मान्सून स्पेशल : घर सुगंधित बनवा असे

* सोमा

पावसाच्या हलक्या सरी वातावरण आनंददायी बनवतात. कडक उन्हानंतर पावसामुळे सर्वांना दिलासा मिळतो. परंतू आपण तेव्हाच या आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेऊ शकतो, जेव्हा घर ताजेतवाने आणि सुगंधित असेल.

यासंदर्भात इलिसियम एबोडेसच्या संस्थापक आणि इंटिरियर डिझाइनर हेमिल पारिख सांगतात की खरंतर सततच्या पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढते. हा ओलावा घरातही शिरतो. उष्णता आणि ओलावा वाढल्यामुळे घराच्या भिंतींवर ओलसरपणा, बुरशी येणे इत्यादी होते, ज्यामुळे कुबट वास सर्वत्र पसरतो. स्वच्छ हवेची कमतरता होऊ लागते. म्हणूनच आपण आपले घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि चांगले वातावरण मिळेल. यासाठी येथे काही महत्त्वपूर्ण टीप्स देत आहोत :

* बहुतेक लोक एखाद्या विशिष्ट प्रसंगीच कापूर जाळतात. पावसाळयात कापूर जाळल्यामुळे बुरशीजन्य संसर्ग आणि शिळा वास टाळता येतो. ते जाळल्यानंतर खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि १५ मिनिटांनंतर उघडा. खोलीत फ्रेशनेस येईल.

* जर तुमच्या खोलीत फर्निचर असेल तर ते ओले होण्यापासून वाचवा. ओल्या फर्निचरमुळे कधीकधी दुर्गंधी येते.

* पायपुसणी ओली होऊ देऊ नका. दर २-३ दिवसांनी ती पंख्याखाली कोरडी करा.

* काही लोक कीटकांच्या भीतिने पावसाळयात दारे आणि खिडक्या बंद ठेवतात. यामुळे खोलीत जास्त कुजका वास येतो. खिडक्या आणि दारे थोडया वेळासाठी का होईना उघडी ठेवा, जेणेकरून बाहेरची ताजी हवा आत येईल. क्रॉस व्हेंटिलेशन होण्यासह खोलीतील दुर्गंधीदेखील जाईल.

* कुबट वास दूर करण्यासाठी व्हिनेगर खूप चांगले कार्य करते. रुंद तोंडाच्या भांडयात १ कप व्हिनेगर घाला आणि खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. थोडया वेळातच तुम्हाला फ्रेश वाटू लागेल.

* आजकाल बाजारामध्ये रूम फ्रेशनर सहज उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार खोलीत फवारणी करता येते. त्यात लव्हेंडर, चमेली, गुलाब इत्यादी ताजेपणा निर्माण करतात.

* कडुलिंबाची पाने बुरशी दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. त्याची सुकलेली पाने कपडयांमध्ये आणि कपाटाच्या कोपऱ्यात ठेवता येतात.

* स्वयंपाकघरात बुरशीचा स्मेल कमी करण्यासाठी बेकिंगची कल्पना चांगली आहे. बेकिंगमुळे त्याचा सुवास संपूर्ण पसरतो.

* या हंगामात विविध प्रकारची फुले उमलतात आणि या फुलांचा सुगंध कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. ही फुले केवळ सुगंधच देत नाहीत तर ताजेपणाही कायम राखतात. गुलाब, चंपा, चमेली इत्यादी सर्व फुले घराला आपल्या सुगंधाने सुगंधित करतात, म्हणून त्यांना फुलदाणीत अवश्य सजवा.

* तेल आणि मेणबत्त्या तेवत ठेवल्यानेही घराचे वातावरण फ्रेश होईल.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात कसा असावा आहार

* अनु जायस्वाल, फादर डायरेक्टर वैदिक सूत्र वेलनेस सेंटर

वर्षा ऋतूत जर तुमचे खाणेपिणे बरोबर असेल तर तुम्ही डिहायड्रेशन, डायरिया, घाम, थकवा येणे, भूक न लागणे, उलटया, हीट स्ट्रोक, अन्नातून विषबाधा यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थ समाविष्ट करू शकता :

सॅलड

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लाईकोपिन असल्याने पौष्टिक घटकांचे हे पॉवरहाऊस फळ आणि भाजी दोन्हीमध्ये गणले जाते. एका टोमॅटोत ३५ ते ४० कॅलरी असतात, पण हा दिवसात ४० टक्के व्हिटॅमिन सी आणि २० टक्के विटामिन ए ची गरज पूर्ण करू शकतो.

टोमॅटोचे आणखीसुद्धा अनेक फायदे आहेत. लाईकोपिनसारखे अँटीऑक्सिडंट असल्याने हा अनेक प्रकारच्या कँसरच्या लढयात मदत करतो. संशोधनात असे आढळते की लाईकोपिन एलडीएल अथवा वाईट कोलेस्ट्रॉलपासून सुरक्षित ठेवते, ज्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते.

काकडी सॅलडच्या स्वरूपात जास्त वापरली जाते. यात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते. अल्सरच्या उपचारातसुद्धा काकडीचे सेवन आरामदायक ठरते. पेपर अथवा काळी मिरी यातसुद्धा बीटा कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रतिकारशक्ती बळकट करते आणि फ्री रॅडिकल्समुळे  होणारे नुकसान कमी करते. पण काही आजार जसे मुतखडयात  टोमॅटोचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करावे.

फळं

या ऋतूत अनेक लो कॅलरी फळं उपलब्ध असतात, ज्यात फायबर, कॅल्शियम व इतर महत्वाच्या पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण उपलब्ध असते. हे शरीरात पाण्याचे प्रमाण कायम ठेवते. या ऋतुतील फळं जसे कलिंगड, लिची, काकडी, टरबूज, संत्री, अंगूर वगैरे याचे सेवन लाभदायक असते. सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ने परिपूर्ण असलेले कलिंगड शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते.

ज्यूस

चिपचिप्या उन्हाळयात शरीराला पाण्याची जास्त गरज असते, म्हणून पेयपदार्थांचे सेवन जास्त करायला हवे, जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळेल आणि तुम्हाला कंटाळवाण्या दुपारी उत्साही वाटेल. म्हणून तुमच्या आहाराच्या यादीत ज्यूससुद्धा समाविष्ट करा. लिंबू पाण्यापेक्षा उत्तम अन्य कोणता ज्यूस नाही. संत्री, मोसंबी यासाख्या फळांचे रससुद्धा तुम्ही घेऊ शकता. शहाळयाच्या पाण्यात अनेक आवश्यक खनिजे असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. हे पोटॅशियमचे  उत्तम स्रोत आहे.

भाज्या

आहारात त्या त्या हंगामी भाज्या जसे दुधी भोपळा, भेंडी, कारले, लालभोपळा, टोमॅटो, काकडी आणि मिरची अवश्य समाविष्ट करा. दुधीभोपळयात कॅलरी कमी आणि फायबर आणि पाणी जास्त असते. लो कॅलरी असल्याने ही भाजी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका नसतो. कारल्यात तांबे, लोह आणि पोटॅशियम असते. याचे सेवन केल्यास शरीरातील रक्तशर्करा आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. कारले शरीरात क्षाराचा प्रभाव वाढवते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

लाल भोपळयात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. कच्च्या लाल भोपळयाचा रस शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकतो. अॅसिडिटी कमी करण्यातसुद्धा हा फारच लाभदायक असतो.

मान्सून स्पेशल : मान्सून आणि अॅलर्जी

* डॉ. पी. के मल्होत्रा

पावसाळयाच्या दिवसांत थोडे जरी बेफिकीर राहिलात, तरी तुम्ही अॅलर्जी आणि इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता. पावसाळा सुरू होताच, अनेक आजार आपल्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर, त्वचा आणि डोळयांसंबंधी विकार डोके वर काढतात.

स्किन इन्फेक्शन

पाऊस सुरू होताच सर्वप्रथम त्वचेवर त्याचा विपरित परिणाम होतो. या काळात वातावरणात आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया, वायरस, फंगस वेगाने वाढू लागतात आणि हे त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेला इन्फेक्शन होतं. अर्थात, या दिवसांत त्वचेला सर्वाधिक संक्रमणाची भीती कोणापासून असेल, तर ते आहे फंगस. पावसाळयाच्या दिवसांत सर्वात जास्त फंगस म्हणजेच शेवाळामुळे त्वचेला आजाराचं संक्रमण होते. अशा वेळी अनेक प्रकारचे स्किन डिसीझ होण्याची शक्यता असते.

रेड पॅच किंवा लाल चट्टे

फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेला खासकरून काख, पोट आणि जांघांचे सांधे, तसेच स्तनांखाली गोल, लाल रंगाचे पपडी निघणारे चट्टे दिसू लागतात. त्यांना खूप खाज येते.

या समस्येपासून वाचण्यासाठी काख, ग्रोइन व शरीराच्या ज्या भागांमध्ये सांध्यांचा जोड आहे, तिथे अँटिफंगल पावडर लावा, जेणेकरून घाम आणि ओलावा एकत्र होणार नाही. वाटल्यास, मेडिकेटेड पावडरचा वापर करा.

हीट रॅशेज

या मोसमात जास्त घाम येतो, त्यामुळे त्वचेची रोमछिद्रं म्हणजेच स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर लाल फोडया म्हणजेच घामोळं येतं. त्याला खूप खाज तर येते व जळजळही होते.

अशा वेळी प्रिकली हीट पावडर लावा, सैल आणि सुती कपडे वापरा. त्वचेच्या स्वच्छतेबाबत पूर्णपणे काळजी घ्या. घामोळे आलं असेल, तर कॅलामाइन लोशनचा वापर करा. त्यामुळे खाजेपासून आराम मिळेल.

पायांचे इन्फेक्शन

फंगल इन्फेक्शनमुळे पायांच्या बोटांमधील पेरांना संक्रमण होतं. खरं तर या मोसमात उघडया पायांनी ओल्या फरशीवर चालल्यास किंवा जास्त काळ पाण्याच्या संपर्कात राहिल्यास, त्यात असलेले फंगस बोटांना संक्रमित करतात. या संक्रमणामुळे बोटे लाल होऊन सुजतात आणि त्यांना खाज येऊ लागते. या संक्रमणामुळे रुग्णाला चालणंही कठीण होतं. या संक्रमणामुळे अनेकदा अंगठयांची नखं म्हणजेच टो नेल्स आणि इतर बोटांची नखंही संक्रमित होतात. या संक्रमणामुळे नखं खराब तर दिसतातच, शिवाय ती कमजोर होतात.

फूट आणि नेल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी ओल्या फरशीवरून उघडया पायांनी चालू नका. पायांना जास्त काळ ओले ठेवू नका. खूप वेळ सॉक्स व बूट घालून राहू नका. कारण त्यामुळे घाम येतो आणि तो तसाच राहातो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होतं. या मोसमात सँडल्स आणि फ्लोटर्सचाच वापर करा. नखं वेळोवेळी कापत जा आणि त्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या. सुती मोजे वापरा.

साइट संक्रमण (रांजणवाडी)

पावसाळयात डोळयांना सर्वात जास्त त्रास साइट संक्रमणाचा होतो. या संक्रमणामुळे पापण्यांवर एक प्रकारची गाठ होते. त्यामुळे डोळयांना खूप वेदना होतात. हे संक्रमण बॅक्टेरियांचे डोळयांना संक्रमण झाल्यामुळे होते. गरम पाण्यात कपडा बुडवून शेकल्याने, तसेच २-३ तासांनी सतत डोळयांची सफाई केल्याने रुग्णाला आराम मिळतो.

याबरोबरच या मोसमात डोळे लाल होणं, त्यांची जळजळ, टोचल्यासारखे वाटणं आणि खाज येणं हा त्रासही नेहमीच उद्भवतो.

अॅथलीट फूट

हा आजार जास्त काळ दूषित पाण्यात राहाणाऱ्यांना होतो. या संक्रमणाची सुरुवात अंगठयाने होते. येथील त्वचा सफेद किंवा हिरवट होते. त्यात खाज येऊ लागते. अनेकदा या त्वचेतून दुर्गंधीयुक्त स्त्राव निघू लागतो.

अशा संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पाण्यातून बाहेर आल्यानंतर पाय गरम पाण्याने साबण लावून स्वच्छ धुवा. त्यानंतर ते चांगल्याप्रकारे कोरडे करा.

आय इन्फेक्शन

या दिवसांत हवेतील परागकण, धुलीकण व इतर अॅलर्जिक गोष्टींमुळे डोळयांना इन्फेक्शन होऊन ते लाल होतात. याला अॅलर्जिक कंजक्टिवायटिस म्हणतात. यामुळे डोळयांना सूज येते. डोळयांतून पाणी येत नसले, तरी त्यांना खूप खाज येते. या त्रासापासून वाचण्यासाठी अॅलर्जिक गोष्टींपासून स्वत:चं संरक्षण करा. थोडया-थोडया वेळाने डोळयांत आयड्रॉप टाका.

अस्थमा

पावसाळी हवेत परागकण व फंगससारखे अॅलर्जन असल्यामुळे अस्थमाचा त्रास वाढतो. पावसाळयात अस्थमा बळावण्याची अनेक कारणं आहेत :

विजेच्या कडकडाटासह पाऊस पडल्यास, या मोसमात रुग्णाला अस्थमाचा अॅटॅक येतो. या मोसमात वेगाने वारे वाहात असल्यामुळे मोठया प्रमाणात फुलांतील परागकण बाहेर पडून हवेत मिसळतात. ते श्वासासोबत रुग्णाच्या शरीरात प्रवेश करतात. परिणामी, रुग्णाचा त्रास आणखी वाढतो.

* या मोसमात ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता वाढल्यामुळे फंगल स्पोर्स किंवा मोल्ड्स वेगाने वाढतात. हे फंगस किंवा मोल्ड्स दम्याच्या रुग्णासाठी खूप स्ट्राँग अॅलर्जन असतात. अशा वेळी वातावरणात यांचं प्रमाण वाढणं अस्थमा रुग्णांसाठी त्रासाला आमंत्रण देण्यासारखं असतं. याच कारणामुळे या मोसमात दम्याचे सर्वाधिक अॅटॅक येतात. पावसामुळे हवेत सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडचं प्रमाण वाढतं. परिणामी, वायुप्रदूषणात वाढ होते. हे सल्फरडायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड दम्याच्या रुग्णांवर सरळ हल्ला करतात. त्यामुळे त्यांचा त्रास वाढतो. पावसाळयात गाडयांमुळे होणारे वायुप्रदूषण सहजपणे नष्ट होत नाही. त्यामुळे अस्थमाच्या अॅटॅकचा धोका वाढतो.

* पावसाळयात कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी घरातच असतात. पावसामुळे त्यांचं बाहेर जाणं कमी होतं. परिणामी, त्यांच्या केसांतील कोंडयाचं प्रमाण वाढतं. हा कोंडा अस्थमा रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो.

* पावसाळयात व्हायरल इन्फेक्शनमध्ये वाढ होते. त्यामुळे दम्याची लक्षणं वाढतात.

या मोसमात अस्थमापासून संरक्षण करण्यासाठी खालील काळजी घ्या :

* या काळात नियमितपणे दम्याचं औषध घेत राहा. ज्यांना गंभीर प्रकारचा अस्थमा आहे, त्यांनी इन्हेलरद्वारे घेतलं जाणारं औषध घेत राहा. जेणेकरून, त्यांच्या वायुनलिकांमध्ये सूज येणार नाही.

* आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आणि ओलसर जागांना वेळीच कोरडे व हवेशीर बनवा.

* गरज वाटल्यास एअर कंडिशनचा वापर करा.

* नियमितपणे बाथरूमची सफाई करा. सफाईसाठी क्लीनिंग उत्पादनांचा वापर करा.

* वाफेला बाहेर काढण्यासाठी एक्झस्ट फॅनचा वापर करा.

* या दिवसांत इनडोअर प्लाण्ट्सना बेडरूमच्या बाहेर ठेवा.

* बाहेरील स्रोत उदा. ओली पानं, बागेतील गवत, कचरा यापासून दूर राहा. कारण तिथे शेवाळ असण्याची शक्यता असते.

* फंगसला नष्ट करण्यासाठी ब्लीच आणि डिटर्जंट असलेल्या क्लीनिंग सोल्युशनचा वापर करा.

* ज्या वेळी सर्वात जास्त परागकण हवेत पसरलेले असतील, त्यावेळी सकाळीच बाहेर जाणं टाळा.

* फरच्या उशा आणि बेडचा वापर टाळा.

* आठवडयातून एकदा गरम पाण्याने चादरउशांची कव्हर्स स्वच्छ करा.

* या दिवसांत गालिचा अंथरू नका. जर गालिचा अंथरलेला असेल, तर त्याला साफ करताना मास्कचा वापर अवश्य करा.

* घरात धूळ साचणार नाही, या गोष्टीची काळजी घ्या. ओल्या कपडयाने लँपशेड व खिडक्यांच्या काचांना स्वच्छ ठेवा.

मान्सून स्पेशल : पावसात अशी घ्या पायांची काळजी

* डॉ. सपना बी. रोशनी

शरीराच्या संपूर्ण देखभालीमध्ये आपण सर्वात कमी महत्व पायाच्या देखभालीला  देतो. आपण दिवसातून बऱ्याच वेळा चेहऱ्याला क्रिम लावतो, पण पायाकडे दुर्लक्ष करतो. खरं तर असे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. उदारणार्थ बॅक्टेरीअल फंगस संक्रमण, क्रॉर्न्स, पायाच्या त्वचेवरील भेगा, दुर्गंधी इत्यादी समस्या उद्भवतात.

पावसाळयाच्या दिवसामध्ये पायाच्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे  असते. कारण या काळात पायाचा दूषित पाण्याशी अधिक संपर्क येतो.

जर पायाच्या त्वचेला खाज, सूज, किंवा त्वचा रुक्ष होणे यासारख्या समस्या होत असतील तर लगेच चिकित्सकाचा सल्ला घ्या कारण ही गंभीर त्वचेची एलर्जी असू शकते, ज्याचा तातडीने इलाज होणे गरजेचे आहे.

पायांची देखभाल करायचे काही उपाय

पाय व्यवस्थित धुवून घ्या : पायांची त्वचा बॅक्टेरीअल आणि फंगस संक्रमणाप्रति अधिक संवेदनशील असते. आपण जरी दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोजे आणि बूट घातले असले तरीदेखील पाय त्यातील बॅक्टेरीया व फंगसच्या संपर्कात राहतात. याव्यतिरिक्त पाय फरशीवर साठलेल्या धूळ आणि घाणीच्या संपर्कात राहतात. जर पाय व्यवस्थित धुतले किंवा साफ केले नाहीत तर पाय आणि बोटांच्यामधील जागेत बॅक्टेरीया आणि फंगसचे संक्रमण सहजपणे होऊ शकते. म्हणूनच आपले पाय दिवसातून कमीत कमी एकदा तरी साबणाने धुणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामध्ये साठलेली मळ आणि घाम स्वच्छ होऊ शकेल.

पाय कोरडे ठेवा : अॅथसिट्स फ्रूट पायांचे सामान्य फंगल संक्रमण आहे, त्यामुळे खाज सुटणे, त्वचा जळजळणे, त्वचा पडणे तसेच फोडी तयार होऊ शकतात. अॅथलिट्स फूटसारख्या फंगल संक्रमणाला पायातील ओसरपणा कारणीभूत ठरतो. पाय व्यवस्थित धुतल्यानंतर त्यांना सुकवणे, कोरडे ठेवणे आणि विशेषत: बोटांच्यामधील जागा कोरडी ठेवणे आवश्यक आहे.

पायांना नियमित मॉश्चराइज करा : फक्त चेहरा आणि हातांना मॉश्चरायइझ करू नका पायाकडेही लक्ष द्या. कारण त्यातील आर्द्रता कमी झाल्यास त्वचा रुक्ष व फुगलेली होऊ शकते. तसेच त्वचेला भेगा पडू शकतात. त्वचेला खास करून पायाच्या त्वचेला भेगा पडल्यास, ती खूप कोरडी आणि कडक होते. त्यानंतर या भागात धुळ, माती साचते. भेगा पडलेले पाय कुरूप दिसतात आणि तिथे दुखणे सुरु होते. म्हणूनच पाय रोज धुवून मॉइश्चरायझिंग क्रिम लावा. यासाठी कोकोआ बटर किंवा पट्रोलियम जेली हा उत्तम पर्याय आहे.

मृत त्वचा काढणे : मृत त्वचेला निव्वळ मॉश्चराइझ करून काहीच फायदा होत नाही. म्हणून महिन्यातून एकदा एक्सफोलिएट करून मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. हे फ्युमिक स्टोन किंवा लुकद्वारे केले जाते. असे हलक्या हाताने करावे लागते. ती कडक मृत त्वचेवर जमलेली घाण काढण्यासाठीदेखील याची मदत होते. मृत त्वचा काढल्यानंतर त्याला मॉश्चराइझर लावून हायड्रेड करा आणि रात्रभर तसेच ठेवा.

साखर आणि ऑलिव्ह ऑईलच्या मिश्रणाचे काही थेंब मीठ किवी टी ट्री ऑईलमध्ये मिसळून स्क्रबिंग करू शकता. कारण यात बॅक्टेरीयारोधक गुण असतात.

पायांना पॅम्पर  करा : महिन्यातून २ वेळा १० ते १५ मिनिटे पाय गरम पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पायाची त्वचा नरम होण्यास मदत मिळते. मग पाय व्यवस्थित कोरडे करून घ्या. मग त्यावर व्हिटॅमिन इ युक्त कोल्ड क्रीम लावा. पाय संक्रमणाप्रति असंवेदनशील असेल तर अँटिबायोटिक क्रिमचा वापर करा.

तुम्ही हायड्रेटिंग मास्कसाठी स्मॅश केळे लिंबाचा रस एकत्र करून वापरू शकता. हे पूर्ण पायावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या. बाहेर जाण्यापूर्वी किंवा झोपताना पायांना मॉश्चरायझिंग फूट क्रीम लावा किंवा पट्रोलियम जेली लावा.

मोजे वापरा : मोजे हे धूळ, घाण इत्यादीपासून पायांचे संरक्षण करतात, एवढंच नव्हे तर अतिरिक्त किरणांपासून पायांना सुरक्षित ठेवतात.

आरामदायी चपला वापरा : नेहमी आरामदायक चपलांचा वापर करा. घट्ट बूट वापरणे टाळा. कारण त्यामुळे त्वचेला संसर्ग किंवा जखमा होऊ शकतात. उंच टाचांच्या चपला नियमित वापरणे टाळा, कारण त्यामुळे पायांच्या पेशी आणि लिगामेंटला नुकसान पोहोचू शकते.

मान्सून स्पेशल : अँटीफंगल पावडर का आहे जरूरी

* सोमा घोष

मान्सूनमध्ये अनेकदा गरमीसोबत वातावरणात दमटपणाचं प्रमाण अधिक झाल्याने अनेकांना बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होण्याची संभावना असते. याशिवाय ज्यांची त्वचा ऑयली असते त्यांना खाज, रॅशेज, संक्रमण वा त्वचेसंबंधी इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता जवळपास १० पटींनी अधिक वाढते.

पावसाळयात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत जरुरी आहे, विशेषत: पायाच्या बोटांमध्ये, आर्म पिट, ब्रेस्टच्या खाली, मान, पाठ इत्यादी जागी जिथे घामामुळे ओलावा जास्त प्रमाणात राहतो आणि नंतर फंगल इन्फेक्शनला जन्म देतो.

याबाबत मुंबईच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोमा सरकार सांगतात की पावसाळयात अँटीफंगल पावडर सर्वांसाठी आवश्यक असते, कारण वर्षाऋतूत शरीर आणि पाय ओले होतात. म्हणून दमट वातावरणात फंगस सहज वाढीला लागते. म्हणून या ऋतूत स्वत:ला कोरडे ठेवणे अतिशय गरजेचे आहे. अशात अँटीफंगल पावडर खूपच लाभकारक असते, कारण ही त्वचेला कोरडे ठेवण्यात मदत करते. ही पावडर वापरल्याने कोणत्याही प्रकारच्या फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहता येते.

केव्हा करायचा फंगल पावडरचा वाप

फंगल इन्फेक्शन झाल्यावर, योनीत त्याचे संक्रमण झाल्यास, पायांच्या बोटांच्यामध्ये खाज सुटली, कंबरेवर फंगल इन्फेक्शन झाल्यास, एथलीट्स फूटच्या उपचारासाठी, त्वचेला खाज सुटल्यास फंगल पावडरचा दिवसातून २-३ वेळा वापर करावा.

सकाळी अंघोळ झाल्यावर काखांमध्ये, जांघांमध्ये, छातीखाली, मान, पायांच्या बोटांमध्ये इत्यादी जागी जिथे घाम जास्त येतो तिथे फंगल पावडरचा वापर करा. याशिवाय जेव्हा केव्हा गरमीने खाज जाणवेल तिथे याचा वापर करा. मेडिकेटेड साबणाने हातपाय चांगले धुवा आणि कोरडे केल्यावरच फंगल पावडर लावा.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार

फंगल इन्फेक्शनचे अनेक प्रकार असतात.

* पायांच्या बोटांमध्ये होणारे फंगल इन्फेक्शन सामान्य आहे. यात बोटांच्यामध्ये कठीण थर जमा होतो अथवा बुळबुळीत पदार्थ निघतो, ज्याला दुर्गंधीसुद्धा असते.

* टिनिया कौरपोरिस आणि टिनिया क्रूरिस इन्फेक्शन : साधारणत: काखांमध्ये वा छातीच्या खाली होते. हे बहुतांश ओले कपडे वापरल्याने होते. हे फंगल पावडर लावून सहज नाहीसे करता येते.

फंगल इन्फेक्शन बहुतांश लठ्ठ, स्वच्छतेकडे कमी लक्ष देणारे, मधुमेह असलेल्यांना होते. त्यांनी विशेषत: ही  पावडर जवळ बाळगण्याची गरज भासते.

डॉ. सोमा सांगतात, ‘‘माझ्याकडे अनेक असे रुग्ण येतात, ज्यांना फंगल इन्फेक्शन कळतच नाही आणि रिंगवर्म समजून दुकानातून औषधं घेत राहतात. अनेकदा दोन्ही जांघांमध्ये घर्षण झाल्यानेसुद्धा खाज आणि रॅशेज येतात, ज्याकडे ते लक्ष देत नाही आणि मग नंतर हा त्रास वाढू लागतो. अशा लोकांनी पावसाळयात रोज फंगल पावडर वापरली तर या त्रासापासून दूर राहू शकतात.    अनेक महिला शरीरात फंगल इन्फेक्शन आहे म्हणून माझ्याकडे येतात.

‘‘फंगल इन्फेक्शन अलीकडे मुलांमध्येही आढळते आहे. याने त्रस्त लोकांना मी हाच सल्ला देते की  आपले कपडे रोज आणि वेगळे धुवा, त्यांना इस्त्री करा.

मान्सून स्पेशल : मान्सून ब्युटी केअरच्या ९ टीप्स

* प्रतिनिधी

मान्सून काळात त्वचेत संक्रमण, चेहऱ्यावरची त्वचा फाटणे, शरीरावर चट्टे येणे, पाय अथवा नखांना बुरशी येणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. सादर आहे, या सर्व समस्यांपासून दूर राहण्याचे उपाय :

* त्वचेला स्वच्छ करण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि नंतर मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. केसांना गुंतण्यापासून आणि रुक्ष होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना पौष्टीकतेचा पुरवठा करणं गरजेचे आहे.

* घराबाहेर जाण्याआधी केसांवर अँटिपोल्युशन स्प्रे वापरा. त्वचेलासुद्धा सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणून सनस्क्रीन व एलोवेरा जेल आणि सुरक्षित ठेवणाऱ्या स्किन प्रोटेक्टर्सचा आपल्या त्वचेवर सुरक्षित थर तयार करून त्वचेसंबंधी समस्यांपासूनसयाचा वापर करू शकता. हे स्किन प्रोटेक्टर्स तुमच्या त्वचेच्या रोमछिद्रांना ६-७ तास बंद ठेवतात आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्यात मदत करतात.

* त्वचा हायड्रेटेड आणि रिजूव्हिनेट ठेवण्याकरीता नियमितपणे एक्सफौलिएशन आणि स्क्रबिंग करणे तसेच ग्लो पॅक लावणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही घराबाहेर निघाल तेव्हा विषारी प्रदुषणाचा सामना करण्याकरिता घरी बनवलेले पॅक वापरणे चांगले असते.

* मान्सूनच्या या काळात भिजल्याने केस अस्वच्छ आणि अनहेल्दी होतात, कारण पावसाच्या पाण्यात अनेक प्रकारची रसायनं व विषारी घटक मिसळलेले असतात. अशावेळी चांगल्या शाम्पू व कंडिशनरचा वापर करावा. हे केसांना मुलायम ठेवतात आणि त्यांचा दमटपणा बाहेर जाऊ देत नाही. केसांना नियमित तेलाने मालिश करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण पावसाळी वातावरणात दमटपणाचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे केसांची मुळं बंद होतात.

* तेल लावल्यावरसुद्धा केसांचे स्टीमिंग आणि मास्किंग करायला हवे. जर तुम्हाला घरीच मास्क करायचा असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे एवोकाडोसोबत केळे आणि ऑलिव्ह ऑइल किंवा आवळा, रिठा आणि शिकेकाईसारखे साहित्य वापरायला हवे.

* मान्सून काळात सिथेंटीक व घट्ट कपडे वापरणे टाळा. सैल आणि सुती कपडे घाला अन्यथा तुम्हाला स्किन इन्फेक्शन आणि चट्टे येणे यासारख्या त्रासांचा सामना करावा लागतो. सर्वात महत्वाचे हे की आपल्या त्वचेवर सगळया किटाणुनाशक उत्पादनांचा जसे साबण, पावडर, बॉडी लोशन वगैरेंचा वापर करा, ज्यामुळे घाम आला तरीही त्वचेला सर्व प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यात मदत करतो.

* मुरूम आणि चट्टे येणे थांबवण्यासाठी चेहरा नेहमी स्वच्छ ठेवा. जास्त ऑयली मेकअप उत्पादनांचा वापर टाळा. तुमची मेकअप उत्पादनं पावडर बेस्ड असायला हवीत, जी स्किन फ्रेंडली असतात. याशिवाय चांगली गुणवत्ता असलेलीच मेकअप उत्पादनं वापरा, कारण त्वचा अति तापमान व दमटपणा यामुळे लवकर इन्फेक्शनचे भक्ष्य ठरते.

* फास्ट फूड अथवा अनहेल्दी आहार घेऊ नका, जर  तुम्ही फास्ट फूड खाऊ इच्छित असाल किंवा खाण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्ही ताजे आणि गरम भोजनाचे सेवन करणे आवश्यक आहे.

* आपले शरीर निरोगी राहावे यासाठी रोज १० ते १२ ग्लास पाणी अवश्य प्या, जेणेकरून शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडतील. शरीर स्वच्छ ठेवा. यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा अंघोळ करा.

मान्सून स्पेशल : मान्सूनमधील ट्रेंडी लुकच्या टीप्स व ट्रिक्स

* गरिमा पंकज

प्रत्येक महिलेची इच्छा असते की ती दुसऱ्यांपेक्षा वेगळी, सुंदर आणि फ्रेश दिसावी, सर्वांच्या प्रशंसेने भरलेल्या नजरा तिच्यावर रोखल्या जाव्या आणि तिने ऐटीत पुढे चालावे.

मान्सूनमध्ये स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आणि आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या जाणून घेऊया मोटे कार्लो या कार्यकारी संचालक मोनिका ओसवालकडून काही आवश्यक स्टाईल स्टेटमेंट्सविषयी प्रत्येक महिला व मुलगी ज्यांचा अवलंब करून प्रत्येक फॅशन जगतात स्वत:ला सगळयात पुढे ठेवू शकेल.

कॅज्युअल लुकसाठी

एखाद्या पार्टीत जायचे असेल, मूवी नाइटची योजना असेल किंवा मित्रमैत्रिणींना भेटायचं असेल तर आपण आपल्या स्वत:ची स्टाईल स्टेटमेंट बनवण्यासाठी काही वाईल्ड आणि बोल्ड ट्राय करू शकता. यासाठी आपण नवीन प्रिंट्स, एक्सेसरीज फॅब्रिक आणि कलर ट्राय करू शकता.

पफ शोल्डर

विंटेज पफ शोल्डर पुन्हा ट्रेंडमध्ये आला आहे. टॉप ड्रेस व ब्लाउज इत्यादींमध्ये पफ स्लीव्हचा ट्राय करू शकता. कुठल्याही पार्टीमध्ये पफ स्लीववाली ब्लॅक पेन्सिल ड्रेस घालावी आणि मग बघा कसे आपण प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र बनता. जर आपण कुल गर्लवाला लुक बघू इच्छित असाल तर ओव्हरसाइज्ड शोल्डरचा लांब शर्ट अँकल लैंथ बुटांसोबत घाला आणि परफेक्ट कूल लुक मिळवा.

फॅशनचे फंडे

ब्रीजी व्हाईट ड्रेस, स्ट्रेपी सँडल, सिल्की मिडी स्कर्ट, स्मोक्ड टॉप, चेक्ड पँट आणि अॅसिमेट्रिक नेकलाइन्स आजकाल फॅशनमध्ये आहे, पंख/फरचे ड्रेसेस पुन्हा चलनात येत आहेत. लाइलैक फॅशनमध्ये आहे आणि रेड व पिंकचे कॉम्बिनेशन सगळयात जास्त फॉलो केले जात आहे.

व्हाईट टँक टॉप

एक उत्तम फिटिंगचा पांढरा टँक टॉप, रुंद बॉटमची पँट किंवा प्लाजो वा जीन्स, सेलर पँट किंवा मग जोधपुरी पायजम्याबरोबर घाला आणि एका प्रिंटेड स्कार्फबरोबर याला अॅक्सेसराइज करा, तसेच केसांना मेसी अप डू लुक देऊन आपण परफेक्ट लेडी लुक मिळवू शकता.

प्रोफेशनल लुकसाठी

आपल्याला फॅशनबरोबर खेळत स्टाईलला आपल्या ऑफिसच्या आउटफिटसोबत फिट करावे लागते. ऑफिसच्या फॅशनमध्ये एक समतोल आणि साधेपणाच्या ग्लॅमरची गरज असते. वास्तविक बऱ्याच कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये बटनवाले ड्रेस घालण्याचे नियम आहेत. परंतू आपण यातही स्टाईल आणि फॅशनचा उत्तम मेळ घालू शकता.

फॉर्मल ड्रेसेसबरोबर परफेक्ट लुकच्या टीप्स

रंगांच्या बाबतीत दक्षता : प्रोफेशनल प्रतिमेत रंग खूप महत्वाची भूमिका बजावतात. न्यूट्रल कलर जसे की काळा, मरुन, पांढरा, नेवी, क्रीम, चारकोल, ग्रे इत्यादी रंगांना प्राथमिकता द्या. यापैकी बहुतेक रंग पँटसूट, स्कर्ट आणि शूजमध्ये चांगले वाटतात. या रंगांना सॉफ्ट फेमिनाईन रंग जसे की आईस ब्ल्यू, लाइलैक, सॉफ्ट पिंक आणि आयवरीसोबत मॅच करा.

काँप्लिकेटेड हेयरस्टाईल आणि अॅक्सेसरीजला मिस करा : लक्षात ठेवा प्रिंट अॅक्सेसरीजची कमतरता भरून काढतात. आपल्या लुकला अधिक प्रोफेशनल दाखवण्यासाठी मोठे इयररिंग्स, भडकावू रंगांच्या हँडबॅग आणि ब्राईट ग्लासेसचा वापर करणे टाळा. आपल्या अॅक्सेसरीजमध्ये खूप साऱ्या रंगाचा वापर करणे टाळा. केसांमध्ये फ्रेश ब्रॅड, साईड वेणी, फ्रेंच रोल इत्यादी ट्राय करा. स्लिक हेयरस्टाईल या दिवसांत फॅशनमध्ये आहे. यासाठी एक स्वच्छ रैप अराउंड पोनीटेल ट्राय करू शकता.

लहान प्रिंट्स चांगले वाटतात : जर आपण आपल्या ऑफिसात अनावश्यक आकर्षणाचे केंद्र बनू इच्छित नसाल तर आपल्या कपड्यांच्या प्रिंट् भडक असू नयेत. लाऊड प्रिंट्स ऐवजी थॉटफूल प्रिंट्स चांगले असतात. फ्लोरल प्रिंट्स फॅशनमध्ये आहे.

माइंडफूल पेयरिंग : बॉटमवियर आणि टॉपच्यामध्ये समतोल खूप आवश्यक आहे. फ्लॉवर कॅट्स किंवा हार्ट प्रिंटवाले ब्लाउज परंपरागत बॉटमवियरच्या संगतीने घालावे.

बिरला सैलूलोजचे हेड ऑफ डिझाइन, नेल्सन जाफरीच्या मते आपली पर्सनॅलिटी उठावदार दिसावी म्हणून या टीप्स उपयोगात आणू शकता :

प्लाजो पँट : आकर्षक आणि आरामदायक अनुभवण्यासाठी प्लाजो पँट आपल्या वॉर्डरोबमध्ये अवश्य असायला हवी. ही आराम देते आणि ट्रेंडी असल्यामुळे पसंतही केली जाते. कॅज्युअल असो किंवा पारंपरिक, प्लाजो पँट जवळपास सर्वच प्रसंगी सूट करते. पारंपरिक लुक हवा असल्यास आकर्षक प्लाजोबरोबर सुंदर कुर्ता मॅच करा आणि मॉडर्न रूपातील साध्या सफेद किंवा कलरफुल टॉपबरोबर प्लाजो पँटची जोडी बनवा.

मॅक्सी ड्रेस : अल्ट्रा कंफर्टेबल सेक्सी मॅक्सी ड्रेस प्रत्येक ऋतूत स्टायलिश लुक देते. आपल्या शरीराच्या रचनेनुसार योग्य मॅक्सी ड्रेस निवडा. एक लांब मॅक्सी ड्रेस बीचवर फिरण्यासाठी योग्य पोशाख आहे. आपल्या मॅक्सी ड्रेसला योग्य स्लिंग बॅग, सनीज आणि फ्लॅट्सबरोबर स्टाईल करा.

शॉर्ट्स : जर आपण शॉर्ट्स घालत नसाल तर समजून जा की आपली फॅशन अपूर्ण आहे. याला एका कूल आणि फंकी टीशर्ट किंवा स्नेजी एसिमेट्रिकल क्रॉप टॉपबरोबर जोडा ज्यामुळे आपणास नवा लुक मिळू शकेल. अॅक्सेसरीज आणि चंकी स्नीकर्सच्या जोडीबरोबर कुल फैशनिस्टामध्ये बदलून जावी.

जंपसूट्स आणि प्लेसुट्स : आपण आपल्या कलेक्शनमध्ये हे फॅशनेबल ड्रेसेस अवश्य समाविष्ट केले पाहिजेत. जंपसूट्स आणि प्लेसुट्स आपल्याला ऑफशोल्डर लुक, हॉल्टर नेकपॅटर्न एवढेच नव्हे तर कोल्डशोल्डर डिझाइन जसे की रौक हॉट फॅशन ट्रेंड्सचीसुद्धा स्वतंत्रता देतात.

कुर्ती : भारतीय महिला आणि मुलींमध्ये कुर्ती खूप पॉप्युलर ड्रेस आहे. ही प्रत्येकीवर आकर्षक आणि कंफर्टेबल वाटते. विशेषकरून स्लीव्हलेस कुर्त्या स्टायलिश लुक देतात. यांना प्लाजो पँट्स किंवा बेसिक लेगिंगच्या व्यतिरिक्त जीन्सबरोबरसुद्धा परिधान करू शकता.

या विषयी फॅशन डिझायनर आशिमा शर्मा काही टीप्स सांगतात :

* आपल्या डेलीवियरमध्ये कोल्ड शोल्डर आणि क्रॉप टॉप्स जोडा. असे ड्रेसेस तरुण महिलांना खूप आवडतात.

* यांना शॉर्ट्स आणि जीन्सबरोबर पेयर करून क्लासी आणि ट्रेंडी लुक मिळतो.

* स्कर्ट : स्कर्टही तरुण महिलांच्या पसंतीस पडणारा आणि फॅशनेबल ड्रेस आहे. स्केटर स्कर्ट, पेन्सिल स्कर्ट, प्लिटेड स्कर्ट इत्यादी पार्टीसाठी फॅशनेबल लुक प्राप्त करण्यासाठी घातली जाऊ शकते.

* आजकाल स्निकर फुटवेयर खूप जास्त चलनात आहे आणि ही प्रत्येक प्रकारच्या ड्रेसबरोबर परिधान केली जाऊ शकते. आधी फक्त हिल्सलाच क्लासी मानले जाई. आता स्निकर्स आणि फ्लॅट शूजलाही स्टायलिश मानले जाते. स्नीकर्सला फुटवियरच्या रूपात जोडून आपण प्रत्येक लुकला पूर्ण करू शकता.

* अपडू हेयर किंवा सिंगल आपल्या ड्रेसिंग स्टाईलला रिइन्व्हेन्ट करण्यासाठी ट्रेंडी हेयरस्टाईल्स आहेत. या हेयरस्टाईल्स आपली डे्रसिंग स्टाईल रिफ्रेश करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसात महाराष्ट्राची सैर

* सोमा घोष

भीषण गरमीनंतर पावसाची पहिली सर जेव्हा मुंबई आणि आजूबाजूच्या ठिकाणांवर पाण्याचा वर्षाव करते, तेव्हा झाडंझुडपं, जीवजंतूंबरोबरच मनुष्यही खू्श होऊन जातो.

पावसाळयाच्या दिवसांत मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रांमध्ये राहाणारे लोकसुद्धा वीकेंडसाठी काही ठिकाणी जाणं खूप पसंत करतात.

महाराष्ट्रात नेहमी टुरिझमला प्रोत्साहन मिळत आलं आहे. पावसाळयात लोणावळा, माथेरान, भंडारदरा, माळशेज घाट इ. पर्यटनस्थळं लोक सर्वात जास्त पसंत करतात.

पावसाळयात पर्यटकांची संख्या वाढण्याचं कारण येथील पाणी आणि हवा असून, त्यामुळे पर्यटकांना खूप आल्हाददायक वाटतं. ठोसेघर, अंबोली घाट, भांबावली वज्री इ. ठिकाणाचे धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. याबरोबरच काही इतर आकर्षक स्थळं उदा. कुंडालिका वॉटर राफ्टिंग, लोहगडाचे ट्रेकिंग इ ठिकाणंसुद्धा पावसाळयात आकर्षणाची केंद्र बनतात, तसेच या दिवसांत समुद्रकिनारी फिरण्याचा अनुभवही मनमोहक असतो.

पावसाळ्यातील खास पर्यटनस्थळं

माळशेज घाट

सह्याद्री रांगांमधील हे हिल स्टेशन हिरवीगार वनराई आणि झऱ्यांमुळे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनत आहे. हा डोंगर आपल्या नैसर्गिक सौंदर्यांने सर्वांनाच भुरळ घालतो. माळशेज घाट पुण्यापासून १३० किलोमीटर अंतरावर ठाणे आणि अहमदनगर बॉर्डरवर असून, इथे अनेक रिसॉर्टही आहेत.

लोणावळा आणि खंडाळा

हे ठिकाण मुंबईपासून खूप जवळ आहे. इथे जमीन आणि पाण्याचा अद्भूत संगम पाहायला मिळतो. पावसाळयाच्या दिवसांत येथील नैसर्गिक सौंदर्य हिरवळ व धबधब्यांनी जास्त खुलून येते. इथे विमानतळ नसल्यामुळे मुंबई किंवा पुण्यावरून बस किंवा ट्रेनने जावं लागतं. मुंबईपासून ८३ किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी ट्रेन किंवा लझरी बसेसची सुविधा उपलब्ध आहे.

भुशी डॅम, राजमाची पॉइंट आणि सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम इ. खंडाळयामध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाणं आहेत. इथे राहाण्यासाठी महाराष्ट्र टुरिझमच्या हॉटेल्सबरोबरच अनेक हॉलिडे रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सही आहेत.

मुळशी डॅम

मुळा नदीवर बांधलेल्या या धरणापर्यंत मुंबईवरून केवळ तीन तासांत पोहोचता येतं. हा डॅम संपूर्ण महाराष्ट्रासाठी विद्युत उत्पादनाचा प्रमुख स्रोत आहे. पावसाळयात हा डॅम पाण्याने पूर्णपणे भरतो. परिणामी, पाण्याच्या वेगामुळे इथे एवढं धुकं होतं की, पर्यटकांना ढगांवरून चालल्याचा आभास होतो. हे एक नवीन पर्यटनस्थळ आहे. याच्या आजूबाजूला राहाण्यासाठी अनेक सुविधा आहेत.

कळसूबाई शिखर

सह्याद्री डोंगररांगांतील सर्वात उंचावर (५,४०० फूट) असलेल्या या कळसूबाई शिखराला महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हटलं जातं. इथे असलेला कळसूबाई हरिश्चंद्र गड वाइल्ड लाइफ सेंच्युरी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण वर्षभर इथे ट्रेकर्स येतात. मात्र, पावसाळी वातावरणात येथील सुंदरता अवर्णनीय असतं. मुंबईपासून हे ठिकाण १५२.८ किलोमीटर अंतरावर आहे.

इथे वास्तव्य करण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये हॉटेल परिचय, हॉटेल राज पॅलेस, यश रिसॉर्ट, आदित्य लॉज अॅण्ड विस्टा रूम्स इ. आहेत.

भंडारदरा

भंडारदरा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. मुंबईपासून १८५ किलोमीटर अंतरावरील या ठिकाणी पोहोचल्यानंतर, नैसर्गिक धबधबे, पर्वत-शिखर, हिरवळ, शांती आणि प्राचीन वातावरण या गोष्टी पर्यटकांच्या मनाला भुरळ घालतात.

प्रवरा नदीच्या किनारी वसलेलं हे क्षेत्र आर्थर धबधबा आणि रंधा झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे क्षेत्र पावसाळयाच्या दिवसांत आकर्षणाचं केंद्र बनते. मुंबईहून भंडारदऱ्याला जाण्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे रस्ता मार्ग आहे.

आंबोली घाट

महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन ६९० मीटर उंचीवर आहे. सह्याद्री हिल्सवर असलेले हे ठिकाण जगातील एकमेव ‘इको हॉट स्पॉट’ मानलं जातं. येथील ‘फ्लोरा आणि फना’ची व्हरायटी खूप चांगली मानली जाते. पर्यटक इथे पावसाळयाच्या दिवसांतच फिरायला येतात. मुंबईपासून ४९१ किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी कार, ट्रेन किंवा बसद्वारे जाता येतं.

इथे राहाण्यासाठी चांगले रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये वृंदावन रिसॉर्ट्स, हॉटेल सैली, साइलण्ट व्हॅली रिसॉर्ट, महाराष्ट्र टुरिझम इ. हॉटेल्स प्रमुख आहेत. नानगरता तलाव, केवलेश पॉइंट, आंबोली धबधबा, शिरगावकर पॉइंट, माधवगड किल्ला इ. प्रेक्षणीय स्थळं आहेत.

कर्नाळा

चारही बाजूला हिरवीगार निसर्गसंपदा आणि नैसर्गिक धबधब्यांनी सुशोभित झालेलं हे ठिकाण मुंबईपासून केवळ ८० किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळयात येथील ट्रेकिंग हे खास आकर्षण असते. येथे कर्नाळा किल्ला इ. सारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत.

कोलाड

मुंबई-गोवा हायवेजवळील कोलाड हे एक छोटंसं पर्यटनस्थळ आहे. हे ठिकाण चारही बाजूने छोटया-छोटया डोंगरांनी वेढलेलं आहे. कुंडलिका नदीजवळील हे ठिकाण मुंबईपासून ११७ किलोमीटर अंतरावर आहे.

येथे असलेल्या धरणातून पाणी सोडल्यानंतर कोलाड राफ्टर्स, मुंबई हाइकर्स, महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशन इ. राफ्टिंगची सोय करतात.

ठोसेघर धबधबा

मुंबईपासून जवळच असलेलं हे ठिकाण धबधब्यांचे सौंदर्य आणि फ्लॉवर व्हॅलीसाठी प्रसिद्ध आहे. येथील धबधबे २० मीटरपासून ५०० मीटर उंचीवरून वाहातात. पावसाळयातील शांत वातावरणात हे धबधबे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनतात. इथे जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टचा आधार घ्यावा लागतो. कास धबधबा, फुलांनी डवरलेलं येथील कास पठार पाहाण्यासारखी स्थळं आहेत.

लोहगड किल्ला

लोहगडचा किल्ला मुंबईच्या सर्वात जवळील पर्यटनकेंद्र आहे. याचा इतिहास जुना आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट यादव, बहमनी, निजाम, मोघल इ.नी वेळोवेळी यावर कब्जा केला. ३,३९० फुट उंचीवर असलेला हा किल्ला पावसाळयात आपलं नैसर्गिक सौंदर्य उधळतो. इथे जाणाऱ्या सर्व मार्गांवर वेगवेगळया वनस्पती पाहायला मिळतात. हा किल्ला पुणे आणि मुंबई विमानतळापासून जवळ आहे. येथील जवळचं रेल्वेस्टेशन म्हणजे मालावली. लोणावळा आणि पुण्याला जाणाऱ्या सर्व ट्रेनमधून येथे जाता येतं. पावसाळयात ट्रेकिंगसाठी हे ठिकाण उत्तम आहे. याबरोबरच भाजे लेणी, कारला लेणी इ. ठिकाणंही पाहण्यालायक आहेत. इथे राहाण्यासाठी पुणे आणि आजूबाजूला अनेक हॉटेल्स व रिसॉर्ट्स आहेत.

मान्सून स्पेशल : वडा पाव

पाककृती सहकार्य : सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्ररार

साहित्य

* ७-८ लसूण पाकळया

* ४-५ हिरव्या मिरच्या

* ३-४ उकडलेले बटाटे

* पाव कप तेल

* १ मोठा चमचा राई

* पाव छोटा चमचा हिंग

* कडीपत्ता

* पाव छोटा चमचा हळद पावडर

* चिरलेली कोथिंबीर थोडीशी

* मीठ चवीनुसार.

बेटरसाठी साहित्य

*  १ कप बेसन

* अर्धा छोटा चमचा हळद पावडर

* पाव छोटा चमचा लाल मिरची पावडर

* मीठ चवीनुसार.

तळणीच्या मिरचीचं साहित्य

* ५-६ मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या

* तळण्यासाठी तेल.

वडापाव छाटणीचं साहित्य

*२ मोठे चमचे तेल

* अर्धा कप शेंगदाणे

* ४-५ लसूण पाकळया

* अर्धा कप तळलेले बेसन चुरा

* ३ मोठे चमचे लाल मिरची पावडर

* तळण्यासाठी तेल द्य  मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई, हिंग, कडीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि बटाटयाच्या फोडी टाकून एकत्रित करून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित एकत्रित करून एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा.

बॅटरसाठी कृती

एका बाउलमध्ये भाजलेले बेसन, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि गरजेपुरतं पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

वडापावची कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची व लसूण टाकून व्यवस्थित फ्राय करा. नंतर एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल, शेंगदाणे, लसूण, तळलेल्या बेसनचा चुरा, लाल मिरची पावडर व मीठ टाकून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर बटाटयाच्या सारनाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून घ्या आणि गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळलेली मिरची आणि शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करा.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यातील लिपस्टिकच्या ५ शेड्स

* पारुल भटनागर

एका मुलीच्या जीवनात लिपस्टिकची महत्वाची भूमिका असते, कारण ती रोज याचा वापर करुन आपले सौंदर्य वृद्धिगत करत असते.

या पावसाळ्यात कोणत्या शेडची लिपस्टिक लावावी, याबाबत एल्प्सच्या फाउंडर व डायरेक्टर डॉ. भारती तनेजा सांगतात, ‘‘असे कोण असेल जो सुंदर रंगांवर मोहित होत नसेल आणि ज्याला समोरच्याच्या नजरेत आपल्या प्रति प्रशंसा बघू इच्छित नसेल. जेव्हा आपण लिपस्टिकच्या जगात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला त्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात जसेकी चमकदार, दीर्घकाळ टिकणारा, मॅट आणि न जाणे कोणकोणते वेगळेपण घेऊन अनेक प्रकारच्या लिपस्टिक असतात. पण मला नेहमी मॅट लिपस्टिक आवडते, कारण हे ऑफिस आणि कॉलेजला जाताना वापरण्याचे अगदी अचूक सौंदर्यप्रसाधन आहे. मॅट लिपस्टिक दीर्घ काळ टिकणारे सौंदर्य प्रसाधन आहे आणि ग्लॉसी लिपस्टिकप्रमाणे सहज फिके होत नाही.’’

तर या जाणून घेऊ पावसाळ्यात कोणती मॅट लिपस्टिक वापरून पाहावी :

गुलाबी आणि कोरल इम्प्रेशन लिपस्टिक

गुलाबी आणि कोरल रंग दोन्ही सर्वात चांगले मॅट लिपस्टिकचे रंग आहेत. गुलाबी आणि कोरल अंडर टोन्ससोबत हा सुपर गॉर्जियस शेड तुम्हाला एक सुंदर इफेक्ट देईल. उन्हाळयानानंतर पावसाळ्यात या थंडावा देणाऱ्या एकदम अचूक लीप कलर शेडला स्वत:साठी निवडा. न्यूड लुक देणाऱ्या या शेडच्या लिपस्टिकला कमी देखभालीची आवश्यकता असते. म्हणून तुम्हाला पावसाळ्यात टचअपची आवश्यकता भासणार नाही.

वेलवेट कलर मॅट लिपस्टिक

मॅट लिपस्टिकमध्ये वेलवेट कलर एक वेगळाच लुक देतो. आता जुना न्यूड ब्राऊन कलर सोडून वेलवेट कलरला आपलेसे करा. गोऱ्या रंगाच्या मुलींवर हे वेलवेट रंगाची लिपस्टिक छान दिसते. तुम्ही हे जाणून घ्यायला हवे की वेलवेट कलर तोच शेड आहे, जो तुमच्या लुकमध्ये फन आणि ग्लॅमर आणतो. मग बिनधास्त होऊन वापरा हा रंग

पीच कार्नेशन मॅट लिपस्टिक

एकीकडे सुंदर ब्युटी प्रोडक्ट पीच कार्नेशन मॅट लिपस्टिक आहे. हे पिंक ब्राऊन कलरमध्ये उपलब्ध आहे आणि हे लावल्यावर न्यूड लुक दिसतो. पीच कार्नेशन कलर एक असा रंग आहे, जो केवळ सावळया रंगाच्या मुलींवर खास खुलतो. हा रंग नि:संकोचपणे कॉलेज आणि ऑफिसमध्ये जाताना लावता येतो. तुमच्या कोणत्याही रंगाच्या ड्रेससोबत हा रंग छान दिसेल. जेव्हा तुम्हाला कळत नसेल की ओठांवर कोणती लिपस्टिक लावावा तेव्हा तुम्ही हा रंग वापरून पाहू शकता.

साटन जजबेरी जॅम

हा सुपर क्रिमी न्यूड लिपस्टिक रंग असा रेग्यूलर रंग आहे, जो कोणत्याही स्कीन टोनवर छान दिसतो. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुम्ही बेरीच्या या लिपस्टिकच्या गडद रंगांना समाविष्ट करू शकता. लिपस्टिकच्या गडद रंगांची स्वत:ची अशी एक जादू असते.

फ्युशिया पिंक मॅट लिपस्टिक

काही असे खास आहे या लिपस्टिकच्या रंगांमध्ये. म्हणूनच तर अख्ख्या जगात मुली या लिपस्टिकच्या मागे वेडया झाल्या आहेत. हा लिपस्टिकचा एक अतिशय सुंदर रंग आहे, जो प्रत्येक स्किन टोनमध्ये आणखी ग्लॅमर आणतो. जर तुमचा रंग सावळा असेल तर हा शेड तुमच्या त्वचेला पूर्णपणे सूट होईल. या रंगात तुम्ही गडद पासून ते फिक्कट रंगांपर्यंत कोणत्याही शेडची लिपस्टिक वापरू शकता, विश्वास ठेवा फ्युशिया रंगाची लिपस्टिक तुमच्या लुकला पार बदलेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें