मधुमेह : नियंत्रण शक्य आहे

* डॉ. मीना छाबडा

असा अंदाज वर्तवला जात आहे की २०३० पर्यंत डायबिटीज मॅलिटस भारताच्या ७.९४ कोटी लोकांना प्रभावित करू शकतं, तर चीनमधील ४.२३ कोटी लोक आणि अमेरिकेतील ३.०३ कोटी लोक या रोगांच्या कचाट्यात सापडतील. अशी अनेक कारणे आहेत जे देशभरातील लोकांध्ये या रोगासाठी जबाबदार आहेत.

मधुमेहग्रस्त लोक मनामध्ये हा संशय घेऊन जगू लागतात की पुढे त्यांचे डोळे जातील किंवा त्यांचा पाय कापावा लागू शकतो वा किडनी फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

तरुणांमध्ये वाढतं प्रकरण

भारतात २२ ते ३० वयोमर्यादा असलेल्या तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ज्यांच्यामध्ये भरपूर उर्जा आणि रचना करण्याची क्षमता आहे. पण तरुण ज्या जीवनपद्धतींचा अवलंब करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अनेक रोगांचा वाईट प्रभाव पडू लागला आहे.

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जाऊ लागलं आहे. खरंतर अलीकडचे तरुण आरोग्यवर्धक नसलेल्या आहाराच्या सवयीमुळे लठ्ठपणाला बळी पडू लागले आहेत. जे डायबिटीज आणि इतर कार्डियोवॅस्क्युलर समस्यांचं मुख्य कारण आहे. पूर्वी हा रोग ४० ते ४५ वयोमर्यादा असलेल्या लोकांना व्हायचा, पण आता तर हा रोग २२ ते २५ वर्षांच्या तरुणांनाही होऊ लागला आहे.

संसर्गाचा धोका

जरासं कापल्यानेदखील त्वचेमध्ये होणाऱ्या भयंकर संसर्गाला सॅल्युलायटिस म्हटलं जातं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या त्वचेच्या बाबतीत तुम्ही अधिक सावधगिरी बाळगा, कारण ब्लड ग्लूकोज लेव्हल जास्त असल्यास संसर्गाची अधिक असते.

सॅल्यूलायटिस एक गंभीर संसर्ग आहे, जो त्वचेच्या आतमध्ये पसरतो आणि त्वचा व त्याच्या अंतर्गत चरबीला प्रभावित करतो. लोक बऱ्याचदा सॅल्यूलायटिसला सॅल्यूलाइट समजतात. पण खरंतर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सॅल्यूलायटिज चरबीच्या आतला थर डर्मीज आणि त्वचेच्या आतल्या टिश्यूचा एक जंतूसंसर्ग असतो तर सॅल्यूलाइट त्वचेच्या आतमध्ये चरबी साचल्यामुळे होतो, जे दिसायला संत्र्यांच्या सालीसारखं दिसतं. सॅल्यूलायटिसचा सर्वात मोठा अपाय म्हणजे हा योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यास फार वेगाने पसरतो.

सॅल्यूलायटिसपासून संरक्षण

* त्वचेला अपाय करणारं कठिण आणि अधिक कार्य करणं टाळा. असं काम निवडा ज्याने तुम्हाला जास्त थकवा येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड शुगरचा योग्य स्तर टिकवून ठेवा. ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा हा अर्थ आहे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच कमी असेल आणि अशावेळी जखम भरण्यास अडथळा येईल.

* कमी कार्बोहायडे्रट असलेल्या आहाराचं सेवन करा आणि फायबरयुक्त फळांचं भरपूर सेवन करा. तुम्ही आपल्यासोबत ग्लूकोज टेस्ट मीटर ठेवल्यानेदेखील तुम्हाला त्याच्या वृद्धिवर नजर ठेवण्यास मदत होईल.

*  तुम्ही जर सॅल्यूलायटिसच्या ज्ञात असलेल्या लहानात लहान रिस्क फॅक्टरच्या कचाट्यात असाल, तर दररोज आपल्या पायांवर नजर ठेवा. जखमेवरही पूर्ण लक्ष द्या. त्चचेची सूज, लालसरपण यासारख्या लक्षणांवरही लक्ष ठेवा.

* जखम नीट करण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्या. लक्षात ठेवा नियंत्रित तपासणीच्या अभावात लहानशी जखमही सॅल्यूलायटिसच कारण ठरू शकते. जखम असलेला भाग चांगल्याप्रकारे स्वच्छ ठेवा जेणेकरून तिथे पाणी लागू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जखमेवर ड्रेसिंग करा आणि प्रत्येक वेळेस स्वच्छ ड्रेसिंगचाच वापर करा.

असं केल्यास तुम्ही मधुमेह असूनसुद्धा सुदृढ व्यक्तिसारखं जीवन जगू शकता. जीवनपद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही तुमची ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रित ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हालाच स्वस्थ वाटेल.

११ अँटी एजिंग फूड

* नसीम

वयाच्या चाळीशीनंतर चेहरा आणि हातापायांवर पडणाऱ्या सुरकुत्या, डोळयांखालची काळी वर्तुळे, पांढरे केस, ढिले पडलेले शरीर, कामवासना कमी होणे, सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, तणाव तुम्हाला वेगाने वृद्धापकाळाकडे घेऊन जातात. अशावेळी वाढते वय रोखण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरू लागता. एनर्जी ड्रिंक पिऊ लागता. व्हिटॅमिनच्या गोळया खाऊ लागता. तरीही वाढणारे वय थांबत नाही आणि त्याच्या खुणाही लपत नाहीत.

पण आता नवीन वर्ष…नवी सकाळ…नवा विचार… आणि स्वत:च स्वत:शी केलेला 2021चा नवा पहिला संकल्प की यावर्षी आपण वाढत्या वयाचा वेग नक्की थांबवू. होय, आम्ही मस्करी करीत नाही तर हे शक्य आहे. फक्त तुम्ही संकल्प करण्याची गरज आहे. वाढत्या वयाला रोखता येईल, पण कुठल्याही महाग क्रीम, लोशन किंवा एनर्जी टॉनिकने नाही तर, त्या गोष्टींनी ज्या तुमच्या किचनमध्ये नेहमीच असतात. या त्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपले ऋषीमुनी निरोगी, आनंदी आणि १०० वर्षांहूनही अधिक दीर्घायुष्य जगत होते. होय, आम्ही अँटी एजिंग फूडबद्दलच बोलत आहोत.

आरोग्यासाठी खाण्याच्या निरोगी सवयींचा अवलंब करून त्याचा परिणाम यावर्षी तुम्ही तुमची त्वचा, शरीर आणि चेहऱ्यावर पाहू शकाल. नवीन वर्षात जर तुम्ही अँटी एजिंग फूडला आपलेसे केले तर आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही जास्त वय होऊनही सुंदर आणि तरुण दिसाल, शिवाय म्हातारपणातले रोग म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहाल.

1. अंडे : अंडयात व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते, जे वाढत्या वयाचा वेग कमी करते. नियमित दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील हानी पोहोचलेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी पुरेशी चरबी आणि प्रथिने मिळतात. म्हणून, आजपासून नाश्ता करताना दोन अंडी नक्की खा.

2. सोया : सोयाबीन, सोया पीठ, सोया दूध आणि टोफूमध्ये कमी फॅट आणि कॅल्शियम असते. सोया उत्पादनांमुळे शरीर सुदृढ आणि निरोगी होते. शिवाय याच्या वापरामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो.

3. डाळिंब : डाळिंब वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून शरीराच्या डीएनएमध्ये ऑक्सिडेशन कमी करते. हे खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होते. दररोज एक डाळिंब खाल्ल्यास तुमच्या सौंदर्यात भर पडेल.

4. ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात. ही तुमची पाचक प्रणालीही निरोगी ठेवते, म्हणून जर तुम्हाला वयापेक्षा लहान दिसायचे असेल तर दिवसभरातून दोन कप ग्रीन टी नक्की प्या.

5. आंबट आणि पिवळी फळे : संत्री, मोसंबी, द्राक्षे, लिंबू ही अशी फळे आहेत, ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यातून बायोफ्लेव्होनॉइड्स आणि लायमोनीनही मिळते. हे दोन्ही घटक कर्करोगास कारणीभूत कार्सिनोजन्स उत्सर्जित करतात. सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात, म्हणून आजपासून यांचा आहारात समावेश करा. सकाळी लिंबूपाणी आणि दुपारच्या जेवणानंतर एक संत्र किंवा मोसंबी नक्की खा.

6. ब्लूबेरी : हे काहीसे महागडे फळ आहे, परंतु त्यात बरीच महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि पॉलिफेनॉल आढळून येतात. ज्यामुळे वाढत्या वयाचा वेग मंदावतो, शिवाय कॅन्सर आणि मधुमेहासारखे आजारही होऊ शकत नाहीत. म्हणूनच दिवसभराच्या आहारात ब्लूबेरीचा अवश्य समावेश करा.

7. दही : दह्यात लाइव्ह बॅक्टेरिया असतात, जे पचनास मदत करतात. कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याने दही ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांना कमकुवत आणि पोकळ होण्यापासून रक्षण करते. सोबतच हे त्वचेला चमकदार आणि तरूण बनविण्यास मदत करते.

8. मोड आलेली कडधान्ये : ही खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. यात आढळणारे बीटा कॅरोटीन, आइसोथियोसायनेट्ससारखे घटक कॅन्सरपासून दूर ठेवतात. हे नियमित खाल्ल्याने माणूस आयुष्यभर तरूण आणि उत्साही दिसतो.

9. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीत फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वाढत्या वयाला थोपवून ठेवतात.

10. टोमॅटो आणि टरबूज : टोमॅटो आणि कलिंगड हे लाइकोपेनचे समृद्ध स्रोत आहेत. लाइकोपेन कॅन्सर होण्याची शक्यता कमी करते. टोमॅटोचा रस आणि कच्चे टोमॅटोदेखील प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

11. सुकामेवा : सुकामेवा किंवा नट्समध्ये आरोग्यवर्धक फॅट्स असतात. यामुळे इलास्टिन आणि कोलेजनचे फायदे मिळतात, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात. मूठभर सुकामेवा रोज खाल्ल्याने शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्स मिळतात. यात भरपूर कॅलरी असते, त्यामुळेच सुकामेवा कमी खा असा सल्ला दिला जातो. दोन पिस्ता, चार बदाम, दोन काजू आणि एक अक्रोड हा दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम नाश्ता आहे.

मद्यपान बिघडवतेय महिलांचे स्वास्थ्य

* गरिमा पंकज

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाची एक महिला पायलट आणि क्रूच्या एक सदस्य यांना ‘प्रीफ्लाइट अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल झाल्यामुळे शिक्षा म्हणून ३ महिन्यासाठी ग्राउंड ड्युटीवर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण डायरेक्टर जनरल

ऑफ सिव्हिल एव्हिएशनपर्यंत पोहोचले, कारण एअरक्राफ्ट रूल्सनुसार क्रू मेंबर्सना फ्लाइटच्या आधी १२ तास अल्कोहोल सेवनास परवानगी नाही.

याच प्रकारे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या प्रीती नावाच्या एका ३६ वर्षीय महिलेने दारूच्या नशेत गाडीने ५ मजुरांना चिरडले होते. ही घटना सकाळी ११.३० ला घडली होती. प्रीती कारमध्ये एकटी होती. हरियाणा हायवेवर काम करणाऱ्या ५ मजुरांना तिने धडक दिली होती, ज्यातील २ जण तर जागच्या जागीच ठार झाले होते.

अशा कितीतरी घटना दररोज घडतच असतात, ज्यात दारूच्या नशेत महिला स्वत:चेच नुकसान करून घेतात. गोष्ट फक्त दुर्घटना आणि इमेज खराब होणे एवढीच मर्यादित नसून दारू पिण्याची किंमत अनेकदा त्यांना आपले सर्वस्व गमावूनही चुकवावी लागते.

सर्वसाधारणपणे जेव्हा दारू पिण्याची गोष्ट असते, तेव्हा भारतासकट सर्व दुनियेतील महिला पुरुषांवर आरोप करतात, परंतु सत्य हे आहे की महिलाही आता मोठया संख्येने या व्यसनाच्या शिकार होऊ लागल्या आहेत.

हल्लीच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंटद्वारे सादर केलेल्या ग्लोबल रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे की भारतात मद्य सेवनाचे प्रमाण गेल्या २० वर्षांत ५५ टक्क्यांनी वाढले आहे. मद्य सेवनाच्या दृष्टिकोनातून ४० देशांच्या सूचीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. महिलांमध्ये याचे प्रमाण वाढते आहे. सर्वेक्षणांनुसार गेल्या १० वर्षांत आपल्या देशातील मद्य सेवन करणाऱ्या महिलांची संख्या ही जवळ जवळ दुप्पट झाली आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अलीकडच्याच रिपोर्टनुसार भारतात जवळ जवळ ११ टक्के महिला मद्यसेवन करतात.

सध्या परिस्थिती अशी आहे की काही महिला या दारूला प्रतिष्ठा आणि स्वतंत्रतेशी जोडतात. जर त्यांना दारू पिण्यापासून रोखले गेले तर त्या याला संकुचित रूढीवादी विचारसरणी आणि महिलांविषयी जाणूनबुजून केलेला कट आहे असे म्हणून तमाशा करतात. दारू पिऊन त्या स्वत:ला स्वतंत्र आणि आधुनिक समजू लागतात.

महिलांसाठी अधिक घातक असते दारू

मधाचे सेवन हे पुरुष आणि महिला या दोघांसाठीही घातकच असते, पण महिलांच्या शारीरिक रचनेमुळे पुरुषांच्या तुलनेत दारूमुळे महिलांचे अधिक नुकसान होते.

