चटणीची चटकदार चर्चा

* इंदिरा मित्तल

मिस चटणीचे रंग आता बदलत आहेत. आधी हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना, कैरी किंवा हिरवी चिंच, काळे किंवा सैंधव मीठ, गुळ, हिंग किंवा लसूण असे सगळे एकत्र घेऊन पाटावरंवट्यावर वाटली जाऊन चिनीमातीच्या भांड्यात जाऊन बसत असे आणि तिथून केळीच्या पानावर ताजी वाटली आणि ताजी खाल्ली जात असे. आता शिळ्या चटणीत ती मजा कुठून येणार?

चिंचेचा कोळ, गुळ, काळेमीठ आणि लालमिरची, भाजलेले जिरे, बारीक चिरलेले खजूर, खारिकांसोबत मिसळून शिजवून, डाळिंबाचे दाणे, द्राक्ष आणि केळ्याचे कापही मिसळले. कधी समोशाचा कोपरा तर कधी भज्यांची पापी घेऊन किंवा मग आलु टिक्की, दहीवडे यांच्यावर लाडात पसरवली आणि खाणाऱ्यांना चटक मटक करायला लावली. कधी पाणीपुरीच्या चटकदार पाण्यातला गोड तिखटपणा चाखला तर कधी भेळपूरी चटपटीत बनवली.

जुन्या दिल्लीमध्ये पान बाजारातील अख्खे मेथीदाणे, जाडी बडीशेप, जिरे, गुळ, कम्रक, शिंडे, अख्ख्या लाल सुक्या मिरच्या, वाळलेली कैरी, वाटलेली हळद, कोथिंबीर, सर्व साहित्य मिठाच्या मिश्रणात रात्रभर पाण्यात भिजवते. सकाळी हलवायांनी मंद आचेवर खूप शिजवले आणि खुसखुशीत कचोरीसोबत वाढले आणि खाणाऱ्यांनी तर अप्रतिम चवीमुळे पत्रावळ्यासुद्धा चाटूनपुसून स्वच्छ केल्या.

दक्षिण भारतात गेले आणि नारळ, आले, मूग, चणा किंवा उडदाची भाजलेली डाळ, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, कडीपत्ता, हिरवी मिरची, दही, मिरची, लिंबूसोबत वाटली जाऊन गोरीपान झाली किंवा भाजलेले टोमॅटो, कांदा, सुक्या लाल मिरच्या यांच्यासोबत लालेलाल झाली. मग हिंग, मोहरीच्या फोडणीने दृष्टही काढून घेतली. आले, तीळ आणि रसरशीत टोमॅटोची हॉट हैदराबादी चटणी बनून कलौंजीची फोडणी दिली.

कोकण महाराष्ट्रामध्ये हिरव्या मिरच्या, कांदा, लसणाबरोबर ठेचा बनली. कारल्याशीही नाते जोडले, सुके खोबरे, मेथी दाणे, लसूण, लाल मिरची, कोकमासोबत सुक्या खोबऱ्याची खमंग चटणी तयार झाली. कच्छच्या रणमध्ये कधी गाजर, कोबी आणि किसलेल्या कच्च्या आंबे हळदीबरोबर दहीकोशिंबिर स्वरूपात आली तर कधी अर्ध्यांकच्या आंब्यांचा गोड छुंदा बनली. बेसनपीठ आणि आंबट दही यांची कढी बनवण्याआधी निसटली आणि गुजराती फाफडा चटणी बनली.

एकीकडे बंगालच्या जादूने जादू केलेली असताना मोहरीच्या तेलात पंचफोडणसोबत अननस, आंबापापड, मनुके, कच्ची पपई, अनारोशेर बनवले तर आसाम, मिझोराममध्ये उकडलेले बटाटे, सुके मासे, टोमॅटोसोबत जुकान माछोर चटणी बनून लोकांना चटपटीत स्वाद मिळवून दिला. इंजली आणि पान चटणीही बनवून पाहिली. उत्तराखंडमध्ये मुरवलेल्या लिंबाची नक्कल केली आणि दहीसोबत कुस्करलेला मुळा, लिंबू, डाळिंब, तीळ आणि भांगेच्या भाजलेल्या बिया छान कुटून घेतल्या.

राजस्थानमध्ये लसूण चटणी बनली आणि झारबेरीसोबत व्यवस्थित मिसळली. राजवाड्यांमध्ये नवरत्न चटणी बनून थाटात राज भोजनात सहभागी झाली.

हरियाणावासियांनी त्याची हिरवे चणे, मटार, पिकलेल्या पेरू किंवा आवळ्याची चटणी बनवली तर हिमाचलवासियांनीनी बेसन, पालकसोबत पथेडू चटणी बनवली. अमृतसरमध्ये कुंडीसोटेमध्ये दरडी, कांदा, पुदीना मिरची, अनारदाणे, मीठ यांच्यासोबत कुटली गेली. काश्मिरला गेली आणि खुबानी आलुबुखारे किंवा शफताळूची काश्मिरी चटणीही बनली.

मग निघाली परदेशात

रूचकर आणि पाचूक आपल्या विशाल कुटुंबातील इतर सदस्यांना भेटण्यासाठी आणि नवे फूड ट्रॆड्ज जाणून घेण्यासाठी मिस चटणी परदेशी निघाली. अंड्यातील बलक, लसूण पेस्ट, लिंबू रस, ऑलिव्ह ऑईल, मस्टर्ड पावडर, मीठ आणि लाल मिरचीचा फ्रेंच मेयोनीज सॉस भारतामध्ये फूड क्राफ्ट इंस्टिट्यूटच्या एका काळापासून बेसिक रशियन सॅलडसोबत सर्व्ह करत आले आहेत.

स्पेनमध्ये मिळणारी क्रीम रंगाची एयोली म्हणजे मेयोनीजचे पूर्वज अर्थात् निरे ऑलिव्ह ऑईल आणि दाणेदार मिठासोबत व्यवस्थित मिसळलेला लसूण सॉस, मेयोनीजला ब्लेंडर थेट प्रोसेसरमध्ये फेटूनही एयोली मूसळीतच एकजीव करावी.

इटलीमध्ये पेस्टोशी भेट झाली. पेस्टो म्हणजे पेस्ट अर्थात् मऊ बेसिलचीपाने वाटलेला लसूण, चिलगोजे, ऑलिव्ह ऑईल, भुरभुरीत पारमेसन चीज, मीठ आणि काळ्या किंवा सफेद व मिरीसोबत वाटलेली चटणी. हवं तर लिंबू रस मिसळला आणि चिगोंजेच्याऐवजी अक्रोड किंवा हिरवे पिस्तेहीसोबत वाटा. वरून एक पातळ थर ऑलिव्ह ऑईलचा असेल तर हवेने रंग उडण्याचीही भीती नाही. १-२ दिवस फ्रिजमध्येही राहते. भारतात बेसिलची ताजी पाने आणि पारमेसन चीज शोधावे लागेल. या सर्व वस्तू मिळाल्या की मग हिरव मिरची, कोथिंबीर, पुदीना, कढीपत्ता, हिरवा कांदा पात आणि लसूणपात, सोललेल्या बदामांसोबत वाटली जाऊन पेस्टोचा नवा अवतार धारण करेल.

एशिअन डिपिंग सोसेजमध्ये श्रीराचा बनली आणि लाल मिरची, लसूण, व्हिनेगर, मीठ, साखरेच्या पेस्टमध्ये थोडे दिवस विश्रांती घेऊन लोकांच्या जिभेला आंबट चवीची पर्वणी दिली.

ग्रीसमध्ये त्जात्जीकी सॉस बनली. काकडी सोलून, बिया काढून, किसून पाणी काढून टाकले. दह्यात काकडी, दाणेदार मीठ, कुटलेली काळी पांढरी मिरी, लसूण पेस्ट, लेमन झोस्ट, लिंबू रस आणि बारीक चिरलेला ताजा हिरव्या सोया पानांबरोबरच मिक्स झाली आणि गारेगार झाली. थोडे अतिरिक्त ऑलिव्ह ऑईल आणि ताजी बारीक पुदीन्याची पाने मिसवून चव अजून खुलवली.

यांच्याच कुटुंबातील एक सदस्य बाबा गनुश वांग्याच्या बिहारी चोख्याचा मिडला  ईस्टर्न नातेवाईक आहे. चोखा नव्हे, वाटलेली लसूण, लिंबू रस, भाजून कुटलेले तीळ, जिरे आणि ऑलिव्ह ऑइल असलेली आणि भाजलेले चिलगोंजे, चिरलेली पार्सले, ऑलिव्हच्या कापांनी सजवलेली भाजलेल्या वांग्याची चटणी.

मिडलइस्टमध्ये हुमुस दिसला म्हणजे उकडून कुस्करलेल्या काबूली चण्यांची चटणी. खूप निगूतीने करायचे म्हटले तर साले काढून कुस्कराते. लिंबू रस, वाटलेली लसूण, ऑलिव्ह ऑईल, मीठ, वाटलेल्या लाल मिरचीसोबतीने चटकदार केले. ऑलिव्ह ऑईलच्या काही थेबांवर उकडलेले काबुली चणे, चिलगोजे सजवून चिप्स क्रॅकर्ससोबत सर्व्ह केले.

यांचा मेक्सिकन नातेवाईक गुआकामोले थोडा वेगळा होता. नाशपातीच्या रूपात हिरव्या काळ्या रंगाच्या अॅव्हाकाडोमधील गर जणू लोणीच. ज्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, बारीक चिरलेला, लसूण, मीठ, काळी मिरी व लिंबू रस मिसळून चिप्स, कॅकर्ज यांच्यासोबत पटकन खाऊन टाकावे नाहीतर ही काळी पडण्याची भीती असते.

मायदेशी परतून मिस चटणी जुना खलबत्ता शोधायला लावेल आणि त्यातच स्वत:ला कुटुन घेईल. अनेक नवी रूपे, शोधून रूचकर आणि पाचक मिस चटणी स्वदेशी परतली आहे. ताजे दोडके, हिरवे टोमॅटो यांच्यासोबत मिसळून पाहतील. अनारदाण्याच्या चटणीत लिंबू आणि संत्र्याचे झोस्ट मिसळून पाहतील. चटणीऐवजी स्वत:ला डीपसुद्धा म्हणवू पाहतील.

यावेळी थंडीमध्ये हिरवी मेथी, मटार, हरभरे, पातीचा कांदा, लसूण पात, हिरवी कोथिंबीर, पुदीन्याची एकदम मऊपाने आणि हिरव्या मिरचीसोबत फक्त मीठ व लिंबू रसात वाटली जाऊन सिंधी पराठे किंवा शामी कबाबची सोबत करतील. अनेक खुबींनी स्वत:ला सादर करेल. ‘पेजेंट फूड’ म्हणजे ग्रामीण जेवणानुसार थोडा रफ लुक स्विकारायला तयार आहेत जसे की सालसा, रॅलिश. पण तरी पाट्यावर व वरवंट्याने वाटण्याची मजा काही वेगळीच.

रिमझिम पावसातील चटकदार स्वाद : मान्सून स्पेशल

* पाककृती सहकार्य : संजय चौधरी

  • पालक रताळं जॅलेपीनो टिक्की

साहित्य

* २५० ग्रॅम ताजा पालक

* २५० ग्रॅम रताळं

* २ मोठे चमचे चिरलेली जॅलेपीनो

* २ मोठे चमचे चिरलेला कांदा

* १ मोठा चमचा आलं

* १ मोठा चमचा चिरलेली लसूण

* १ चिमूटभर गरम मसाला

* १ चिमूटभर भाजलेलं जिरं

* १ लिंबाचा रस

* मीठ चवीनुसार

* तळण्यासाठी तेल.

कृती

पालक भाजी स्वच्छ धुवून कापून घ्या. रताळं ओवनमध्ये बेक करा. मग त्याची साल काढून किसून घ्या. आता पालक मीठ मिश्रित पाण्यात ४५ सेंकद शिजवून घ्या. मग तो गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घाला. पालक पाण्यातून काढून घ्या. आता सर्व साहित्य एकत्रित करून लहान गोले बनवून हाताने दाबून त्याला टिक्कीचा आकार द्या. मग तेल गरम करून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत फ्राय करून चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसातील चटकदार स्वाद

* पाककृती सहकार्य : संजय चौधरी

बेसण बुंदी पनीनी

साहित्य

* १२० ग्रॅम बेसण बुंदी

* ८० ग्रॅम चिरलेला कांदा

* ५० ग्रॅम चिरलेला टोमॅटो

* १ मोठा चमचा चिरलेली काकडी

* १ मोठा चमचा चिरलेली हिरवी मिरची

* अर्धा लहान चमचा चाटमसाला

* १ मोठा चमचा मेयोनीज

* १०० एमएल पुदीना चटणी

* १ लहान चमचा लाल मिरची पावडर

* १ मोठा चमचा फेटलेलं लोणी

* मीठ चवीनुसार

* २ फ्रेंच ब्रेड स्लाइस.

कृती

सँडविच ग्रिलर गरम करा. एका मिक्सिंग बाउलमध्ये बुंदी, भाज्या, चाटमसाला, लाल मिरची पावडर आणि मेयोनीज घालून मिसळा. आता ब्रेड स्लाइसवर एकीकडे पुदीना चटणी लावा. आता स्लाइसवर बुंदी मिश्रण लावा आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाका. आता यावर लोणी लावा. आता पनीनी सँडविच सोनेरी होईपर्यंत सँडविच ग्रिलरमध्ये ग्रिल करा आणि तात्काळ सर्व्ह करा.

बेसण पिझा

साहित्य

* ४८० ग्रॅम बेसण

* ११० ग्रॅम दही

* १० ग्रॅम यीस्ट

* २ लहान चमचे मीठ

* १०० एमएल पाणी

* १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल

* १६० ग्रॅम टोमॅटो पिझा सॉस

* १ कप किसलेलं मोजरेला चीज

* १६० ग्रॅम चिरलेला मिक्स भाज्या.

कृती

एका बाउलमध्ये थोड्याशा पाण्यामध्ये चिमूटभर यीस्ट साखरेसोबत १० मिनिटं ठेवा. एका भांड्यात दही, बेसण, मीठ, ऑलिव्ह ऑइल आणि यीस्ट मिसळून पाण्याने पीठ मळून ४ गोळे बनवा. ओल्या कापडाने जवळपास २४ तास झाकून ठेवा. ओवन २१० डिग्री सेल्सिअसवर गरम करा. गोळे जाडसर लाटून त्यावर पिझा सॉस लावा आणि मोजरेला चीज घाला. वरतून भाज्या घालून १२ मिनिटं ओवनमध्ये बेक करा आणि गरमागरम खायला द्या.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यात कसा असावा आहार

* अनु जायस्वाल, फादर डायरेक्टर वैदिक सूत्र वेलनेस सेंटर

वर्षा ऋतूत जर तुमचे खाणेपिणे बरोबर असेल तर तुम्ही डिहायड्रेशन, डायरिया, घाम, थकवा येणे, भूक न लागणे, उलटया, हीट स्ट्रोक, अन्नातून विषबाधा यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थ समाविष्ट करू शकता :

सॅलड

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लाईकोपिन असल्याने पौष्टिक घटकांचे हे पॉवरहाऊस फळ आणि भाजी दोन्हीमध्ये गणले जाते. एका टोमॅटोत ३५ ते ४० कॅलरी असतात, पण हा दिवसात ४० टक्के व्हिटॅमिन सी आणि २० टक्के विटामिन ए ची गरज पूर्ण करू शकतो.

टोमॅटोचे आणखीसुद्धा अनेक फायदे आहेत. लाईकोपिनसारखे अँटीऑक्सिडंट असल्याने हा अनेक प्रकारच्या कँसरच्या लढयात मदत करतो. संशोधनात असे आढळते की लाईकोपिन एलडीएल अथवा वाईट कोलेस्ट्रॉलपासून सुरक्षित ठेवते, ज्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते.

काकडी सॅलडच्या स्वरूपात जास्त वापरली जाते. यात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते. अल्सरच्या उपचारातसुद्धा काकडीचे सेवन आरामदायक ठरते. पेपर अथवा काळी मिरी यातसुद्धा बीटा कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रतिकारशक्ती बळकट करते आणि फ्री रॅडिकल्समुळे  होणारे नुकसान कमी करते. पण काही आजार जसे मुतखडयात  टोमॅटोचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करावे.

फळं

या ऋतूत अनेक लो कॅलरी फळं उपलब्ध असतात, ज्यात फायबर, कॅल्शियम व इतर महत्वाच्या पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण उपलब्ध असते. हे शरीरात पाण्याचे प्रमाण कायम ठेवते. या ऋतुतील फळं जसे कलिंगड, लिची, काकडी, टरबूज, संत्री, अंगूर वगैरे याचे सेवन लाभदायक असते. सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ने परिपूर्ण असलेले कलिंगड शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते.

ज्यूस

चिपचिप्या उन्हाळयात शरीराला पाण्याची जास्त गरज असते, म्हणून पेयपदार्थांचे सेवन जास्त करायला हवे, जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळेल आणि तुम्हाला कंटाळवाण्या दुपारी उत्साही वाटेल. म्हणून तुमच्या आहाराच्या यादीत ज्यूससुद्धा समाविष्ट करा. लिंबू पाण्यापेक्षा उत्तम अन्य कोणता ज्यूस नाही. संत्री, मोसंबी यासाख्या फळांचे रससुद्धा तुम्ही घेऊ शकता. शहाळयाच्या पाण्यात अनेक आवश्यक खनिजे असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. हे पोटॅशियमचे  उत्तम स्रोत आहे.

भाज्या

आहारात त्या त्या हंगामी भाज्या जसे दुधी भोपळा, भेंडी, कारले, लालभोपळा, टोमॅटो, काकडी आणि मिरची अवश्य समाविष्ट करा. दुधीभोपळयात कॅलरी कमी आणि फायबर आणि पाणी जास्त असते. लो कॅलरी असल्याने ही भाजी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका नसतो. कारल्यात तांबे, लोह आणि पोटॅशियम असते. याचे सेवन केल्यास शरीरातील रक्तशर्करा आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. कारले शरीरात क्षाराचा प्रभाव वाढवते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

लाल भोपळयात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. कच्च्या लाल भोपळयाचा रस शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकतो. अॅसिडिटी कमी करण्यातसुद्धा हा फारच लाभदायक असतो.

मान्सून स्पेशल : वडा पाव

पाककृती सहकार्य : सेलिब्रेटी शेफ रणवीर ब्ररार

साहित्य

* ७-८ लसूण पाकळया

* ४-५ हिरव्या मिरच्या

* ३-४ उकडलेले बटाटे

* पाव कप तेल

* १ मोठा चमचा राई

* पाव छोटा चमचा हिंग

* कडीपत्ता

* पाव छोटा चमचा हळद पावडर

* चिरलेली कोथिंबीर थोडीशी

* मीठ चवीनुसार.

बेटरसाठी साहित्य

*  १ कप बेसन

* अर्धा छोटा चमचा हळद पावडर

* पाव छोटा चमचा लाल मिरची पावडर

* मीठ चवीनुसार.

तळणीच्या मिरचीचं साहित्य

* ५-६ मधून चिरलेल्या हिरव्या मिरच्या

* तळण्यासाठी तेल.

वडापाव छाटणीचं साहित्य

*२ मोठे चमचे तेल

* अर्धा कप शेंगदाणे

* ४-५ लसूण पाकळया

* अर्धा कप तळलेले बेसन चुरा

* ३ मोठे चमचे लाल मिरची पावडर

* तळण्यासाठी तेल द्य  मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये राई, हिंग, कडीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि बटाटयाच्या फोडी टाकून एकत्रित करून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर व्यवस्थित एकत्रित करून एका बाजूला थंड होण्यासाठी ठेवा.

बॅटरसाठी कृती

एका बाउलमध्ये भाजलेले बेसन, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि गरजेपुरतं पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

वडापावची कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची व लसूण टाकून व्यवस्थित फ्राय करा. नंतर एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल, शेंगदाणे, लसूण, तळलेल्या बेसनचा चुरा, लाल मिरची पावडर व मीठ टाकून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. नंतर बटाटयाच्या सारनाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते बेसनच्या बॅटरमध्ये घोळवून घ्या आणि गरम तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. तळलेली मिरची आणि शेंगदाणा चटणीसोबत सर्व्ह करा.

पास्ता आणि नुडल्स

* अनुपमा गुप्ता

  • ग्रीन स्पेगेटी

food-article

साहित्य

* १ कप शिजवलेली स्पेगेटी
* ३ मोठे चमचे कोथिंबीर
* १ हिरवी मिरची
* पाव कप शेंगदाणे
* १ लसूण पाकळी
* १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल
* मीठ चवीप्रमाणे.

कृती

मिक्सरमध्ये कोथिंबीर, लसूण व भाजलेले शेंगदाणे आणि मिरची यांची जाडसर पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करून त्यात ही पेस्ट टाका. मीठ व स्पेगटी घालून मिसळा व गरमगरम सर्व्ह करा.

 

  • पास्ता विथ व्हाईट सॉस व्हेजिटेबल्स

paasta-food-article

साहित्य

* १ कप पास्ता
* ३ पातीचे कांदे
* अर्धा कप बीन्स
* १-१ मोठा चमचा लाल, पिवळी, हिरवी कापलेली सिमला मिरची
* २ मोठे चमचे मटार दाणे
* १ पाकळी लसूण
* २ मोठे चमचे फ्लॉवर
* १ कप दूध
* २ मोठे चमचे बटर
* १ मोठा चमचा ओट्सचे पीठ
* पाव लहान चमचा मिरपूड
* २ मोठे चमचे किसलेले चीज.

कृती

कढईत लोणी गरम करून त्यात लसूण व पातीचा कांदा परतून घ्या. मग त्यात सर्व भाज्या टाका व त्या थोडया शिजल्या की त्यात परत एक चमचा लोणी आणि ओट्सचे पीठ घालून भाजून घ्या. यात एक कप दूध घाला. हळूहळू ढवळत राहा व हे मिश्रण जरा घट्ट होऊ द्या. यात चीज व शिजलेला पास्ता टाका. मग मिर पूड टाकून गरम गरम सर्व्ह करा.

 

  • पनीर नुडल्स सूप

paneer-noodles-soup

साहित्य

* अर्धा कप आटा नुडल्स
* १-१ मोठा चमचा लाल, हिरव्या, पिवळया, सिमला मिरच्या कापलेल्या
* २ मोठे चमचे कापलेले गाजर
* १ पातीचा कांदा कापलेला
* २ उकडलेल्या टॉमॅटोची प्युरी
* १ कापलेली हिरवी मिरची
* २ मोठे चमचे पनीरचे बारीक तुकडे
* पाव लहान चमचा नुडल्स मसाला
* एक पाकळी कापलेला लसूण
* १ चमचा लोणी
* मीठ चवीनुसार.

कृती

कढईत लोणी गरम करून त्यात लसूण, पातीचा कांदा व सिमला मिरच्या परतून घ्या. यात गाजर, टोमॅटोची प्युरी, मीठ, हिरवी मिरची टाका, नुडल्स मसाला व दीड कप पाणी टाकून उकळू द्या. मग त्यात पनीरचे तुकडे व न्युडल्स टाका व गरमगरम सर्व्ह करा.

आरोग्यदायी पौष्टिक भाज्या

पाककृती * नीरा कुमार

  • सरसोंची (मोहरी) भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम सरसों साग (मोहरीची भाजी) जाडसर चिरलेली

* १०० ग्रॅम फ्रोजन कॉर्न

* १ मोठा चमचा उभी चिरलेली लसूण

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* १ मोठा चमचा मस्टर्ड ऑइल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका कढईत तेल गरम करून लसूण व लाल मिरच्यांचे तुकडे परता. यामध्ये भाजी व मक्याचे दाणे टाका. जर फ्रोजन कॉर्न नसतील तर मक्याचे दाणे उकडून टाका. आता मीठ टाका. ६-७ मिनिटांत भाजी शिजेल. ही भाजी मक्याची वा बाजरीची भाकरी अथवा पराठ्यांसोबत खूप छान लागते.

  • मूगडाळ-मुळ्याची भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* ५ कप पानांसहित चिरलेली मुळ्याची भाजी

* अर्धा कप भिजवलेली मूगडाळ

* १ लहान चमचा बारीक चिरलेलं आलं व हिरवी मिरची

* १ लहान चमचा ओवा

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* पाव लहान चमचा हळद पावडर

* १ मोठा चमचा राईचं तेल

* मीठ चवीनुसार

कृती

एका कढईत तेल गरम करून ओवा व लाल मिरचीची फोडणी घाला आणि त्यामध्ये मुळ्याची भाजी व मूगडाळ टाका. मग हळद पावडर, आलं, मिरची आणि मीठ टाका. भाजीवर झाकण ठेवून ७-८ मिनिटं शिजू द्या. मग मुळा व डाळ शिजली की भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढा.

  • पालक कबाब

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम ब्लांच केलेला पालक

* पाव कप चण्याची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवलेली

* पाव लहान चमचा गरममसाला

* १ मोठा चमचा तांदळाचं पीठ

* १०० ग्रॅम कुस्करलेलं पनीर

* २० मनुका

* पाव लहान चमचा काळीमिरी पावडर

* २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर

* कबाब शेकवायला पुरेसं तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

भिजलेल्या चण्याच्या डाळीत पाव कप पाणी आणि पाव लहान चमचा मीठ घालून प्रेशरकुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. डाळ कोरडी होऊ द्या. डाळ थंड करून मॅशरने मॅश करा. ब्लांच केलेल्या पालकमधील पाणी काढून टाका आणि पालक मिक्सरमध्ये बारीक करा. मग यामध्ये मॅश केलेली डाळ, गरममसाला, पाव लहान चमचा मीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिसळून घ्या. यानंतर पनीरमध्ये काळीमिरी पावडर, मनुका, कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ मिसळा. आता पालकचं थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर पसरवा. त्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून बंद करा. जेव्हा सर्व कबाब बनवून तयार होतील तेव्हा नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून कबाब शेकवा. दोन्ही बाजूंनी परतून लालसर रंग येऊ द्या. स्वादिष्ट कबाब तयार आहेत.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  खीर

तांदळाची खीर

 साहित्य

  • 1 वाटी बासमती तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1 वाटी साखर
  • काजू, बदाम, पिस्ते, मनुका, केशर, वेलची पावडर
  • 2 चमचे तूप.

 कृती

एक वाटी बासमती तांदूळ (इतर कोणतेही घेऊ शकतो ) स्वच्छ धुवून अर्धा तास  पाण्यात भिजवायचे मग त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून ते कणीदार जाडसर वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. त्या दुधाला एक उकळी आली कि वाटलेले तांदूळ त्यात घालून सतत ढवळत राहावे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. तांदूळ मऊ होऊ लागल्यावर त्यात आवडीनुसार साखर घालावी व ढवळत राहावे. भात पूर्ण मऊ झाला कि गॅस बंद करून त्यात वेलची-जायफळ पूड घालावी. केशर टाकावं. काजू ,बदाम, पिस्त्याचे पातळ काप एकत्रित करावे. शेवटी 2 चमचे तूप पसरावं. ही खीर गरम किंवा थंड कशीही छान लागते .

# टीप: तांदळाची खीर जसजशी थंड होते तशी ती सुकत जाते घट्ट होत जाते , त्यामुळे आपण त्यात सोयीनुसार गरम किंवा थंड दूध घालून  पुन्हा थोडी पातळ करून सर्व्ह करू शकतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  पंचामृत

 यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा वापर जेवणात करतात. म्हणजेच कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.

साहित्य

 

  • 5-6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धी वाटी दाण्याचं कूट
  • अर्धी वाटी तिळाचं कूट
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • अर्धी वाटी किसलेला गूळ
  • पाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या
  • ७-८ कढीपत्त्याची पानं
  • मोहरी-हिंग-हळद
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.

कृती

एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला. जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला. चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या. जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. यामध्ये कडुलिंबाची फुले घाला.

होली स्पेशल- होळीची रंगत स्वादिष्ट पदार्थांसंगत…

– प्रतिनिधी

ठंडाई

 साहित्य

* १० हिरव्या वेलचीचे दाणे

*  दीड लहान चमचा बडीशेप

*  अर्धा लहान चमचा काळीमिरी

*  अर्धा लहान चमचा धणे

*  १ लहान चमचा टरबुजाच्या बिया

*  ५० ग्रॅम सोललेले बदाम

*  ५ मोठे चमचे साखर

* १ मोठा चमचा बदामपिस्त्याचे काप

*  ७५० मिलीलीटर दूध.

कृती

तव्यावर सुका मेवा थोडासा गरम करा. मग दूध सोडून सर्व साहित्य पाण्यात भिजवा. दोन तास सुका मेवा पाण्यात भिजू द्या. यानंतर सुक्या मेव्याची पेस्ट बनवा आणि ती दुधात मिक्स करा. हे दूध मलमलच्या कापडातून गाळून घ्या. शेवटी बदामपिस्त्याने सजवून थंडथंड सर्व्ह करा.

 

पान मॉकटेल

साहित्य

* २ गोड पानांचे लहान लहान तुकडे

* अर्धा लहान चमचा लिंबाचा रस

* २ मोठे चमचे साखर

* ५०० मिली. स्प्राइट

* अर्धा लहान चमचा जाडसर कुटलेली बडीशेप

* १ मोठा चमचा माउथ फ्रेशनर

* १ पान सजविण्यासाठी

* गरजेनुसार बर्फ.

कृती

एका भांड्यात पानाचे तुकडे, बडीशेप, लिंबाचा रस आणि बर्फाचे तुकडे एकत्रित मिसळा. जेव्हा हे व्यवस्थित मिक्स होईल तेव्हा हे मिश्रण एका ग्लासात एक तृतियांश भाग भरा आणि त्यामध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे मिसळा. वरून स्प्राइट मिसळा. सर्व्ह करताना माउथ फ्रेशनर आणि पानाने सजवून द्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें