काय आहे लॅक्टोज इनटॉलरन्स

* शकुंतला सिन्हा

दूध, दही इत्यादी दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले असतात. असे असूनही, जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना दूध किंवा इतर दुग्धजन्य पदार्थ पचवता येत नाहीत किंवा त्यांना त्यांची अॅलर्जी असते, असे म्हणता येईल. वैद्यकीय भाषेत याला लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतात.

लॅक्टोज म्हणजे काय : दुधात लॅक्टोज नावाची साखर असते. लॅक्टोज इनटॉलरन्स हा आजार नसला तरी तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. आपल्या शरीरात ‘लॅक्टेज’ हे एनिझइम असते जे शरीराला साखर शोषण्यास मदत करते. हे एनिझइम लहान आतडयात असते, परंतु काही लोकांमध्ये ते नसते किंवा फारच कमी असते. ज्यांच्याकडे लॅक्टेज कमी आहे त्यांना दुग्धजन्य पदार्थ, अगदी दुधापासून बनवलेली स्वादिष्ट देशी मिठाईही पचवता येत नाही.

कमी लॅक्टोजमुळे काय होते : ज्यांच्यामध्ये लॅक्टोज एनिझइमची कमतरता असते, त्यांच्या लहान आतडयात दुधातली साखर, लॅक्टोजचे विघटन होऊ शकत नाही. हे कोलनमध्ये जाऊन तेथील जिवाणूंमध्ये मिसळते आणि किण्वन होते, ज्यामुळे गॅस, ढेकर, जुलाब आणि उलट्या किंवा मळमळल्यासारखे वाटू लागते.

लॅक्टोज इनटॉलरन्स कोणाला होऊ शकतो : याला कुठलाच अपवाद नाही, जगभरातील लाखो लोकांना विशेषत: प्रौढांना हा त्रास असतो. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही की, सुमारे ४० टक्के लोकांमध्ये २ ते ५ वर्षांनंतर लॅक्टोज एनिझइमचे उत्पादन थांबते किंवा मोठया प्रमाणात कमी होते.

लक्षणे : अतिसार (अतिसार, मळमळ, उलट्या, पोटदुखी किंवा लचक भरणे), गॅस आणि ढेकर येणे.

उपचार : तुम्ही काही आठवडे दुग्धजन्य पदार्थ खाणे बंद करून बघा. लक्षणे संपल्यानंतर तुम्ही पुन्हा दुग्धजन्य पदार्थ खाणे सुरू करा आणि परिणाम पाहा.

तुमच्या लक्षणांनुसार डॉक्टर तुम्हाला काही दिवस तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थ बंद करण्याचा सल्ला देऊन त्याचा काय परिणाम होतो ते पाहू शकतात. या व्यतिरिक्त, खालील चाचण्यांचा सल्ला देऊ शकतात :

हायड्रोजन ब्रेथ टेस्ट : तुम्हाला असे पेय पिण्यास सांगितले जाईल ज्यामध्ये लॅक्टोज जास्त प्रमाणात असेल. काही काळानंतर, तुमच्या श्वासातील हायड्रोजनचे प्रमाण मोजले जाईल. तुमच्या श्वासोच्छवासात हायड्रोजनचे प्रमाण जास्त असेल तर याचा अर्थ तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे.

लॅक्टोज इनटॉलरन्स टेस्ट : उच्च पातळीचे लॅक्टोज पेय प्यायल्यानंतर २ तासांनी तुमची रक्त तपासणी केली जाईल. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण न वाढल्यास त्याचा अर्थ असा की, तुम्ही लॅक्टोज पचवू शकत नाही आणि तुम्हाला लॅक्टोज इनटॉलरन्स आहे.

उपचार : लॅक्टोज इनटॉलरन्स काही ठराविक कारणामुळे झाला असेल तर उपचारानंतर तो बरा होऊ शकतो, पण त्याला काही महिने लागू शकतात, अन्यथा त्यावर काही उपायही आहेत.

दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा वापर कमी करून लॅक्टोज इनटॉलरन्स नियंत्रित केला जाऊ शकतो. दुधात लॅक्टोज एनिझइम पावडर मिसळून ते पिता येईल.

सध्या दुग्धशर्करा मुक्त दूधही उपलब्ध आहे : सोया दूध, तांदळाचे दूध, बदामाचे दूध, नारळाचे दूध, काजूचे दूध, ओटचे दूध, शेळीचे दूध, शेंगदाण्याचे दूध, नट दूध यापैकी काही दूध वगळता इतर दुधापासून दही, पनीर आणि मिठाईही बनवता येते. डेअरी दुधाचा सर्वात जवळचा पर्याय म्हणजे सोया दूध, ते इतर पर्यायांपेक्षा स्वस्तही असते.

चॉकलेट खा, खुश व्हा

* दीपा पांडेय द्य

चॉकलेट खायला सगळयांनाच आवडते. अनेकदा कुणालातरी चॉकलेट खाताना पाहून आपल्यालाही ते खाण्याचा मोह होतो, पण दात किडण्यापासून वाचवण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण स्वत:ला आवरले पाहिजे. तरीही डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोको या पदार्थापासून बनवलेल्या चॉकलेटमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

कोकोची वैशिष्टये

अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, झिंक याशिवाय कोकोच्या झाडात इतर अनेक पोषक घटक असतात ज्यापासून डार्क म्हणजेच गडद चॉकलेट बनवले जाते. याशिवाय यामध्ये कॅफिनचे प्रमाणही कमी असते. म्हणूनच जरी आपण हे चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ले तरी ते आपल्याला भरपूर ऊर्जा देते.

शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अँटिऑक्सिडंट्सचा डोस हवा असतो. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोकोमध्ये ब्ल्यूबेरीपेक्षा चांगले अँटिऑक्सिडंट असतात.

डार्क आणि साखर नसलेले चॉकलेट मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असते. ते पित्त आणि इन्सुलिनच्या स्त्रावावर परिणामकारक ठरते, ज्यामुळे मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

ते नैराश्य आणि तणाव कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर असते. आपण सर्वच आपल्या स्वभावातील चढ-उतारांमुळे त्रस्त असतो. कधी मन खूपच उदास किंवा चिडचिडे होते. अशा स्थितीत डार्क चॉकलेट खूपच लाभदायक ठरते. त्यात असलेल्या कोको पॉलिफेनॉल्सच्या सेवनामुळे चांगल्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते.

लीन बार

हरियानाचे टॉपर असलेल्या देवांश जैन यांनी २०१८ मध्ये प्रदीर्घ संशोधनानंतर एक असे चॉकलेट बनवले जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यांनी चोको, सिपिरुलिना, बदाम, मनुका आणि मुसलीचा (ओट्स आणि इतर तृणधान्ये, सुकामेवा आणि काजू यांचे मिश्रण) वापर करून हे चॉकलेट तयार केले. त्याला नंतर स्टार्टअपचे स्वरूप दिले. आज ऑनलाइन ‘द हेल्थी’च्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी या चॉकलेटची खरेदी केली आहे.

चॉकलेटचे तोटे

डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच ते मर्यादित प्रमाणातच खायला हवे. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे झोप न येणे, डिहायड्रेशन, डोकं गरगरणे, उलटी, वजन वाढणे असे आजार उद्भवतात.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हेच चॉकलेटसाठीही लागू होते. दररोज डार्क चॉकलेटचे १ किंवा २ तुकडेच खायला हवेत. ते किती खावे यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्लाही घेऊ शकता.

सर्वसामान्यपणे चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्तच असते, जे दात आणि शरीरासाठी नुकसानकारक ठरते. विचारपूर्वक मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास त्याच्यातील गुणांचा फायदा करून घेता येतो.

वेजाईनल ड्रायनेस आणि वेदना

* डॉ. संचिता दुबे, फिमेल इश्यू एक्सपर्ट, मदरहूड हॉस्पिटल, नोएडा, मोनिका अग्रवाल यांनी केलेल्या बातचीतवर आधारित

वेजाईनल ड्रायनेस म्हणजेच योनीमार्ग कोरडं होण्याची समस्या, ही सर्वच वयोगटातील महिलांना होऊ शकते, मात्र रजोनिवृत्तीनंतर ही समस्या प्रत्येक महिलांमध्ये सर्वसामान्य होऊ लागलीय. संशोधन सांगतात की ही समस्या पोस्टमेनोपोजल स्त्रियांचा साधारणपणे अर्धा भाग प्रभावित करते आणि त्यामध्ये अनेकजणी अशाप्रकारच्या लक्षणांवर उपायदेखील शोधत नाहीत. यामध्ये कोरडेपणा बरोबरच संभोगाच्यावेळी जळजळ आणि वेदना यांचादेखील समावेश आहे.

हे इतर आजाराप्रमाणे जगण्याची गुणवत्ता कमी करू शकतं. रजोनिवृतीच्या काळात हळूहळू सुधारणा होते परंतु योनीचा कोरडेपणा तसाच राहतो कारण हे शारीरिक बदलामुळे उत्पन्न होतं. खासकरून ऐट्रॉफी ऑफ टिशूज, जे इस्ट्रोजनच्या हानिमूळे अगोदर कोरडे आणि कडक होतात.

वेजाईनल ड्रायनेसची लक्षणं

* संभोगाच्या दरम्यान लुब्रिकेशन न झाल्यामुळे वेदना होणं हळूहळू वाढत राहतं. योनीच्या आजूबाजूची त्वचा पातळ झाल्यामुळे ती सहजपणे क्षतीग्रस्त होते. जर लुब्रिकेशन होत नसेल तर सेक्सच्या दरम्यान अधिक त्रास होतो. अगदी कोमल घर्षणानेदेखील वेदना होऊ शकतात. वेदनादायी संभोगामुळे यौन कामेच्छा हळूहळू कमी होऊ लागते.

* योनी आणि वलवाच्या स्थितीत बदल होऊ लागतो. योनीचं वेगळं दिसणं सर्वसामान्य आहे कारण यामुळे तो भाग खूप पातळ होत जाईल.

* योनीच्या स्त्रावात बदल होऊ लागतो. स्त्रियांना हळूहळू त्यांच्या योनीस्त्रावात बदल दिसू लागतो. कारण हे जळजळ सोबतच दुर्गंधीयक्तदेखील असतं. ही लक्षणं चिंताजनक असण्याबरोबरच हार्मोनल बदलानादेखील कारणीभूत ठरतात.

भावनात्मक प्रभाव : योनीच्या कोरडेपणामुळे त्यांना वेगळं पडल्यासारखं वाटतं. शरीरातील बदल स्विकारणं कठीण होऊ शकतं आणि यामुळे होणाऱ्या वेदना आणि त्रास यामुळे आत्मविश्वास आणि संभोगातील आत्मविश्वास यामध्ये कमतरता दिसून येते.

कधीकधी या लक्षणांमुळे संभ्रम निर्माण होतो कारण हे यौन संचारीत रोग वा त्वचा सोलणं या लक्षणांसारखेच असतात. जसं की ही खूपच लज्जास्पद समस्या आहे, अनेक स्त्रिया हे निमूटपणे सहन करतात. खासकरून जर स्त्रिया लाजेखातर जोडीदाराला त्यांना यौन संबंधात रुची का नाही हे सांगण्यास लाजत असतील तर यामुळे त्यांच्या जोडीदाराच्या संबंधावर याचा अधिक परिणाम होतो.

उपाय

जर एखाद्या स्त्रीला वरील लक्षणांचा त्रास होत असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. काही त्वचेसंबंधित समान लक्षणंदेखील असू शकतात, जसं की योनीवर व आजूबाजूला पातळ, डाग असलेली पांढरी त्वचा, ज्यामुळे पांढरा पदर जाणं जे शेबुडासारखं असतं यामुळे खाज सुटते.

साधारणपणे, डिस्प्लेसिया नावाचं लक्षण यामुळे निर्माण होतं.

वेजाईनल इन्फेक्शन आणि खाजेची लक्षणंदेखील योनीच्या कोरडं होण्याच्या लक्षणांसारखीच असू शकतात.

अनेकदा इकडेतिकडे भटकून जेव्हा काहीच समाधान होत नाही तेव्हा योग्य डॉक्टरांकडे गेल्यास तुम्हाला कोरडेपणावर योग्य उपचार होऊ शकतात. वेजाईनल मॉइश्चरायझर, वेजाईनल इस्ट्रोजन वा इतर उपाय डॉक्टर सांगू शकतात.

काही डॉक्टर संभोगाच्यावेळी एखाद्या स्त्रीला लुब्रीकेंट वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. हार्मोन थेरपीदेखील देऊ शकतात.

या उपचारांव्यतिरिक्त योग्य आहार तुमच्या योनीला हायड्रेट करण्यात मदत करू शकतं, ज्यामुळे शरीराच्या इतर भागातील कोरडया त्वचेला मदत मिळते.

योनीला लावण्यासाठी तात्पुरतं लोशन देता येतं, तसंच खोबरेल तेल वा ऑलिव ऑइलचा वापर मॉइश्चरायझरच्या रुपात वापर केला जाऊ शकतो. मात्र याचा नियमितपणे वापर केल्यास संक्रमण होऊ शकतं. जर तुमच्या लघवीवर अनियंत्रण असेल आणि यासाठी पॅड वापरत असाल तर त्वचेला सूज येऊ शकते कारण यामध्ये सुगंधित डिटरर्जेंट असू शकतं.

साधारणपणे, सुती पॅन्टी नियमितपणे वापरणं योग्य पर्याय आहे.

एक मौन समस्या

वेजाईनल ड्राइनेसशी संबंधित समस्यांचा सामना करण्यासाठी स्त्रियांची संख्या अधिक असूनदेखील ही आजसुद्धा एक मौन समस्या आहे. अनेक स्त्रिया आपल्या मैत्रिणी, जोडीदार अगदी डॉक्टरांनादेखील या गोष्टी सांगण्यास संकोच करतात. फक्त एक चथुर्ताश स्त्रिया यावर उपचार करण्यासाठी पुढे येतात.

लक्षात ठेवा, रजोनिवृत्तीनंतरच्या अवस्थेत. स्वत:च जीवन जगणाऱ्या महिलांनी रजोनिवृत्तीअगोदर स्वत:ला निरोगी ठेवणं गरजेचं आहे. वेजाईनल ड्राइनेसला वाढत्या वयाच्या अपरिहार्य भागाच्या रुपात उपचार करण्याची गरज नाहीए. त्यावर वेगळं करण्याची गरज आहे. स्त्रियांनी आपल्या समस्यांसाठी पुढे यायला हवं आणि मोकळेपणी बोलायला हवं.

सारकोमा कॅन्सरवर उपाय

* पारुल भटनागर

आज आपण आपल्या आयुष्यात एवढे व्यग्र आहोत की स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाहीए. अशावेळी अनाहुतपणे अनेक आजारात आपल्याला घेरतात मग ते कॅन्सर असो कॅन्सरसारखा घातक आजार असो. जगभरात २०२० मध्ये १० मिलियनच्या जवळपास लोकांच्या मृत्यूचं कारण वेगवेगळया प्रकारचे कॅन्सर राहिले आहेत. कारण आपण स्वत:कडे  दुर्लक्ष करत असल्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांना दुर्लक्षित करतो आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा आपल्या जीवावर बेततं.

सारकोमा कॅन्सर भलेही सर्वसाधारण नसला तरी हा वेगाने वाढणारा कॅन्सर आहे. यासाठी वेळेतच याच्या लक्षणांची ओळख करून उपाय करण्याची गरज आहे.

चला तर जाणून घेऊया याबद्दल मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्रीमंत बीएस यांच्याकडून.

काय आहे सारकोमा कॅन्सर

सॉफ्ट टिश्यूज सारकोमा एक प्रकारचा कॅन्सर आहे, जो शरीराच्या चहूबाजूंनी असलेल्या टीशूजमध्ये जातो. यामध्ये मांसपेशी, चरबी, रक्तवाहिण्यासोबतच जॉईंटसचादेखील समावेश आहे व इतरांच्या तुलनेत हा आजार सर्वात आधी मुलं आणि त्यानंतर तरुणांना होतो. हा कॅन्सर शरीरात पसरत जातो तोपर्यंत अधिक घातक होतो. म्हणून यांची ही लक्षणे दिसून येताच त्वरित डॉक्टरांना दाखवावं अन्यथा जीवावर बेतू शकतं.

केव्हा होतो

तसं याच्या काही खास कारणांबद्दल माहित नाही परंतु साधारणपणे हा कोशिकाच्या डीएनएमध्ये विकसित होऊ लागतो, तेव्हा होतो.

कसा ओळखाल

* हाडांमध्ये वेदना होणं खासकरून रात्रीच्या वेळी, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते.

* सोबतच मोठया आकाराची गाठ बनू लागते जी वेगाने वाढते.

* चालते वेळी सामान्यपणे पडल्याने व जखमेमुळे हाड तुटणे.

* लघवी करतेवेळी अनेकदा रक्त येणे.

* पोटात खूप वेदना होणे.

* उलटी  होण्यासारखी फिलिंग होणं.

* हाडांमध्ये वेदना होणं.

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांना दाखवा म्हणजे तपासणी करून आजाराची लक्षणं समजतील आणि वेळेतच यावर उपाय करता येतील.

हाडांचा कॅन्सरचे खालील प्रकार आहेत :

* ओस्टेओमा.

* इविंज सारकोमा.

* कोंड्रो सारकोमा.

* एडमेटीनोमा.

हाडांच्या कॅन्सर निदानासाठी कोणत्या टेस्ट आवश्यक आहेत –

* एक्स-रे (प्लेन रेडिओग्राफ).

* ब्लड टेस्टस.

* एमआरआय वा सिटी स्कॅन.

* बायोप्सी.

* होल बॉडी चेकअप.

कोणकोणते उपाय उपलब्ध आहेत

सर्वप्रथम कॅन्सरची स्टेज व कॅन्सरचा टाईप बघून डॉक्टरांची टीम उपाय सुरू करते. या उपायांसाठी केमोथेरेपी, सर्जरी, रेडिओ थेरपीचा आधार घेतला जातो. दहा टक्यांपेक्षा अधिक हाडांच्या कॅन्सरच्या प्रकरणात लिंब सालवेज सर्जरीने उपाय केला जातो. यामुळे अवयव वाचवता येतात. बाकी उपायांनीदेखील गाठ काढली जाते. म्हणजे व्यक्ती पुन्हा सामान्य जीवन जगू शकते.

आईचं दूध वाढवी बाळाची इम्युनिटी

* पारूल भटनागर

कोरोनासारख्या महामारीपासून लढण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढी इम्युनिटी वाढवणं खूपच गरजेचं आहे. हे वाढविण्यासाठी आज बाजारात अनेक सप्लीमेंट्स उपलब्ध आहेत. परंतु जर आपण नवजात शिशुबद्दल बोलत असू तर त्यांची इम्युनिटी वाढविण्यासाठी आईच्या दूधापेक्षा सर्वोत्तम काहीच असू शकत नाही. म्हणून तर प्रत्येक नवजात आईला हा सल्ला दिला जातो की तिने सुरुवातीचे सहा महिने आपल्या बाळांना फक्त आपलं दुध द्यायला हवं. कारण आईचं दूध विटामिन्स, मिनरल्स आणि अनेक न्यूट्रिएंट्सचा पुरेपूर खजिना असतो.

ब्रेस्ट फीडिंग वाढवते इम्युनिटी

अनेकदा नवजात माता आपली फिगर मेंटेन ठेवण्यासाठी व मुलांची भूक शांत करण्यासाठी सुरुवातीच्या काही महत्वाच्या महिन्यातच फॉर्मुला मिल्क द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांची भूक शांत होते, परंतु शरीरातील न्यूट्रिशन संबंधित गरजा पूर्ण होऊ शकत नाही. तर आईच दूध प्रोटीन, फॅट्स, शुगर, अँटीबॉडीज व प्रोबायोटिकने पुरेपूर असतं, जे मुलांचं मौसमी आजारांपासून संरक्षण करून त्यांची इम्युनिटी बुस्ट करण्याचं काम करतं. जर आईला एखादं इन्फेक्शन झालं असेल तर त्या इन्फेक्शनपासून लढण्यासाठीदेखील शरीरात अँटीबॉडीज बनवणे सुरू करतं आणि मग याच अँटीबॉडीज आईच्या दुधाच्या माध्यमातून मुलांमध्ये पोहोचून त्यांची इम्युनिटी वाढविण्याचं काम करतं.

अनेक संशोधनाने सिद्ध झालं आहे की जी मुलं सुरवातीच्या सहा महिन्यांमध्ये फक्त आईचं दूध पितात, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अॅलर्जी, अस्थमा व संसर्गाचा धोका खूपच कमी होतो. म्हणूनच आईचं दूध बाळांसाठी औषधाचं काम करतं.

ब्रेस्टफीडिंग स्तनपान सप्ताह

महिलांमध्ये ब्रेस्ट फीडिंगबाबत जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने दरवर्षी एक ते सात ऑगस्टच्या दरम्यान जागतिक स्तरावर ब्रेस्ट फीडिंग वीक साजरा केला जातो. त्यांना दरवर्षी जागोजागी आयोजित कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षित केलं जातं की आईच दूध दिल्याने बाळ आजारापासून दूर राहतं त्याबरोबरच तर आईचादेखील यामुळे ओवेरियन व ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्कपासून बचाव होतो. यामुळे रिलीज होणार हार्मोन ऑक्सिटोसिनमुळे आपल्या पूर्वीच्या आकारात येतं, सोबतच ब्लीडिंगदेखील कमी होतं.

ब्रेस्ट फिडींगचे इतर फायदे

न्यूट्रिशन अण्ड प्रोटेक्शन : आईच्या स्तनातून येणाऱ्या पहिल्या दूधाला कोलॉस्ट्रम म्हणतात. जे बेकार समजून वाया घालू घालवू नका. कारण हे न्यूट्रिएंट्सचा खजिना असण्याबरोबरच यामध्ये फॅटचे प्रमाणदेखील कमी होतं. ज्यामुळे मुलांसाठी हे पचवणं खूपच सहज सोपं होतं. सोबतच हे मुलाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनविण्याचं काम करतं.

स्ट्राँग बॉण्ड बनविण्यात मदतनिस : लहानपणापासूनच आई आणि मुलाचं बोंड स्ट्राँग बनतं, यासाठी ब्रेस्टफीडिंगची महत्वाची भूमिका असते. ब्रेस्ट फिडींग केल्यामुळे आई आणि मुलाला एकमेकांचा स्पर्श होतो. ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे ऑक्सिटोसिन हार्मोन ज्याला बॉण्डिंग हार्मोनदेखील म्हणतात, हेच हार्मोन जेव्हा तुम्ही किस वा हग करता तेव्हादेखील रिलीज होतं.

ब्रेस्टफीड बेबी मोर स्मार्ट : वेगवेगळया संशोधकांनी ब्रेस्टफीडिंग व ज्ञानात्मक विकासाशी सरळ संबंध जोडला आहे. अनेक शोधांमुळे हा निष्कर्ष काढला गेला आहे की ज्या मुलांना दीर्घकाळपर्यंत ब्रेस्टफीड केलं जातं त्यांचा आयक्यू लेवल खूप उत्तम असण्याबरोबरच ते प्रत्येक गोष्टीत खूपच स्मार्टदेखील होतात. कारण आईच्या दुधामध्ये बुद्धिमत्ता उत्तम करण्याचे न्यूट्रिशन, कोलेस्ट्रॉल, ओमेगा थ्री फॅटी आढळले आहेत. ब्रेस्ट मिल्क सहजपणे पचतं कारण यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असतं. ज्यामुळे मुलाला कफ, गॅससारख्या तक्रारींचा सामना करावा लागत नाही. म्हणूनच पाचन तंत्र उत्तम ठेवण्यासाठी ब्रेस्टफीड हे बेस्ट आहे.

एसआयडीएसचा धोका कमी होतो : एका निष्कर्षांमुळे एक गोष्ट समोर आली आहे की कमीत कमी दोन महिन्यापर्यंत ब्रेस्टफीडिंग केल्यामुळे एसआयडीएस म्हणजेच सडन इन्फेन्ट डेथ सिंड्रॉमचा धोका ५० टक्यांपर्यंत कमी होतो. असं म्हटलं जातं की जी मुलं स्तनपान घेतात ते सहजपणे उत्तम झोप घेतात. यांची इम्युनिटी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका आहे. तर मग आपण आपल्या बाळाला निरोगी ठेवण्यात ब्रेस्ट फिड नक्की करा.

मासिक पाळीच्या स्वच्छतेमध्ये निम्मी लोकसंख्या मागे आहे

* पारुल भटनागर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील सर्व राज्यांपैकी गुजरात आणि मेघालय या फक्त २ राज्यांमध्ये ६५ टक्के महिला पीरियड उत्पादनांचा वापर करतात. तर इतर राज्यात हे प्रमाण खूपच कमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधुनिकता आणि माहितीचे सर्व पर्याय असूनही देशातील ८२ पैकी तीन चतुर्थांश महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरत नाहीत आणि आजही त्या मासिक पाळीच्या काळात जुन्या पद्धतींचा अवलंब करतात. ज्याचे मुख्य कारण बहुतेक मुली आणि स्त्रियादेखील या विषयावर बोलणे लाजिरवाणी गोष्ट मानतात. त्यामुळे संसर्गाची भीती तर राहतेच पण वंध्यत्व आणि कर्करोग होण्याचाही मोठा धोका असतो. म्हणूनच महिलांनी पीरियड्सच्या काळात पीरियड उत्पादनांचा वापर करून स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घ्यावी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

आकडे काय सांगतात

जर आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेबद्दल बोललो, तर बिहारच्या महिला स्वच्छतेची काळजी न घेण्याच्या बाबतीत मागे आहेत, जिथे केवळ ५९ टक्के महिला केवळ मासिक पाळीच्यावेळी सुरक्षित साधनांचा वापर करतात. आजही देशभरात १५ ते २४ वयोगटातील सुमारे ५० टक्के महिला मासिक पाळीच्यावेळी कपडे वापरतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दरवर्षी जगभरातील लाखो महिलांचा मासिक पाळीच्या दरम्यान संसर्गामुळे मृत्यू होतो. जे खूपच आश्चर्यकारक आहे.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता

पीरियड्स दरम्यान, जेव्हा महिला सर्वाधिक कपडे वापरतात, तेव्हा योनीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. ज्याचा थेट संबंध गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की भारतात दरवर्षी हजारो महिलांचा गर्भाशयाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू होतो.

यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची संख्या मोठी आहे, ज्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. हा कर्करोग थेट स्त्रियांच्या जननेंद्रियाशी संबंधित कर्करोग आहे, ज्यामुळे गर्भाशय ग्रीवाच्या पेशींवर परिणाम होऊन कर्करोग होतो. ज्यासाठी महिलांनी मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची किती काळजी घेणे आवश्यक आहे, याबाबत जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.

स्वस्त नॅपकिन्स खरेदी करणे हीदेखील मोठी समस्या आहे

स्त्रिया आपल्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. मग ते त्यांच्या खाण्याबद्दल असो किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल, ते या प्रकरणात स्वत:कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक कमतरता आहेत आणि ते पैसे वाचवण्यासाठी स्वस्त नॅपकिन किंवा घरात ठेवलेले कपडे वापरतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्हाला स्वस्त दरात नॅपकिन मिळत असले, तरी त्यात ब्लिचिंगसह अनेक घातक रसायनांचा वापर केल्यामुळे गर्भाशयाच्या कर्करोगासोबतच हे वंध्यत्त्वाचेही कारण होऊ शकते. हेदेखील सिद्ध झाले आहे की बहुतेक स्त्रिया नॉन ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड वापरतात, ज्यामध्ये एका पॅडमध्ये चार प्लास्टिकच्या पिशव्यांएवढे प्लास्टिक असते. ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ते महिलांच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहेत.

स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी

पॅडचा वापर करतांना कंजुषी करू नका. दर महिन्याला येणाऱ्या काळात तुम्ही कपडे वापरत असाल तर थोडी काळजी घ्या. कारण त्यात असलेल्या अनेक बॅक्टेरियामुळे ते तुमचे प्रजनन आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे पीरियड्सच्या काळात फक्त चांगले म्हणजेच ऑरगॅनिक पॅड वापरावेत. कारण ते      नैसर्गिक आहे तसेच त्यांची शोषण्याची क्षमताही खूप चांगली आहे. तसेच, नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले असल्याने, युरिन इन्फेक्शन, कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता खूप कमी होते. अधिक आरामदायक असल्याने, योनीच्या आरोग्यासाठीदेखील खूप चांगले आहे. तुमच्या मासिक पाळीचा प्रवाह जास्त नसला तरी दर दोन ते तीन तासांनी पॅड बदलत राहा. हे लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता नाही.

दररोज स्नान करा

मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात विविध बदल होतात. कधी पोटदुखीचा त्रास तर कधी पाठदुखीचा त्रास. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुली आणि स्त्रिया मासिक पाळीदरम्यान दररोज अंघोळ करणे पूर्णपणे टाळतात. ज्यामुळे योनीमार्गात संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत, स्वत:च्या स्वच्छतेची काळजी घेत, या काळात तुम्हाला दररोज अंघोळ करण्याची सवय लावावी लागेल. जेणेकरून तुम्ही स्वत:ला संसर्गापासून वाचवू शकाल.

टॅम्पन्सदेखील सर्वोत्तम पर्याय आहेत

जर तुम्हांला हेवी फ्लो येत असेल किंवा वारंवार पॅड बदलण्याचा त्रास टाळायचा असेल तर टॅम्पन्स हा सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय आहे. हे फक्त योनीच्या आत आरामात घालणे आवश्यक आहे. हे वापरण्यास सोपे असून अतिशय आरामदायकदेखील आहे. फक्त लक्षात ठेवा की ८ तासांपेक्षा जास्त काळ एकच टॅम्पन्स वापरू नका, अन्यथा संसर्ग होऊ शकतो.

योनी स्वच्छ ठेवा

संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याने तुमची योनी धुवत रहा. कारण पीरियड्सच्या काळात योनीतून नेहमी रक्तस्राव होत असल्याने स्वच्छ न केल्यास संसर्ग होण्याची भीती राहते. तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे तुमच्या योनीतून वास ही येऊ लागतो. हे टाळण्यासाठी योनीमार्ग स्वच्छ ठेवा.

सुती पँटी घाला

या दिवसांसाठी, तुमची पँटी वेगळी, सुती आणि स्वच्छ असावी. कारण जर तुम्ही तीच ती घाणेरडी पँटी रोज वापरत असाल तर संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. तसेच जर तुम्ही कॉटन पँटीज वापरत असाल तर ती आरामदायी असण्यासह स्किन फ्रेंडलीदेखील असेल.

गरोदर महिलांचा आहार कसा असावा

* दीपिका विरेंद्र

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी सुखद अनुभव असतो. गर्भात वाढणारं मूल आईला बऱ्याच गोष्टी शिकवत असतं. संवदेनशील बनवतं, प्रेम करायला शिकवतं. त्यामुळे गरोदर महिला स्वत:ची विशेष काळजी घेतात. कारण अशावेळी महिला फक्त स्वत:साठीच नाही तर बाळासाठीही अन्न ग्रहण करत असतात.

नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांना सतत थकवा जाणवतो. ८-९ तास ऑफिसमध्ये काम केल्याने त्या जास्त थकतात. याशिवाय महिलांना घरातली कामं करावी लागतात. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस श्रमाचा असतो. चला तर मग जाणून घेऊया नोकरी करणाऱ्या गरोदर महिलांचा आहार कसा असावा.

असा असावा नाश्ता

तुम्ही सकाळी उठल्या उठल्याच स्वयंपाक आणि घरातली इतर कामं सुरू करत असाल तर हे योग्य नाही. सकाळी उठताच सर्वात आधी ग्रीन टी प्या. दिवसाची सुरूवात ग्रीन टी ने झाली तर तुम्हाला दिवसभर ऊर्जेची कमतरता जाणवणार नाही. त्यानंतर अंघोळ करून फ्रेश व्हा. दुपारचं जेवण तुम्ही स्वत: करत असाल तर त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. सकाळी सगळं तयार मिळालं तर जेवण करणं डोकेदुखी ठरणार नाही. जेवण करून झाल्यावर सर्वात आधी नाश्ता करा. नाश्त्याला उकडलेली अंडी, चपाती आणि भाजी खा. त्यानंतर आपला डबा तयार करा. डब्यात फळं, सुका मेवा आणि जेवण भरा. दही किंवा ताक घ्यायला विसरू नका.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर

ऑफिसला पोहोचल्यावर सर्वात आधी पाणी प्या. शरीराला पाण्याची कमतरता भासू देऊ नका. त्यानंतर थोडा आराम करा. काम सुरू करण्याआधी डाळिंब किंवा सफरचंद खा. हे तुमच्यासह बाळाच्याही आरोग्यासाठी चांगलं आहे. शक्य असेल तर केळं खा. त्यानंतर आपलं काम सुरू करा.

दुपारचं जेवण चांगलं घ्या

डाळ-भात, भाजी-चपाती, दही किंवा ताक जे तुम्ही आणलं असेल ते व्यवस्थित चावून खा. घाईघाईत खाऊ नका. जेवणासोबत काकडी खा. सलाड तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

संध्याकाळचा नाश्ता

बऱ्याचदा असं दिसून येतं की गरोदर महिला संध्याकाळच्या नाश्त्याला समोसा, जिलेबी इत्यादी पदार्थ खातात. हे पदार्थ चविष्ट तर असतात, पण आरोग्यदायी नसतात. त्यामुळे घरून सुकामेवा घेऊन या आणि तोच खा. चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर पिऊ शकता. हे दोघांसाठीही फायदेशीर असेल. संध्याकाळी नाश्त्याच्या नावाखाली पूर्ण पोट भरू नका. कारण रात्रीचं जेवणही जेवायचं आहे.

घरी पोहोचण्यासाठी घाई करू नका. ऑफिसची कॅब असेल तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर संध्याकाळी रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे आरामात निघा. थोडा उशिर झाला तरी चालेल. पण घरी आरामात सुरक्षित पोहोचा. घरी पोहोचल्यावर थोडा आराम करा, पाणी प्या. त्यानंतर घरातली कामं करा.

रात्री पौष्टिक जेवण करा

रात्रीच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. एकवेळ डाळ नक्की खा. सोबत चपाती, सलाड आणि बेबीकॉर्न, ब्रोकोली, पनीर इत्यादी भाज्या खा.

रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नका. थोडं फिरा. दिवसभरात एक ग्लास दूध नक्की प्या. बाळंतपणादरम्यान दूध अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या.

ऑफिससोबत घरातलं काम मॅनेज करायला जमत नसेल तर मेड ठेवा. सगळं काम स्वत:वर घेऊ नका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या

* डॉ. नरसिंग सुब्रमण्यम

रजोनिवृत्ती ऐकायला नवीन आणि विचित्र वाटू शकते, परंतु स्त्रियांच्या रजोनिवृत्तीपेक्षा ही परिस्थिती खूप वेगळी आहे. याची लक्षणे आणि आवश्यक उपचार तज्ञ सांगत आहेत.

पुरुषांसाठी, रजोनिवृत्ती हा शब्द कधीकधी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत घट किंवा वृद्धत्वामुळे टेस्टोस्टेरॉनची जैवउपलब्धता कमी करण्यासाठी वापरला जातो.

स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती आणि पुरुषांमधील रजोनिवृत्ती या दोन भिन्न परिस्थिती आहेत. तथापि, स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन थांबते आणि हार्मोन्सचे उत्पादन कमी होते आणि हे सर्व तुलनेने कमी वेळेत होते, तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे हार्मोनचे उत्पादन आणि जैवउपलब्धता बर्याच वर्षांपासून कमी असते. याचे परिणाम स्पष्ट असतीलच असे नाही.

स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रजोनिवृत्ती अचानक होत नाही. याची चिन्हे आणि लक्षणे हळूहळू आणि सूक्ष्मपणे समोर येतात. कोणत्याही परिस्थितीत, पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची पातळी कमी होण्याइतकी वेगाने महिलांमध्ये होत नाही. हेल्थकेअर तज्ञ याला एंड्रोपॉज, टेस्टोस्टेरॉनची कमतरता किंवा उशीर म्हणतात

त्याला हायपोगोनॅडिझम म्हणतात. हायपोगोनॅडिझम म्हणजे पुरुष संप्रेरकांमध्ये घट होणे, जे वृद्ध व्यक्तीसाठी खूप कमी असते.

चिन्हे आणि लक्षणे

* मूड बदलणे आणि चिडचिड.

* शरीरातील चरबीचे पुनर्वितरण.

* स्नायूंच्या वस्तुमानाचा अभाव.

* कोरडी आणि पातळ त्वचा.

* हायपरहायड्रोसिस म्हणजे जास्त घाम येणे.

* एकाग्रतेचा कालावधी कमी होणे.

* उत्साह कमी होणे.

* झोपेत अस्वस्थता, म्हणजे निद्रानाश किंवा थकवा जाणवणे.

* लैंगिक इच्छा कमी होणे.

* लैंगिक क्रियाकलापांची कमतरता

वरील लक्षणे वेगवेगळ्या पुरुषांमध्ये भिन्न असू शकतात आणि नैराश्यापासून ते दैनंदिन जीवनात आणि आनंदात हस्तक्षेप करण्यापर्यंत काहीही असू शकते. म्हणून, संबंधित कारण शोधणे महत्वाचे आहे आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपचार केले पाहिजेत. काही लोकांची हाडेही कमकुवत होतात. याला ऑस्टियोपेनिया म्हणतात.

काही प्रकरणांमध्ये, जेव्हा जीवनशैली किंवा मानसिक समस्या कारणीभूत वाटत नाहीत, तेव्हा पुरुष रजोनिवृत्तीची लक्षणे हायपोगोनॅडिझममुळे असू शकतात जेव्हा हार्मोन्स कमी तयार होतात किंवा अजिबात तयार होत नाहीत. कधीकधी जन्मापासून हायपोगोनॅडिझम असतो. यामुळे लैंगिक संभोग सुरू होण्यास उशीर होणे आणि लहान अंडकोष यांसारखी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये, हायपोगोनॅडिझम नंतरच्या आयुष्यात विकसित होऊ शकतो, विशेषत: लठ्ठ किंवा टाइप 2 मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये. याला उशीरा हायपोगोनॅडिझम म्हटले जाऊ शकते आणि अशा पुरुषामध्ये रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू शकतात.

उशीरा सुरू झालेल्या हायपोगोनॅडिझमचे निदान सामान्यत: तुमची लक्षणे आणि रक्त चाचणी परिणामांद्वारे केले जाते. हे टेस्टोस्टेरॉनची पातळी जाणून घेण्यासाठी वापरले जाते. पुरुष रजोनिवृत्तीच्या लक्षणांसाठी सर्वात सामान्य उपचार म्हणजे निरोगी जीवनशैली निवडणे. उदाहरणार्थ, तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात :

* पौष्टिक आहार घ्या.

* नियमित व्यायाम करा.

* पुरेशी झोप घ्या.

* तणावमुक्त रहा.

या जीवनशैलीच्या सवयी सर्व पुरुषांसाठी फायदेशीर ठरू शकतात. या सवयी लागू केल्यानंतर, रजोनिवृत्तीची लक्षणे अनुभवणाऱ्या पुरुषांना त्यांच्या एकूण आरोग्यामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. तुम्ही उदासीन असल्यास, तुमचे डॉक्टर अँटी-डिप्रेसंट थेरपी आणि जीवनशैलीचा विचार करू शकतात

बदल सुचवेल. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीदेखील एक उपचार आहे. तथापि, प्रोस्टेट कर्करोगासाठी रुग्णाचा कौटुंबिक इतिहास आणि उपचारासाठी रक्त पीएसए हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी फायदेशीर ठरेल असे डॉक्टरांना वाटत असल्यास अहवाल आवश्यक आहे.

 

स्वादुपिंडाचा दाह ही एक गंभीर समस्या आहे

* प्रतिनिधी

स्वादुपिंडाचा दाह हा एक आजार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्वादुपिंडाला सूज येते. या आजारात पोटात असह्य वेदना होतात, जे सहन करणे फार कठीण होते. स्वादुपिंड ही पोटाच्या मागे आणि लहान आतड्याजवळ एक लांबलचक ग्रंथी आहे. स्वादुपिंडाची दोन मुख्य कार्ये आहेत, ती शक्तिशाली पाचक एन्झाईम्सना लहान आतड्यात अन्न पचवण्यास मदत करते, दुसरे म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये इन्सुलिन आणि ग्लुकागन सोडणे. हे हार्मोन्स शरीराला उर्जेसाठी अन्न वापरण्यास मदत करतात.

सामान्यतः हा आजार मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये अधिक असतो, परंतु आता कोणत्याही वयोगटातील लोकांना याचा त्रास होत आहे. असाच एक प्रकार नुकताच दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उघडकीस आला, जिथे दुर्मिळ उपचारानंतर यशस्वी उपचार पूर्ण करण्यात आले.

मुलाचे वय अवघे 7 वर्षे होते.त्यावर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे उपचार करण्यात आले. ही शस्त्रक्रिया मुलामध्ये तीव्र स्वादुपिंडाचा दाह बरा करण्यासाठी करण्यात आली. मुलाचे वजन खूपच कमी होते आणि इतर रुग्णालयांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला, कारण त्याचे वजन केवळ 17 किलो होते. ही शस्त्रक्रिया आपल्या देशातील पहिली आणि जगातील पाचवी शस्त्रक्रिया होती. या अर्थाने तीही मोठी उपलब्धी होती.

डॉ. अमित जावेद, सीके बिर्ला रुग्णालयातील प्रगत सर्जिकल सायन्सेस आणि ऑन्कोलॉजी सर्जरी विभाग, तपासणीनंतर, या मुलावर कमीतकमी चीराच्या पद्धतीने उपचार केले, ज्यामुळे कमी वेदना होत होत्या आणि तो लवकर बरा झाला.

डॉ. अमित जावेद म्हणाले, “हे प्रकरण खूप गुंतागुंतीचे होते, कारण आम्ही फक्त एका लहान रुग्णावर उपचार करत होतो असे नाही, तर त्याचे वजनही त्याच्या वयानुसार खूपच कमी होते. सखोल तपासणीनंतर, मुलावर कमीतकमी चीरा देऊन लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये त्याला कमी वेदना झाल्या आणि तो लवकर बरा झाला. स्वादुपिंडातील अनेक दगड आणि पित्त नलिकेत अडथळा असूनही, बाळ आता सामान्य आणि निरोगी जीवन जगत आहे. याशिवाय त्याच्यावर शस्त्रक्रियेचे कोणतेही खुणे आढळणार नाहीत.

ज्या मुलावर उपचार करण्यात आले त्या बालकाला स्वादुपिंडात अनेक दगडांमुळे पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारी होत्या. लहान मुलांमध्ये क्रॉनिक पॅन्क्रियाटायटीसवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे आव्हानात्मक आहे आणि विशेषतः लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया जगभरात दुर्मिळ आहे. ते भारतातील क्रोनिक पॅन्क्रियाटायटीस आणि पित्त नलिकेच्या अडथळ्याच्या सर्वात तरुण रुग्णांपैकी एक होते.

सीके बिर्ला हॉस्पिटलचे विपुल जैन म्हणतात, “या शस्त्रक्रियेचे यश आमच्यासाठी मैलाचा दगड आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात दुर्मिळ प्रकरणाद्वारे आमच्या वैद्यकीय उत्कृष्टतेची ही पुष्टी आहे.”

किंबहुना, अशा लहान मुलांमध्ये स्वादुपिंडाचा दाह होणे हे दुर्मिळ आहे, ते देखील दीर्घकालीन स्वादुपिंडाचा दाह आहे, ज्यामध्ये दीर्घकालीन दाह असतो. हे बर्याचदा तीव्र स्वादुपिंडाचा दाह नंतर उद्भवते. मुलांमध्ये हे दुर्मिळ आहे कारण हा रोग होण्याचे एक कारण म्हणजे जास्त काळ मद्यपान करणे आणि धूम्रपान करणे. जास्त मद्यपान केल्याने स्वादुपिंडाचे नुकसान होते. परंतु मुलांमध्ये अशा रोगाचे स्वरूप देखील गंभीर चिन्हे देत आहे.

हृदयाला फक्त कोलेस्टेरॉलची भीती वाटली पाहिजे

* प्रतिनिधी

कोलेस्टेरॉल हे हृदयरोगाचे एकमेव कारण आहे असे आपण आयुष्यभर मानतो. खरं तर, ही एक सामान्य धारणा आहे की शरीरातील जास्त कोलेस्टेरॉल आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद होण्यास कारणीभूत आहे, ज्यामुळे बहुतेकदा छातीत दुखते आणि अत्यधिक झाल्यावर हृदयविकाराचा झटका येतो. तथापि, सत्य यापेक्षा बरेच क्लिष्ट आहे.

चला, कोलेस्टेरॉल म्हणजे नेमकं काय ते सगळयात आधी पाहू. हा यकृताद्वारे तयार केलेला चरबीयुक्त पदार्थ आहे, ज्याचा उपयोग शरीराची हजारो कार्ये करण्यात मदत करण्यासाठी केला जातो. सुमारे ७५ टक्के कोलेस्टेरॉल यकृताद्वारे तयार केले जाते, उर्वरित आपण खात असलेल्या अन्नातून मिळते. आपले शरीर पेशी पडदे तयार करण्यात मदतीसाठी हे वापरते. याशिवाय आपण पुरेसे हार्मोनल संतुलन राखण्यास सक्षम होणार नाहीत. कोलेस्टेरॉल ही एक व्यापक संज्ञा आहे, जी चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल दोन्ही दर्शवते. लोक सामान्यत: कोलेस्टेरॉल हा शब्द फक्त खराब कोलेस्टेरॉलसाठीच वापरतात, जे सहसा हृदयरोगासाठी जबाबदार एकमेव घटक मानले जाते. मात्र ते खरं नाही.

हृदयाशी संबंधित समस्यांची अनेक कारणे असतात. रक्तप्रवाहातील अडथळा, सूज आणि जळजळ, खराब जीवनशैली, तणाव ही काही कारणे आहेत, तर कोलेस्टेरॉलचे केवळ ३० टक्के हृदयाच्या समस्यांमध्ये योगदान असते. म्हणून फक्त कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, आदर्शपणे आपण संपूर्ण हृदयाच्या काळजीसाठी उपायांचा शोध घेऊ शकता आणि तेही लहानपणापासूनच.

आपण हृदयाच्या विचारातून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून हृदयरोगापासून बचाव करू शकता. आपल्या हृदयाचे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी येथे काही रणनीती दिल्या आहेत :

आहार चांगला असावा

निरोगी आहार घेतल्याने आपल्याला हृदयरोगाचा धोका कमी असतो. फळे, भाज्या आणि शाबूत धान्याने समृध्द आहार हृदयाचे रक्षण करण्यास मदत करू शकतो. आहारात जास्त प्रमाणात मीठ आणि साखर टाळा. संतृप्त चरबीचे मर्यादित सेवन महत्वाचे आहे. या दिशेने पहिले पाऊल म्हणजे स्वयंपाकासाठी असे तेल निवडणे, ज्यात योग्य प्रमाणात योग्य घटक असतात, जे हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. तेल ओमेगा -३ मध्ये समृद्ध असावे आणि त्यात ओमेगा -६ व ओमेगा -३ मधील गुणोत्तरदेखील आदर्श असावे. त्यात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि ऑरिझोनॉलसारखे पोषक घटकदेखील असावेत.

वजन मर्यादेत ठेवा

जास्त वजन असणे म्हणजे कंबरेभोवती अतिरिक्त चरबी साठवणे. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. नियमित व्यायामाचा नित्यक्रमात समावेश केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो. जेव्हा आपण योग्य प्रमाणात अन्न घेण्याबरोबरच आपल्या जीवनशैलीत शारीरिक क्रियाकलापदेखील जोडता, तेव्हा याचा परिणाम आणखी चांगला होतो.

ताण नियंत्रणात ठेवा

तणाव व्यवस्थापित करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावेत जसे की रिलॅक्स करणारे व्यायाम किंवा ध्यान आपले आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.

रात्री चांगली झोप घ्या

ज्यांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणे, मधुमेह आणि नैराश्य येण्याचा धोका जास्त असतो. प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी प्रत्येक रात्री ७-८ तास झोप घेणे खूप महत्वाचे आहे.

द लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार, १९९० पासून भारतावरील एकूण आजारांच्या ओझ्यात हृदयरोगाचे योगदान जवळजवळ दुप्पट झाले आहे. ही आकडेवारी लक्षात घेता, हे स्पष्ट करणे फार महत्वाचे आहे की केवळ उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे हृदयाच्या आरोग्याची हमी देऊ शकत नाही, कारण इतर अनेक घटकदेखील यात भूमिका बजावतात. आपल्या स्वत:च्या हृदयाची जबाबदारी घेण्याची आणि यासाठी संपूर्णपणे निरोगी जीवनशैलीचे पालन करण्याची वेळ आली आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें