केव्हा करावी एसीची सर्विस

* रेणु लेंसी फ्रान्सिस

एअर कंडिशनर गरम वातावरणातून दिलासा देऊन तुम्हाला थंडावा आणि समाधानाची अनुभूती देतो. हेच कारण आहे की आता पंखे आणि कुलरपेक्षा जास्त एसीचंच चलन वाढतंय. एसीमध्ये गॅसचा वापर केला जातो. जेव्हादेखील आपण एसी विकत घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की तो दीर्घकाळपर्यंत चालू शकतो, परंतु असं अजिबात नाहीये. खरंतर एसीचं लाईफ त्याच्या मॉडेल युनिटवर अवलंबून असतं.

परंतु त्यापेक्षा देखील तुम्ही एसीची कशी काळजी घेता त्यावर अवलंबून असतं. अनेक लोक एसीकडे तेव्हाच लक्ष देतात जेव्हा त्यातून हवा येणं कमी होतं व त्यातून दुर्गंधी यायला सुरुवात होते. त्यातून आवाज येणं सुरू होतं.

तुम्हाला वाटत असेल की तुमचा एसी वर्षानुवर्षें तुमची सेवा करावी आणि त्यावर तुम्हाला जास्त खर्च करावी देखील लागू नये तेव्हा एसीची देखभाल चांगली करा आणि कमीत कमी वर्षातून दोनदा एसीचे सर्विसिंग करा. यामुळे एसीचं लाईफ वाढू शकतं. तुमच्या एसीचं युनिट लाईफ वाढविण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे.

धुळ वा माती जमा होणं : एसीलादेखील स्वच्छतेची गरज होत असते. एसीची स्वच्छता न केल्यामुळे त्यावर जमा होणारी धूळ वा माती एअर फ्लोला ब्लॉक करू लागते, सोबतच याच्या फिल्टरवर जमा होणाऱ्या कचऱ्याने कॉइलवर बर्फदेखील जमू शकतो. या व्यतिरिक्त यामुळे श्वासाचा आजार होण्याचीदेखील भीती असते आणि हे मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत नुकसानदायक होऊ शकतं. या त्रासापासून वाचण्यासाठी एसीची स्वच्छता करणे खूपच गरजेचे आहे.

कमी कुलिंग : जास्त गरम होत असेल आणि आपण एसी चालू केला आणि त्यामध्ये कुलिंग कमी होत असेल तर आपण त्रासतो आणि आपण एसीच्या सर्विसिंगदेखील करत नसाल तर तुम्ही प्रयत्न आणि थोडी मेहनत करून घरच्या घरीदेखील विंडो एसीची सर्विस करू शकता. तुम्ही त्याचे एअर फिल्टर साफ करा. असं केल्यामुळे देखील तुम्हाला दिलासा मिळेल आणि एसीचा एअरफ्लोदेखील वाढेल.

फिल्टरला नियमितपणे बदला : एसीच्या सर्विसिंगच्या दरम्यान फिल्टरची तपासणी करायला हवी. जर ते घाण असतील तर त्यांना बदलण्याबद्दल विचार करा. मग ते भलेही त्यांना आता बदलण्याच वेळ आली नसली तरी.

घाणेरडे एअर फिल्टर म्हणजे घरामध्ये हवेला पसरवण्यासाठी सिस्टमला दुप्पट मेहनत करावी लागते. यामुळे पंख्यावर परिणाम होण्याबरोबरचं पूर्ण कुलिंग सिस्टमच नुकसान होतं आणि रूमदेखील पूर्णपणे थंड होत नाही. फिल्टरदेखील लवकरच खराब होतात. एसी दीर्घकाळ चालण्यासाठी फिल्टरची नियमित तपासणी करून घ्या.

कंडेन्सरची तपासणी करा : एअर कंडिशनचा आनंद घेण्यासाठी एसीच्या कंडेन्सरची देखील तपासणी करणं गरजेचं आहे कारण कंडेसर घराच्या बाहेर असतो आणि कंडेसरचं बाहेरच्या वातावरणामुळेदेखील नुकसान होऊ शकतं. या व्यतिरिक्त कंडेन्सरच्या आजूबाजूला जमा झालेला कचरा स्वच्छ करा. कंडेन्सरच्या आजूबाजूला एखादं गवत वा रोपटं वाढलं असेल तर ते वेळेतच साफ करायला हवं.

लीक्स चेक करणं देखील गरजेचं : कमीत कमी वर्षातून एकदा लीक चेक करायला हवी. जर कोणत्याही नळीतून लीक होत असेल तर हे एसीसाठी चांगलं नाहीये. हे त्वरित रिपेरिंग करायला हवं अन्यथा एसीची कंडिशन खराब होऊ शकते आणि लवकरच एसी खराब होऊ शकतो.

एसीला द्या आराम : एसीला आराम देणं खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे आपण काम करून थकतो, आपल्या शरीराला आराम हवा असतो. आराम मिळाल्यानंतर शरीर परत ऊर्जा मिळवण्यासाठी काम करू लागतं, त्याच प्रकारे एसीदेखील सतत चालल्यामुळे थकून जातो. म्हणून त्याला पुन्हा उर्जावान बनवण्यासाठी आराम देणं खूपच गरजेचं आहे.

जेव्हा एअर कंडिशनर सतत चालवला जातो तेव्हा तो लवकर खराब होतो. जर तुम्ही काही दिवसांसाठी घराबाहेर जात असाल तर लक्षात ठेवा की एसीला व्यवस्थित बंद करूनच बाहेर जा. युनिट चालू ठेवण्यासाठी थर्मोस्टेटला कमीत कमी पाच डिग्री फिरवू शकता.

डकट्स ठेवा स्वच्छ : अनेकदा आपल्या घरामध्ये एसी थंड होत नाही, याचं सर्वात मोठं कारण एअर डकट्स असू शकतं. जर हे घाणेरडे झाले तर हवेचा फ्लो कमी होतो. अशावेळी एअर डकट्सची स्वच्छता करणं नियमितपणे गरजेचं आहे. हा एसीची एअर क्वालिटी चांगली करतो. एक वर्षांमध्ये एकदा एअर डकट्सची स्वच्छता करायला हवी.

एसीच्या सर्विसिंगमुळे आवाज कमी होतो : एसीच्या नियमित सर्विसिंगने आवाज कमी केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत बोलत आहात आणि या दरम्यान एसी चालू केला, तर अचानक तुम्हाला समोरच्याचा आवाज ऐकू येत नाही कारण एसीच्या मोठ्या आवाजामुळे त्याचा आवाज दबला जातो.

एक एसी युनिट ज्याची सर्विस केली नाही तर ते सहजपणे सिंकच्या बाहेर होऊ शकतं. पंखा इतर गोष्टी इकडे तिकडे होऊ शकतात.

जेव्हा सक्रू थोडे लूज होतात तेव्हा ते आपापसात खडखडतात वा आपटतात ज्यामुळे अधिक आवाज यायला सुरुवात होते.

‘‘प्रत्येकीने आपल्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत’’- शुभांगी मांजरेकर

* नम्रता पवार

मुंबईत बऱ्याच महिला स्कूटर चालवतात. परंतु एखादी बाई, बाईक वा बुलेट चालवताना दिसली की लोकं आपोआप माना वळवून पाहतात आणि त्या नजरांमध्ये कुतूहल दिसते की, अरे व्वा, बाई बुलेट चालवतेय. अगदी आपल्याकडे गुढी पाडव्याच्या ज्या शोभायात्रा असतात त्यामध्ये देखील आता अनेक महिला नऊवारी साडी नेसून आपल्याला बुलेटवर स्वार होताना दिसतात आणि हा खरोखरंच एक कुतुहलाचा, कौतुकाचा विषय असतो. मात्र त्याचवेळी यांना कोणी बरं शिकवलं असेल एक तर नवरा, भाऊ किंवा वडिलांनीच शिकवलं असेल हाच विचार मनात येतो आणि जेव्हा मी याबद्दलची माहिती घेतली तेव्हा एक नाव समोर आलं ते म्हणजे ‘फर्स्ट गियर मोटर सायकल ड्रायव्हिंग स्कूल’च्या संचालिका शुभांगी मांजरेकर यांचं. चला तर त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया…

तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलचा प्रवास कसा सुरू झाला?

२०१४ पासून मी प्रोफेशनली शिकवायला सुरुवात केली. त्या अगोदर मी शिकवत होते, परंतु ते फक्त ऑफिसमधील सहकारी आणि मैत्रिणींपुरतं मर्यादित होतं. मी स्वत: २०१४ पासून लॉन्ग डिस्टन्स ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली. तेव्हा मला रिअलाईज झालं की अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु शिकवायला कोणी नसतं. बेसिक हंड्रेड सीसी मोटरसायकल, बुलेट, स्कुटी मी शिकवते. माझं ड्रायव्हिंग स्कूल हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं पहिलं ड्रायव्हिंग स्कूल आहे. मात्र आता महिलांसोबतच मी पुरुषांनादेखील दुचाकी चालवायला शिकवते.

जेव्हा तुमच्याकडे एखादी स्त्री शिकायला येते तेव्हा तिच्याकडे पाहून सर्वप्रथम तुमच्या मनात काय येतं?

अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु घरी त्यांना कोणी शिकवणारं नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. माझ्याकडे सुरुवातीला ज्या महिला येतात, अगोदर त्यांच्या मनात एक थोडा संकोच असतो, भीती असते, कुतूहल असतं. काहींना त्यांच्या हाईटबद्दल शंका असते, माझी हाईट कमी आहे मी शिकू शकेन का? वजनाबद्दल प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रत्येकीला मोटिवेट करून शिकवावं लागतं. बरेचदा त्यांना असं वाटत असतं की आपण घरातील छोट्याछोट्या गोष्टींसाठी घरातील पुरुषावर अवलंबून राहता कामा नये म्हणजे अगदी मुलांना शाळेत, क्लासेसला सोडायला जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल.

अनेकदा तर काही स्त्रिया घरी सांगूनही येत नाहीत, कारण त्यांना घरून परवानगी नसते. काहींचं वय झालं तरी पण गाडी शिकायची इच्छा अपूर्ण राहिलेली असते ते स्वप्न असतं त्यांच्यासाठी. तेव्हा मात्र मला यांना गाडी शिकवायला हवी, ते मी ठरवते. कारण सुरुवातीला मलादेखील गाडी शिकवायला कोणी फारसं तयार नव्हतं.

तुमच्या करिअरची सुरुवात ड्रायव्हिंग स्कूलनेच झाली का?

नाही. मी माझ्या करिअरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली. एका एक्सपोर्ट हाऊसमध्ये मी मोठया पोस्टवर कामही करत होते. बरेच वर्ष मी या इंडस्ट्रीत होते. मुलींच्या जन्मानंतर मी एडवर्टाइजिंगमध्ये काम करायला सुरुवात केली.

तुमच्या दिवसाची सुरुवात कशी असते?

माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे पाचलाच होते. पहाटे पाहिलं सेशन सहा वीस ते साडे आठपर्यंत माझं ट्रेनिंगचं काम सुरू असतं. त्यानंतर ऑफिसला जाते आणि मग रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा मोटर सायकलचं ट्रेनिंग देते.

गाडी चालवायला शिकवताना फिटनेस किती महत्त्वाचा आहे?

फिटनेस खूपच महत्त्वाचा आहे, कारण एकतर मी जेव्हा दुचाकी चालवायला शिकवते तेव्हा सुरुवातीला त्यांच्यासोबत चालत, बाईकच्या बेसिक स्पीडने धावत शिकवावं लागतं. मी स्वत: फिटनेसबाबत अगोदरपासूनच जागरूक असल्यामुळे या गोष्टी मी सहजपणे करते.

तुम्ही स्पोर्ट्समध्येदेखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय काय सांगाल याबद्दल?

माझी मुलगी दादरच्या समर्थ व्यायाम शाळेत जिम्नॅस्टिकसाठी जात असे. तेव्हा तिथे मला वय वर्षे तीस ते शंभर या वयोगटासाठी स्पर्धा असल्याचं समजलं आणि मी भाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी १०० मीटर, २०० मीटर रनिंग करत असे. मला त्यासाठी देखील मेडल्स मिळाली होती. यादरम्यान माझा एक अपघात झाला आणि धावण्यावर मर्यादा आल्यात. मग मात्र मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळा फेक, भालाफेक अशा स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आता देखील मी जबलपूरला नॅशनल्ससाठी जाणार आहे. बुलेटवरून तुमचं किती आणि कसं फिरणं झालंय?

मी २०१४ च्या अगोदर फक्त पुणे केलं होतं. २०१४ नंतर मी गोवा, बंगलुरु, कर्नाटका, हिमाचल प्रदेश अशा बऱ्याच ठिकाणी गेली आहे. माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्या ग्रुपसोबत मी जाते. मुंबई पनवेल मुंबई, मुंबई पुणे मुंबई, कर्नाटका, उत्तराखंडला गेली आहे. मी २४ तास लॉन्ग डिस्टन्स ड्राईव्ह केलेलं आहे. तो एक रेकॉर्ड असतो आणि २४ तासात तुम्हाला १६०० किलोमीटर गाडी चालवायची असते. त्यामध्ये फक्त पेट्रोल आणि टॉयलेट ब्रेक असतो. पुणे टू बेंगलुरू आणि बेंगलुरू टू पुणे बॅक केलं होतं. ही सोलो राईड होती.

महिलांसाठी बाईक वा बुलेट शिकणं खरोखरंच सोपं आहे का?

नक्कीच सोपं आहे. पहिले दोन दिवस तर मी बेसिक इन्फॉर्मेशन दिल्यानंतर गाडीला किक मारणं आणि ती स्टॅन्डवरून उतरवून परत चढवणं हेच शिकवते. कारण कुठेही पार्किंग करताना किंवा गाडी मिडल स्टॅन्डला लावताना त्रास होता कामा नये. कारण लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं, एक तर एक बाई म्हणून तुम्ही गाडी चालवत असता. तसंच तुमची उंची, वय, वजन यामुळे काही फरक पडत नाही. अगदी चार अकरा उंची असलेली महिलादेखील दुचाकी शिकू शकते.

बॉलीवूडमध्येसुद्धा मोटर सायकल शिकवली आहे का?

बॉलीवूडमध्ये काही जणांना मी शिकवलं आहे. सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांना शिकवलं आहे. सोनाक्षी सिन्हा यांना त्यांच्या एका फिल्मच्या प्रोजेक्टसाठी शिकवलं आहे. खूपच छान अनुभव होता तो. त्यानंतर सोनाक्षीने तिची मैत्रीण हुमा खान हिला माझा रेफरन्स दिला. ‘फॅमिली मॅन’मधील हाश्मी यांना शिकवलं आहे. अजून एक प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी मी नुकतंच ट्रेनिंग दिलं आहे.

महिला ड्रायव्हर्सबद्दल लोकांची मते वेगवेगळी आहेत, अनेकदा महिला ड्रायव्हर्सना नावं ठेवली जातात, काय सांगाल त्याबद्दल?

एक तर बायकांना फ्रीडम नसतं, त्यामुळे त्या सुरुवातीला तशा घाबरलेल्या असतात. मात्र मला तरी महिला ड्रायव्हर जास्त सावध आणि नियम पाळणाऱ्या वाटतात. वेगावर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे अपघात टाळले जातात. गाडी चालवताना संयम आणि शिस्त ठेवतात.

मला तरी वाटतं ड्रायव्हिंग चांगली की वाईट हे जेण्डरवर नाही, तर व्यक्तीच्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून असतं. चांगले आणि वाईट ड्रायव्हर स्त्री-पुरुष दोन्हीमध्ये असतात. मला वाटतं ‘महिला ड्रायव्हर’ ही टीका नाही, तो फक्त एक गोड गैरसमज आहे.

बाईकिंगमुळे महिलांच्या स्वभावात काय फरक जाणवतो?

खूप फरक जाणवतो. जेव्हा येतात तेव्हा लो कॉन्फिडन्स असतात. बऱ्याचदा ऑर्थोडॉक्स फॅमिलीतून आल्यामुळे त्यांना डिसिजन घेता येत नाहीत. मात्र बाईक शिकल्यानंतर एक आत्मविश्वास मिळतो. कारण ती एखादी गोष्ट त्या थोड्या दिवसात आत्मसात करतात. बऱ्याच मुली हल्ली लाँग डिस्टन्स ड्राईव्ह करतात.

तुम्ही आमच्या महिला वाचकांना काय सांगाल?

मला वाटतं की घरातील जबाबदाऱ्या या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. आपली आवड आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडूनच जोपासायला हवी. काही वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना देणे गरजेचे आहे. एकदा का तुमची मुलं मोठी झाली की तुम्ही प्रत्येकाला तुमच्यावरती डिपेंडंट बनवू नका. मी नसली तर हे होणारच नाहीये असं प्रत्येकीला वाटत असेल, तर त्यातून बाहेर यायला हवं. प्रत्येक बाईला स्वत:च पण एक जगणं असतं, तिच्या इच्छा आकांक्षा असतात, त्या प्रत्येकीने जोपासल्या पाहिजेत, कारण आयुष्याच्या शेवटी मला हे आवडत असूनही मी केलं नाही ही खंत राहता कामा नये.

डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण आहे गरजेचे

* सोमा घोष

18 वर्षीय सुमितला १२वी नंतर शिक्षण घ्यायचे नव्हते, कारण त्याला अभ्यास करायला आवडत नव्हता. त्याला पैसे कमावून श्रीमंत व्हायचे होते. त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सांगितले की, डिजिटल मार्केटिंग हा आज पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे लाखो लोक कमावू शकतात. हे लक्षात आल्यावर सुमित प्रभावित झाला आणि त्याने त्याचे शिक्षण सोडून दिले. त्याने आई-वडिलांना समजावून सांगितले की, आजच्या काळात जास्त अभ्यास केल्याने काही फायदा होत नाही, मेंदूचा वापर करावा लागतो, म्हणून तुम्ही माझ्यासाठी एक प्रयत्न करा, ज्यासाठी घरात एक संगणक, एक वेगळी खोली आणि एक की बोर्ड असणे गरजेचे आहे.

सुमितचे वडील राजेश यांनी मुलाचे म्हणणे ऐकले, कारण सुमित दिवसभर घरीच पडून असे, त्याने पुढील शिक्षण घेण्यासही नकार दिला. मुलाच्या हट्टामुळे अखेर आई-वडिलांनी त्याला एअर कंडिशनर, की-बोर्ड आणि संगणक घेऊन दिला. त्यांना वाटले होते की, त्यांचा मुलगा काही नवीन संकल्पनांसह चांगले पैसे कमावेल, पण तसे झाले नाही. सुमितला पहिले काही महिने काहीही कमावता आले नाही, परंतु सहा महिन्यांनंतर त्याने थोडे पैसे कमावले, दुसरीकडे वडील राजेश यांना खूप मोठे वीज बिल येऊ लागले, कारण त्यांचा मुलगा दिवसभर एसी लावून ठेवायचा.

आता काय करावे तेच वडिलांना सुचत नव्हते. त्यांनी पुजारी, ताईत, होमहवन आणि मंदिरांचा आधार घेतला, परंतु मुलाचे वर्तन तसेच राहिले. त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता वाटू लागली, कारण त्यांना माहीत होते की, शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणे कधीही शक्य नसते, कारण ते स्वत: एका महाविद्यालयाचा प्राचार्य होते.

२५ वर्षीय पीएचडीची विद्यार्थिनी सीमा हिने तिच्या मैत्रिणींच्या आग्रहावरून अभ्यासासोबत डिजिटल मार्केटिंगमध्येही काम करायला सुरुवात केली, पण काही महिन्यांतच तिला जाणवले की, या व्यवसायात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती ब्रँडकडून केली जात नाही. ब्रँडची प्रसिद्धी केल्यानंतर जेवढे पैसे मिळायला हवे होते ते तिला देण्यात येत नव्हते. थोडक्यात काय तर हे क्षेत्र वेळ आणि मेहनत वाया घालवते. म्हणूनच तिने नोकरी सोडली आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. हे खरं आहे की, आज जगाचा ८० टक्के भाग ऑनलाइन आहे आणि बहुतेक लोक खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन माहिती घेणे पसंत करतात. आज ऑनलाइन सेवा कोणालाही अगदी घरोघरी उपलब्ध आहेत. स्विगी आणि झोमॅटोसह अनेक प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच मागवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. ते त्वरित दाराशी पोहोचवले जातात. याशिवाय, वाहतूक सेवा ऑनलाइनदेखील मिळू शकतात. ज्यामध्ये उबर आणि ओला प्रमुख आहेत, म्हणूनच त्यांना मोठी मागणी आहे, विशेषत: कोविड-१९ साथीच्या काळात, सर्वकाही डिजिटल झाल्यामुळे, या सेवांना खूप गती मिळाली.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन किंवा सेवा विकण्याची पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंग. याला ऑनलाइन मार्केटिंग असेही म्हणतात. डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय आणि ऑनलाइन वाहिनीच्या संभाव्य ग्राहकांशी जोडले जाता येते.

डिजिटल मार्केटिंगचा इतिहास

डिजिटल मार्केटिंगच्या इतिहासाचा विचार करता, डिजिटल मार्केटिंग हा शब्द पहिल्यांदा १९९०च्या दशकात वापरण्यात आला. त्यानंतर, सोशल मीडियाच्या उदयाबरोबर त्याचा विस्तार झाला.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार

डिजिटल मार्केटिंगचे अनेक प्रकार आहेत, ज्यात व्हिडीओ मार्केटिंग, डिस्प्ले अॅडव्हर्टायझिंग, ईमेल मार्केटिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. अशाप्रकारे, डिजिटल मार्केटिंग हा एकूण डिजिटल धोरणाचा एक भाग आहे. व्यवसायाच्या गरजांनुसार हे वैयक्तिकरित्या वापरले जाऊ शकतात.

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यापूर्वी, त्या क्षेत्रात शिक्षण घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रक्रिया समजेल. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही त्यासंबंधित प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता. या क्षेत्रात एमबीए करण्याचा पर्याय देखील आहे (डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए), डिजिटल मार्केटिंग कोर्स ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने करता येतो. चांगली नोकरी मिळवण्यासाठी, तुम्हाला किमान ६ महिने किंवा १ वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

* सर्वप्रथम, मूलभूत कौशल्ये वाढवावी लागतील, जसे की डिजिटल मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे शिकणे, ज्यामध्ये एसइओ, पीपीसी, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स यांचा समावेश आहे.

* मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर, तुम्ही स्वत:ला कौशल्यवान बनवू शकता आणि स्वत:ची वेबसाइट तयार करू शकता, ज्यामध्ये सोशल मीडिया मोहिमा चालवणे, सामग्री तयार करणे आणि बरेच काही समाविष्ट आहे.

* हे काम घरी बसून करावे लागत नाही तर त्यासाठी बाहेर नेटवर्किंग आवश्यक आहे. उद्योगासंबंधी कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने तुम्हाला मार्केटिंग व्यावसायिकांशी चांगले संबंध निर्माण करण्यास मदत होऊ शकते आणि सोशल मीडियाद्वारे व्यावसायिकांच्या समुदायात सामील झाल्याने तुम्हाला नवीनतम ट्रेंड्सबद्दल माहिती मिळू शकते.

* मोठ्या कंपनीत सहभागी होण्यासाठी, तसेच गरजू कंपन्यांच्या गटात काम करण्यासाठी तुम्हाला नोकरीच्या संधी शोधाव्या लागतील. यासाठी कंपनीच्या वेबसाइट तपासाव्या लागतील.

* डिजिटल मार्केटिंग क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल तर तुम्ही प्रथम तुमच्या विषयाशी संबंधित ब्लॉग पोस्टसाठी गुगलवर शोधू शकता. याशिवाय, तुम्ही एक ब्लॉग तयार करू शकता आणि तुमचा अनुभव आणि ज्ञान शेअर करू शकता. डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी, तुमच्यामध्ये शक्य तितका सराव आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी हवी, जेणेकरून तुम्हाला हळूहळू त्यातील बारकावे समजू शकतील.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे

डिजिटल मार्केटिंगमुळे ब्रँडचा दबदबा वाढतो. ती कमी खर्चात करता येते. ती ऑनलाइन असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ग्राहकांची निष्ठा वाढू शकते. या उत्पादनाची जाहिरात करणं सोपं आहे, ज्याद्वारे देशातील तसेच परदेशातील वापरकर्त्यांपर्यंत ते सहज पोहोचू शकते, ज्यामुळे विक्री आणि महसूल वाढतो.

डिजिटल मार्केटिंगचे तोटे

डिजिटल मार्केटिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी, त्याच्या मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास नंतर पश्चात्ताप होऊ शकतो:

* डिजिटल मार्केटिंगमध्ये, सर्व प्रकारचे ब्रँड स्वत:ला विकसित करण्यासाठी स्पर्धा करताना दिसतात.

* आजकाल, डिजिटल जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वेगळे दिसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बँड्सचा भरणा आहे. विशेषत: लहान व्यवसायांसाठी वेगळे दिसणे ही एक कठीण लढाई असू शकते,

* डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात डेटा चोरी होणे सामान्य आहे. धोकादायक हॅकिंगपासून ते मालवेअरपर्यंत, धोके भरपूर आहेत. अशी घुसखोरी ब्रँडची विश्वासार्हता खराब करू शकते आणि आर्थिक नुकसान करू शकते.

* डिजिटल मार्केटिंगचे जाळे विस्तृत असले तरी, त्यात वैयक्तिक संवाद आणि जवळीकतेचा अभाव आहे. ग्राहकांशी थेट संवादाचा अभाव हा चुकीची माहिती आणि अविश्वास निर्माण करतो.

* तंत्रज्ञान हे डिजिटल मार्केटिंगचे सार आहे, जे पूर्णपणे सुरक्षित नाही. अस्पष्ट लिंक्स, प्रतिसाद न देणारी पृष्ठे किंवा सिस्टम ग्राहकांना निराश करू शकतात. बँडची प्रतिमा डागाळू शकतात आणि आर्थिक नुकसान करू शकतात. तांत्रिक त्रुटी विशेषत: डिजिटल मार्केटिंगच्या नवशिक्यांसाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे वेबसाइटची सखोल चाचणी घेण्याची गरज अधोरेखित होते. केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहाणे कधीकधी उलट परिणाम देऊ शकते. यामध्ये गुंतवलेले पैसे बुडू शकतात.

आता, प्रत्येक घर स्वतःचे अन्न सुरक्षा तपासणी बिंदू बनेल

* आभा यादव

अन्न सुरक्षा तपासणी बिंदू: भारतात अन्न भेसळीच्या वाढत्या घटनांमध्ये, तंत्रज्ञान आता प्रत्येक घराला अन्न सुरक्षा तपासणी बिंदूमध्ये बदलत आहे. स्मार्ट उपकरणे आणि नवीन तंत्रज्ञान तुमच्या कुटुंबाचे अन्न कसे सुरक्षित करू शकते ते जाणून घ्या.

भारतासारख्या देशात, अन्न हे केवळ पोषणाचे स्रोत नाही तर संस्कृती आणि कुटुंबाचा एक भाग आहे. तथापि, अन्न भेसळीच्या वाढत्या घटनांनी एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे – आपले अन्न खरोखर सुरक्षित आहे का? सणांच्या काळात, दूध, मिठाई, मसाले आणि तेलात भेसळीच्या बातम्या अनेकदा समोर येतात. म्हणूनच, अन्न सुरक्षा केवळ सरकारी तपासणीपुरती मर्यादित न राहता प्रत्येक घरात पोहोचणे आवश्यक आहे. आजचे तंत्रज्ञान या दिशेने महत्त्वपूर्ण फरक करू शकते.

भेसळ

एक लपलेला धोका अन्न भेसळीमुळे कधीकधी तात्काळ आजार होतात, परंतु त्याचे दीर्घकालीन परिणाम अधिक धोकादायक असतात. पेपर प्रोचे संस्थापक ध्रुव तोमर स्पष्ट करतात की दुधात युरिया, डिटर्जंट्स किंवा कृत्रिम घटकांसह भेसळ केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे, मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग, स्वस्त रसायने किंवा मिठाईमध्ये निकृष्ट दर्जाचे तेल मिसळल्याने आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

ही समस्या केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही. लहान शहरे आणि गावांमध्येही मर्यादित देखरेख प्रणाली धोका वाढवतात.

तंत्रज्ञानाने उपाय सुरू होतात

आता प्रश्न असा आहे की, प्रत्येक ग्राहक स्वतःहून काहीतरी करू शकतो का? उत्तर हो आहे. नवीन तंत्रज्ञानाने प्रयोगशाळांमधून अन्न चाचणी सामान्य लोकांच्या हातात आणण्यास सुरुवात केली आहे. आज, जलद चाचणी किट उपलब्ध आहेत जे काही मिनिटांत दूध आणि इतर अन्नपदार्थांमध्ये भेसळीची प्राथमिक ओळख देऊ शकतात. हे किट वापरण्यास सोपे आहेत आणि त्यांना विशेष तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही.

याव्यतिरिक्त, मोबाइल अॅप्लिकेशन्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता, मूळ आणि प्रमाणपत्र याबद्दल माहिती प्रदान करत आहेत. QR कोड स्कॅन केल्याने आता उत्पादनाची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. भविष्यात, एआय-आधारित तंत्रज्ञान आणि स्मार्ट उपकरणे अधिक अचूक घर-स्तरीय चाचणी सक्षम करू शकतात.

प्रत्येक घर अन्न सुरक्षा तपासणी बिंदूबनू शकते

जर तंत्रज्ञानाचा योग्यरित्या अवलंब केला गेला तर प्रत्येक घर एक लहान चाचणी युनिट बनू शकते. याचा अर्थ असा नाही की सरकारी संस्थांची भूमिका नाहीशी होईल, उलट, ते देखरेखीचा एक अतिरिक्त थर जोडेल. जेव्हा ग्राहक जागरूक होतील आणि त्यांना चाचणी साधनांची उपलब्धता मिळेल तेव्हा भेसळ करणाऱ्यांना धोका वाढेल.

ग्राहकांनी काय करावे?

* विश्वासार्ह ब्रँड आणि विक्रेत्यांकडून अन्न खरेदी करा.

* अत्यधिक स्वस्त ऑफरपासून सावध रहा.

* उत्पादन लेबल्स, उत्पादन तारखा आणि प्रमाणपत्रे तपासा.

* शक्य असल्यास जलद चाचणी किट वापरा.

* कोणत्याही संशयास्पद उत्पादनांची संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करा.

सामूहिक जबाबदारी

अन्न सुरक्षा ही केवळ सरकार किंवा उद्योगाची जबाबदारी नाही. ही ग्राहक, उत्पादक आणि नियामकांची सामायिक जबाबदारी आहे. तंत्रज्ञान हे त्रिकोण मजबूत करण्यासाठी एक प्रभावी साधन असू शकते.

जेव्हा प्रत्येक घर जागरूक असेल तेव्हाच सुरक्षित अन्नाकडे खरा बदल शक्य होईल. शेवटी, निरोगी समाजाची सुरुवात सुरक्षित अन्नाने होते.

गृहशोभिका एम्पॉवरहर इव्हेंट, मुंबई

* रजनी प्रसाद

‘गृहशोभिके’चे प्राथमिक उद्दिष्ट नेहमीच महिला सक्षमीकरण राहिले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, ते त्यांच्या सक्षमीकरण कार्यक्रमांद्वारे महिलांना प्रेरणा देत राहते. ते दिल्ली, जयपूर, बेंगळुरू आणि चंदीगडसारख्या शहरांमध्ये पुरस्कार कार्यक्रम आयोजित करते, जे महिलांचे मनोबल आणखी वाढवते, जसे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी पाहिले. ती या कार्यक्रमात फक्त मजा करण्यासाठीच नाही तर प्रमुख वक्त्यांशी आणि त्यांच्या अनुभवांशी संवाद साधण्यासाठी येते, स्वतंत्र आणि मजबूत राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते, जेणेकरून ती स्वत:ला आणि तिच्या सभोवतालच्या महिलांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक रूपाली यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तिने उत्साहाने सर्व भागीदार आणि प्रायोजकांची ओळख करून दिली आणि त्यांचे आभार मानले.

प्रायोजक: म्युच्युअल फंड पार्टनर: बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड, ज्वेलरी पार्टनर: किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी, असोसिएट प्रायोजक: मोलबायो.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पाहुण्यांना ‘गृहशोभिका’ मॅगझिनच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करण्यास आणि ‘गृहशोभा’ मॅगझिनला टॅग करून कार्यक्रमातील त्यांच्या वेळेतील सर्वोत्तम फोटो किंवा रील पोस्ट करण्यास सांगितले गेले. सराव सामन्यानंतर, कार्यक्रम सुरू झाला.

सत्र एक: महिलांच्या करिअर संधी

या सत्र आणि कार्यक्रमाच्या पहिल्या पाहुण्या वक्त्या सुश्री रेश्मा नितीन मोरे होत्या. सुश्री रेश्मा या शक्ती चॅनलच्या शाखा व्यवस्थापक आहेत, ज्यांना वित्तीय सेवा उद्योगात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. या कार्यक्रमात त्यांनी महिला पाहुण्यांसोबत हा अनुभव आणि ज्ञान शेअर केले. त्यांनी स्पष्ट केले की महिलांचे खरे सक्षमीकरण तिच्या आर्थिक स्वातंत्र्यात आहे. म्हणूनच महिलांनी त्यांच्या करिअर वाढीबद्दल नेहमीच गंभीर असले पाहिजे.

दुसरे सत्र: महिलांचे आरोग्य आणि निरोगीपणा

डॉ. वैशाली जोशी यांनी या सत्रात आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थिती लावली. डॉ. वैशाली या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.    डॉ. वैशाली गेल्या दोन दशकांपासून महिलांच्या आरोग्य आणि तपासणीवर काम करत आहेत. डॉ. वैशाली म्हणाल्या की महिला त्यांच्या कामात, कुटुंबात आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त होतात की त्यांना स्वत:साठी वेळ मिळत नाही. त्या त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडतात. म्हणून, डॉ. वैशाली यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक राहण्यास आणि स्वत:साठी वेळ देण्यास प्रोत्साहित केले.

किसना गेम सेगमेंट

या कार्यक्रमादरम्यान, किसना डायमंड्स अँड गोल्ड ज्वेलरीजने त्यांच्या पाहुण्यांसाठी एक अनोखी क्विझ आयोजित केली होती. ज्यांनी पाच प्रश्नांची अचूक उत्तरे दिली त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन बक्षिस देण्यात आले.

पुढील सत्र: ज्वेलरी सेगमेंट

या सत्रात, किसना डायमंड्स अँड गोल्ड ज्वेलरीजच्या वतीने श्री. विवेक जे. संघानी, एरिया ऑपरेशन्स मॅनेजर, व्यासपीठावर आले. त्यांच्या वर्षांच्या अनुभव आणि ज्ञानाचा वापर करून, श्री. विवेक यांनी हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता उत्कृष्टपणे स्पष्ट केली, जी आपण सोने आणि हिऱ्याचे दागिने खरेदी करताना शोधली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे.

शेवटचे सत्र: आत्मविश्वास आणि वैयक्तिक शैली

या सत्रासाठी पाहुण्या वक्ता नेहा मंडल होत्या. ती एक महिला उद्योजक, एक स्टाइल तज्ज्ञ, नृत्यदिग्दर्शक आणि अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये १५ वर्षांची अनुभवी आहे. शिवाय, नेहा ‘कालनेम आर्ट स्टुडिओ’ची संस्थापक आहे, जिथे स्टाइल, नृत्य आणि फिटनेस हे सर्व एकाच ठिकाणी एकत्र केले जातात.

कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना स्टायलिश कसे राहायचे याबद्दल नेहाने अनेक टिप्स दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की स्टायलिशपणा हा फक्त तुम्ही घालता त्या कपड्यांबद्दल नाही; तर तुमची स्टाईल तुम्ही कोणत्या आत्मविश्वासाने घालता यावर अवलंबून असते.

कार्यक्रम संपण्यापूर्वी, एक रोमांचक ट्विस्ट आला. किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी येथे एक लकी ड्रॉ झाला, ज्यामध्ये विजेत्या महिला पाहुण्याला भेट म्हणून एक चमकणारा हिरा मिळाला.

दुपारच्या जेवणानंतर निघून जाताना सर्व पाहुणे समाधानी आणि आनंदी दिसले. याचा अर्थ दिल्ली प्रेसने आपल्या ध्येयात यश मिळवले आहे आणि ते आपले यशस्वी प्रयत्न सुरू ठेवेल.

बाबा बुवांच्या निशाण्यावर परदेशी तरूणी

* प्रतिनिधी

दिल्लीमध्ये एका स्विस तरुणीची हत्या अनेक प्रश्न निर्माण करतात. ही तरुणी स्विझरलँडमध्ये मारेकरी गुरप्रीत सिंहला ३ वर्षांपूर्वी एका पार्टीत भेटली होती आणि त्यानंतर दोघांमधील भेटी वाढत गेल्या. गुरप्रीतच्या सांगण्यावरून लीना बर्जर दिल्लीत आली. जिथे गुरप्रीत लग्न करण्यासाठी तिच्या मागे लागला. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा तिला मारून तिचं प्रेत एका रस्त्याच्या किनारी फेकून दिलं.

पोलिसांना साखळदंडांनी बांधलेल्या प्रेताची ओळख पटविण्यात आणि मारेकऱ्याला पकडण्यासाठी खूप फिरावं लागलं. कारण खूपच कमी सूत्र उपलब्ध होती. तरीदेखील त्याला पकडण्यात आलं कारण दिल्लीच्या शेकडो कॅमेऱ्यांमध्ये काही ना काही गोष्टी कैद होतंच असतात.

गुरूंच्या जंजाळात अडकणाऱ्या मुली

हजारो तरुणी आज गुरूंच्या आश्रमामध्ये रहात आहेत आणि नाटक करत आहेत की त्यांना खरी शांती इथेच मिळतेय. पश्चिमी देशांमध्येदेखील प्रत्येक गुरुंचे डेरे आहेत, जिथे या तरुणींना ते आकर्षित करतात आणि त्यांच्या मागे मागे त्यांचे बॉयफ्रेंडदेखील निघून येतात. त्यांचे पैसेदेखील लुटले जातात आणि त्यांच्या शरीराचा उपयोगदेखील केला जातो. तुटलेल्या घरांमधून येणाऱ्या या मुली त्यांचे आईवडील, कुटुंबावरती एवढ्या नाराज असतात की त्यांना त्रास देण्यात त्यांना काहीच वाटत नाही.

गोवा, धर्मशाळा, जैसलमेरसारख्या जागी अशा मुलींची संख्या वाढत चालली आहे. ज्या टुरिस्ट विजावर येतात आणि एखाद्या स्थानिकाशी लग्न करून परमनंट विजा मिळवतात आणि मग इथल्याच होऊन जातात. कारण त्यांना त्यांचा श्रीमंत आणि स्वच्छ देश आवडत नाही. भारतीय तरुणांनी हे चांगलंच ओळखलंय आणि कितीतरी तरुण गोऱ्या मुलींना इकडे घेऊन येत आहेत.

फक्त नावाची देवी

 २०१७ साली गोव्यामध्ये आयर्लंडची २८ वर्षीय तरुणी डॅनियल मॅकलाक्लीनच प्रेत मिळालं. ती एका ऑस्ट्रेलियन तरुणासोबत राहत होती. २०२० साली गुजरातच्या सुरतमध्ये थायलंडची वरिंडा बुर्जोनला त्याच घरात जाळून मारलं होतं. २०१८ साली केरळमध्ये युरोपातील लातावियाच्या एका मुलीला मारून टाकलं, जिला आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली फसवून भारतात बोलवण्यात आलं होतं. तिला नशा देऊन तिच्यावर रेप करण्यात आला आणि नंतर तिचं प्रेत दलदलीत फेकण्यात आलं होतं.

भारतात दिल्लीच्या जवळ निठारीमध्ये जे झालं आणि ज्या प्रकारे पकडल्या गेलेल्या दोन जणांना सोडण्यात देखील आलं होतं. यावरून सरळ आहे की इथे मुली अजिबात सेफ नाहीयेत. आपण ना आपल्या स्त्रियांचा आदर करतो, ना ही बाहेरच्या स्त्रियांचा. देवी बनवून तिची पूजा करतो आणि घरात मात्र तिची जागा एखाद्या पायताणासारखी असते.

१० टीप्स किशोरवयीन मुलांशी मैत्रीसाठी

* शोभा कटारे

किशोरवयीन तरुण अनेक बदलांमधून जातात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हार्मोन्स. एकीकडे शरीरात झपाट्याने बदल होत असतात, तर दुसरीकडे हे हार्मोन्स त्यांच्या भावना आणि भावनांमध्येही अनेक बदल घडवून आणतात. तरुणांमध्ये प्रेम, आकर्षण, राग, दुखापत अशा भावना वाढू लागतात. एकीकडे ते या भावना आणि बदल समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शाळेतील अभ्यासाचा दबावही वाढू लागतो. हा दबाव आणि हार्मोन्स मुलाच्या बदलत्या प्रकृतीला जबाबदार असतात.

सकारात्मक नाते टिकवण्यासाठी या टीपांचे अनुसरण करा :

माहिती ठेवा

तरुणांना विश्वासात घेऊन स्वातंत्र्य द्यायचे असले तरी, तरुण किंवा किशोरवयीन कोठे जात आहेत, ते कोणाला भेटत आहेत, ते काय करत आहेत किंवा त्यांचे मित्र कोण आहेत याची पालकांना जाणीव असणे आवश्यक आहे.

ध्येय गाठण्यात मदत करा

हर टीनएजर आपले एक लक्ष्य आहे आणि त्याला पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये आईवडिलांनी त्यांना मदत करणे आवश्यक आहे आणि त्याला हे लक्ष्य प्राप्त करणे मोठ्या प्रमाणात आहे, तसेच ही अपयशी देखील त्याच्या विश्वासाला तयार करण्यात संभाव्यपणे मदत करेल.

मित्र व्हा

किशोरवयीन मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी पालक होण्यासोबतच मित्रांचे नातेही निर्माण करावे लागेल जेणेकरुन किशोर आणि तरुण त्यांच्या समस्या किंवा सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्याशी उघडपणे सांगू शकतील जेणेकरून ते कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाळ्यात अडकू शकतील. गोष्टी त्यांचे मैत्रीपूर्ण वागणे किशोरांना जवळ ठेवेल, तरच वडील त्यांना योग्य आणि अयोग्य याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील.

एकत्र काही वेळ घालवा

हे महत्वाचे आहे की दिवसभरात किमान १ तास एकत्र घालवावा. हा काळ एकत्र खाण्याचा, स्वयंपाकाचा, साफसफाईचा किंवा इतर कशाचाही असू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही २०-२५ मिनिटे एकत्र बोलू शकता आणि दिवसभरातील गोष्टी शेअर करू शकता. व्हिडिओ गेम आणि बोर्ड गेम किशोरवयीन मुलांसोबत खेळले जाऊ शकतात. त्यांच्याशी राजकारणावर गंभीर चर्चा होऊ शकते. पुस्तके किंवा मासिकांमध्ये लिहिलेल्या गोष्टींवर चर्चा केली जाऊ शकते.

धीर धरा

किशोरवयीन मुलांचे चांगले संगोपन करण्याचा मार्ग म्हणजे पालकांनी संयम बाळगणे. किशोरवयीन स्वत: इतक्या बदलांमधून जात आहे की वडीलधाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. आपला मुलगा किंवा मुलगी विचित्र का वागत आहे हे येथे वडिलांनी समजून घेतले पाहिजे. त्याच्या मूड स्विंगमुळे त्याच्यावर ओरडू नका. अशा परिस्थितीत, एक पालक म्हणून, वडिलांनी त्याच्या/तिच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी थोडा धीर धरा. चिडवू नका किंवा रागावू नका. लक्षात ठेवा की ते पौगंडावस्थेपर्तंत पोहोचतात तेव्हा किशोरवयीन मुले मोठ्याने बोलणे आणि रागावणे शिकले आहेत. त्यांना अनेक गोष्टी माहीत असतात ज्या मोठ्यांना माहीत नसतात.

किशोरांना त्यांच्या भावनांबद्दल विचारा. पण त्याला वडीलधाऱ्यांना काहीही सांगायचे नसेल तर त्याला उत्तरे देण्याची सक्ती करू नये, फक्त वडीलधारी मंडळी त्याच्या पाठीशी आहेत याची त्याला खात्री द्या. जेव्हा तो बोलायला येतो तेव्हा वडिलांनी त्याला पूर्ण वेळ द्यावा. त्याला खिजवण्याऐवजी त्याला बोलण्याची संधी द्या. यामुळे, त्याला कोणत्याही प्रकारचे दडपण जाणवणार नाही आणि मोठ्यांसमोर आपले मत उघडपणे मांडता येईल.

मोठ्यांचा आदर करायला शिकवा

अनेक वेळा, रागाच्या भरात आणि चिडून, किशोरवयीन मुले त्यांची मर्यादा ओलांडतात आणि त्यांच्या पालकांबद्दल वाईट बोलतात. अशा परिस्थितीत खूप संयम ठेवा. आईने त्यांना सांगितले पाहिजे की त्यांना त्यांचा राग किंवा समस्या समजू शकतात, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या आईशी अशा प्रकारे बोलू नये.

त्यांना प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे की त्यांच्या शरीरात आणि मनात होणारे बदल चांगले समजतात. पण तरीही अशा काही गोष्टी आहेत ज्या अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत जसे की खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, मोठ्यांचा अपमान करणे, मोठ्यांशी मोठ्याने बोलणे. जर एखाद्या किशोरवयीन मुलाने किंवा तरुणाने या गोष्टी केल्या तर वडीलधाऱ्यांनी त्याला न डगमगता त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी आणि भविष्यात काळजी घेण्यास सांगितले पाहिजे.

त्यांच्यावर विश्वास ठेवा

या वयात, किशोर आणि तरुण त्यांच्या मित्रांच्या खूप जवळ असतात. ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा त्यांच्या मित्रांना अधिक सांगतात. अशा परिस्थितीत, तरुण सोबत बोला, परंतु त्यांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करू नका. फक्त हे शोधण्याचा प्रयत्न करा की त्यांना काहीतरी चुकीचे करण्यास प्रवृत्त करणारा कोणी मित्र आहे का?

वडिलधाऱ्यांना असे वाटत असेल तर त्यांनी तरुणांना सावध करून समजावून सांगावे, तरुणांना या वयात नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असेल की तो काही चुकीचे करत नाही, तर त्याची हेरगिरी करू नये, तर त्याच्यावर विश्वास ठेवावा. अनेक वेळा ते स्वत: चुका करूनच शिकतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी मिळण्याचा अधिकार आहे.

आनंदी रहा

एखादा किशोरवयीन त्याच्या पालकांकडे त्याच्या समस्या घेऊन आला, तर त्यांना आनंद झाला पाहिजे की त्याचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे, यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे आणि नंतर मला सांगा, तुम्ही काय आहात असे सांगून पाठलाग करू नये वारंवार तुमच्या सर्व समस्या घेऊन या, तुमच्या समस्या स्वत: सोडवायला शिका, इ.

काही नियम बनवा

हे शक्य आहे की अति-स्मार्ट होण्यासाठी, ते तुमच्याकडे किंवा तुम्ही म्हणत असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतील. जास्त कडकपणा घरात चांगला दिसत नाही, पण पूर्ण डील देणेही योग्य नाही. घरातील वातावरण सुरळीत ठेवण्यासाठी काही नियम केले तर तरुणाई आनंदाने त्यांचा अवलंब करतील, नियम समजावून सांगण्याबरोबरच ते बनवण्याचे कारणही सांगा आणि त्यातून काय फायदा होईल, हेही सांगा. केव्हा आणि कुठे, कसे आणि का वागावे हे त्याला समजेल.

प्रत्येक परिस्थितीत शांत रहा

किशोरवयीन मुले स्वत: हुशार असतात परंतु त्यांना असे वाटते की त्यांच्या पालकांनी दिलेले ज्ञान जुन्या पद्धतीचे आहे. प्रत्येक समस्या किंवा समस्या किंवा कोणतीही माहिती पालकांना विचारण्याऐवजी ते त्यांच्या मित्रांना किंवा गुगलला विचारतात. मग अनेक वेळा आई-वडील आणि मूल यांच्यात अहंकार येऊ लागतो आणि तो भांडण किंवा नकारात्मकतेचे कारण बनू लागतो. या परिस्थितीत, आपण प्रौढ व्यक्तीसारखे वागले पाहिजे, शांत रहा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा.

किशोरावस्था हा पालक आणि किशोरवयीन मुलांसाठी कठीण काळ असतो परंतु एक चांगले पालक बनून, तुम्ही त्यांना जीवनाचा हा टप्पा सुलभ करण्यात नक्कीच मदत करू शकता. त्यांचे वागणे आणि सवयी बदलून ते शांत पालक राहिले, तर किशोरवयीन मुले आणि तरुण त्यांच्या पालकांचे ऐकतील आणि वडीलधाऱ्यांशी कोणतीही गोष्ट शेअर करण्यात त्यांना अजिबात संकोच वाटणार नाही अशी दाट शक्यता आहे.

म्हणूनच किशोरांना समजूतदार पालकांची नितांत गरज आहे. त्यासोबतच वडिलांनीही आपल्या वागण्यात बदल करणे आवश्यक आहे.

स्वयंपाक बनवा तणाव पळवा

* सोमा घोष

आजच्या धावपळीच्या जीवनात कुकिंगला स्ट्रेस बस्टर मानले जाते. कारण जेव्हा आपण जेवण बनवता, तेव्हा आपण ते बनविण्यासाठी आणि त्याचा स्वाद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सामुग्रीचा वापर करता. भाज्या चिरण्यापासून ते बनवण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपले लक्ष विभागले जाते, ज्यामुळे आपला स्ट्रेस लेवल कमी होतो. एका सर्व्हेमध्ये असे आढळून आले की बेकिंगमध्ये महिला आणि पुरुषांचा जवळपास ४० टक्के स्ट्रेस कमी होतो. म्हणून जेवण बनवण्यास ओझे नव्हे, तर आपल्या मानसिक आणि शारीरिक हेल्थसाठी उपयुक्त मानण्याची गरज आहे.

याबाबत हायपर सिटीमध्ये आयोजित ‘कुकिंग विथ एक्सपर्ट’मध्ये आलेल्या सेलिब्रिटी शेफ रणवीर बरारचे म्हणणे आहे, ‘‘कुकिंग बेस्ट थेरपी आहे, जी कोणत्याही मानसिक आजाराला कमी करू शकते. मोठमोठ्या शहरात कुकिंगने स्ट्रेस लेव्हल कमी करण्याच्या दिशेने वर्कशॉप चालवले जात आहेत. संपूर्ण जग याला थेरपी मानते. ५ वर्षांपूर्वी परदेशात जो स्ट्रेस लेव्हल होता, त्याला बेकिंग आणि कुकिंगद्वारे ८० टक्के कमी करण्यात मदत मिळाली आहे. माझ्या जीवनातही कुकिंगमुळे खूप परिवर्तन आले आहे. मी १६ वर्षांच्या वयात कोळसा वाहून नेत असे आणि मसाले कुटत असे. आज २३ वर्षांत मी इथपर्यंत पोहोचलो आहे.’’

कुकिंगचे खालील फायदे :

* जेवण एकमेकाला जोडते. मग ते फ्रेंड असोत की कुटुंबीय. चांगले जेवण मिळावे अशी सर्वांचीच इच्छा असते.

* कुकिंग करताना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनांना कापावे लागते. त्यामध्ये भाज्यांचे रंग आणि मसाल्यांचे फ्लेवर कापणाऱ्यांच्या नसांना शांती प्रदान करतात. त्यामुळे तणाव कमी होतो.

* भाज्या कापणे, कुस्करणे, क्रश करणे, स्लाइस करणे, सोलणे इ. सर्व कामे आपले लक्ष प्रभावी पध्दतीने कोणत्याही समस्येपासून दूर हटवितात. त्यामुळे आपण तणावमुक्त होता.

* कुकिंगमध्ये खूप क्रिएटिव्हिटी असते. पदार्थ जेवढे आपण योग्य प्रकारे सादर कराल, तेवढ्याच आपण वेगवेगळ्या पध्दती शोधून काढाल. त्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल.

* जेव्हा आपण एखाद्या मित्र किंवा कुटुंबीयांच्या आवडीचा स्वयंपाक करता आणि खूश होऊन ते ग्रहण करतात, तेव्हा आपल्यावर तणावाचे नव्हे, तर स्वयंपाकाचे वर्चस्व असते.

* स्वयंपाक करणे एक कला आहे, जी प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असते आणि शांती देते.

* जेवण बनवायला आल्यावर आपण आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.

हे खरे आहे की, आजच्या धावपळीच्या काळात नोकरदार महिलांनी स्वयंपाक बनवणे सोपे नसते. अशावेळी आपल्याला जर स्मार्ट कुकिंग करायची असेल, तर ही तयारी आधीपासूनच करून ठेवा :

* कुकिंगमध्ये उपयोगात येणाऱ्या सर्व पदार्थांची आपण व्यवस्था करू शकत नसाल, तेव्हा स्मार्ट कुकिंगची सर्वात चांगली पध्दत ही आहे की बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा उपयोग स्वयंपाकात करा.

* भाज्या रात्रीच चिरा. कच्च्या मसाल्याचे पदार्थ वाटून, भिजवून, वाफ देऊन आधी फ्रीजमध्ये ठेवा.

* जर डाळ बनवायची असेल, तर ती आधी भिजवून ठेवा, जेणेकरून ती लवकर शिजेल. त्यामुळे त्याची पोषक तत्त्वेही टिकून राहतात व पटकन मऊ होते.

नोकरदार महिलांसाठी रणवीर बरार सांगतात, ‘‘नोकरदार महिला स्वत:ची काळजी न घेता संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचा ‘मूड’ आणि ‘मॉरल’ दोन्ही कमी होतात. अशावेळी त्यांनी आधी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे, ज्यामुळे त्यांना कामाच्या वेळी कुठल्याही प्रकारे तणाव राहणार नाही.’’

मुलांना मारझोड करण्याचे ९ तोटे

* शोभा शर्मा

आई-वडिलांनी मुलांना मारझोड करण्याचं कारण काहीही असू शकतं जसं की लहानमोठं नुकसान करणं, जखमी होणं, बहिण भावंडांना मारणं, न सांगता बाहेर जाणं, मस्ती करणं, अभ्यास न करणे इत्यादी. जर तुम्ही तुमच्या मुलांवरती हात उचलत असाल तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात :

आत्मविश्वासामध्ये कमी : मारझोड करून तुम्ही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कमी करत आहात, खास करून जेव्हा त्याच्या मित्रांच्या समोर, लहान बहीणभावंड वा स्कूल कॉलेजमध्ये, सोसायटीमध्ये सर्वांच्या समोर मारता तेव्हा.

चुकीची उपाधी देऊ नका : मुलं स्वत:हून स्वत:ला तसंच समजतात जे त्याला मारते व ओरडतेवेळी तुम्ही बोलता. अनेकदा आई-वडील आपल्या मुलांना रागाने तू इतरांसारखा हुशार का नाही आहेस किंवा मस्ती का करतोस. मारतेवेळी रागामध्ये वेगवेगळी विशेषणं, उपाधी देत राहतात. जसं की गाढव, मूर्ख, घाबरट. अशावेळी तुम्ही जे त्याला बोलाल तेच तो बनेल. तो रागात असूनसुद्धा असंच बनण्याचा विचार करेल.

वाढती मस्ती : मुलांची वाढती मस्ती आणि त्यांची वागणूक आई-वडिलांना राग आणण्या वा मारण्यापासून रोखू शकत नाही. कधी कधी तर मुलं एवढी मस्ती करतात की पेरेंट्स यावरचा उपाय म्हणून फक्त आणि फक्त मारझोडंच करताना दिसतात, जे एकदम चुकीचं आहे.

बेडर होईल : तुम्ही तुमच्या मुलांना विद्रोहीदेखील बनवू शकता, कारण एक दोनदा मारल्याने तो तुम्हाला घाबरून जाईल परंतु वारंवार मारल्यामुळे तुमची जी भीती आहे ती त्याच्या मनातून निघून जाईल. कधीकधी तो समजू शकतो की जेवढे तुम्ही त्याला मारले तेवढी, त्याची एवढी चूकही नव्हती. तर तो तुम्हाला उलटून उत्तर देखील देऊ शकतो. तो असं काम करेल, जे तुम्हाला आवडणार नाही. आणि तो बेडर बनेल.

हीन भावनेने ग्रस्त : तुम्ही वारंवार मारल्यामुळे मुलांमध्ये हीन भावना येते आणि ते नकारात्मक विचार करू लागतात व रागीट बनू शकतात ज्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतात, कारण मुलं त्यांच्या लहानपणापासूनच्या चांगल्या आठवणी लक्षात ठेवतात तसेच वाईट आठवणी देखील तेवढ्याच लक्षात ठेवतात.

दुरावा येऊ शकतो : मारल्यावर मुलं तुमच्यापासून दूर होतं आणि ते त्याच्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकत नाही. कारण मारून तुम्ही त्याच्या मनामध्ये भीती घातलेली आहे. अनेक अशा पालकांची उदाहरणं पाहायला मिळतात जी आपल्या मुलांना सुधारण्यासाठी मारत राहतात आणि आता तीच मुलं त्यांच्या सावलीपासूनदेखील दूर राहतात आणि फक्त मित्रांचे म्हणणं ऐकतात. जर अशावेळी मित्रांची वाईट संगत लागली तर मूल बिघडू शकतं.

विकासामध्ये बाधक : मारणं मुलांच्या विकासास मारकदेखील बनू शकतं.

रागाचे परिणाम : जर तुम्ही तुमच्या रागाची बीजं त्याच्यामध्ये रोवली तर अशा प्रकारे तो रागीट बनेल. तो तेच शिकेल जे त्याने तुम्हाला करताना बघितलंय.

दब्बू बनेल : वारंवार मारल्यामुळे मूल दब्बू बनतं.

काय करावं

लहान मोठ्या चुकींसाठी मुलांना प्रेमाने समजवा. स्वत:च्या रागावर काबू ठेवा. दुसऱ्या गोष्टीचा राग, नाकर्तेपणा, थकवा चिडचीड मुलांना मारून उतरवू नका.

लग्नासाठी उत्सुक तरूणांचे कोण ऐकणार?

* भारत भूषण श्रीवास्तव

२३ डिसेंबर २०२३ रोजी मोक्षदा एकादशीच्या दिवशी विष्णूसह इतर देवी-देवता नीट उठलेही नव्हते, तोच खाली जमिनीवर असलेले तरुण अविवाहित आरडाओरड करू लागले की, आता जर तुम्ही खरोखरंच जागे झाले असाल तर आमचे लग्न लावून द्या. तुम्ही जर हे करू शकत नसाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि पदाचा राजीनामा द्या, अशी मागणीही या तरुणांनी केली.

भारत भूमीतील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे सकाळीच सुमारे ५० अविवाहित, वराची वेषभूषा करून घोड्यावर स्वार झाले होते. बँड, लग्नाच्या मिरवणुकीसह हे अविवाहित डीएम ऑफिस म्हणजे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दिशेने नवरदेव मोर्चा घेऊन निघाले होते.

आजकाल, विष्णुजींना जगात जास्त काम आहे, ते पालनकर्ते असल्याने कदाचित लग्नासारख्या क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणूनच भजन आणि आरती गाऊन त्यांना याचसाठी जागे केले जाते की, हे भगवंता उठ आणि विश्वाच्या शुभ कार्यांसह लग्न लावून दे. जी प्रत्येक अविवाहित तरुणाची रोजगारानंतरची दुसरी सर्वात मोठी इच्छा असते. या तरुणांनी शहाणपण दाखवत लग्न पार पाडण्यासाठी कलियुगात पृथ्वीवरील विष्णूचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनाऐवजी जाहिरात आवश्यक

या अविवाहित तरुणांचे दयनीय रडगाणे वरच्यापर्यंत पोहोचले असेल, अशी आशा कमीच आहे. खालच्या देवांबद्दल, बोलायचे झाल्यास ते फक्त मनातल्या मनात हसून केवळ निवेदनच स्वीकारू शकतात. जर कोणी थोडेसेही संवेदनशील असेल तर निदर्शनास आणून देईल की, हे बंधूंनो, मला निवेदन देण्याऐवजी जाहिरातीची मदत घ्या. माझ्यावर किंवा देवावर विसंबून राहू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त वधू शोधण्यातच खर्ची पडेल आणि तुम्ही या नश्वर जगाला अविवाहित म्हणूनच सोडून जाल.

हा सल्लाही त्यांच्या मनात कुठेतरी दडला असेल की, खरा पुरुष असशील तर पृथ्वीराज बनून तुझ्या संयोगिताला घेऊन येशील. सोलापुरातील नवरदेव मोर्चा पाहून लोक आस्थेने आणि आश्चर्याने बघतच राहिले होते, हे तुमच्याही कानावर आले असेलच ना?

काहींना या अविवाहित वऱ्हाडींबद्दल कमालीची सहानुभूती होती, पण त्यांनाही हा प्रश्न पडला होता की, जर तो वरचा या अभागी तरुणांचे ऐकत नसेल तर आम्ही पामर काय करू शकणार? आम्ही कसेबसे आमचे लग्न केले आणि अजूनही ते बोलत आहोत. या वेड्या लग्नाळूंना कोण समजावणार की भावा, संसाराच्या भानगडीत पडू नकोस, पश्चातापच करायचा असेल तर तो लाडूची चव न चाखता कर.

समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही

हे देखील एक मनोवैज्ञानिक तत्त्व आहे की, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या आणि लग्न करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला ब्रह्मादेखील समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही, कारण जे भाग्यात असते तेच घडते. आता या लग्नाळूंबद्दल बोलायचे तर, तुलसीदासांनी खूप आधीच स्पष्ट केले आहे की, ज्यांना भगवंत दारुण दु:ख देतो त्यांची बुद्धी आधीच भ्रष्ट करतो.

पादचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नवरदेवांच्या मोर्चात रस घेतला, तेव्हा त्यांना समजले की, या बिचाऱ्यांना मुली अजिबात मिळत नाहीत आणि ज्यांना त्या कशाबशा मिळतात, त्या या विवाहोच्छुक तरुणांना कुजलेल्या आंब्यासारखे नाकारतात, कारण त्यांच्याकडे रोजगार नाही.

सोलापुरातील हे दृश्य पाहून कदाचित काहीना तो प्राचीन काळ आठवला असेल जेव्हा मुली तोंडातून चकार शब्दही काढू शकत नव्हत्या आणि आई-वडील ज्याच्या गळ्यात बांधायचे त्यालाच सर्वस्व मानून त्याच्यासोबत सावित्री बनून आयुष्य व्यतीत करायच्या. बेरोजगार तर दूरचीच गोष्ट, मुलगा लंगडा, पांगळा, आंधळा किंवा काणा असला तरी ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो,’ अशी प्रार्थना करत त्या वटसावित्रीचा उपवास करत आणि पुढील प्रत्येक जन्मासाठी त्याचेच बुकिंग करून ठेवत.

काळ बदलला आहे

पण, आता काळ आणि मुली दोन्ही बदलले आहे. मुली सुशिक्षित, हुशार, स्वाभिमानी आणि जागरूक झाल्या आहेत. त्यामुळेच आता त्यांना ऐऱ्यागैऱ्या कोणाच्याही गळ्यात बांधले जाऊ शकत नाही. पूर्वी मुलींना गाय म्हटले जायचे. आयुष्यभर त्या त्याच खुंटीला बांधून पडलेल्या असायच्या. आई-वडीलच त्यांना असे बांधून ठेवायचे. पण, आता मुलींनी स्वत:च स्वत:चा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे. अर्थात त्या कोणावरही अवलंबून नसल्याने स्वत:साठी योग्य वर शोधू लागल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

बेरोजगार जोडीदार हा त्यांचा शेवटचा प्राधान्यक्रमही नाही, त्यामुळेच सोलापुरातील अविवाहित तरुणांचा मोर्चा हा प्रत्यक्षात बेरोजगारीविरोधातील मोहीम आहे, हे समजून घेतले पाहिजे, ज्या अंतर्गत वधूच्या वेशात सरकारकडून नोकरी किंवा नोकरीची मागणी केली जात आहे. असे मोर्चे देशाच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतात, जिथे या लग्नाळू तरुणांचे दु:ख ओसंडून वाहताना दिसते.

स्वस्तातला तमाशा नाही

कर्नाटकातील ब्रह्मचारिगलू पदयात्रेत, असेच दु:ख मंड्या जिल्ह्यातील तरुणांनी मार्च महिन्यात व्यक्त केले होते. सोलापुरात ज्याला अविवाहित नवरदेवांचा मोर्चा असे संबोधले गेले त्याला कर्नाटकात ब्रह्मचारीगलू पदयात्रा म्हटले गेले. या पदयात्रेत सुमारे ६० अविवाहित तरुणांनी १२० किलोमीटरचा प्रवास करून चामराजनगर जिल्ह्यातील महादेश्वर मंदिर गाठले. तेव्हा सर्वांनी हे मान्य केले होते की, ही कोणतीही स्वस्तातली पदयात्रा किंवा प्रसिद्धीसाठीचा स्टंट नाही. खरंतर या तरुणांना नोकरी नाही. काही तज्ज्ञांनी दिला असा निष्कर्ष काढला होता की, या अविवाहित तरुणांना चांगली नोकरी नाही आणि मुळात हे पदयात्री शेतकरी कुटुंबातील आहेत.

या समस्येचा दुसरा पैलू असा समजला की, नव्या युगातील मुलींना लग्नानंतर गावात राहायचे नाही आणि आता शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षितता नाही, त्यामुळे मुलींसोबत मुलींचे पालकही धोका पत्करायला तयार नाहीत.

केवळ कर्नाटकातीलच नाही तर प्रत्येक भागातील शेतकऱ्यांचे मुलगे आपली शेती सोडून शहरांकडे धाव घेत आहेत. ते गावातील नोकरांना जेवढा पगार देतात त्यापेक्षा कमी पैशांत शहरात छोटी-मोठी नोकरी करतात, जेणेकरून त्यांच्या लग्नात कोणतेही अडचण येऊ नये.

मुलींना अशी मुलं आवडत नाहीत

याला दुजोरा देताना मंड्या येथील शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा यानेही मीडियाला सांगितले की, आतापर्यंत सुमारे ३० मुलींनी त्याला नाकारले आहे. कारण माझ्याकडे कमी शेती आहे त्यामुळे माझी जास्त कमाई होत नाही.

ही एक गंभीर समस्या आहे. याबद्दल सोलापूरच्या ज्योती क्रांती परिषदेचे प्रमुख रमेश बारस्कर, ज्यांच्या बॅनरखाली अविवाहित तरुणांच्या  मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ते सांगतात की, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात २५ ते ३० वर्षे वयोगटातील १०० ते १५० मुलं अविवाहित आहेत.

एकत्र येत आहेत अविवाहित तरुण

हरियाणातील अविवाहित तरुण देखील या आणि तत्सम मागण्या मांडत आहेत, पण कुठूनही तोडगा निघताना दिसत नाही आणि भविष्यातही तशी कोणतीच शक्यता दिसत नाही. चांगली गोष्ट अशी की, सर्वत्र असे तरुण रस्त्यावर जमा होत आहेत. त्यांच्या कौमार्याबाबत त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड नाही. ही समस्या फार गंभीर बनत चालली आहे असे दिसते, पण त्याबाबत कोणीही गांभीर्य दाखवत नाही.

एका अंदाजानुसार, देशात सुमारे ५ कोटी ६३ लाख तरुण अविवाहित आहेत. त्यापैकी मुलींची संख्या केवळ २ कोटी ७ लाख आहे. मुलींची कमी होणारी संख्या आणि लिंग गुणोत्तर वाढणे हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील जे तरुण संघटित पद्धतीने आंदोलन करत आहेत ते बेरोजगार, अर्धवट बेरोजगार आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. चांगली नोकरी किंवा रोजगार मिळाला तर लग्नासाठी मुलगीही मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. वरचा ऐकत नसल्यामुळेच ते खालच्याकडे विनवणी करत आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें