फॅशनमध्ये इन मटका सिल्क साड्या

* बबिता बसाक

सिल्क आणि बनारसी साड्यांसाठी बनारस जगभरात प्रसिद्ध आहे. शिवाय साड्यांमध्ये पश्चिम बंगालच्या तांत, मलबरी, टशर, मूंगा, कांथा, मध्य प्रदेशाच्या चंदेरी सिल्क, दक्षिण भारताच्या कांचीपुरम सिल्क, गुजराथी सिल्क तसेच प्योर सिल्क इत्यादीसारख्या व्हरायटीच्या साड्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये, वेगळ्या वैशिष्टयामुळे आपली ओळख निर्माण केली आहे.

अलीकडे सर्वात जास्त ज्या सिल्कचं चलन आहे ते आहे मटका सिल्क. या सिल्कसाठी पश्चिम बंगालचे माल्दा आणि मुर्शिदाबाद जिल्हे विशेष करून देशापरदेशातही ओळखले जातात. इथले विणकर एका विशिष्ट किड्यापासून सिल्क (दोरा) काढून मटेरियल तयार करतात आणि मग डिझायनर्सकडून साडीला फायनल टच दिला जातो.

डिफरेंट आणि सुंदर डिझाइन

साडी विक्रेते कमल कर्माकर सांगतात की यावेळी डिझाइन, प्योरिटी, रिचनेस आणि आपल्या एलिगेंट लुकमुळे मटका सिल्कने स्त्रियांमध्ये आपली विशेष जागा बनवली आहे.

या व्यतिरिक्त या साड्यांची आणखीनही अनेक वैशिष्ट्ये आहेत.

* मटका सिल्क साड्यांच्या डिझाइन्समध्ये बऱ्याचदा झिकझिक आणि डिजिटल डिझाइन पाहायला मिळते. कारण तरुणी आणि ऑफिस गर्ल्समध्ये अशा प्रकारच्या डिझाइन्सची खूप डिमांड आहे.

* ४-५ कलर, पदर, बॉर्डर आणि रेस्ट पार्टमध्ये वेगवेगळे कलर्स आणि शेड्स असतात.

* सिंपल आणि एलिगेंट लुकमुळे गेस्ट पार्टीज, केज्युअल आणि फ्रेण्डस गॅदरिंगमध्ये मटका सिल्क साडी बेस्ट चॉइस आहे.

* शेड्समध्ये प्लेन शेड्स, ब्रॉड बॉर्डर आणि डिफरेंट डिझाइन्सद्वारे तयार मटका सिल्क जर तुम्ही कॅरी करत असाल तर तुमची पर्सनालिटी इतरांपेक्षा वेगळी दिसेल.

* लाइट टेक्सचर, डिफरेंट आणि सॉफ्ट मटेरियलमुळे या साड्या ऑफिस वेअर, फ्रेंड्स सर्कल तसेच गेटटुगेदर पार्टीजसाठी दिवसेंदिवस खूपच प्रसिद्ध होत आहे.

कलर कॉम्बीनेशन

* पिंक. क्रीम, सिल्व्हर, ग्रीन, ऑनियन, रॉयल ब्ल्यू कलर्स मटका सिल्क साड्यांचे विशिष्ट कलर्स आहेत.

* साडी बरोबर सिल्व्हर आणि गोल्डन रंगाचा ब्लाउज खूप सुंदर दिसतो.

* प्लेन ब्लॅक आणि पिंक रंगाच्या कॉम्बीनेशनच्या लाइट मटका सिल्क साड्या कॉलेज गर्ल्स, ऑफिस गर्ल्स आणि गृहीणींची विशेष आवड ठरत आहेत.

* ब्राइटनेस आणि अॅट्रैक्टिव्हनेसमुळे मटका सिल्कने तरुणींना खूपच आकर्षित केलं आहे.

इतर वैशिष्ट्ये

* त्या साड्यांचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे या लॉण्ड्रीमध्ये वॉशसाठी देण्याची गरज नसते.

* आपल्या एलिगेंट लुकमुळे ओपन असलेला पदर साडीला आणखीनच स्टायलिश बनवतो.

* या साड्यांना ब्लाउज अटॅच असतो, पण तुम्ही हवं तर दुसरा एखादा साडीला मॅच करणारा ब्लाउजही ट्राय करू शकता.

* पार्टीला जात असाल तर मटका सिल्क साडीबरोबर हायहील सॅण्डल आणि पर्स किंवा क्लचही तुम्ही वापरू शकता.

उंच मुलींसाठी हे 4 पोशाख परिपूर्ण आहेत

*रोझी पंवार

उंची आणि रंगाच्या समस्यांमुळे अनेकदा मुली फॅशन ट्राय करू शकत नाहीत. विशेषतः उंच मुलींसाठी, काही फॅशन पर्याय उपलब्ध आहेत, जे ते प्रत्येक वेळी प्रयत्न करू शकत नाहीत. पण जर पाहिले तर उंच उंची असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत. आज आम्ही तुम्हाला उंच उंची असलेल्या काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या भारतीय फॅशनबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही लग्नात किंवा पार्टीत सहज ट्राय करू शकता. तर उंच मुलींसाठी भारतीय फॅशन सांगूया …

  1. करिश्मा तन्नाचा शरारा पोशाख परिपूर्ण आहे

जर तुमची उंची उंच असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचे असेल तर करिश्मा तन्नाचा हा शरारा पोशाख करून पहा. शरारा लूक असलेला हा गुलाबी रंगाचा सूट तुम्हाला उंच दिसण्याऐवजी सुंदर दिसेल. जे तुमच्या लूकसाठी योग्य असेल.

 

  1. लाल रंगाच्या साडीसह ऑफ शोल्डर ब्लाउज परफेक्ट आहे

जर तुम्ही खूप उंच असाल, तर तुमचे पोट जास्त न दाखवण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या लूकसाठी चांगले होणार नाही. करिश्मा तन्ना सारख्या लाल साडीसह तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाउज ट्राय करू शकता. तुमच्या लूकसाठी हा परिपूर्ण पोशाख असेल, जो तुम्ही कोणत्याही सोशल पार्टीमध्ये ट्राय करू शकता.

 

  1. दीपिकाचा हा लूकही परफेक्ट आहे

जर तुम्ही उंच असाल, तर तुमच्या पोशाखात काहीतरी अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करा की तुम्ही कोणाच्या नजरेत उंच दिसणे टाळता. दीपिकाची ही पिवळी साडी यासाठी योग्य पर्याय आहे. धनुष्य फॅशन ब्लाउज आणि जड दागिने असलेली साधी साधी साडी तुम्हाला उंच वाटेल. म्हणूनच तुम्ही दीपिकासारखा हा लुक ट्राय करून पाहा.

 

 

  1. अनुष्काची फ्लॉवर प्रिंट साडी परफेक्ट आहे

 

आजकाल फ्लॉवर प्रिंटचे नमुने खूप लोकप्रिय आहेत, जे प्रत्येक लुकसह कॅरी करता येतात. जर तुम्ही उंच असाल आणि तुमच्या उंचीऐवजी फॅशन दाखवायची असेल तर हा लूक एकदम परफेक्ट आहे. तसेच, दागिन्यांबद्दल बोलताना, तुम्ही जड दागिने आणि मेकअपने लोकांना तुमच्या उंचीऐवजी लुक दाखवू शकता.

ओल्ड इज गोल्डचा फॅशन ट्रेंड

* ललिता गोयल

तुम्हाला हे माहीत आहे का की करीना कपूर म्हणजेच बेबोने आपल्या लग्नात शर्मिला टागोर यांचा तोच शरारा घातला होता, जो शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात घातला होता आणि पटौदी कुटुंबाच्या परंपरेचे पालन केले होते. बॉलिवूडमधील या ट्रेंडमुळे हल्लीच्या तरूणीसुद्धा जुन्या साड्या, लहेंग्यांना रिसायकल करून नवे रूप देतात आणि ते घालून मिरवायला त्यांना खूपच आवडते. यामुळे भावनिक नाती तर जोडली जातात तसेच जुनी फॅशनही पारंपरिक ठेव्याच्या स्वरूपात आपल्यासोबत रहाते. फॅशन डिझायनरच्या म्हणण्याप्रमाणे हल्ली आई, आजी किंवा सासू यांचे शरारा, लहेंगे स्वत:च्या लग्नात घालण्याची फॅशन सध्या जोरात आहे.

लहानपणापासूनच तुम्हाला तुमची आई किंवा आजीची बनारसी साडी किंवा लहेंगा आवडत होता. मग तुमच्या लग्नात तुम्ही त्या साडीला नवीन लुक देऊन परिधान केल्यास नात्यांतील संबंधही दृढ करता येतील.

लहेंग्यांचे रीडिजाइनिंग

फॅशन डिझायनर, मीनाक्षी सभरवाल यांचं म्हणणं आहे की, हल्ली स्त्रिया जुन्या लहेंग्यांनाच नवीन पद्धतीने तयार करवून घेत आहेत. जर फॅब्रिकबद्दल बोलाल तर ब्रोकेड साड्या, टिशू, चंदेरी, शिफॉन व जॉर्जेटच्या लहेंग्यावर उत्तम वर्क करून त्यांना सुंदर बनवले जाते. यावर गोटा लेस, सोने, चांदी व कलर्ड स्टोन्स लाऊन सुंदर लुक दिला जातो.

खालील टीप्स अंमलात आणून तुम्ही तुमच्या आईच्या वा आजीच्या जुन्या साडी किंवा लहेंग्याला नवे रूप देऊ शकता.

* लहेंग्याची बॉर्डर चेंजकरून त्याला नवा लुक देऊ शकता जसं की मॅचिंग चोळीऐवजी पोंचू, शर्ट किंवा कॉन्ट्रॅस्ट कलर ट्राय करू शकता. यामुळे इजी लुक मिळेल.

* कांजीवरम किंवा बनारसी साडीपासून अनारकली बनवू शकता. यामुळे तुमच्या साडीला नवीन लुक मिळेल आणि हे वापरण्यासही सोपे आहे.

* तुम्ही तुमच्या आईच्या किंवा आजीच्या एखाद्या प्लेन सिल्कच्या साडीचा गाऊनही बनवू शकता आणि रिसेप्शन संगीत कार्यक्रमासाठी घालू शकता.

* जर साडीची बॉर्डर घासली गेली आहे किंवा फाटली असेल तर त्यावर नवीन बॉर्डर लावता येऊ शकते. मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्हाला स्टायलिश बॉर्डरसाठी अनेक दुकानं उपलब्ध आहेत. बॉर्डर चेंज करून साडीचे रूपच पालटून जाईल. म्हणजेच साडी एकदम नव्यासारखी होऊन जाईल अशी साडी तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही. जर साडीचा मधला भाग फाटला असेल किंवा कापला गेला असेल तर त्याजागी कॉन्ट्रास्ट कलरचे जॉर्जेट किंवा शिफॉनचे फॅब्रिक लावू शकता.

प्रयोग करून पहा : लग्नाच्यावेळी तुमच्या आईच्या लहेंग्यासोबत तुम्ही क्रॉप टॉप किंवा कोर्सेट बरोबर परिधान करून इंडोवेस्टर्न लुक मिळवू शकता. तसेच तुम्हाला आवडले तर लहेंग्यासोबत शीयर जॅकेटही घालू शकता. यामुळे लहेंग्याला नवीन लुक मिळेल.

लहेंग्याला बनवा अनारकली : तुमच्या आईच्या लहेंगा वा चोलीपासून अनारकलीसुद्धा बनवू शकता. यासाठी तुमच्या आवडीचे फॅब्रिक लहेंग्याच्या घेराबरोबर शिवून घ्या. अशाचप्रकारे जर तुमच्याकडे एखादी जुनी चोली असेल तर त्यासोबत आवडीचे फॅब्रिक जोडून अनारकली बनवू शकता.

बनारसी साडीचा हेवी दुपट्टा : आईच्या बनारसी साडीचा हेवी दुपट्टासुद्धा बनवू शकता आणि प्लेन स्कर्ट व सलवार सूटसोबत पेयर करू शकता. असे केल्याने तुमचे पैसेही वाचतील आणि नवीन एक्सक्लुजिव लुक मिळेल. असा दुपट्टा स्टे्रट फिटवाले सूट, अनारकली, पटियाला सलवार कमीजबरोबरही शोभून दिसतील.

्रेंडमधील लेटेस्ट कलर : लाल रंग आता आउट ऑफ ट्रेंन्ड झाला आहे. म्हणजे रंग कोणी घालतही नाही. आता मुली नवनवे रंग वापरून बघत आहेत. हल्लीच्या नववधू पेस्टल रंग जसे फिकट गुलाबी. सी ग्रीन, क्रीम रंग किंवा गडद केशरी रंगही कॉन्फिडंटली वापरत आहेत.

लाइटवेट नेटचे लहेंगे : वजनदार लहेंग्याची जागा आता लाईटवेट आणि नेटच्या आणि वेलवेटच्या लहेंग्यांनी घेतली आहे. हे लाइट वेट असल्याने खूप पसंत केले जात आहेत. लाइट पिंक, पर्पल, क्रीम यासोबत पिवळा, निळा, हिरवा, लाल इ. रंगांच्या कॉम्बीनेशनचे लहेंगे सध्या तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. हे स्टायलिश लुक आणि डिझायनर असल्यामुळे ते खूपच सुंदर व अनोखी अनुभूती देतात.

कार्गोची फॅशन परत आली आहे

* मोनिका गुप्ता

९०च्या दशकात परिधान करण्यात येणारे कार्गो आज पुन्हा फॅशनमध्ये परतले आहे. जुन्या काळातील अनेक नायिका कार्गोला टाईलिश पद्धतीने कॅरी करून चुकल्या आहेत. आता तीच कार्गो पँट आजच्या तरुणींची पहिली पसंती बनली आहे. कार्गोबद्दल विशेष गोष्ट म्हणजे ती जीन्सपेक्षा अधिक चांगली आणि आरामदायक आहे. आपण तिला वेगवेगळया शैलीमध्ये बाळगू शकता. ऑफिस असो किंवा सहल असो, डेटवर जायचे असो किंवा मित्रांसह हँगआउट असो, ही प्रत्येक लुकसाठी योग्य आहे.

चला, जाणून घेऊया की कार्गो वेगवेगळया स्टाईलमध्ये कशी बाळगली जाऊ शकते.

कार्यालयासाठी

आपण कार्यालयासाठी अरुंद (नॅरो) कार्गो पँट्स वापरुन पाहू शकता. ही अतिशय स्टाईलिश लुक देते. ही तळाशी अरुंद असते आणि हिच्या बाजूला सिंगल पॉकेट असते, जे अतिशय स्टाईलिश कार्गो लुक देते. कार्यालयासाठी आपण नेहमीच हलक्या शेडचे ट्राउजर वापरुन पहावे जसे तपकिरी रंगाप्रमाणे. या रंगाच्या ट्राऊजरसह पांढरा शर्ट परिपूर्ण ऑफिस लुक देईल.

जेव्हा प्रवास करायचा असेल

बऱ्याच वेळा आपण स्टायलिश कपडे तर घालतो पण त्यात आरामदायक वाटत नाही. म्हणूनच नेहमी असा एखादा पोषाक निवडला पाहिजे, जो आरामदायक असेल. जर आपण दूरच्या प्रवासाला किंवा ट्रेकिंगला जात असाल तर कार्गो आपल्यासाठी सर्वोत्तम परिधान आहे. ट्रॅकिंगसाठी आपण सैन्य डिझाइनवाली कार्गो पँट निवडू शकता. ही खूप छान लुक देते. यासह आपला आवडता टी-शर्ट वापरुन पहा. प्रवास करताना आपणास यात आरामदेखील वाटेल आणि सहजपणे फिरण्याचा आनंदही घेऊ शकाल.

जेव्हा तुम्हाला डेटवर जायचे असेल

जेव्हा आपल्याला डेटवर जायचे असते, तेव्हा मुली त्यांच्या वॉर्डरोबमधील स्टाईलिश कपडयांचा शोध सुरू करतात जेणेकरून त्या सुंदर दिसतील. परंतु ड्रेस स्टाईलिश असण्यापेक्षा हे अधिक महत्वाचे आहे की आपणास त्यास बाळगताना किती आरामदायक वाटते. जर आपल्याला ड्रेसमध्ये आरामदायक वाटत असेल तर आपण आपला सर्व वेळ आनंदाने घालविण्यास सक्षम असाल. डेटवर जाण्यासाठी कार्गो पँट योग्य आहेत. स्टाईलिश दिसण्यासाठी आपण त्वचेला फिट असणाऱ्या कार्गो ट्राऊजरसह क्रॉप टॉप घालू शकता. आपण हे परिधान केल्याने स्टाईलिशदेखील दिसाल आणि आरामदायकही वाटेल.

व्यायामशाळेसाठी

कार्गोबद्दल सर्वात मजेदार गोष्ट ही देखील आहे की आपण ती जिममध्येही घालू शकतो. ही इतकी आरामदायक असते की ही परिधान केल्याने आपण कोणताही व्यायाम सहज करू शकतो.

बऱ्याच वेळा, जिममध्ये परिधान करण्यात येणाऱ्या ट्राउझर्समध्ये पँटीचा शेप बनू लागतो. ज्यामुळे मुलींना व्यायाम करण्यास आरामदायक वाटत नाही. परंतु कार्गोमध्ये शेप बनण्याची कोणतीही शक्यताच नसते. तिचे फॅब्रिक किंचित जाड असते.

कार्गो बाळगण्याच्या या स्टाईलिश शैलींनी प्रत्येक प्रसंगासाठी आपल्या लुकला एक छान लुक मिळेल, तेही संपूर्ण आरामात.

पुन्हा आली बूट कटची फॅशन

* मोनिका गुप्ता

फॅशनचा अर्थ आहे कुल, हॉट आणि सेक्सी दिसणे. स्वत: कुल, हॉट आणि सेक्सी दिसण्यासाठी गरज आहे योग्य कपडयाच्या निवडीची आणि ते व्यवस्थित कॅरी करण्याची.

फॅशन जगतात डेनिमचा वेगळाच स्वॅग आहे. ९०च्या दशकात घातल्या जाणाऱ्या बूट कट जीन्सने पुन्हा एकदा फॅशन जगतात पुनरागमन केले आहे. करीना कपूर, माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, काजोल, रवीना टंडन यांच्यासारख्या अनेक हिरोइन्सना तुम्ही ९०च्या दशकातील चित्रपटांमध्ये बूट कट जीन्स घालून नक्कीच पाहिले असेल. तोच बूट कट आता पुन्हा फॅशनमध्ये प्रचलित झाला आहे.

बूट कट जीन्सला बेलबॉटम आणि स्किनी फ्लेअर्ड जीन्ससुद्धा म्हटले जाते. या जीन्सचे वैशिष्टय असे की तुम्ही हे कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही लुकसोबत वापरू शकता.

बूट कट फॅशनमध्ये बॉलीवूड

फॅशनच्या बदलांमध्ये फॅशन डिझायनर्ससोबत बॉलीवूड स्टार्सचाही महत्त्वपूर्ण सहभाग असतो. आपली फॅशन बॉलीवूडच्या ट्रेंडप्रमाणे आत बाहेर होत राहते. एखादा नवीन चित्रपट आला आणि तो हीट झाला की चित्रपटातील फॅशनचा ट्रेंड आपला स्टाईल स्टेटमेंट बनतो. ज्याप्रकारे जुन्या चित्रपटांना जुन्या गाण्यांना नव्या प्रकारे रीमेक केले जाते, तशाच प्रकारे फॅशनचासुद्धा रीमेक केला जातो. प्लाजो, क्रोप टॉप, लाँग स्कर्ट, हाय वेस्ट जीन्स, बूट कट जीन्स हे सर्व ९०च्या दशकात वापरलं जायचं. आता हे सगळे फॅशनमध्ये पुन्हा आले आहेत. ९०च्या दशकातील चित्रपटांमध्ये कितीतरी हिरोइन्स बूट कट जीन्समध्ये दिसायच्या.

नवनव्या लग्नाच्या बंधनात अडकलेली फॅशन क्वीन सोनम कपूर आहूजासुद्धा बूट कट स्टाईलच्या ड्रेसमध्ये दिसली. निळ्या रंगांच्या या ड्रेसमध्ये सोनम एकदम क्लासी आणि एलीगंट दिसत होती.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करीअरची सुरूवात करणारी आलिया भट्टसुद्धा स्वत:ला फॅशनच्या बाबतीत मागे ठेवत नाही. निळ्या डेनीम बूट कट जीन्ससोबत पांढऱ्या टीशर्टमध्ये आलिया भट्ट आपल्या मित्रांसोबत लंचला जाताना दिसली.

‘मुन्नी बदनाम’सारख्या आयटम साँगवर सगळ्यांना नाचवणारी मलायका अरोरा नेहमी आपल्या लुक्स आणि ड्रेसिंगसाठी सोशल मिडीयावर चर्चेत असते.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी अॅक्टिव्ह असणारी मलायका आपल्या रिसेंट पोस्टमध्ये अत्यंत फॅशनेबल आणि कुल लुकमध्ये दिसली. ब्ल्यू डेनीम बूट कट जीन्ससोबत लांब फेदर जॅकेट आणि ब्लॅक शेडचा तिचा हा लुक खूप चर्चेत राहिला.

अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावणारी दीपिका पादुकोण एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत आपल्या हॉट आणि सेक्सी लुक्ससाठी नेहमी बातम्यांमध्ये असते.

बूट कटला कसे कराल कॅरी

आजचे तरूण स्वत:ला वेगळे आणि स्टायलिश दर्शवण्याच्या प्रयत्नात असतात. ड्रेसिंग सेंसची समज तर सगळ्यांनाच असते. परंतु योग्य फॅशन-सेंसची समज फार कमीजणांना असते. केवळ डिझायनर ड्रेस घातल्याने तुम्ही स्टायलिश दिसू शकत नाही. ती योग्य पद्धतीने कॅरी करूनच तुम्ही स्टायलिश दिसू शकता. बूट कट जीन्सचा ट्रेंड वेळोवेळी बदलत राहिला आहे. कधी हायवेस्ट, कधी लो वेस्ट तर कधी स्किनी. परंतु सध्या जो ट्रेंड आहे, तो आहे बूट कट जीन्सचा. बूट कट जीन्सचा ट्रेंड एका वर्षांपूर्वीसुद्धा होता आणि आता पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आहे.

जर तुम्ही असा विचार करून काळजीत पडला असाल की कॅरी कशी करायची तर चला जाणून घेऊ ही कॅरी करायच्या काही टीप्स :

* जर तुम्ही मित्रांबरोबर हँगआऊटचा प्लान बनवत असाल तर तुम्ही बूट कट जीन्ससोबत डेनीम जॅकेट किंवा प्रिंटेड व्हाईट टॉप कॅरी करू शकता.

* जर तुम्ही बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणार असाल, तर बूट कट जीन्ससोबत क्रॉप टॉप कॅरी करा.

* शॉपिंगला जायचे असो किंवा मुव्ही बघायला जायचे असो, बूट कट जीन्स ही तुमची योग्य निवड आहे. बूट कट जीन्सवर हॉट शर्ट घालून तुम्ही परफेक्ट दिसाल.

अशा बना फॅशन आयकॉन

– गरिमा पंकज

आपण कोणते कपडे घालता, कशा राहता, त्यावरून आपली आवडनिवड कळून येते. आपली पर्सनॅलिटी आकर्षक आणि अपडेट ठेवण्यासाठी आपला वॉर्डरोबसुध्दा अपडेट असणे आवश्यक आहे. याबाबत फॅशन डिझायनर आशिमा शर्माच्या मते, आपल्या वॉर्डरोबमध्ये अशा प्रकारचे कपडे जरूर असले पाहिजेत.

ऑफिससाठी स्टाईल

आपण वेगवेगळ्या फॅशनचा स्वीकार केला पाहिजे आणि आपली स्टाइलही अशाप्रकारे कॅरी केली पाहिजे जी ऑफिसच्या आउटफिटसोबतही पूर्णपणे सूट करेल. मंडे ब्लूज आणि वीकेंड हँगओव्हरचा स्वत:च्या लुकवर प्रभाव पडू देऊ नका. तसेच आपल्या वर्कप्लेसवर फॅशन विचित्र दिसू नये, त्यामुळे फॅशनमध्ये संतुलन राखण्याचीही आवश्यकता असते.

लांब कट असलेल्या कुर्ती

आजकाल मुलींमध्ये लांब कट असलेल्या कुर्ती खूप लोकप्रिय आहेत. दीपिका पदुकोन, नरगिस फाकरी, जॅकलिन, जान्हवी यांसारख्या अनेक बॉलीवूड बाला या कुर्तीमध्ये दिसून येतात.

अनेक प्रकारच्या कट असलेल्या कुर्ती सध्या फॅशनमध्ये आहेत. उदा. मध्येच कंबरेच्या वरपासून खालपर्यंत, साइड कट, कुर्त्याच्या दोन्ही बाजूला लांब कट इ. अशा प्रकारच्या कुर्ती आपण जीन्स आणि अँकल लेंथच्या लेगिंगसह घालू शकता. या कुर्तींसह हुप इअररिंग्ज, फ्लॅट्स, चप्पलचे कॉम्बिनेशन छान दिसते. या आपण कॉलेज, ऑफिस किंवा कुठल्याही प्रसंगी कॅज्युअल वियरच्या रूपात घालू शकता.

लेअरिंग ड्रेसेस

ऑटम सीझनमध्ये गॉर्जियस दिसण्यासाठी आपण लेयरिंगवाले ड्रेस घालू शकता. लेयरिंग ड्रेसचा अर्थ आहे २-३ कपडे एकसाथ घालणे आणि हा आजकाल खूप ट्रेंड आहे. ट्रान्सपरंट शर्ट आणि जॅकेट इ.च्या खाली सॉलिड कलरचा टॉप घाला. हा लुक खूप प्रिटी वाटतो. या ड्रेसच्या खाली शॉर्ट्स आणि जीन्स घाला.

फ्लोरस ड्रेसेस

आपल्या वॉर्डरोबमध्ये फ्लोरस ड्रेसेस जरूर असले पाहिजेत. फ्लोरल फॅशनवाले ड्रेसेस नेहमीच स्प्रिंग आणि समर सीझनमध्ये वापरले जातात. या मोसमात मोठे फ्लोरल प्रिंट फॅशनमध्ये आहेत आणि दिवसा वापरण्यासाठी एकदम परफेक्ट असतात. क्रॉप टॉपसह फ्लोरल प्रिंट पेंसिल आणि प्रिंटेड स्कर्ट घाला. त्यावर हाय हिल्स आणि हुप इअररिंग्ज घालून स्टाइल पूर्ण करा. नाइटी फ्लोरा ड्रेसही घालू शकता. हा प्लेन डार्क कलरच्या श्रगसह कॅरी करा. आपण आपल्या मित्रमंडळींमध्ये खूप स्टायलिश दिसाल. रेग्युलर जीन्स आणि टॉपसह फ्लोरल स्टोल किंवा डेनिम शर्ट व क्रॉप टॉपसह फ्लोरल शर्टही कॅरी करू शकता.

सॅटीन ड्रेस

स्टायलिश दिसण्यासाठी स्मार्ट, शाइनी, ग्लॉसी आणि सुपर सॉफ्ट सॅटीन ड्रेसेस आपल्या वॉर्डरोबमध्ये जरूर असले पाहिजेत. एसिमॅट्रिकल बॉडीकॉन आणि ओव्हर साइज सॅटीन टॉप्स आजकाल ट्रेंडमध्ये आहे. अशा प्रकारे आपण सॅटीन स्पोर्ट रफल स्कर्टसह गोल्ड कलर क्रॉप टॉप घालूनही स्टायलिश दिसू शकता.

प्रिंट जेवढे छोटे तेवढे चांगले

जर आपणास ऑफिसमध्ये नको त्या अटेंशनपासून वाचायचे असेल, तर मोठ्या प्रिंटचे पेहराव घालायचे टाळा. आजकाल फ्लोरल प्रिंटस ट्रेंडमध्ये आहेत. आपल्या ब्लाउजची निवड करताना तुम्ही हे ट्राय करू शकता. आपण सफेद किंवा पिस्ता कलरच्या बेससह छोट्या गुलाबांची प्रिंट असलेला ब्लाउज घालू शकता.

प्रोम ग्लॅम आउटफिट

काही महिला विचार करतात की शाइनी सीक्वेन्स वर्कवाले पेहराव त्याच्या लुक ओव्हर एक्स्पोझर बनवतात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे यापेक्षा खूप वेगळे आहे. कौशल्याने डिझाइन केलेले मोती आणि टिकल्या असलेले ड्रेसेस   आपले वॉर्डरोबला खूप इंटरेस्टिंग बनवतात. सीक्वेन्स वर्कवाले ड्रेस घातल्यानंतर ज्वेलरी घालण्याचीही गरज भासत नाही. डायमंड नेकलेसशिवायही आपण सुंदर दिसाल.

मोंटे कार्लोच्या कार्यकारी निर्देशिका मोनिका ओसवाल काही स्टाइल टीप्स सांगत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण फॅशन गेममध्ये स्वत:ला अव्वल ठेवू शकता.

रंगांसोबत खेळ

न्यूट्रल कलर उदा. काळा, मरून, सफेद, नेव्ही, क्रीम, चारकोल आणि ग्रे कलरचा वापर करा. यातील बहुतेक रंग पँट, सूट, स्कर्ट आणि शूजसाठी पूर्णपणे फिट बसतात. या रंगांना सॉफ्ट फॅमिनाइन रंग उदा. आइस ब्ल्यू, सॉफ्ट पिंक इ. सोबत मॅच करा.

अशा एक्सेसरीजपासून दूर राहा

लक्षात ठेवा, प्रिंट आपल्या एक्सेसरीजची कमतरता दूर करण्याचे काम करतात. म्हणून प्रिंटवाल्या ब्लाउजसह मोठमोठ्या डँगल इयररिंग्ज, लाउड हेअर बँड, ब्राइट ग्लॉसवाल्या वस्तू टाळा जेणेकरून आपला लुक प्रोफेशनल वाटेल.

सॉलिड कलरच्या कपड्यांमध्ये आपण काही एक्सेसरीज वापरू शकता. उदा. डायमंडचे स्टड्स, पर्ल स्टड्स आणि पर्ल नेकपीस इ. आपल्या एक्सेसरीजमध्ये विविध रंगांचा वापर करण्याचे टाळा. केसांना फ्रेश ब्रँड, साइड वेणी किंवा फ्रेंच रोल ट्राय करा. आजकाल स्लीक हेयर स्टाइलची फॅशन आहे. आपण पूर्णपणे बांधलेल्या केसांचा पोनीटेल ट्राय करू शकता. ज्यांचे केस छोटे असतात, त्यांना केस मोकळे ठेवण्याचाही पर्याय असतो. परंतु ज्यांचे केस मोठे आहेत, त्यांना ते बांधून ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

मॅटेलिक शेड्स ड्रेसेस

मॅटेलिक विशेषत: गोल्ड आणि सिल्वर कलरचे ड्रेसेसही आपल्या वॉर्डरोबमध्ये जरूर असले पाहिजेत. थोडेसे क्रिएटिव्ह असलेले शाइनी, मॅटेलिक ड्रेस घालूनही आपण पार्टीचे आकर्षण बनू शकता. आपण मेटॅलिक कलरची मिडी घातलेली असो किंवा ऑफ शॉल्डर बॉडीहगिंग ड्रेस, आपली स्टाइल इतरांपेक्षा वेगळी दिसेल.

कट्स आणि कर्व्ज

जेव्हाही प्रोफेशनल वर्क क्लोथ्सबाबत बोलले जाते, तेव्हा आपला ड्रेस नेहमी अशाप्रकारे शिवलेला असला पाहिजे की तो आपल्या शरीरावर योग्य प्रकारे फिट बसेल. नेहमी पारंपरिक कट असलेल्या ड्रेसचीच निवड करा. ज्यांची फिटिंग चांगली नाहीए, असे ड्रेस घालायचे टाळा. बहुतेक भारतीय महिलांचे शरीर गिटार किंवा पीयर शेपमध्ये असते(बॉटम थोडे जास्त हेवी असते.), म्हणून चांगल्या फिटिंगचे ट्राउझर, पँटची निवड करा. पँट फिट जरूर असली पाहिजे, पण ती जास्त टाइटही नसावी. त्यातून पँटीची लाइन दिसू नये. आपला स्कर्ट ढोपर किंवा त्याच्या खालपर्यंत लांब असला पाहिजेत. तो एवढा लूज असला पाहिजे की आपण आरामात बसून काम करू शकाल. कामाच्या ठिकाणी टाइट फिटिंग असलेले कपडे घालू नका.

परिधान करा ५ एक्सेसरीज बॉलिवूड स्टाइलने

* पूनम

कपडेच नाहीत तर दागिनेदेखील स्टाइल स्टेटमेंट बनू शकतात. पण त्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे जरूरी आहे. त्या म्हणजे तुमचे कपडे, तुमचं व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन जर दागिने आणि कपडे परिधान केले तर तुम्हीदेखील बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमरस दिसू शकता. तेव्हा दागिने निवडताना काही गोष्टी लक्षात घेणं जरूरी आहे.

नेकपीस

काही सेकंदात स्टायलिश दिसण्यासाठी आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्टाइलचे, आकाराचे नेकपीस जरुर ठेवा.

* ट्युनिक, कुर्ती आणि फुललेंथ टीशर्ट सोबत लाँगलेंथ नेकपीस घाला.

* कॉलरवाल्या ड्रेसवर बीडेड नेकपीस घाला. यामुळे ग्लॅमरस लूक मिळेल.

* मोहक लूक मिळवण्यासाठी स्पार्किंग स्टेटमेंट नेकलेस घ्या. तो गाऊन, वनपीस आणि ऑफशोल्डर ड्रेसवर शोभून दिसतो.

* ट्रायबल आदिवासी दागिनेदेखील आजमावू शकता.

* कॉलेज गर्ल फंकी लूकसाठी ३-४ नेकपीस एकत्र घालू शकता.

* प्यूजन वेअर असल्यास मोहक दिसण्यासाठी टेंपल ज्वेलरी नेकपीस हा उत्तम पर्याय होऊ शकतो.

* नेहमीच सगळ्याच कपड्यांवर सूट होणारा काळ्या रंगाचा नेकपीस आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हवा.

* नियॉन शेड्सचे नेकपीस नेहमीच फ्रेश लूक देतात. तेदेखील असायलाच हवेत.

इयररिंग्स

तुमची इच्छा असेल तर नेकपीस ऐवजी फक्त इयररिंग्स घालून आपला लूक स्टायलिश करू शकता.

* बोल्ड लूकसाठी मोठ्या आकाराचे इयररिंग्स निवडा.

* गाऊन, ड्रेससोबत हिरे किंवा मोत्याचे मोठे टॉप्स घाला.

* नेहमीच्या नॉर्मल लूकसाठी मिडलेंथ हँगिंग इयररिंग्स घाला. ते खूपच स्टायलिश दिसतात.

* शोल्डरलेंथ इयररिंग्स घालून ग्लॅमरस लूक येऊ शकतो.

* मिस मॅच लूकसाठी वेस्टर्न वेअरसोबत फुल साईज झुमके घाला.

* गर्दीत सर्वांचं लक्ष तुमच्याकडे वेधून घ्यायचं असेल तर इअर कफ घाला.

* सुपर स्टायलिश लूकसाठी फक्त एकाच कानात एक्सट्रिम लेंथ (गळ्याच्या खालपर्यंत) इयररिंग्स घाला.

* फंकी लूकसाठी फूटवेअर, फळं व प्राण्यांच्या आकाराचे इयररिंग्स घालू शकता.

बांगड्या

* हातांचे सौंदर्य वाढवण्यासोबतच आपलं व्यक्तिमत्त्व उठून दिसावं म्हणून ब्रेसलेट ज्वेलरी बॉक्समध्ये असायला हवं.

* डिसेंट लूकसाठी हिरेजडीज कफ घालू शकता.

* डेनिमसोबत लेदरचे ब्रेसलेट घाला

* फ्रेश लूकसाठी बाइट गडद रंगाच्या शेड्सचे बीडेड, मोती असलेलं कफ वापरू शकता.

* ३-४ कफ एकत्र घालून स्टायलिश लूक मिळवू शकता.

* सोन्याच्या आणि चांदीच्या बांगड्या ज्वेलरी बॉक्समध्ये असायलाच हव्यात. या सहज कोणत्याही ड्रेस, कपड्यांसोबत मॅच होतात.

* फंकी लूकसाठी ब्रॅण्ड कफ वापरून पाहू शकता.

* रॅप कफ कलेक्शनमध्ये असावेत. डेनिमसोबत खूपच छान दिसतात.

रिंग

फक्त ब्रेसलेट नव्हे तर अंगठीदेखील तुमच्या हाताच्या सौंदर्यात भर घालते.

* बोल्ड लूक हवा असल्यास मोठ्या आकाराच्या अंगठ्या घालाव्यात.

* फॅशनबेल लूकसाठी डबल फिंगर रिंग नक्की वापरून बघा.

* नेलआर्टसाठी वेळ नसेल तर नेलआर्ट रिंग घाला.

* सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचे असल्यास साखळी रिंग वापरू शकता.

* स्टयलिश लूकसाठी फुल फिंगर रिंग म्हणजेच संपूर्ण बोटात घालायची रिंग हा उत्तम पर्याय आहे.

* फोर फिंगर सध्या तेजीत आहे. त्यामुळे तीदेखील ट्राय करू शकता.

घड्याळ

घड्याळ हा एक असा दागिना आहे, ज्यामुळे व्यक्तिमत्त्वह झळकतं. स्टायलिश लूकसाठी घड्याळ नक्की विकत घ्या.

* वेगळ्या आणि हटके लूकसाठी कॉलेजगोईंग मुलींसारखे ब्रेसलेट वॉच वापरू शकता.

* लेदर बेल्टचं घड्याळ तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावी करतं.

* कफ वॉच हे कलेक्शनमध्ये असायलाच हवं. हे वेस्टर्न आउटफिटसोबत खूप छान दिसते.

* स्पॉर्ट्स वॉचमुळे खेळाडूप्रमाणे लूक करता येईल.

* नेहमीच्या वापरासाठी मेटल वॉच विकत घ्या.

* पार्टी, फंक्शन प्रसंगी रत्नजडीत घड्याळ वापरू शकता.

* कपड्यांच्या रंगाना मॅच होणारी रंगीबेरंगी घड्याळंदेखील वापरायला काहीच हरकत नाही.

साध्या ड्रेसला ट्रेंडी बनवते भरतकाम

* प्रतिभा अग्निहोत्री

एखाद्या कापडावर सुई आणि रंगीबेरंगी, रेशमी धागा वापरुन वेगवेगळया डिझाइन कोरण्याच्या कलेला भरतकाम म्हणतात. आरसे, मोती आणि मणी इत्यादींचा वापर डिझाइन अधिक आकर्षक करण्यासाठी केला जातो. आज जरी युग पुढे सरसावले असले तरी हाताने केलेल्या भरतकामाची बाब वेगळीच असते. शरारा, गरारा, स्कर्ट यासारख्या पोशाखांच्या वाढत्या फॅशनबरोबरच तरुण मुलींमध्ये भरतकामाची आवड निर्माण झाली आहे.

पूर्वी फक्त हातांनी भरतकाम करण्याची प्रथा होती, आता या कामासाठी मशीन्सही आल्या आहेत. तसे तर काश्मिरी, सिंधी, चिकनकारी आणि गोटेपत्तीसारख्या अनेक भरतकाम कला प्रचलित आहेत, पण आम्ही तुम्हाला तीन मुख्य भरतकामाबद्दल सांगत आहोत.

कांथा वर्क : हे भरतकाम बंगालमधील सर्वात प्राचीन लोक भरतकामांपैकी एक आहे. कांथा म्हणजे जुने कापड. पूर्वी वेगवेगळया रंगांचे जुने कपडे पुन्हा वापर करण्यायोग्य बनवण्यासाठी एकावर एक ठेऊन त्यांना धावत्या टाकेच्या माध्यमातून नवीन चादर, ओढनी किंवा गोधडीचे रूप दिले जात असे आणि म्हणूनच या भरतकाम कलेला कांथा वर्क असे नाव देण्यात आले. यापासून प्रेरित होऊन यास नवीन साडया, कुर्ते आणि चादरी इत्यादींवरही बनवून त्यांना आकर्षक लूक देण्यात येऊ लागले. आता तर हे भरतकाम प्रत्येक प्रकारचे कपडे जसे खादी, सुती, रेशीम इत्यादीवरही केले जात आहे. हे बनवण्यासाठी रनिंग टाके किंवा रफू टाक्याचा उपयोग केला जातो. यात रंगीत धाग्यांच्या मदतीने फॅब्रिकवर फुलांची पाने, प्राणी आणि सामान्य जीवनातील दृश्ये कोरली जातात. कोणतेही प्लेन शर्ट, साडी, चादर किंवा ब्लाउजला या भरतकामाद्वारे आकर्षक लूक देता येऊ शकतो.

ही स्टिच स्टाइल ट्रेंडमध्ये आहे

रनिंग स्टिच : हाताने कपडे शिवण्यासाठी धावते टाकेच वापरले जातात. रंगीत धाग्यासह कोणतेही प्लेन फॅब्रिक धावत्या टाक्यांनी खूप आकर्षक बनवता येते. याला कच्चा टाकादेखील म्हणतात. कांथा वर्कमध्ये याच टाक्याचा वापर केला जातो.

स्टेम स्टिच : नावावरूनच स्पष्ट होते की हा टाका फुले आणि पानांचे पृष्ठभाग व त्यावरील सरळ रेषा तयार करण्यासाठी वापरला जातो.

चेन स्टिच : भरतकामाचे मूलभूत टाके म्हणजे साखळी टाके. हा टाका काश्मिरी भरतकामामध्ये वापरला जातो. साखळीसारखे दिसण्यामुळे याला साखळी टाका म्हणतात.

साटन स्टिच : साटन टाके फुलांच्या पानासारखे कोणतेही नमुने भरण्यासाठी वापरले जातात. हे टाके नमुन्याला एक रॉयल लुक देतात.

ले डे : छोटया-छोटया फुलांना धाग्याच्या विळख्याच्या माध्यमातून कपडयावर विणले जाणारे भरतकाम आहे हे. हे भरतकाम पाकळयासारखे दिसते.

फ्रेंच नॉट : लहानशा गाठीसारखा दिसणारा हा टाका खूप सोपा आणि सुंदर टाका आहे. हा सुईवरती दोरा गुंडाळून बनविला जातो. हा लहान-लहान फुले तयार करण्यासाठीच वापरला जातो.

डिझाईन कसे छापावे

यासाठी प्रत्यक्ष नमुन्यावर बटर पेपर ठेवून पेन्सिलने स्केच करा. आता जाड सुईने डिझाइनच्या कडांना छिद्र करा. आपण नमुना ३ प्रकारे छापू शकता :

* जुने सेल तोडून त्यातील काळया सामग्रीत रॉकेल मिसळा व जेल बनवा आणि छापल्या जाणाऱ्या फॅब्रिकवर बटर पेपर लावा आणि तयार केलेल्या जेलमध्ये सूतीचा एक छोटा कपडा भिजवा आणि नमुन्याच्या छिद्रांवर २-३ वेळा फिरवा. नमुना कपडयावर छापला जाईल.

* एका छोटया वाटीत कपडयांना लावण्यात येणारी लिक्विड नीळ घ्या. आता बटर पेपर कपडयावर ठेवा आणि वरील प्रक्रिया पुन्हा करा. नमुना छापला जाईल.

* आपण छिद्र न करता बटर पेपर आणि कपडयाच्या मध्यभागी कार्बन पेपर ठेवून आपली डिझाइन छापू शकता.

* आपल्या फॅब्रिकवर संपूर्ण नमुना एकाच वेळी मुद्रित करा जेणेकरुन भरतकाम करताना आपल्या सातत्यात कोणताही अडथळा येणार नाही.

* भौमितीय डिझाइन तयार करणे खूप सोपे असते. आपण केवळ पेन्सिलच्या मदतीने हे तयार करू शकता.

भरतकाम का करावे

हल्ली एकसारख्या डिझाईन्स आणि फॅब्रिक्सचे कपडे घातलेले लोक मॉल कल्चरमध्ये दिसून येतात. अशा परिस्थितीत हलक्या-फुलक्या भरतकामासह आपला पोशाख आपणास गर्दीपासून वेगळेपण देतो. याशिवाय बऱ्याच वेळा बाजारात पार्टीवेअर पोशाख आपल्या बजेटच्या बाहेर असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रिंटेड किंवा प्लेन ड्रेसवर हाताने भरतकाम करून आपण त्याला सहजपणे पार्टीवेअर ड्रेस बनवू शकता. सध्या हाताचे भरतकाम फॅशनमध्ये आहे आणि मशीनी भरतकामापेक्षा हाताने भरतकाम केलेला कपडयांचा ड्रेस खूप महाग आहे.

* प्लेन फॅब्रिकवर वेगवेगळया रंगाच्या धाग्यांनी रनिंग स्टिचमध्ये सरळ रेषा बनवून आपण त्याला सहजच एक आकर्षक लुक देऊ शकता.

* छापील कुर्ते आणि साडीच्या छपाईवरदेखील डिझाइननुसार रेशीम धागा वापरल्याने त्याचे सौंदर्य वाढेल.

* प्लेन कुर्ते, दुपट्टे किंवा ब्लाउजचा गळा आणि बाह्यांना मिरर वर्क व फ्रेंच नॉटने सजवा.

* कोणत्याही प्लेन कपडयावर पेन्सिलने ८ इंच लांबीची आणि ६ इंचाच्या रुंदीची चौकट बनवा आणि नंतर त्यामध्ये भरतकाम करून गळ्याभोवती कॉलर बनवा आणि नंतर कॉन्ट्रास्ट कलरच्या कुर्त्यावर हे लावा, अप्रतिम कुर्ता तयार होईल.

* प्लेन चादरला कॉन्ट्रास्ट रंगाचे पॅच वर्क किंवा लोकर वर्कने बनवून तयार करा.

थोडी खबरदारी घ्या

* भरतकामासाठी नेहमीच फक्त दर्जेदार आणि पक्क्या रंगाचेच कपडे निवडा, जेणेकरुन आपल्या भरतकामावरील मेहनत फळास येईल.

* प्लास्टिकऐवजी लाकडी चौकट वापरा. कपडयांवर लाकडी चौकट लावल्याने घट्टपणा प्रकट होतो.

* भरतकामासाठी अँकरचे धागे वापरा. ते पक्क्या रंगाचे असतात.

* प्रत्येक सुताच्या गुंडीवर एक लेबल असते, ज्यावर धाग्याचा शेडदेखील लिहिलेला असतो. हे लेबल काळजीपूर्वक ठेवा, जेणेकरून जेव्हा आपल्याला पुन्हा धागा घ्यायचा असेल तेव्हा शेडविषयी आपल्या मनात कोणताही गोंधळ होणार नाही.

* प्रत्येक रंगाच्या धाग्याचा साठा ठेवा, जेणेकरून आपल्याला पुन्हा-पुन्हा बाजारात जाण्याची गरज भासणार नाही.

* प्रथमच भरतकाम करताना रनिंग आणि चेन स्टिचिंगपासून सुरूवात करा.

* पॅचच्या कामासाठी शुद्ध सूती कपडयांचा वापर करा, कारण रेशीम कपडयाने बनविलेल्या पॅचच्या काठावरुन धागे लवकर निघू लागतात.

* भरतकामानंतर धागे उलटया बाजूने कापून घ्या आणि आपल्या फॅब्रिकला अंतिम टच द्या.

* नमुना छापण्यासाठी केवळ कार्बन पेपर, रॉकेल आणि नीळचाच वापर करा, कारण हे कपडयांवर काही परिणाम करत नाहीत.

* भरतकाम सुरू करण्यापूर्वी पंचाच्या मदतीने कपडयाच्या वरती चौकट व्यवस्थित घट्ट करा. जेव्हा फ्रेम सैल होते, तेव्हा स्टिचचे टाके सैल राहतात आणि कपडयामध्ये फुगवटा येतो.

आउटडोर फॅशन कधी काय घालावं

* अनुराधा गुप्ता

आजच्या स्त्रिया घराची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच स्वत:ला इतर कामातही व्यस्त ठेवू लागल्या आहेत. त्या जर नोकरदार असतील तर त्यांचं प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफही वेगवेगळं असेल आणि त्यानुसारच त्यांना अनेक प्रसंगात सहभागीही व्हावं लागतं, तसंच अनेक वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधावा लागतो. ही सर्व कामं व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी आणि प्रत्येक प्रसंगी स्वत:ला प्रेझेंटेबल दाखवण्यासाठी फॅशन ट्रेण्ड्सची योग्य माहिती असणंही फार गरजेचं आहे.

फॅशन डिझायनर श्रुती संचेती सांगते की, ‘डिस्को’ पार्टीमध्ये जर कोणी स्त्री लहेंगा घालून गेली तर हे फॅशन डिजास्टरच ठरेल. म्हणून योग्य प्रसंगी योग्य ड्रेस घालणं खूप महत्त्वाचं ठरतं.

नाइटआउटला काय घालावं

अलीकडे मोठमोठ्या शहरांमध्ये तरुण वर्गाचं आपल्या मित्रांच्या घरात रात्री थांबणं आणि मजामस्ती करण्याचा ट्रेण्ड फार जोरावर आहे. मुलीदेखील याचा आनंद घेत आहेत. तसं यात काही चुकीचंही नाहीए. अशा प्रकारचे प्रसंग स्टे्रस बस्टरसारखे असतात आणि याचा आनंद घ्यायला मागेही राहू नये. शिवाय हे प्रसंग तुम्ही आणखीन गमतीदार बनवू शकता, जर तुम्ही योग्य आउटफिट्सची निवड केली असेल तर.

श्रुती सांगते की, नाइटआउट म्हणजे मजामस्ती, पार्टी, कुकिंग आणि गेम्स. या सर्वांचा पुरेपूर आनंद फक्त आरामदायक कपड्यांमध्येच घेतला जाऊ शकतो. पण आता जेव्हा नाइटआउट करणं एक ट्रेण्ड झाला आहे, म्हणून या ट्रेण्डमध्ये फॅशनची धूमदेखील खूप गरजेची आहे.

श्रुती या प्रसंगी घातल्या जाणाऱ्या ड्रेसेसबद्दल सांगते की :

* या प्रसंगी अनेक अॅक्टिविटीज कराव्या लागतात; ज्यासाठी असे कपडे घालावेत जे फ्लेक्सिबल असतील. लाँग कॉटन स्कर्टबरोबर शॉर्ट कुर्ती, रॅपराउंड स्कर्टबरोबर स्टायलिश स्पेगेटी आणि स्टोल या प्रसंगी खूपच आरामदायक पर्याय आहे.

* अलीकडे बाजारात प्रिंटेड कॉटन पॅण्ट्सदेखील मिळतात. नाइटआउटसारख्या मनमोकळ्या प्रसंगी हा ड्रेस खूपच स्टायलिश लुक देतो. याच्यासोबतदेखील शॉर्ट कॉटन कुर्ती घातली जाऊ शकते.

* कॅज्युअल अफगाणी पायजम्यासोबत स्टायलिश स्लीव्हलेस टीशर्टदेखील याप्रसंगी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा लुक देण्यासाठी पुरेसा असतो.

फंकी लुक खास शॉपिंगसाठी

नाइट आउटसारखंच शॉपिंगदेखील स्त्रियांसाठी स्टे्रस बस्टर आहे. हा प्रत्येक स्त्रीचा फेवरेट टाइमपास असतो. या वेळेचा आनंद घेण्यासाठी हे जरुरी आहे की कपडेही तसेच घातले जावे. जरा विचार करा, शॉपिंगला जर तुम्ही शॉर्ट फ्रॉक किंवा स्कर्ट घालून गेलात तर प्रत्येक क्षणी तुमचं याच गोष्टीवर लक्ष लागून राहील की तुमच्यासोबत मालफंक्शनिंग तर होणार नाही ना आणि मार्केट एरियासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सगळे तुमची चेष्टा तर करणार नाही. पण असंही नाही की शॉपिंगसाठी तुम्ही वरून खालपर्यंत कपड्यांतच स्वत:ला गुंडाळून घ्यावं.

श्रुती सांगते की, शॉपिंगला जाणं एक असा प्रसंग असतो जेव्हा अनेक वेळा फिटिंग चेक करण्यासाठी कपडे बदलावे लागतात. अशावेळी जास्त कॉप्लिकेटेड ड्रेस घातल्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या सगळ्यापासून बचावण्यासाठी ईझी टू वेअर आणि ईझी टू रिमूव आउटफिट्स चांगले ठरतात.

शॉपिंगसाठी घातल्या जाणाऱ्या स्टायलिश आउटफिट्ससाठी श्रुती अनेक पर्याय सांगत आहे.

* या प्रसंगी डेनिम जीन्स स्त्रियांची ऑलटाइम फेवरेट असते. तसंही जीन्स या प्रसंगासाठी एक फार चांगला पर्याय आहे. पण याला स्टायलिश लुक देण्यासाठी ट्रेण्डी टॉपसोबत क्लब करायला पाहिजे.

* जंम्पसूट्स या प्रसंगी खूपच स्टायलिश आणि आरामदायक असतात. बाजारात याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत, शॉपिंग टाइमसाठी फंकी लुकचा एखादा जंपसूट तुम्ही घालू शकता.

* कुलोट्स आणि क्रॉप टॉप फॅशन ट्रेण्ड्समध्ये सर्वात लेटेस्ट आहेत आणि हे कॉम्बिनेशन शॉपिंग टाइमसाठीदेखील सर्वात स्टायलिश आहे.

* अलीकडे बाजारात अनेक प्रकारचे प्रिंटेड प्लाजो मिळतात. हे तुम्ही शॉर्ट टॉप किंवा स्टायलिश स्पेगिटी आणि स्टोलसोबत घालू शकता.

* फक्त वेस्टर्नच नव्हे, तर भारतीय पेहरावदेखील शॉपिंग करताना खूप आरामदायक आणि स्टायलिश लुक देतात. जसं की पॉकेट आणि कॉलरच्या कुर्त्यांबरोबर अॅन्कल लेन्थ लेगिंग्जचं खूप चलन आहे. त्याबरोबर अफगाणी पायजम्याबरोबर स्टायलिश टीशर्टदेखील तुम्हाला फॅशनेबल स्त्रियांच्या रांगेत नेऊन उभं करेल.

* सिमॅट्रिकल टॉप आणि सॉफ्ट डेनिम पॅण्ट्सदेखील फॅशनमध्ये आहेत. स्त्रियांना हे खूप आवडत आहे. हे फ्लेक्सिबल असण्याबरोबरच खूपच कूल लुक देतात.

जेव्हा पार्टीची शान बनायचं असेल

फक्त शॉपिंगच नव्हे, तर भारतीय स्त्रियांमध्ये सतत वाढणाऱ्या पार्टीच्या क्रेझने फॅशन इंडस्ट्रीला दर दिवशी बाजारात काही तरी नवीन सादर करण्यासाठी मजबूर केलं आहे.

श्रुती सांगते की पूर्वी स्त्रिया अशा प्रसंगी इंडियन आउटफिट्सच जास्त घालणं पसंत करायच्या, पण आता त्यांना असा पेहराव हवा आहे जो इंडियनही असावा आणि वेस्टर्नही. यासाठी डिझायनर्सनी अनेक प्रकारचे इंडोवेस्टर्न फ्यूजन डे्रस डिझाइन केले आहेत.

* लहेंग्याची फॅशन कधीच आउट होऊ शकत नाही. पण स्त्रिया याला कंटाळल्या आहेत. म्हणूनच डिझायनर्सनी आता स्त्रियांना लहेंग्याऐवजी वेडिंग गाउनचा पर्याय दिला आहे. गाउन वेगवेगळ्या प्रसंगानुसार बाजारात उपलब्ध आहेत. जसं की लग्नप्रसंगी घालण्यासाठी सिल्क, नेट, वेल्वेट यांसारख्या फॅब्रिक्सवर गोटा वर्क, सीक्वेन्स वर्क अणि जरीकाम केलेला गाउन घातला जाऊ शकतो, तर बर्थ डे पार्टी, संगीत, मेंदी किंवा साखरपुडा इत्यादी प्रसंगी शिफॉनवर ब्रोकेड वर्क, फॅन्सी लेस वर्क आणि इंग्लिश एम्ब्रॉयडरीवाला गाउन फार चांगला पर्याय आहे.

* म्यूलेट डे्रसेजमध्ये वनपीस आणि सलवार सूटदेखील स्त्रियांना वेगळा लुक देतात. हे तुम्ही दुपट्टा आणि लेगिंग्जबरोबर घालू शकता.

* तुम्हाला जर लहेंगाच घालायचा असेल तर बाजारात मिळणाऱ्या पारंपरिक लहेंग्याऐवजी लाँग कोटसोबत घाघऱ्याच्या कॉम्बिनेशनला प्राधान्य द्या. हे तुम्हाला इंडोवेस्टर्न लुक देईल. घाघरा लाँग कुर्त्याबरोबरही घातला जाऊ शकतो. त्याचबरोबर केप आणि घाघऱ्याचं कॉम्बिनेशनदेखील स्टायलिश इंडोवेस्टर्न लुक देतो.

* शॉर्ट अनारकली कुर्त्यांची फॅशन पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये परतली आहे. मात्र, या वेळेस हे चूडीदारबरोबर नव्हे तर पटियाला किंवा अफगाणी पायजम्यांबरोबर घातले जात आहेत.

* बाजारात विशेषकरून लेगिंग्जवर नेसल्या जाणाऱ्या साड्या आल्या आहेत, ज्या खूपच आकर्षक दिसतात. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या साड्या सोनम कपूर, अदिती राव हैदरी, दीपिका पादुकोण यांसारख्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही नेसलेल्या पाहायला मिळालं आहे. या साड्या बारीक आणि सडपातळ फिगर असलेल्या स्त्रियांवर खूपच स्टायलिश दिसतात.

ऑफिसला जा अपटुडेट बनून

मजामस्तीबरोबरच आता स्त्रिया कॉर्पोरेट कल्चरच्या रंगातही रंगलेल्या दिसत आहेत. या कल्चर म्हणजे संस्कृतीबरोबर चालण्यासाठी स्त्रियांनी आपल्या पेहरावांमध्ये अनेक बदल केले आहेत. एक काळ होता जेव्हा ‘चांदनी’ चित्रपटातील श्रीदेवीचा कट स्लीव्ह, ब्लाउज फॅशनेबल स्त्रियांनी ऑफिसात घालायलाही सुरुवात केली होती. आणि ही फॅशन आजपर्यंत आउटडेटे्ड झाली नाहीए.

श्रुती सांगते की, ब्लाउजच्या स्टाइलमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. पण साडीची क्रेज आजही नोकरदार स्त्रियांमध्ये जशीच्या तशी आहे. आता वेस्टर्न कल्चरच्या प्रभावाने स्त्रियांचा ऑफिस ड्रेसिंगसेन्सही बराच बदलला आहे. साडी नेसायला १५ मिनिटं घालवण्याऐवजी त्यांना ट्राउजर आणि शर्ट घालणं योग्य वाटतं.

फक्त ट्राउजर आणि शर्टच नव्हे, तर आता स्त्रियांना ऑफिस वेअरमध्येही स्टाइलची धूम दाखवणं आवडत आहे. बघूया अशाच काही स्टायलिश ऑफिस वेअरची माहिती :

* फिटेड ड्रेसचं चलन तसं जुनं आहे, पण त्याच्यावर समर ब्लेझर घातला तर त्याचा पूर्ण लुकच बदलतो.

* चित्रपट ‘की एंड का’ मध्ये करीना कपूरने घातलेला बेबी कॉलर शर्ट सद्या ट्रेण्डमध्ये आहे.

* लाँग शर्ट ड्रेसदेखील कॉर्पोरेट वर्किंग स्त्रियांना सुंदर लुक देतात. सामान्य शर्टाच्या लांबीपेक्षा जास्त लांबी असलेल्या या शर्ट्सवर लावलेले बेल्ट यांना वेगळाच लुक देतात.

ट्रेंडी ज्वेलरीने मिळवा नवा लूक

* तोषिनी राठौड

कपडयांच्या फॅशनप्रमाणे ज्वेलरी ट्रेंडही सातत्याने बदलत असतो. पण काही ज्वेलरी अशी असते, तिची क्रेझ सतत टिकून असते. यात झुमक्यापासून ते नव्या डिझाइन्सचे चोकर, नेकपीस, बिंदी, विविध प्रकारचे कडे इत्यादी महिलांमध्ये प्रचलित आहेत. चला पाहूया, सध्या कोणती ज्वेलरी फॅशनमध्ये इन आहे.

ऑक्सिडाइज ज्वेलरी

आजकाल स्त्रिया सगळीकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी घालताना दिसतात. पण या ज्वेलरीला एका वेगळया रुपात सादर केलं जातं. जसं की ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये बनवले जाणारे पेंडेंट आणि इतर छोटे छोटे डिझाइन्स मणी हे लोकरीच्या धाग्यांमध्ये ओवले जातात. याव्यतिरिक्त ऑक्सिडाइज सिल्व्हरने बनलेले कडे, हस्तीदंतापासून बनलेल्या कडे आणि मोत्यांच्या ज्वेलरीसोबत वापरले जातात. जे राजस्थानी लुक देतात. तसेच ऑक्सिडाईज ज्वेलरीसोबत एअर कफचाही ट्रेंड शीखरावर आहे. ज्यामुळे तुमचं सौंदर्य खुलून दिसेल.

कडे

तुमचा लुक अधिक खुलवण्यासाठी हातामध्ये घातलेल्या कडयांची महत्त्वाची भूमिका असते. हे कडे सर्वांनाच आकर्षित करतात. या सीझनमध्ये इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी तुम्ही असे कडे निवडा, ज्यामुळे तुमचे सौंदर्य उठून दिसेल. आजकाल गोंडे, मोती, रेशीम, लोकर लावलेले कडे ट्रेंडमध्ये आहेत. तसेच ट्रायबल डिझाइन्ससह ऑक्सिडाइज कडे तुमच्या हातावर छान दिसतील. तुम्ही गोल्डनसह सिल्व्हर कडयांचं कॉम्बिनेशन करून ड्रेसनुसार घालू शकता.

वुलन ज्वेलरी

आजकाल वुलन ज्वेलरी घालण्याचा ट्रेंड सुरु आहे. ही ज्वेलरी सामान्यपणे हाताने बनवली जाते. यात डिझाइनर पॅचवर हातांनी मोत्यांचं काम केलं जातं. यासह वुलनचे गोंडे, लटकन लावले जातात. याची सुंदरता काही औरच आहे.

वेस्ट बेल्ट

वेस्ट बेल्ट अशी ज्वेलरी आहे, जी तुम्हाला स्टाइलिश लुक मिळवून देते. बाजारात अनेक प्रकारचे वेस्ट बेल्ट उपलब्ध आहेत. यात ऑक्सिडाईज सिल्वरसह वुलन बेल्ट, मिरर वर्क बेल्ट इत्यादी तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार घालू शकता, ज्यामुळे तुमचा ड्रेस अधिक आकर्षक दिसेल.

कंठा ज्वेलरी

कंठा ज्वेलरीची फॅशन खूप वर्षांपूर्वी होती. पण यंदा याच स्टाइलला वेगळया पद्धतीने सादर केलं जात आहे. कंठा ज्वेलरीमध्ये मेटलने बनलेल्या मोत्यांचा वापर केला जातो, जे लोकरीच्या धाग्यात ओवले जातात आणि पेंडेंटसोबत सजवले जातात.

डँग्लर्स अँड ड्रॉप्स

सिनेक्षेत्रात चलती असलेल्या या कानातल्यांचा ट्रेंड सर्वच ठिकाणी दिसून येतो. विशेषत: या ज्वेलरीत चंद्राच्या आकाराचे झुमके ट्रेंडमध्ये आहेत, जे आकारांत मोठे असतात. यामुळे कानांचं सौंदर्य वाढतं. हे कानातले घालून तुम्हालादेखील स्टार असल्यासारखं वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें