तर येईल गाढ झोप

* गरिमा

जीवनाच्या धावपळीत दिवसभर थकलेली व्यक्ती जेव्हा रात्री अंथरुणावर पडते, तेव्हा तिला सुखद गाढ झोपेची अपेक्षा असते. गाढ आणि आरामदायक झोप दिवसभराचा थकवा दूर करून शरीरात नवीन उत्साह भरते.

एका निरोगी माणसासाठी ५-६ तासांची झोप पुरेशी आहे,  तर लहान मुलांसाठी १०-१२ तासांची झोप पुरेशी असते. प्रौढांसाठी ४-५ तासांची झोप पुरेशी असते.

रात्री चांगली झोप न आल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, घोरणे, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेत कमतरता, निर्णय घेण्यात अडचण, पोटात गडबड, उदासी, थकवा यासारख्या समस्या डोके वर काढतात.

झोप न येण्याची कारणे

झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. चिंता, तणाव, निराशा, रोजगाराशी संबंधित समस्या, मानसिक आणि भावनात्मक असुरक्षा वगैरे.

याबरोबरच निश्चित वेळी न झोपणे, चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन, एखादा त्रास किंवा आजार, उशिरा जेवणे किंवा उपाशी झोपणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल फोनला चिकटून राहणे, दिवसभर काही काम न करणे इ. कारणेही अनिद्रेची कारणे बनू शकतात.

कशी येईल सुखद झो

* ज्यांना दिवसभर पुन्हा-पुन्हा चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते, ते रात्री लवकर झोपत नाहीत. चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफेन झोपेत बाधा निर्माण करतं. म्हणूनच खास करून झोपण्याच्या अगदी आधी त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

* आपण जर मानसिकरीत्या एखाद्या गोष्टीवरून काळजीत असाल आणि काही निर्णय घेऊ शकत नसाल, तरीही आपल्या झोपेत बाधा येऊ शकते.

* आपण जर झोपण्याचा प्रयत्न करत असाल, पण झोप येत नसेल, तर उठून थोडा वेळ टीव्ही पाहा. एखादे आवडते पुस्तक वाचा किंवा मग हलके संगीत ऐका. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.

* झोपण्यापूर्वी थोड्या वेळासाठी आपले मन एखाद्या खास गोष्टीवर केंद्रित करा. त्यामुळे मनाची चंचलता कमी होईल आणि आपल्याला चांगली झोप येईल.

* रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ फेरफटका मारला पाहिजे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि झोपही आरामदायक येते. डिनरमध्ये जड आहार टाळला पाहिजे.

* जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण घ्या.

* झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने गाढ झोप येते.

* झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. रोज एकाच वेळी झोपल्याने गाढ झोप लागते.

* झोपताना नेहमी सैल कपडे घातले पाहिजेत.

* रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने चांगली झोप येते.

* झोपताना खोलीत हलका प्रकाश असला पाहिजे.

* दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करावे लागते, त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी होते. त्यामुळे रोज व्यायाम जरूर करा. व्यायाम केल्याने वेदना दूर होतील आणि गाढ झोपही येईल.

या टीप्स आजमावल्यानंतरही झोपेची समस्या जशीच्या तशी राहिली, तर डॉक्टरांना भेटा आणि अनिद्रेच्या समस्येवर उपाय करा.

कसे पाणी पिता आपण?

* डॉ. आरएसके सिन्हा, इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

स्वच्छ पाणी प्रत्येक व्यक्तिची मुलभूत गरज आहे. प्रदूषित पाणी खूप घातक ठरू शकते. स्वच्छ पाण्याला युनायटेड नेशन्सद्वारे मनुष्याची मुलभूत गरज मानले गेले आहे. तरीही जगभरात जवळपास १.८ मिलियन लोक प्रदूषित पाण्यामुळे मरतात.

पाण्याबाबत चार महत्त्वपूर्ण गोष्टी

प्रमाण : प्रत्येक व्यक्तिला रोज पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, सॅनिटेशन आणि हायजिनसाठी २० ते ५० लीटर पाण्याची आवश्यकता असते.

विश्वसनीयता : पाण्याची उपलब्धता विश्वासार्ह असली पाहिजे. मोसम मग कुठलाही असो, व्यक्तिला प्रत्येक स्थितीत पाणी मिळाले पाहिजे. जर पाण्याचा स्त्रोत विश्वासार्ह नसेल किंवा मोसमी असेल, तर याचा परिणाम व्यक्तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर पडतो.

गुणवत्ता : पाण्याच्या वितरणासाठी उचित आणि विश्वासार्ह प्रणाली असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल मिळेल.

खर्च : स्वच्छ पाण्याचा विश्वसनीय स्त्रोतही महत्त्वाचा ठरला नसता, जर व्यक्तिला ते मिळाले नसते. यात पैसे आणि वेळ दोहोंचा प्रश्न आहे.

स्वच्छ पाणी यासाठीच आवश्यक

स्वच्छ पाणी पोषण देते : मनुष्याचे शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले असते. त्याने पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून त्याचे शरीर सर्व काम सुरळीत करत राहील. त्याबरोबरच पाणी तोंडाची स्वच्छता करण्यासाठीही आवश्यक आहे. ते रक्ताची तरलता सुरळीत ठेवण्यास मदत करते. रक्ताच्या माध्यमातून पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत पोहोचवते.

विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते : स्वच्छ व ताजे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. मग ते विषारी पदार्थ शरीरात बनलेले असो किंवा बाहेरून शरीरात प्रवेश केलेले असो अथवा प्रदूषित पाण्यासोबत शरीरात प्रवेश केलेले असो.

शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राखते : स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यायल्याने शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राहते. ते अन्न पचवण्यास ते शरीरात शोषून घेण्यास मदत करते. शरीराचे तापमान सामान्य ठेवून त्याला आरोग्यदायी बनवते.

पेशींना ऊर्जा देते : जेव्हा पेशींना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, तेव्हा त्यांच्यात वेदना आणि जखडलेपणा सुरू होतो. त्यामुळे पेशींना निरोगी बनवण्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे.

पाणी मूत्रपिंडांसाठी खूप आवश्यक : जर व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पित नसेल, तर त्याच्या किडनीमध्ये मूतखडा आणि संक्रमणाची शक्यता वाढते. विशेषत: गरम वातावरणात. याबरोबरच पाणी केस, त्वचा आणि नखांना निरोगी राखण्यास मदत करते. पाण्याने पसरणारे बहुतेक आजार प्रदूषित किंवा घाणेरड्या पाण्याने होतात.

अस्वच्छ पाण्याने होणारे १० आजार

डिसेंट्री : या आजाराची अनेक लक्षणे आहेत- उलटी येणे, पोटात मुरड आणि गंभीर डायरिया. अक्यूट डिसेंट्रीप्रकरणी व्यक्तिला ताप येऊ शकतो आणि मलाबरोबर रक्तही पडू शकते.

डायरिया : डायरिया घाणेरड्या पाण्याने होणारा सर्वात सामान्य आजार आहे. हा बहुतेकदा पाण्याने पसरणाऱ्या वायरसने होतो. याचे मुख्य लक्षण आहे, पातळ आणि पाण्यासारखी मलप्रवृत्ती. त्यामुळे व्यक्तिला डिहायड्रेशन होऊ शकते. नवजात आणि लहान मुलांना तर मृत्यूही येऊ शकतो.

कॉलरा : हा बॅक्टेरियाने होणारा आजार आहे. त्यामुळे व्यक्ती गंभीर डिहायड्रेशन आणि डायरियाने पीडित होतो. जे लोक आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवत नाहीत, त्यांच्यात याची शक्यता जास्त असते. पाण्यासारखे शौचास झाल्यास शरीरातून तरल पदार्थ आणि इलेक्ट्रोलाईट निघून जातात आणि रुग्ण गंभीर डिहायड्रेशनचा शिकार होतो. काही वेळा गंभीर डायरियाच याचे मुख्य लक्षण असते.

टाइफाइड : भोजन आणि पाण्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे टाइफाइड होतो. ज्या ठिकाणी सॅनिटेशन सुविधा नसतात, त्या ठिकाणांवर हा सहजपणे पसरतो. अति ताप, पोटदुखी, डोकेदुखी, रॅशेस, पेशींमध्ये कमकुवतपणा याची मुख्य लक्षणे आहेत. काही गंभीर प्रकरणात इंटरनल ब्लीडिंगही होऊ शकते.

हॅपिटाइटिस ए : शौचालयांतून येणाऱ्या पाण्यामुळे हॅपिटाइटिस ए सहजपणे पसरतो. सॅनिटेशन म्हणजेच साफसफाई न ठेवल्यास हा आजार सहजपणे पसरतो. या आजाराची लक्षणे आहेत – ताप, थकवा, डायरिया, उलटी, भूक न लागणे, कावीळ इ. गंभीर प्रकरणी लिव्हर फेल्योरही होऊ शकते.

हुकवर्म (जंत) : हुकवर्म असे परजीवी आहेत, जे मलाच्या माध्यमातून पसरतात. अर्थात, हे पाण्याच्या माध्यमातून आपला नवीन होस्ट शोधतात. जर व्यक्तिने हुकवर्मचा लार्वा गिळला, तरी हा आजार होऊ शकतो. पोटदुखी, जखडलेपणा, ताप, भूक न लागणे, रॅशेस, मलातून रक्त जाणे इ. याची लक्षणे आहेत.

स्टमकफ्लू : हा असा आजार आहे, ज्यामुळे पोट आणि आतड्यांत जळजळ आणि सूज येते. हा बॅक्टेरिया किंवा वायरसने पसरतो. याची मुख्य लक्षणं आहेत – डायरिया आणि उलटी. हा आजार सर्व वयाच्या लोकांना होतो. लहान मुलांमध्ये तर खूप सामान्य आहे.

पोलिओ : पोलियोमाइलिटिसला सामान्यपणे पोलिओ म्हटले जाते. हे अक्यूट व्हायरल संक्रमण आहे, जे प्रदूषित पाण्याने पसरते. हा शरीराच्या केंद्रीय तंत्रिकातंत्रावर परिणाम करतो. याची मुख्य लक्षणे आहेत – ताप, डोकेदुखी, चक्कर येणे इ. शेवटी रुग्ण पॅरालाइसिसचा शिकार होतो.

लॅड पॉइजनिंग : लॅड पॉइजनिंग लॅडयुक्त पाणी प्यायल्याने होते. असे पाणी नेहमी जुन्या पाइपातील दूषित पाण्यामार्फत मिसळते. हा आजार मुलांसाठी खूप घातक आहे. हा अनेक समस्यांचे कारण बनू शकतो. उदा. अवयव क्षतिग्रस्त होणे, तंत्रिकातंत्रावर वाईट परिणाम, रक्ताची कमी, हाय ब्लडप्रेशर, किडनी रोग इ.

ई कोलाई : लहान मुले आणि वयस्करांमध्ये याच्या संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. जर मांस चांगल्याप्रकारे शिजले नसेल, तर हा विना पाश्चयुरिकृत उत्पादनाच्या सेवनाने याची शक्यता वाढते. पाण्यासारखे मल, मलातून रक्त येणे, पोटदुखी आणि जखडलेपणा याची मुख्य लक्षणे आहेत. मलातून रक्त येणे असे लक्षण आहे, ज्यात व्यक्तिने लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

चुकीच्या पद्धतीने तर ब्रश करत नाही तुम्ही?

* प्रतिनिधी

जर योग्य पद्धतीने ब्रश केलं नाही तर दातांमध्ये किड, पायरिया इ. समस्या उद्भवू शकतात. म्हणून ब्रश करताना सावधगिरी बाळगावी आणि यात हलगर्जीपणा करू नये. डेंटिस्ट असेही सुचवतात की योग्य पद्धतीने ब्रश केल्यानेच दातांच्या समस्येपासून बचाव करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने ब्रश करण्याची सवय लावून घ्या आणि दातांना आजारांपासून वाचवा.

योग्य ब्रशचा वापर

ब्रशची निवड करताना नेहमी काळजी घ्यावी. ब्रशचा आकार लहान आणि मोठा असता कामा नये. ब्रश मध्यम आकाराचा वापरावा. मोठा ब्रश आतपर्यंत नीट पोहोचणार नाही आणि लहान ब्रश पकडण्यातही सहजता असावी. त्याची पकडही योग्य असावी. ब्रिटिश सेंदूल हेल्थ फाऊंडेशन मुलायम ब्रश वापरण्याचा सल्ला देतात.

ब्रशच्या चुकीच्या सवयी

एका दिवसात दोनदा ब्रश करण्याचा सल्लासुद्धा तज्ज्ञ देतात. पण तुम्हाला जर दात आणि हिरड्या निरोगी ठेवायच्या असतील तर कुठलेही गोड पेय प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ करावे. तसेच दिवसातून ३ किंवा ४ वेळा ब्रश करणेही टाळावे. सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ब्रश करणंच दातांचं आरोग्य कायम राखण्यासाठी पुरेसे आहे. आरामशीर २ किंवा ३ मिनिटे ब्रश करणेच पुरेसे आहे.

दातांची खोलवर स्वच्छता

काही लोक ब्रश करताना फक्त बाहेरील दातांचीच स्वच्छता करतात. प्लेकसारख्या समस्या दातांच्या आतल्या थरापासून सुरू होते. म्हणून दातांची स्वच्छता करताना आतूनही दात स्वच्छ करावेत.

ब्रश स्वच्छ ठेवा

जर तुम्ही बाथरूममध्ये ब्रश ठेवत असाल तर त्या जागी ओलावा असल्याने तिथे किटाणू जमा होऊ लागतात. म्हणून ब्रश कोरड्या जागीच ठेवा. जर ब्रशला कव्हर असेल तर ते नक्की लावा. ब्रश करण्याआधी आणि ब्रश केल्यानंतर ब्रश जरूर स्वच्छ करा.

ब्रश न बदलणे

प्रत्येक डेंटल असोसिएशन हाच सल्ला देते की स्वत: चा ब्रश दर ३ महिन्यांच्या अंतराने बदलावा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे ब्रिस्टल्स तुटू लागतात. अशावेळी तुम्ही ब्रश बदलला पाहिजे.

दातांना आजारांपासून वाचवण्यासाठी योग्यप्रकारे ब्रश करण्याबरोबरच त्याचा योग्य वापर कसा करावा हेही जाणून घ्या. असे केल्याने तुमचे दात स्वस्छ आणि मजबूत राहण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतर वजन कमी करावे असे

* डॉ. रिनू जैन, कन्सल्टंट ओब्स्टेट्रिक्स अँड गायनाकोलॉजिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

मुल जन्माला घातले की महिलांसमोर मोठे आव्हान असते ते आपले वजन कमी करण्याचे. गर्भावस्थेत पोट आणि कंबरेचा आकार वाढतो. प्रसूतीनंतर पूर्वीसारखा आकार मिळवण्यासाठी महिलांना खूप मेहनत घ्यावी लागते.

प्रसूतीनंतर ३-६ महिन्यांनी स्त्रिया व्यायाम करू शकतात. पण जोवर मूल अंगावर दूध पित असते, तोवर तिने वेटलिफ्टिंग व पुशअप्स करू नयेत, तिने कोणत्याही प्रकारचे डाएटिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

स्तनपान : मुलाला दूध पाजले की वजन सहज कमी होते, कारण शरीरात दूध तयार होत असताना कॅलरीज बर्न होतात. हेच कारण आहे की ज्या महिला बाळाला दूध पाजतात, त्यांचे वजन लवकरकमी होते.

योग्य प्रमाणात पाणी पिणे : जर तुम्हाला तुमची कंबर पूर्वीसारखी कमनीय बघायची असेल तर रोज कमीतकमी ३ लिटर पाणी प्यायला हवे. पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीरातील द्रव्यांचे संतुलन कायम राहते. याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते.

कोमट पाण्यात लिंबाचा रस  व मध एकत्र करून पिणे : रोज सकाळी रिकाम्या पोटी हे प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि फॅट बर्न होतात. दर वेळी जेवणाआधी याचे सेवन करू शकता. असे केल्यास पचन नीट राहिल व फॅट लवकर बर्न होते.

ग्रीन टी प्या : ग्रीन टीमध्ये अनेक असे घटक असतात, जे बर्निंग प्रक्रियेला जलद करतात. यात असलेले प्रमुख घटक अँटीऑक्सिडंट असतात, जे मेटाबोलिझमला जलद करतात. म्हणून दूध टाकलेला चहा घेण्याऐवजी ग्रीन टी घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. हा आरोग्यासाठीही उपयुक्त असतो, शिवाय यामुळे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.

आरोग्यवर्धक चांगले असे खाद्यपदार्थ निवडा : प्रक्रिया केलेले अन्न खाणे. जास्त कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन करू नका जसे कँडी, चॉकलेट, बेक केलेले पदार्थ जसे बिस्किटं, केक, फास्ट फूड व तळलेले पदार्थ जसे फ्राईड मतं आणि चिकन नगेट्स. प्रक्रिया केलेल्या अन्नात सर्वात जास्त कॅलरीज व साखर असते. जे वजन वाढवतात. अशा आहारात योग्य पौष्टिक घटक कमी असतात. याऐवजी आरोग्यास उत्तम असे पर्याय निवडा. उदा, त्या ऋतूतील फळं, सलाड, घरी तयार केलेलं सूप व फळांचे रस इत्यादी

या घरगुती उपायांशिवाय भरपूर प्रमाणात भाज्या फळांचे सेवन केल्याने पोटावरची चरबी कमी होते. जर तुम्ही बाळाला दूध पाजत असाल तर तुम्ही रोज १८०० ते २२०० कॅलरीजचं सेवन करायला हवं, जेणेकरून तुमच्या बाळाला उत्तम पोषण मिळू शकेल.

जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर कमीतकमी १२०० कॅलरीजचं सेवन करायला हवं. दिवसातून कमीतकमी ३ वेळा कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवं. यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी नैसर्गिक पदार्थ निवडायला हवे.

नैसर्गिक नाश्ता निवडा जसे ओट्स, दलिया किंवा अंडयातील पांढऱ्या भागाचे आम्लेट. दुपारच्या जेवणात कडधान्याची पोळी, बेक्ड चिकन किंवा कॉटेज चीज हिरवे सॅलड व फळं. रात्रीच्या जेवणात तुमची प्लेट अर्धा प्लेट फळं व भाज्या यांनी भरलेली असायला हवी. उरलेल्या पाव प्लेटमध्ये कडधान्य आणि प्रथिने असावीत. चांगल्या आहारासोबतच नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

जेवणानंतर जलद चाला : जेवणानंतर रोज २० मिनिटं जलद चाला. यामुळे पोटावरची चरबी कमी होईल. हे गरजेपेक्षा जास्त करू नका. मुलाला स्ट्रॉलरमध्ये सोबत घेऊनही चालू शकता. हा व्यायाम करण्याचा सर्वात छान उपाय आहे.

अॅब्ज क्रँच : पोटावरची चरबी कमी करण्याचा हा सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे पोटावरील पेशींमधील कॅलरीज बर्न होतात व पोटावरील चरबी कमी होऊ लागते.

लोअर अबडॉमिनल स्लाईड : हा व्यायाम मुलाच्या जन्मानंतर आईसाठी चांगला असतो. विशेषत: बाळाचा जन्म सीसेक्शन पद्धतीने झाला असेल तर. कारण सर्जरीनंतर ओटीपोटातील पेशींवर परिणाम होतो. हा व्यायाम या पेशींवर काम करतो. पाठीवर झोपा, पाय जमिनीवर पसरवा. हात सरळ बाजूला ठेवा व पंजे खालच्या दिशेला असावे. आपल्या पोटाच्या पेशींना आकुंचित करून आपला उजवा पाय बाहेर आणा. मग हा पाय सरळ करून डाव्या पायाच्या बाबतीत असेच करा. दोन्ही पायांच्या बाबतीत ५-५ वेळा असे करा.

पेल्विक टिल्ट : आपल्या पोटाच्या पेशींना आकुंचित करा. असे करताना आपल्या कंबरेला समोरच्या बाजूला वाका. असे तुम्ही झोपून, उभे राहून अथवा बसूनही करू शकता. हे रोज तुम्ही जितके वेळा करू शकत असाल तेवढे करा.

नौकासन : नौकासनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे पोटाच्या पेशी टोन होतात. पचनात सुधारणा होते. तसेच पाठीचा कणा व कंबर मजबूत होते.

पाय वर घेणे : आपले पाय ३० डिग्री, ४५ डिग्री, ६० डिग्री अंशात वर उचला. प्रत्येक अवस्थेत ५ सेकंद थांबा. यामुळे पोटातील पेशी बळकट होतात.

उत्थासन : उत्थासनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे कंबरेवरील चरबी कमी होते व त्यात आणि खांद्यामध्ये ताण निर्माण होतो.

मॉडिफाइड कोब्रा : आपल्या हातांना फरशीवर टेकवा. खांदे आणि कोपरे आपल्या बरगडयांना लागलेली असावी. आपले डोके व मान वर करा. एवढे पण नाही की आपल्या पाठीवर याचा ताण पडेल. आता अॅब्जना आतील बाजूला ओढा जसे तुम्ही पेल्व्हिसना फरशीपासून वर उचलायचा प्रयत्न करता.

इतर उपाय

पोस्ट मार्टम सपोर्ट बेल्ट : हा बेल्ट पोटाच्या पेशींना टाईट करतो. यामुळे तुमचे पोश्चर चांगले राहते व पाठीचे दुखणे कमी होते.

बेली रॅपचा वापर करा : बॅली रॅप वा पोटपट्टा तुमच्या अॅब्जना आवळून ठेवतो. ज्यामुळे तुमच्या युट्रस व पोटाचा भाग आपल्या मुळ आकारात येतो, हा पोटावरील चरबी कमी करण्याचा सर्वात जुना उपाय आहे. यामुळेसुद्धा पाठीचे दुखणे थांबते.

फुल बॉडी मसाज करा : मसाज शरीरासाठी अतिशय लाभदायक असतो. याद्वारे तुम्ही घाम न गाळता वजन कमी करू शकता. अशा पद्धतीने मसाज करवून घ्या की तुमच्या पोटावरील चरबीवर त्याचा परिणाम होईल. यामुळे फॅट शरीरावर समप्रमाणात पसरेल. मेटाबोलिझिमवर परिणाम होईल व चरबीपासून सुटका होईल.

मान्सून स्पेशल : पावसात अशी घ्या पायांची काळजी

* डॉ. सपना बी. रोशनी

शरीराच्या संपूर्ण देखभालीमध्ये आपण सर्वात कमी महत्व पायाच्या देखभालीला  देतो. आपण दिवसातून बऱ्याच वेळा चेहऱ्याला क्रिम लावतो, पण पायाकडे दुर्लक्ष करतो. खरं तर असे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. उदारणार्थ बॅक्टेरीअल फंगस संक्रमण, क्रॉर्न्स, पायाच्या त्वचेवरील भेगा, दुर्गंधी इत्यादी समस्या उद्भवतात.

पावसाळयाच्या दिवसामध्ये पायाच्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे  असते. कारण या काळात पायाचा दूषित पाण्याशी अधिक संपर्क येतो.

जर पायाच्या त्वचेला खाज, सूज, किंवा त्वचा रुक्ष होणे यासारख्या समस्या होत असतील तर लगेच चिकित्सकाचा सल्ला घ्या कारण ही गंभीर त्वचेची एलर्जी असू शकते, ज्याचा तातडीने इलाज होणे गरजेचे आहे.

पायांची देखभाल करायचे काही उपाय

पाय व्यवस्थित धुवून घ्या : पायांची त्वचा बॅक्टेरीअल आणि फंगस संक्रमणाप्रति अधिक संवेदनशील असते. आपण जरी दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोजे आणि बूट घातले असले तरीदेखील पाय त्यातील बॅक्टेरीया व फंगसच्या संपर्कात राहतात. याव्यतिरिक्त पाय फरशीवर साठलेल्या धूळ आणि घाणीच्या संपर्कात राहतात. जर पाय व्यवस्थित धुतले किंवा साफ केले नाहीत तर पाय आणि बोटांच्यामधील जागेत बॅक्टेरीया आणि फंगसचे संक्रमण सहजपणे होऊ शकते. म्हणूनच आपले पाय दिवसातून कमीत कमी एकदा तरी साबणाने धुणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामध्ये साठलेली मळ आणि घाम स्वच्छ होऊ शकेल.

पाय कोरडे ठेवा : अॅथसिट्स फ्रूट पायांचे सामान्य फंगल संक्रमण आहे, त्यामुळे खाज सुटणे, त्वचा जळजळणे, त्वचा पडणे तसेच फोडी तयार होऊ शकतात. अॅथलिट्स फूटसारख्या फंगल संक्रमणाला पायातील ओसरपणा कारणीभूत ठरतो. पाय व्यवस्थित धुतल्यानंतर त्यांना सुकवणे, कोरडे ठेवणे आणि विशेषत: बोटांच्यामधील जागा कोरडी ठेवणे आवश्यक आहे.

पायांना नियमित मॉश्चराइज करा : फक्त चेहरा आणि हातांना मॉश्चरायइझ करू नका पायाकडेही लक्ष द्या. कारण त्यातील आर्द्रता कमी झाल्यास त्वचा रुक्ष व फुगलेली होऊ शकते. तसेच त्वचेला भेगा पडू शकतात. त्वचेला खास करून पायाच्या त्वचेला भेगा पडल्यास, ती खूप कोरडी आणि कडक होते. त्यानंतर या भागात धुळ, माती साचते. भेगा पडलेले पाय कुरूप दिसतात आणि तिथे दुखणे सुरु होते. म्हणूनच पाय रोज धुवून मॉइश्चरायझिंग क्रिम लावा. यासाठी कोकोआ बटर किंवा पट्रोलियम जेली हा उत्तम पर्याय आहे.

मृत त्वचा काढणे : मृत त्वचेला निव्वळ मॉश्चराइझ करून काहीच फायदा होत नाही. म्हणून महिन्यातून एकदा एक्सफोलिएट करून मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. हे फ्युमिक स्टोन किंवा लुकद्वारे केले जाते. असे हलक्या हाताने करावे लागते. ती कडक मृत त्वचेवर जमलेली घाण काढण्यासाठीदेखील याची मदत होते. मृत त्वचा काढल्यानंतर त्याला मॉश्चराइझर लावून हायड्रेड करा आणि रात्रभर तसेच ठेवा.

साखर आणि ऑलिव्ह ऑईलच्या मिश्रणाचे काही थेंब मीठ किवी टी ट्री ऑईलमध्ये मिसळून स्क्रबिंग करू शकता. कारण यात बॅक्टेरीयारोधक गुण असतात.

पायांना पॅम्पर  करा : महिन्यातून २ वेळा १० ते १५ मिनिटे पाय गरम पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पायाची त्वचा नरम होण्यास मदत मिळते. मग पाय व्यवस्थित कोरडे करून घ्या. मग त्यावर व्हिटॅमिन इ युक्त कोल्ड क्रीम लावा. पाय संक्रमणाप्रति असंवेदनशील असेल तर अँटिबायोटिक क्रिमचा वापर करा.

तुम्ही हायड्रेटिंग मास्कसाठी स्मॅश केळे लिंबाचा रस एकत्र करून वापरू शकता. हे पूर्ण पायावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या. बाहेर जाण्यापूर्वी किंवा झोपताना पायांना मॉश्चरायझिंग फूट क्रीम लावा किंवा पट्रोलियम जेली लावा.

मोजे वापरा : मोजे हे धूळ, घाण इत्यादीपासून पायांचे संरक्षण करतात, एवढंच नव्हे तर अतिरिक्त किरणांपासून पायांना सुरक्षित ठेवतात.

आरामदायी चपला वापरा : नेहमी आरामदायक चपलांचा वापर करा. घट्ट बूट वापरणे टाळा. कारण त्यामुळे त्वचेला संसर्ग किंवा जखमा होऊ शकतात. उंच टाचांच्या चपला नियमित वापरणे टाळा, कारण त्यामुळे पायांच्या पेशी आणि लिगामेंटला नुकसान पोहोचू शकते.

मान्सून स्पेशल : अँटीफंगल पावडर का आहे जरूरी

* सोमा घोष

मान्सूनमध्ये अनेकदा गरमीसोबत वातावरणात दमटपणाचं प्रमाण अधिक झाल्याने अनेकांना बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होण्याची संभावना असते. याशिवाय ज्यांची त्वचा ऑयली असते त्यांना खाज, रॅशेज, संक्रमण वा त्वचेसंबंधी इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता जवळपास १० पटींनी अधिक वाढते.

पावसाळयात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत जरुरी आहे, विशेषत: पायाच्या बोटांमध्ये, आर्म पिट, ब्रेस्टच्या खाली, मान, पाठ इत्यादी जागी जिथे घामामुळे ओलावा जास्त प्रमाणात राहतो आणि नंतर फंगल इन्फेक्शनला जन्म देतो.

याबाबत मुंबईच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोमा सरकार सांगतात की पावसाळयात अँटीफंगल पावडर सर्वांसाठी आवश्यक असते, कारण वर्षाऋतूत शरीर आणि पाय ओले होतात. म्हणून दमट वातावरणात फंगस सहज वाढीला लागते. म्हणून या ऋतूत स्वत:ला कोरडे ठेवणे अतिशय गरजेचे आहे. अशात अँटीफंगल पावडर खूपच लाभकारक असते, कारण ही त्वचेला कोरडे ठेवण्यात मदत करते. ही पावडर वापरल्याने कोणत्याही प्रकारच्या फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहता येते.

केव्हा करायचा फंगल पावडरचा वाप

फंगल इन्फेक्शन झाल्यावर, योनीत त्याचे संक्रमण झाल्यास, पायांच्या बोटांच्यामध्ये खाज सुटली, कंबरेवर फंगल इन्फेक्शन झाल्यास, एथलीट्स फूटच्या उपचारासाठी, त्वचेला खाज सुटल्यास फंगल पावडरचा दिवसातून २-३ वेळा वापर करावा.

सकाळी अंघोळ झाल्यावर काखांमध्ये, जांघांमध्ये, छातीखाली, मान, पायांच्या बोटांमध्ये इत्यादी जागी जिथे घाम जास्त येतो तिथे फंगल पावडरचा वापर करा. याशिवाय जेव्हा केव्हा गरमीने खाज जाणवेल तिथे याचा वापर करा. मेडिकेटेड साबणाने हातपाय चांगले धुवा आणि कोरडे केल्यावरच फंगल पावडर लावा.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार

फंगल इन्फेक्शनचे अनेक प्रकार असतात.

* पायांच्या बोटांमध्ये होणारे फंगल इन्फेक्शन सामान्य आहे. यात बोटांच्यामध्ये कठीण थर जमा होतो अथवा बुळबुळीत पदार्थ निघतो, ज्याला दुर्गंधीसुद्धा असते.

* टिनिया कौरपोरिस आणि टिनिया क्रूरिस इन्फेक्शन : साधारणत: काखांमध्ये वा छातीच्या खाली होते. हे बहुतांश ओले कपडे वापरल्याने होते. हे फंगल पावडर लावून सहज नाहीसे करता येते.

फंगल इन्फेक्शन बहुतांश लठ्ठ, स्वच्छतेकडे कमी लक्ष देणारे, मधुमेह असलेल्यांना होते. त्यांनी विशेषत: ही  पावडर जवळ बाळगण्याची गरज भासते.

डॉ. सोमा सांगतात, ‘‘माझ्याकडे अनेक असे रुग्ण येतात, ज्यांना फंगल इन्फेक्शन कळतच नाही आणि रिंगवर्म समजून दुकानातून औषधं घेत राहतात. अनेकदा दोन्ही जांघांमध्ये घर्षण झाल्यानेसुद्धा खाज आणि रॅशेज येतात, ज्याकडे ते लक्ष देत नाही आणि मग नंतर हा त्रास वाढू लागतो. अशा लोकांनी पावसाळयात रोज फंगल पावडर वापरली तर या त्रासापासून दूर राहू शकतात.    अनेक महिला शरीरात फंगल इन्फेक्शन आहे म्हणून माझ्याकडे येतात.

‘‘फंगल इन्फेक्शन अलीकडे मुलांमध्येही आढळते आहे. याने त्रस्त लोकांना मी हाच सल्ला देते की  आपले कपडे रोज आणि वेगळे धुवा, त्यांना इस्त्री करा.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

हॅप्पी प्रेगनन्सी

– डॉ. साधना सिंघल

स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली

आई बनणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. परंतु अनेकदा काही कारणांमुळे काही स्त्रिया आई बनू शकत नाहीत. अशा परिस्थितीत निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु बऱ्याचदा काही गोष्टींची काळजी घेऊन आणि वैद्यकीय सल्ला घेऊन उणिवा दूर केल्यास आई बनण्याचे सुख मिळविता येऊ शकते.

जाणून घेऊया प्रेगनन्सीसाठी कोणकोणत्या खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच प्रेगनन्सीची प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत याबाबत :

महत्त्वपूर्ण खबरदारी

  • ३२ वर्षांनंतर, स्त्रियांमधील गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीचे वय ३२ वर्ष झाले असेल तर तिने तिच्या गर्भधारणेस उशीर करू नये. जर ती नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नसेल तर तिने त्वरित विशेषज्ञांना दाखवले पाहिजे.
  • धूम्रपान केल्यानेही आई बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इतकेच नाही, यामुळे गर्भपात होण्याचा धोकादेखील असतो, म्हणून स्त्रियांनी धूम्रपान करू नये.
  • खूप जास्त वजन असणेही आई बनण्यासाठी अडथळा ठरू शकते. जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला गरोदरपणात त्रास होत असेल तर तुम्ही आपले वजन कमी करा.
  • ज्या महिला शाकाहारी असतात, त्यांनी आपल्या आहारात फॉलिक अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन १२ घेण्याची गरज असते. शरीरात या पोषक तत्त्वांचा अभावही गर्भधारणेत अडथळा आणतो.
  • जर तुम्ही एका आठवडयामध्ये ७ तासांपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर तो कमी करणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त व्यायामामुळे ओव्हुलेशनची समस्या निर्माण होते, ज्यामुळे गर्भधारणेत त्रास होतो.
  • शारीरिक निष्क्रियताही कधीकधी गर्भधारणेत अडथळा आणते. जर तुम्ही खूप आळशी, शारिरीकदृष्टया अॅक्टिव्ह नसाल तर तुम्हाला अॅक्टिव्ह व्हावे लागेल.
  • एसटीआय अर्थात लैंगिक संक्रमणामुळेही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्हाला अशी काही समस्या असल्यास त्वरित उपचार करा.
  • पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, धातू यासह काही रासायनिक घटक असे असतात की ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. म्हणूनच शक्य तितके यांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
  • मानसिक तणावही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करते. म्हणून जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते टाळा.

 

गर्भधारणा कशी होते

एक स्त्री जिला दरमहा मासिक पाळी येते, तिच गर्भधारणा करू शकते. खरेतर २ मासिक पाळीदरम्यान ओव्हुलेशन कालावधी असतो. हा तो काळ असतो, जेव्हा अंडाशयातून अंडी रिलीज होतात, म्हणजे सोडली जातात. सामान्य स्थितीत एका स्त्रीमध्ये पुढील मासिक पाळीच्या २ आठवडयांपूर्वी ओव्हुलेशन प्रक्रिया सुरू होते. ओव्हुलेशनदरम्यान सोडलेली अंडी २४ तास जिवंत राहतात आणि त्यानंतर मरतात. ओव्हुलेशनदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध येतो, तेव्हा अंडी आणि शुक्राणू एकमेकांच्या संपर्कात येतात. त्याच वेळी, शुक्राणूने अंडयाला फर्टिलाइज्ड म्हणजे फलित केल्याने स्त्री गर्भधारण करते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वेळ

ओव्हुलेशनवेळी शारीरिक संबंध ठेवणे ही गर्भधारणेसाठी सर्वात चांगली वेळ असते. सामान्य स्त्रीमध्ये ओव्हुलेशनचा कालावधी ६ दिवस असतो. ओव्हुलेशननंतर जिथे अंडी फक्त १ दिवस टिकतात, शुक्राणू १ आठवडयापर्यंत टिकतात. अशाप्रकारे ओव्हुलेशन नंतरचे ५ दिवस गर्भधारणेसाठी उत्तम मानले जातात. विशेषज्ञांच्या मते, जर ओव्हुलेशनच्या १-२ दिवस आधी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेची क्षमता मोठया प्रमाणात वाढते, कारण यामुळे शुक्राणूंना अंडयांशी संपर्क साधण्यास अधिक वेळ मिळतो.

गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्या

गर्भधारणेनंतर स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते. तसे न केल्यास तिला अनेक समस्या येतात.

उच्च रक्तदाब : गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची तक्रार असते.

अॅनिमिया : गर्भवती महिलेने पुरेशा लोहाचे सेवन न केल्यास तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास आई आणि मूल, दोघांचाही जीव जाऊ शकतो.

संसर्ग : गर्भवती महिलेस इन्फ्लूएन्  हॅपिटायटीस ई, हर्पिस सिम्पलेक्स, मलेरिया इत्यादी आजार होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांवर वेळेवर उपचार करणे फारच गरजेचे असते, अन्यथा आई आणि मूल दोघांचा मृत्यू होऊ शकतो.

मूत्रमार्गातील असंयम : गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा मूत्रमार्गातील असंयम म्हणजे मूत्रमार्गाचे विकार होतात. ही समस्या उद्भवते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तणाव : गर्भावस्थेदरम्यान आणि नंतर बऱ्याच स्त्रिया प्रचंड मानसिक तणावाखाली येतात. या तणावाचा परिणाम आई आणि मूल दोघांवर होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मुलीला अवश्य सांगा मासिक पाळीसंबंधी या टीप्स

* प्रतिनिधी

बहुतांश आया मासिक पाळीबाबत मुलीशी मोकळेपणाने बोलत नाहीत. हेच कारण आहे की या दरम्यान मुली हायजिनच्या महत्वाकडे दुर्लक्ष करतात आणि अनेक समस्यांच्या भक्ष्य बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकता नसणे याचे मोठे कारण आहे. सादर आहेत काही टीप्स ज्या प्रत्येक आईने आपल्या किशोरवयीन मुलीला द्यायला हव्या. जेणेकरून ती मासिकपाळीदरम्यान येणाऱ्या सगळया समस्यांना तोंड देऊ शकेल.

कपडयाला नाही म्हणा : आजही आपल्या देशात जागरूकता कमी असल्याने मासिक पाळी दरम्यान तरुणी कपडा वापरतात. असे केल्याने त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. कपडयाचा वापर केल्याने होणाऱ्या आजारांबाबत आपल्या मुलीला जागरूक बनवणे हे प्रत्येक आईचे कर्तव्य आहे. मुलीला सॅनिटरी नॅपकीनचे फायदे सांगा आणि तिला याची माहिती द्या की हे वापरल्यास ती आजारांपासून दूर तर राहीलच, शिवाय या दिवसातही मोकळेपणाने वावरू शकेल.

केव्हा बदलावे पॅड : प्रत्येक आईने आपल्या मुलीला हे नक्कीच सांगावे की साधारणत: दर ६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलवायला हवे. याशिवाय आपल्या गरजेनुसारसुद्धा सॅनिटरी नॅपकीन बदलायला हवा. जास्त स्त्राव असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागते, पण जर स्त्राव कमी असेल तर सतत पॅड बदलायची गरज नसते. तरीही ४-६ तासांनी सॅनिटरी नॅपकीन बदलत राहावे जेणेकरून इन्फेक्शनपासुन सुरक्षित राहू शकू.

गुप्तांगांची नियमित स्वच्छता : मासिक पाळी दरम्यान गुप्तांगांच्या आजूबाजूच्या त्वचेत रक्त गोळा होते, जे संक्रमणाचे कारण बनू शकते. म्हणून गुप्तांगांची नियमित स्वच्छता करण्याचा सल्ला द्या. यामुळे व्हजायनातुन दुर्गंधी येणार नाही.

हे वापरू नका : व्हजायना आपोआप स्वच्छ ठेवण्याची एक नैसर्गीक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाचे संतुलन कायम ठेवते. साबण योनी मार्गात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाना नाहीसे करू शकते. म्हणून याचा वापर करू नका, असा सल्ला द्या.

धुण्याची योग्य पद्धत : मुलीला सांगा की गुप्तांगांना स्वच्छ ठेवण्यासाठी योनीकडून पार्श्वभागाच्या दिशेने स्वच्छ करा म्हणजे समोरून मागच्या दिशेने. उलटया दिशेला कधीही करू नका. उलटया दिशेने धुतल्यास पार्श्वभागात असलेले बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि संक्रमणाचे कारण बनू शकतात.

सॅनिटरी पॅडची विल्हेवाट : वापरलेले पॅड योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने फेकायाला सांगावे, कारण हे संक्रमणाचे कारण बनू शकतात. पॅडस फ्लश करू नका, कारण यामुळा टॉयलेट ब्लॉक होऊ शकते. नॅपकीन फेकल्यावर हात नीट धुणे आवश्यक आहे.

रॅशेशपासून कसे दूर राहाल : मासिक पाळीत जास्त स्त्राव झाल्यास पॅडसचे रॅशेश येण्याची संभावना खूप वाढते. असे साधारणत: तेव्हा होते जेव्हा पॅड खूप काळ ओला राहतो आणि त्वचेववर घासल्या जातो. म्हणून मुलीला वेळोवेळी पॅड बदलायला सांगा. जर रॅश आलाच तर आंघोळीनंतर आणि झोपताना अँटीसेप्टीक ओइन्टमेन्ट लावा. जर ओइन्टमेन्ट लावूनही रॅश बरा झाला नाही तर तिला डॉक्टरकडे घेऊन जा.

एकाच प्रकारचा सॅनिटरी नॅपकीन वापरा : ज्या किशोर वयीन मुलींमध्ये स्त्राव जास्त होतो, त्या एकाच वेळी २ पॅड्स अथवा एका पॅडसोबत टोपोन वापरू शकतात किंवा कधीकधी सॅनिटरी नॅपकिनसोबत कपडासुद्धा वापरू वापरतात म्हणजे असे केल्याने त्यांना दीर्घ काळ पॅड बदलावे लागत नाही. अशा वेळी मुलीला सांगा की एका वेळी एकाच प्रोडक्ट वापर. जेव्हा एकाच वेळी दोन प्रकारचे प्रॉडक्ट वापरल्या जातात तेव्हा जाहीर आहे की हे बदलता येत नाहीत, ज्यामुळे इन्फेक्शनची संभावना आणखीनच वाढते.

लठ्ठपणा तुम्हाला ओझं वाटतोय का?

* शैलेंद्र सिंह

उत्तर प्रदेशात प्रयागराज शहरात राहणारी वर्निका शुक्ला स्वत:ला उत्तर प्रदेशातील पहिली प्लस साईज मॉडेल म्हणवून घेते. तिने राष्ट्रीय स्तरावरील अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. ती मॉडेलिंग करते आणि यासोबतच ती सिंगल मदर्ससाठी ‘मर्दानी द शेरो’ ही संस्थासुद्धा चालवते. ती टीचर आहे. ती इतके काम करते की तिच्याकडे पाहून कोणीही असे म्हणू शकत नाही की प्लस साईज सुंदर नसते.

प्लस साईजच्या बाबतीत फॅशनजगत बदललेले आहे. वर्निका सांगते की अलीकडे फॅशन वीकमध्ये प्लस साईजचा एक वेगळा राउंड असतो. फॅशन क्षेत्रात अशी अनेक दुकानं असतात, ज्यात प्लस साईज कपडे मिळतात. अशा कपडयांसाठी प्लस साईज मॉडेलची गरज असते. त्यामुळे प्लस साईजमुळे चिंतीत व्हायची आवश्यकता नाही.

साईज नाही मानसिकता बदला

समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. यात अनेक लोक असे असतात जे लठ्ठ असूनही आपले काम चांगल्याप्रकारे करत कार्यरत असतात आणि काही असेही असतात, जे तेवढे लठ्ठ तर नसतात पण उगाच चिंतित असतात.

सायकोथेरपीस्ट नेहा आनंद मानतात, ‘‘लठ्ठपणा ही एक मानसिक समस्या आहे. जर तुम्ही असेच मानू लागलात की तुम्ही लठ्ठ आहात आणि कोणतेच काम करू शकत नाहीत तर खरेच काहीही करू शकणार नाही. जर तुम्ही तुमचे खाणेपिणे व्यवस्थित ठेवून व व्यवस्थित व्यायाम करून शरीराला तंदुरुस्त ठेवत असाल तर लठ्ठपणा कधीच तुमच्या मार्गातला अडथळा ठरणार नाही.’’

याबाबत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे की फॅट्सची शरीराला आवश्यकता असते. हे शरीराच्या बायोलॉजिकल कार्यांमध्ये विशेष भूमिका निभावते. फॅट्सची एक सूक्ष्म रेखा असते. जर लठ्ठपणाची ही सूक्ष्म रेखा पोटाच्या आसपास भेदून जात असेल तर धोका वाढतो. मुलींनी आपली वेस्टलाइन ३५ इंचांपेक्षा कमी आणि मुलांनी ती ४० इंचांपेक्षा कमी ठेवायला हवी.

फॅट्स नियंत्रणात ठेवणारा आहार घ्या

पोट भरावे म्हणून खाऊ नका. खाताना हे लक्षात ठेवा की आहार असा असावा, ज्यामुळे शरीराला चांगल्या प्रमाणात कॅलरी मिळू शकतील. काही पदार्थ असे असतात की ते खाल्ल्याने पोट भरते पण योग्य प्रमाणात कॅलरी मिळत नाही. केवळ फॅट्स वाढतात. जितक्या कॅलरीज तुम्ही अन्नाद्वारे घेता तेवढया बर्न करायला तेवढी मेहनतसुद्धा करावी लागते. एका शरीराला १६०० कॅलरीजची गरज असते. जर काम कमी करत असाल तर १००० ते १२००  कॅलरीज घ्यायला हव्या. आक्रोड, बदाम, राईचे तेल आणि डाळी यात फॅट्स कमी करणारे पदार्थ आढळतात.

तळलेल्या पदार्थांच्या जागी भाजलेले मोड आलेले कडधान्य घ्या. याने पोटही भरते व शरीराला पौष्टीक घटकसुद्धा मिळतात. डाएट शेड्युलची आखणी करताना द्रव पदार्थांचासुद्धा समावेश करा. शहाळयाचे पाणी व मोसंबीचा रस यांचा जास्त वापर केल्यास फॅट्स वाढत नाहीत. फॅट्स कमी करायला एखाद्या स्लिमिंग सेंटरमध्ये जाण्यापेक्षा व्यायाम करा. लठ्ठपणा शरीराला मिळणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या कॅलरीतील असंतुलन वाढवते.

व्यायाम न करणाऱ्यांमध्ये वा बसून काम करणाऱ्यांमध्येसुद्धा ही समस्या वाढलेली आढळते. अनेक लोक मानसिक तणावाखाली असताना जास्त जेवण घेतात. यामुळेसुद्धा लठ्ठपणा वाढतो. किशोरावस्थेत आलेला लठ्ठपणा नंतर टिकून राहतो. महिलांमध्ये काही शारीरिक बदल झाले तर लठ्ठपणा वाढतो. गर्भावस्थेत लठ्ठपणा वाढतो. शरीराचे अपेक्षित वजन उंचीप्रमाणे असावे, ज्यांमुळे शरीराची प्रमाणबद्धता सुंदर वाटेल. बॉडी मास हा शरीराचे योग्य वजन मोजायचा अचूक उपाय आहे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) उंचीचा गुणाकार करून वजन किलोग्रॅमशी भागाकार करून मोजता येतो.

सेक्समध्ये बाधक नसतो लठ्ठपणा

अधिकांश लोकांचा असा ग्रह असतो की लठ्ठपणा सेक्समध्ये अडथळा आणतो. सेक्समध्ये समाधानी नसल्याने वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होतो. ज्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व त्याचा लठ्ठपणा बिघडवत नाही, अशा व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात व त्यांना सेक्स करण्यात काही अडचण येत नाही. जर एखाद्याचा जोडीदार लठ्ठ असेल तर दुसऱ्याने त्याला सेक्स करण्यास उद्युक्त करायला हवे. सेक्सदरम्यान अशा क्रिया अवलंबायला हव्या, ज्यात लठ्ठपणा बाधा आणणार नाही. लठ्ठ व्यक्ती लवकर थकतात.

लठ्ठ स्त्रिया आणि पुरुषांच्या वेगवेगळया समस्या असतात. लठ्ठपणाला अगदी सहजतेने घेऊन सेक्स क्रियांमध्ये बदल करून त्याचा आनंद उपभोगता येऊ शकतो. लठ्ठ व्यक्तीला वाटत असते की ती आपल्या जोडीदाराला सेक्सबाबत समाधानी ठेवू शकत नाही. म्हणून आपल्या मनात न्यूनगंड न ठेवता आपल्या जोडीदाराच्या गरजा समजून घेऊन त्याला सहकार्य करायला हवे.

शरीर तसेच मनही फिट ठेवा

लठ्ठपणामुळे आपला जुना काळ आठवून तुलना करणे योग्य नाही. अनेकदा लोक आपले जुने फोटो पाहून असे म्हणत असतात की मी पूर्वी असा होतो. मी बारीक तर होतोच पण किती आकर्षक होतो. असे विचार नैराश्य आणण्यास मदत करतात. नेहमी आपण आपल्या लठ्ठपणाबाबतच विचार करत राहतो. अशी मानसिकता बरी नाही की मी २० वर्षांचा होतो तेव्हा शारीरिक आणि आकर्षक होतो.

शारीरिक आकर्षणच सगळे काही नाही

नेहा आनंद सांगतात, ‘‘केवळ शारीरिक आकर्षणच असणे जरुरी नसते. माणसाला स्वत:ला तेव्हा जास्त चिंतेत असल्यासारखे जाणवते जेव्हा त्याला लठ्ठपणाऐवजी मूर्ख समजतात. बाह्य सौंदर्याला जास्त महत्व देऊ नये. माणसातील शिस्त, मेहनत, काम करण्याप्रती निष्ठा हे गुण त्याला आकर्षक बनवत असतात.’’

१२० किलो वजन असलेल्या दिवाकरचे म्हणणे आहे, ‘‘माझा लठ्ठपणा पाहून डॉक्टर म्हणतात की मधुमेह व रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी मी ६ महिन्यात २०-२५ किलो वजन कमी करायला हवे. असे असूनही मला असे वाटते की मी ५ तुकडे असलेला पिझ्झा ३-४ तासात संपवू शकतो. माझे असे मत आहे की आयुष्य फार छोटे आहे. ते आपण आपल्या पद्धतीने जगायला हवे. आपले आवडते पदार्थ खाणे सोडून वेडयाप्रमाणे बारीक होण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. जसे आहात तसेच आनंदी राहायला शिका.’’

दुसऱ्याशी तुलना करून स्वत:ला अस्वस्थ होऊ देऊ नका. काही लोक अस्वस्थपणामुळे नशेचे शिकार होतात. समाजापासून स्वत:ला वेगळे करून घेतात. जसे वय वाढते ही अस्वस्थता कमी होते, कारण व्यक्तीला वाटते की आता म्हातारे झाल्यावर काही फरक पडत नाही. उलट त्याला असे वाटू लागते की तो आणखीनच परिपक्व झाला आहे. त्याने स्वत:ला वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेतलेले असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें