ही झाडं घरात लावा, आजारांना दूर पळवा

* गृहशोभिका टीम

निसर्गामध्ये अशा नानाविध गोष्टी आहेत, ज्याद्वारे आपल्या शारीरीक व्याधींवर उपचार होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला काही अशा झाडांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा रोज वापर केला तर तुम्ही कितीतरी आजारांपासून दूर राहू शकता. चांगली गोष्ट तर ही आहे की ही झाडं तुम्ही आपल्या घराच्या आतसुद्धा लावू शकता.

पुदिना

पुदिन्याची पानं पोटाच्या तक्रारी पळवून लावतात. जर याच्या पानांना आहाराचा भाग बनवलं, तर पचन शक्ती मजबूत होते. त्याबरोबरच पोटातील उष्णतासुद्धा कमी होते.

जराकुश

जराकुश हे हिरव्या आणि पिवळया रंगाचे गवत असते. हे मुळात उष्ण आहे, जराकुश मुतखडयाचा आजार बरा करते. जराकुश चहात टाकून प्यायल्याने ताप उतरतो. याशिवाय जराकुश चावल्याने दात मजबूत होतात.

कडिपत्ता

कडिपत्त्यात भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिड असते. लोह शरीरासाठी एक प्रमुख पोषक तत्व आहे, फॉलिक अॅसिड यांच्या अवशोषणात सहाय्य्क म्हणून काम करतं. यामुळेच हे अॅनिमियापासून आपले रक्षण करते.

कोथिंबीर

कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ असते, जे मधुमेहाला नियंत्रणात ठेवते. कोथिंबिरीच्या दांडया खाल्याने थायरॉईडवरही नियंत्रण मिळवता येते.

तुळस

ज्या घराच्या अंगणात किंवा ज्या भागात तुळशीचे रोप असेल, तिथे जीवजंतू येत नाही. याशिवाय तुळशीच्या सुगंधाने वातावरण स्वच्छ राहते. हीच्या सुगंधात असलेले एस्ट्रोन आपले मानसिक संतुलन नीट ठेवते.

ढग आणि झऱ्यांचे शहर चेरापुंजी

* प्रतिनिधी

चेरापुंजी भारताचे उत्तर-पूर्व राज्य मेघालयातील एक छोटेसे शहर आहे, जे शिलाँगपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. जगात हे ठिकाण पावसासाठी ओळखले जाते. येथील स्थानिक लोक याला ‘सोहरा’ या नावाने ओळखतात. हे शहर बांगलादेशाच्या सीमेपासून खूप जवळ आहे, त्यामुळे येथून बांगलादेशाचे दृश्यही पाहता येऊ शकते. पावसाळयाच्या दिवसांत पर्यटक दूरवरून येथे पर्यटनासाठी येतात. तुम्ही म्हणाल की, पावसाव्यतिरिक्त इथे असे काय आहे की, पर्यटक इथे फिरायला येतात. खरे तर चेरापुंजीमध्ये पावसाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य, झरे आणि गुहा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

शिलाँगपासून चेरापुंजीकडे जाताना, मार्गात थोडा चढाव, दोन्ही बाजूला डोंगर, दोन डोंगरांच्या मधून घाटरस्ते, अननसाची झाडे, सुंदर पाने असलेली इतर झाडे आणि अनेक प्रकारच्या वनस्पती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात. चेरापुंजीपासून थोडे पुढे जाताच, ६ किलोमीटर अंतरावर मास्माई गुहा आहे. ही गुहा पर्यटक कोणत्याही तयारी किंवा गाइडशिवाय सहजपणे फिरू शकतात. १५० मीटर लांब असलेली ही गुहा बाहेरून पाहताना थोडीशी भीती जरूर वाटते. मात्र, तुम्ही याच्या आत प्रवेश करता, तेव्हा तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे जवळून दर्शन होते. गुहेच्या आतील भागांत अनेक प्रकारचे जीवजंतू आणि झाडांचे वास्तव्य आहे. गुहेत अनेक वळणे व घुमावदार मार्ग आहेत, ज्यामुळे रोमांचक अनुभव घेता येतो. गुहेमध्ये प्रवेश करताच, आपणास जराही घाण दिसणार नाही. गुहेमध्ये लाइटची योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण आपल्यासोबत टॉर्च जरूर घेऊन जा. जेणेकरून गुहेतील सौंदर्य व्यवस्थित पाहता येईल.

सतत पाणी टपकत असल्यामुळे येथील रस्ता बुळबुळीत झालेला आहे, त्यामुळे गुहेमध्ये चालताना सांभाळून चाला. गुहेत ४-५ रस्ते असेही आहेत, जे उंचावर आहेत. तिथे आपल्याला चढूनच जावे लागेल. इथे उंच असलेल्या लोकांना थोडा त्रास होऊ शकतो. त्यांना गुहेमध्ये काही ठिकाणी वाकून जावे लागेल. गुहेमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला तिकीट काउंटरवरून तिकीट घ्यावे लागेल. इथे १० वर्षांपर्यंतच्या मुलांना प्रवेश नि:शुल्क आहे, तर १० वर्षांवरील पर्यटकांना २० रुपये तिकीट घेणे अनिवार्य आहे. जर कॅमेरा आत घेऊन जायचा असेल, तर तुम्हाला २५ रुपयांचे वेगळे तिकीट घ्यावे लागेल. ही गुहा सकाळी ९ वाजता पर्यटकांसाठी खुली होते. ज्या लोकांना पाय, गुडघे आणि पाठीचे दुखणे आहे, त्यांनी या ठिकाणी जाणे टाळावे. कारण त्यांना चढण्या-उतरण्यात त्रास होऊ शकतो. इथे जाताना आरामदायक कपडे वापरा. उदा. ट्रॅक पँट किंवा लोअर वगैरे. त्याचप्रमाणे, इथे कधीही चप्पल किंवा हाय हिल घालून जाऊ नका. इथे स्पोर्ट्स शूज वापरणेच योग्य ठरेल.

गुहेबाहेर अनेक छोटी-छोटी हॉटेल्स आणि चहा-कॉफीची दुकाने आहेत. तिथे आपणास खाण्या-पिण्याचे अनेक पदार्थ मिळू शकतील. आपल्याकडे वेळ असेल, तर चेरापुंजीपासून केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर नोहकालिकाई झरा आहे, तो अवश्य पाहा. हा भारतातील सर्वांत उंच झरा मानला जातो. हा ११०० फूट उंचावरून कोसळतो. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल, तर समजून जा, हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे. जसजसे तुम्ही या झऱ्याजवळ जाता, तसतसा उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज आपल्या कानात घुमू लागतो आणि पाणी पाहून पाण्यात एक डुबकी घ्यायची इच्छा होते. झऱ्याच्या बरोबर समोरून व्ह्यू पॉइंटवरून झऱ्याचे सौंदर्य न्याहाळत राहावे, इतके सुंदर दिसते. तुम्हाला हा झरा आणखी जवळून पाहायचा असेल, तर दगड आणि डोंगरांच्या सहाय्याने चढून आजूबाजूचे अनेक छोटे-मोठे झरे जवळून पाहू शकता, भिजण्याचा आनंद लुटू शकता आणि खडकांवर चढून फोटोही काढू शकता, परंतु लक्षात ठेवा, इथे थोडे बुळबुळीत असते. त्यामुळे सेल्फी घेण्याच्या नादात आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका. पावसाळयाच्या दिवसांत इथे जाणे थोडे जोखमीचे असते. कारण पावसात ढगांमुळे झरा स्पष्ट दिसत नाही. तुम्ही जर डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान गेलात, तर कदाचित तुम्हाला झऱ्यात पाणी दिसणार नाही. म्हणूनच इथे पावसाळयानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात जा.

त्या दिवसांत येथील सौंदर्य पाहण्यासारखे असते. धुक्यातून वाहणाऱ्या ढगांची ओलसर हवा तुम्हाला आकाशात विहार करत असल्याची अनुभूती देईल. झऱ्यातून वाहणारे पाणी आणि आजूबाजूचे दृश्य आपणास पूर्णपणे रिलॅक्स करते. इथे पोहोचणे खूप सोपे आहे. शिलाँग व चेरापुंजीमधील रस्ता परिवहनाच्या दृष्टीने खूप उत्तम आहे. इथे खासगी वाहनांबरोबरच सरकारी परिवहनाची साधनेही नेहमी उपलब्ध असतात. इथे झऱ्याजवळच बांबूपासून बनलेली खेळणी विकली जातात, ती खूप वेगळी असतात. पर्यटक ती खरेदी केल्याशिवाय पुढे जात नाहीत. इथे एक बाजारही आहे. तिथे स्थानिक स्मृतिचिन्ह असलेल्या वस्तू मिळतात. इथे फिरायला गेलात, तर दालचिनी अवश्य खरेदी करा. तुम्ही दालचिनी नेहमी छोटया-छोटया तुकडयांत पाहिली असेल, परंतु इथे दालचिनी काठीच्या रूपात मिळते.

पदार्थांमध्ये असा जागवा स्वाद

* ज्योती मोघे

आपण काही खास प्रसंगी, सण-उत्सवांवेळी गोडधोड बनवतोच. पण कधी कधी किटी पार्टी किंवा न्यू इअर पार्टी किंवा मग काही खास पाहुणे येणार असतील तर अशा वेळीही गोडधोड बनविले जाते. पण ते बनवण्यापूर्वी काही गोष्टी अवश्य लक्षात ठेवा, ज्यामुळे पदार्थांचा स्वाद तर खास होईलच, शिवाय सर्वच म्हणतील, व्वा, खूपच छान.

जेव्हा गोड बनवाल

* तांदळाची खीर बनवत असाल किंवा साबुदाण्याची, सर्वात आधी ते दुधात चांगल्याप्रकारे शिजवा. नंतर साखर घाला. अन्यथा तांदूळ किंवा साबुदाणा शिजणार नाही.

* लापशी बनवणार असाल तर सर्वप्रथम कढईत थोडे तूप घालून लापशी म्हणजे जाड रवा मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात गरम पाणी किंवा गरम दूध घालून चांगल्याप्रकारे एकत्र करा. झाकण ठेवून वाफ येऊ द्या म्हणजे लापशी चांगली फुलेल. शेवटी साखर घालून मिश्रण नीट एकजीव करा. सतत हलवत राहा. गरमागरम आणि स्वादिष्ट लापशी सर्व्ह करा.

* फळांचा हलवा बनवणार असाल तेव्हा चवीनुसार साखर घाला. बहुतेक फळे गोड असतात. तुपाच्या प्रमाणाकडेही लक्ष ठेवा. जर गाजर, दुधी भोपळयाचा हलवा बनवत असाल तर दूध किंवा कंडेस्ड मिल्क घालताना साखरेचे प्रमाण कमीच ठेवा, कारण कंडस्ड मिल्क गोड असते.

* पाक ज्या पदार्थांसाठी तयार करणार आहात, त्या हिशोबानेच तो पातळ किंवा जाड करा. जसे की, लाडूसाठी एकतारी तर गुलाबजामून, जिलेबीसाठी दोन तारी पाक बनवा.

* गुलाबजामून बनवताना माव्याचे प्रमाण पाहूनच मैदा घ्या. त्यानंतर मैदा मिसळा. अन्यथा चव बिघडण्याची भीती असते.

* करंज्या बनवताना त्यात मिसळला जाणारा मावा अर्थात खोबऱ्याचे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्या. त्यामुळे अधिक दिवस ठेवले तरी त्यात दुर्गंधी येणार नाही. करंज्यांची पारी व्यवस्थित बंद करा, म्हणजे ती फाटणार नाही. करंज्या सुकू नयेत म्हणून त्यावर ओला कपडा घाला.

* गोड पदार्थ बनवताना तूप वापरा. यामुळे त्याची क्वॉलिटी टिकून राहाते.

* कस्टर्ड बनविताना थोडेसे गरम दूध वेगळया वाटीत काढून त्यात कस्टर्ड पावडर घाला. अन्यथा गुठळया होतील. उकळत्या दुधात कधीच कस्टर्ड पावडर घालू नका.

* पाकाचा चिवटपणा काढण्यासाठी त्यात जरासे दूध घाला. यामुळे चिकटून राहिलेले वर येईल. गुळाच्या पाकासाठी गुळ कमी लागतो आणि साखरेच्या पाकासाठी साखर जास्त लागते.

* गोड पदार्थ बनवण्यासाठी वेलचीची पूड करून ठेवा. कडक झाल्याने वेलचीची पूड होत नसेल तर ती तव्यावर गरम करा किंवा त्यात साखर घालून मिक्सरवर बारीक करा.

* केसर दुधात घालून ठेवा. गुळ बारीक करून ठेवा. साखर साफ करून ठेवा.

* पिठी साखर नसेल तर साखर बारीक करून वापरता येईल.

चटपटीत पदार्थ बनविताना

* सर्वप्रथम मसाल्याच्या डब्यात लाल मिरची पावडर, धने पावडर, हिंग, हळदीची पावडर वाटून, गरम मसाला, राई, जिरे, मेथी दाणा, कलोंजी, बडीशेप इत्यादी सर्व नीट भरून ठेवा. यामुळे पदार्थात या वस्तू प्रमाणानुसार घालणे सोपे होईल. पाणी आणि तेलाचे प्रमाण पदार्थानुसार ठेवा. अन्यथा पदार्थाची चव व पौष्टिकता नष्ट होऊ शकते.

* लापशीचे पीठ नरम मळा. लापशी पाणी शोषून घेते. मैदा कडक मळा. तो पाणी कमी शोषून घेतो आणि नरम पडतो. मैदा सैलही होतो.

* पदार्थ कुरकुरीत कराये असतील तर मोहन करण्यासाठी थोडे गरम तेल वापरा. यामुळे पदार्थ कुरकुरीत आणि चविष्टही होईल.

* गोड, तिखट पदार्थ बनवताना चमचे वेगवेगळे ठेवा, म्हणजे ते एकत्र होणार नाहीत.

* भाजी पातळ झाल्यास त्यात किसलेला नारळ किंवा शेंगदाण्याचे कुट घाला. मीठ जास्त झाल्यास त्यात बटाटा कापून घाला.

* पुलाव बनवताना तांदूळ कसा आहे ते पाहूनच पाण्याचे प्रमाण ठरवा. नाहीतर तो चिकटू किंवा करपू शकतो.

* कोथिंबीर नीट स्वच्छ, बारीक करून उपमा, पोहे, पुलावात घातली तर पदार्थाची चव वाढते.

* तिळाचे पदार्थ बनवताना तीळ नीट निवडून घ्या. त्यात बारीक दगड असतात, जे पदार्थाची चव बिघडवतात.

* बेसनची पापडी बनविताना त्यात थोडा मैदा घाला आणि अरबी नीट उकळून, सोलून, स्मॅश करूनच मळा. त्यामुळे पापडी फाटणार नाही.

* मठरी बनविताना त्यात थोडा सोडा घाला. त्यामुळे ती कुरकुरीत होईल. शेव बनवताना ओवा वाटून घाला. यामुळे चव वाढेल.

* पदार्थ तळताना तेल वर उडते. काळजी घ्या.

गार्निश कसे करावे

पदार्थ सर्व्ह करताना अशाप्रकारे सजवा की पाहूनच खायची इच्छा होईल. गोड पदार्थांचे गार्निशिंग नारळ किसून, सुकामेव्याचे काप भुरभूरवून करा. चटपटीत पदार्थांचे गार्निशिंग कडिपत्ता, हिरवी चटणी, गोड चटणी किंवा दह्याने करता येईल.

कुकिंग करताना छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्या. ज्यामुळे तुमच्या पदार्थांची चव सर्वांच्या कायम लक्षात राहील.

बहुसंख्य महिला कुकरी शो पाहतात किंवा वर्तमानपत्रात पदार्थ बनवण्याची कृती वाचतात. कधी कधी कुकिंगचे काही शब्द समजून घेणे अडचणीचे ठरते. कुकरीची भाषा समजून घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण माहिती देत आहोत.

डीप फ्राय करणे : पदार्थ बनविताना तो तेल किंवा तुपात तळणे, जसे कचोरी, समोसे इत्यादी.

ब्लांच करणे : भाजी उकळून लगेच थंड पाण्यात टाकणे म्हणजे ब्लांच करणे.

चर्न करणे : मिक्सरमध्ये दह्याची लस्सी किंवा ज्यूस बनवणे म्हणजे चर्न करणे.

प्युरी बनवणे : टॉमेटो, कांदा किंवा एखाद्या फळाचे तुकडे करून मिक्सरला लावून पेस्ट बनवणे म्हणजे प्युरी तयार करणे.

मॅरिनेट करणे : एखाद्या खाद्यपदार्थाला एखादी गोष्ट लावून ठेवणे जसे, कारल्याला मीठ लावून ठेवणे, पनीर टिक्का बनवताना त्याला दह्याचे मिश्रण लावून ठेवणे किंवा मुळयाला मीठ लावून ठेवणे म्हणजे मॅरिनेट करणे.

कोटिंग करणे : एखादा खाद्यपदार्थ तयार झाल्यानंतर तो पाकात बुडवणे म्हणजे कोटिंग करणे.

बीट करणे : एखादा खाद्यपदार्थ फेटणे किंवा एका मोठया चमच्याच्या मदतीने दहीवडयाच्या डाळीचे मिश्रण फेटणे म्हणजे बीट करणे. यामुळे पदार्थ स्पंजी आणि चवदार होतो.

बॅटर : एखाद्या पदार्थासाठी तयार केलेले ओले पीठ. जसे इडलीचे पीठ, भजीचे पीठ, दहीवडयाचे पीठ इत्यादी.

चॉप करणे : भाजीचे छोटे छोटे तुकडे करणे जसे बटाटा, कांदा, वांगी इत्यादी.

मुलांसाठी कशी बनवाल गुंतवणूक योजना

* रायसा काजी

ज्या क्षणाला एखादी स्त्री आई बनते, तेव्हा त्याच क्षणापासून तिचे मूल तिच्या संसारातील मुख्य घटक बनते. रोज आपल्या मुलाच्या लहानसहान गरजांपासून ते त्याच्या सुरक्षित भवितव्यापर्यंत, ती त्याला सगळे उत्तम देऊ इच्छिते. तसेही आता मुलांना उत्तम शिक्षण आणि उत्तम भवितव्य देण्याची जबाबदारी केवळ वडिलांची राहिली नाही, आईसुद्धा यात आपले संपूर्ण सहकार्य देऊ लागली आहे.

या संदर्भात अनिता सहगल नामक एका महिलेचे उदाहरण घेऊ या. तिचे वय ३५ वर्ष आहे आणि ती आपल्या पती आणि २ मुलांसोबत पुण्यात राहते. तिचा मोठा मुलगा १२ व लहान ६ वर्षांचा आहे. सध्या एका मुलाचे पालनपोषण करण्यात होणाऱ्या खर्चाची यादी भयभीत करते, मग अशावेळी अनितालासुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाची योजना आत्तापासून तयार करण्याची गरज आहे.

भारतात शिक्षणावरील खर्च अतिशय वेगाने वाढत चालला आहे. उच्च शिक्षणाच्या खर्चाचा महागाई दर खूप जास्त आहे. हा दर आर्थिक वर्ष २०१२ पासून २०१८ दरम्यान सरासरी ६.४२ असा होता, पण आता वार्षिक १० टक्के आहे. आपण पुढील २० वर्षात ७ टक्क्यांच्या अपरिवर्तित दराबाबतसुद्धा विचार केला तर ४ वर्षांचा बी. टेक. अभियांत्रिकी पाठयक्रम ज्याचा सध्याचा खर्च साधारण ८ लाख आहे, तोही ३० लाखात बदलू शकतो. अशाचप्रकारे सध्या एमबीए कोर्सवर एकूण जवळपास १२ लाख खर्च होतो, पण भविष्यातील २० वर्षात हा खर्च अंदाजे ४६ लाख होईल. हे लक्षात घेता अनितासारख्या प्रत्येक महिलेने लवकरात लवकर आपल्या मुलाच्या शिक्षणाची एखादी योजना बनवणे अनिवार्य आहे.

गुंतवणुकीची योजना बनवा

सर्वात आवश्यक हे आहे की अनिताने आपले लक्ष्य लिहून काढावे, जेणेकरून या गोष्टीची जाणीव होईल की केव्हा, कोणत्या कारणांसाठी आणि किती खर्च करावा लागेल. उदाहरणार्थ प्री प्रायमरी एज्युकेशनच्या खर्चासाठी उच्च शिक्षणाच्या तुलनेत कमी गुंतवणूकीची गरज आहे. अशाच प्रकारे पदवीच्या तुलनेत पदव्यूत्तर अध्ययनासाठी जास्त पैसे लागतील. केवळ ट्युशन फीजसुद्धा लक्षात ठेवण्याऐवजी एका आईने होस्टेल फी, स्टेशनरी व प्रिंटिंग वगैरे यासंबंधित खर्चाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे. तिला हेसुद्धा ठरवावे लागेल की मुलाचे शिक्षण भारतात होईल की परदेशात.

या सर्व बाबी चार्टमध्ये लिहिल्याने आवश्यक रकमेचा अंदाज घेऊन आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास मदत होईल. तिला बजेटची एक अशी पायाभूत योजना बनवायची गरज आहे जी, वायफळ खर्च कमी करणे आणि अतिरिक्त पैसे वाचवण्यास सहाय्यक ठरेल. हे जास्तीचे पैसे मुलाच्या ध्येयासाठी गुंतवले जाऊ शकतात.

मुलाचा वाढदिवस आणि उत्सवांमध्ये नातेवाईकांकडून  भेटवस्तूरूपात जे पैसे मिळतात, त्याची एकरकमी  गुंतवणूक करायला हवी. जेव्हा मुलाला पैसे मिळतील, त्याचा उपयोग व्यवस्थित विचार करून गुंतवणुकीला प्राधान्य देत करा.

गुंतवणूक करण्याचा प्रभावी मार्ग

मुलाशी संबंधित ध्येयासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ८.५ टक्के व्याज दराने (आर्थिक वर्ष २०१९ची तिसरी तिमाही) देणारी सुकन्या समृद्धी योजना अथवा एकाच वेळी ९-१० टक्के परतावा देणारे युनिट लिक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (यूलिप) आदर्श गुंतवणूक ठरू शकतात.

तसे पाहता एक डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा सगळयात प्रभावी मार्ग आहे. एका ठराविक वेळेत हा लहान बचत योजनांच्या तुलनेत जास्त मोठी रक्कम देण्यात सहायक ठरतो.

एखाद्या मुलाचे उच्च शिक्षण घेण्याचे दीर्घकालीन ध्येय असेल तर यासाठी नातेवाईकांकडून दर २० वर्षांपर्यंत वार्षिक १०,००० रुपये जरी मिळाले तरी ते एकंदरीत १७ लाख रुपयांची रक्कम बनू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवलेला पैसा १८ टक्के दिला तरी शक्य आहे. म्हणून अनितासारख्या अधिकांश महिलांनी असा दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवून चांगल्याप्रकारे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करावी आणि खूप पैसे जमा करावे.

दीर्घकाळासाठी केली जाणारी गुंतवणूक

कुटुंबाकडून कधीकधी जो पैसा मिळतो, त्याशिवायसुद्धा त्यांनी एसआयपीसारख्या इक्विटी योजनांमध्ये आपल्या बचतीतील गुंतवणूक करायला हवी. नियमितपणे दीर्घकाळापर्यंत केली जाणारी ही गुंतवणूकसुद्धा भरपूर रक्कम देऊ शकते.

उदाहरणार्थ १५ वर्षांसाठी एसआयपीमध्ये दरमहिन्याला १५ हजार रुपये गुंतवल्यास तर वार्षिक १८ टक्के परतावा गृहीत धरल्यास शेवटी साधारण ४० लाख गोळा होतील.

शेवटची बाब, नियम कायद्याशी आणि संचलनाशी निगडीत अनावश्यक चिंतांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या नावाने गुंतवणूक करावी. मुलांना नॉमिनी बनवले जाऊ शकते.

एक चांगली आई बनण्यासाठी आपल्या मुलाला उज्ज्वल भवितव्य देणारी प्रत्येक जूबाबदारी पूर्ण करणं जरूरी आहे. तुमच्या आयुष्यापेक्षा चांगले आयुष्य मुलांना देण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.

कसे तयार होतात शृंगार आणि प्रेमाचे दागिने

* गरिमा पंकज

सोन्याच्या दागिन्यांबद्दल महिलांचा झुकाव कोणापासून लपून राहिलेला नाही. कधी एखाद्या आपल्याचे प्रेम आणि आसक्तीचे प्रतीक म्हणून, कधी गुंतवणूकीच्या माध्यमाप्रमाणे शृंगाराचे प्रतीक म्हणून, तर कधी सुख-दु:खाचे साथीदार बनून या दागिन्यांना महिलांच्या जीवनात विशेष स्थान आहे. परंतु आपणास माहिती आहे काय की देशातील बऱ्याच प्लांट्समध्ये हजारो कारागीर आधुनिक मशीनींच्या मदतीने सोन्याचे दागिने बनवतात? एक रत्नजडित दागिना कित्येक चरणांतून होत आपल्या हातात पोहोचतो.

या संदर्भात तनिष्कच्या पंतनगर ज्वेलरी प्लांटच्या युनिट हेड अँजेलो लॉरेन्सने संपूर्ण प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट केली :

* सर्व प्रथम ज्वेलरी डिझाइनर कोणत्याही दागिन्यांची एक रूपरेषा तयार करतात आणि कागदावर कोरतात, ज्याला संगणकाद्वारे कॅड डिझाइन (संगणक अॅडेड डिझाइन)मध्ये रूपांतरित केले जाते.

* त्यानंतर त्या कॅड डिझाइनला ३ डी प्रिंटरद्वारे मुद्रित केले जाते, ज्याला रेझिन प्रोटोटाइप म्हणतात.

* राळला द्रव मोल्डच्या साच्यात मिसळले जाते आणि त्यातून प्रथम चांदीचा नमुना तयार केला जातो, याला मास्टर म्हणतात. त्या मास्टरच्या मदतीने सिलिकॉन मोल्ड कापून त्यामध्ये मेण घातले जाते.

* आपल्याला अंगठीमध्ये हिरे लावायचे असल्यास या चरणात कारागिर सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने मेणाच्या तुकडयात योग्य जागी हिरे सेट करतात.

* यानंतर अनेक वॅक्सचे दागिने एका वॅक्स ट्रीच्या बेसमध्ये जोडले जातात. त्यानंतर हे वॅक्स ट्री पुढील विभागात सोन्याच्या कास्टिंगसाठी पाठविले जाते, जेथे गोल्ड ट्री, लॉस्ट वॅक्स कास्टिंग पद्धतीने तयार केले जाते.

* गोल्ड ट्री तयार करण्यासाठी, सर्व प्रथम ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मिश्रणामध्ये ठेवले जाते. ७-८ मिनिटांत सुकून कडक होणारे, प्लास्टर ऑफ पॅरिसने झाकलेले, हे झाड भट्टीमध्ये ५०० ते ६०० डिग्री तापमानात १६ तास गरम केले जाते.

* त्यानंतर गरम मिश्रणाला यूएसएमधून मागवलेल्या जेट इंजिन मशीनमध्ये घातले जाते. येथे प्लास्टर ऑफ पॅरिसमधील मेण विरघळते आणि रिक्त साचा राहून जातो. जेव्हा मशीनचे तापमान १,०९० डिग्री असते, तेव्हा मशीनमध्ये सोने ओतले जाते.

* पिवळा रंग सोन्याचा नैसर्गिक रंग आहे, तर सोन्याला पांढरा रंग देण्यासाठी त्यात पॅलेडियम आणि निकेल मिसळले जाते, तर गुलाबी रंगासाठी त्यात २५ टक्केपर्यंत तांबे जोडले जाते. अशा प्रकारे पांढरे सोने आणि गुलाबी सोने तयार केले जाते.

* रिकाम्या साच्यांमध्ये सोने आणि मिश्र धातु भरतात तेव्हा अंगठया त्यांचा आकार घेतात. हे गोल्ड ट्री बाहेर काढले जाते आणि कारागिरांकडून काळजीपूर्वक अंगठया वेगवेगळया केल्या जातात. नंतर त्यांची गुणवत्ता तपासल्यावर त्यांना डाउनस्ट्रीम प्रक्रियेसाठी पाठविले जाते.

* डाउनस्ट्रीम प्रक्रियेमध्ये दागदागिन्यांना डिझाइनप्रमाणे जोडले जाते. सुंदर चमक देण्यासाठी ४-५ स्टेप्समध्ये पॉलिश केली जाते.

* फॅक्टरीच्या बाहेर पडण्यापूर्वी, प्रत्येक दागिन्यांची गुणवत्ता आधुनिक मशीनींवर ट्रेंड क्वालिटी इन्स्पेक्टरांकडून तपासली जाते. त्यानंतरच, तनिष्क ब्रॅडच्या हॉलमार्किंगसाठी दागिने तयार होतात.

* नंतर प्रक्रियेदरम्यान उडणारे धुळीचे कण गोळा केले जातात आणि त्यांच्यापासून सोन्याची रिकव्हरी केली जाते. १ महिन्यात सरासरी १० ते १०० किलो धुळीचे कण गोळा केले जातात. ज्यामधून २ ते २.५ किलो २४ कॅरेट सोने मिळते.

दागदागिने तयार झाल्यानंतर, तिथून लॉकरमध्ये ठेवले जातात, जेथून ऑर्डरीनुसार त्यांना वेगवेगळया शहरांमध्ये पाठविले जाते. टायटन कंपनीच्या पंतनगर ज्वेलरी युनिटमध्ये तयार झालेले दागिने संपूर्ण प्रक्रियेनंतर देशातील ४०० हून अधिक शोरूम्सद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचतात.

पावसाळी मोसमात फिरून या हे ‘नॅशनल पार्क’

* प्रतिनिधी

पावसाळ्याच्या दिवसांत हिरवा शालू पांघरलेल्या डोंगरदऱ्यांतून फिरणे खूप आनंददायी असते आणि हे ठिकाण राष्ट्रीय उद्यान असेल, तर मजा अजूनच वाढते. मग वाट कसली पाहताय, या पावसाळी मोसमात फिरून या भारतातील प्रसिध्द नॅशनल पार्कमध्ये.

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय पार्क आहे. हे १९३६ मध्ये एनडेंजर्स बंगाल टायगरच्या रक्षणासाठी हॅली नॅशनल पार्कच्या रूपात स्थापन करण्यात आले होते. हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे आणि याचे नाव कॉर्बेटच्या नावावर ठेवले होते, ज्यांनी याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. वाघ वाचवा मोहिमेसाठी पुढाकार घेणारे हे पहिले पार्क होते.

पेरियार नॅशनल पार्क

‘पेरियार नॅशनल पार्क’ ही भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य केरळातील इडुक्की आणि पथनामथिट्टा जिल्ह्यात एक रिझर्व्ह एरिया आहे. हा हत्ती आणि वाघांसाठी रिझर्व्ह म्हणून ओळखला जातो. ९२५ किलोमीटरमध्ये वसलेल्या या अभयारण्याला १९८२ मध्ये पेरियार नॅशनल पार्क म्हणून घोषित करण्यात आले होते.

ताडोबा नॅशनल पार्क

महाराष्ट्रातील ताडोबा अंधेरी टायगर रिझर्व्ह सर्वात जुने आणि सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. हे स्थान बंगाल टायगरसाठीही फेमस आहे. इथे जवळपास ४३ बंगाल टायगर आहेत. भारतात सर्वात जास्त टायगर याच पार्कमध्ये आहेत.

हेमिस नॅशनल पार्क

‘हेमिस राष्ट्रीय उद्यान’ भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये पूर्व लडाख क्षेत्रात सर्वात जास्त उंचावर असलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हेमिस भारतात सर्वात मोठे अधिसूचित संरक्षित क्षेत्र आणि नंदा देवी बायोस्फेयर रिझर्व्ह आणि आजूबाजूच्या संरक्षित क्षेत्रांनंतरचे दुसरे सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. हे नॅशनल पार्क अनेक दुर्मीळ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींबरोबरच हिमचित्त्यांसाठीही ओळखले जाते.

नागरहोल नॅशनल पार्क

कर्नाटकात असलेले नागरहोल आपल्या वन्यजीव अभयारण्यासाठी संपूर्ण जगात प्रसिध्द आहे. हे त्या काही ठिकाणांपैकी एक आहे, जिथे आशियाई हत्ती आढळतात. मान्सूनपूर्व पावसात इथे मोठ्या संख्येने रंगीबेरंगी पक्षीही आढळून येतात. वाइल्ड लाइफ आणि अॅनिमल लव्हर्सना इथे पाहण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी खूप काही आहे.

सरिस्का नॅशनल पार्क

‘सरिस्का वाघ अभयारण्य’ भारतातील सर्वात प्रसिध्द नॅशनलपार्कपैकी एक आहे. हे राजस्थानातील अलवर जिल्ह्यामध्ये आहे. १९५५ मध्ये याला ‘वन्यजीव आरक्षित भूमी’ म्हणून घोषित करण्यात आले होते. १९७८ मध्ये वाघ वाचवा परियोजनेनुसार याला नॅशनल रिझर्व्हचा दर्जा देण्यात आला. सरिस्कामध्ये वाघ, चित्ते, बिबटे, रानमांजर, कॅरकल, पट्टेवाला उद, कोल्हा स्वर्ण, चितळ, सांबर, नीलगाय, काळवीट, चौसिंगा मृग त्याला ‘छाउसिंगा’ही म्हणतात. रानटी डुक्कर, ससा, माकड आणि पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अनेक प्रजातींबरोबरच भरपूर वन्यजीव पाहायला मिळते.

रणथंभोर नॅशनल पार्क

‘रणथंभोर नॅशनल पार्क’ उत्तर भारतातील मोठ्या नॅशनल पार्क्सपैकी एक आहे. हे जयपूरपासून १३० किलोमीटर, दक्षिण आणि कोटापासून ११० किलोमीटर उत्तर-पूर्वेकडे राजस्थानमधील दक्षिणी जिल्हा सवाई माधोपूरमध्ये वसलेले आहे.

कसा उतरवाल हार्टब्रेकचा हँगओव्हर

* पूनम अहमद

स्वधाचा आपल्या बॉयफ्रेंड राहुलशी ब्रेकअप झाल्याला अनेक महिने उलटून गेले होते. पण ती अजूनही त्याच्याबाबतच विचार करत राहते. ती राहुलला अजूनपर्यंत आपल्या डोक्यातून काढू शकलेली नाहीए.

स्वधाचे म्हणणे आहे, ‘‘रोज सकाळी जेव्हा मी झोपून उठते, पहिला विचार मला राहुलचाच येतो. मग लक्षात येते की आता आम्ही वेगळे झालोय आणि मी रडू लागते. मग मी त्याचे इन्टाग्राम पेज पाहते. त्याला त्याच्या जीवनात पुढे जाताना पाहाते, तेव्हा अजून वाईट वाटते. माझी मित्रमंडळी मलाही आयुष्यात पुढे जाण्यास सांगतात, पण मी काय करू? तो माझ्या डोक्यातून जात नाही. त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही.’’

अनेक महिने उलटूनही स्वधा या ब्रेकअपमधून बाहेर आलेली नाहीए. आपल्यातील अनेक लोक ब्रेकअपनंतरही आपल्या एक्सला विसरण्यासाठी संघर्ष करतात. ज्या व्यक्तिला धक्का बसला आहे, ज्याने प्रेमभंग केलाय, त्याच्याशी नाते संपुष्टात आल्यानंतरही त्याच्याबाबतच विचार करतात. त्याची एवढी जास्त गरज जाणवते की पुन्हा-पुन्हा त्याचे मेसेज, फोटो पाहतात. असे जाणवते की आपण त्याच्याशिवाय अपूर्ण आहोत.

प्रेमही नशा आहे

रिसर्च सांगते की प्रेमाचाही नशेप्रमाणे मेंदूवर परिणाम होतो. जेव्हा एखादे रोमँटिक नाते संपुष्टात येते, तेव्हा तसाच परिणाम होतो, जसा हेरॉइन किंवा अन्य कुठली नशा करणारी व्यक्ती अचानक त्या नशेपासून दूर होते, तेव्हा होतो.

स्वधाचा मेंदूही तसाच प्रतिक्रिया देत होता, जसा एखाद्या व्यसनी व्यक्तिचा देतो. कारण स्वधाला आपला एक्स म्हणजेच तिचं हेरॉइन मिळत नव्हतं. ती स्वत:ला त्याच्या आठवणीत जखडून ठेवत होती. त्या आठवणी थोड्या वेळासाठी तिला सुख देऊ शकत होत्या, पण एक्सला भेटण्याची तिची इच्छा अजून तीव्र होत होती.

हार्टब्रेक एक अशी नशा आहे, ज्यापासून सुटका मिळवणे सोपे नाही. हार्टब्रेकमधून बाहेर पडणे अगदी तसेच आहे, जसे ड्रग्ज, सिगारेट, अल्कोहोल किंवा जुगार खेळण्यासारख्या व्यसनांपासून सुटका मिळवणे. आपला मेंदू आपल्यावर ती नशा किंवा त्या व्यक्ती किंवा मग त्या अॅक्टिव्हिटीशी संपर्क ठेवण्यासाठी प्रेशर निर्माण करतो.

आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागेल :

* आपल्या एक्सला आपल्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी काँटॅक्टचे सर्व मार्ग बंद करा. आपल्या फोनमधून त्याचा फोननंबर डिलीट करा.

* ब्रीदिंग एक्सरसाइजवर जास्त लक्ष द्या. तोपर्यंत मेडिटेशन करा, जोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवत नाही. अशा इच्छा काही क्षणात संपुष्टातही येतात.

* स्वत:ला बिझी ठेवा. आपला विचारप्रवाह एक्सपासून हटवून दुसऱ्या एखाद्या दिशेला वळवून एवढ्या व्यस्त व्हा की त्याच्याबाबत विचार करायला वेळच राहणार नाही. जे आपण करू शकता, जे करण्यात आपण कुशल आहात, तेच करणे अशा वेळी चांगले असते.

* अधेमधेही आपल्या एक्ससोबत काढलेले चांगल्या वेळेचे फोटो पाहू नका. त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. मग एक्सजवळ जाण्याचीच इच्छा वाढत राहील, जे आपल्यासाठी योग्य नसेल.

* जेव्हा आपण सोबत होता, आपला एक्स आपल्यासाठी आनंद आणि सेफ्टीचे कारण होता. आता तो काळ गेला आहे. आता त्याने आपला प्रेमभंग केलाय. आता तो दुसरेच काहीतरी आहे- एक नशा. या नशेपासून दूर राहा.

हार्टब्रेकमधून बाहेर येण्याचा हाच मार्ग आहे की, आपण जाणून घ्या की आपल्याला आपल्या एक्सची नशा आहे आणि आपल्याला या नशेच्या व्यसनापासून मुक्ती मिळवायची आहे. एक्सला आपल्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी तशाच दृढ इच्छाशक्तीची गरज असते, जशी इतर व्यसनांपासून सुटका मिळवताना आवश्यक असते. मजबूत बना, पक्का निश्चय करा आणि पुढे व्हा. विजय तुमचाच असेल.

कपल्ससाठी स्वर्गाहून सुंदर असं ‘उटी’ हनिमूनसाठी उत्तम पयार्य

* प्रतिनिधी

शिमलामध्ये बर्फ पडायला सुरूवात होताच लोक शिमल्याचा स्नोफॉल बघण्याचं प्लानिंग सुरू करतात. या मोसमात शिमल्याचा तोट्यातला पर्यटन व्यवसाय पुन्हा व्यवस्थित सुरू होतो. दुसऱ्या बाजूला शिमल्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या एकाएकी वाढली आहे. तुम्हीही शिमल्याला जायचं ठरवत असाल तर तुमची विशलिस्ट थोडी मोठी करा. कारण तिथे तुम्हाला गर्दी मिळू शकते.

पण शिमल्याप्रमाणेच सुंदर आणखी एक जागा आहे, उटी हे असं सुंदर शहर आहे जे कपल्सचं फेवरेट हॅनीमून डेस्टिनेशन आहे. चला तर मग जाणून घेऊया, काय विशेष आहे या उटीमध्ये.

हे दक्षिण भारतातील प्रमुख हिल स्टेशन आहे. हे ठिकाण हनिमून हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे. हे शहर तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्याचा एक भाग आहे. उटी शहराच्या भोवताली असणाऱ्या निलगिरी पर्वतामुळे शहरातल्या सौंदर्यात भर पडते. या पर्वतांना ब्ल्यू माऊंटन म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की भोवतालच्या घाटांमध्ये फुलणाऱ्या निलगिरी फुलांमुळेच या ठिकाणाचं नाव कुरूंजी असं पडलं. ही फुलं निळ्या रंगांची असतात. त्यामुळे पर्वतही निळे दिसू लागतात.

विशेष काय

बोटॅनिकल गार्डन, डोडाबेट्टा उद्यान, उटी झिल, कलहट्टी, प्रपात आणि फ्लॉवर शो अशा बऱ्याच कारणांसाठी उटी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. एवलेंच, ग्लेंमोर्गनचे शांत, सुंदर गाव, मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान अशी काही प्रमुख पर्यटन स्थळं आहेत.

कसं पोहोचाल?

उटीजवळ ८९ कि.मी.वर कोइंबतूर विमानतळ आहे. मुंबई, कोलकात्ता, चेन्नई आणि मदुराईसाठी इथे नियमित विमानं आहेत. चेन्नई आणि कोइंबतूरहून ट्रेनसुद्धा आहे. बस-टॅक्सीने मदुराई, तिरूअनंतपुरम, रामेश्वरम, कोच्ची कोइंबतूरहून इथे पोहोचता येतं.

तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत एखाद्या खास ठिकाणी फिरायला जायचं असेल तर हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

असे ठेवा, किटाणूमुक्त घर

* सोमा

‘स्वच्छ घरातच सुदृढ कुटुंब नांदते’ असे म्हटले जाते. हे बरोबरदेखील आहे. ऋतु कोणताही असो, प्रत्येकाने घर किटाणूमुक्त ठेवणे गरजेचे आहे. कारण याचा प्रभाव थेट आपल्या स्वास्थ्यावर पडतो. केवळ एखाद्या विशेष प्रसंगी नाही तर प्रत्येक दिवशी साफ-सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अनेक आजार जसे की श्वाससंबंधी, किटकांमुळे पसरणारे आजार, वायरल फ्लू इत्यादींपासून दूर राहू शकता.

जर घरात लहान मुले आणि वृद्ध असतील तर घर किटाणूरहीत असणे गरजेचे आहे.

मुंबईतील सॅरिनिटी पीसफुल लिव्हिंगचे डिझायनर आणि को फाऊंडर अमृत बोरकाकुटी सांगतात की जर्म फ्री घर असणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक प्रकारचे व्हायरल आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. ज्यामुळे अनेक प्रकारचे व्हायरल फ्लू होतात. यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते जीवघेणे सिद्ध होऊ शकतात.

या काही टीप्सवर लक्ष द्या, ज्यामुळे तुम्ही किटाणूमुक्त घर ठेवू शकता :

* घराची नियमितपणे साफ सफाई करा. जेणेकरून घर पूर्णत: जर्म फ्री होईल. पुसणी किंवा डसटिंगसाठी अरोमा आणि युक्लिप्टस ऑइलचा वापर करा. यामुळे बॅक्टेरियाला निर्मितीची शक्यता उरणार नाही. तसेच यामुळे छोटे छोटे किडे नष्ट होतात.

* सफाई केल्यानंतर तो कपडा चांगल्या पद्धतीने साबणाने धुवून ऊन्हात वाळत घाला. यामुळे पुसणी किंवा डस्टिंग कापड साफ आणि दुर्गंध विरहित राहील.

* स्वंयंपाकघर आणि इतर खोल्यांसाठी वेगेवगळे डस्टिंगचे कापड ठेवा. यामुळे घर हायजिनिक राहील. पुसताना फ्लोर क्लिनर लिक्डिचा वापर नक्की करा. सर्वाधिक किटाणू हे जमिनीवरच आढळतात.

* किचन घरातील विशेष हिस्सा असतो. जिथे जंतू किटाणू सहजपणे प्रवेश करतात. वापरलेली भांडी वेळच्या वेळी धुवा. जर तुमची भांडी दुसऱ्या दिवशी कामवाली धुवत असेल तर सर्व भांडी डिर्टजंटच्या पाण्यात भिजवून ठेवा. अशा भांड्यांकडे किडे लवकर आकर्षित होतात.

* जिथे अधिक ओलावा असतो, तिथे बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर जंतू सहजपणे उद्भवतात आणि दुसऱ्या ठिकाणी पसरू लागतात. अशावेळी या जागेतून ओलावा दूर करण्यासाठी तो भाग धुवून झाल्यानंतर पंखा लावून ठेवा.

* चादरी आणि टॉवेल गरम पाण्यात आणि डिर्टजंटमध्ये नियमितपणे धुवा. जेणेकरून जर्म फ्री राहील.

* पडदे आणि पंख्यांची सफाई वॅक्युम क्लिरनने महिन्यातून एकदा तरी नक्की करा. बऱ्याचदा या ठिकाणी धूळ, माती सहजपणे जमते. मग किटाणू सहजपणे आकर्षित होतात.

* कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका. यामुळे मच्छर आणि किटाणू उद्भवतात. १-२ दिवसात पाण्याचा उपयोग करून पुन्हा स्वच्छ पाणी भरा.

* जर घरात लहान मुले किंवा वृद्ध असतील तर जास्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण कोणताही आजार त्यांना लवकर होतो. साफसफाईनंतर अरोमायुक्त कँडल किंवा अगरबत्ती नक्की लावा.

* बाथरूम आणि वॉश बेसिनची सफाई नियमितपणे करा. यासाठी ब्लीचच्या ऐवजी साबण आणि पाणी वापरणे योग्य राहील.

* टाईल्सची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही डिटर्जंट आणि पाण्याचा वापर करू शकता. जर कुठे अधिक मळ जमा झाला आसेल तर त्याला जुना ब्रश आणि साबणाच्या सहाय्याने घालून स्वच्छ करा.

* दरवाजे खिडक्या आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून काढा. जेणेकरून त्यावर धुळ, माती चिकटू नये आणि किटाणू आकर्षित होऊ नयेत.

मुलांना जंक फूडपासून वाचवा घरच्या घरी हे बनवा

* नीरा कुमार

बर्गर, पिझा, हॉट-डॉग, नूडल्स, पास्ता, चिप्ससारखे खाद्यपदार्थ मुलांना खूपच आवडतात. मात्र याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे पदार्थ खाल्ल्याने मुलांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही, उलट जंक फूडमध्ये फॅटचं प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉल वाढतं, या पदार्थांच्या अत्याधिक सेवनामुळे मुलं लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदय व यकृताशी संबंधित आजारांना बळी पडतात.

चला तर मग जाणून घेऊया की कशाप्रकारे प्रत्येक आई आपल्या मुलांना घरातच त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला घालू शकते.

* मुलांना चाउमिन, पास्ता, नूडल्स वगैरे खूपच आवडतात. त्यासाठी आटा नूडल्स वा मल्टीग्रेन इत्यादी विकत घ्या. यामध्ये रंगीबेरंगी भरपूर भाज्या उदाहरणार्थ ब्रोकली, गाजर, मटार, हिरवी, लाल, पिवळी सिमला मिरची, टोमॅटो इत्यादी हॅण्ड चॉपरने बारीक कापून टाका. कारण मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या त्यांना कळूनदेखील येणार नाहीत. नूडल्स, पास्ताचं प्रमाण कमी ठेवा आणि भाज्यांचं अधिक. पास्तामध्ये टोमॅटोसोबत काही भाज्यांची पेस्ट करून घ्या, नंतर शिजवा. बघा मुलं आवडीने खातील.

* २-३ फळं एकत्रित करून त्यांचा रस काढून मुलांना प्यायला द्या. मुलं अनेकदा पालक खायला कंटाळतात. जर पालकाच्या प्यूरीत जलजीरा पावडर, मीठ, जिरे व लिंबाचा रस टाकून कुलकुल ड्रिंक मुलांना दिलं तर ते मजेत पितील. आंबा, केळं, चीकू मुलांची आवडती फळं आहेत. ती दुधासोबत एकत्रित करून शेक बनवून मुलांना द्यावीत.

* उन्हाळ्यात मुलांना आइस्क्रीम, कुल्फी खायला खूप आवडतात. त्यासाठी भरपूर फळं सुरीने बारीक कापून घ्या. दुधामध्ये केळं वा आंबा टाकून शेक बनवा. त्यामध्ये सर्व फळं व सुका मेवा टाकून आइस्क्रीम वा कुल्फी बनवा आणि मुलांना द्या.

* सॅण्डविचेसदेखील मुलांना खूप आवडतात. खासकरून बटाटा आणि पनीरची. यामध्ये तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची बारीक कापून एकत्रित करा व परतून घ्या. यामुळे पौष्टिकता वाढेल.

* मुलांना जी पोळी खायला देता त्या कणकेमध्ये भाज्यांची प्युरी एकत्रित करा. इतर पीठं उदाहरणार्थ, मूगडाळीचं पीठ, जवाचं पीठ, नाचणीचं पीठ इत्यादी एकत्रित करा. यापासून बनविलेल्या पोळ्या खूपच रुचकर व पौष्टिक होतील आणि मुलंदेखील आवडीने खातील.

* मुलांना पॉपकॉर्न खूप आवडतात. त्यासाठी घरच्या घरी सॉल्टेड पॉपकॉर्न बनवा.

* फ्रोजन भाज्या व कॉर्नचा वापर करून कटलेट, बर्गर बनवा. मात्र हे डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करा. बर्गरमध्ये टोमॅटो, कांदा पनीर, सलाडची पानं लावा. त्यामुळे हे सर्व पाहायला आकर्षक दिसेल व खाण्यास पौष्टिक लागेल.

* गव्हाच्या कणकेचा पिझाचा बेस बाजारात उपलब्ध असतो. त्याचा वापर करा परंतु घरच्या घरीच बनवा.

* ब्राउन राइस उकळून चटपटीत भेळ चाट बनवा. मुलांना नक्कीच ते खूप आवडेल.

* उन्हाळ्यात मुलांना बर्फाचा गोळा खूपच आवडतो, कलिंगड, स्ट्रॉबेरीक्रश, टरबूज व खस सरबताचे गोळे बनवा. त्यामध्ये स्टीक लावा. गोळा झाल्यावर मुलांना चोखताना खूपच मजा येईल.

* फळं कापून कस्टर्डमध्ये एकत्रित करून मुलांना द्या.

* हिरव्या पानांच्या भाज्यांची प्यूरी बनवा आणि ती कणकेत एकत्रित करून हिरवी, लाल, पिवळी पोळी वा पराठे बनवा.

* मुलांना चिप्सदेखील खूप आवडतात. बटाट्याचे चिप्स शॅलो फ्राय करा. खूपच कमी फॅटमध्ये चिप्स तयार होतील. एक लहान चमच्याच्या तेलात १०० ग्रॅम शेंगदाणे सहजपणे तळता येतील.

* मुलांना ओट्सचा पराठा द्या. मुलांना ओट्स फारसे आवडत नसल्यामुळे ओट्सची पावडर बनवा आणि कणकेसोबत मळून त्याचे पराठे बनवा. पराठे रुचकर व पौष्टिक बनतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें