एकटी आई आणि मुलं

– चारुलता सूर्यवंशी

मुलांचं संगोपन आईवडील दोघांनाही करावं लागतं. पण काही कारणामुळे मुलांना जर वडिलांना मुकावं लागलं, तर मुलांचं संगोपन केवळ आईलाच करावं लागतं.

हेच एकलपालकत्व (सिंगल पॅरेंटिंग) होय

पालक व बालक या दोघांसाठीही हे जीवनातील एक आव्हान ठरतं. यात बाईला आई व बाबा या दोन्ही भूमिका पार पाडणं भाग पडतं. साहजिकच यामुळे अनेक विपरीत घटनांना तिला सामोरं जावं लागतं व यामुळे संताप, भय, एकटेपणा व असहाय्यता या भावना तिला सतत जाणवू लागतात. पण यातून मार्गही अखेर तिलाच काढायचा असतो. यासाठी तिने काही खास बाबी ध्यानात ठेवल्या तर या अडचणींवर तिला सहजतेने मात करता येऊ शकेल.

मनातील संताप आवरा

मुलाला आईहून अधिक वडिलांची गरज असते असं मानलं जातं. आईवडील दोघांचंही प्रेम मिळणारी मुलं जीवनात अधिक सफल होतात. पण काही कारणामुळे जर ही जबाबदारी केवळ एकट्या आपल्यावरच येऊन पडली तर घाबरू नका. उलट या जबाबदारीला एक आव्हान समजून सामोरं जा.

जीवनातील आव्हानं पेलताना आपला विकास होत असतो. आपण ती चांगली पेलू शकलात तर आज टीका करणारे लोक उद्या तुमचं कौतुकही करू लागतील.

अनेकदा एकल पालकत्व निभावणाऱ्या आयांना आपल्या मुलांना वडिलांची माया मिळू शकत नाही यासाठी अकारण हळहळ वाटते. पण असे विचार मनात आणणंही चुकीचं आहे; कारण अशाने तुमचं जगणंही कठीण होईल.

अशा तणावातून बाहेर यायचं तर आधी आपण कणखर बना, मुलांनाही तसं बनवा. आपणासारख्या इतरही अनेक महिला या जगात अशा घटनांचा सामना करत असतील याचा विचार केलात की मग आपण एकाकी नाही या सुखद जाणिवेने आपणास मोठा दिलासा मिळेल.

योग्य मार्गदर्शन

योग्य मार्गदर्शन, प्रेम, सहकार्य व वेळ या गोष्टी असतील तर एकटी आईदेखील मुलांचं पालनपोषण सहजतेने करू शकेल.

याबाबत पत्रकार मानसी काणे सांगते, ‘‘लग्नानंतर दीड वर्षांतच एका अपघातात माझे पती वारले. पण आधी आम्हाला एक मुलगा झालेला होता. आज या घटनेला १० वर्षं उलटून गेली आहेत. मुलासोबत गेली १० वर्षं मी एकटीच राहातेय. त्याला घडलेलं सारं ठाऊक आहे. पण तो अगदी सहजतेने समाजात वावरतोय. अशा जीवनातील अडचणी त्याला ठाऊक आहेत व त्यावरील उपायही तो जाणतो.

‘‘पतीच्या निधनानंतर मी नोकरीला लागले. पत्रकारितेतील नोकरीची माझी दिनचर्या त्यालाही आता माहिती झालेली आहे व यामुळे आम्ही मजेत जगतोय.’’

उचित निर्णय

मानसी पुढे सांगते, ‘‘एखादी बाई पतीला गमावल्याने एकटी पडते तेव्हा तिला अनेकदा दुसरा विवाह कर असा सल्ला दिला जातो आणि बहुतेकदा ती याला नकार देते. याचं कारण आजची स्त्री जीवनातील संकटांचा सामना करायला सक्षम बनलेली आहे. तिच्यात कमालीचा आत्मविश्वास आलेला आहे. मलाही खूप जणांनी दुसरं लग्न कर असा सल्ला दिला होता.

पण ते करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. आज १० वर्षांनंतरदेखील मला व माढ्या मुलालाही या निर्णयाचा अभिमान वाटतोय.’’

गरज भावनिक आधाराची

एकल पालकांच्या मुलांनादेखील काही सामाजिक संकटांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना कसा करावा याची शिकवण आईच मुलांना देऊ शकते.

एकल वडील व एकल आई यांच्या भूमिकांत अनेकदा आपल्याला फरक जाणवेल. मुलांचं संगोपन, घर, कुटुंब, नोकरी ही सर्वच कामं आईला करावी लागतात. या सर्व कामात ताळमेळ साधणं खूप अवघड असतं.

आधाराने जखमा भरतात

याबाबत स्वाती कटारे सांगतात, ‘‘मी ८ वर्षांची असताना माझे वडील पोलिसांचं कर्तव्य निभावताना मारले गेले. यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारच हरपला. पण माझी आई डगमगली नाही. तिने अनेक सामाजिक संकटांचा धाडसाने सामना केला व आम्हालाही भावनिक तणावातून बाहेर काढलं.

‘‘आज मागे वळून पाहताना मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. कारण कुटुंबाच्या वाईट काळात व विपरीत परिस्थितीत ती एक शक्ती बनून आमच्यामागे उभी राहिली होती.’’

अभिमानाची बाब

आज अनेक महिला विवाहित नसूनही मुलांना सांभाळत आहेत. एकल आई बनणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरलीए. मिस यूनिवर्स सुष्मिता सेनने याबाबतीत एक आदर्श घालून दिलाय. आपलं धकाधकीचं जीवनमान सांभाळून तिने एक यशस्वी पालक असा लौकिक मिळवलाय.

सुष्मिता सेन सांगते, ‘‘मला मुलांची भारी आवड असल्याने मी आधी एका मुलीला दत्तक घेतलं. काही वर्षांनी तिला कोणीतरी जोडीदार हवी म्हणून आणखी एक मुलगी मी दत्तक घेतली. माझ्या दोन्ही मुली आता एखादा सामाजिक कार्यक्रम असो वा फॅशन पार्टी हरेक समारंभात सतत माझ्यासोबत असतात.’’

धाडसी पाऊल

टीव्हीवरील कलाकार उर्वशी ढोलकिया उर्फ कोमोलिका व नीना गुप्ता यादेखील एकल माताच आहेत. उर्वशीने एका रिअॅलिटी शोमध्ये या करुण कथेचा खुलासाही केला होता. नीना गुप्तानेदेखील आपली मुलगी मसाबाला धाडसाने स्वीकारून तिला समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं.

एकल आई वा एकल वडील होणं आजकाल खूपच कठीण आहे, पण अखंड सावधानता व धाडस बाळगल्याने जीवनाला एक नवी दिशा मिळू शकते. पण आशा व विश्वास सोडला तर तुमच्याबरोबरच मुलाची प्रगतीही खुंटेल. यासाठी निर्भयतेने एकल पालकाची भूमिका चोख पार पाडून इतरांसाठी एक आदर्श बना!

माझी आई माझी ताकद

* पारुल भटनागर

‘‘सकाळी ५ वाजताचा अलार्म वाजत नाही तोच आई लगेचच उठून उभी राहते. कामाला लागते. त्यानंतर जेव्हा ती आम्हाला उठवू लागते तेव्हा आम्ही मात्र फक्त पाच मिनिटे आणखी झोपू दे, असे सांगून लोळत राहतो. उठल्याबरोबर आम्हाला ब्रेकफास्ट, लंच सर्व तयार मिळते. स्वत:ची तयारी करतानाही आम्ही कधी तिला चप्पल आणून दे असे सांगते, तर कधी आई प्लीज माझाया ड्रेसला इस्त्री करुन दे, असे म्हणत तिचीच मदत घेते.

‘‘आम्हीच नाही तर वडील आणि घरातील इतर सदस्ययही तिच्याकडे अशाच प्रकारे सतत काही ना काही मागत असतात. तिला कामाला लावतात. आई मात्र चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम ठेवून आमच्या प्रत्येकाचे काम आनंदाने करते. तिला स्वत:लाही ऑफिसला जायचे असते. पण स्वत:सोबत कुटुंबाच्या सर्व गोष्टी कशा मॅनेज करायच्या, हे तिला चांगल्या प्रकारे माहीत असते.

‘‘घरातल्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्यानंतर तिला तिच्या ऑफिसला जायचे असते. कधीकधी तर मला आश्चर्य वाटते की, इतक्या चांगल्या प्रकारे ती सर्व कसे काय मॅनेज करते? मलाही तिच्याकडून हे सर्व शिकून तिच्यासारखीच बनायचे आहे. खरेच माझी आई एक परिपूर्ण स्त्री तर आहेच, सोबतच माझी ताकद आहे. प्रत्येक घाव सहन करुन लोखंडासारखे मजबूत बनून जीवन जगण्याची योग्य पद्धत तिच्याकडूनच मी शिकत आहे,’’ असे १७ वर्षीय रियाने सांगितले.

फिटनेससाठी नो कॉम्प्रमाईज

ऑफिसला लवकर जाण्याच्या घाईत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आजारांच्या रुपात अनेक अडचणींचा सामाना करावा लागेल. म्हणूनच सकाळचा फेरफटका मारण्याच्या दिनक्रमाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. त्यासाठी सकाळी अर्धा तास लवकर उठावे लागले तरी हरकत नाही, असे आईचे म्हणणे असते.

ती हे केवळ स्वत:च करत नाही, तर कुटुंबातील सर्व सदस्यांनाही करायला भाग पाडते. कारण तिला माहीत असते की, फिटनेस फक्त तिच्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच गरजेचा आहे. सकाळच्या ताज्या हवेत फेरफटका मारल्यामुळे आपण स्वत:ला आजारांपासून दूर ठेवू शकतो, सोबतच दिवसभर प्रसन्न वाटते. आपण उत्साहाने काम करू शकतो, हे ती  घरातील सर्वांना समजावून सांगते.

आई, ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणते की, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी तिचे स्वत:चे आरोग्यही निरोगी राखणे गरजेचे आहे.

नोकरदार महिला या गोष्टीकडे विशेष करुन लक्ष देतात. त्यांना माहीत असते की, वय वाढू लागल्यानंतर महिलांच्या शरीरात आयर्न, कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्याने त्या थकून जातात. आजारी पडू शकतात. म्हणूनच कुटुंबासह त्या स्वत:च्या डाएटकडेही विशेष लक्ष देतात.

कुठलेच काम टाळायचे नसते, हे शिकलो

असे म्हणतात की, आईकडे जादूची छडी असते, जिच्यामुळे ती प्रत्येक कठीण गोष्टही सहज सोपी करते.

कुणालने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, एकाच दिवशी आईची ऑफिसमध्ये मीटिंग होती आणि आमची पार्टी असल्यामुळे मला शाळेत भात तयार करुन न्यायचा होता. आमच्या मोलकरणीनेही नेमकी त्याच दिवशी दांडी मारली. वडिलांनी तर सकाळीच सांगितले होते की, आज त्यांना मटार-बटाटयाची भाजी खायची इच्छा आहे. इतकी सर्व कामे करायची होती. तरीही माझ्या आईने कोणालाच नाराज केले नाही.

घरातले कोणतेच काम अर्धवट ठेवले नाही. इतकेच नाही तर वेळेवर ऑफिसलाही गेली. ती संध्याकाळी घरी आल्यावर आम्हाला हे सर्व समजले. तेव्हा आम्हाला वाटले की, आम्हीही आपल्या लाडक्या आईसाठी काहीतरी करायला हवे. मग काय, मी आणि वडिलांनी तिच्यासाठी डिनर तयार करुन तिला सरप्राईज दिले. माझ्या आईने अशी कितीतरी कामे फक्त एकदाच नव्हे तर अनेकदा केली आहेत. तिला असे करताना पाहून मला प्रेरणा मिळते आणि मलाही तिच्याचसारखे बनायचे आहे.

स्वत:ला नेहमीच ठेवते टापटीप

आईला हे चांगल्या प्रकारे माहिती असते की, तिची मुलगी तिला स्वत:ची ताकद तर समजतेच, पण सोबतच आपला आदर्शही मानते. त्यामुळेच ती स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाकडे, नीटनेटके राहण्याकडे कधीच दुर्लक्ष करत नाही.

आपल्या आईबाबत कृती सांगते की, कुणीही साधा एक आवाज दिला तरी आई लगेचच धावत येते. तिचा संपूर्ण दिवस घर आणि ऑफिसच्या कामात निघून जातो. तरीही ती स्वत:ला नेहमीच टापटीप ठेवते. लेटेस्ट आऊटफिट वापरते. बाहेर जाण्यासाठी वेळ नसेल तरीही स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तूंचा वापर करते, जेणकरुन तिची त्वचा नेहमीच सुंदर आणि तजेलदार दिसेल.

ती आम्हालाही त्वचा नेहमीच तरुण आणि सुंदर रहावी यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देते. फक्त सल्लाच देत नाही तर जबरदस्तीने आम्हाला तसे करायला भाग पाडते, जेणेकरुन हळूहळू आम्हाला पाणी पिण्याची सवय लागेल. मी जेव्हा कधी माझ्या आईसोबत जाते तेव्हा मला सतत तिचा अभिमान वाटत असतो की, ती माझी आई आहे. प्रत्येक जण तिच्या व्यक्तिमत्त्वाचे भरभरुन कौतुक करत असतो.

कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीची घेते काळजी

आई कुटुंबाची ताकद आहे, असे उगाच म्हणत नाहीत, तिला कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आवडीची, नावडती गोष्ट बरोबर माहिती असते. कधी, कोणाला काय हवे असते हे तिला न सांगताही समजते.

आदर्शने आपल्या परीक्षेच्या दिवसांची आठवण काढून सांगितले की, मागच्या आठवडयात माझी परीक्षा होती. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास केला. आईला माहीत होते की, मी घाईगडबडीत सवयीप्रमाणे माझे हॉलतिकीट घेऊन जायला विसरणार. त्यामुळे तिने आधीच ते माझ्या बॅगेत ठेवले होते. परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मला हॉलतिकीटची आठवण झाली आणि मी घाबरलो. पण माझी आई ग्रेट आहे, याची आठवण होताच मी बॅग तपासली आणि मला तिने ठेवलेले हॉलतिकीट सापडले.

इतकेच नाही तर जेव्हा माझ्या वडिलांना महत्त्वाची कागदपत्रे हवी असतात तेव्हा आईच ती शोधून देते. याचाच अर्थ आम्ही तिच्याशिवाय अपूर्ण आहोत.

मुलांना देते चांगल्या वर्तणुकीची शिकवण

मुलांसमोर वेळ घालवण्यासाठी भलेही आईकडे पुरेसा वेळ नसतो, पण तरीही ती आपल्या मुलांची वर्तणूक चांगली असावी, यासाठी सतत धडपडत असते.

मोठयांसमोर कशाप्रकारे वागायला हवे, घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करावा, कुणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर प्रेमाने त्याला त्याची चूक कशी समजावून सांगायची, आईवडील, मोठयांना उलट उत्तर का देऊ नये, नेहमी सर्वांच्या मदतीसाठी कसे पुढे रहावे, अशाप्रकारची सर्व शिकवण ती मुलांना देते.

आईपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ही गोष्ट कोण समजू शकेल की, मुलांसाठी त्यांची पहिली शाळा त्यांचे आईवडीलच असतात. त्यांची वागण्या-बोलण्याची पद्धत आणि दैनंदिन व्यवहारावर आईवडिलांचाच ठसा असतो. म्हणूनच घरातील कुठल्याही सदस्याने मुलांसमोर अर्वाच्च भाषेत बोलू नये, गैरर्वतन करु नये याकडे आई सतत लक्ष देत असते.

समजावते अभ्यासाचे महत्त्व

मुलाला क्लासला घातले म्हणून आई निश्चिंत होत नाही तर क्लाससोबतच ती स्वत:ही त्याच्या अभ्यासासाठी वेळ देते, जेणेकरुन तो कोणत्या विषयात तरबेज आहे आणि कोणत्या विषयात कच्चा आहे, हे तिच्या लक्षात येईल. मुलाला चांगले गुण मिळावे म्हणून ती त्याच्याकडून कच्च्या विषयाची एखाद्या शिक्षकाप्रमाणे चांगली तयारी करुन घेण्याचा प्रयत्न करते.

मुलाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचण्यासाठी आईची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका कोणीही नाकारू शकणार नाही. तिने मुलावर दरदिवशी घेतलेल्या या मेहनतीचे फळ मुलगा स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिल्यावरच तिला मिळते.

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे घालवते वेळ

कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे वेळ घालवण्याला ती नेहमीच प्राधान्य देते. कारण थोडासा जरी वेळ कुटुंबासोबत घालवता आला तरी तो वेळ दिवसातील सर्वोत्तम वेळ ठरेल आणि कुटुंबातील कुठल्याही सदस्याला त्याच्याकडे कुटुंबाचे दुर्लक्ष झाले असे वाटता कमा नये.

आई कुटुंबात धाग्याप्रमाणे असते, जिच्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्य या धाग्यात मोती बनून प्रेमाने गुंफला जातो. त्यामुळे दिवसातील काही क्षण का होईना, पण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित आनंदाने वेळ घालवावा यासाठी ती सतत प्रयत्नशील असते.

कुठलेच कार्यक्रम टाळत नाही

आजकाल व्यस्त दिनक्रमामुळे नातेवाईकांना भेटण्याची संधी कमीच मिळते. येथे आईची जबाबदारी जास्तच वाढते कारण तिने जर वेळ नाही म्हणून असे कार्यक्रम टाळले तर मुलांना आपले नातेवाईक कोण, हे समजणारच नाही.

कौटुंबिक सोहळयात सहकुटुंब सहभागी होऊन कौटुंबिक नाते दृढ करण्याचा तिचा प्रयत्न असतो. याबाबत श्रेया सांगते की, मी थकली आहे किंवा माझी अजून खूप कामे शिल्लक आहेत असे सांगून माझ्या आईने कधीच आमच्या कुटुंबातील लग्नसोहळा किंवा इतर कार्यक्रम टाळले नाहीत. उलट ती प्रत्येक कार्यक्रमाला आपुलकीने जाते.

इतकेच नाही तर घरी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचा ती हसतमुखाने पाहुणचार करते. नाते, कुटुंबांचे महत्त्व समजून घ्या, कारण एकत्र कुटुंबात जी ताकद असते ती वेगळे राहण्यात नाही, असे ती आम्हाला नेहमीच समजावून सांगत असते.

वेळेचे नियोजन करायला शिकवते

वेळेचे योग्य प्रकारे नियोजन कशा प्रकारे करायचे हे तर आईकडूनच शिकायला हवे. आपला अनुभव सांगताना राज म्हणाला की, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. यामुळे माझे पालक माझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. माझे आईवडील दोघेही कामला जातात. तरीही माझी आई घरही अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते.

मी एखादी चूक केल्यास ती केवळ नजरेच्या धाकाने मला त्या चुकीची जाणीव करुन देते. यामुळे मी ती चूक दुसऱ्यांदा करण्याची हिंमतच करू शकत नाही. वेळेचे नियोजन कसे करायचे, हे मी माझ्या आईकडूनच शिकलो. मी तर असे म्हणेन की आतापर्यंत मी जे काही यश मिळवले आहे ते केवळ माझ्या आईमुळेच शक्य झाले.

आई बनवते धीट

ज्याप्रमाणे आई परिस्थितीचा सामना धैर्याने करते त्याचप्रमाणे तो धैर्याने करण्यासाठीचा धीटपणा मुलांच्या अंगी बाणवते. अनुभवने सांगितले की, माझ्या आईचे मौजमजा करण्याचे दिवस होते तेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अशावेळी आईने स्वत:ला या द:खातून तर सावरलेच, पण आम्हालाही कधी वडिलांची कमतरता भासू दिली नाही. नोकरी करुन तिने आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या.

आम्ही धीट व्हावे यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. वडिलांच्या जाण्याने ती मनाने हळवी झाली होती, पण आमच्यासमेर तिने कधीच तिच्या डोळयात अश्रू येऊ दिले नाहीत. तिचा संघर्ष आणि मेहनत पाहून माझ्या तोंडून निघणारे कौतुकाचे शब्द थांबूच शकत नाहीत. मी माझ्या आईला फक्त एवढेच सांगेन की, तुला जगातील प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न करेन.

अतिप्रेम ठरेल डोकेदुखी

* निधी गोयल

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि समर्पण या भावनांनी जोडलेले असते. जसजसा एकमेकांना वेळ दिला जातो तसे नाते अधिक घट्ट होत जाते. गोड नात्यात काही कारणास्तव आंबटपणा कालवल्यास त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे अतिप्रेम दोघांसाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर, पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तोदेखील तुमच्याकडून बेशुमार प्रेमाचे अपेक्षा करतो. पण प्रेमाची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा तुमचा पार्टनर तुमचे म्हणणे समजून घेऊ शकत नाही. अशावेळी तुमचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दोघेही एकमेकांप्रती चुकीच्या भावना मनात बाळगू लागतात. एकास वाटते की माझ्या प्रेमाला काही किंमतच देत नाही तर दुसरा विचार करतो की, माझा पार्टनर माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेत आहे. मग अशी वेळ येते की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागते. अशीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या सूचनांवर लक्ष द्या :

प्रत्येकक्षणी नजर ठेवू नका : बऱ्याचदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळी त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असा विचार करत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवले जाते. अतिप्रेमामुळे पार्टनर वैतागून जातात. कारण तुम्ही प्रत्येकवेळी त्यांच्यावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपण्यावर, उठण्यावर, येण्याजाण्यावर नजर ठेवता. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांचे स्वातंत्र हिरावले जात असल्याची भीती निर्माण होते. ते स्वत:ला एका बंधनात बांधल्याचा अनुभव घेत असतात.

नात्याला स्पेस देणे : नाते कोणते का असेना, त्या नात्यात स्पेस असणे गरजेचे असते. नाहीतर त्या नात्याचे आयुष्य मर्यादित राहाते. नात्यात स्पेस न दिल्यामुळे प्रेम कमी होते आणि भांडण-तंट्यांमध्ये वाढ होते. यामुळे नात्यात जवळीकतेऐवजी दरी निर्माण होते.

प्रत्येकवेळी पार्टनरच्या सोबत राहणं : आपल्या पार्टनरवर अमाप प्रेम करणारे, त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळस असेही होऊ शकते की पार्टनरची त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसह वेळ घालवण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याच्यासाठी तुमचे प्रेम शिक्षा ठरू शकते.

अपेक्षांना सीमा असावी : बऱ्याचदा तुम्ही पार्टनरकडून खूपच अपेक्षा करू लागता. जर त्याचे माझ्यावर प्रेम असेल, त्याने माझ्या अपेक्षांवर खरे उतरलेच पाहिजे. अशा भावनांनी प्रेमाची परीक्षा घेणे, जेवढे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तेवढेच प्रेम त्यानेही तुमच्यावर करावे. अशा अपेक्षांमुळे तुमच्या पार्टनरला बंधनात अडकल्यासारखे वाटते. मग अशावेळी ते या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.

संशय घेऊ नका : तुमचा पार्टनर प्रत्येक छोटीछोटी गोष्ट तुम्हाला विचारून करेलच असे काही नाही. पण तरीही तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवू लागता की त्याने प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करावी. तसेच तुम्ही प्रत्येकवेळी त्याला फोन कुठे आहे? काय करत आहे? असे विचारून प्रश्नांचा भडीमार करता आणि मनात संशयाची सुई निर्माण करता. त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची बातमी ठेवता इत्यादी सर्व गोष्टींमुळे तुमचा पार्टनर हैराण होऊन जातो.

जवळीकतेला मर्यादा हवी : नात्यात मर्यादेपेक्षा अधिक जवळीकता निर्माण झाल्यावर, एकमेकांमध्ये तक्रारी होण्याच्या संभावना बळावतात. कारण काही वेळेस आपल्या माणसावर हक्क दर्शविणे हे आदेशासमान भासू शकते. म्हणूनच आपल्या पार्टनरवर अतिप्रेम करू नका. तर त्याला प्रेम द्या. म्हणजे मग त्याला स्वत:चे स्वत:लाच जाणवेल की तुमची आणि तुमच्या प्रेमाची किंमत काय आहे ते?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रेम तुम्हा दोघांसाठी डोकेदुखी ठरू नये तर यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या :

* तुमचे तुमच्या पार्टनरवर प्रचंड प्रेम आहे म्हणून ते त्याच्यावर लादू नका आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर मुळीच करू नका.

* जेवढे प्रेम आणि काळजी तुम्ही तुमच्या पार्टनरची करता, तेवढेच प्रेम आणि काळजी त्यानेही करावी. अशी अपेक्षा मनाशी बाळगत असाल, तर प्रेम आणि काळजी कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे कधीही चांगलेच ठरेल.

* प्रत्येकवेळी आपल्या पार्टनरच्या जोडीला राहू नका. तुमच्या प्रेमाची सीमा राखा.

* जर तुमच्या पार्टनरकडून तुमच्यावर दबाव टाकला जात असेल तर, त्याच्यापासून वेगळे होणे हा अंतिम पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. कोणत्याही दबावामुळे तुमचे नाते दीर्घकाळ टिकणे कठीण होईल.

* तुमच्याएवढे प्रेम तुमचा पार्टनर तुमच्यावर करू शकत नसेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकत नसेल तर तुम्ही मनाशी धीर धरा आणि पार्टनरशी यासंबंधी संवाद साधा.

* दिवसागणिक नात्यात बदल येत राहतात. काळानुरूप अनेक गोष्टी बदलतच जातात. पण प्रेमासाठीच्या अपेक्षा तशाच जिंवत राहतात. अशावेळी तुम्ही नात्याला सावरत, त्या बदलांवर तुमच्या पार्टनरशी संवाद साधत राहणे.

* नेहमीच होणाऱ्या तंट्याने आणि रोखठोकीने नाते दीर्घकाळ टिकत नाही. प्रत्येक क्षणी पार्टनरवर लक्ष ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या प्रति असलेला अविश्वास दिसून येतो.

कसे असावे नाते सासूसुनेचे

* मोनिका अग्रवाल

मुलांना मोठं होत असताना पाहून त्यांचे आईवडिल त्यांच्या लग्नाची स्वप्नं पाहू लागतात. मग कोणाच्या तरी मुलीला आपल्या घराण्याची शोभा बनवून आपल्या कुटुंबात घेऊन येतात. याचप्रमाणे मुलीला मोठी होताना पाहून तिच्या केवळ विवाहाच्या कल्पनेनं आईवडिल भावुक होतात. इतकेच नाही, स्वत: मुलगीसुद्धा तिच्या लग्नाच्या कल्पनेने, वेगवेगळ्या भावतरंगामध्ये गुंतलेली असते. ती फक्त पत्नीच नव्हे तर तरी सून, वहिनी, काकू, ताई, जाऊ अशी अनेक नाती निभावत असते.

लग्नाच्या काही काळानंतर न जाणे काय बदल घडतात, पण सासरच्यांना सुनेत दोषच दोष दिसून येतात. दुसरीकडे मुलगीही सासरच्या माणसांविषयी स्वत:चे विचार व वागणूक बदलते. काही कुटुंबांमध्ये तर ३६चा आकडाच निर्माण होतो. मुलीच्या सासरचे तर कुटुंबांतील प्रत्येक समस्येचे मूळ सुनेला आणि तिच्या कुटुंबाला समजू लागतात.

एकमेकांना समजून घ्या

एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. जेव्हा आपण एखाद्याची मुलगी आपल्या कुटुंबात घेऊन येतो, तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या (जिथे ती लहानाची मोठी झाली) घरापेक्षा एकदम वेगळे वातावरण मिळते. मग ते राहण्यावागण्याबाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या किंवा स्वभावाच्या बाबतीत. सर्वच दृष्टीने खूप बदल झालेला असतो.

याशिवाय पतिपत्नीचे आपापसातील संबंध समजून घ्यायलाही तिला थोडा अवधी लागतो. अशावेळी कुटुंबातील लोकांनी अपेक्षा थोड्या कमी ठेऊन सुनेला आपले मानून समजुतीने घ्यावे तर बहुधा समस्या निर्माण होणार नाहीत.

सुन घरी येण्याआधी सासू खूप अपेक्षा बाळगते जसे की सुन येईल आणि कामाचा ताण कमी होईल. ती सर्वांची सेवा करेल वगैरे.

सुनेचे घरातील कामात परिपूर्ण नसणे किंवा कमी काम करणे हा खूप मोठा दोष समजला जातो. प्रत्येक सासू हे विसरून जाते की सुरूवातीला सासरी आल्यावर जसा तिला पतिचा सहवास आवडत असे तसाच सुनेलाही हवाहवासा वाटणार.

मान देऊन मान मिळवा.

सासूसुनेचे संबंध मधुर बनून राहावेत यासाठी सासूच्या वागण्यात उदारता, धैर्य आणि त्यागाचे भाव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांना सोडून आलेल्या सुनेसोबत मायेची वर्तणूकच तिला नव्या परिवारासोबत जोडू शकेल, तिला आपलेपणा वाटू शकेल आणि तिच्या मनात सन्मान आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकेल. सुनेला फक्त काम करणारी मशीन न समजता कुटुंबाचे सदस्य मानले जावे.

सुनेच्या विचारांना व भावनांना महत्त्व दिले जावे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचेही मत विचारात घ्यावे, जेणेकरून कुटुंबात सुखशांती व समृद्धी टिकून राहिल.

सासूने घरातील सर्व कामे सुनेला न सोपवता स्वत:सुद्धा काही काम केले तर सासूचे आरोग्य सुदृढ राहीलच, कुटुंबातील वातावरणही चांगले राहील.

तसेच लग्नानंतर मुलीचीही काही कर्तव्य आहेत, जी तिने पार पाडली पाहिजेत. मुलीला हे कळत नाही की कुठल्याही सदस्याकडून समजावले जाणे ही ढवळाढवळ नाही. घरातील थोडेसे कामसुद्धा तिला ओझे वाटू लागते. तिला असे वाटते की पतिवर तिचाच हक्क आहे. त्याने जर इतर कोणाला वेळ दिला तर तिला ती स्वत:ची उपेक्षा वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचे म्हटले तर सासरी अधिकार काय हे तर तिला माहित असते, पण कर्तव्यपालन करणे तिला ओझ्यागत भासते.

सासरीसुद्धा मुलीसारखे अधिकार मिळावेत असे वाटणे गैर नाही, पण कोणी काही हटकले की ती हे विसरून जाते की माहेरीसुद्धा असेच होते. हे खरं आहे की सासरी कुणाशीही (तिच्या मुलांशिवाय) तिचे रक्ताचे नाते नाही पण माणुसकी आणि प्रेमाचे नाते तर आहेच.

तिनेही हे सत्य मनापासून स्विकारायला हवे की थोड्या मेहनतीने सर्वांचे मन जिंकून ती सर्वांना आपलेसे बनवू शकते. नोकरदार मुलींना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ अधिक व्यतित करायला वेळ मिळत नाही. पण वेळ काढला जाऊ शकतो आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनण्यासाठी काही कर्तव्य तिचीही असतात. कुटुंबीयांना आदर आणि प्रेम देऊन ती आपल्या पतीचे मन जिंकू शकते.

विवादापासून दूर राहा

खरंतर वर्चस्वाची लढाईच सासूसुनेमध्ये तेढ निर्माण करते. कुठल्याही संयुक्त कुटुंबात सासू आणि सुन बहुतांशी वेळ एकमेकींसोबत घालवतात. त्यांच्यावरच कामाची जबाबदारी असते. अशात घरात अशांततेचे मुख्य कारणही सासू आणि सुनेचे कटु संबंध हेच असते.

आज टीव्हीवर अनेक मालिका सासूसुनेच्या नात्यावरच आधारित असतात. दोघांपैकी कोणीतरी एक चाल खेळत असते. कधी नात्यांना उपहासात्मक विडंबन पद्धतीने सादर केले जाते. निरनिराळ्या सर्वेक्षण व शोधांमधून हे समोर आले आहे की संयुक्त कुटुंबामध्ये तणावाचे कारण ६० टक्के सासूसुनेतील नाते हेच असते.

ज्या घरांमध्ये मोठ्या चवीने या मालिका पाहिल्या जातात तिथेच वादविवाद जास्त होतात. ते तासन्तास त्यावर चर्चासुद्धा करतात की सासू किती चुकीचे वागत आहे. किंवा त्या कुटुंबातील सुन कशी चलाख आहे. तेव्हाच या सासूसुनेच्या मनातही हेच ठसते की मालिकेतील पात्रांप्रमाणेच वागायला पाहिजे आणि टीव्हीवर पाहिलेले सर्व आयुष्यातही उतरू लागते व स्वत:वर तशी वेळ आल्यास आपणही तसेच वागतो.

आपण सर्वच कुठल्या न कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतील पात्रांशी स्वत:ला जोडून पाहतो व तसे बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी सासू बनायला आवडेल? ‘कुछ रंग प्यार के’ सिरीअल मधल्या ईश्वरीदेवीसारखी की ‘बालिका वधू’मधल्या दादीसारखी?

सुनेचे कुठले पात्र तुम्हाला सूट करते? तुम्ही सासूसुनेच्या कुठल्याही पात्राप्रमाणे वागा, पण एक प्रश्न स्वत:ला नक्की विचारा की घरातल्या कुठल्याही सदस्याला त्रास देऊन तुम्ही खूश राहू शकता का? कुटुंबातील सदस्यांचा आत्मसन्मान दुखावून तुम्ही स्वस्थ बसू शकता का? कुटुंब एका माळेसारखे आहे आणि यातील सदस्य मोती आहेत. मग ही नाती तोडून तुम्ही खुश राहू शकाल का?

सुनांनी शक्यतो कधी ज्येष्ठांशी वाद घालू नये. विवादस्पद परिस्थिती उद्भवू देऊ नये. आपले म्हणणे शांतपणे त्यांच्यासमोर मांडा. मुलाने समंजस्यपणे ही स्थिती हातळावी. एक गुणी मुलगा, पती आणि जावयाच्या रूपात हा समजूतदारपणा असावा.

मुंबई येथे राहणाऱ्या वाणीचे म्हणणे आहे, ‘‘मी तमिळ कुटुंबातील आहे आणि माझे लग्न एका पंजाबी कुटुंबात झाले. मला सासूची खूप भीती होती. माझ्या मैत्रिणींनी आणि नातेवाईंकांनी मला सासूविषयी खूपच घाबरवून सोडले होते. आमचं लग्न वेगळ्या धर्मात झाले होते. राहणेखाणे, वागणेबोलणे सर्व वेगळे होते. पण मी जितके घाबरत होते त्याच्या उलटच झाले.’’

‘‘माझ्या सासूने मला प्रेमाने सर्व करायला शिकवले. हिंदी बोलायला शिकवले. त्या मला सासू कमी आणि मैत्रीण जास्त वाटल्या.’’

दिल्लीची मधू सांगते, ‘‘मी अवघी १६ वर्षांची असताना आनंदाने माझ्या सासरी गेले. माझ्या मनात कुठलाही पूर्वग्रह आणि भीती नव्हती. मी ठरवले होते की कोणालाही उलट उत्तर देणार नाही. मग माझ्यावर कोणी का नाराज होईल?

‘‘सासूबाई तसे तर खूप प्रेमाने बोलत. मनातल्या मनात का कोणास ठाऊक मुलगा बदलेल अशी भीती त्यांना वाटत असे. त्यामुळे त्या माझ्या कामात काही ना काही चुक काढत असत. मी कुठलाही वादविवाद करत नसे, तरी गोष्टी हळूहळू चिघळू लागल्या.

‘‘सासूबाई आता बाहेरच्या लोकांसमोरही माझा पाणउतारा करू लागल्या. त्या प्रत्येक वेळेस माझ्याबद्दल वाईट बोलत असत. माझीही सहनशक्ती संपत होती. मी त्यांना उलट ऐकवायला लागले होते. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागले होते. पती सतत तणावग्रस्त राहू लागले. ते ना आईला समजावून सांगू शकत होते ना मला.

‘‘यादरम्यान त्या आजारी पडल्या, पण जेव्हा मी त्यांची खूप सेवा केली तेव्हा त्यांचे मनपरिवर्तन झाले. माझ्या सेवेमुळे त्या माझ्यावर प्रेम करू लागल्या. त्यांचे मन परिवर्तन माझ्या सेवेमुळे झाले की माझ्या समजूतदारपणामुळे हे माहीत नाही, पण महत्त्वाचे हे आहे की आज घरातील वातावरण एकदम शांत आहे.’’

या दोन्ही प्रकरणांपेक्षा वेगळे प्रकरण आहे मोहिनीचे. ती सांगते, ‘‘माझे लग्न झाले आणि समस्यांचे सत्रच सुरू झाले. पूर्ण घरात सासूचे आणि नणंदेचे वर्चस्व होते. नुसते म्हणण्यापुरतेच नणंद विवाहित होती, पण प्रत्येकवेळी मला त्रास देत असे. मी सासूसासरे आणि नणंद या त्रिकोणात अडकून गेले होते.

‘‘पती नेहमी शांत असत. त्या दोघांच्या कुटिलपणामुळे आमच्यावर वेगळे होण्याची वेळ आली होती. पण अचानक परिस्थिती अशी बदलली की पतीच्याही लक्षात आले की कमतरता कुठे आहे.

‘‘नणंद आपल्या निढीवलेल्या वर्तनामुळे माहेरीच आहे. सासूबाईंनाही आता माझं महत्त्व पटलं आहे. मुलगी आणि सून यामध्ये एक पुसटशी रेषा असते. गरज असते ती फक्त रेषा पुसून टाकण्याची. मागे वळून पाहताना खूप दु:ख होते कारण महत्त्वाचा सोनेरी काळ लोटला होता. पण तरी समाधानाची बाब ही की उशिरा का होईना त्यांना त्यांची चूक समजली आहे.’’

परकी नाही स्वत:ची मुलगी समजावे

काही घरात सासूसुनेचे नाते माय लेकींसारखे असते तर काही घरात परिस्थिती खूपच वाईट असते. कमतरता ना सासूमध्ये असते ना सुनेत, कमतरता तर त्यांच्या समंजसपणात आणि त्यांच्या प्रेमात असते.

प्रश्न हा आहे की शेवटी सासूसुनेला परके का समजते? घरातली गोष्ट आहे असे असेल तर आपल्याला हेच ऐकायला आवडेल की घर तिचे आहे, पण घरांसोबत जबाबदाऱ्याही येतात.

दुसरीकडे काही सुना अशा असतात की त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याची आणि मुलांचीच जबाबदारी घ्यायची असते, सासूसासऱ्यांची नाही. याला घर सांभाळणे म्हणता येणार नाही.

वस्तूत: घर सर्व कुटुंबाचे असते. प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात. घर फक्त सासूचे आहे म्हणणे किंवा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे आहे असे म्हणणे चुक ठरेल. कारण घरात इतर लोकसुद्धा राहतात. कोणा एका व्यक्तीमुळे घर बनत नाही. घर पूर्ण कुटुंबामुळेच बनते.

लहान लहान बाबी लक्षात ठेवल्या तर कुटुंबाचे वातावरण सहज, सुखद आणि शांततापूर्ण राहू शकेल.

नवे नातेबंध, वर्क वाइफ, वर्क हझबंड

* वीणा सुखीजा

तुम्हाला त्याच्या मित्रांची नावं माहीत आहेत. तुम्हाला त्याच्या आवडत्या चित्रपटांची नावं ठाऊक आहेत. तुम्हाला त्याच्या जीवनात घडलेल्या अनेक विशिष्ट घटनांची माहिती आहे. तुम्ही त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता. कधीकधी तो तुम्हाला रागावतो. तरीदेखील तुम्ही त्याची कुणाकडेही तक्रार करत नाही, अगदी तुम्हाला याचं वाईटही वाटत नाही. तुम्हाला त्याच्या बोलण्याची लकब ठाऊक आहे. त्याच्या मनात काय सुरू असतं, याचाही तुम्हाला अंदाज असतो.

प्रश्न – अखेरीस तुमचा तो कोण आहे?

तुम्ही तिच्याकडून अपेक्षा बाळगता की तिने तुमच्या पसंतीचा पेहराव करावा. जेव्हा तुम्ही दोघे लंच करायला बसता तेव्हा तिने वाढावं अशी तुमची इच्छा असते. तुम्ही काही बोलत असाल, मग भले ते रागाने असेल तरी तिने ते निमूटपणे ऐकून घ्यावं, त्यावेळी उलट उत्तर देऊ नये, नंतर भले ती ओरडली तरी चालेल असं वाटतं.

तुम्ही तिला आपल्या भविष्यातील योजना सांगता, प्रवासादरम्यान घडलेल्या मजेदार गोष्टी सांगता. तुम्ही तिच्यासोबत बसून काम करण्याच्या उत्तम रणनीतीवर विचार करता.

प्रश्न – अखेरीस ती तुमची कोण आहे?

होय, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पती आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पत्नी. परंतु थांबा, हे सामान्य जीवनातील पतिपत्नी नाहीत. हे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ आहेत. वर्क हझबंड म्हणजे कार्यस्थळी वा कार्यालयातील पती. अशाचप्रकारे वर्क वाइफचाही अर्थ आहे. कार्यस्थळ वा कार्यालयातील पत्नी. ऐकायला हे भले थोडं विचित्र वाटत असेल वा संकोच वाटेल, परंतु वास्तव हेच आहे. कामाची नवी संस्कृती भरभराटीला येण्यासोबतच जगभरात अशा पतिपत्नींची संख्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांच्या जवळपास ४० टक्के आहे.

१९५०च्या दशकात अमेरिकेत अशा नात्यांसाठी मोठ्या शिताफीने एका शब्दाचा वापर केला जात असे – वर्क स्पाउज. हे वर्क वाइफ, वर्क हझबंड हे शब्द वास्तविक त्याचीच विस्तारीत रूपं आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कार्यक्षेत्र जगतातील हे काही नवं नातं नाही. नवीन आहे ते इतकंच की या नात्याला जगाच्या बहुतेक देशांमध्ये स्पष्टरीत्या स्वीकारालं जाऊ लागलं आहे.

त्यामुळे आपण या नात्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याची काही गरज नाही. वर्षांनुवर्षांपासून जगात अशाप्रकारच्या संबंधांचं अस्तित्त्व आहे आणि का असू नये? हे खूप स्वाभाविक आहे की जेव्हा आपण दिवसातील बहुतेक कालावधी सोबत व्यतित करतो तेव्हा तिथे भावनिक नातं का विकसित होणार नाही?

ऑस्कर वाइल्डने म्हटलं होतं, ‘‘स्त्री आणि पुरुषात सर्व प्रकारची नाती असू शकतात, परंतु केवळ मैत्री असू शकत नाही. मित्र असूनही त्यांच्यात स्त्री आणि पुरुषाचं नातं विकसित होतं.’’

मनोविश्लेषकही सांगतात की जेव्हा दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकमेकांसोबत आकर्षण अनुभवतात, तेव्हा त्यांचं हे आकर्षण त्यांच्या शारीरिक व मानसिक स्वभावधर्मानुसार आकार घेऊ लागतं म्हणजे पुरुष हा पुरुष होतो आणि स्त्री, स्त्री होते.

पूर्वीसुद्धा होते असे नातेबंध

असे नातेबंध नेहमीच अस्तित्वात होते आणि जोपर्यंत स्त्री आणि पुरुष सोबत असतील तोपर्यंत ते कायम राहातील. असे नातेबंध पूर्वीसुद्धा होते, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी होतं, याचं कारण होतं त्या काळात स्त्रियांचं घरातून बाहेर पडणं कठीण होतं. कार्यालयात साधारणपणे पुरुषच असायचे. परंतु आता काळ बदलला आहे. आजच्या जमान्यात स्त्री आणि पुरुष दोघेही घराबाहेर पडून सोबत काम करत आहेत. दोघेही घराऐवजी कार्यालयात अधिक वेळ व्यतित करतात. कामाची संस्कृतीसुद्धा काहीशी अशीच विकसित झाली आहे की सर्व कामं सोबत एकत्रित करावी लागतात. त्यामुळे एकाच कार्यालयात काम करत २ भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये व्यवसायासोबत भावनिक जवळीक वाढणंसुद्धा खूप स्वाभाविक आहे.

एक काळ होता, जेव्हा कार्यालयाचा अर्थ होता केवळ ८ तास. परंतु आज कार्यालयासाठी ८ तास पुरेसे नाहीत. आजच्या घडीला व्हाइट कॉलर नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयाचा अर्थ आहे एक निश्चित टार्गेट पूर्ण करणं, ज्यामध्ये दररोजचे १२ ताससुद्धा लागू शकतात आणि कधीकधी सलग २४ ते ३६ तासही सोबत काम करावं लागू शकतं.

असं यासाठी आहे; कारण अर्थव्यवस्था बदलली आहे, जग मर्यादित झालं आहे आणि वास्तविकतेहून गोष्टी अधिक आभासपूर्ण झाल्या आहेत. निश्चितच दीर्घ काळ कार्यालयात सोबत राहाणाऱ्या दोन व्यक्ती आपली सुखदु:खंही एकमेकांना सांगतात; कारण जेव्हा दोन व्यक्ती सोबत राहून काम करतात, तेव्हा ते आपसांत हसतात, सोबत जेवतात, एकमेकांच्या कुटुंबाविषयी ते बोलतात, ऐकतात, बॉसला एकमताने दूषणं देतात आणि ताजंतवानं राहाण्यासाठी परस्परांना चुटकुलेही ऐकवतात. हे सर्व एका छोट्याशा केबिनमध्ये घडत असतं, जिथे २ सहकारी अगदी बाजूबाजूला बसत असतात.

अशा परिस्थितीत ते एकमेकांना कळतनकळत प्रत्येक गोष्ट शेअर करतात. सहकाऱ्याला कोणतं संगीत आवडतं हे तुम्हालाही माहीत असतं आणि त्यालाही. त्याला चॉकलेट आवडतं की आइस्क्रीम ही गोष्ट दोन्ही सहकाऱ्यांना चांगलीच ठाऊक असते. निश्चितच आकर्षणाचे बंध या सर्व धाग्यांमुळे जुळतात.

काम करताना बराच काळ सोबत व्यतित होतो, तेव्हा आपण एकमेकांच्या केवळ क्षमताच नव्हे, तर मानसिक जडणघडण आणि भावनिक बाजूही व्यवस्थित समजून घेतो. परिणामी दोन भिन्नलिंगी व्यक्ती परस्परांच्या पूरक बनतात. त्यांचं एकमेकांसोबत भांडण होत नाही. दोघे एकत्रित काम करतात तेव्हा कामही जास्त होतं आणि थकवाही जाणवत नाही. दोघे सोबत एकत्रित खूश राहातात म्हणजे असे सहकारी पतिपत्नींप्रमाणे काम करू लागतात. त्यामुळे अशा लोकांना समाजशास्त्रामध्ये परिभाषित करण्यासाठी वर्क हझबंड आणि वर्क वाइफ श्रेणीमध्ये ठेवलं जातं.

प्रमाण वाढत आहे

पूर्वी याला सैद्धांतिक स्वरूपात मानलं आणि समजून घेतलं जात होतं. परंतु संपूर्ण जगात प्रसिद्ध करिअर वेबसाइट वॉल्ट डॉट कॉमने एक सर्वेक्षण केलं आणि आढळलं की २०१० मध्ये असे वर्क हझबंड आणि वर्क वाइफ जवळपास ३० टक्के होते, जे २०१४मध्ये वाढून ४४ टक्के झाले आहेत.

या अभ्यासात सहभागी लेखकांनी एक अतिशय परिचित उदाहरण देऊन जगाला समजावण्याचा प्रयत्न केला की वर्क वाइफ आणि वर्क हझबंड कसे असतात? उदाहरण हे आहे की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश व त्यांच्या परदेश मंत्री व राष्ट्रीय सल्लागार असलेल्या कोंडालिझा राइस यांच्यात जी कामासंदर्भातील केमिस्ट्री होती, ती वर्क हझबंड वा वर्क वाइफच्या पठडीतील केमिस्ट्री होती.

कितपत नैतिक आहे हे नातं?

प्रश्न हा आहे की हे नातं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? हे नातं विश्वासार्ह आहे का? वॉल्ट डॉटकॉमचा सर्वेक्षण निष्कर्ष या गोष्टी समोर आणतं की लोक हे एक महत्त्वपूर्ण आणि मजबूत नातं असल्याचं मानतात. या सर्वेक्षणादरम्यान आवडत्या सहकाऱ्यासोबत जे नातं बनतं ते अधिक विश्वासार्ह आणि अधिक मजबूत असतं. लोक ही नाती आनंदाने निभावतात. जवळपास तसंच जसं एखादं विवाहित जोडपं आपल्या संसाराचा गाडा व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करतात. या नात्याला पश्चिमेकडे समाजशास्त्रज्ञांनी व्यवहारिकतेच्या अनेक कसोट्यांमध्ये ठेवून दाखवलं आहे आणि त्यांना आढळून आलं की हे नातं केवळ खासच नव्हे, तर अतिशय सामंजस्याने परिपूर्णसुद्धा असतं.

या नात्यात रोमान्य नसतो फक्त जोडप्याचं एकमेकांसोबत भावनिक बंध असतात आणि एकमेकांच्या समस्या आणि वास्तव यांची योग्य जाण ठेवून ते हे नातं निभावत असतात. वास्तविक बहुतेक अशी जोडपी जी अशा नातेबंधांच्या आवाक्यात येतात, ते शारीरिकसंबंधात खोल उतरत नाहीत. परंतु थोडीबहुत जवळीक सर्वांची असतेच, मात्र समाजशास्त्रज्ञांना आपल्या व्यापक विश्लेषणामध्ये हे आढळून आलं की ज्या जोडप्यांमध्ये शारीरिकसंबंधसुद्धा असतात, तेसुद्धा एकमेकांच्या वास्तविक परिस्थितीचा सन्मान करतात आणि गरज भासल्यास कोणताही राग-द्वेष, बाचाबाची न करता अतिशय सहजतेने एकमेकांपासून अंतर राखतात.

प्रोफेसर मॅक्सब्राइट ज्यांनी या सर्वेक्षणाचं सविस्तर विश्लेषण केलं, त्यांच्यानुसार खूप कमी लोकांमध्ये या कामकाजी नातेबंधांसह रोमान्सचं नातं असतं.

अखेरीस या नात्याचा फायदा काय हा प्रश्न आहे? या सर्वेक्षणाचे निष्कर्ष मानले आणि सर्वेक्षणादरम्यान लोकांनी केलेल्या मुलाखतीतून मिळालेल्या निष्कर्षावर विश्वास ठेवला तर जेव्हा २ सहकाऱ्यांमध्ये वर्क वाइफ वा वर्क हझबंडचं नातं बनतं, तेव्हा ते दोन्ही कर्मचारी आपल्या कामाप्रति जास्त प्रामाणिक होतात आणि त्यामुळे कामही अधिक प्रमाणात होतं. हेच कारण आहे की जगातील सर्व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्क वाइफ, वर्क हझबंडचं नातं निर्माण व्हावं असं वाटत असतं.

आज जगातील सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या प्रकारचं आरामदेय कार्य वातावरण प्रदान करतात आणि कार्यालयात ज्याप्रकारे स्त्रिया आणि पुरुषांना जवळपास समान प्रमाणात ठेवतात, त्यामागे एक विचार हासुद्धा असतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपापली जोडी निश्चित करून काम करावं.

मानसतज्ज्ञांच्या मते जेव्हा पुरुष आणि स्त्रिया सोबत बसून काम करतात, तेव्हा त्यांच्यात काही कारण नसताना, १० टक्के आनंदी भावना असते अर्थात जेव्हा एकटा पुरुष वा एकटी स्त्री काम करतात, तेव्हा ते कामाने लवकर कंटाळतात. त्यांचं कार्य उत्पादनही कमी असतं आणि काम करण्याचा उत्साह वा रोमांचही जाणवत नाही.

परंतु जेव्हा महिला आणि पुरुष मिळून सोबत काम करतात, तेव्हा त्यांना एक प्रकारच्या आंतरिक आनंदाची अनुभूती होते, भले या आनंदाला काही अर्थ नसेल. वास्तविक २ भिन्न लिंगी व्यक्ती एकत्रित वेळ व्यतित करताना एकमेकांना अनोखी उर्जा प्रदान करत असतात.

कामाची गुणवत्ता वाढते

सर्व सर्वेक्षणं आणि संशोधनांमध्ये हेसुद्धा आढळून आलं आहे की जेव्हा स्त्रिया आणि पुरुष एकत्रित काम करतात, तेव्हा ते नेहमीच्या तुलनेत अधिक काम करतात, शिवाय उत्तम प्रतिचं कामही करतात. सोबतच नवनवीन कल्पनाही विकसित करतात. बहुराष्ट्रीय कंपन्या याच रणनीतीअंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांना आपसांत मिळूनमिसळून राहाण्यायोग्य वातावरण तयार करण्यासाठी बहुतेकदा पार्ट्या आयोजित करतात. कर्मचाऱ्यांसाठी आल्हाददायक वातावरण तयार करतात जेणेकरून सगळे एकमेकांच्या कमतरता आणि कौशल्य ओळखू शकतील, शिवाय कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीनुरूप अनुकूल साथी निवडण्यास अडचण होणार नाही.

वर्क हझबंड आणि वर्क वाइफचा ट्रेण्ड वेगाने फोफावत आहे. वास्तविक भारतासारख्या समाजव्यवस्थेतच नव्हे, अमेरिका आणि युरोपसारख्या समाजातही या शब्दांचा वापर करायला कर्मचारी संकोचतात. विवाहित वा अविवाहित दोन्ही प्रकारचे कर्मचारी आपल्या कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये या शब्दाचा वापर चुकूनही करत नाहीत. इतकंच नव्हे तर, आपसांतही ते कधी या शब्दाचा वापर करत नाही वा एकमेकांना दर्शवत नाहीत की हो, असं आहे. परंतु ते एकमेकांशी याच भावनेने जोडलेले असतात, ही गोष्ट दोघांनाही ठाऊक असते.

लग्नापूर्वी या गोष्टी जरूर करा

* किरण बाला

कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणजे तिचं लग्न…लग्नामुळे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. जर एखाद्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी सर्व बाबींचा गंभीरपणे आणि शांतपणे विचार केला नाही तर लग्नानंतर मात्र पश्तात्ताप करण्याची वेळ येते. अशात एक तर तिला आयुष्यभर कुढतकुढत जगावं लागतं किंवा मग तिच्यावर घटस्फोटाची तरी वेळ येते. या दोन्ही परिस्थिती तिच्या बाजूने नसतात. अशात जर कोणत्याही नात्याला होकार देण्यापूर्वी स्वत: मुलीनेच काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तिला लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि तिचं आयुष्यही आनंदी व सुखी ठरेल.

काही विशेष मुद्दयांवर लग्नापूर्वी चर्चा करून घेणं तुमच्या हिताचंच ठरेल. कारण दाम्पत्याचा पाया हा याच मुद्दयांवर टिकून असतो आणि वादविवाद व घटस्फोटदेखील याच गोष्टींवरून होतात.

* लग्न हे लहान मुलांचा किंवा बाहुल्यांचा खेळ नव्हे. म्हणून लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची भेट घेणं फार जरुरी आहे, जेणेकरून दोघांनाही एकमेकांचे विचार कळतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्या माणसामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण नाहीत जे तुम्हाला हवे आहेत, तर नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी लग्न न करणंच चांगलं ठरेल. कारण लग्नापूर्वीच जर तुम्ही वेगळे झालात तर निदान तुमच्यावर घटस्फोटित असण्याचा ठपका तरी लागणार नाही.

* लग्नापूर्वी तुम्ही मुलाकडून त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दलही जाणून घ्या. तसंच त्याला हेदेखील सांगा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला हवी तशी असेल, तरच लग्न करा.

* बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय कोणीच तिच्या करिअर प्लॅनिंगबद्दल सांगत नाहीत, की ती लग्नानंतर नोकरी करणार की नाही. तिला जर आपलं करिअर सोडायचं नसेल किंवा नोकरी करायची असेल, तर ही गोष्ट तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर ते तिला नोकरी करण्यास अडवणार नाहीत. त्याचबरोबर जर ती वर्तमानकाळात नोकरी करत असेल आणि लग्नानंतर तिला नोकरी करायची नसेल, तरीदेखील तिने तिची इच्छा लग्नाआधीच व्यक्त करावी. नाहीतर लग्नानंतर ते नोकरी करण्यासाठी जोरही देऊ शकतात. नोकरी करणं किंवा न करणं याबाबत लग्नानंतर कसला वाद होऊ नये, म्हणून आपल्या करिअरचं प्लॅनिंग आधीच सांगणं फार गरजेचं आहे.

* तुम्ही जर कोणा नोकरदार मुलाशी लग्न करत असाल तर हे जाणून घ्या की त्याची नोकरी तर बदलणार नाही. जर बदली होत असेल तर त्याचं क्षेत्र कुठे आहे. नाहीतर तुम्ही हा विचार करून लग्नासाठी हो म्हणाल की त्याची बदली चंदीगड, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, बंगळुरू यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये होणार आहे. पण जर लग्नानंतर त्याची बदली एखाद्या लहानशा शहरात झाली, जिथे तुम्हाला जायचं नसेल, तर मग अशा परिस्थितीत तुमच्यात नक्कीच वाद होतील. त्यामुळे लग्नापूर्वीच तुम्ही हा विचार करून घ्या की तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्थैर्य हवंय की संपूर्ण भारतभर पतींच्या बदलींबरोबर भटकणं हवंय. तुम्ही जर नोकरी करत असाल तर हे जरुरी नाही की जिथे तुमच्या पतींची बदली होईल, तिथेच तुमचीही होईल. अनेक वेळा हे शक्य नसतं. अशावेळी एक तर तुम्हाला नोकरी सोडावी लागते किंवा आपल्या पतींपासून वेगळं तरी राहावं लागतं.

* तुम्हाला जर एकत्र कुटुंबात लग्न करायची इच्छा नसेल तर असं नातं आधीच नाकारणं बरं. तुम्ही जर त्यांना होकार देऊन लग्न केलं आणि नंतर पतींवर आईवडिलांपासून वेगळं होण्यासाठी जोर दिला तर ही गोष्ट मात्र अयोग्य ठरेल. त्याने कुटुंबात क्लेश निर्माण होईल आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं. तुम्हाला जर कोणाचं बंधन नको असेल तर मग अशाच मुलाबरोबर लग्न करा जो लग्नाच्या आधीपासूनच आईवडिलांपासून वेगळा राहात असेल आणि लग्नानंतरही त्याची वेगळंच राहाण्याची इच्छा असेल.

* ज्या कुटुंबात तुम्ही लग्न करत आहात तिथलं वातावरण, रीतीभाती, संस्कार, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी गोष्टी तुम्ही आधीपासूनच जाणून घ्या. शिवाय हेदेखील पाहा की तुम्ही अशा वातावरणात जुळवून घेऊ शकता की नाही. जर तुम्हाला तिथे जमणार नसेल तर तिथे लग्न करू नका. पण तरीदेखील तुम्ही जर तिथे लग्न केलं तर तुम्हाला तिथे ताळमेळ बसवावा लागेल. म्हणजे स्वत:ला त्यांच्यानुसार तुम्हाला घडवावं लागले. नाहीतर तुमचं कायमस्वरुपी माहेरी येणं ठरलंच समजा.

* लग्नापूर्वी मुलाबरोबर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये त्याच्या आवडीनिवडी आणि सवयींबद्दलही जाणून घ्या. कदाचित त्याची एखादी आवड किंवा सवय तुम्हाला आवडत नसेल, ज्यामुळे लग्नानंतर तुमच्यात भांडण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंतही पोहोचू शकतं. तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल तर त्याला हे विचारून घ्या की तो आणि त्याचे कुटुंबीय शाकाहारी आहेत की नाही? लग्नानंतर जर तुम्हाला कळलं की तो मांसाहारी आहे तर तुमच्यावरही मांसाहारी बनवण्यासाठी जोर दिला जाईल आणि कदाचित तुम्ही ते करू शकणार नाही. त्याचबरोबर जर त्याला मद्यपान करण्याचं व्यसन असेल आणि तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही अशा माणसासोबत जवळिकी कशी वाढवणार? स्पष्टच आहे की त्याची ही सवय तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करेल आणि शेवटी तुम्हाला पश्चात्तापच करावा लागेल.

* लग्नाआधी जर तुमचा कुणी प्रियकर असेल किंवा कोणाबरोबर तुमचे संबंध राहिले असतील, तर ही गोष्ट आधीच सांगणं फायदेशीर ठरेल. शिवाय ती गोष्टही जरा थोडक्यात सांगितली गेली पाहिजे, जेणेकरून ते प्रकरण जास्त गंभीर नव्हतं, असं वाटेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं जर कोणावर प्रेम असेल तर ही गोष्ट तुमच्या सर्कलमध्ये कित्येक जणांना माहीतच असेल. म्हणून त्याबद्दल जराशी माहिती देणं भविष्यासाठी योग्य ठरेल. कारण जर लग्नानंतर त्याला याबाबत बाहेरून कळलं तर तो तुमच्याकडे संशयाने बघेल आणि त्याला तुम्ही चारित्र्यहीन असल्याचं वाटेल. अविश्वासावरही दाम्पत्य जीवनाचा पाया जास्त दिवस टिकत नाही. पण हो, जर सगळं काही माहीत असूनही तो लग्नासाठी होकार देत असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे.

* तुम्हाला जर दोन-चार भेटीनंतरही हे कळत नसेल की तो तुमच्यासाठी फिट आहे की नाही, तर तुम्ही कोणा काउन्सलरचाही सल्ला घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल.

संसार मोडण्याचं कारण महत्त्वाकांक्षी पती किंवा पत्नी

* भारत भूषण श्रीवास्तव

दिग्दर्शक गुलजारचा १९७५ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘आंधी’ने ‘रेकॉर्डब्रेक’ यश संपादन केलं होतं. या चित्रपटावर त्या काळात वाद झालेच होते, त्याची चर्चा आजही ऐकायला मिळते. कारण हा चित्रपट दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आयुष्यावर बनला होता. या चित्रपटात संजीव कुमारने नायकाची आणि सुचित्रा सेनने नायिकेची भूमिका साकारली होती, जिचं २०१४ साली निधन झालं होतं.

‘आंधी’ चित्रपटाचा केंद्रीय विषय राजकारण होता, पण हा चित्रपट चालला तो तडा जाणाऱ्या दाम्पत्य जीवनाच्या सटीक चित्रीकरणामुळे. ज्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये इंदिरा गांधी स्पष्ट दिसत होत्या. त्याचबरोबर दिसत होत्या त्या एक प्रतिभासंपन्न पत्नीच्या इच्छा आकांक्षा, ज्या पूर्ण करण्यासाठी ती पतीचाही त्याग करते आणि मुलीचाही, पण त्यांना मात्र ती विसरू शकत नाही. पतीपासून वेगळी होऊन जेव्हा ती अनेक वर्षांनी एका हिल स्टेशनवर आपले राजकीय दिवस घालवायला येते, तेव्हा ती ज्या हॉटेलात थांबते, तिथला मॅनेजर तिचा पतीच निघतो.

पतीला पुन्हा आपल्याजवळ बघून वृद्ध होत चाललेली नायिका कमजोर पडू लागते. तिच्या लक्षात येतं की खरं सुख पतीच्या बाहुपाशात, स्वयंपाकघरात, घरसंसारात, आपसातील थट्टामस्करीत आणि मुलांच्या संगोपनात आहे, अशा चिखलफेक करणाऱ्या राजकारणात नाही. पण प्रत्येकवेळी तिला हीच जाणीव होते की आता या राजकीय दलदलीतून बाहेर पडणं कठिण आहे, जे तिच्या पतीला आवडत नाही. राजकारण आणि पती यापैकी एकाची निवड करणं तिला कायम द्विधावस्थेत टाकत असे. अशात तिचे वडीलही तिला कायम पुढे जाण्यासाठी भडकवत असतात. ही द्विधावस्था चेहऱ्यावरील भाव आणि संवाद इत्यादींच्या माध्यमाने सुचित्रा सेनने इतकी सशक्त बनवली होती की कदाचित खरा पात्रदेखील असं करू शकला नसता.

आरतीची भूमिका साकारणारी सुचित्रा सेन जेव्हा दाम्पत्यजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर पतीबरोबर फिरताना आणि रोमांस करताना दिसते, तेव्हा तर विरोधक तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागतात.

स्वभावाने हट्टी आणि रागिष्ट आरती या सगळ्यामुळे भडकते, कारण तिच्या नजरेत ती काहीच चुकीचं करत नव्हती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा तिला सर्वत्र हे विचारलं जातं की हॉटेल मॅनेजर जे.के.शी तिचे काय संबंध आहेत, तेव्हा मात्र ती शस्त्र टाकते, अशात तिचा पती तिची साथ देतो. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या जनता सभेत ती आपल्या पतीला घेऊन जाते आणि सर्वांना सत्य सांगते की ते तिचे पती आहेत. जर त्यांच्यासोबत फिरणं हा अपराध आहे तर हो तिने हा अपराध केला आहे आणि शेवटी रडत रडत भावुक होऊन आरती जनतेला म्हणते की ती मत नव्हे, त्यांच्याकडून न्याय मागत आहे.

जनताही तिला विजयी करून न्याय मिळवून देते. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ती जेव्हा हॅलीकॉप्टरमध्ये बसून दिल्लीला निघते, तेव्हा संजीव कुमार तिला सांगतो की मला तुला कायम जिंकताना पाहायचं आहे.

याच सुखावर चित्रपट संपतो. पण तिथेच ज्ञानी प्रेक्षकांसमोर हा प्रश्नदेखील सोडून जातो की ज्या पतीला करिअरसाठी सोडलं, त्याला सार्वजनिकरीत्या स्वीकार करणं हा राजाकारणाचा भाग नव्हता का? ही जनतेसोबत एक भावनात्मक ब्लॅकमेलिंग नव्हती का?

एकच गोष्ट स्पष्ट होते की राजकारणात सगळं काही योग्य आहे. हेदेखील स्पष्ट होतं की एक महत्त्वाकांक्षी पत्नी जिला हरणं पसंत नाही ती जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते.

इंदिरा गांधी: अपवाद आणि आदर्श

चित्रपट बाजूला ठेवला तर इंदिरा गांधी भारतीय स्त्रियांसाठी एक आदर्श ठरल्या आहेत. याचं कारण म्हणावं तर ७०च्या दशकात स्त्रियांवर अनेक बंधनं होती. त्यांचं महत्त्वाकांक्षी असणं गुन्हा समजला जायचा आणि या महत्त्वाकांक्षेची हत्या तेव्हा खूपच सहजपणे पतप्रतिष्ठा आणि समाज नावाच्या शस्त्राने केली जायची. मात्र इंदिरा गांधी याला अपवाद होत्या, म्हणूनच त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा जिवंत ठेवली आणि दाम्पत्य व संसाराच्या भानगडीत पडल्या नाही, ज्यामुळे त्या एक आदर्श आणि अपवाद ठरल्या नव्या पिढीला त्यांच्याबद्दल फक्त इतकंच माहीत आहे की त्या एक यशस्वी आणि लोकप्रिय नेत्या होत्या. पण या सगळ्या गोष्टी त्यांनी कोणत्या अटींवर मिळवल्या होत्या, याचं दर्शन ‘आंधी’ चित्रपटातून झालं आहे.

इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधीचा त्यांच्या पत्नीवर कसलाच जोर चालत नव्हता. त्यामुळे इंदिरा गांधी आपल्या आंतरजातीय प्रेम विवाहावर कधीच पस्तावल्या नाहीत आणि त्यांनी कधीच सार्वजनिकरीत्या आपल्या पतीची निंदानालस्ती वा चर्चाही केली नाही. या वैशिष्ट्यांमुळेदेखील ज्याला पतीचा मोठा सन्मान समजला गेला होता. त्यांना उच्च स्तरावर नेऊन ठेवलं होतं.

पण जेव्हा पत्नी इतकी महत्त्वाकांक्षी असेल की ती घर तोडायलाच निघाली असेल तेव्हा पतीने काय करायला हवं, जेणेकरून संसारही टिकून राहील आणि पत्नीला कसलं नुकसानही होणार नाही. त्या प्रश्नाची एक नव्हे अनेक उत्तरं असतील, ज्या खरंतर सूचना असतील, कारण हे देखील स्पष्ट आहे की पत्नी महत्त्वाकांक्षी असणं ही समस्या नाही, तर समस्या पतीकडून तिला मॅनेज न करू शकणं आहे.

याच शृंखलेत पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटपटू ६३ वर्षांच्या क्रिकेटर इमरान खानचंही नाव येतं, ज्यांनी आपल्या पत्नी रेहम खानला तलाक दिला. विशेष म्हणजे रेहम खान आणि इमरान दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. रेहमला पहिल्या पतीपासून ३ मुलं आहेत, तर इमरानलाही पहिल्या पत्नीपासून २ मुलं आहेत. वयानेही रेहम इमरानपेक्षा २० वर्षांनी लहान आहे.

या घटस्फोटाचं कारण त्या दोघांचं दुसरं लग्न किंवा मेळ नसलेलं लग्न नसून इमरानच्या मते रेहमची वाढती राजकीय इच्छा आकांक्षा जबाबदार आहे. इमरान पाकिस्तानच्या मुख्य राजकीय पक्ष तहरीके इंसाफ (पीटीआय)चे संस्थापक आणि पुढारी आहेत. अशीदेखील चर्चा आहे की रेहम पीटीआयवर अधिकार गाजवायला बघत होती. ती सतत पक्षाच्या बैठकीत जाऊ लागली होती आणि कार्यकर्त्यांची पसंतही ठरू लागली होती. पीटीआयची पाकिस्तानच्या सत्तेत काही दखल असो वा नसो, पण तिथल्या राजकारणात मजबूत पकड आहे, ज्यामुळे पाकिस्तानात इमरानच्या चाहत्यांची संख्याही जास्त आहे.

या तणावामुळे एकेकाळची बीबीसीची टीव्हीवरील निवेदिका असलेल्या रेहमदेखील असं वक्तव्य करून हे सिद्ध केलं की या घटस्फोटाचं कारण खरोखरंच तिची महत्त्वाकांक्षा आहे. रेहम सांगते की पाकिस्तानात तिला शिव्या दिल्या जायच्या. तिथलं वातावरण स्त्रियांच्या हक्कांच्या बाजूचं नव्हतं. ती तर संपूर्ण देशाची वहिनी झाली होती, ज्यांना हवं ते तिला शिव्या देऊ शकत होते.

घटस्फोटानंतर रेहमने हे सांगितलं की इमरानची इच्छा होती की तिने फक्त चूल पेटवावी म्हणजे एखाद्या पारंपरिक घरगुती बायकोसारखं राहावं, जे तिला मान्य नव्हतं. स्पष्टच आहे की या सगळ्यांमुळे खरोखरंच रेहमच्या महत्वाकांक्षा जागृत होऊ लागल्या होत्या आणि इमरानला हे मान्य नव्हतं.

पती होण्याचा एक फरक

प्रश्न हा आहे की काय पतीकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की ते आपल्या पत्नींच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास अडथळा ठरणार नाहीत. तर याचं उत्तर स्पष्ट आहे ‘नाही.’ कारण पुरुषांचा स्वत:चा अहंकार असतो. तो पत्नीला आपल्यापुढे जाऊन वेगळी ओळख निर्माण करण्याची आणि प्रसिद्ध होण्याची संधी देत नाही. मात्र याबाबत पूर्णपणे त्यालाच दोषी ठरवणंदेखील त्याच्याशी अतिरेकपणाचं ठरेल. जर पती म्हणू शकते की तिनेच का झुकावं आणि तडजोड करावी, तर पतीकडूनही हा हक्क हिरावला जाऊ शकत नाही. प्रश्न संसार आणि मुलांसोबत अघोषित असलेल्या विवाहाच्या नियमांचाही असतो.

१९७३ साली अमिताभ बच्चन आणि जया भादुरीचा चित्रपट ‘अभिमान’देखील बॉक्स ऑफिसवर बराच गाजला होता. या चित्रपटात पती पत्नी दोघेही गायक असतात, पण पत्नीला जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे पती वैतागतो आणि एकमेकांपासून वेगळे होण्याची परिस्थिती निर्माण होते. पत्नी माहेरी निघून जाते आणि गर्भपात झाल्यामुळे दु:खी राहू लागते. मात्र नंतर पती तिची समजूत घालून तिला पुन्हा स्टेजवर आणतो आणि तिच्यासोबत गाणं गातो. पण असं तेव्हाच घडतं, जेव्हा पत्नीने पराभव पत्करलेला असतो.

एका मध्यमवर्गीय पतीचं आपल्या पत्नीचं यश आणि प्रसिद्धी पचवू न शकणं आणि त्यासाठी दु:खी, कुंठित आणि चिडचिडं होणं, या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं. त्याला वाटतं की पत्नी पुढे गेल्यामुळे जग त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. पत्नीमुळे त्याच्या प्रतिभेचं योग्य मूल्यमापन होत नाहीए आणि लोक त्याची चेष्टा करत आहेत. आता एक नजर रीलऐवेजी रियल लाइफवर टाकली, तर इथे अमिताभ प्रसिद्धीच्या अलौकिक उंचीवर होता, हे तर प्रत्येकालाच माहीत आहे की इथे जया भादूरीचे अमिताभसाठी कितपत आणि काय काय त्याग केले आहेत. आपल्या पतीचं बुडणारं करिअर सावरण्यासाठी तिने ‘सिलसिला’ चित्रपटात काम करणंही स्वीकारलं होतं.

खरंतर प्रतिभासंपन्न महत्त्वाकांक्षी पत्नीचा पती कायम हीनभावना आणि कुंठितपणाला बळी पडत असल्याची गोष्ट सामान्य आयुष्यात घडत असल्याचं दिसून येतं. कारण त्याचा कमकुवतपणा दर्शवणारं एक सत्य त्याच्यासमोर उभं ठाकलेलं असतं आणि इथूनच सुरू होतो लढा, द्विधावस्था, चिडचिड आणि कुंठितपणा. पतीला हे चांगल्याप्रकारे माहीत असतं की तो पत्नीपेक्षा मागे आहे आणि हे सत्य सर्वांना कळत आहे. वैवाहिक जीवनाचा हा तो टप्पा असतो जिथे तो आपल्या पत्नीला नाकारू शकत नाही, स्वीकारूही शकत नाही आणि खरंतर पत्नीची यामध्ये काहीच चूक नसते.

एकीकडे यश आणि प्रसिद्धीच्या पायऱ्या चढणाऱ्या पत्नीला पतीचा कुंठितपणा आणि चिंता कळतच नाही आणि ती आपला प्रवास सुरूच ठेवते तर दुसरीकडे पतीला असं वाटतं की ती मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी असं करत आहे. अशावेळी गरज असते ती ‘अभिमान’ चित्रपटातील बिंदू, असराणी आणि डेविडसारख्या शुभचिंतकांची.

जे पतीपत्नीला समजवू शकतील की खरंतर दोघांपैकी चुकीचं कोणीच नाहीए. गरज वास्तविकता स्वीकारण्याची असते, जिथे कोणाचाच अपमान होणार नसतो.

पण असे शुभचिंतक चित्रपटांमध्येच आढळतात. खऱ्या जगात नाही. त्यामुळे पतीचा कुंठीतपणा नैराश्यात बदलू लागतो आणि तो अनेकवेळा क्रूरपणा करू लागतो.

अशा कुंठितपणापासून सुटका मिळवण्यासाठी ही गोष्ट फार गरजेची आहे की पतीने पत्नीची पात्रता आणि श्रेष्ठत्त्व मनापासून स्वीकारावं आणि पत्नीनेही पतीला सतत हे दर्शवून द्यावं की तिने आजवर जे काही मिळवलं आहे ते त्याच्या सहकार्यामुळेच आहे.

यात शंका नाही की महत्त्वाकांक्षी पत्नीचं पहिलं प्राधान्य तिचं आपलं ध्येय असतं, घर संसार, मुलं किंवा पती नाही. पण याचा अर्थ असा नसतो की तिला त्यांची कसलीच काळजी अगर पर्वा नाही. याचा हाच अर्थ असतो की तिला आपली प्रतिभा कळते, आपल्या ध्येयापर्यंत तिला पोहोचता येतं आणि कुठलीच तडजोड करण्यावर तिचा विश्वास नसतो.

लक्षात ठेवा

  • पतीपत्नीमध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा वैवाहिक जीवन आणि संसारासाठी चांगली नसते. म्हणून यापासून दूर राहा. एकमेकांच्या भावना आणि इच्छेचा मान राखल्यानेच ते दोघे त्या सर्व गोष्टी मिळवू शकतात, ज्या त्यांना हव्या आहेत.
  • पत्नीला जर आयुष्यात काही मिळवायचं असेल वा काही बनायचं असेल तर काहीच चुकीचं नाही. हा तिचा हक्क आहे. पण पत्नींनी हेदेखील समजून घ्यावं की त्यांना जे हवं आहे, त्याने त्यांना काय मिळणार आणि यामुळे पतींच्या भावना दुखावत तर नाहीत ना…?
  • पतीचं प्रोत्साहन आणि प्रशंसा मिळाल्याने पत्नीची प्रतिभा आणखीनच उजळून निघते. तिचा विचार पतीला अपमानित करण्याचा नसतो. ही परिस्थिती तेव्हाच येते, जेव्हा पती आतल्या आत जळफळत असतो आणि पत्नीने जे यश मिळवलं असतं त्यातून तो स्वत:ला बाजूला करून टाकतो.
  • पत्नी कमवती असेल, सार्वजनिक आयुष्य जगत असेल तर पतीनेही हीन भावना न बाळगता आपल्या पत्नीवर अभिमान बाळगायला हवा.

नातेबंधनात या ५ चुका टाळा

* प्रतिनिधी

नाते जोडणे अतिशय सोपे आहे पण ते निभावणे कठीण आहे. एका चांगल्या नात्याचा अर्थ केवळ फुल देणे आणि छान छान ठिकाणी डिनर करणे हा नसतो. तशा तर खूप अशा गोष्टी असतात, ज्या केल्याने तुमचे संबंध विस्कटू शकतात. पण अशा काही चुका आहेत, ज्या तुम्ही सिरिअस संबंधांमध्ये चुकूनही करता कामा नये. जर तुम्ही आपल्या नात्याच्या बंधनाला मजबूत बनवू इच्छित असाल तर या ५ चुका अवश्य टाळा.

रोमांसमध्ये कमी

एक वेळ अशी असते की तुम्ही समाधानी असता आणि विसरता की नात्यात प्रेम आणि रोमान्सही आवश्यक आहे. असे मानले जाते की प्रेमाचे प्रदर्शन केले जात नाही तर ते समजून घ्यायचे असते. जर तुम्ही एखाद्यावर खरे प्रेम करत असाल तर तो माणूस स्वत:च तुमचे प्रेम समजून घेईल पण कधी कधी जर तुम्ही आपले प्रेम जाहीर केले तर यामुळे तुमच्या जोडीदाराला एक वेगळाच आनंद मिळेल. तुमच्यासाठी आवश्यक आहे की नात्यात रोमांस येऊ द्या आणि तो कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहा. कधीकधी प्रेम व्यक्त करून आपल्या जोडीदाराला स्पेशल वागणूक द्या.

परफेक्ट जोडीदाराची अपेक्षा

या जगात कोणताच माणूस परफेक्ट नसतो म्हणून ही अपेक्षा करणे अयोग्य आहे. प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराला हिणवायचे आणि त्याच्या चुका काढत बसायचे हे बरोबर नाही. जर त्याच्याकडून एखादी चूक झाली तर त्याला रागावण्याऐवजी समजवा. सतत त्याच्या चुका दाखवल्याने त्याचा आत्मविश्वास कमी होईल. तुम्ही त्याच्याकडून फार अपेक्षा ठेवल्या नाहीत तर अधिक बरे होईल आणि जरी एखादी चूक झालीच तर दुसऱ्यांसमोर त्यांना हटकू नका. याउलट ती आपापसात सोडवा, त्याला त्या सुधारवायच्या पद्धती सांगा जेणेकरून परत अशी चूक होणार नाही.

परिस्थितीला सामोरे जा

खूपदा आपण विचार करतो की एखादा वाद संपवण्यासाठी त्याविषयी न बोललेच बरे. पण बोलल्याशिवाय तुमचे सगळे वाद संपुष्टात येणार नाहीत उलट जास्त वाढू शकतील. जर तुम्हा दोघांमध्ये वाद असतील तर त्यांना सामोरे जा. सामोरे गेल्याने तुमच्यातले वाद नाहीसे होतील. या मतभेदांबाबत आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, दुसऱ्या कोणाला याबद्दल सांगायची चूक करू नका. असे केल्यास लोकांमध्ये तुमचेच हसे होईल. कोणीच तुमच्या समस्यांचे समाधान करणार नाही. उलट तुम्हाला आणखीनच निराश करतील. आरामात बसून एकमेकांशी बोला आणि समस्येचे निराकरण करा.

जास्त बंधनात ठेवू नका

आपल्या नात्याला थोडी स्पेस द्या. जास्त दखल देणंही योग्य नसतं. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्हाला सगळया गोष्टी सोबत कराव्याशा वाटतात, पण नात्याच्या सुरूवातीला हे बरे वाटते. जसं तुम्ही पुढे जाता तसे जास्त एकमेकांसोबत राहणेसुद्धा तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. प्रत्येक माणसाचे आपले असे जीवन असते आणि थोडा खाजगी वेळ तुमचं नातं अधिक बळकट बनवू शकतं.

स्वत:ला आणि आपल्या जोडीदाराला बदलवण्याचा प्रयत्न

कधीही आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी स्वत:ला बदलू नका किंवा मग आपल्या आनंदासाठी जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. जर तुमी प्रेमात असाल तर तुम्ही जशा आहात तशाच त्याला आवडाल आणि तुम्हीसुद्धा त्याला असेच आवडून घ्यायला हवे. जर कोणी तुम्हाला बदलवू पाहात असेल तर त्याचे प्रेम तुमच्यापेक्षा जास्त दिखाव्यावर आहे. प्रेमाचा अर्थ एकमेकांच्या लहानसहान वस्तूंवर प्रेम करणे आहे, प्रत्येक बाबतीत एकमेकांना समजून घेतले पाहिजे.

असे बनवा अतूट नाते

* गरिमा पंकज

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा हनीमूनचा टप्पा आठवणींमध्ये कमी झालेला असतो तेव्हा काही वैवाहिक समस्या डोके वर काढू लागतात. अशा परिस्थितीत हे नाते दृढ करणे आणि वेळेत त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण जोडीदार कमी व रूममेट अधिक वाटू लागतात : लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी अशी वेळ येते जेव्हा आपण रोमँटिक जोडीदार कमी आणि रूममेट्ससारखे वागणे जास्त सुरू करता. आपण दीर्घकाळ दृढ नातेसंबंधात रहावे. यासाठी परस्पर आकर्षण राखणे आवश्यक आहे.

यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कधीकधी रोमँटिक ड्राईव्हवर जा. एकमेकांना सरप्राइज द्या. शारीरिक हालचालींद्वारे वेळोवेळी एकमेकांवर प्रेम व्यक्त करा. आवश्यक असल्यास समुपदेशनासाठी जात रहा.

असे प्रयत्न एकमेकांना जोडून ठेवतात. त्याउलट जर आपण आपले सर्व लक्ष एकमेकांऐवजी आयुष्याशी संबंधित इतर गोष्टींकडे केंद्रित केले तर समजून घ्या की तो दिवस फार दूर नाही जेव्हा आपण जोडीदार कमी, रूममेट अधिक वाटू लागाल.

एकमेकांविषयी कंटाळवाणेपणा : विवाहाच्या बऱ्याच वर्षानंतर, प्रत्येक दिवस आपणास परीकथांप्रमाणे सुंदर जाईल असा विचार करणे निरर्थक आहे. जर आपणास आपल्या विवाहित जीवनाचा कंटाळा येऊ लागला तर याचा अर्थ असा आहे की आपण एकमेकांना गृहीत धरले आहे. आपण नित्याचे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे आणि कोणत्याही प्रकारचे जोखीम घेण्याचे टाळत आहात.

जर आपण लैंगिक संबंध, वृद्धत्व, किंवा अगदी आपला दिनक्रम बदलण्यासंबंधित विषयांवर चर्चा करण्यास संकोच करत असाल तर आपण स्वत:ला बदलणे, प्रत्येक विषयावर बोलणे आणि जीवनात विविधता आणणे महत्त्वाचे आहे.

प्रणय आणि शारिरीक जवळीकतेचा अभाव : बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षानंतर दाम्पत्याचे लैंगिक जीवन कमी होते. याची अनेक कारणे असू शकतात. जसे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न, झोपेचे प्रश्न, मुलांचा जन्म, औषधांचे परिणाम, नात्यातील समस्या इ.लग्नाच्या काही वर्षानंतर असे होणे बऱ्याचदा स्वाभाविक मानले जाते. परंतु जर ही परिस्थिती बराच काळ टिकली आणि अंतर वाढत गेले तर नात्यातील दृढतेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत कधीकधी आपल्या जोडीदाराचे चुंबन घेणे आणि त्यास मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करणे व त्यास शारीरिकरित्या दूर जाऊ न देणे महत्वाचे आहे.

उद्दिष्टयांपासून अंतर : लग्नाच्या १-१५ वर्षानंतर आपल्या मनात असा विचार करून असंतोष उत्पन्न होऊ शकतो की आपण जीवनात कोणतेही विशेष हेतू साध्य करू शकले नाही. जेव्हा आपण लग्न करता तेव्हा जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात. आपला जीवनसाथी आणि मुले आपल्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण बनतात.

लग्नानंतर प्रत्येकाला लहान-मोठे त्याग आणि तडजोडी कराव्या लागतात, ज्यामुळे बऱ्याचदा विशेषत: महिलांना आपले करियर आणि आयुष्याशी संबंधित इतर उद्दीष्टे जसे स्वत:चा व्यवसाय सुरू करणे, प्रवास, मॉडेलिंग किंवा इतर छंदांना वेळ देणे यासारख्या गोष्टींपासून वंचित रहावे लागते. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात जोडपे अनेकदा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कुटुंब वाढविण्यादरम्यान आपल्या स्वप्नांच्या उड्डाणावर निर्बंध घालतात जेणेकरुन विवाहित जीवनात स्थिरता राखता येईल. परंतु १०-१५ वर्षे उलटून गेल्यावर त्यांना वाईट वाटू लागते की त्यांनी आपल्या स्वप्नांपासून स्वत:ला का दूर ठेवले? त्यांना असं वाटतं की जणू आयुष्य परत बोलवत आहे.

सत्य हे आहे की जर जोडप्यांना याबद्दल खऱ्या अर्थाने काही करायचे असेल तर त्यांनी एकत्र येऊन पुढे वाटचाल केली पाहिजे, एकमेकांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.

सहनशक्ती कमी होणे : लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जेव्हा आपला जोडीदार काही अनियमित किंवा त्रासदायक काम करतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जसजसा काळ व्यतीत होतो, बहुतेक जोडीदारांमध्ये संयम राखण्याची आणि एकमेकांच्या चुकांना क्षमा करण्याची प्रवृत्ती कमी होते. सुरुवातीला ते ज्या गोष्टीं हसत टाळत असत आणि नंतर त्याच गोष्टींवर एकमेकांवर रागावू लागतात.

हे महत्वाचे आहे की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जसे आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी दाखवतात, चुकांकडे दुर्लक्ष करतात, त्याचप्रकारे ही प्रवृत्ती नंतरही कायम ठेवली पाहिजे.

लहान-मोठे उत्सव : लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही अगदी लहानाहून लहान प्रसंग साजरे करता. सहा महिन्यांची मॅरिज अॅनिव्हर्सरी असेल किंवा फर्स्ट डेट अॅनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन डे असेल किंवा वाढदिवस उत्सव प्रत्येक प्रसंगासाठी विशेष करण्याचा प्रयत्न करता. पण लग्नाला १०-१२ वर्षे उलटताच उत्सव कमी होत जातात.

प्रत्येक लहान-मोठया खुषीचा आनंद उठवणे महत्त्वाचे आहे. उत्सवाचे कारण बदला परंतु मूड नाही. जसे की कामाची पदोन्नती, मुलाचा वाढदिवस, पदवी प्राप्त करणाऱ्या मुलाचा उत्सव, लग्नाला १० वर्षे उलटल्याचा उत्सव इ. त्यांना टाळण्याचा कधीही प्रयत्न करु नका. असे प्रसंग आपल्या दोघांनाही जवळ आणतील.

आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह गेटटुगेदर करू शकता किंवा मग आपापसातच उत्सव साजरा करू शकता. प्रत्येक प्रसंगाला संस्मरणीय बनवा, हे उत्सव महाग करणारे नाही, तर यात दोघेही आनंद लुटतील हे महत्वाचे आहे. आपले प्रेम साजरे करण्यासाठी कधीकधी लाँग ड्राईव्हवर जा, मैफिलीत भाग घ्या, चित्रपट पहा किंवा घरीच स्पा नाइटचा आनंद घ्या. तारखेला जाणे कधीही थांबवू नका.

मोठ-मोठया इच्छा पूर्ण करण्याचा दबाव : लग्नाला १०-१५ वर्षापर्यंत पोहोचत-पोहोचत जोडपे मोठ-मोठया जबाबदाऱ्यांचे ओझे उचलू लागतात. मोठ-मोठी उद्दिष्टे बनवतात. आपले घर, मुलांचे उच्च शिक्षण अशा अनेक योजना त्यांच्या मनात चालत असतात. ती पूर्ण करण्याच्या धडपडीत आपण आपल्या नात्यावरील आपले लक्ष गमावतो, तथापि अशा परिस्थितीत संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. जर आपण एकमेकांनी मिळून आपल्या योजनांवर कार्य केले तर याने नाते आणखी मजबूत होते आणि लक्ष्यदेखील सहजतेने प्राप्त होते.

कसे बनाल उत्तम जीवनसाथी

* मोनिका अग्रवाल

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात पतीपत्नीमधील प्रेम हरवणे स्वाभाविक आहे. पती-पत्नी दोघेही आपापले काम व जबाबदाऱ्यांमध्ये इतके व्यस्त असतात की आयुष्य एका मशीनसारखे होऊन जाते. आश्चर्याची स्थिती तर तेव्हा होते, जेव्हा लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघे एकमेकांना समजू शकत नाहीत व अंतर वाढत जाते.

देवने जेव्हा आपला नवीन जॉब सुरू केला, तेव्हा बरेच महिने प्रचंड मेहनत केली. रात्रंदिवस फक्त आपल्या जॉबमध्येच बिझी असायचा. रात्री उशिरा घरी येऊ शकायचा. अशात त्याला आपली पत्नी सिमरनची साथ मिळाली नसती, तर कदाचित उद्दिष्ट गाठणे सोपे झाले नसते. सिमरनने केवळ पत्नीच नव्हे, तर एक मैत्रीण बनून त्याच्या प्रत्येक पावलावर व प्रत्येक निर्णयात त्याची सोबत केली.

सपोर्टिव्हही असावे : साधारणपणे बायका विचार करतात की नवऱ्याला बायकोचे रूप, शृंगार, वस्त्रे, प्रेम व गोड शब्द आवडतात, परंतु त्यांना फक्त याच गोष्टी आवडतात का? निर्विवादपणे, एक पती आपल्या पत्नीच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच साजशृंगार व शालीनतेचादेखील चाहता असावा, परंतु सोबतच तो पत्नीचा साधेपणा, अनुकूलता, गहिरे प्रेम व साथ निभावण्याचे गुणही पसंत करतो. तो इच्छितो की त्याची जीवनाची सोबतीण फक्त नावाचीच सोबतीण नसावी, तर समजूतदार, भावना समजणारी, त्याच्या सुख-दु:खात साथ देणारी, सपोर्टिव्हसुद्धा असावी.

खोटेपणा नव्हे गहनता असावी : पती-पत्नीचे नाते तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा दोघांमध्ये आपलेपणा असतो, खोटेपणा नव्हे. पतिला हे जाणवले पाहिजे की त्याची पत्नी जीवनाच्या प्रत्येक अडचणीत त्याची सोबत करेल. पत्नीची प्रेमपूर्ण साथ, त्याच्या गरजांना समजण्याची शक्ती व विश्वासच पतिचा आधार असतो, ज्याच्या बळावर तो जगातील साऱ्या अडचणींचा सामना आरामात करू शकतो.

आपसातील समजूतदारपणा : या नात्यात आपसातील समजूतदारपणा व विश्वास खूप गरजेचा आहे. एका पत्नीचीही हीच इच्छा असते की पतिने तिच्या भावना समजून घ्याव्यात व असा आधार बना, ज्याच्यासोबत ती जगातील प्रत्येक आव्हानाचा सामना करू शकेल. परंतु हे एकतर्फी नसावं, समजूतदारपणा फक्त पत्नीच दाखवेल, तर ताळमेळ बिघडेल. त्यामुळे एकमेकांसोबत पावलाशी पाऊल मिळवून चालावे व जीवनातील सगळया अडचणींचा भार उतरवून फेकावा.

गरजा समजून घ्या : पुष्कळ पती-पत्नी वर्षानुवर्षे एकमेकांच्या गरजा व भावना ओळखू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या दरम्यानचे अंतर वाढू लागते. एकाच छताखाली राहूनदेखील ते एकमेकांसाठी अनोळखी होऊन राहतात. मानसिकरित्या त्रस्त राहतात.

जर तुम्ही पतिचा जीवनसाठी बनू इच्छिता, तर पतिची आवड-निवड लक्षात ठेवा. यात तुम्ही फक्त आहार वा पेहरावापुरत्या मर्यादित नाही ना मी ज्या आवडीनिवडीबद्दल बोलतेय, ती आहे पॅशन व विचार यांची. पॅशन पूर्ण करण्यात त्यांचा सहकारी बना, जसे की जर ते लेखक आहेत, तर त्यांच्या लेखणीला काही नवे लिहिण्याची शक्ती तुमच्याकडून मिळायला हवी.

जर त्यांना क्रिकेट खेळ आवडतो तर तुम्हीही त्यात रस घ्या व जेव्हा ते दौऱ्यावर असतील, तेव्हा वेळोवेळी त्यांना स्कोर अपडेट करा. विश्वास ठेवा, यामुळे तुमच्या दोघांमध्ये विश्वास वाढेल व जीवन सुखी होईल. त्यांच्या श्रीमंत असण्याचे दरवेळी प्रदर्शन करू नका वा कमी पगार असेल तर अगदी असंतोष वा चेष्टाही करू नका.

रिकामेपण भरून काढा : सांगण्याचा अर्थ असा, की आपल्या पतिच्या जीवनाचे रिकामंपण भरून काढा. तुमचं खरं प्रेम व सोबत त्यांच्या जीवनातील प्रत्येक कमतरता पूर्ण करेल. यातच जीवनाचा आनंद आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर चांगलेवाईट दिवस येत जात राहतात. एकमेकांवरील विश्वास कठीण परिस्थितीतदेखील हरू देणार नाही.

अनौपचारिक असावा आनंद : जीवनसाथी सोबत दु:ख वाटून घेतल्याने जितकं हलकं वाटतं, त्यापेक्षा कितीतरी आनंद त्याच्यासोबत आपलं हास्य वाटून घेतल्यानं मिळतं. जर तुमच्याकडे एक उत्तम लाइफपार्टनरची सोबत आहे, तर मग जीवनातील प्रत्येक लहानातील लहान आनंदातही तुम्ही खूपच अनौपचारिकपणे उत्साहाने हसाल.

एकमेकांकडून शिकू शकता : जर तुमच्या जीवनात एक चांगली महिला पत्नीच्या रुपात येते, तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे, कारण तुम्ही तिच्याकडून पुष्कळ काही शिकू शकता. तुम्ही दोघे एकमेकांशी मोकळे राहाल. यामुळे तुमच्या दोघांमध्ये चांगले कम्युनिकेशन राहू शकेल ज्यायोगे तुम्ही दोघे एकमेकांकडून पुष्कळ काही शिकू व समजू शकता.

दोन शरीरे एक मन : पतिपत्नीला उगाच दोन शरीरे एक मन म्हटले जात नाही. एक खरी व प्रेमळ महिला जेव्हा एखाद्या पुरुषाच्या जीवनात येते, तेव्हा ती नेहमी हेच इच्छिते की तिचा जीवनसाथीची कायम प्रगती व्हावी. तुमच्या जीवनसाथीमध्येदेखील असेच गुण असतील, तर स्पष्टच आहे की तुम्हा दोघांच्या जीवनाचे उद्दिष्ट वेगवेगळे नसूव एकच असेल.

दोन मिनिट नुडल्सवाले प्रेम तर बाह्यप्रदर्शनासाठी चालू शकते, परंतू जीवन त्याच व्यक्तिसोबत आनंदाने व्यतीत होते, ज्यात हे सारे गुण आहेत. असे गुण फक्त मुलांसाठीच नव्हेत, तर मुलींसाठीही गरजेचे आहेत. नात्याची दोन्ही चाके बरोबर असतील तरच नात्याची गाडी दूरवर चालेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें