* प्रतिनिधी

जर योग्य पद्धतीने ब्रश केलं नाही तर दातांमध्ये किड, पायरिया इ. समस्या उद्भवू शकतात. म्हणून ब्रश करताना सावधगिरी बाळगावी आणि यात हलगर्जीपणा करू नये. डेंटिस्ट असेही सुचवतात की योग्य पद्धतीने ब्रश केल्यानेच दातांच्या समस्येपासून बचाव करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने ब्रश करण्याची सवय लावून घ्या आणि दातांना आजारांपासून वाचवा.

योग्य ब्रशचा वापर

ब्रशची निवड करताना नेहमी काळजी घ्यावी. ब्रशचा आकार लहान आणि मोठा असता कामा नये. ब्रश मध्यम आकाराचा वापरावा. मोठा ब्रश आतपर्यंत नीट पोहोचणार नाही आणि लहान ब्रश पकडण्यातही सहजता असावी. त्याची पकडही योग्य असावी. ब्रिटिश सेंदूल हेल्थ फाऊंडेशन मुलायम ब्रश वापरण्याचा सल्ला देतात.

ब्रशच्या चुकीच्या सवयी

एका दिवसात दोनदा ब्रश करण्याचा सल्लासुद्धा तज्ज्ञ देतात. पण तुम्हाला जर दात आणि हिरड्या निरोगी ठेवायच्या असतील तर कुठलेही गोड पेय प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ करावे. तसेच दिवसातून ३ किंवा ४ वेळा ब्रश करणेही टाळावे. सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ब्रश करणंच दातांचं आरोग्य कायम राखण्यासाठी पुरेसे आहे. आरामशीर २ किंवा ३ मिनिटे ब्रश करणेच पुरेसे आहे.

दातांची खोलवर स्वच्छता

काही लोक ब्रश करताना फक्त बाहेरील दातांचीच स्वच्छता करतात. प्लेकसारख्या समस्या दातांच्या आतल्या थरापासून सुरू होते. म्हणून दातांची स्वच्छता करताना आतूनही दात स्वच्छ करावेत.

ब्रश स्वच्छ ठेवा

जर तुम्ही बाथरूममध्ये ब्रश ठेवत असाल तर त्या जागी ओलावा असल्याने तिथे किटाणू जमा होऊ लागतात. म्हणून ब्रश कोरड्या जागीच ठेवा. जर ब्रशला कव्हर असेल तर ते नक्की लावा. ब्रश करण्याआधी आणि ब्रश केल्यानंतर ब्रश जरूर स्वच्छ करा.

ब्रश न बदलणे

प्रत्येक डेंटल असोसिएशन हाच सल्ला देते की स्वत: चा ब्रश दर ३ महिन्यांच्या अंतराने बदलावा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे ब्रिस्टल्स तुटू लागतात. अशावेळी तुम्ही ब्रश बदलला पाहिजे.

दातांना आजारांपासून वाचवण्यासाठी योग्यप्रकारे ब्रश करण्याबरोबरच त्याचा योग्य वापर कसा करावा हेही जाणून घ्या. असे केल्याने तुमचे दात स्वस्छ आणि मजबूत राहण्यास मदत होईल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...