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टर इंदू अग्रवाल सांगतात की महिला या दारूच्या प्रभावाविषयी अधिक संवेदनशील असतात. योग्य प्रमाणात दारूचे सेवन करूनही महिलांच्या रक्तात त्याचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत अधिक होतो. महिलांवर एकसमान ड्रिंक घेण्याचा प्रभाव हा पुरुषांच्या तुलनेत दुप्पट असतो. याची अनेक जैववैज्ञानिक कारणे आहेत :

शरीरातले फॅट : महिलांचे वजन हे पुरुषांच्या तुलनेत कमी असते आणि पुरुषांसमान वजन असलेल्या एका महिलेच्या शरीरात पाणी कमी आणि ज्यादा फॅटी टिश्यू असतात. जिथे पाणी दारूचे घनत्व घटवते, म्हणूनच महिलांच्या शरीरात दारूचे घनत्व अधिक काळपर्यंत आणि अधिक मात्रेत राहते.

एंजाइम : महिलांमध्ये एंजाइमचा स्तर कमी असतो. जो आमाशय आणि यकृतात दारूला मेटाबोलाइझ करू शकेल. परिणामी महिलांच्या रक्तात दारूचे प्रमाण वाढते.

हार्मोन : मासिकचक्राच्या वेळी हार्मोनमधील बदलांमुळे महिलांद्वारे अल्कोहोल मेटाबोलाइझ करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो.

मद्य सेवनाचे परिणाम

मद्य सेवनाने शारीरिक स्वास्थ्यच नाही तर मानसिक आरोग्यही बिघडते. ज्याचा परिणाम व्यक्तिच्या वैयक्तिक तसेच प्रोफेशनल जीवनावरही होऊ लागतो.

शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम

लिव्हर डिसीज : जे लोक सतत जास्त प्रमाणात दारूचे सेवन करतात, त्यांना लिव्हरला सूज आणि लिव्हर सोरायसिस अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. जर यांचा वेळीच उपचार केला गेला नाही तर लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकते. ज्यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात येते.

रक्तदाब वाढणे : दारूच्या सेवनाने रक्तदाब वाढतो. महिलांमध्ये दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या रक्तदाबाचा धोका पुरुषांच्या दुप्पट असतो.

थकवा : जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्याने व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा येऊ लागतो. चक्कर येणे, गोंधळून जाणे अशा समस्या उद्भवू शकतात.

लठ्ठपणा : दारू शरीरातील लेप्टीनचा स्तर कमी करते. हा भूकेवर नियंत्रण करणारा हार्मोन आहे. याचा स्तर कमी झाल्याने भूक जास्त लागते, ज्यामुळे कॅलरीचा इनटेक अधिक होऊन लठ्ठपणा वाढतो. दारू प्यायल्यावर असे पदार्थ खायची इच्छा होते, ज्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका अधिकच वाढतो.

नववर्षाचा फिटनेस फॉर्म्युला

* आरुषी वर्मा

‘‘नवीन वर्षात मला फिट दिसायचे आहे आणि यासाठी मला ५ किलो वजन कमी करायचे आहे,’’ किंवा ‘‘मला आपला हरवलेला फिटनेस परत मिळवून तो मेंटेन ठेवायचा आहे,’’ अशाप्रकारचे काही संकल्प तुम्हीसुद्धा केले असतील. असेही होऊ शकते की तुमच्यापैकी काही लोकांनी लवकर फिट होण्याच्या नादात शॉर्टकट घ्यायला सुरुवातही केली असेल.

तुमच्यासाठी हे जाणून घेणे जरुरी आहे की हे सर्व प्रयत्न लाँग टर्मसाठी चांगले नाहीत. त्यामुळे समंजसपणे वजन कमी करण्याचे असे प्रयत्न करा की ज्यात सातत्याने तुमचे वजन घटत राहील. झुंबा आणि वेट लिफ्टिंग व्यायाम तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन सिद्ध होईल.

झुंबा आहे जबरदस्त

झुंबासाठीही अनेक लोक जिमला जाणे पसंत करतात. परंतु जिमच्या उपकरणांवर आणि मशीनवर त्याच त्या पारंपरिक पद्धतीने वर्कआउट करणे फिटनेस प्रेमींमध्ये मोठया प्रमाणावर कंटाळवाणे ठरते. आता त्यांना आपले फिटनेस लक्ष्य गाठायला काहीतरी विविधता, उत्साह आणि मनोरंजन असलेले असे एखादे टेक्निक हवे असते.

झुंबाचा आविष्कार ९०च्या दशकात एक फिटनेस प्रशिक्षक अल्बर्टो बेटो पेरेज यांनी केला. हा ऊर्जेने परिपूर्ण असा एरोबिक फिटनेस प्रोग्रॅम आहे, जो दक्षिणी अमेरिकी डान्स शैलीपासून प्रेरित आहे. यात आपल्या पायांच्या पंज्यावर उभे राहून हिपहॉप आणि सालसाच्या मस्तीभऱ्या बिट्सवर आपली बॉडी मूव्ह करायची असते. उत्साह आणि फिटनेस यासाठी केला जाणारा झुंबा हा मुख्यत्वे ग्रुपने केला जातो.

झुंबा हा वेगाने केला जाणारा डान्स प्रकार असल्याने हा ट्रेडमिलवर धावणे किंवा क्रॉस ट्रेनरवर वेळ घालवणे अशा वर्कआउटपेक्षा वेगाने फॅट बर्न करतो.

लवचिकपणा वाढतो : झुंबा एक कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज आहे, जी वेगात आणि मध्यम अशा गतीने केली जाते आणि इंटरवेल ट्रेनिंगसारखे काम करते. त्यामुळे प्रत्येक मांसपेशी खासकरून पोट आणि पाठ यावर अधिक परिणामकारक ठरते. झुंबाचे परिणाम एवढेच सीमित नसून ताकदीने परिपूर्ण असलेल्या या वर्कआउटचा दुसरा फायदा हा आहे की हा सगळया मांसपेशींना सक्रिय करतो आणि पूर्ण शरीराला फिट राखायला मदत करतो. फिट राहण्यासाठी ५ ते ६५ वर्षांपर्यंत कोणीही व्यक्ती झुंबा करू शकतो.

वेट ट्रेनिंग

वेट ट्रेनिंग हेसुद्धा वजन कमी करण्याचे एक अन्य प्रभावी असे वर्कआउट आहे, जे परंपरागतरित्या बॉडी बिल्डर्समध्ये लोकप्रिय राहिलेले आहे. आश्चर्य वाटतंय? आपल्यापैकी बहुतेक लोकांचा असा समज असतो की वेट ट्रेनिंग हे फक्त मसल्स बनवण्यासाठीच योग्य असते. हेच कारण आहे की वजन कमी करू पाहणारे वेट ट्रेनिंगला प्राधान्य देत नाहीत आणि ते सोडून कार्डिओ आणि कॅलिस्थेनिक्स करतात.

वेट लिफ्टिंग शरीराच्या बळकटिसह वजन कमी करण्याचा एक महत्त्वपूर्ण व्यायाम आहे. परंपरागत रूपात स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सहनशक्ती आणि मांसपेशी मजबूत करण्यासाठी फ्री वेट किंवा वेट मशीनचा वापर केला जात आहे. मेटाबोलिक स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये उच्च तीव्रतेचे इंटरवेल सर्किट्स आणि चेंजिंग कॉम्बिनेशन्ससह फ्री वेट्स, कॅटलबेल्स, डंबेल्स इ. चा वापर करत रिपीट करायचे असते.

वर्कआउट दरम्यान रेजिस्टन्स बँड्स मेटॅबॉलिझम रेट वाढवतात. कार्डिओ ट्रेनिंगमध्ये फक्त वर्कआउटच्या दरम्यान हृदय आणि फुफ्फुसांची क्षमता वाढून कॅलरीज बर्न होतात, याउलट वेट ट्रेनिंगमध्ये व्यायाम संपल्यानंतरही ७२ तासांपर्यंत कॅलरी बर्निंग सुरू राहते.

वजन कमी मजबूतीची हमी : वेट लिफ्टिंगचे फायदे केवळ वजन कमी करण्यापर्यंत सीमित नाहीत. वेट ट्रेनिंग हे बॉडी मसल्स बनवण्यासाठी आणि हाडांची घनता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण मिळते. दररोज वेट लिफ्टिंग केल्याने डायबिटीसचा धोका कमी होतो आणि यामुळे पाठदुखीतही आराम मिळतो. मानसिक स्वास्थ्यही वाढते.

त्यामुळे शरीराच्या मजबुतीसाठी भलेही फिटनेसच्या धुंदीत तुम्ही झुंबा निवडा किंवा वेट ट्रेनिंग, हे दोन्हीही वर्कआउट्स तुमचे फिटनेसचे ध्येय गाठायला तुम्हाला मदत करतील. तुम्हाला वजन कमी करायचे असो किंवा मांसपेशींची मजबुती, झुंबा आणि वेट लिफ्टिंग हे दोन्हीही उत्तम मार्ग आहेत. तर मग तुम्ही घाम गाळायला तयार आहात का?

फोन मेनिया

* दीपिका

ही दिवसभरातील १५-१६ तास फोनवरच असता का? तसंच तुम्ही सकाळ होताच व्हाट्सऐप वा फेसबुक चेक करू लागता का? तुम्हाला सतत तुमच्या फोनची घंटी वाजतेय असं वाटत राहतं आणि जेव्हा तुम्ही फोन चेक करता तेव्हा फोन आलेला नसतो. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर बदला, कारण तुम्ही जर असेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेळ घालवत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ लागतात. उदाहणार्थ, तुम्ही जर फेसबुक, ट्व्टिर वा व्हॉटसऐपवर दिवसभर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला डिप्रेशन, पाठदुखी, डोळ्यांचे त्रास इत्यादी समस्यांशी सामना करावा लागेल.

चला तुम्हाला सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान यांची ओळख करून देऊया :

प्रत्येक गोष्ट सहजसोपी

फेसबुक असो वा मग व्हॉटसऐप यामुळे लोक एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. तुमचा एखादा मित्र वा नातेवाइक सातासमुद्रापलिकडे राहत असेल तर तुम्ही फेसबुक वा मग इतर नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू शकता. चौकशी करू शकता. तुम्ही फ्रीमध्ये परदेशात राहणाऱ्यांशी गप्पा मारू शकता. जरा आठवा, जेव्हा परदेशात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी ४० ते ५० रुपये प्रति मिनिट खर्च करावे लागत होते. परंतु आता सोशल नेटवर्किंगने प्रत्येक गोष्ट सहजसोपी झालीय.

नेटवर्किंग साइट्स बिनेसचा अड्डा

अलीकडे हा ट्रेण्ड खूपच पहायला मिळतोय. बिझनेसमन आपल्या प्रोडक्ट्सची डिटेल्स फेसबुकवर टाकतात वा फेसबुकवर स्वत:चं पेज बनवतात. एखाद्याला जर प्रोडक्ट्स आवडले तर ते खरेदी करतात, ज्याचा फायदा बिझनेसमनला मिळतो. सोशल नेटवर्किंग साइट्सचा जर विचारपूर्वक विचार केला तर यापासून मोठा फायदादेखील होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्या अलीकडे फेसबुक वा मग ट्विटरवर जाहिरातींच्या माध्यमातून बराच पैसा कमावत आहेत.

माहिती देण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ

जर एखादी माहिती वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असाल तर सोशल नेटवर्किंग तुमच्यासाठी सर्वोत्तम मंच ठरू शकतो. अलीकडे लोकांना आपली समस्या वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकतात, ज्यामुळे गोष्ट वणव्यासारखी पसरते आणि त्यांना लोकांकडून त्वरित प्रतिक्रियादेखील मिळत राहतात.

केवळ फायदेशीर नाहीत या नेटवर्किंग साईट्स, यांचे काही तोटेदेखील आहेत. या, आता तुम्हाला सोशल नेटवर्किंग साइट्सने होणाऱ्या तोट्यांबद्दलही सांगतो.

प्रायव्हसी राहत नाही

अनेकदा लोक सकाळी उठताच फोनचा चेहरा पाहतात. दिवसभर फोनवर गप्पा मारूनदेखील रात्रीदेखील फोनवर असतात. कधी फेसबुक चेक करतात, तर कधी व्हॉट्सऐप. सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रायव्हसी अशी राहतच नाही. कोणीही,  कधीही आपल्याबद्दल सर्च करू शकतो. जसं की आपण काय करतो? कुठे राहतो? कोण कोण आपल्याजवळ आहे? हे योग्य आहे का? स्वत: विचार करा आणि ठरवा. नेटवर्किंग साइट्सवर एवढी माहिती टाकणं योग्य आहे का?

आजारपणाला आमंत्रण

एका रिसर्चनुसार सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करणारे कमीत कमी १६-१७ तास त्यातच घालवतात. रात्रीच्यावेळी अंधारात फोनवर चॅट करतात. कायम ऑनलाइन राहतात. कमीत कमी दर १०-१५ मिनिचांनी आपला फोन वारंवार चेक करतात, ज्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. काळोखात जेव्हा फोनचा वापर केला जातो, तेव्हा आपली पाहण्याची क्षमता कमी होते. दिवसभर सिस्टमवर फेसबुक खोलून बसून राहिल्याने वा स्काइपवर व्हिडिओ चॅट करत राहिल्याने पाठीच्या कण्यात फरक पडतो. सतत फोनचा वापर करून डिप्रेशनदेखील येऊ शकतं.

वेळेचा अपव्यय

अनेकदा आपण आपलं महत्त्वाचं काम सोडून फोनवर मॅसेज चेक करायला लागतो. मॅसेज चेक करता करता केव्हा दीर्घकाळ चॅट होतं, ते समजतच नाही. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे फोनचा वापर कमी करा.

मुलं बिघडत चाललीत

पूर्वी मुलं आजीआजोबांसोबत वेळ घालवत असत. आपल्या मित्रांसोबत संध्याकाळी खेळत असत. परंतु आता मुलं स्वत:मध्येच गुंतून असतात. त्यांच्याकडे कोणासाठी वेळच नाहीए. आईवडिल हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. अगोदरच मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात.

लॅपटॉप, महागडे फोन मिळाल्यामुळे मुलं दिवसभर त्यामध्येच अडकून राहतात. फोन वा लॅपटॉपवर पोर्न मूव्हिज पाहू लागतात, ज्याचे दुष्परिणाम लवकरच आईवडिलांसमोर येऊ लागतात

कसा कराल योग्य वापर

* फोनचा वापर कमीत कमी करा.

* सतत ऑनलाइन राहू नका.

* प्रथम महत्त्वाची कामे करा.

* काल्पनिक मित्रांसोबत गप्पा मारण्यात

वेळ घालविण्याऐवजी स्वत:ला वेळ द्या.

* प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकू नका.

* वैयक्तिक गोष्टी सोशल नेटवर्किंग

साइट्वरून दूरच ठेवा.

* वारंवार फोन चेक करू नका.

सकाळचा नाश्ता पोषक हवा

* डॉय सिमरन सॅनी, फोर्टिस हॉस्पितल

अनेकदा म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता हे दिवसातील सर्वात महत्त्वाचं भोजन आहे. कारण रात्रभराची झोप आणि १२ तास वा अधिक वेळ अन्नाविना राहिल्यामुळे जेव्हा आपल्या शरीराला पोषणाची गरज भासते आणि त्याची आपूर्ति सकाळचा नाश्ता पूर्ण करतो. याव्यतिरिक्त जागे झाल्यानंतर तुमच्या मेंदूमध्ये काम करण्यासाठी ग्लूकोजचा वापर होतो. सकाळचा नाश्ता ग्लूकोजचं प्रमाण बॅलेन्स करतो आणि तुमच्या पाचनशक्तीला पुन्हा क्रियाशील बनवतो.

याव्यतिरिक्त, सकाळचा नाश्ता करण्याचे इतर फायदेदेखील आहेत. हा तुमची स्मरणशक्ती वाढवतो आणि तुमचं वजन समतोल ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका

साकारतो. सकाळचा नाश्ता नियमित न करणाऱ्यांना दिवसभरात जेव्हा भूक लागते, तेव्हा ते अधिक खातात, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. सकाळचा नाश्ता करण्याची चांगली सवय ही उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेह पिडित लोकांसाठी सहाय्य ठरते.

पोषक तत्त्वांनी परिपूर्ण

न्यूट्रिशनिस्ट नेहमीच सांगतात की सकाळचा नाश्ता हा जागे झाल्यानंतर २ तासातच करायला हवा. परंतु तुम्ही काय खाता हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सकाळचं हे पहिलं खाणं कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन, फायबर आणि व्हिटामिन बीसारख्या आवश्यक पोषक मुल्यांनी परिपूर्ण असावं. परंतु सर्वसाधारणपणे आपल्या देशात सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे पदार्थ हे अनारोग्यकारक असतात. त्यामध्ये वापरली जाणारी साखर, लोणी, तूप आणि तेल इत्यादी पदार्थांमुळे तो हानिकारक ठरतो.

तेलकट अन्नामध्ये चरबीचं प्रमाण अधिक असतं, जे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामध्ये कॅलरीज आणि चरबीदेखील अधिक असते. ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि

खराब कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्त वाहिन्यांमध्ये मेद आणि प्लाक हळूहळू जमा होत राहिल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि शेवटी हृदयरोग म्हणजेच स्ट्रोक होतो. उच्च रक्तदाबामुळे पित्ताचा असमोतल वाढण्याची शक्यता असते.

नवी दिल्लीच्या फोर्टिस इस्पितळाच्या कन्सल्टंट डॉ. सिमरन सॅमी यांनी सांगितलं की नाश्त्यामध्ये तूप आणि लोणी यांचा सढळ वापर होणं आरोग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची रोटी आणि ब्रेड रोलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा होते. तेलकट, चरबीयुक्त व गोड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या आहारात तूप, लोणी आणि साखर यांचा नियमित वापर करण्याऐवजी आरोग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निरोगी जीवनशैलीची गरज आहे.

गोड कमी खा

उत्तम आरोग्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिरिक्त मिठ आणि शर्करायुक्त पदार्थांऐवजी उच्च फायबर आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करण्याची अधिक गरज आहे. गोड पदार्थांची आवड असणाऱ्यांनी सुरक्षित पर्याय म्हणून साखरेला मीठाचे उपलब्ध पर्याय वापरावेत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि इतर आरोग्याशी संबंधित पिडित लोकांनादेखील मदत मिळू शकेल. स्टेल्विया, एस्पारटेम आणि सुक्रेलोस साखर याचे पर्याय आहेत, जे जगभरात लोकप्रिय आहेत आणि आपल्या देशातदेखील उपलब्ध आहेत. परंतु याचा वापर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला हवा.

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय खायचं नाही? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये फायबर प्रोटिन आणि कार्बोहायडे्रट अधिक प्रमाणात असतील तसंच मीठाचं प्रमाणदेखील कमी असेल. आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दररोज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थोड्या थोड्या प्रमाणात पदार्थ खा.

सकाळच्या आरोग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पोहे, फळांचं सॅलड, पोळी, मल्ट्रीग्रेन डोसा, उपमा, सांबर, डाळ, सोया, मोडाची धान्य, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, कॉटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री आणि डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लोणी वा तूप, मैद्याचा रोटी, भात, फ्रेंच टोस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका. लोणी आणि साखरेचे आरोग्यदायी पर्याय निवडा.

सकाळचा पोषक नाश्ता लहान मुलं आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी अधिक गरजेचा आहे. जे सकाळी पौष्टिक नाश्ता करतात, त्यांना शारीरिक व मानसिक कामे करण्यास अधिक उर्जा मिळते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि दररोजच्या दिनचर्येशी संबंधित आजारपण दूर पळविण्यास मदत होते.

अशी मुलं शाळांमध्येदेखील अधिकाधिक सक्रीय असतात. चिडचिडेपणा, बेचैनी, थकवा या मुलांमध्ये कमी प्रमाणात दिसून येतो. यासाठीच प्रत्येकाने मग लहान असो वा मोठे सकाळचा नाश्ता अधिक गांभीर्याने घ्यायला हवा.

स्वस्थ गर्भावस्थेसाठी जरूरी नियमित तपासण्या

– डॉ. सुनीता यादव

गर्भधारणा होणे कोणत्याही स्त्रीसाठी सर्वात आनंददायी बाब आणि अप्रतिम अनुभव असतो. जेव्हा तुम्ही गर्भार राहता, त्या दरम्यान करण्यात येणाऱ्या प्रिनेटल चाचण्या तुम्हाला, तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याबाबत माहिती देतात. यामुळे अशा कोणत्याही समस्येची माहिती मिळण्यास मदत होते, ज्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो जसे की संक्रमण, जन्मजात व्यंग किंवा एखादा जेनेटिक आजार. याचे निदान बाळाच्या जन्माआधीच काही निर्णय घेण्यास मदत करतात.

तसे पाहता प्रीनेटल चाचण्या खुपच उपयोगी असतात, परंतू हे जाणणे खुप अवश्यक आहे की त्यांच्या परिणामांची व्याख्या कशी करायला हवी. पॉझिटिव्ह टेस्टचा नेहमी हाच अर्थ नसतो की आपल्या बाळाला एखादा जन्मजात दोष असेल. तुम्ही आपल्या डॉक्टरांशी चाचणीच्या रिपोर्टबाबत चर्चा करा.

डॉक्टर सगळयाच गर्भवती महिलांना प्रीनेटल टेस्टस् करण्याचा सल्ला देतात. काही स्त्रियांच्या बाबतीतच जेनेटिक तक्रारींची टेस्ट व इतर स्क्रिनिंग टेस्टस् करायची गरज भासते.

५ नियमित टेस्ट्स

गर्भावस्थेत काही नियमित चाचण्या हे निश्चित करण्यासाठी असतात की तुम्ही स्वस्थ आहात की नाही. तुमचे डॉक्टर तुमच्या रक्ताची आणि लघवीची चाचणी करून काही गोष्टी माहीत करून घेतात. यात खालील चाचण्यांचा समावेश आहे :

1 हिमोग्लोबिन (एचबी)

2 ब्लड शुगर एफ आणि पीपी

3 ब्लड ग्रुप चाचणी

4 व्हायरल मार्कर चाचणी

5 ब्लड प्रेशर

जर तुम्ही गर्भधारणेचा विचार करत असाल तर डॉक्टर तुम्हाला फॉलिक असिड (सप्लिमेंट्स) टॅबलेट्स घेण्याचा सल्ला देऊ शकतात. या गोळया घेण्याचा सल्ला तुम्हाला तेव्हासुद्धा दिला जाऊ शकतो, जेव्हा तुम्ही अगदी ठीक आहात आणि उत्तम आहारसुद्धा घेत आहात. व्हिटॅमिन बी सप्लिमेंट्स आणि कॅल्शियम घेण्याचा सल्ला सर्वच गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना देण्यात येतो. हे सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

इतर चाचण्या

स्कॅनिंग टेस्ट : अल्ट्रासाउंड तुमच्या बाळाच्या आणि आपल्या जननेंद्रियांच्या प्रतिमा घेण्यासाठी ध्वनितरंगांचा वापर करते. जर तुमची गर्भावस्था सामान्य असेल, तर तुम्हाला हे २-३ वेळा करावे लागेल. पहिल्यांदा अगदी सुरूवातीला काय परिस्थिती आहे हे पाहायला दुसऱ्यांदा बाळाची वाढ पाहायला साधारण १८-२० आठवडयाचा गर्भ झाल्यावर, ज्याने हे निश्चित होऊ शकेल की बाळाच्या शरीराचे सगळे अवयव योग्य प्रकारे विकसित होत आहेत अथवा नाहीत.

जेनेटिक टेस्ट्स : प्रीनेटल जेनेटिक टेस्ट् विशेषत: त्या स्त्रियांसाठी महत्त्वाची असतात, ज्यांच्या बाळाला जन्मजात व्यंग अथवा जेनेटिक समस्या असण्याची शक्यता असते. असे खालील परिस्थितीत होऊ शकते :

* तुमचे वय ३५ वर्षांहून अधिक असेल.

* तुम्हाला एखादा जेनेटिक आजार असेल किंवा तुम्ही किंवा तुमच्या नवऱ्याच्या कुटुंबात एखाद्या जेनेटिक आजाराचा इतिहास असेल.

* तुमचा आधी एखादा गर्भपात होऊन मृत शिशु जन्मले असल्यास.

डॉ. मोनिका गुप्ता, एम.डी.,डीजीओ गायनॉकोलॉजीस्टच्या मते निरोगी गर्भावस्थेसाठी चाचण्यांबाबत माहिती असणे अवश्यक आहे. प्रीनेटल टेस्टसमध्ये ब्लड टेस्ट्स सामिल आहेत, ज्यामुळे तुमचा ब्लड ग्रुप, तुम्हाला अॅनिमिया आहे अथवा नाही यासाठी तुमच्या हिमोग्लोबिनची पातळी, डायबेटीसच्या चाचणीसाठी ब्लड ग्लुकोजची पातळी, तुमचा आरएच फॅक्टर (जर तुमचा ब्लड ग्रुप आरएच निगेटिव्ह असेल आणि बाळाच्या वडिलांचा ब्लड ग्रुप आरएच पॉझिटिव्ह असेल तर शिशुमध्येही वडिलांचे आरएच प्रॉझिटिव्ह ब्लड असू शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होणे सुरु होते आणि त्यामुळे तुमच्या गर्भाला धोका उत्पन्न होऊ शकतो.) तपासला जातो. एचआयव्ही, हेपेटाईटीस सी आणि बीसारख्या आजारांसाठी तुमची व्हायरल मार्कर चाचणीसुद्धा होऊ शकते, कारण गर्भावस्थेत हे आजार होऊ शकतात.

जर तुम्हाला आधीच कळले असेल की तुमच्या जोडीदाराला एखादा विशिष्ट आजार आहे, तर तुम्ही सुरूवातीपासुनच भावनिक पातळीवर तयार राहु शकता.

वाढत्या वजनामुळे त्रासले आहात?

* श्रेया कत्याल, आहारतज्ज्ञ

अनेकदा कुणी आपल्या वाढत्या वजनामुळे तर कुणी कृश असल्यामुळे त्रासलेले असतात. कारण आपला आहार कसा असावा हेच त्यांना समजत नसते. जर तुम्हीही यामुळे त्रासले असाल तर काळजी करू नका. यासंदर्भात आहारतज्ज्ञ श्रेया कत्यालशी साधलेला संवाद…

आहार म्हणजे काय?

आहार म्हणजे असे परिपूर्ण खाणे ज्यात सर्व पोषक तत्वे असतात.

चांगले आणि वाईट अन्न म्हणजे काय?

अन्न चांगले किंवा वाईट नसते. आपण कसे, कधी, काय आणि किती खातो यावर ते चांगले की वाईट हे ठरते. म्हणून माणसाने सर्व काही खायला हवे, परंतु कमी प्रमाणात. खाण्यापिण्याची इच्छा मारणे शरीराशी प्रतारणा करण्यासारखे आहे.

योग्य पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यात किती वजन कमी करता येते?

हे व्यक्तिनुरूप अवलंबून असते. योग्य पद्धतीने एका महिन्यात कमीतकमी सुमारे ३-४ किलोग्रॅमपर्यंत (दर आठवडयाला १ किलोग्रॅम) तर जास्तीत जास्त ८ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासोबतच जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.

पथ्याच्या आहारशैलीत बदल केल्यानंतर वजन पुन्हा वाढते का?

योग्य प्रकारे वजन नियंत्रणात आणल्यानंतर ते आहारात बदल केला तरीही नियंत्रणात राहते. परंतु वजन नियंत्रणात तेव्हाच राहू शकते, जेव्हा जीवनशैलीत बदल करणे हे तुमचे ध्येय असेल. त्यामुळेच एकदा का तुम्ही आहार नियंत्रणासोबत सकारात्मकपणे जीवनशैलीतही परिवर्तन करता, तेव्हा आहारशैलीतील बदलांचे पालन न करताही तुम्ही आहात तसेच राहू शकता.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे वगैरे घेण्याचा सल्ला देता का?

वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे किंवा कुठल्याही कृत्रिम पद्धतीवर मी विश्वास ठेवत नाही. कारण भविष्यात याचे दुष्परिणाम समोर येतात.

रक्तगटानुसार आहारशैलीत बदल करणे किती परिणामक ठरते आणि तुम्ही कशाप्रकारची आहार योजना तयार करता?

‘अ’ रक्तगटावर आधारित आहारशैली एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरते. ती १०० टक्के परिणामकारक नसते. ती प्रभावी असून तिचे सकारात्मक परिणामही दिसून येतात, परंतु ती सर्वांसाठीच पूर्णपणे लागू करता येत नाही. लोकांसाठी आहार योजना तयार करताना मी त्यांचा रक्तगट लक्षात ठेवते, पण आहार योजना पूर्णपणे रक्तगटावर आधारित नसते. व्यक्तिची आवडनिवड, प्राथमिकता, दिनक्रम, जीवनशैली इत्यादी आहार योजना तयार करताना महत्वाची भूमिका बजावतात.

सर्वसाधारणपणे असा समज आहे की पथ्याच्या आहारशैलीनंतर त्वचा निस्तेज होते. यात कितपत तथ्य आहे?

आहार योजनेचे पालन केवळ अतिरिक्त कॅलरीजना संपवण्यासाठी केले जात नाही तर तुमचे आरोग्य अधिक चांगले बनविण्यासाठी केले जाते. सुदृढ स्वास्थ्यासाठी पोषक तत्वांचा योग्य आहार घेणे सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण दिवसभरात ५-६ वेळा काय खायचे याची योजना तयार केली जाते जेणेकरून तुमची चयापचय प्रक्रिया सुधारून तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी निरुपयोगी घटकांना दूर करून आहारात पौष्टिक घटकद्रव्यांचा समावेश करण्यात येतो.

वजन कमी करण्यासाठी मिठाई खाणे बंद केले पाहिजे का?

ज्यांना मिठाई आवडते अशांसाठी माझे उत्तर नाही असे आहे. एका निश्चित कालावधीसाठी आपण आहार योजनेचे पालन करू शकतो, पण कायमस्वरूपी आपल्या आवडीचे पदार्थ खाणे बंद करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला जे आवडते ते खा, परंतु योग्य प्रमाणात व योग्य वेळी खा. एका वेळचे जेवण समजून मिठाई खाऊ नका तर जेवण झाल्यावर ती खा.

रात्रीचे जेवण आठ वाजण्यापूर्वी करायला हवे किंवा मग अळणी जेवण जेवायला हवे का?

तुम्ही जितके वजन कमी केले आहे ते अळणी जेवल्यामुळे कायमचे तसेच राहील असे मुळीच नाही. त्यामुळेच मी रात्रीचे जेवण नेहमीच अळणी असावे, असा सल्ला देणार नाही. शिवाय रात्री आठपूर्वी जेवणे किंवा अळणी जेवण हा नियम कुठलीच व्यक्ती फार काळापर्यंत पाळू शकत नाही. त्यामुळे मी असा कुठलाच सल्ला देत नाही, जो दीर्घकाळ पाळणे शक्य नाही. म्हणूनच रात्रीचे जेवण योग्य वेळी करा, जेणेकरून जेवण व झोपणे यात कमीतकमी २ तासांचे अंतर राहील.

आहार योजनेसोबतच व्यायामही गरजेचा आहे का?

वजन कमी करण्यासाठी ७० टक्के आहार आणि ३० टक्के व्यायाम महत्त्वाचा आहे असे मानले जाते. याशिवाय वजन कमी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते आणि त्यासाठीच काही बेसिक व्यायाम करणेही आवश्यक आहे, कारण आजकाल बहुतांश लोकांची जीवनशैली श्रमहीन झाली आहे. व्यायाम आपली पचनप्रक्रिया उत्तम राखतो, तसेच वजन कमी करण्याच्या प्रक्रियेलाही गती निर्माण करून देतो.

निरोगी राहण्याच्या ७ टीप्स

* निधी धवन

सणासुदीचा काळ सुरु आहे, म्हणून आम्ही तुम्हाला काही अशा टीप्स सांगत आहोत, ज्यामुळे साखरयुक्त पेय आणि अधिक कॅलरी असलेल्या मिठाईचे सेवन कमी करता येऊ शकते :

  1. आपल्या डाएट प्लानचे पालन करा
  • हेवी ब्रेकफास्ट करा. याने तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहील. सणांच्या काळात हेवी ब्रेकफास्ट करा, जो फायबर आणि पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असेल. दुपारच्या जेवणात प्रथिनांचे प्रमाण अधिक असावे. हे पोटाला खूप काळ भरलेले ठेवेल ज्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात खाल. आपल्या फ्रिज आणि किचनमध्ये पौष्टीक स्नॅक्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचे अनेक प्रकार जास्त प्रमाणात ठेवा.
  1. विचार करून खा
  • तुम्ही जे काही खात आहात, त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवा. यामुळे जर तुम्ही मिठाई किंवा इतर कोणता जास्त कॅलरी असलेला पदार्थ थोडया प्रमाणात खाल्ला तर तुमचा कॅलरी इनटेक वाढणार नाही.
  1. पाणी भरपूर प्या
  • रोज भरपूर प्रमाणात पाणी प्या. दिवसाची सुरुवात पाणी पिऊन करा. सकाळी रिकाम्या पोटी २-३ ग्लास पाणी प्या, याने तुमची पचनसंस्था साफ राहील. यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कायम राहील आणि रक्तातील विषारी पदार्थ बाहेर टाकेल. दिवसातून कमीतकमी ३ लिटर पाणी अवश्य प्या.
  1. व्यायाम करायचा नसेल तर डान्स करा
  • जर व्यायाम करणे तुमच्यासाठी कठीण असेल तर मनापासून नृत्य करा. यामुळे खूप प्रमाणात कॅलरीज जळतात. कित्येक प्रकारच्या मिठाई आणि तुपाचे सेवन करूनही स्वस्थ राहण्याकरिता डान्स हे सगळयात चांगलं वर्कआऊट आहे.
  1. आरोग्यासाठी उत्तम उपाय निवडा
  • नेहमी चांगले आणि पौष्टीक पदार्थ निवडा. अतिखाणे टाळा. मिठाईऐवजी सुका मेवा, फळं, फ्लेवर्ड दही यांना प्राधान्य द्या.
  1. खरेदीसाठी जा
  • सणांच्या काळात कोणालाही खरेदी करायला आवडते आणि येथे आम्ही तुम्हाला आणखी एक कारण सांगत आहोत की खरेदी करणे तुमच्यासाठी कसे उपयोगी ठरू शकते. आपली शॉपिंगची योजना अशी बनवा की तुम्हाला अधिकाधिक चालावे लागेल. कारचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईन शॉपिंग करण्याऐवजी जर तुम्ही बाजार अथवा मॉल फिरून शॉपिंग केली तर जास्त प्रमाणात कॅलरी बर्न कराल
  1. डीटॉक्सिफिकेशन तंत्र
  • तसे पाहता आपल्या शरीराची रचना अशी असते की ते आपोआपच शरीरातील अपायकारक रसायने बाहेर फेकते, तरीही सणांच्या काळात शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढते. म्हणून आपल्या शरीरातून यांना काढून टाकायचा प्रयत्न करा. चहा आणि कॉफीऐवजी ग्रीन टी प्या. आपल्या दिवसाची सुरूवात १ ग्लास कोमट पाणी लिंबाचा रस मिसळून घ्या.
  • जर कॅलरी इनटेक जास्त झाले तर दुसऱ्या दिवशी वर्कआउट किंवा वॉकची वेळ १० मिनिटे वाढवा. सणांमध्येही आपले व्यायामाचे रुटीन चालू ठेवा. बस कार्डिओ थोडे वाढवा.

आनंदी पीरियड्ससाठी टिप्स

* डॉ. रंजना शर्मा

बहुसंख्य महिलांना आपल्या पीरियड्सबाबत बोलायला आवडत नाही. हेच कारण आहे की यादरम्यान त्या हायजीनच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात आणि नवीन समस्यांच्या शिकार बनतात.

मासिक पाळीबाबत जागरूकतेचा अभाव हेदेखील या समस्यांमागील मोठे कारण आहे. पीरियड्सदरम्यान होणाऱ्या समस्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही सुचना लक्षात घ्या :

1) नियमित बदल : सर्वसाधारणपणे दर ६ तासांनी सॅनिटरी पॅड बदलायला हवे. तुम्ही टँपॉन वापरत असाल तर दर २ तासांनी ते बदला. याशिवाय तुम्ही आपल्या गरजेनुसारही सॅनिटरी पॅड बदलायला हवे. जसे की जास्त अंगावरून जात असल्यास तुम्हाला सतत पॅड बदलावे लागतात. फ्लो कमी असेल तर सतत बदलण्याची गरज नाही. तरीही दर ४ ते ८ तासांनी पॅड बदला, जेणेकरून स्वत:ला इन्फेक्शनपासून वाचवू शकाल.

2) आपल्या गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा : पीरियड्सदरम्यान गुप्तांगाच्या आसपासच्या त्वचेजवळ रक्त साचते, ते संसर्गाचे कारण ठरू शकते. म्हणूनच गुप्तांगाला नियमित धुवून साफ करा. यामुळे योनीला दुर्गंधीही येणार नाही. दरवेळी पॅड बदलताना गुप्तांग चांगल्या प्रकारे साफ करा.

3) हायजीन प्रोडक्ट्स वापरू नका : योनस्वत:हूनस्वच्छहोण्याची नैसर्गिक प्रक्रिया असते, जी चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांना संतुलित ठेवते. साबण योनीतील चांगल्या बॅक्टेरियांना नष्ट करू शकतो, म्हणून त्याचा वापर करू नका. तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता.

4) धुण्यासाठी योग्य पद्धत वापरा : गुप्तांग स्वच्छ करण्यासाठी योनीपासून गुद्द्वाराकडे साफ करा. म्हणजे पुढून पाठच्या दिशेपर्यंत जा. उलटया दिशेने कधीच धुवू नका. उलटया दिशेने धुतल्यास गुद्द्वारातील बॅक्टेरिया योनीत जाऊन संसर्ग होऊ शकतो.

5) वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य ठिकाणी फेका : वापरलेले सॅनिटरी प्रोड्क्ट योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणीच फेका, कारण ते संसर्गाचे कारण ठरू शकतात. फेकून देण्यापूर्वी ते गुंडाळा जेणेकरून दुर्गंधी किंवा संसर्ग पसरणार नाही. पॅड किंवा टँपॉन फ्लश करू नका, कारण यामुळे टॉयलेट ब्लॉक होऊ शकतो. नॅपकिन फेकल्यानंतर हात चांगल्याप्रकारे धुवा.

6) पॅडमुळे होणाऱ्या रॅशेसपासून बचाव करा : पीरियड्समध्ये हेवी फ्लोवेळी पॅडमुळे रॅशेस होण्याची शक्यता खूपच वाढते. असे सर्वसाधारपणे तेव्हा होते जेव्हा पॅड जास्तवेळ ओला राहतो आणि त्वचेशी घासला जातो. म्हणून स्वत:ला कोरडे ठेवा. नियमितपणे पॅड बदला. रॅशेस पडल्यास आंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी अॅण्टीसेप्टिक मलम लावा. यामुळे रॅशेस बरे होतील. मलम लावूनही ते बरे न झाल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.

7) एकावेळी एकाच प्रकारचे सॅनिटरी प्रोडक्ट वापरा : काही महिला ज्यांच्या जास्त अंगावरून जाते त्या एकाचवेळी दोन पॅड्स किंवा एका पॅडसोबतच टँपॉन वापरतात. कधी सॅनिटरी पॅडसोबतच कपडाही वापरतात. त्यामुळे त्यांना दीर्घकाळपर्यंत पॅड बदलण्याची गरज भासत नाही. पण तुम्ही एका वेळी एकच प्रोडक्ट वापरणे आणि ते सतत बदलणे हेच उत्तम आहे. जेव्हा एकाचवेळी दोन प्रोड्क्टचा वापर केला जातो, तेव्हा तुम्ही सतत ते बदलत नाही, यामुळे रॅशेस, संसर्गाची शक्यता वाढते. तुम्ही पॅडसोबत कपडाही वापरत असाल तर संसर्गाची भीती अधिकच वाढते, कारण जुना कपडा अनेकदा हायजिनिक नसतो. पॅड्सच्या वापराबाबत बोलायचे तर ते आरामदायक नसतात आणि रॅशेसचे कारणही ठरू शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें