* प्रतिभा अग्निहोत्री
लग्नाचा सिझन सुरू झाला आहे. नवरीने पहिल्यांदाच साधारणपणे गोड बनविण्याची परंपरा सुरु झाली आहे, परंतु अलीकडे पूर्ण जेवण वा थाळी बनविण्याची फॅशन जोरात आहे. अलीकडे मुली नोकरी करत असतात ज्यामुळे त्यांना खाणं बनवणं वा शिकण्याची संधीच मिळत नाही.
त्यामुळे लग्नानंतर सासरी जेव्हा पहिल्यांदा जेवण बनविण्यात त्रास होऊ नये यासाठी गरजेचं आहे की तुम्ही पहिल्यापासूनच तुमच्या कुकिंगची थोडीफार तयारी करुन जा. आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्या तुम्हाला सासरी पहिल्यांदा स्वयंपाक बनवण्यात खूप मदतनीस ठरतील :
१. पूर्वी नवरीकडून पहिल्यांदा गोड बनवून घेतलं जात असे तिथे अलीकडे कम्प्लीट मिल बनवायला सांगण्यात येऊ लागलंय. ज्यामुळे हे गरजेचं आहे की तुम्ही अगोदरपासूनच तुमच्या डोक्यात एक पूर्ण मील प्रीपेयर करून जा.
२. साधारणपणे टोमॅटो सूप सर्वांनाच आवडतं. हे जेव्हा तुम्ही स्टार्टर म्हणून बनवाल तेव्हा एक किलो टोमॅटो सूपमध्ये एक सॅशे रेडीमेड नॉर सूप टाका. यामुळे सूपची चव आणि घट्टपणा दोन्ही वाढतील. सूपमध्ये टाकण्यासाठी सूप स्टिक ऐवजी ब्रेडक्रम्सच्या क्यूब्स रोस्ट करून टाका.
३. स्टार्टरमध्ये एखादा नवीन प्रयोग करण्याऐवजी पापड मसाला बनवा. पापडाला मधून ४ भागांमध्ये कापा, नंतर हे तेलामध्ये तळा वा रोस्ट करून सर्व्ह करा. काकडी, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरचीचं सलाड पापडाच्या वरती ठेवण्याच्या जागी प्लेटच्या कोपऱ्यात ठेवा. यामुळे पापड लवकर नरम होणार नाही.
४. मेन कोर्समध्ये पनीरच्या भाजीची निवड करा कारण पनीरची भाजी सर्वांनाच आवडते, सोबतच भाजी घट्ट करण्यासाठी टरबूजच्या बिया /काजू/शेंगदाणे, भाजलेले तीळ /बेसन इत्यादी पैकी एकाचा वापर करा.
५. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये ग्लेज आणि तरी आणण्यासाठी कोरडया मसाल्यांना एक मोठा चमचा दही वा मलईमध्ये फेटून तेलात टाका.
६. पराठा, पुरी अथवा भाकरीपैकी जेदेखील बनवाल त्यामध्ये पालक प्युरी टाकून दुधाने पीठ मळा, यामुळे पुरी, पराठयाचा रंग आणि चव दोन्हीही छान होऊन जातील.