* श्रेया कत्याल, आहारतज्ज्ञ

अनेकदा कुणी आपल्या वाढत्या वजनामुळे तर कुणी कृश असल्यामुळे त्रासलेले असतात. कारण आपला आहार कसा असावा हेच त्यांना समजत नसते. जर तुम्हीही यामुळे त्रासले असाल तर काळजी करू नका. यासंदर्भात आहारतज्ज्ञ श्रेया कत्यालशी साधलेला संवाद...

आहार म्हणजे काय?

आहार म्हणजे असे परिपूर्ण खाणे ज्यात सर्व पोषक तत्वे असतात.

चांगले आणि वाईट अन्न म्हणजे काय?

अन्न चांगले किंवा वाईट नसते. आपण कसे, कधी, काय आणि किती खातो यावर ते चांगले की वाईट हे ठरते. म्हणून माणसाने सर्व काही खायला हवे, परंतु कमी प्रमाणात. खाण्यापिण्याची इच्छा मारणे शरीराशी प्रतारणा करण्यासारखे आहे.

योग्य पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यात किती वजन कमी करता येते?

हे व्यक्तिनुरूप अवलंबून असते. योग्य पद्धतीने एका महिन्यात कमीतकमी सुमारे ३-४ किलोग्रॅमपर्यंत (दर आठवडयाला १ किलोग्रॅम) तर जास्तीत जास्त ८ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासोबतच जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.

पथ्याच्या आहारशैलीत बदल केल्यानंतर वजन पुन्हा वाढते का?

योग्य प्रकारे वजन नियंत्रणात आणल्यानंतर ते आहारात बदल केला तरीही नियंत्रणात राहते. परंतु वजन नियंत्रणात तेव्हाच राहू शकते, जेव्हा जीवनशैलीत बदल करणे हे तुमचे ध्येय असेल. त्यामुळेच एकदा का तुम्ही आहार नियंत्रणासोबत सकारात्मकपणे जीवनशैलीतही परिवर्तन करता, तेव्हा आहारशैलीतील बदलांचे पालन न करताही तुम्ही आहात तसेच राहू शकता.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे वगैरे घेण्याचा सल्ला देता का?

वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे किंवा कुठल्याही कृत्रिम पद्धतीवर मी विश्वास ठेवत नाही. कारण भविष्यात याचे दुष्परिणाम समोर येतात.

रक्तगटानुसार आहारशैलीत बदल करणे किती परिणामक ठरते आणि तुम्ही कशाप्रकारची आहार योजना तयार करता?

‘अ’ रक्तगटावर आधारित आहारशैली एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरते. ती १०० टक्के परिणामकारक नसते. ती प्रभावी असून तिचे सकारात्मक परिणामही दिसून येतात, परंतु ती सर्वांसाठीच पूर्णपणे लागू करता येत नाही. लोकांसाठी आहार योजना तयार करताना मी त्यांचा रक्तगट लक्षात ठेवते, पण आहार योजना पूर्णपणे रक्तगटावर आधारित नसते. व्यक्तिची आवडनिवड, प्राथमिकता, दिनक्रम, जीवनशैली इत्यादी आहार योजना तयार करताना महत्वाची भूमिका बजावतात.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...