* किरण बाला

कोणत्याही मुलीच्या आयुष्यात सर्वात मोठा आनंदी क्षण म्हणजे तिचं लग्न...लग्नामुळे तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. जर एखाद्या मुलाशी लग्न करण्यापूर्वी सर्व बाबींचा गंभीरपणे आणि शांतपणे विचार केला नाही तर लग्नानंतर मात्र पश्तात्ताप करण्याची वेळ येते. अशात एक तर तिला आयुष्यभर कुढतकुढत जगावं लागतं किंवा मग तिच्यावर घटस्फोटाची तरी वेळ येते. या दोन्ही परिस्थिती तिच्या बाजूने नसतात. अशात जर कोणत्याही नात्याला होकार देण्यापूर्वी स्वत: मुलीनेच काही विशेष गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तिला लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही आणि तिचं आयुष्यही आनंदी व सुखी ठरेल.

काही विशेष मुद्दयांवर लग्नापूर्वी चर्चा करून घेणं तुमच्या हिताचंच ठरेल. कारण दाम्पत्याचा पाया हा याच मुद्दयांवर टिकून असतो आणि वादविवाद व घटस्फोटदेखील याच गोष्टींवरून होतात.

* लग्न हे लहान मुलांचा किंवा बाहुल्यांचा खेळ नव्हे. म्हणून लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याची भेट घेणं फार जरुरी आहे, जेणेकरून दोघांनाही एकमेकांचे विचार कळतील. तुम्हाला जर असं वाटत असेल की समोरच्या माणसामध्ये ती वैशिष्ट्य किंवा गुण नाहीत जे तुम्हाला हवे आहेत, तर नंतर पस्तावण्यापेक्षा तुम्ही त्याच्याशी लग्न न करणंच चांगलं ठरेल. कारण लग्नापूर्वीच जर तुम्ही वेगळे झालात तर निदान तुमच्यावर घटस्फोटित असण्याचा ठपका तरी लागणार नाही.

* लग्नापूर्वी तुम्ही मुलाकडून त्याच्या भविष्याच्या योजनांबद्दलही जाणून घ्या. तसंच त्याला हेदेखील सांगा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे. जर समोरची व्यक्ती तुम्हाला हवी तशी असेल, तरच लग्न करा.

* बऱ्याचदा असं दिसून येतं की मुलगी आणि तिचे कुटुंबीय कोणीच तिच्या करिअर प्लॅनिंगबद्दल सांगत नाहीत, की ती लग्नानंतर नोकरी करणार की नाही. तिला जर आपलं करिअर सोडायचं नसेल किंवा नोकरी करायची असेल, तर ही गोष्ट तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सांगायला पाहिजे. म्हणजे लग्नानंतर ते तिला नोकरी करण्यास अडवणार नाहीत. त्याचबरोबर जर ती वर्तमानकाळात नोकरी करत असेल आणि लग्नानंतर तिला नोकरी करायची नसेल, तरीदेखील तिने तिची इच्छा लग्नाआधीच व्यक्त करावी. नाहीतर लग्नानंतर ते नोकरी करण्यासाठी जोरही देऊ शकतात. नोकरी करणं किंवा न करणं याबाबत लग्नानंतर कसला वाद होऊ नये, म्हणून आपल्या करिअरचं प्लॅनिंग आधीच सांगणं फार गरजेचं आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...