रिक मानले जाते कारण ते बेडवर सरकत नाही आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी हानिकारक नाही, परंतु पावसाळ्यात कोरडे होण्यास बराच वेळ लागतो, म्हणून कापसाच्या मिक्सच्या 1-2 शीट्स terrycott तसेच किल्ली खरेदी करा जेणेकरून तुम्ही त्यांचा पावसात वापर करू शकाल. दिवाळी किंवा लग्नासारख्या विशेष प्रसंगांसाठी, साटन रेशीम, किंवा भरतकाम केलेल्या चादरी खरेदी करणे योग्य आहे.

हवामान महत्वाचे आहे

बेडशीट खरेदी करताना, हवामानाचीदेखील काळजी घेणे फार महत्वाचे आहे, उन्हाळ्यात, हलके वजनाचे कापूस, जाड लोकरी, रेशीम, साटन आणि तागाचे हिवाळ्यात आणि सिंथेटिक फॅब्रिक शीट्स पावसाळ्यात चांगले असतात.

वय लक्षात ठेवा

लहान मुलांच्या खोलीसाठी पशु नर्सरी प्रिंट्स, प्रौढांसाठी शांत पेस्टल रंग, वृद्धांसाठी हलके रंग आणि तरुणांसाठी चमकदार चमकदार रंग बेडशीटसह चांगले जातात. याशिवाय, जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर तुम्ही जाऊ शकता गडद रंगाच्या चादरी. प्राधान्य द्या कारण गडद रंगाच्या चादरी लवकर घाण होत नाहीत.

सेट घ्या

नेहमी उशाच्या कव्हरसह पत्रक घ्या. यासह, पलंगाचा देखावा चांगला होईल आणि आपल्याला वेगळे उशाचे कव्हर घ्यावे लागणार नाहीत. सिंगल शीट घेण्यामध्ये आणि उशाच्या सेटसह दरात फारसा फरक नाही, परंतु बेडच्या देखाव्यामध्ये बराच फरक आहे.

आकार लक्षात ठेवा

योग्य आकाराची शीट असणे फार महत्वाचे आहे, अन्यथा पत्रक एकतर बेडवर कमी पडेल किंवा खाली लटकेल. अनेक वेळा घरात 4 बाय 6 चा बेड असतो, ज्यावर सामान्य सिंगल बेडची शीट लहान असते, मग एवढ्या मोठ्या डबल बेडसाठी, दुकानदाराला आकार सांगून रुंद शीट विकत घ्या. पलंगाच्या परिपूर्ण आकारापेक्षा सुमारे 6 इंच मोठी शीट खरेदी करा, कारण पत्रक घातल्यानंतर ते गादीखालीही दाबावे लागते. आजकाल बाजारात बेड फिटेड शीट्सदेखील बाजारात येत आहेत, जे बिछावल्यानंतर कुरकुरीत होत नाहीत कारण त्यांच्या कोपऱ्यांवर लवचिक असतात जेणेकरून ते बेडच्या गादीमध्ये बसतील.

धाग्यांची संख्या लक्षात ठेवा

उच्च धागा मोजणीसह एक पत्रक अधिक आरामदायक आहे, म्हणून पत्रक खरेदी करताना धाग्यांची संख्या लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. 300 ते 500 च्या दरम्यान धागा मोजणीची शीट चांगली मानली जाते. 175 पेक्षा कमी धाग्यासह शीट खरेदी करणे योग्य नाही कारण त्यांचे फॅब्रिक खूप हलके आहे.

ऑनलाईन खरेदी करताना

कोरोना असल्याने, बहुतेक खरेदी ऑनलाईन केली जाते, म्हणून खरेदी करण्यापूर्वी, रिटर्न पॉलिसी आणि उत्पादनाची पुनरावलोकने तपासा याची खात्री करा जेणेकरून फॅब्रिकचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर परत किंवा एक्सचेंज करता येईल. केवळ नामांकित साइट्सवरून ऑनलाइन खरेदी करा.

लग्न मंडपांचा नवा दिमाख

* सोमा घोष

लग्नप्रसंगी मंडपाचं आकर्षण प्रत्येक वर वधूला असतं. हे योग्य आहेच कारण त्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलणार असते. म्हणूनच हा क्षण सर्वांनाच आठवणीत राहील असा बनवायचा असतो. तसेच लग्नाच्या जास्तीत जास्त विधी इथेच पार पाडल्या जातात.

एक काळ असा होता जेव्हा मंडप सजवण्यासाठी केळी आणि आब्यांच्या डहाळ्या, फूले, पाने इ. वापरले जात असे. पण बदलत्या काळामुळे यातही आधुनिकीकरण झाले आहे. खरे तर मंडपांचा आवाका हल्ली कमी होत चालला आहे. वेळ तसेच जागेची कमतरता ही त्याची कारणे आहेत. तरीही बरेच लोक आजही पारंपरिक लग्नांनाच महत्त्व देतात. तसेच हल्ली लग्नांसाठी इवेंट मॅनेजमेंटचाही आधार घेतला जातो.

गुड टाईम कॉन्सेप्ट्सचे इवेंट मॅनेजर आशु गर्ग यांच्याशी याबाबतीत बोलले असता ते म्हणतात की, विवाह मंडपांची धारणा आता कमी होत चालली आहे. पण अजूनही काही लोक पारंपरिक विवाहांना चांगलं मानतात व म्हणून ते इवेंट मॅनेजमेंटचा आधार घेतात. आम्हांला प्रत्येक वेळी मंडपासाठी वेगवेगळ्या कल्पना द्याव्या लागतात, जे त्यांच्या बजटनुसार असतात.

मंडप बनवण्यासाठी हल्ली नवनवीन पद्धतींचा वापर केला जातो. ज्यामध्ये थर्माकोल, कागद, रंग, इकोफ्रेन्डली प्रिंटरद्वारे लाकूड, कागद इ. वर विविध प्रकारची चित्रे काढून मंडप सजवला जातो. मंडपांची कल्पना हल्ली चित्रपटांमधूनही मिळते. पण बहुतेक मंडप संकल्पनेवर आधारित असतात. आशूच्या म्हणण्यानुसार हे मंडप अलीकडे अधिक प्रचलित आहेत.

घुमटाकार मंडप : ‘रिच ट्रेडिशन’ आणि परंपरा दर्शवणाऱ्या मुघलकाळापासून प्रचलित असणारे घुमटाकार मंडप लोकांना जास्तीत जास्त आवडतात. हे बनवण्यासाठी सुरेख खांबांचा वापर केला जातो. ज्यामुळे यांचे सौंदर्य वाढते. घुमट सजवण्यासाठी फूले व रंगांचाही वापर केला जातो. पूर्वीच्या काळी आकाशालाही घुमट मानले जायचे म्हणून अशा मंडपांची कल्पना आजही केली जाते.

थीमवर आधारित मंडप : पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आलेला मंडप ज्यात गडद रंग, सोनेरी व गुलाबी रंगसंगतीसोबत सॅटीन कापडाचा, वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. विवाहाच्या प्रत्येक विधीसाठी हा मंडप योग्य असतो. या अंतर्गत फुलाची संकल्पना, रंगांवर आधारित काही संकल्पना ज्यात रॉयल ब्लू, ब्लशिंग राज इ. खूपच लोकप्रिय आहेत.

राजस्थानी पद्धतींचा मंडप : हा मंडप राजस्थानातील गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जयपूरवर आधारित असतो. लाकडी खांबांवर कटवर्क काम करून हा बनवला जातो. यात प्रकाश योजना खूप चांगल्याप्रकारे केली जाते. ज्यात प्रकाशाचे प्रतिबिंब चारही दिशांना व खांबांना पसरते आणि आत असणाऱ्या दांपत्याला राजस्थानातील जयपूरमध्ये असल्याचा आभास वाटतो.

मोराच्या संकल्पनेवर आधारित मंडप : अशापद्धतींच्या मंडपात चारही बाजूंनी सोनेरी खांब उभारले जातात. मंडपाच्या मधोमध मोराची कलाकृती असणारी नक्षी गुलाबी फुलांच्या सहाय्याने बनवली जाते. सोनेरी खांब व गुलाबी फूले या मंडपांचे खास आकर्षण असतात.

रॉयल संकल्पना : राजवाडा मंडप ट्रेडिशनल ट्विस्टसोबत कंटेम्पररी डिझाइन मिळून बनवला जातो. यात खूप फूलांचा प्रयोग करून मोहक लुक दिला जातो. चमकदार गडद रंगांनी बनवण्यात आलेला हा मंडप शाही अंदाजाचा अनुभव मिळवून देतो. यात प्रकाश, पुरातन कलाकृती, रंग व सॅटिन कपड्यांपासून करण्यात आलेली सजावट पाहण्यासारखी असते. मंडपांचे प्रवेशद्वार ही खूपच आकर्षक बनवले जाते. मंडपाच्या आसापस बैठक व्यवस्थेला शाही लुक देण्यासाठी महागडी व सुरेख गाद्या, तकिया तसेच गालिच्यांचा वापर केला जातो.

विचारच नव्हे लुकही झाला बोल्ड

* गरिमा पंकज

स्त्रिया आज घराचा उंबरठा ओलांडून उच्च पदांवरही स्थानापन्न झालेल्या आहेत. मिस वर्ल्डचा किताब मिळवणे असो किंवा मिस युनिव्हर्सच्या कॉर्पोरेट जगतात नाव कमवायचे असो किंवा पुरूषप्रधान क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेचे सादरीकरण असो. महिला सामाजिक बेड्या तोडून आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.

त्यांचे विचार बोल्ड झाले आहेत आणि त्याबरोबरच त्यांच्या लुक आणि व्यक्तिमत्त्वामध्येही बदल झाला आहे. पेहराव असो किंवा मेकअप बोल्डनेस आणि स्वातंत्र्य प्रत्येक पैलूमध्ये दिसून येत आहे.

चर्चेत राहणं आवडतं

हल्लीच दंगल फेम फातिमा शेख आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत राहिली. फातिमाने इंस्टाग्रामवर २ बोल्ड फोटो शेअर केले. यात ती बीचवर स्विमसूटमध्ये दिसत आहे.

आज स्त्रिया अशा प्रकारच्या बोल्ड लुकद्वारे चर्चेत येण्यास घाबरत नाहीत, या उलट त्या याचा आनंद घेतात. बोल्ड लुकचे अजून एक उदाहरण मलायका अरोरासुद्धा आहे, जी नेहमी फॅशन आणि तिच्या बोल्ड स्टेटमेन्टसाठी चर्चेत असते.

क्रिएटीव्हिटीचे फंडे

आजकाल मुली आणि महिला फॅशनेबल आणि बोल्ड दिसण्यासाठी स्वत:ची अशी एक वेगळी स्टाइल बनवतात. स्टाइलमुळे स्वत:चे असे एक वेगळे स्थान निर्माण होते, जे लोक नेहमी लक्षात ठेवतात.

श्री लाइफस्टाइलच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर शीतल कपूर म्हणतात, ‘‘तुम्ही कुठला फॅन्सी ड्रेस घातला आहे याच्याशी लोकांना देणेघेणे नसते. तुम्ही तो कशाप्रकारे सांभाळत आहात ही गोष्ट महत्त्वाची आहे. ड्रेस लोकांच्या नजरेत आला पाहिजे आणि तो त्यांना आवडला पाहिजे. मग तो इंडियन असो की वेस्टर्न, प्रयत्न करा अशी स्टाइल बनवण्याची जी वेगळीही असेल आणि तुम्हाला शोभेलसुद्धा.’’

‘‘उदाहरण म्हणजे साडी एक पारंपारिक पेहराव आहे. पण हल्लीच्या मुली बॉलीवुडमधील ताऱ्यांकडून प्रेरित होऊन त्यालाही ग्लॅमरस टच देतात. साडीसोबत मॅडरिन कॉलर ब्लाऊज, हॉल्टर नेक ब्लाऊज, लोकट स्लीवलेस आणि नेट स्लिव्ह ब्लाऊज घातल्याने खूपच स्टायलिश आणि बोल्ड दिसतात.’’

फॅशनचा परिणाम प्रत्येक वयावर

महिला आता स्वत:वर वयाचा प्रभाव जाणवू देत नाहीत. आजच्या काळात फॅशनचे परिणाम सर्वच वयोगटावर दिसून येतात. आई, आजी, आत्या आधी साड्या व पंजाबी ड्रेसशिवाय काही वेगळे वापरत नसत. आता त्यांनाही तितकेच मॉर्डन दिसायचे असते. जितक्या त्यांच्या मुली आणि सूना दिसतात. आता त्याही जीन्स, ट्राउजर, टीशर्ट आणि शर्टमध्ये स्वत:ला कंफर्टेबल समजतात व तरूण दिसण्याचा प्रयत्न करतात.

आत्मविश्वासासाठी बोल्ड मेकअप

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या मेकअप आर्टिस्ट इशिका तनेजा म्हणतात की मेकअपमुळे व्यक्तिचे बाह्य सौंदर्यच उठून दिसते असे नाही तर, यामुळे जगासमोर स्वत:ला सादर करण्याचा आत्मविश्वासही बळावतो. मेकअपद्वारे सुंदर बनून स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास व चांगले घडण्याची मानसिकता ठासून भरली जाते. या आत्मविश्वासामुळे त्या जे काही काम करतात, त्यामध्ये त्यांना निश्चितच यश मिळते.

इशिका म्हणतात की मेकअप तुम्हाला गर्दीपासून वेगळे करतो. बोल्ड दिसण्यासाठी आजकाल ब्लॅक आणि ट्रान्सपरंट शेडच्या मस्काऱ्याऐवजी पिंक ग्रीन यलो असे कलरफुल मस्कारेही वापरले जातात. या कलरफुल शेड्स फक्त तुमचे डोळे मोठे व सुंदर बनवतात असे नाही तर ब्लॅक मस्काऱ्यापेक्षा जास्त आकर्षकही दिसतात.

बोल्ड लुकमध्ये लिपस्टिकच्या डार्क शेड्स जसे लाल आणि पिंक चेहऱ्याला आकर्षक लुक देतात एवढेच नाही तर डार्क कलर चेहऱ्याला जास्त काळ एनर्जेटिकही ठेवतात.

याचप्रमाणे डोळ्यांच्या स्मोकी लुकला बोल्ड मेकअपमध्ये जास्त पसंती दिली जाते, आयब्रोज पूर्णपणे वाढवून किंवा कुठल्याही आकाराशिवाय ठेवल्या जातात किंवा आकारही दिला जातो. पण मग पाँइंट्स न देता स्टे्ट ठेवल्या जातात. नखांना नवा लुक देण्यासाठी नेलआर्टचा वापर केला जातो.

कॉस्मेटिक सर्जरीने बोल्ड लुक

आज कॉस्मेटिक सर्जरीनेही कमाल केली आहे की लोक फक्त चेहराच नाही तर वॉर्ड पार्ट्सलाही नवा व बोल्ड लुक देऊ शकतात. मोठमोठ्या शहरातच नव्हे तर लहान लहान शहरातही बॉडी कंटूरिंग क्लिनिक उघडले आहेत. महिला जसे शिल्पा शेट्टीसारखे कर्व्ह, कॅटरिना कैफसारखे आकर्षक ओठ किंवा प्रियंका चोप्रासारखा सेक्सी लुक मिळवण्यासाठी व बोल्ड दिसण्यासाठी इथे लाखो रूपये खर्च करण्यासाठी मागे पुढे पहात नाहीत.

बीएलके सेंटर फॉर कॉस्मेटिक अॅन्ड सर्जरीचे डॉ. लोकेश कुमार सांगतात की कॉस्मेटिक सर्जरीद्वारे अनेक प्रकारे आकर्षक आणि बोल्ड लुक मिळवला जाऊ शकतो. जसे :

फेस लिफिटंग : फेस लिफिटंग दोन प्रकारे केले जाते. पहिली आहे पारंपरिक पद्धत ज्यात सर्जिकल प्रक्रियेद्वारा ढीली त्वचा आणि सुरकुत्या नीट केल्या जातात. हे पूर्णपणे एखाद्या ऑपरेशनप्रमाणे असतं आणि २-३ दिवस रूग्णालयात राहावं लागतं. सर्जरी करून पेशी व त्वचा घट्ट केली जाते.

ब्रेस्ट कंटुअर्स : अनेक स्त्रिया त्यांच्या स्तनांच्या आकाराने खुश नसतात. वाढत्या वयासोबत स्तनांचे सैलावणेही एक मुख्य समस्या आहे. ब्रेस्ट एनलार्जमेंट आणि ब्रेस्ट ऑगमेन्टेशनद्वारे स्तनांना मनासारखा आकार दिला जातो. ब्रेस्ट इनहांसमेन्टमध्ये सिलिकॉन इंप्लांट सर्वात जास्त प्रचलित आहे.

लिप सर्जरी : ही सर्जरी दोन कारणांनी केली जाते. एक तर ज्यांचे ओठ पातळ असतात त्यांच्यासाठी इनहांसमेंट सर्जरी केली जाते. या सर्जरीद्वारे ओठांमध्ये स्टफिंग करून त्यांचा आकार वाढवला जातो.

दुसरा प्रकार म्हणजे ज्यांचे ओठ मोठे आणि जाड असतात, त्यांच्यासाठी लिप रिडक्शन सर्जरी केली जाते. सर्जरीऐवजी एक नॉन सर्जिकल प्रकारही आहे ज्यामध्ये फिलर्सने ओठांच्या दिसण्यात बदल केला जातो.

नोज शेपिंग : काही लोकांचे नाक त्यांच्या चेहऱ्याला साजेसे नसते. सर्जरी करून नाकाच्या आकारात बदल केले जातात. म्हणजे ते त्यांच्या चेहऱ्याला शोभून दिसेल. या सर्जरीसाठी रूग्णालयात दाखल व्हावे लागते आणि पूर्ण बरे होण्यासाठी कमीत कमी दोन-तीन आठवडे इतका वेळ लागतो.

टॅटू : हल्लीच्या मुलींना आपला लुक कूल आणि बोल्ड दिसण्यासाठी वेगवेगळे टॅटू वगैरे काढून घेण्याचेही वेड आहे. काही मुली आपल्या आईवडिलांचे नाव किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव असलेले टॅटू गोंदवून घेतात. बॉयफ्रेन्डचे नाव गोंदवून घेणाऱ्या मुलींचीही संख्या कमी नाही.

मोठ्या शहरांची स्वस्त पण चांगली बाजारपेठ

* प्रतिनिधी

खरेदीची खरी मजा कोणत्याही मॉलमध्ये नसून शहरातील स्थानिक आणि गर्दीच्या बाजारपेठेत आहे आणि येथे वस्तू योग्य किमतीत उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला शहराच्या संस्कृतीबद्दल खूप माहिती मिळते. येथे जाणून घ्या काही मोठ्या शहरांची स्वस्त पण चांगली बाजारपेठ.

कुलाबा कॉजवे मार्केट, मुंबई

पुस्तकांपासून हस्तकला, ​​कपडे आणि पादत्राणे या रस्त्यावरच्या बाजारात तुम्हाला विविधता मिळेल. येथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारंपारिक आणि आधुनिक दोन्ही कपडे येथे उपलब्ध आहेत.

सरोजिनी मार्केट, दिल्ली

दिल्ली हे खूप महागडे ठिकाण आहे पण इथे रस्त्यावर खरेदी खूप स्वस्त आहे. येथे कमी बजेट असूनही, आपण मुक्तपणे खरेदी करू शकता. भारतीय ते पाश्चिमात्य कपडे उपलब्ध आहेत.

लाड बाजार, हैदराबाद

हैदराबादचा मोती प्रसिद्ध आहे. हैदराबादचा लाड बाजार मोत्यांपासून बांगड्या, दागिने आणि कपड्यांच्या खरेदीसाठी ओळखला जातो. इथे क्वचितच सापडत नाही.

जोहरी बाजार, जयपूर

राजस्थान हे हस्तकलेसाठी ओळखले जाते. जयपूरचा जोहरी बाजार सोन्या -चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. एवढेच नाही तर लोक बाजारात स्वस्त किमतीत दागिन्यांसह महागड्या साड्या आणि लेहेंगा भाड्याने घेतात.

गरियाहट मार्केट, कोलकाता

कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, साड्या, फर्निचर हे सर्व कोलकाताच्या या प्रसिद्ध बाजारात आहेत. येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने सुशोभित केलेली आहेत.

वर्कआउटसाठी निवडा योग्य लॉन्जरी

* सोमा घोष

महिला शूज आणि कपडयांवर तर पुष्कळ खर्च करत असतात, मात्र लॉन्जरीवर जास्त लक्ष देत नाहीत, ज्यामुळे अनेकदा त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. योग्य लॉन्जरी परिधान करणे फार गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही फिट राहाल.

याविषयी जीएनसी फिटनेस एक्स्पर्ट निशरिन पारीख म्हणतात, ‘‘वर्कआउट करताना जर योग्य लॉन्जरी नसेल तर बॅक पेन होऊ शकते, कारण सततच्या वर्कआउटमुळे ब्रेस्ट टिशूज खराब होऊ लागतात, ज्यामुळे त्यांच्यात लवचिकता येऊ लागते. शरीरासाठी सपोर्ट सिस्टीम योग्य असणे फार आवश्यक असते.’’

निवडा योग्य ब्रा

मुली ते वयस्कर महिला या सर्वानीच आपल्या ब्रेस्ट साइजनुसार योग्य ब्रा घातली पाहिजे, कारण वर्कआउटचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर होत असतो. वर्कआउट अनेक प्रकारचे असतात, ज्यातील रनिंग, एरोबिक, जुंबा यांचा शरीरावर जास्त परिणाम होतो. हल्ली मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या ब्रा अगदी सहज मिळतात.

* वर्कआउटसाठी सुती ऐवजी लायक्रा ब्राचा वापर करा.

* जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर लाइट सपोर्टची ब्रा घाला, कारण यात जास्त मूव्हमेंट होत नाही.

* वॉक करत असाल तर मिडियम सपोर्ट ब्रा वापरा.

* जर स्ट्रॉंग वर्कआउट करत असाल तर फुल सपोर्ट ब्रा वापरा.

* वर्कआउटच्या वेळी स्पोर्ट्स ब्रा घालणे सर्वोत्तम असते. यामुळे ब्रेस्ट शेप योग्य राहतो. जास्त मुव्हमेंट्समुळे ब्रेस्टच्या चारी बाजूचे लिंगामेन्ट ओढले जातात. यामुळे ब्रेस्ट लटकल्यासारखे दिसू शकतात. हे योग्य स्पोर्ट्स ब्रा घालूनच रोखता येते.

तुमच्या गरजेनुसार बाजारात अनेक प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत जसे :

योगा ब्रा : ही ब्रा पिलेट्स आणि मेडिटेशनसाठी सर्वोत्तम आहे. याचे मटेरियल सॉफ्ट असते. टी शेपची ही ब्रा घालणे फारच आरामदायी असते.

हायपर क्लासिक पॅडेड स्पोर्ट्स ब्रा : ही एक आरामदायी ब्रा आहे, ज्यातील पॅड तुम्ही गरजेनुसार काढूही शकता. ही ब्रा व्यायाम करताना पूर्ण ब्रेस्टला फिट ठेवते. कार्डिओ करताना ही वापरणे योग्य असते.

रॅपअप ब्रा : ही ब्रासुद्धा व्यायाम आणि पिलेट्ससाठी वापरता येते. हाय नेक लाइन आणि डबल लेयर कपडयापासून तयार झालेली ही क्रॉप टॉप ब्रा ब्रेस्टला पूर्णपणे कव्हर करते. तुमचे ब्रेस्ट भले कितीही मोठे असोत यात आराम मिळतो.

हायपर स्ट्राइप डबल डेयर ब्रा : ही सुपर सॉफ्ट सीमलेस, लाइट वेट आणि घाम शोषून घेणारी ब्रा आहे. दोन्ही साइडने की होलसारखी रचना असल्याने यात वर्कआउट करताना श्वासोच्छवास मोकळेपणाने करता येतो. ही ब्रा घालून जॉगिंगही करू शकता.

टेक लेयर ब्रा टॉप : स्मूथ आणि फ्लॅटरिंग फिट असलेली ही ब्रा लो टू मिडियम वर्कआउटसाठी योग्य असते. हीसुद्धा घाम शोषून शरीर थंड राखते.

रेसर स्पोर्ट्स ब्रा : ही घालून तुम्ही रनिंग करू शकता. याची सॉफ्ट पट्टी आणि मटेरियल इतके हलके असते की ही घातल्यावर २ मिनिटातच घातल्याची जाणीवही होत नाही.

अंडर आर्मर इक्लिप्स स्पोर्ट्स ब्रा : ही ब्रा कार्डिओ आणि स्ट्रॉंग वर्कआउटसाठी सर्वाधिक फायदेशीर असते. स्लिक, स्किन फिट आणि मिडियम इम्पॅक्ट ब्रा ब्रेस्टला पूर्णपणे होल्ड करतात. कोणत्याही प्रकारच्या मूव्हमेंटकरता ही ब्रा योग्य ठरते.

न्यू बॅलन्स काँफी काँफॉर्मर ब्रा : ही ब्रेस्टला हाय कव्हरेज देते. आणि ही घातल्यावर कोणत्याही स्ट्राँग मुव्हमेंटची जाणीवही होत नाही. याला झिरो बाउंस ब्रासुद्धा म्हणता येते. स्किन फिट असलेली ही ब्रा घालून महिला कोणत्याही प्रकारचे वर्कआउट सहजरित्या करू शकतात.

सिंगल राहण्याचे १० फायदे

* निधी निगम

यशस्वी करिअर वुमन हल्ली सिंगल राहणेच पसंत करतात. त्यांच्या फ्युचर प्लॅन्समध्ये जणू काही लग्न या शब्दाचे स्थानच उरलेले नाही. मुली आपले यश, पॉवर, पैसा आणि स्वातंत्र्य अगदी मनमोकळेपणाने एन्जॉय करत आहेत. युवतींमध्ये लेट मॅरेज किंवा नो मॅरेज सिंड्रोममुळे समाज किंवा कुटुंबावर पडणाऱ्या नकारात्मक परिणामांमुळे भलेही आईवडील, समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि डॉक्टर चिंतीत झाले असले तरी युवती मात्र खुश आहेत. खरंच खूप फायदे आहेत सिंगल राहण्याचे, विश्वास बसत नसेल तर हे वाचा :

  • करिअरची उंची गाठता येते

आपली रिलेशनशिपला कायम राखण्यासाठी खूप प्रयत्न, ऊर्जा आणि वेळ खर्ची घालणे जरुरी असते. तुम्ही सिंगल असाल तर हे सरळ आहे की तुम्हाला यापैकी काहीच करण्याची गरज नाही आणि तुम्ही तुमची संपूर्ण एनर्जी, अटेन्शन, क्षमता यांना आपल्या प्रोफेशन, करिअरसाठी वापरू शकता, ज्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. त्याचबरोबर तुम्ही लेट नाइट मिटिंग्स, बिझनेस डिनर आणि ऑफिशिअल टूरसाठीही सदैव तत्पर असता. आपली कंपनी, ऑफिस यांच्यासाठी पूर्ण समर्पित असता. त्यामुळे हे जाहीरच आहे की तुमच्यासाठी प्रमोशनचा मार्ग सोपा होतो.

  • जे हवे ते करा

तुम्हाला प्रत्येक क्षणी या गोष्टीचा विचार करावाच लागत नाही की तुमच्या पार्टनरला काय आवडते आणि काय नाही, तुम्ही तुम्हाला हवे ते सहज करू शकता. जीवनातला प्रत्येक क्षण तुम्ही भरभरून जगू शकता आणि तेही कोणत्याही अपराधभावनेशिवाय. जसे तुम्ही  कॉलेजगर्ल्सप्रमाणे तुमच्या गर्ल गँगला घरी बोलावून पैजामा पार्टी करू शकता, आपल्या मर्जीने ड्रेसअप होऊ शकता, तुमचे पॅरेंट्स, रिलेटिव्हज यांच्यासोबत राहू शकता. या माझ्या मर्जीवाल्या टॉनिकमुळे तुम्ही अधिक आनंदी, रिलॅक्स राहता आणि संतुष्ट व्यक्तिला इतरांच्या आयुष्यात आनंद आणू शकते.

  • फट, तरुण आणि सुंदर

तुम्ही स्वत:कडे लक्ष देऊ शकता. तुमची काळजी घेणारे दुसरे कोणी नसल्याने तुमचा डाएट, हेल्थ, बॉडी आणि ब्युटी केअर ही तुमचीच जबाबदारी बनते, आणि आज करिअर गर्लसाठी फिट, ग्लॅमरस आणि प्रेजेंटेबल असणे अतिशय आवश्यक आणि फायदेशीरही बनले आहे. त्यामुळे सिंगल गर्ल ही इतरांच्या तुलनेत ना केवळ तरुण दिसते तर तिची बॉडीही शेपमध्ये ठेवते.

  • पूर्णत: स्वतंत्र

कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसणे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला आत्मनिर्भर करणे जरुरी असते. तुम्हाला पॅम्पर करण्यासाठी, डेली रुटीनला स्मूथ बनवण्यासाठी कुणा पुरुषाचे कुशन नसल्याने तुमची शिकण्याची क्षमता वाढते. परिस्थितीचा सामना तुम्ही इतर महिलांपेक्षा उत्तमरीतीने करू शकता. तुमची हीच आत्मनिर्भरता तुमचा आत्मविश्वास वाढवते.

  • प्रत्येक आव्हान स्वीकारते

सिंगलहूड तुम्हाला मानसिकदृष्टया कणखर करते. उत्तरोत्तर तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आणि अचानक आलेल्या संकटाचा सामना कसा करायचा हे शिकत जाता. वेगवेगळया व्यक्तिमत्त्व, स्वभावाच्या व्यक्ती आणि कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटीच्या लोकांशी त्यांच्या इगोला धक्का न पोहोचवता कसे डील करायचे हे तुम्हाला चांगले समजते आणि तुम्हाला अलौकिक असा आनंद आणि समाधान मिळते.

  • ब्युटी स्लीप भरपूर

तुमच्याकडे भरपूर मी टाइम असतो, जो मिळण्यासाठी विवाहित महिला तरसतात. तुम्ही तुमचे डेली रुटीन, स्लीपिंग रुटीन हे तुमची बॉडी, वर्क आणि आवश्यकतेनुसार सेट करू शकता. त्याचबरोबर पार्टनरचे रुसवे फुगवे, मुले आणि सासरची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर नसल्याने तुमच्यासाठी प्रत्येक दिवशी प्रॉपर, स्ट्रेस फ्री ब्युटी स्लीप घेणे सहज शक्य असते. रात्रभर मिळालेली चांगली झोप ही ना केवळ तुमच्या सौंदर्य, फिजिकल मेंटल हेल्थ यासाठी आवश्यक असते तर यामुळे तुमचा मेंदूही सक्रिय राहतो.

  • स्वत:ची लाइफस्टाइल

तुम्ही कोणालाही उत्तरदायी नसता, त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ, ऊर्जा आणि रिसोर्सेस असतात, जेणेकरून तुम्ही एक हेल्दी रुटीन फॉलो करू शकाल. आपल्या लाइफस्टाइल, इटिंग हॅबिट्स आणि एक्सरसाइज शेड्युलमध्ये बदल करू शकता आणि बोअरडम टाळू शकता.

  • मनी रिलेटेड इश्यू कमी

आजच्या वर्किंग कपल्समध्ये माझा पैसा, तुझा पैसा म्हणजे पैश्यावरून उत्पन्न होणारे वाद बराच स्ट्रेस निर्माण करतात. खासकरून पत्नी आपल्या पैशांचे काय करते, किंवा तिने काय केले पाहिजे हे साधारणपणे पती ठरवताना दिसून येतो. पण सिंगल होण्याचा अर्थ हा आहे की तुम्हाला तुमचा पैसा कुठे, कशाप्रकारे खर्च करायचा आहे, कोणावर खर्च करायचा आहे किंवा किती बचत करायची आहे या सर्व गोष्टींसाठी कोणालाही उत्तर देण्याची गरज नसते. तुम्ही शॉपिंग करा, स्पा ला जा किंवा इन्व्हेस्ट करा तुमची मर्जी. हाच फायनान्शिअल इंडिपेडन्स आणि फायनान्शिअल सिक्युरिटी तुम्हाला मजबूत बनवते, तुमचा आत्मविश्वास वाढवते.

  • स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण होते

करिअरमध्ये सेट झाल्यानंतर तुम्ही वेळेचा आणि पैशांचा अभाव यामुळे राहून गेलेला एखादा छंद जोपासू शकता. जॉबवरून घरी आल्यावर उरलेल्या वेळेत थिएटर, स्क्रिप्ट रायटिंग, क्ले पेंटिंग किंवा संगीत यासाठी आपल्या पॅशनला नवीन दिशा देऊ शकता. आपली स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण करू शकता.

  • जेव्हा हवे तेव्हा हॉलिडेला जाऊ शकता

सिंगल होण्याचा आणखी एक मोठा फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या मर्जी, मूड आणि पसंतीने कधीही हॉलिडे प्लॅन करू शकता. असे डेस्टिनेशन निवडू शकता की जिथे जाणे हे तुमचे स्वप्न आहे. पार्टनरच्या मर्जीने कॉम्प्रोमाइज करणे, आपले मन मारणे, जे बहुतांश महिला करत असतात. हे तुम्हाला करण्याची गरज नाही. तुम्हाला वाटत असेल तर बर्फाच्छादित हिमशिखरे पालथी घाला किंवा समुद्र किनारी मऊशार वाळूत अनवाणी पायांनी मनसोक्त बागडा, तुम्ही ताज्या तवान्या होऊन सकारात्मक ऊर्जेने भरूनच घरी परताल यात शंकाच नाही.

स्मार्टफोनचे व्यसन आहे वाईट

* ललिता गोयल

स्मार्टफोन आपल्या सगळयांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच्यावर अवलंबून असतो, मग गोष्ट सकाळच्या अलार्मची असो, ऑनलाईन पेमेंटची, शॉपिंगची, बोअर झालं की संगीत ऐकणे किंवा चित्रपट बघणे, एखादा महत्वाचा मेल करायचा असो किंवा आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी कनेक्ट राहायचे असो. आपणा सगळयांचा पूर्ण संसार या लहानशा वस्तूत  सामावलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की या लहानशा वस्तूशी आपली ही जवळीक आपल्या दैनंदिन वर्तणुकीत कित्येक समस्यासुद्धा निर्माण करत आहे? जर तुम्ही स्मार्टफोनमधून महत्वाची माहिती काढू शकला नाहीत तर तुम्ही त्रासून जाता. जर तुमच्यापर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचत नसेल, तर तुम्ही बेचैन होऊ लागता. जर तुमच्याकडे प्रीपेड कनेक्शन असेल, तर स्मार्टफोनमध्ये बॅलेंस कमी होताच तुम्ही घाबरून जाता. कित्येक व्यक्तींमध्ये इंटरनेटचं स्पीडही टेन्शन वाढवतो.

फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:चा स्टेटटस अपलोड करू न कल्याने वा इतरांचा स्टेटस वाचू न शकल्यानेही अस्वस्थता जाणवते.

याव्यतिरिक्त काही लोकांना नेहमी आपला स्मार्टफोन हरवणार असल्याची भीती सतावत राहते. याचा अर्थ जर एक मिनिटही फोन त्यांच्या नजरेपासून दूर झाला तर ते बेचैन होऊ लागतात. आपला स्मार्टफोन हरवल्याच्या भीतिने त्यांच्या हृदयाची धडधड वाढते.

नोमोफोबिया नावाचा आजार

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अलीकडेच लावलेल्या शोधानुसार स्मार्टफोन लोकांमध्ये नोमोफोबिया नावाचा आजार निर्माण करत आहे. या रोगाच्या व्यक्तीला सतत आपला मोबाईल हरवण्याची भीती वाटत राहते आणि कित्येकदा तर हा फोबिया माणसांवर एवढा वरचढ होतो की टॉयलेटमध्येसुद्धा ते आपला मोबाईल बरोबर घेऊन जातात आणि दिवसातून कमीतकमी ३० पेक्षा जास्त वेळा आपला फोन चेक करतात. प्रत्यक्षात त्यांना भीती वाटत असते की फोन घरी विसरलो तर त्यांचा एखादा महत्वाचा मेसेज किंवा कॉल मिस होईल आणि त्यांची हीच भीती त्यांच्या वर्तणूक आणि व्यक्तिमत्वातील बदलाचे कारण बनते. या भीतिने त्रस्त लोकांना वाटत राहते की फोनविना आपला सगळया जगाशी काहीच संपर्क राहणार नाही.

फोनविना जीवन अपूर्ण

लंडनमध्ये झालेल्या एका दुसऱ्या संशोधनात म्हटलं आहे की नोमोफोबिया आजच्या काळातली एक गंभीर समस्या आहे आणि यांच्या गांभीर्याला समजून घेण्यासाठी जवळपास १००० लोकांवर संशोधन झालं, ज्यात ६६ टक्के लोक म्हणाले की त्यांना आपला मोबाईल हरवण्याची भीती त्रास देत राहते. संशोधनात असंही दिसून आले की १८ ते २४ वर्षांमधील तरुणांमध्ये मोबाईलप्रति सर्वाधिक जवळीक आहे. या वयातील साधारणत: ७७ टक्के लोक मोबाईलविना एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. अशा लोकांना वाटतं की मोबाईलविना आपलं जीवन अपूर्ण आहे. ते याच्याशिवाय राहू शकणार नाहीत. संशोधनात असेही दिसून आले की नोमोफोबिया झालेली व्यक्ती दिवसातून कमीतकमी ३७ वेळा आपला मोबाईल चेक करते.

उपाय काय

मानलं की स्मार्टफोनचे टेक्निक तुम्हाला स्मार्ट आणि अपडेट ठेवते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायची गरज आहे की ही टेक्निक तुमची सुविधा बनण्याऐवजी डोकेदुखीचे कारण न बनो. मोबाईल फोनच्या या व्यसनातून बाहेर निघायला आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय ठरवावं. स्वत:ला आपल्या आवडीच्या छंदात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने तुम्ही फालतू कॉल्स आणि मेसेजेसपासून दूर राहाल. आपल्या सगळया सोशल मिडिया अॅपचे नोटिफिकेशन बंद ठेवा. सोबतच फोनमध्ये फालतू अॅप्स ठेवू नका. यामुळे तुम्ही फोनवर अवलंबून राहणार नाही. काल्पनिक जगातले संबंध निभावण्याऐवजी खऱ्या जीवनातल्या मित्रांबरोबर वेळ घालावा. शक्य तितके स्वत:ला फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

कॅज्युअल ड्रेसला असं बनवा स्टायलिश

* गरिमा

एक फॅशन दिवा म्हणून ऑफिस वेअरमध्ये तुम्हाला अनेक रेस्ट्रिक्शन्स फॉलो करावी लागतात. अशात कॅज्युअल वेअर हा चेंजसाठी एक उत्तम पर्याय असतो. प्रिंट, फॅब्रिक, कलर्स आणि एक्सेसरीज घालून वाइल्ड आणि बोल्ड लुक मिळवा, ज्यामुळे तुम्ही फ्रेंड्स मीट, पार्टी किंवा मूव्ही नाइटमध्ये तुमची स्टाइल एकदम हटके दिसेल.

फॅशन

ब्रीझ सफेद ड्रेस, स्ट्रॅपच्या सँडल्स, सिल्की मिडी स्कर्ट, स्मोक्ड टॉप, चेक्स पँट फॅशनमध्ये आहे. पोल्का डॉट्स आणि फेदर पुन्हा एकदा कमबॅक करत आहेत. लाइलॅक या मोसमासाठी नवा मिलेनियल पिंक आहे.

पफ शोल्डर

विंटेज पफ शोल्डर या मोसमात पुन्हा एकदा वापरात आले आहेत. टॉप ड्रेसेस आणि ब्लाउजमध्ये पफ स्लीव्ह्ज ट्राय करा. पफ स्लीव्हवाला ब्लॅक पेन्सिल ड्रेस घाला. पार्टीत सर्वजण तुमच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहतील. लॉन्ग शर्ट ज्याचे शोल्डर्स आणि स्लीव्ह्ज खूप मोठे असतात, ते अँकल लेन्थ बुटांसोबत ट्राय करून पहा.

अँकल लेन्थ बूट

या मोसमात एक जोडी अँकल लेन्थ बूट जरूर खरेदी करा आणि ते मोजे न घालता मिडी स्कर्टसोबत घाला. यामुळे तुम्हाला परफेक्ट ट्रेडिशनल लुक मिळेल. हे बोहो मॅक्सी ड्रेस किंवा टोटो डेनिससोबत घालून तुम्ही स्पोर्टी आणि फॅशनेबल लुक मिळवू शकता.

व्हाइट टँक

उन्हाळ्याच्या मोसमात तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक चांगल्या फिटिंगचा टँक ड्रेस जरूर ठेवा. हा प्लाजो किंवा ब्रॉड बॉटम पँट, जीन्स, सेलर पँट किंवा जोधपुरी पँटसोबत घाला. हा एखाद्या प्रिंटेड स्कार्फसोबत कॅरी करून तुम्हाला मिळेल एक परफेक्ट लेडी लुक.

रंगरीतीचे सिद्धार्थ बिंद्रा म्हणतात की आजची युवा पिढी ही आपल्या पेहरावांसोबत नवनवीन प्रयोग करायला किंवा नवीन लुक मिळवायला घाबरत नाही. नवीन लुक मिळवण्यासोबतच ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कायम नाविन्य आणण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक बदलत्या मोसमासोबत नवीन फॅशन प्रचलित होत असतात, ज्या तुम्हाला नवीन लुक मिळवून देतात.

इंडी टॉपची किमया : इंडी टॉप तुम्हाला परफेक्ट चीक लुक देतात. हे अनेक रंग आणि डिझाइन्समध्ये उपलब्ध असतात. हे अतिशय आरामदायक असतात. हे तुम्ही कोणत्याही डेनिम, डार्क कलरची पँट किंवा लुज बेल बॉटमसोबत मॅच करू शकता.

स्लिम पँट्स : स्लिम पँट्स कधीही फॅशनमधून आउट होत नाहीत आणि कोणत्याही प्रकारच्या टॉपबरोबर मॅच होतात. तुम्ही हे घालून कोणतीही अॅक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या शर्टसोबत ऑफिसलाही घालून जाऊ शकता. कुर्त्यासोबत तुम्ही याला कॅज्युअल लुकही देऊ शकता. तुमच्या वॉर्डरोबकरता हा एक उत्तम पर्याय आहे. सुंदर अशा मॅचिंग स्कार्फसोबत यामुळे तुम्ही अगदी स्टायलिश दिवा दिसाल.

वेजेस : वेज हीलच्या सँडल्स तुमची हाइट वाढवून तुम्हाला स्टायलिश लुक देण्यासोबतच आरामदायकही असतात. तुम्ही हे घालून अगदी आरामात चालू शकता. पेन्सिल किंवा किटन हीलपेक्षा यात तुम्हाला अधिक कंफर्टेबल वाटू शकते.

श्रग : तुम्ही बेसिक टीशर्ट किंवा टँक टॉप नाहीतर लिटिल ब्लॅक ड्रेसवर श्रग घालू शकता. श्रग तुमच्या नेहमीच्या बोअरिंग ड्रेसला आकर्षक बनवतो किंवा असेही म्हणता येईल की जणू स्टाइलचा तडकाच लावतो.

कॅज्युअल शूज : कॅज्युअल शूज तुमच्या पायांना कव्हर करतात आणि ते आरामदायीही असतात. आपल्या कॅज्युअल टॉप, जीन्स, बेसिक टीशर्ट किंवा शॉर्ट्सबरोबर यांना मॅच करा आणि आकर्षक, स्टायलिश लुक मिळवा.

फ्यूजन पँट्स : फॅशनच्या दुनियेतील सर्वात उत्तम शोध म्हणजे फ्यूजन पँट्स. ते सर्वप्रकारच्या परिधानांसोबत शोभून दिसतात. जसे इंडी टॉप किंवा टँक टॉपसोबत तुम्ही हे शॉर्ट कुर्ती आणि सिल्व्हर ज्वेलरीबरोबर मॅच करून स्वत:ला स्टायलिश लुक देऊ शकता.

लिबर्टीचे अनुपम बन्सल यांच्या मते तुमच्याकडे स्टायलिश, ट्रेंडी आणि लेटेस्ट फुटवेअर रेंज नेहमी असलीच पाहिजे.

फ्लॅट्स : फ्लॅट्स हे बेसिक आणि आरामदायी कॅज्युअल फुटवेअर आहेत. विविध आकर्षक रंगात उपलब्ध असलेले हे फुटवेअर स्टायलिश लुक देतात. आपल्या कोणत्याही आउटफिटसोबत हे मॅच करा आणि बीचवर जाऊन सीजनचा आनंद घ्या किंवा मित्रपरिवारासोबत लंचची मजा घ्या. तुमच्या कॅज्युअल आउटफिटसाठी हे एकदम अनुकूल असतात.

बॅलेरिना : आराम आणि चीक स्टाइलचा सुंदर मिलाफ असलेले बॅलेरिना फुटवेअर हे एखाद्या फॅन्सी संध्येसाठी मस्त पर्याय आहे. कॉपर शाइनी शेड्समध्ये उपलब्ध हे फुटवेअर तुमची संध्याकाळ एकदम स्टायलिश बनवतील. हे तुम्ही डेनिम आणि चीक बॅगसोबत कॅरी करू शकता.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात घाला ही पादत्राणे

* पूजा भारद्वाज

पादत्राणे ऋतूनुसार बदलायला हवीत. हीच गोष्ट लक्षात घेत आम्ही तुम्हाला मान्सूनमधील पादत्राणांच्या फॅशनबाबत सांगत आहोत.

हो जर हिवाळा आणि उन्हाळ्यात फॅशनमध्ये बदल घडतो तर पावसाळयात का नाही? मान्सून काळात बाजारात फॅशनचे हजारो पर्याय मिळतील, जे तुमच्या फॅशनची शोभा वाढवतील.

फुटवेअर डिझायनर रेखा कपूर यांचे असे मत आहे की बाजार रंगीत फ्लिप फ्लॉप, फ्लोटर्स, रेन बूट्स आणि प्लास्टिक चप्पल्सने खचाखच भरला आहे. हे सर्व लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या सर्व रंगात उपलब्ध आहेत. याशिवाय फ्लॉवर  प्रिंट्स  व इतर डिझाइन्समध्येसुद्धा हे मिळतात, जे तुम्हाला एखादा फंकी आणि हॅपनिंग लुक देतील आणि मान्सून काळात तुम्ही वेगळेच दिसाल.

असे निवडा

पावसाळयात आपल्या पादत्राणांची निवड विचार करून करायला हवी. या दिवसात बूट अजिबात घालू नये, कारण पावसाळयात बूट ओले झाल्यास फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूत प्लास्टिकच्या चपला घालणे पायांसाठी अधिक सुरक्षित असते.

दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये चपलांचे दुकान चालवणारा महेंद्र सांगतो की अलीकडे म्युल्सनासुद्धा खूप मागणी आहे, जे एक प्रकारचे बॅकलेस शूज असतात. हा फ्लिप फ्लॉपचा स्टायलिश पर्याय आहे. हे घालणे आणि काढणे अत्यंत सोपे आहे. याची किंमत १५० ते २०० च्या आसपास असते, जी तरुणांच्या खिशाला महाग वाटत नाही.

पादत्राणांची निगा राखणेसुद्धा आहे गरजेचे

तज्ज्ञांचे मत आहे की मान्सून काळात प्लास्टिक चपलांचा सेल जास्त असतो. आणि यावेळी गम बूट्सचे खास कलेक्शन बाजारात उपलब्ध आहे. पावसाळयात पादत्राणांची खास निगा ठेवणे आवश्यक असते.

प्लास्टिक सँडल्स : प्लास्टिक जोडे अथवा चपला खराब झाल्यास सहज ब्रशने स्वच्छ करता येतात.

रबराचे बूट : रबराचे जोडे वा चपला घालणार असाल तर वापरल्यानंतर लगेच ते पंख्याखाली वाळवा कारण ओल्या रबरातून लगेच दुर्गंधी येण्यास सुरूवात होते आणि पादत्राणे लवकर खराब होतात.

स्पोर्ट्स शूज : जर तुम्ही स्पोर्ट्स शूज घातले असतील, तर लगेच लेस काढून हे शूज उलट बाजूने ठेवा. जर तुम्ही ताबडतोब वाळायला ठेवाल तर शूज खराब होणार नाहीत.

कपाटात ठेवू नका : जोवर तुमचे शूज चांगले खणखणीत वाळत नाहीत तोवर ते कपाटात बंद करून ठेवू नका. नाहीतर ते खराब होतील आणि त्यावर फंगस चढण्याची शक्यता असते.

उन्हात ठेवा : जोडे खराब होऊ नये म्हणून त्यांना उन्हात ठेवा. यामुळे आत वाढत असलेले बॅक्टेरिया नाहीसे होतील.

लेदर टाळा : मान्सून काळात लेदरचे शूज आणि चपला घालू नका. जर वापरणे अतिशय आवश्यक असेल तर त्यांना आधी वॅक्सचे पॉलिश करा. वॅक्स लावल्याने शूजवर सुरक्षेचा पातळ थर निर्माण होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें