* पारुल भटनागर
आज आपण आपल्या आयुष्यात एवढे व्यग्र आहोत की स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाहीए. अशावेळी अनाहुतपणे अनेक आजारात आपल्याला घेरतात मग ते कॅन्सर असो कॅन्सरसारखा घातक आजार असो. जगभरात २०२० मध्ये १० मिलियनच्या जवळपास लोकांच्या मृत्यूचं कारण वेगवेगळया प्रकारचे कॅन्सर राहिले आहेत. कारण आपण स्वत:कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सुरुवातीच्या लक्षणांना दुर्लक्षित करतो आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा आपल्या जीवावर बेततं.
सारकोमा कॅन्सर भलेही सर्वसाधारण नसला तरी हा वेगाने वाढणारा कॅन्सर आहे. यासाठी वेळेतच याच्या लक्षणांची ओळख करून उपाय करण्याची गरज आहे.
चला तर जाणून घेऊया याबद्दल मणिपाल हॉस्पिटलचे कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर श्रीमंत बीएस यांच्याकडून.
काय आहे सारकोमा कॅन्सर
सॉफ्ट टिश्यूज सारकोमा एक प्रकारचा कॅन्सर आहे, जो शरीराच्या चहूबाजूंनी असलेल्या टीशूजमध्ये जातो. यामध्ये मांसपेशी, चरबी, रक्तवाहिण्यासोबतच जॉईंटसचादेखील समावेश आहे व इतरांच्या तुलनेत हा आजार सर्वात आधी मुलं आणि त्यानंतर तरुणांना होतो. हा कॅन्सर शरीरात पसरत जातो तोपर्यंत अधिक घातक होतो. म्हणून यांची ही लक्षणे दिसून येताच त्वरित डॉक्टरांना दाखवावं अन्यथा जीवावर बेतू शकतं.
केव्हा होतो
तसं याच्या काही खास कारणांबद्दल माहित नाही परंतु साधारणपणे हा कोशिकाच्या डीएनएमध्ये विकसित होऊ लागतो, तेव्हा होतो.
कसा ओळखाल
* हाडांमध्ये वेदना होणं खासकरून रात्रीच्या वेळी, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते.
* सोबतच मोठया आकाराची गाठ बनू लागते जी वेगाने वाढते.
* चालते वेळी सामान्यपणे पडल्याने व जखमेमुळे हाड तुटणे.
* लघवी करतेवेळी अनेकदा रक्त येणे.
* पोटात खूप वेदना होणे.
* उलटी होण्यासारखी फिलिंग होणं.
* हाडांमध्ये वेदना होणं.
जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांना दाखवा म्हणजे तपासणी करून आजाराची लक्षणं समजतील आणि वेळेतच यावर उपाय करता येतील.
हाडांचा कॅन्सरचे खालील प्रकार आहेत :
* ओस्टेओमा.
* इविंज सारकोमा.
* कोंड्रो सारकोमा.
* एडमेटीनोमा.
हाडांच्या कॅन्सर निदानासाठी कोणत्या टेस्ट आवश्यक आहेत -