अशाप्रकारे घ्या दागिन्यांची काळजी

* प्रतिनिधी

दागने कोणत्याही धातूचे असले तरी ते नियमितपणे वापरल्यास त्याच्यावर धूळ जमा होते. मग हळूहळू त्याची चमक कमी होत जाते.

अशावेळी दागिन्यांची विशेष देखभाल करणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांची चमक तशीच नव्यासारखी राहील. तुम्ही त्या दागिन्यांची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी सराफाकडे घेऊन जाऊ शकता. ते दागिन्यांना केमिकलने स्वच्छ करतात. पण सातत्याने असे केल्यास दागिन्यांच्या वजनात घट होते.

सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही. पण रोजच्या वापरातल्या किंवा सातत्याने वापरात येणाऱ्या दागिन्यांची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते.

सुभाषिनी ऑर्नामेंटचे ज्वेलरी डिझायनर आकाश अग्रवाल यांनी दागिन्यांची चमक सदाबहार ठेवण्यासाठी काही सोप्प्या पद्धती सांगितलेल्या आहेत :

अशाप्रकारे घरीच दागिन्यांची सफाई करा

सोन्याचे दागिने : सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी प्रथम त्यांना स्वच्छ कपडयाने पुसून घ्या. मग चिमुटभर हळद लावून मलमलच्या कपडयाने हलकेच रगडले की दागिने स्वच्छ होतील.

डिश सोपने स्वच्छता : एका वाटीत गरम पाणी घेऊन त्यात लिक्विड साबणाचे काही थेंब मिसळा. अधिक चांगला परिणाम पाहण्यासाठी सोडियम फ्री सॅल्टजर किंवा क्लब सोडयाचा वापर करू शकता. नाजुक आणि रत्नजडित दागिन्यांवर उकळत्या पाण्याचा वापर करू नये. सोन्याच्या दागिन्यांना साबणाच्या पाण्यात १५ मिनिटांसाठी भिजवत ठेवा. गरम साबणाचे पाणी दागिन्यांच्या कोपऱ्यात जाऊन तेथे अडकलेल्या धुलीकणांना सैल करतील मग सॉफ्ट टूथब्रशने ते साफ करून घ्या. बाजारात दागिन्यांची सफाई करण्यासाठी विशेष ब्रश उपलब्ध आहे.

चांदीचे दागिने : चांदीचे दागिने नेहमी डब्यात बंद करून ठेवा. हवा आणि दमटपणाने ते काळे पडू शकतात. नियमितपणे उपयोगात येणाऱ्या चांदीच्या दागिन्यांना थोडयाशा टूथपेस्टने हातानेच हळूवारपणे स्क्रब करा आणि काही वेळासाठी तसेच ठेवून द्या. मग सॉफ्ट टूथब्रशने हळूहळू साफ करा.

* एक वाटी गरम पाण्यात १ चमचा बेकिंग सोडा घालून ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यात चांदीचे दागिने काही वेळासाठी बुडवा. मग त्यांना पाण्यातून काढा आणि मलमलच्या कपडयाने नीट पुसून घ्या.

* ब्लीच विरहीत डिटर्जंट पावडरनेदेखील चांदीचे दागिने साफ करता येतात. एका वाटीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंटचा घोळ बनवून घ्या.

* बटाटे उकडलेले पाणी वापरून चांदीचे दागिने स्वच्छ केल्यास चमक येईल.

मोत्यांचे दागिने : सफेद चमकदार मोती प्रत्येकाचेच मन मोहून घेतात. पण त्यांची काळजी घेतली नाही तर त्यांची चमक हरवून जाते. मोत्यांवर कोटींग केलेली असते. त्यामुळे दमट वातावरणात ते कोटींग निघण्याची शक्यता अधिक असते.

* मोत्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर लगेच रंगविरहीत नेलपेंटचा एक कोट लावून घ्या, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत.

* मोत्यांचे दागिने कापसावर स्पिरीट लावून स्वच्छ करा म्हणजे ते चमकदार दिसतील.

* जर मोती अस्वच्छ दिसत असतील तर मलमलचा कपडा पाण्याने ओला करूम हळूहळू स्वच्छ करा.

* मोत्याच्या दागिन्यांना शार्प दागिन्यांसह ठेवू नका. नाहीतर त्यावर स्क्रॅचेस येऊ शकतात.

* मोत्यांच्या हाराला वर्षातून एकदा सराफाकडून व्यवस्थित बांधून घ्या म्हणजे ते मजबूत राहतील.

प्लॅटीनमचे दागिने : प्लॅटीनमला सोने म्हणूनही संबोधले जाते. याप्रमाणे घ्या काळजी :

* प्लॅटीनमच्या दागिन्यांना अमोनियाने साफ करू नका.

* साबणाच्या पाण्यात जास्त वेळ ठेवू नका.

* प्लॅटीनमचे दागिने स्वच्छ करण्यासाठी साबणाचा फेस बनवून छोटया ब्रशने हलक्या हातांनी साफ करा, मग ते धुवून सुकवा.

सेक्सलाइफ रिचार्ज करणे आहे गरजेचं

* अंजू जैन

माहेरी आलेली नणंद अभिलाषाचा उतरलेला चेहरा पाहून वहिणीने विचारले, ‘‘पवनसोबत काही वाद झाला आहे का?’’ अभिलाषा काहीच बोलली नाही. पण अनुभवी वहिणीने अधिक आपुलकीने विचारताच तिचे डोळे पाणावले. अभिलाषा स्वत:ला रोखू शकली नाही. मग अभिलाषाने तेच सांगितले ज्याचा संशय वहिणीला आला होता. अभिलाषा म्हणाली, ‘‘लग्नाला केवळ २ वर्षेच झाली आहेत… पवनला माझ्यात काहीही इंटरेस्ट उरलेला नाही… इच्छा झालीच तर एखाद्या यंत्राप्रमाणे तो सर्व करुन झोपून जातो… रोमान्स नाही की मजामस्ती नाही.’’

पत्नींची एक सर्वसामान्य तक्रार अशी असते की, लग्नानंतर २-३ वर्षे पती त्यांच्या मागूनपुढून फिरत असतात, पण नंतर इंटरेस्ट घेणे बंद करतात. अशा परिस्थितीत पत्नींना आपण उपेक्षित असल्यासारखे वाटू लागते.

वेगवेगळया तक्रारी

शेकडो जोडप्यांच्या केलेल्या अभ्यासानुसार, पत्नीने केलेल्या या तक्रारीचीही पुष्टी झाली. या अभ्यासानुसार हनीमून फेज जो ३ वर्षे ६ महिन्यांचा असतो, तो संपल्यानंतर पती-पत्नी दोघेही एकमेकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सोडून देतात. दोघेही सुंदर दिसणे, एकमेकांची काळजी घेणे यासाठीचे अतिरिक्त प्रयत्न करणे सोडून देतात. प्रेम ही एक नॉर्मल गोष्ट आहे असे त्यांना वाटू लागते. एकीकडे बायका तक्रार करतात की पती पूर्वीसारखे त्यांच्यावर प्रेम करत नाहीत आणि त्यांच्याशी लैंगिक संबंधात जास्त रस घेत नाहीत, तर दुसरीकडे पतीही अशीच काहीशी तक्रार करतात.

अभिलाषासारख्या पत्नींना हे समजून घ्यावे लागेल की, पतीनेच नेहमीच पत्नीमध्ये इंटरेस्ट का दाखवायचा? पतीनेच लैंगिक संबंधासाठी आर्जव किंवा पुढाकार का घ्यावा? यासाठी पत्नीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पतीने का करू नये?

जर तुम्ही तुमच्या लैंगिक संबंधात पहिल्या इतकीच ऊर्जा टिकवून ठेवू इच्छित असाल तर या टीप्स नक्की जाणून घ्या :

स्वत:चेच लाड करा : तुम्ही यापूर्वी तुमच्या भुवया, नखे, ओठ, अंडरआर्म्स, पाठ, त्वचा, केस आणि चेहऱ्याची किती काळजी घेत होता, हे आठवते का? दररोज सकाळी ड्रेस घालण्यापूर्वी कोणता ड्रेस घालावा, याची निवड करायला तुम्ही कितीतरी वेळ घेत होता आणि आता लाल ब्लाऊजवर हिरव्या रंगाची साडी, ओठांची निघालेली सालपटे, अंडरआर्म्सचा घामाचा वास आणि बिकिनी एरियातील केस अशा अवस्थेत तुम्ही असता.

जरा विचार करा, कमरेवरची चरबी, सुटलेले पोट, या सर्वांमध्ये पतीचा दोष आहे का? नाही? मग उशीर कशाला करता? पेडिक्योर, मॅनिक्योर, स्पा, फेशियल, हे सर्व कधी उपयोगी पडणार? जिम, एक्सरसाईज करुन स्वत:ला पुन्हा फिट ठेवा. आनंदी रहा, हसत रहा, मग बघा काय कमाल होते ती.

अंतर्वस्त्रांचा मेकोव्हर गरजेचा : सेक्स लाईफमध्ये कंटाळा येण्याचे सर्वात मोठे कारण असते ते आकर्षणाचा अभाव. अनेक महिला लग्नाच्या २-४ वर्षांनंतर अंतर्वस्त्र घालणेही थांबवतात. काही ते घालत असले तरी रंग उडालेले, फाटलेले, घाणेरडे झालेले अंतर्वस्त्र पाहून मळमळायला होते.

अशा बायकांना वाटत असते की, अंतर्वस्त्रांकडे कोण बघणार? त्या हे का विसरतात की, ज्याला ते दाखवायचे आहे त्यालाच तर इम्प्रेस करायचे आहे. रोमांसमध्ये चिंब भिजलेला नवरा जेव्हा तुमच्याकडे पाहून पुढे सरसावतो आणि अंतर्वस्त्रांची अशी अवस्था पाहतो तेव्हा विश्वास ठेवा त्याच्यातील अर्धा रोमांस गायब होतो. त्यामुळे थोडे पैसे खर्च करुन सेक्सी अंतर्वस्त्र घ्यायला काहीच हरकत नाही.

रोमान्सची संधी द्या : रोज तोच बेडरूम, तेच वातावरण… यामुळेही सेक्स कंटाळवाणे होऊ लागते. पतीसोबत वर्षातून १-२ वेळा फिरायला जा. नोकरी किंवा मुलांचे शिक्षण यामुळे बाहेर जाणे शक्य नसेल तर वीकेंडला शहरातच फिरायला जा. पार्कमध्ये जा. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पहा किंवा शॉपिंग मॉलमध्ये विंडो शॉपिंगसाठी जा आणि त्यावेळी थोडेसे फ्लर्टी व्हा. प्रेमाने गप्पा मारणे, रोमँटिक बोलणे यातून पतीला उत्तेजित करण्यासोबत तुम्हीही सेक्ससाठी तयार आहात, याची त्याला जाणीव करुन द्या. मग पहा की, पतीचा स्वत:वरचा ताबा सुटून तो तुमच्या मिठीत येण्यासाठी आतूर होईल.

गॅझेट्सचा वापर करा : आजकाल मोबाईल फोन किंवा टॅब खूप उपयोगाचे ठरत आहेत. कधीकधी याचाही फायदा घ्या. लपून पतीची एखादी विशिष्ट पोझ किंवा अस्ताव्यस्तपणे पलंगावर झोपल्यानंतरचा त्याचा फोटो काढा. त्याला तो रात्री दाखवा. नवरा घराबाहेर असल्यास, रोमँटिक एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप पोस्ट पाठवा. यामुळे पती तुमच्यासोबत रोमांस करण्यासाठी व्याकूळ होईल. रोमांस म्हणजेच प्रणयाच्या क्षणांना जादुई स्पर्श देण्यासाठी, बेडरूममध्ये एखादे सेक्सी किंवा रोमँटिक गाणे हळू आवाजात लावा घाला आणि त्यानंतर एकमेकांमध्ये हरवून जा.

उत्कंठा प्रेमींना आकर्षित करणारं ठिकाण

* प्रतिनिधी

आपल्या सर्वांनाच रोजच्या दगदगीतून शांतता मिळावी म्हणून सुट्ट्यांची गरज असते. जिथे आपण शरीराला थोडा आराम देऊ शकू आणि पुन्हा रोजच्या कामासाठी दुप्पट उर्जेने परतू शकू. अशात जर तुमच्या मनाबरोबरच आत्म्याची शांतता ही हवी असेल तर जॉर्डनला नक्की जा.

आपल्यामध्ये बऱ्याच व्यक्ती अशा असतात, ज्या दुसऱ्यांना पोहताना पाहून खूप खूश होतात. त्यांनाही पाण्यात उतरावेसे वाटते. पण कुठल्याशा भीतिमुळे ते पाण्यात जाण्यास घाबरतात. पण आज अशा समुद्राची तुम्हाला ओळख करून देणार आहोत जिथे पोहता न येणारे लोकसुद्धा सहजपणे पोहू शकतात आणि असे करण्यासाठी त्यांना लाइफ जॅकेटचीही गरज नसते.

या समुद्राचे नाव डेड सी. डेडसी जॉर्डन आणि इस्त्रायल यांच्या मधोमध आहे. या समुद्राला सॉल्ट सी असेसुद्धा म्हटले जाते.

यामुळे म्हणतात डेड सी

याचे नाव डेड (मृत) सी पडले आहे, कारण येथील सर्व वस्तू मृत आहेत. इथे ना झाडं झुडुपं आहेत ना गवत. इतकेच नाही तर इथे कोणत्याच प्रकारचे मासेही नाहीत. यामागील कारण असे की येथील समुद्राचे पाणी सरासरीपेक्षा ८ पट जास्त क्षारयुक्त म्हणजे खारट आहे. म्हणून याला खाऱ्या पाण्याचा समुद्र किंवा सरोवर असेही म्हटले जाते. हा समुद्र जॉर्डनच्या पूर्वेला आहे, तर पश्चिमेला इस्त्रायलच्या सीमेजवळ आहे.

यात अनेक विषारी खनिज मीठ जसे मॅग्नीशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड इ. भरपूर प्रमाणात आढळते. या सर्व क्षारांच्या अधिक प्रमाणामुळे इथे समुद्री झुडपे आणि समुद्री जीव राहण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. या समुद्राचे पाणी ना पिण्यासाठी वापरले जाऊ शकते ना इतर कुठल्या कामासाठी. डेड सी ६७ कि.मी. लांब आणि १८ कि.मी. रूंद आहे. याची खोली ३७७ मीटर (साधारण १२३७ फूट) आहे. हे या विश्वातील सर्वात खोल खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

यामुळे कोणी बुडत नाही

पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असल्याने इथे कोणी बुडत नाही. याचमुळे लोकांना या समुद्रात पोहायला आवडते. इतर समुद्रांपेक्षा हा समुद्र खूप वेगळा आहे. या वैशिष्ट्यामुळे जगभरात हा समुद्र प्रसिद्ध आहे. दूरदुरून लोक इथे येतात आणि आनंद लुटतात.

इर्षा नेहमीच वाईट नसते

* पूनम पांडे

इर्षा किंवा द्वेष या भावनेकडे हल्ली मानसोपचारतज्ज्ञ व समाजसुद्धा एका नव्या दृष्टीने पाहू लागले आहेत. त्यांचा शोध असे सिद्ध करत आहे की जर कोणाची प्रगति पाहून तुम्हाला इर्षा वाटत असेल तर घाबरण्यापेक्षा याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला हवे. जर या इर्षेतून प्रेरणा घेऊन आपली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर परिस्थिती बदलू लागेल. याचा फायदा असा होईल की या इर्षेमुळे तुमचे नुकसान होण्याऐवजी तुम्हाला आनंदाचा मार्ग मिळेल.

दुसऱ्यांची प्रगति किंवा यश पाहून इर्षेने जर तुम्हीही चांगले प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला तर ही इर्षा तुमच्यासाठी सुखद ठरू शकते. हे भविष्यासाठी शुभ संकेत आहेत.

नवे प्रयोग करा

असं म्हणतात की भावनांना कुणी थोपवू शकत नाही, पण आपला दृष्टीकोन तर बदलता येऊ शकतो ना? सांगण्याचे तात्पर्य हेच की दृष्टीकोन जर सकारात्मक बाळगून स्वत:ला चांगल्या वातावरणासाठी तयार करत राहावे नाहीतर फक्त इर्षाच केल्याने मानसिक शांती हरवून जाईल. बरोबरच हृदय, यकृत, रक्तदाब इ. आजारही तुमच्या शरीराचा ताबा घेतील.

वेळेचे महत्त्वं ओळखून आपल्या इर्षेचा लाभ करून घेतला जाऊ शकतो. म्हणजे जगही नवनवे प्रयोग करून प्रगती साधत आहे, तर तुम्हीही करून पाहा. जर काळाप्रमाणे नाविन्य आणि ताजेपणा अपेक्षित असेल तर तुम्हीही असेच करण्याकडे लक्ष केंद्रित करा.

लक्ष्य ठरवा

मनात जर इर्षेची भावना जोर धरत असेल तर आपले लक्ष्य एखादे ध्येय गाठण्याकडे वळवा. याचा खूप फायदा होऊ शकेल. याबाबतीत आळशी व कामचोर लोक फक्त विचारच करत बसतील व वेळेला दोष देत राहतील. पण ध्येय गाठणारे लोक स्वत:चा तोल ढळू देत नाहीत. पटकन् आपल्यातील कमतरता ओळखतात व आपले ध्येय निश्चित करतात व इर्षा नावाच्या या रोगाला आपले औषध बनवतात.

मुल्यांकन करा

आपली स्पर्धा स्वत:शीच करणे हे अतिउत्तम असतं म्हणजे दरदिवशी मागील दिवसापेक्षा चांगले व उत्तम बना. यासाठी एक दिनदर्शिका तयार करणे खूपच उपयुक्त ठरते. स्वत:चं खरंखुरं मुल्यांकनही करता आलं पाहिजे. यात दिनदर्शिकेची खूप मदत होते. काळचक्र आणि प्रकृती आपल्यासाठी नेहमी चांगली व्यवस्था करून ठेवत असते. यावर अवश्य विचार करत राहिलं पाहिजे.

स्वत:शीच विचारविनिमय केला तर आपल्याला आपल्यातील उणिवा कळून येतील. आपल्यातील कमतरतेलाच आव्हान बनवून हिम्मत ठेवणे खरोखर एक उत्तम पर्याय आहे. अजिबात घाबरू नका. बस्स, नाराजी व तक्रारींमध्ये थोडीशी कपात करून शक्यता जागृत करा व जीवनाला सावरून घ्या.

स्वयंपाकघरातील प्रदूषण टाळणेदेखील महत्त्वाचे आहे

* पारुल भटनागर

भारतीय मसाले केवळ चवच वाढवत नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. परंतु जिथे ते अन्नाची चव वाढवतात तिथे तेल-मसाल्याने समृद्ध अन्न शिजवताना स्वयंपाकघरात खूप धूरही होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.

महिलांचा बराच वेळ स्वयंपाकघरात व्यतीत होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्यासाठी असे एखादे साधन, जे स्वयंपाकघरातील धूर क्षणार्धात बाहेर काढून टाकते आणि स्वयंपाकघर प्रदूषणमुक्त करते, तर ते म्हणजे चिमणी आहे.

पूर्वी भारतीय घरे मोठी होती आणि स्वयंपाकघर सामान्यत: उघडयावर बनविले जात असे जेणेकरून घरात स्वयंपाकघराच्या धुराचा प्रसार होऊ नये, परंतु लोकसंख्या वाढत असल्याने कुटुंबं फ्लॅटमध्ये संकोचित होत आहेत, ज्यामध्ये हवा आणि प्रकाशाची कमतरता असते आणि लोक आरोग्याशी संबंधित समस्यांचे बळी ठरतात. हे टाळण्यासाठी चांगल्या वायुवीजनासह, विद्युत उपकरणे योग्य प्रकारे साफ करणेदेखील आवश्यक आहे जेणेकरून घराच्या आत प्रदूषण होणार नाही.

स्वयंपाकघरात प्रदूषणाची कारणे

आता स्वयंपाकघर फक्त गॅसपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता जुन्या स्वयंपाकघराचे रूपांतर मॉडयूलर किचनमध्ये केले जात आहे, ज्यामध्ये टोस्टर, मायक्रोवेव्ह ओव्हन आणि इतर बऱ्याच गोष्टी ठेवल्या जात आहेत. परंतु या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जसा वेळ वाचतो, तसंच ते प्रदूषणदेखील पसरवतात, जे बाह्य प्रदूषणापेक्षा बरेच अधिक धोकादायक आहे. चला, याविषयी जाणून घेऊया :

टोस्टर : सर्व इलेक्ट्रिक बर्नर वाफेने-निर्मित धूळीपासून सूक्ष्मकण तयार करतात, जे प्रदूषणास जबाबदार आहेत. जेव्हा आपण बराच काळ टोस्टर वापरत नाही आणि पुन्हा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा त्यात साचलेली घाण वाफेच्या रूपात सूक्ष्मकणांमध्ये बदलते आणि प्रदूषणास कारणीभूत ठरते, ज्यामुळे आरोग्याशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागते.

मायक्रोवेव्ह : इंग्लंडच्या मॅनचेस्टर विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार मायक्रोवेव्ह ओव्हन कार्बन डायऑक्साईडचे अत्यधिक प्रमाणात उत्सर्जन करतात, जे कारपेक्षा अधिक धोकादायक प्रदूषण पसरवण्याचे काम करते.

रोटी मेकर : जरी रोटी मेकर त्वरित गरमागरम रोटया तयार करत असेल परंतु तो ही आपल्या घरास प्रदूषित करत आहे हे आपणास ठाऊक आहे काय? जर आपल्या घरात यापासून निघणारा धूर बाहेर काढण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसेल तर याचा वापर काळजीपूर्वक करा.

ही समस्या कशी सोडवावी

* स्वयंपाकघरातून धूर आणि घाण काढून टाकण्यासाठी घरात योग्य वायुवीजन असण्याबरोबरच चिमणीचीही व्यवस्था करावी जेणेकरून घरात प्रदूषण होणार नाही.

* चिमणीवर साचलेली घाण काढून टाकण्यासाठी, थोडया-थोडया दिवसांनंतर फिल्टर आणि त्याचे फ्रेम स्वच्छ करा.

* जेव्हा-जेव्हा आपण टोस्टर, मायक्रोवेव्ह नंतर कॉफी किंवा चहा मेकर वापरता तेव्हा त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण जेव्हा या उपकरणांवर घाण जमा होते तेव्हा प्रदूषणाचा धोका जास्त असतो.

* एकावेळी फक्त एकच इलेक्ट्रिक डिव्हाइस वापरण्याचा प्रयत्न करा.

दानाच्या मोबदल्यात प्रेम मिळविण्याची धार्मिक पद्धत

* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

आत्महत्या हा समस्येवर उपाय नाही

* गरिमा पंकज

मार्च २०२० मध्ये हैदराबाद येथील एका सॉफ्टवेअर अभियंत्याने कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्याने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी वडिलांना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अभियंत्याने वाढत्या कर्जाचा बोजा हे त्याच्या आत्महत्येचे कारण असल्याचे नमूद केले आहे. त्याने एका गृहनिर्माण वित्त कंपनीकडून 22 लाखांचे गृहकर्ज घेतले होते. याशिवाय घर बांधण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनेक कर्जे घेतली गेली. त्याच्या शब्दांत, ‘मी कधी विचार केला नव्हता की मी अशा प्रकारे कर्जाच्या जाळ्यात अडकू. एका कर्जदाराने मला पुन्हा पुन्हा फोन करायला सुरुवात केली आहे. तर मी घर विकू शकत नाही कारण माझ्या आईच्या आठवणी घराशी जोडलेल्या आहेत. मी माझ्या पत्नी आणि मुलांना तुमच्यावर ओझे म्हणून सोडू शकत नाही. म्हणून मी त्यांना माझ्या बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझा तुम्हाला शेवटचा संदेश आहे. ”

मृताच्या पत्नीच्या भावानं, जो स्वत: एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, अनेक वेळा दरवाजा ठोठावला पण तो उघडला नाही, तेव्हा कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली आणि चारही मृतदेह घराच्या आतून सापडले.

त्याच दिवशी, मुंबईत अशीच एक घटना उघडकीस आली जेव्हा तिच्या 3 वर्षांच्या मुलीला तिच्या पती आणि पत्नीसह मृत अवस्थेत तिच्याच घरातून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर ही आत्महत्या आहे. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे, त्यात नमूद आहे की कुटुंबातील 13 लोकांमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले आहे. सुसाईड नोटनुसार, कुटुंबातील काही सदस्य तिला मालमत्तेच्या मुद्द्यावरून त्रास देत असत. चिठ्ठीत मृत व्यक्तीने आपल्या पत्नीचे दागिने दान करण्यास सांगितले आहे. पोलिसांचा असा विश्वास आहे की या जोडप्याने आत्महत्या करण्यापूर्वी मुलीची हत्या केली आणि नंतर तिचा मृत्यू होण्यापूर्वी, महिलेने ही सुसाईड नोट तिच्या कुटुंबासह सोशल मीडियाद्वारे शेअर केली.

मुंबई जवळील या 6 हनीमून स्पॉट्सचा आनंद घ्या

*सोमा घोष

काही वर्षांपूर्वी कोणत्याही नवविवाहित जोडप्याला हनीमूनला जाणे आवश्यक नव्हते, परंतु काळाच्या ओघात ते बदलले आहे. लग्नाच्या परंपरा पूर्ण केल्यानंतर, सर्वप्रथम त्यांना अशा सुंदर आणि आनंददायी ठिकाणी जायला आवडते. जिथे त्यांना कुटुंबापासून काही दिवस दूर या नवीन नात्याची माहिती मिळू शकते, मग त्यांना योग्य ठिकाण सापडले तर काय, जेणेकरून विवाहित जोडपे काही दिवस एकत्र घालवू शकतील आणि एक रोमांचकारी वातावरण अनुभवू शकतील. मुंबईच्या आसपास अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे तुम्ही जाऊ शकता. चला जाणून घेऊया 6 सुंदर हनीमून स्पॉट्स बद्दल, जिथे तुम्ही काही दिवस तुमच्या प्रियकरासोबत घालवू शकता.

  1. महाबळेश्वर

सभोवताल सुंदर दऱ्या आणि सुंदर हवामान, जे काहीही न बोलता सर्वांना आकर्षित करते, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हिल स्टेशन, जिथे वर्षभर तापमान सुखद राहते. 1438 मीटर उंचीवर वसलेल्या या पर्यटन स्थळाला महाराष्ट्राच्या हिल स्टेशनची राणी म्हटले जाते. दूरवर पसरलेले डोंगर आणि त्यांच्यावर हिरवाईची सावली नजरेसमोर आहे. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये, मुंबईपासून 264 किमी दक्षिण-पूर्व आणि साताऱ्याच्या वायव्येस स्थित, या ठिकाणाची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक वर्षभर गर्दी करतात. बहुतेक नवविवाहित जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी येथे येतात.

येथे पाहण्यासाठी 30 पेक्षा जास्त ठिकाणे आहेत, जे पर्यटक त्यांच्या बजेटनुसार भेट देतात. इथली जंगले, दऱ्या, धबधबे आणि तलाव खूप सुंदर आहेत, थकवा फक्त इथे आल्यावरच दूर होतो. याशिवाय एल्फिस्टन, माजोरी, नाथकोट, बॉम्बे पार्लर, सावित्री पॉईंट, आर्थर पॉईंट, विल्स पॉईंट, हेलन पॉईंट, लॉकविंग पॉईंट आणि फोकलेक पॉईंट ही इथली खास ठिकाणे आहेत. महाबळेश्वरला जाताना तिथून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर असलेला प्रतापगड किल्ला पाहणे अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय इथली स्ट्रॉबेरी खूप प्रसिद्ध आहे. त्यात राहण्याच्या चांगल्या सुविधा आहेत, ज्यात हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि बंगले खास आहेत, जे बजेटनुसार बुक करता येतात. इथला रस्ता खूप चांगला आहे, त्यामुळे इथे पोहोचण्यासाठी बस किंवा कारची व्यवस्था चांगली आहे. याशिवाय, हवाई मार्गानेही पोहोचता येते. सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे, तेथून एक कार घेऊन महाबळेश्वरला 131 किलोमीटर अंतर रस्त्याने जाता येते.

  1. पाचगणी

पाचगणी पठार, मुंबईपासून 250 किमी अंतरावर, हिरव्यागार दऱ्या आणि सह्याद्रीच्या 5 पर्वत रांगांनी वेढलेले, सपाट वरच्या ज्वालामुखींनी बनलेले आशियातील दुसरे सर्वात मोठे पठार आहे. हे ठिकाण विवाहित जोडप्यांसाठी निश्चितच एक अविस्मरणीय हनीमून स्पॉट आहे. हे सर्वात जुने हिल स्टेशन आहे. इथल्या नैसर्गिक सौंदर्याव्यतिरिक्त ट्रेकिंग किंवा हायकिंगची योग्य व्यवस्था आहे. जुन्या कलाकृतींची आवड असणाऱ्या जोडप्यांना जुन्या पारशी आणि ब्रिटिश बंगल्यांची कारागिरी आवडेल, कारण ब्रिटिश त्यांच्या सुट्ट्या घालवण्यासाठी येथे येत असत. याशिवाय प्रतापगड किल्ला, राजपुरी लेणी, वेण्णा लेक, पाचगणी वॅक्स म्युझियम इत्यादी अनेक ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत.

लोक येथे कॅम्पिंगचाही आनंद घेतात आणि रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांचा समूह पाहणे खूप छान आहे. पाचगणीतील निवास सुविधा बजेटवर आधारित आहेत. येथे लक्झरी हॉटेल्स, अपार्टमेंट, कॉटेज इत्यादी सहज उपलब्ध आहेत. येथील रस्ते खूप चांगले आहेत, त्यामुळे गाडी, बस, ट्रेन इत्यादींनी पाचगणीला जाता येते. इथेही स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते, त्यामुळे त्याच्याशी निगडित जाम, शर्बत, आइस्क्रीम वगैरे खूप चांगले असतात. इथल्या रहिवाशांनी बनवलेल्या भिंतीवरील लटक्या, सजावटीच्या वस्तू आणि चप्पलही पर्यटक खरेदी करून घेऊन जातात.

  1. माथेरान

माथेरान हे मुंबईपासून 110 किमी अंतरावर रायगड जिल्ह्यात स्थित एक छोटे हिल स्टेशन आहे. या ठिकाणचे निसर्गसौंदर्य नजरेसमोर आहे. हे पश्चिम घाटाच्या पर्वत रांगेमध्ये समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले एक हिल स्टेशन आहे. ह्यूग मॅलेटने 1850 मध्ये याचा शोध लावला होता. नवविवाहित जोडप्यांसाठी हनीमूनसाठी माथेरान हे सर्वोत्तम ठिकाण आहे. माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पायी किंवा घोडेस्वारी ही येथे प्रवासाची मुख्य पद्धत आहे. म्हणूनच, प्रदूषणमुक्त वातावरण, आकर्षक दृश्ये, थंड वारा, दूरगामी हिरव्या दऱ्या, उंच भरारी घेणारे ढग आणि सुंदर पर्वत रांगांपर्यंत पोहोचताच एखाद्याला मंत्रमुग्ध करावे लागते. मुंबईच्या आसपासून प्रत्येकजण इथे येतो. कोविड लक्षात घेऊन माथेरानला कोविड मुक्त क्षेत्र बनवण्यात आले आहे. येथे 95 टक्के लोकांनी कोविडचा पहिला डोस आणि 25 ते 30 टक्के लोकांनी दुसरा डोस देखील लागू केला आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी थोड्या वेळाने स्वच्छता देखील केली जाते. इथे राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. येथे आल्यावर 4 ते 5 दिवस भटकण्यासाठी पुरेसे आहेत.

येथे येण्यासाठी, कर्जत किंवा नेरळला आल्यानंतर दस्तुरी नाक्यावर गाडीने यावे लागते. तिथून, एक तासानंतर, 90-सीटची शटल ट्रेन अमन लॉजवर पोहोचते, जी सकाळी 10 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 6 पर्यंत 6 गाड्या सोडते. येथे 38 पॉइंट्स पाहायला मिळतात आणि शार्लोट लेक, ज्यात हनीमून पॉईंट, पॅनोरामा पॉईंट, मंकी पॉईंट, लॉर्ड्स पॉईंट, हार्ट पॉईंट इत्यादींचा समावेश आहे. येथे येण्यापूर्वी कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे चप्पल, चामड्याची पाकिटे, बेल्ट, जाम, चिक्की इत्यादी खरेदी करता येतात.

  1. लोणावळा

लोणावळा हे पुण्यातील एक हिल स्टेशन आहे, जे मुंबईपासून 96 किमी अंतरावर आहे. आजचा लोणावळा हा एकेकाळी यादव राजवटीचा भाग होता, त्याचे महत्त्व लक्षात घेता, मोगलांनी तो बराच काळ आपल्या ताब्यात ठेवला. त्या वेळी लोहगढ किल्ला जिंकण्यात मावळ्यांच्या योद्ध्यांनी मराठा साम्राज्य आणि पेशव्यांना भरपूर पाठिंबा दिला होता. लोणावळा पर्वतराजी 1811 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी शोधली होती. या पर्वत रांगेवर गुंफांची एक मालिका आहे, ज्यात कार्ला लेणी, भजा लेणी आणि बेडसा लेणी प्रमुख आहेत. हनीमूनपासून कौटुंबिक सुट्टीपर्यंत लोणावळ्यात मित्रांसोबत मजा करता येते. हे ठिकाण पावसाळ्यात पूर्णपणे फुलते. याला पश्चिम घाटातील तलावांचे ठिकाण असेही म्हणतात. नैसर्गिक झरे, सुंदर दऱ्या आणि थंड वारा या प्रदेशाच्या सौंदर्यात भर घालतात. येथील बुशी धरण पिकनिक स्पॉट म्हणून खूप लोकप्रिय आहे. याशिवाय लोणावळा तलाव, तिगोटी तलाव, पवना तलाव, लायन्स पॉईंट, ऐतिहासिक किल्ला, लोहागढ, तिकोना किल्ला इत्यादी आहेत. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगची सुविधा उपलब्ध आहे. येथे राहणे खूप आरामदायक आहे, कारण येथे राहण्यासाठी बजेटनुसार हॉटेल्स, रिसॉर्ट्स, बंगले उपलब्ध आहेत. लोणावळ्याची चिक्की विशेष प्रसिद्ध आहे, जी शेंगदाणे, काजू, बदाम, तीळ, पिस्ता, अक्रोड इत्यादीपासून बनवली जाते. या व्यतिरिक्त, भंगार कँडीदेखील येथे खूप प्रसिद्ध आहे.

  1. खंडाळा

खंडाळा हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावरील पर्वत रांगेत वसलेले एक छोटे शांत हिल स्टेशन आहे. सुंदर दऱ्या, आकर्षक डोंगर, कुरण, शांत तलाव, धूराने भरलेले धबधबे प्रत्येकाचे मन मोहून टाकतात. याच कारणामुळे आमिर खानने हिंदी चित्रपट ‘गुलाम’ मधील ‘आत्या क्या खंडाला …’ हे गाणे शूट केले. हे ठिकाण मुंबईपासून 122 किलोमीटर अंतरावर आहे. येथे रेल्वे, कार किंवा लक्झरी बसने पोहोचता येते. नवविवाहित जोडप्यांसाठी हे ठिकाण अतिशय सुंदर ठिकाण आहे. सुंदर दऱ्याबरोबरच सुंदर कलाकृती पर्यटकांचे आकर्षण ठरली आहे. निवासाची योग्य व्यवस्था आहे, ज्यात हॉलिडे होम, हॉटेल्स, रिसॉर्ट्स इत्यादी आहेत.आपण बजेटनुसार ते बुक करू शकता.

खंडाळ्यामध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जसे की राजमाची पॉईंट, कर्नाळा पक्षी अभयारण्य, तुंगा किल्ला, कुन फॉल्स, खंडाळा तलाव इ. याशिवाय बंजी जंपिंगची सुविधाही येथे उपलब्ध आहे. तरुण आपल्या मित्रांसह ट्रेकिंगसाठी येथे येतात. बंजी जंपिंगमध्ये, 10 वर्षांपेक्षा जास्त व 35 किलोपेक्षा कमी वजनाच्या व्यक्तीला उडी मारण्याची परवानगी आहे. ज्यांना अधिक साहसी उपक्रम आवडतात त्यांच्यासाठी हे विशेष आहे. याशिवाय, कुणे धबधबा हा कुणे नावाच्या गावाजवळ एक नैसर्गिक धबधबा आहे, जो 200 मीटर उंचीवरून पडतो. येथे पर्यटक धबधब्यात आंघोळ आणि पोहण्याचा आनंद घेतात. खंडाळ्यात भरपूर जाम आणि शरबत आहे, याशिवाय इथली चिक्कीसुद्धा खास आहे. खंडाळ्याला भेट देण्याची वेळ ऑक्टोबर ते मे पर्यंत असते, कारण पावसाळ्यात काही वेळा भूस्खलनाची भीती असते, परंतु निसर्ग प्रेमी आणि नवविवाहित जोडपी पावसाळ्यातही खंडाळाला भेट देणे पसंत करतात. वडा पाव, पारंपारिक महाराष्ट्रीयन थाली येथे प्रसिद्ध आहे.

  1. अलिबाग

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील कोकण भागात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले हे एक सुंदर शहर आहे. हे ठिकाण तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. व्यस्त जीवनशैलीपासून दूर आरामशीर वेळ घालवणे हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी येथे बरेच काही आहे, जेथे जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवता येतो. सर्व किनाऱ्यांवर नारळ आणि सुपारीच्या झाडांच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण उष्णकटिबंधीय समुद्रकिनाऱ्यासारखे दिसते. येथील हवामान अतिशय आल्हाददायक आहे. तापमान 36 डिग्री सेल्सियस आहे येथील हवा प्रदूषण मुक्त आणि ताजी आहे, ज्यामुळे येथे येणाऱ्या व्यक्तीला स्वर्गासारखे वाटते. येथील कुलाबा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. इथे समुद्राची वाळू कुठेतरी काळी तर कुठेतरी पांढरी दिसते, समुद्र काही अंतरावरच दिसतो, अशा स्थितीत कोणाला आपल्या प्रेमासोबत वेळ घालवायला आवडणार नाही.

मावळतीचा सूर्य पाहणे, समुद्राच्या पाण्यात मजा करणे, अलिबाग बीच, किहिम बीच, अक्षय बीच, नागाव बीच, कनकेश्वर फॉरेस्ट, जंजिरा किल्ला इत्यादी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. याशिवाय अनेक लेण्यादेखील आहेत, जे प्राचीन कलाकृतींच्या अद्भुत संगमाचा वारसा आहेत. येथे बजेटनुसार हॉटेल, रिसॉर्ट आणि अपार्टमेंट उपलब्ध आहेत. समुद्रकिनारी असल्याने येथील मासे विशेष आहेत. त्यातून बनवलेल्या अनेक पदार्थांचा आस्वादही इथे घेता येतो.

असे शिकवा मुलांना चित्र काढायला

* पद्मा अग्रवाल

लॉकडाऊनमुळे आयुष्य जणू थांबले आहे. मुले बऱ्याच दिवसांपासून घरातच बंद आहेत. शाळेची सुट्टी सुरू आहे. मुले आपल्या मित्रांसह खेळण्यासाठी उद्यानात जाऊ शकत नाहीत. घराच्या चार भिंती त्यांच्यासाठी कैदखाना झाल्या आहेत. ती कधी खेळण्यासाठी आईचा मोबाइल घेतात, तर कधी वडिलांचा.

वन्या स्वयंपाक घरातील कामं आटोपून आली. त्यावेळी आपला ५ वर्षांचा मुलगा अन्वय आपल्या मोबाइलवर गेम खेळत असल्याचे पाहून तिला राग आला. तिने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावला, त्यामुळे तो रडू लागला. वन्याच्या हे लक्षात आले की, मुलाला कशात तरी गुंतवून ठेवावे लागेल. म्हणून ती मुलाला म्हणाली की, चल आपण चित्र काढूया. पण अन्वय रडत होता. जेव्हा वन्या स्वत:च कागद घेऊन त्यावर चित्र काढू लागली, तेव्हा अन्वय तिच्याजवळ गेला.

जर तुमचा मुलगा छोटा असेल तर त्याला संपूर्ण वही देऊ नका. नाहीतर तो थोडया वेळातच त्याला हवे तशी पाने रंगवून संपूर्ण वही खराब करून टाकेल. म्हणून त्याला वहीचे फक्त एक पान द्या.

चला वर्तुळ बनवायला शिकवू या

तुमची बांगडी किंवा एखाद्या गोल झाकणाच्या साहाय्याने मुलांना वर्तुळ कसे काढायचे हे शिकवा. त्यानंतर त्याला स्वत:हून वर्तुळ काढायला लावा. जेव्हा अन्वयने स्वत: वर्तुळ काढले तेव्हा तो खूपच खुश झाला.

अशाच प्रकारे निशीने आपली ८ वर्षांची मुलगी ईशी समोर एक केळे ठेवले आणि तिला केळे किंवा टोमॅटो, आंबा असे एखादे चित्र काढायला सांगितले.

पेपरवर केळयाचे चित्र काढल्यानंतर ईशीला खूपच आनंद झाला. नंतर आईने जो रंग वापरला त्याच रंगाने ते चित्र रंगवताना तिला गंमत वाटली. त्यानंतर चित्र काढणे आणि रंगवणे हा तिच्यासाठी आवडता खेळ झाला.

एके दिवशी निशीने स्वत:चा मोबाइल ईशासमोर ठेवून सांगितले की, मोबाइलचे चित्र काढ. जेव्हा तिने मोबाइलचे चित्र काढून त्यावर डायल करण्यासाठी आकडेही काढले तेव्हा ते पाहून निशीने प्रेमाने तिचे चुंबन घेतले.

मुलांना प्रोत्साहन द्या

मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काढलेले चित्र भिंतीवर लावा. त्या चित्राचे कौतुक करा.

अनुचा १२ वर्षांचा मुलगा चित्रे तर काढायचा, पण ती रंगवायला कंटाळा करायचा. अनु स्वत: चांगली आर्टिस्ट आहे. जेव्हा मुलाने काढलेल्या चित्रात ती स्वत: रंग भरू लागली तेव्हा ते पाहून आरवलाही चित्र रंगवावेसे वाटू लागले. त्यानंतर काढलेल्या चित्रांमध्ये स्वत:हून भरलेले रंग पाहून तो आनंदित झाला.

तुम्ही मार्गदर्शनासाठी यू ट्यूबची मदतही घेऊ शकता. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी भावंडांमध्ये चित्रकलेची स्पर्धा घ्या. यामुळे त्यांच्यात जिंकण्याची इच्छा निर्माण होईल आणि ते चित्रांमध्ये रमून जातील. चांगल्या प्रकारे चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.

मुलांना त्यांच्या कल्पनाशक्तीनुसार काहीही काढायला सांगा. ती त्यांच्या कल्पनेनुसार खूप काही काढू शकतात. जसे एखाद्याला आपल्या शाळेची आठवण येत असेल, एखाद्याला मित्राची आठवण येत असेल तर ते चित्राच्या माध्यमातून या भावना कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतील.

मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला शाबासकी द्या. तुम्ही त्याला छोटे बक्षीसही देऊ शकता. त्याच्या पेपरवर छान, खूपच छान किंवा अतिउत्तम असा शेरा द्या. हे पाहून लहान मुले खूपच खुश होतात आणि त्यांना स्वत:चा अभिमान वाटू लागतो.

मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून चित्र तेथे शेअर करायला सांगा. यामुळेही मुले आणखी चांगले चित्र काढण्याचा प्रयत्न करतील.

४०शीनंतर मिळवा अपार आनंद

* डॉ. नीरजा श्रीवास्तव नीरू

एकटी असण्याचे कारण जे काही असेल म्हणजे अविवाहित असेल, घटस्फोटिता असेल किंवा विधवा. जर आर्थिक रूपात सक्षम असाल तर स्वत:ला आनंदीच माना. इतक्या वर्षांचा अनुभव आहे तुमच्याकडे. हीच वेळ आहे जेव्हा स्वत:च्या हिमतीवर योग्य निर्णय घेऊन आपल्या जीवनाला तुम्ही आनंदी बनवू शकता. स्वत:ची स्वत:ला ओळखून जगात तुमची ओळख बनवू शकता. आर्थिक रूपात सक्षम नसाल तरीदेखील घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वतंत्र आहात.    स्वत:ला अनुकूल काम करून कमाई करू शकता. तुमचे रुटीन ठरवू शकता कि तुम्हाला तुमचा वेळ स्वत:च्या पद्धतीने कसा व्यतीत करायचा आहे. कसे आनंदी राहू शकता. बस यासाठी टाईम मॅनेजमेंट गरजेचे आहे. सदैव काही चांगले शिकण्याची प्रबळ इच्छा आणि तुमचा हेतू तुमच्या व्यक्तिमत्वाचे साच्यात घाला. तुमचा विचार, तुमची दृष्टी सकारात्मक ठेवून खालील मुख्य गोष्टींसाठी वेळेचे नियोजन अवश्य करा :

* कामाचा वेळ

* आरोग्यासाठीचा वेळ

* छंदांसाठीचा वेळ

* शेजारी नातेवाईक आणि मित्रांसाठीचा वेळ

* मनोरंजनाचा वेळ

* सामाजिक कार्यांसाठीचा वेळ

यात सगळयात प्रथम आहे कामकाजासाठीचा वेळ. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा इतर कोणत्या व्यवसायात आहात तर त्यासाठी वेळ आधीच ठरलेला असावा. चांगले असेल की त्याच्या तयारीचा वेळदेखील तुम्ही जरूर निर्धारित करा, जसे की काय घालायचे आणि घेऊन जायचे आहे. हे सगळयात आधीच तयार ठेवा. आवश्यक पेपर्स, फाईल, फोटोकॉपी इत्यादी. जर काम करीत नसाल आणि आर्थिक स्थिती योग्य नसेल तर आपल्या अनुरूप एखादे काम नक्की करू लागा किंवा छोटा-मोठा व्यवसाय करा, जेणेकरून तुमचा वेळ आणि घर दोन्हीही सुव्यवस्थित होऊ शकेल.

स्वत:साठीचा वेळ

नंतर येतात घराबाहेरची कामे. रोजची कामे म्हणजे जेवण बनवणे, झाडांना, कुलरमध्ये पाणी घालणे, वाणसामान, भाजीपाला आणणे किंवा मागवणे, साफसफाई करणे करवून घेणे, बिले जमा करणे, बँकेत जाणे इत्यादी यांसाठीदेखील वेळ निश्चित करा.

सकाळी एक तास आरोग्यासाठी देणे तुम्हाला पूर्ण दिवस स्फूर्तीमय ठेवेल. नियमित जो काही अनुकूल वाटेल असा व्यायाम अवश्य करा आणि संपूर्ण दिवसासाठी चार्ज व्हा. स्वस्थ मन, मेंदू, शरीर असेल तर तुम्ही खुश राहाल. सकारात्मक ऊर्जा आपल्याला चांगले आणि योग्य कार्य करण्यात सहकार्य करते हे सगळयांनाच ठाऊक आहे.

छंदांची सोबत

काही छंद तर असे असतात की त्यांच्यासोबत छोटी छोटी कामेदेखील उरकली जाऊ शकतात, जसे संगीत ऐकण्यासोबत डस्टिंग, टेबल अरेंजमेंट, कुकिंग इत्यादी काहीही आनंदाने करू शकता. हो, पुस्तके वाचणे, पेंटिंग, नृत्य, फिरणे, काही नवे शिकणे इत्यादींसाठी तुम्हाला वेगळा वेळ काढायलाच हवा, मग तो अर्धा तास का असेना. तुम्ही अनुभवाल की तुमच्यामध्ये ऊर्जेचा अनोखा प्रवेश होत आहे. छंदांची सोबत आहे तर मग तुम्ही एकटया कुठे आहात. तुमचे सारे विश्व तुमच्या सोबत असेल.

नातेवाईक आणि मित्रांसाठीदेखील थोडासा वेळ काढा. एखाद्या आपल्या माणसासोबत बोलून सुख-दु:ख शेअर करा. कधी फोनवर, तर कधी भेटून सकारात्मक गप्पा मारा. कधी त्यांच्यासोबत फिरण्यासाठी जा, बिनधास्त शॉपिंग, मौजमस्ती करा. आवडत्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप बनवा. गंभीर विषयांवरदेखील विचारांची देवाण-घेवाण करा आणि आपल्या प्रेरक अनुभवांना व्यक्त करा.

आनंदाची किल्ली

मनोरंजन आणि जगाशी जोडले राहण्याचा वेळदेखील आपल्या रूटीनमध्ये अवश्य ठेवा. यासाठी सगळयात सोपे माध्यम टीव्ही आहे. अर्धा पाऊण तासाचा वेळदेखील पुष्कळ आहे. असे करून तुम्ही स्वत:ला अपडेट ठेवा आणि शेवटचे प्रमुख कार्य, जे आनंदाची किल्ली आहे ते आहे सामाजिक कार्य. तुम्ही आठवडयातून एकदा नक्कीच समाजाच्या भल्यासाठी काही वेळ काढा. मग ते गरीब, अनाथ मुले, वयस्कर, असहाय्य स्त्रिया, अनाथ पशुपक्षी यांच्या कोणाच्यादेखील भल्याचे काम का असेना किंवा भ्रष्टाचार विरोध, व्यसनमुक्ती इत्यादी कोणत्याही मुद्दयावर कार्य करा.

आणखीदेखील पुष्कळ काही आहे चाळीशीच्या पल्याड. घाबरू नका. मग पहा तुम्ही एकटया कुठे आहात? बिनधास्त आनंद साजरा करा, चांगल्या कामांमध्ये हिरीरीने सहभाग घ्या, काही चांगले शिका, शिकवा. एंजॉय करा. जीवन व्यतीत करू नका, जीवन जगा. आनंद शोधा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें