अशी लावा मुलांना हात धुण्याची सवय

* पारुल भटनागर

एकीकडे मुलांचे लहान हात गोंडस वाटतात तर दुसरीकडे ते बहुतेक वेळा मातीत खेळत असल्याने जंतूंनीदेखील भरलेले असतात. त्यांचे मन नेहमी खोडया करण्यात गुंतलेले असते. अशा परिस्थितीत आपण या मौजमस्तीच्या वयात खोडया करण्यापासून त्यांना रोखू शकत नाही, परंतु त्यांना हँडवॉशचे महत्त्व नक्कीच सांगू शकतो.

बहुतेकदासंसर्गजन्य रोगाचे कारण घाण आणि हात न धुणे असते आणि यामुळे बरीच मुले आजारी पडतात आणि मरण पावतात. अशावेळी हँडवॉशच्या सवयीमुळे हे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

हातावर सर्वाधिक जंतू

हातावर दोन प्रकारचे जंतू असतात, ज्याला सूक्ष्मजीवदेखील म्हणतात. एक रहिवासी आणि दुसरे प्रवासी सूक्ष्मजीव. जे रहिवासी सूक्ष्मजीव असतात ते निरोगी लोकांना आजार पाडू शकत नाहीत, कारण ते नेहमीच हातावर असतात आणि हँडवॉशनेही जात नाहीत, तर प्रवासी सूक्ष्मजीव येत-जात असतात. खोकला, शिंकणे, दूषित अन्नाला स्पर्श केल्याने हे हातावर स्थानांतरित होतात. म्हणून साबणाने हात धुणे खूप महत्वाचे आहे.

न्यूझिलंडमध्ये झालेल्या संशोधनानुसार केवळ ९२ टक्के महिला आणि ८१ टक्के पुरुष शौचालयानंतर साबण वापरतात, तर अमेरिकेच्या संशोधनानुसार केवळ ६३ टक्के लोक शौचालयानंतर आपले हात धुतात. त्यापैकी फक्त २ टक्के साबण वापरतात.

कोणत्या युक्त्या आहेत ज्यामुळे मुलांमध्ये हँडवॉशची सवय लागेल :

मजेसह शिका : आपल्या मुलांना बाहेरून आल्यावर शौचालय वापरण्यास शिकवा. जेव्हा-जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला स्पर्श कराल, शिंकाल किंवा खोकाल तेव्हा-तेव्हा हात अवश्य धुवा अन्यथा जंतू तुम्हाला आजारी बनवतील. तुम्हीही त्यांच्या या नित्यकर्मात सहभागी व्हा. त्यांना सांगा की जो लवकर हँडवॉश करेल तोच विजेता होईल.

स्मार्ट स्टूल्स : बऱ्याच घरात हात धुण्याची जागा खूप उंचावर असते, ज्यामुळे मुलांना पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी जायला आवडत नाही. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यासाठी स्मार्ट स्टूल ठेवा, ज्यावर चढायला त्यांना आवडेल आणि त्यावर चढून ते हात धुवू शकतील. यासह टेप्समध्ये पक्ष्याच्या आकारात येणारे स्मार्ट किड्स फॉसिट एक्स्टेंड लावावे, या सर्व वस्तू मुलांना आकर्षित करतात, तसेच त्यांना हात धुण्याची सवय देखील लावतात.

जंतूविरहीत हात : ‘जर्म मेक मी सिक’ तुम्हाला वाटतं का की जंतूंनी तुम्हाला आजारी पाडावं परिणामी तुम्ही शाळेत जाऊ शकणार नाही वा मित्रांसोबत खेळूही शकणार नाही. नाही ना, तर मग जेव्हा-जेव्हा आपण हँडवॉश करता तेव्हा आपली बोटे, तळवे आणि अंगठे साबणाने चोळून चांगले स्वच्छ करा.

ग्लिटर पद्धतीने शिकवा : जर आपली मुले हँडवॉश चांगले करत नसतील तर आपण त्यांना ग्लिटरद्वारे जंतूंबद्दल समजवावे. यासाठी आपण त्यांच्या हातांवर ग्लिटर टाका, नंतर थोडयाशा पाण्याने हँडवॉश करून त्यांना टॉवेलने पुसण्यास सांगा. यानंतरही ग्लिटर त्यांच्या हातावर राहील्यास आपण त्यांना समजावून सांगा की जर तुम्ही हँडवॉश नीट केले नाही तर जंतू तुमच्या हातावर राहतील आणि तुम्हाला आजारी पाडतील.

मजेदार गाण्याद्वारे सवय लावा : मजेदार गाणे गाऊन आपल्या मुलांना हँडवॉशची सवय लावा. जेव्हा-जेव्हा ते खायला बसतात किंवा टॉयलेटमधून येतात तेव्हा त्यांना हँडवॉश करण्यास सांगत म्हणा,

वाश योर हैंड्स, वाश योर हैंड्स

बिफोर यू ईट, बिफोर यू ईट,

वाश विद सोप ऐंड वाटर, वाश विद सोप ऐंड वाटर,

योर हैंड्स आर क्लीन, यू आर रैडी टू ईट,

वाश योर हैंड्स, वाश योर हैंड्स,

आफ्टर टौयलेट यूज, वाश योर हैंड्स विद सोप ऐंड वाटर,

टू कीप डिजीज अवे.

यकीन मानिए ये ट्रिक आप के बहुत

काम आएंगे.

आकर्षक सोप डिस्पेंसर : आकर्षक गोष्टी पाहून मुलांना आनंद होतो. अशावेळी आपण त्यांच्यासाठी एक आकर्षक हँडवॉश डिस्पेन्सर आणा, ज्याकडे पाहून त्यांना पुन्हा-पुन्हा हँडवॉश करायला आवडेल.

मान्सून स्पेशल : मान्सूनमध्ये काय खाल आणि काय टाळाल

* मिनी सिंह

पावसाचा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही आणतो. त्यामुळे जर आपण या ऋतूत योग्य आहारविहार आणि साफसफाईकडे लक्ष दिले नाही तर आपण अनेक आजारांचे सहज शिकार होऊ शकतो. या ऋतूतल्या योग्य आहाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे, ज्यायोगे आपण स्वत:ला ताजेतवाने आणि तंदुरुस्त ठेवू शकतो.

आपण जाणून घेऊया या ऋतूत आपला आहार कसा असावा :

* पावसाळयात शिळे अन्न खाणे टाळा. नेहमी ताजे अन्नच खा. तसेच लक्षात घ्या की अन्न पचायला हलके असावे. जड आणि तेलकट अन्न नुकसानदायी ठरू शकते.

* या ऋतूत उपाशी राहू नका. उपाशीपोटी बाहेरही जाऊ नका. घरून जेवून किंवा  सोबत डबा घेऊन बाहेर जा. आपल्या लंचबॉक्समध्ये सॅलड असेल याची काळजी घ्या. पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका.

* फळांचे जास्तीत जास्त सेवन करा. फळांमुळे शरीरात ताजेपणा टिकून राहतो. टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे, लीची इ. चे सेवन शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर करतेच, पण त्याचबरोबर आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्ततासुद्धा होते.

* चहाकॉफीऐवजी लिंबू पाणी, थंडाई, कैरी पन्हे, लस्सी, ताक इ. चे सेवन जास्त प्रमाणात करा.

* या ऋतूत बेल, सफरचंद आणि आवळयाचा मोरांबा तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करेल.

* या ऋतूत बॅक्टेरिया आणि व्हायरस अधिकाधिक पसरतात. शुगर कन्टेन्ट असलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ताज्या फळांचे सेवन करा. आधीपासून कापून ठेवलेली फळे खाऊ नका. फक्त ताज्या भाज्याच खा.

* पावसाळयात स्वच्छ पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे.

* शक्य होईल तितके नॉनव्हेज खाणे टाळा.

* या ऋतूत हिरव्या चटण्या खाणे लाभदायक असते. पुदिना, कोथिंबीर, आवळा, कांदा इ.चे सेवन करा.

* घरात पुदिना, कोथिंबीर, ग्लुकोज इ. अवश्य ठेवा. फूड पॉयझनिंगमध्ये आराम  पडतो.

* नियमित व्यायाम अवश्य करा.

मान्सून स्पेशल : पावसात अशी घ्या पायांची काळजी

* डॉ. सपना बी. रोशनी

शरीराच्या संपूर्ण देखभालीमध्ये आपण सर्वात कमी महत्व पायाच्या देखभालीला  देतो. आपण दिवसातून बऱ्याच वेळा चेहऱ्याला क्रिम लावतो, पण पायाकडे दुर्लक्ष करतो. खरं तर असे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. उदारणार्थ बॅक्टेरीअल फंगस संक्रमण, क्रॉर्न्स, पायाच्या त्वचेवरील भेगा, दुर्गंधी इत्यादी समस्या उद्भवतात.

पावसाळयाच्या दिवसामध्ये पायाच्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे  असते. कारण या काळात पायाचा दूषित पाण्याशी अधिक संपर्क येतो.

जर पायाच्या त्वचेला खाज, सूज, किंवा त्वचा रुक्ष होणे यासारख्या समस्या होत असतील तर लगेच चिकित्सकाचा सल्ला घ्या कारण ही गंभीर त्वचेची एलर्जी असू शकते, ज्याचा तातडीने इलाज होणे गरजेचे आहे.

पायांची देखभाल करायचे काही उपाय

पाय व्यवस्थित धुवून घ्या : पायांची त्वचा बॅक्टेरीअल आणि फंगस संक्रमणाप्रति अधिक संवेदनशील असते. आपण जरी दिवसातील जास्तीत जास्त वेळ मोजे आणि बूट घातले असले तरीदेखील पाय त्यातील बॅक्टेरीया व फंगसच्या संपर्कात राहतात. याव्यतिरिक्त पाय फरशीवर साठलेल्या धूळ आणि घाणीच्या संपर्कात राहतात. जर पाय व्यवस्थित धुतले किंवा साफ केले नाहीत तर पाय आणि बोटांच्यामधील जागेत बॅक्टेरीया आणि फंगसचे संक्रमण सहजपणे होऊ शकते. म्हणूनच आपले पाय दिवसातून कमीत कमी एकदा तरी साबणाने धुणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामध्ये साठलेली मळ आणि घाम स्वच्छ होऊ शकेल.

पाय कोरडे ठेवा : अॅथसिट्स फ्रूट पायांचे सामान्य फंगल संक्रमण आहे, त्यामुळे खाज सुटणे, त्वचा जळजळणे, त्वचा पडणे तसेच फोडी तयार होऊ शकतात. अॅथलिट्स फूटसारख्या फंगल संक्रमणाला पायातील ओसरपणा कारणीभूत ठरतो. पाय व्यवस्थित धुतल्यानंतर त्यांना सुकवणे, कोरडे ठेवणे आणि विशेषत: बोटांच्यामधील जागा कोरडी ठेवणे आवश्यक आहे.

पायांना नियमित मॉश्चराइज करा : फक्त चेहरा आणि हातांना मॉश्चरायइझ करू नका पायाकडेही लक्ष द्या. कारण त्यातील आर्द्रता कमी झाल्यास त्वचा रुक्ष व फुगलेली होऊ शकते. तसेच त्वचेला भेगा पडू शकतात. त्वचेला खास करून पायाच्या त्वचेला भेगा पडल्यास, ती खूप कोरडी आणि कडक होते. त्यानंतर या भागात धुळ, माती साचते. भेगा पडलेले पाय कुरूप दिसतात आणि तिथे दुखणे सुरु होते. म्हणूनच पाय रोज धुवून मॉइश्चरायझिंग क्रिम लावा. यासाठी कोकोआ बटर किंवा पट्रोलियम जेली हा उत्तम पर्याय आहे.

मृत त्वचा काढणे : मृत त्वचेला निव्वळ मॉश्चराइझ करून काहीच फायदा होत नाही. म्हणून महिन्यातून एकदा एक्सफोलिएट करून मृत त्वचा काढणे गरजेचे आहे. हे फ्युमिक स्टोन किंवा लुकद्वारे केले जाते. असे हलक्या हाताने करावे लागते. ती कडक मृत त्वचेवर जमलेली घाण काढण्यासाठीदेखील याची मदत होते. मृत त्वचा काढल्यानंतर त्याला मॉश्चराइझर लावून हायड्रेड करा आणि रात्रभर तसेच ठेवा.

साखर आणि ऑलिव्ह ऑईलच्या मिश्रणाचे काही थेंब मीठ किवी टी ट्री ऑईलमध्ये मिसळून स्क्रबिंग करू शकता. कारण यात बॅक्टेरीयारोधक गुण असतात.

पायांना पॅम्पर  करा : महिन्यातून २ वेळा १० ते १५ मिनिटे पाय गरम पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पायाची त्वचा नरम होण्यास मदत मिळते. मग पाय व्यवस्थित कोरडे करून घ्या. मग त्यावर व्हिटॅमिन इ युक्त कोल्ड क्रीम लावा. पाय संक्रमणाप्रति असंवेदनशील असेल तर अँटिबायोटिक क्रिमचा वापर करा.

तुम्ही हायड्रेटिंग मास्कसाठी स्मॅश केळे लिंबाचा रस एकत्र करून वापरू शकता. हे पूर्ण पायावर लावा आणि २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून घ्या. बाहेर जाण्यापूर्वी किंवा झोपताना पायांना मॉश्चरायझिंग फूट क्रीम लावा किंवा पट्रोलियम जेली लावा.

मोजे वापरा : मोजे हे धूळ, घाण इत्यादीपासून पायांचे संरक्षण करतात, एवढंच नव्हे तर अतिरिक्त किरणांपासून पायांना सुरक्षित ठेवतात.

आरामदायी चपला वापरा : नेहमी आरामदायक चपलांचा वापर करा. घट्ट बूट वापरणे टाळा. कारण त्यामुळे त्वचेला संसर्ग किंवा जखमा होऊ शकतात. उंच टाचांच्या चपला नियमित वापरणे टाळा, कारण त्यामुळे पायांच्या पेशी आणि लिगामेंटला नुकसान पोहोचू शकते.

मान्सून स्पेशल : अँटीफंगल पावडर का आहे जरूरी

* सोमा घोष

मान्सूनमध्ये अनेकदा गरमीसोबत वातावरणात दमटपणाचं प्रमाण अधिक झाल्याने अनेकांना बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन होण्याची संभावना असते. याशिवाय ज्यांची त्वचा ऑयली असते त्यांना खाज, रॅशेज, संक्रमण वा त्वचेसंबंधी इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता जवळपास १० पटींनी अधिक वाढते.

पावसाळयात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत जरुरी आहे, विशेषत: पायाच्या बोटांमध्ये, आर्म पिट, ब्रेस्टच्या खाली, मान, पाठ इत्यादी जागी जिथे घामामुळे ओलावा जास्त प्रमाणात राहतो आणि नंतर फंगल इन्फेक्शनला जन्म देतो.

याबाबत मुंबईच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोमा सरकार सांगतात की पावसाळयात अँटीफंगल पावडर सर्वांसाठी आवश्यक असते, कारण वर्षाऋतूत शरीर आणि पाय ओले होतात. म्हणून दमट वातावरणात फंगस सहज वाढीला लागते. म्हणून या ऋतूत स्वत:ला कोरडे ठेवणे अतिशय गरजेचे आहे. अशात अँटीफंगल पावडर खूपच लाभकारक असते, कारण ही त्वचेला कोरडे ठेवण्यात मदत करते. ही पावडर वापरल्याने कोणत्याही प्रकारच्या फंगल इन्फेक्शनपासून सुरक्षित राहता येते.

केव्हा करायचा फंगल पावडरचा वाप

फंगल इन्फेक्शन झाल्यावर, योनीत त्याचे संक्रमण झाल्यास, पायांच्या बोटांच्यामध्ये खाज सुटली, कंबरेवर फंगल इन्फेक्शन झाल्यास, एथलीट्स फूटच्या उपचारासाठी, त्वचेला खाज सुटल्यास फंगल पावडरचा दिवसातून २-३ वेळा वापर करावा.

सकाळी अंघोळ झाल्यावर काखांमध्ये, जांघांमध्ये, छातीखाली, मान, पायांच्या बोटांमध्ये इत्यादी जागी जिथे घाम जास्त येतो तिथे फंगल पावडरचा वापर करा. याशिवाय जेव्हा केव्हा गरमीने खाज जाणवेल तिथे याचा वापर करा. मेडिकेटेड साबणाने हातपाय चांगले धुवा आणि कोरडे केल्यावरच फंगल पावडर लावा.

फंगल इन्फेक्शनचे प्रकार

फंगल इन्फेक्शनचे अनेक प्रकार असतात.

* पायांच्या बोटांमध्ये होणारे फंगल इन्फेक्शन सामान्य आहे. यात बोटांच्यामध्ये कठीण थर जमा होतो अथवा बुळबुळीत पदार्थ निघतो, ज्याला दुर्गंधीसुद्धा असते.

* टिनिया कौरपोरिस आणि टिनिया क्रूरिस इन्फेक्शन : साधारणत: काखांमध्ये वा छातीच्या खाली होते. हे बहुतांश ओले कपडे वापरल्याने होते. हे फंगल पावडर लावून सहज नाहीसे करता येते.

फंगल इन्फेक्शन बहुतांश लठ्ठ, स्वच्छतेकडे कमी लक्ष देणारे, मधुमेह असलेल्यांना होते. त्यांनी विशेषत: ही  पावडर जवळ बाळगण्याची गरज भासते.

डॉ. सोमा सांगतात, ‘‘माझ्याकडे अनेक असे रुग्ण येतात, ज्यांना फंगल इन्फेक्शन कळतच नाही आणि रिंगवर्म समजून दुकानातून औषधं घेत राहतात. अनेकदा दोन्ही जांघांमध्ये घर्षण झाल्यानेसुद्धा खाज आणि रॅशेज येतात, ज्याकडे ते लक्ष देत नाही आणि मग नंतर हा त्रास वाढू लागतो. अशा लोकांनी पावसाळयात रोज फंगल पावडर वापरली तर या त्रासापासून दूर राहू शकतात.    अनेक महिला शरीरात फंगल इन्फेक्शन आहे म्हणून माझ्याकडे येतात.

‘‘फंगल इन्फेक्शन अलीकडे मुलांमध्येही आढळते आहे. याने त्रस्त लोकांना मी हाच सल्ला देते की  आपले कपडे रोज आणि वेगळे धुवा, त्यांना इस्त्री करा.

आजारी पाडू शकते टॅटूची क्रेज

– मोनिका गुप्ता

पूर्वी टॅटू गोंदवून घेणे जेवढे महागडे आणि वेदनादायक होते तेवढेच आज आता ते वेदनारहित झाले आहे. तसेही सध्या लोक कूल आणि आधुनिक दिसावे यासाठी असह्य वेदना सहन करतात.

टॅटू काढणे तर जणूकाही अलीकडे रिवाजच झाला आहे. टॅटूचा हा वेडेपणा असा आहे की जोडपी आपले प्रेम व्यक्त करायला त्वचेवर एकमेकांची नावं लिहून घेतात. काही जण आपले व्यक्तिमत्व टॅटूद्वारे व्यक्त करण्यास प्राधान्य देतात तर काही जण आपल्या शरीरावर.

आजकाल तर आईवडिलांवरील प्रेमसुद्धा टॅटू काढून व्यक्त केले जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हे टॅटू न जाणे किती जणांच्या प्रेमाचे प्रतीक आहे, पण तुमच्यासाठी ते हानिकारक असू शकते. जे टॅटू आज तुमचे स्टाईल स्टेटमेंट आहे आणि जे आज लोकांच्या शरीरावर दिसू लागले आहेत, त्याच टॅटूमुळे त्वचेसंबंधी समस्या उदभवू लागल्या आहेत.

त्वचा समस्या

टॅटूचे सध्या इतके चलन आहे की जवळपास प्रत्येकाच्या शरीराच्या भागावर हा गोंदवलेला दिसतो. पण टॅटूमुळे आपल्या त्वचेवर लालसरपणा, पू, सूज यासारखे अनेक त्रास सुरु होऊ शकतात.

याशिवाय अनेक प्रकारच्या त्वचेच्या इन्फेक्शनचा धोका संभवतो. कायमस्वरूपी  त्वचेच्या टॅटूच्या वेदनेपासून दूर राहण्यासाठी अनेक लोक नकली टॅटूचा आधार घेतात. पण असे करू नका. यामुळे तुम्हाला आणखीनच समस्यांना तोंड द्यावे लागेल.

कँसर होण्याची भीती

टॅटू बनवताना आपण अनेकदा असा विचार करतो की आपण खूपच कूल दिसत आहोत. टॅटूमुळे सोरायसिस नामक आजार जडण्याची भीती निर्माण होते. अनेकदा आपण दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यावर वापरलेली सुई आपल्या शरीरावर वापरण्यात येते. त्यामुळे त्वचेसंबंधित रोग, एचआयव्ही व हेपिटायटस यासारख्या आजाराच्या संभावना वाढतात. टॅटू काढल्याने कॅन्सरची शक्यतासुद्धा वाढू शकते.

शाई त्वचेसाठी हानिकारक

टॅटू बनवण्यासाठी आपल्या शरीरावर वेगवेगळया प्रकारच्या शाईचा वापर केला जातो, जो आपल्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक असतो. टॅटू बनवण्यासाठी निळया रंगाची शाई वापरली जाते, ज्यात अल्युमिनियमसारखे अनेक धातू मिसळलेले असतात, जे त्वचेसाठी हानिकारक असतात. हे त्वचेच्या आत शोषले जातात.

स्नायूंचे नुकसान

आपण आपल्या त्वचेवर मोठया उत्साहाने टॅटू काढून घेतो, पण त्यापासून होणाऱ्या नुकसानापासून अजाण असतो. टॅटूचे डिझाइन्स असे असतात ज्यात शरीराच्या खोलवर सुया रुतवल्या जातात, ज्यामुळे स्नायूंमध्ये शाई जाते. यामुळे स्नायूंना इजा पोहोचते. त्वचा तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की शरीराच्या ज्या भागावर तीळ असेल तिथे टॅटू बनवू नये.

टॅटू काढल्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर त्वरित डॉक्टरकडे जावे. याकडे दुर्लक्ष करणे फार महागात पडू शकते. याशिवाय हेसुद्धा जाणून घ्या की टॅटू काढल्यावर एक वर्ष रक्तदान करू शकत नाही.

टॅटू काढताना

*टॅटू काढायला एखाद्या चांगल्या व्यावसायिक टॅटू काढणाऱ्याकडे जा.

* टॅटू काढताना आधी हेपिटायटिस बी ची लस अवश्य घ्या.

* टॅटू काढताना आपल्या त्वचेवर इंकची टेस्ट अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला शाईची अॅलर्जी आहे वा नाही हे कळेल.

* टॅटू काढताना सुई नवी आहे वा नाही याकडे लक्ष ठेवा.

* टॅटू काढल्यानंतर २ आठवडे त्या जागेला पाणी लागू देऊ नका.

* ज्या जागी टॅटू काढला असेल त्या जागेवर नियमित अँटीबायोटिक क्रीम अवश्य लावा.

काय आहे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिजीज

* डॉ. सागरिका अग्रवाल, आयवीएफ, इंदिरा हॉस्पिटल, नवी दिल्ली

पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच पीआयडी हे गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयात होणारे इन्फेक्शन आहे. अनेकदा हे इन्फेक्शन पेल्विक पेरिटोनियम पर्यंतही पोहोचते. पीआयडीचा योग्य इलाज करणे जरुरी असते, कारण यामुळे महिलांमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी किंवा गर्भाशयाच्या बाहेर प्रेग्नन्सी अथवा पेल्विकमध्ये सतत दुखणे अशा तक्रारी असू शकतात. साधारणत: हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असते, ज्याची लक्षणे म्हणजे ओटीपोटात दुखणे, ताप, व्हजायनल डिस्चार्ज, अति रक्तस्त्राव, लैंगिक संबंध किंवा युरीनेशनच्या वेळेस दुखणे ही आहेत.

पीआयडीची प्राथमिक कारणे काय आहेत

जेव्हा बॅक्टेरिया योनीमार्ग किंवा गर्भाशयाच्या ग्रीव्हेद्वारा महिलांच्या प्रजनन अवयवांपर्यंत पोहोचतात, तेव्हा ते पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजचे कारण असते. पीआयडी इन्फेक्शनसाठी अनेक प्रकारचे बॅक्टेरिया(जीवाणू) जबाबदार असतात. बहुतांशवेळा हे इन्फेक्शन यौन संबंधांच्या वेळेस निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होते. याची सुरुवात क्लॅमायडियाची आणि प्रमेह रूपात असते. एकाहून अधिक सेक्शुअल पार्टनर असल्यास पीआयडीचा धोका वाढतो. अनेकवेळा क्षयरोगही यास कारणीभूत ठरतो. २० ते ४० वर्षांच्या महिलांना हा आजार होण्याची सर्वाधिक शक्यता असते.

असा त्रास होतो

पीआयडीमुळे अनेकदा प्रजनन अवयव कायमस्वरूपी क्षतीग्रस्त होतात आणि फॅलोपियन ट्यूब्सना जखम होऊ शकतात. यामुळे अंडे गर्भाशयापर्यंत पोहचण्यात अडथळे येतात. अशा स्थितीत स्पर्म अंडयापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा अंडे फर्टिलाइज होऊ शकत नाही, ज्यामुळे भ्रुणाचा विकास गर्भाशयाच्या बाहेरच होऊ लागतो. क्षतिग्रस्त असल्याने आणि पुन्हापुन्हा ही समस्या असल्यास इन्फर्टिलिटीचा धोका वाढतो आणि जेव्हा पीआयडीची समस्या टीबीमुळे उद्भवते, तेव्हा रुग्णाला एन्डोमेट्रिअल ट्यूबरक्लॉसिस असण्याची शक्यता असते.

निदान आणि उपचार

पीआयडीला थांबवणे शक्य आहे. पीआयडीची भलेही कमी लक्षणे आढळून येत असली आणि याचे निदान करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तपासणी अस्तित्वात नाही. रुग्णाकडे विचारपूस करून आणि लक्षणांच्या आधारे डॉक्टर याचे निदान करतात. डॉक्टरांना हे माहीत करून घेण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते की कोणत्या प्रकारच्या बॅक्टेरियामुळे पीआयडीची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी क्लॅमायडियाची तपासणी केली जाते. फॅलोपियन ट्यूबमध्येच इन्फेक्शन समजण्यासाठी अल्ट्रासाउंड करता येते. पीआयडीचा इलाज अँटिबायोटिक्सद्वारे केला जातो. रुग्णाने औषधाचा कोर्स पूर्ण करणे जरुरी असते.

पीआयडी नंतर प्रेग्नन्सी

ज्या महिलांमध्ये पीआयडी नंतर प्रजनन अवयव क्षतिग्रस्त झाले आहेत, त्यांनी फर्टिलिटी विशेषज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते, जेणेकरून आरोग्यदायी गर्भावस्था प्राप्त होईल. पेल्विक इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या बाहेर प्रेग्नन्सी होण्याचा धोका ६ ते ७ पटीने वाढतो. हा धोका दूर करण्याकरता आणि फॅलोपियन ट्यूब्समध्ये समस्या असताना आयवीएफ थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो, कारण आयवीएफद्वारा ट्यूब्सना पूर्णपणे पार केले जाऊ शकते.

फॅलोपियन ट्यूब्समध्ये कुठल्याही प्रकारचा अवरोध असल्यास रिप्रॉडक्टिव्ह टेक्नोलॉजी ट्रीटमेंटचा सल्ला दिला जातो.

उपाय जे तणावाला म्हणतील बाय

* पूनम पाठक

फिल्म ‘सुपर थर्टी’मध्ये रितिक रोशनद्वारे केल्या गेलेल्या जबरदस्त अभिनयाने त्यांना यशाच्या शिखरावर आणून उभे केले. त्यांचा पुढला चित्रपट ‘वॉर’नेदेखील बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली, पण खूप कमी लोक हे जाणत असतील की गेल्या काही काळापासून ते पुष्कळ मानसिक तणावाच्या काळातून जात आहेत. प्रथम कंगना सोबतच्या त्यांच्या वादाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला चर्चेत आणले होते. नंतर पत्नी सुजान सोबतच्या घटस्फोटाने त्यांच्या वैवाहिक जीवनात गोंधळ माजवला. यानंतर बहिणीचे डिप्रेशन आणि वडिलांच्या गंभीर आजारानेदेखील त्यांना पुष्कळ तणावात ठेवले. स्वत: त्यांना अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘बैंगबैंग’च्या सेटवर एक्सीडेंटमुळे सर्जरीतून जावे लागले.

रितिकच्या मते छोटया-मोठया मानसिक तणावांच्या दरम्यान जर त्यांची कुणी पुष्कळ साथ दिली असेल तर तो त्यांचा जिम ट्रेनर क्रिस गर्थिन आहे, ज्याने ना केवळ त्यांना स्ट्रेसमधून बाहेर आणले, तर त्यांना फिजिकली फिट होण्यातदेखील त्यांची मदत केली. स्ट्रेस दूर पळवण्यासाठी रितीक एक्सरसाइजलाच सर्वात उत्तम मार्ग मानतात. कित्येक अन्य स्टारदेखील वेगवेगळया प्रकारांनी आपल्या स्ट्रेस किंवा दडपणापासून रिलॅक्स होतात, जसे शिल्पा शेट्टी आपला स्ट्रेस दूर करण्यासाठी कुकिंग करणे पसंत करतात, तर बिपाशा बासू आपल्या फेवरेट संगीतासोबत मसाज घेणे. वरून धवन आपले टेन्शन संपवण्यासाठी परिवारासोबत सुट्टया घालवणे पसंत करतात, तर शाहिद कपूरचा स्ट्रेस बस्टर आहे लाँग ड्राईव्ह.

काय आहे तणाव

मुळात काय आहे हा मानसिक दबाव किंवा तणाव आणि सोबतच जाणून घ्या याची कारणे आणि उपाय :

तज्ज्ञांच्या मते तणाव व्यक्तीच्या मन आणि मेंदूची निर्माण होणारी ती अवस्था आहे ज्यात तो जीवनाच्या प्रत्येक बाजूवर नकारात्मक पद्धतीने विचार करणे सुरू करतो. मानसिक दबावाची ही स्थिती जर दीर्घकाळापर्यंत अशीच राहिली तर व्यक्तीचे मन कोणत्या कामात लागत नाही. तो छोटया छोटया गोष्टींवर आक्रमक होऊन उठतो. कधीकधी ही समस्या वाढत जाऊन आत्महत्येच्या स्थितीपर्यंतदेखील पोहोचते. जीवनात तणाव वेगवेगळया कारणांमुळे होऊ शकतो, उदाहरणार्थ वैवाहिक, प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये कटुता येणे, करियरमध्ये योग्य ग्रोथ न करू शकणे, कार्यभार आणि जबाबदाऱ्यांचे अधिक्य, आर्थिक अडचणी इत्यादी. परंतु जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. जर समस्या आहे तर कुठे ना कुठे त्याचे उपायदेखील असतील. आपली इच्छा असेल तर या तणावातून मुक्तीचा उपायदेखील आपण शोधू शकतो.

जर तुम्ही देखील चिंता आणि तणावासारख्या स्थितीशी झगडत असाल, तर काही सोपे उपाय वापरून यातून बाहेर निघू शकता.

सकारात्मक विचार : हे तर नक्की आहे की नैसर्गिकरीत्याच कुणीही जीवनाच्या संघर्षापासून वाचलेला नाहीए. कधी यश आपली झोळी आनंदाने भरून देते, तर कधी अपयशातून आलेले नैराश्य आपल्यावर खोलपर्यंत आघात करते. सांगण्याचा अर्थ हा की जेव्हा परिस्थिती सदैव एकसारखी राहत नाही, तेव्हा जीवनात एकसारखेपणा कसा राहू शकतो. त्यामुळे कधीही जीवनात येणाऱ्या अडचणीपासून घाबरून पळू नका. उलट त्यांचा धीराने सामना करण्याची युक्ती शोधा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये समोर येत असलेल्या अडचणींशी दोन हात करण्याचा धीर ठेवा. मोठयात मोठा तणावदेखील गायब होऊन जाईल. फक्त तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा.

तुलना करू नका : सर्वांचे आपापले जीवन सर्वांच्या आपापल्या प्रवासावर आधारित आहे हे ज्ञान. आपले जीवन वेगळे आहे तर स्वाभाविक आहे की अडचणीदेखील वेगळया असणार. इतरांशी तुलना करून स्वत:ला विनाकरण तणावात टाकू नका. इतरांच्या सुखामुळे दु:खी होऊ नका, ना कुणाच्या दु:खामध्ये आपल्या आपला आनंद शोधा. अनावश्यक स्वरूपातील कोणा इतरांशी केले गेलेली तुलना आपला मानसिक ताण आणखीच वाढवते.

अडचण नाही, उपायांवर फोकस करा : जास्त नाही तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की समस्येविषयी सदैव विचार करत राहू नका आणि त्याच्या भीतीलादेखील स्वत:वर हावी होऊ देऊ नका. त्याच्या उपायांच्या सर्व पर्यायांवर विषयी शांतपणे विचार करा आणि ते अंमलात आणा. विश्वास ठेवा तुम्ही असे करण्याने समस्या कधी दूर झाली तुम्हाला कळणारदेखील नाही.

व्यस्ततेत मस्त राहा : तणावापासून दूर राहण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे व्यस्त राहणे. मोठयातली मोठी समस्या असली, तरी मस्त राहून जीवन आधीसारखे जगत रहा आणि छोटया छोटया क्षणांमधील आनंद वेचत चला. सदैव पाहिले गेले आहे की एखादा मोठा आनंद मिळवण्यासाठी किंवा लक्ष्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आपण जीवनातील छोटया छोटया गोष्टी आणि आनंद दुर्लक्षित करत जातो.

परिणामी आपण त्या आनंददायी क्षणांना तर हरवून टाकतोच, त्या आनंदामुळे मिळणाऱ्या आपल्या ऊर्जा अर्थात एनर्जीलादेखील हरवतो, जी कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे व्यस्त आणि मस्त राहून तणाव रुपी राक्षसालाच मात द्या.

जिम किंवा एक्सरसाइज : एक्सरसाइजद्वारेदेखील तुम्ही तुमच्या आतील पूर्ण तणाव, चिडचिडेपणा आणि राग दूर करू शकता. नियमित वर्क आऊटमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढण्याससोबतच आपली शारीरिक आणि मानसिक थकावटदेखील दूर होते आणि स्वाभाविकच आपण स्वत:ला अधिक ऊर्जावान आणि स्फूर्तीदायक बनलेले जाणवतो. व्यायाम स्नायूंना गतिशीलता प्रदान करतो आणि वर्कआऊटमुळे मानसिक आणि शारीरिक स्तरावर आपण फिट राहतो.

आपले छंद किंवा आवडी जगणे : तुम्ही तुमचे छंद किंवा आवडीदेखील तणाव मुक्त होण्याचा उपाय म्हणून वापरू शकता, जसे आपल्या आवडीचे संगीत ऐकणे, लाँग ड्राईव्हवर जाणे, डान्स करणे, कुकींग करणे किंवा अन्य एखाद्या आवडत्या क्रिएटिविटीमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवणे, जेणेकरून जीवनातील अडचणी आणि समस्यापासून काही वेळ दूर राहिले जाईल आणि शांत चित्त होऊन त्यांचा उपाय शोधला जाईल.

हे छोटे-छोटे उपायदेखील स्ट्रेस बस्टरचे काम करू शकतात :

* सदाबहार आणि आनंदी लोकांची सोबत तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. त्यामुळे त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवा आपली चिंता आणि तणाव त्या कौटुंबिक मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, ज्यांना तुमची काळजी आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होऊ शकतात.

* पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या, जेणेकरून शारीरिक स्तरावर फिट राहू शकाल. म्हणजे तणावाच्या स्थितीत जंक फूड किंवा अत्यधिक मसालेदार जेवणापासून अंतर ठेवायला हवे.

* यावेळी पुष्कळ झोपेची आवश्यकता असते. हो, गरजेपेक्षा जास्त विचार करू नका. अन्यथा डोक्यामध्ये जडपणा आणि आळसाची समस्या निर्माण होऊ शकते.

* शारीरिक क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याचा प्रयत्नदेखील करू नका, कारण अशा स्थितीत मानसिक तणावा सोबतच फिजिकल प्रॉब्लेमशीदेखील लढावे लागू शकते.

* तणावातून मुक्त होऊ शकत नसाल तर डॉक्टरांशी संपर्क करा, कारण अधिक काळ तणावाची स्थिती गंभीर परिणाम देऊ शकते.

समर-स्पेशल : हे खा आणि शरीराची झिज वाचवा

* सोनिया नारंग

गरमीच्या दिवसांत शरीरातून भरपूर विषद्रव्य (डिटॉक्स) बाहेर पडत असतात. यामुळे उन्हाळा डिटॉक्स होण्यासाठी उपयुक्त मानला जातो; कारण या दिवसांत ताजी फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

लिव्हर आपलं अॅण्टिऑक्सिडंट स्वत:च तयार करत असते. पण निरोगी राहाण्यासाठी त्याला खाद्यपदार्थांतील स्त्रोतांद्वारे अॅण्टिऑक्सिडंट मिळवावं लागतात. म्हणूनच असे पदार्थ खा ज्यामुळे लिव्हर आणि पचनसंस्थेला स्वस्थ राहाण्यात मदत होईल. अॅण्टिऑक्सिडंटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरातील विषद्रव्यांशी लढण्यास मदत मिळते. डिटॉक्ससाठी खालील टिप्स शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतील.

* उन्हाळ्यात डिटॉक्स करण्यासाठी कलिंगड हा उत्तम पर्याय आहे. याच्या सेवनाने शरीरात भरपूर प्रमाणात क्षार निर्माण होतात आणि यात भरपूर प्रमाणात सायट्रोलाइन असतं. यामुळे आर्जिनिन बनण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील अमोनिया तसेच इतर हानिकारक तत्त्व शरीराबाहेर पडतात. सोबतच कलिंगडात भरपूर पोटॅशियम असतं, जे आपल्या शरीरातील सोडिअमचं प्रमाण संतुलित ठेवतं आणि आपल्या किडनीला मदत होते.

* शरीरातील हानिकारक तत्व बाहेर फेकण्यासाठी काकडी फारच फायदेशीर आहे. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मूत्रविकार होत नाहीत.

* लिंबू लिव्हरसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. हे यूरिक अॅसिड आणि इतर रसायने एकत्र करतो. शरीरात क्षारांचे प्रमाण संतुलित राखतं. त्यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहाते.

* पुदिन्याची पाने उन्हाळ्यात थंडावा देतात. अन्न पचवण्यासाठी याचा उपयोग होतो. लिव्हर, पित्ताशय व छोटी आतडी यामध्ये पित्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.

* अमिनो अॅसिड प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये उपलब्ध होते. ते शरीरातील हानिकारक घटक बाहेर फेकण्यासाठी फारच उपुयक्त आहे.

* भाज्या वाफेवर शिजवणं किंवा थोड्याशा परतणं हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे भाज्यांमधील पोषक द्रव्यं टिकून राहातात.

* शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्यासाठी काही व्यायाम करणे आवश्यक आहे. डिटॉक्स करताना आम्लीय पदार्थ आणि कॅफिन यांचं सेवन करू नका.

* दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून घ्या. कारण त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता होण्यापासून बचाव होतो.

* पॉलिफेनॉल्सयुक्त ग्रीन टीचा भरपूर वापर करावा. कारण ते सर्वात शक्तिशाली अॅण्टिऑक्सिडंट आहे.

* ठराविक प्रमाणात पण नेहमी दूध घ्यावं. दूध अतिशय पौष्टिक असतं. त्यामुळे हाडं मजबूत होतात. तसंच शरीरातील विषद्रव्यं बाहेर फेकली जात असताना दुधामुळे शरीर मजबूत होते.

* कॅफीनचं सेवन करू नये. कारण शरीराला इतर पोषक द्रव्यं शोषून घेण्यात अडचण निर्माण होते. तसेच दारूचंही सेवन करू नये. ही रक्तात सहज मिसळली जाते. तसेच शरीरातील प्रत्येक अवयवास नुकसान करते.

* भरपूर पाणी प्या. पुरुषांनी दिवसातून साधारण ३ लीटर पाणी प्यावं तर स्त्रियांनी साधारण २.२ लीटर पाणी प्यावे. पाणी संपूर्ण शरीरातून विषद्रव्यं बाहेर फेकण्यात मदत करतं आणि पोषक द्रव्यं शोषून घेण्यास मदत करतं.

* आहारात तंतूमय पदार्थ अवश्य असावेत. तंतूमय पदार्थांमुळे कार्डिओव्हेस्क्युलर आजार, मधुमेह, कॅन्सर आणि लठ्ठपणा याचा धोका कमी होतो.

* योग्य विटॅमिन्स घ्या. शरीर स्वत: विटॅमिन्स तयार करू शकत नाही. त्यामुळे आपला आहार हा विटॅमिन्सनी पुरेपूर असायला हवा.

* झोप हीदेखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरातील पेशी आणि नसांमध्ये साठलेला ऑक्सिजन फिरण्यास मदत होते.

ऑक्सिजन संपूर्ण शरीरासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे, जो शरीर व्यवस्थित चालण्यास मदत करतो तसेच त्वचा कोमल आणि डोळे चमकदार बनवतो.

स्त्रियांमध्ये हृदयरोगाचा धोका

* डॉ. नीती चड्ढा

हदयरोगाचा धोका स्त्री आणि पुरुषांमध्ये एकसारखाच असतो. मात्र स्त्री आणि पुरुषांमध्ये कार्डिओलॉजी वेगळ्या प्रकारे काम करतं. पुरुष आणि स्त्रियांमध्ये कार्डिओवॅस्क्युलर आजारांच्या बरोबरीच्या धोकादायक कारकांव्यतिरिक्त (मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तर आणि धूम्रपान) आणखीनही असे कारक आहेत, जे स्त्रियांमध्ये कार्डिओवॅस्क्युलर आजाराचा धोका वाढवतात.

अशात स्त्रियांना हे जाणून घेणंही तितकंच गरजेचं आहे की कोणकोणत्या कारणामुळे हृदयरोग होण्याचा धोका संभवतो.

रजोनिवृत्ती आणि एस्ट्रोजनची कमी

स्त्रियांच्या शरीरात बनणारं हार्मोन एस्ट्रोजन हृदयरोगापासून नैसर्गिक संरक्षण प्रदान करतं. वाढत्या वयाबरोबर नैसर्गिक एस्ट्रोजनच्या अभावामुळे त्यांच्यामध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. जर गर्भाशय किंवा अंडाशय काढण्याची सर्जरी रजोनिवृत्तीचं कारण असेल तर धोका आणखीन वाढतो.

गर्भनिरोधक गोळ्या

काही औषधी गोळ्या हृदयरोगाचा धोका निर्माण करू शकतात. विशेष करून त्या स्त्रियांमध्ये ज्या धूम्रपान करतात किंवा ज्यांना उच्च रक्तदाब असतो.

तणाव, लठ्ठपणा आणि थकवा ही काही धोक्याची कारणं आहेत जी तुलनात्मकरीत्या स्त्रियांना जास्त प्रभावित करतात.

डायबिटीज झालेल्या स्त्रियांचा कार्डिओवॅस्क्युलर आजारामुळे मृत्युचा धोका, डायबिटीज झालेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त असतो. गरोदरपणादरम्यान झालेला डायबिटीजदेखील स्त्रियांमध्ये धोका वाढवतो.

हृदयाचे अनेक प्रकारचे रोग स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त दिसून येतात. जसं की स्ट्रोक, हायपरटेंशन. एण्डोथेलियल डिसफंक्शन आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्योर.

आज हेल्थकेअर समाजात सर्वात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे स्त्रियांना या गोष्टीसाठी प्रेरित करायला हवंय की त्यांनी आपल्या लक्षणांवर लक्ष द्यावं आणि वेळीच रोगाच्या निदानासाठी उपचाराची निवड करावी.

कोरोना काळातील फूड हायजीन टीप्स

* पारुल भटनागर

बऱ्याचदा असे पहायला मिळते की, आपल्या चुकीच्या सवयीमुळेच आपण आजारी पडतो. खाण्यापिण्यासंदर्भातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष, दूषित जेवण जेवणे इत्यादी कारणांमुळे बॅक्टेरिया किंवा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करुन आपल्याला आजारी पाडतात. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की, दूषित खाण्यातून बॅक्टेरियांचा शरीरात शिरकाव झाल्यानंतर काहीच तासांनी त्यांची संख्या वेगाने वाढते ज्यामुळे पोटदुखी, उलटी किंवा ताप येतो. ही समस्या गंभीर झाल्यास आपल्या इम्युनिटीवर म्हणजे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. आता जेव्हा संपूर्ण जग कोविड -१९च्या समस्येशी लढा देत आहे तेव्हा या समस्येकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी तुम्ही घरी जेवण बनवा किंवा बाहेरुन खाण्यापिण्याच्या वस्तू आणा, प्रत्येक वेळी विशेष करुन स्वच्छतेकडे लक्ष द्यायलाच हवे, अन्यथा जरासाही बेजबाबदारपणा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’नुसार, जगभरात दरवर्षी दूषित अन्न खाल्ल्यामुळे १० पैकी १ व्यक्ती आजारी पडते आणि दरवर्षी ४ लाख २० हजार लोकांचा मृत्यू होतो.

अशावेळी हे माहिती करुन घेणे खूपच गरजेचे आहे की, फूड हायजीन म्हणजे अन्नपदार्थांच्या सुरक्षेकडे लक्ष देऊन आपण स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे कसे लक्ष देऊ शकतो :

फळे आणि भाजीपाला स्टेरिलाईज कसा करावा?

फळे आणि भाज्या वापरापूर्वी चांगल्या प्रकारे धुतल्या न गेल्यास तुम्ही आजारी पडू शकता. आता तर कोरोना काळात त्यांना घरात आणताच लगेच धुवून त्यानंतर स्टोअर करणे गरजेचे आहे, जेणेकरुन संक्रमित व्यक्तीकडून फळे, भाजीपाल्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या विषाणूच्या संपर्कात येण्यापासून तुम्ही वाचू शकाल. सोबतच फळे, भाजीपाल्यात ज्या कीटकनाशकांचा वापर केला जातो त्याचा प्रभावही या गोष्टी धुतल्यामुळे दूर करता येईल.

कसे कराल स्वच्छ?

* प्रत्येक भाजी स्वच्छ पाण्याखाली धरुन चांगल्या प्रकारे चोळून साफ करा. यामुळे त्यावरील किटाणू निघून जातील. फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननुसार, फळे, भाजीपाला धुण्यासाठी एखाद्या चांगला डिटर्जंट किंवा साबण वापरण्याची गरज नाही, कारण त्यात केमिकल्स असतात. त्यामुळे तुमच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडून आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याउलट केवळ स्वच्छ पाण्याने फळे आणि भाज्या धुतल्यास बॅक्टेरिया मरतात. पण हो, या गोष्टीकडे लक्ष द्या की भाजीपाला धुण्याआधी आणि नंतर स्वत:चे हात स्वच्छ धुवा.

* फळे आणि भाज्या स्वच्छ धुण्यासाठी व्हिनेगर, बेकिंग पावडर खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही कोमट पाण्यात हे दोन्हीही समान प्रमाणात घेऊन त्यात फळे, भाज्या २० मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून सुकवा व स्टोअर करा.

* हळद, व्हिनेगर आणि मीठ घातलेल्या कोमट पाण्यानेही तुम्ही फळे, भाज्या धुवू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या कमीत कमी २० मिनिटे या पाण्यात ठेवाव्या लागतील. त्यानंतर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून सुकल्यानंतर स्टोअर करा. लक्षात ठेवा, चांगल्या परिणामासाठी तिन्ही समप्रमाणात घेऊन त्यात लिंबाच्या रसाचेही काही थेंब टाका.

किराणा सामान स्वच्छ करणे गरजेचे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ग्रोसरी म्हणजे किराणा सामानामुळे विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका खूपच कमी असतो. तरीही या महामारीच्या काळात जेवढी खबरदारी घेता येईल तेवढी कमीच आहे. अशावेळी आपण स्वत:ला बाहेर जाण्यापासून तर रोखू शकतो पण, खाण्यापिण्यासाठी किराणा सामान घ्यावेच लागते. त्यामुळे एकतर तुम्ही ते स्वत: घेऊन या किंवा ऑनलाइन मागवा. सामान आल्याबरोबर तसेच्या तसे स्टोअर करण्याची सवय बदला. उलट ग्रोसरी आणल्यानंतर ती थोडावेळ एकाच ठिकाणी ठेवा. वाइप्स अल्कहोलयुक्त सॅनिटायजरने साफ करा. यामुळे त्यावरील बॅक्टेरिया नष्ट होण्यासोबतच विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यताही जवळजवळ संपुष्टात येईल.

पॅकिंग केलेले सामान मागवण्याचाच प्रयत्न करा, कारण मोकळे सामान जास्त लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते. याउलट पॅकिंग सामानाबाबत अशा प्रकारची शक्यता फारच कमी असते.

जेव्हा बाहेर जेवणाची ऑर्डर द्याल

अनेकदा घरचे जेवण जेवल्याने कंटाळा येतो आणि मग बाहेरचे खाणे मागवले जाते. अशावेळी ते लगेच खाऊ नका. असे सांगितले जाते की, प्लॅस्टिकवर कोरोना विषाणू ७२ तासांपर्यंत जिवंत राहू शकतो, पण आतापर्यंत असे काहीच सिद्ध झालेले नाही की जेवण, खाण्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरतो. तरीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच जेव्हा तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर कराल तेव्हा कॉण्टॅक्टलेस म्हणजे संपर्कविरहित डिलिव्हरी आणि ऑनलाइन पेमेंटचाच पर्याय निवडा. ऑर्डर आल्यानंतर ते जेवण आपल्या भांडयांमध्ये काढून गरम करायला विसरू नका. जेवणाची ऑर्डर घेताना आणि ती पाकिटे उघडल्यानंतर हात स्वछ धुवा. स्वयंपकाघरात जेथे जेवण ठेवाल ती जागाही चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेडने स्वच्छ करा. अशा प्रकारे खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देऊन स्वत:ला सुरक्षित ठेवता येईल.

दुधाची पिशवी कशी स्वच्छ कराल?

दूध हे अत्यावश्यक फूड आयटमपैकी एक समजले जाते. त्याच्याशिवाय बहुतांश घरातील दिवसाची सुरुवात होत नाही. पण आता प्रश्न असा आहे की, कोरोना काळात इतक्या अत्यावश्यक दुधाचा काळजीपूर्वक वापर कसा करावा, जेणेकरुन सुरक्षेसोबतच शरीराला पोषक तत्त्वेही मिळू शकतील.

‘फूड सेफ्ट अॅण्ड स्टॅण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया’ने दूधाची सुरक्षा आणि हायजीनसंदर्भात काही टीप्स शेअर केल्या आहेत. त्यानुसार, जेव्हा तुम्ही दुधाची पिशवी घ्याल तेव्हा सर्वात आधी ती पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर ती सुकू द्या किंवा टिश्यू पेपरच्या मदतीने कोरडी करा, जेणेकरुन त्याचे पाणी भांडयात पडणार नाही.

कीटकांना घरात आश्रय देऊ नका

घरात कीटक राहू नयेत यासाठी पेस्ट कंट्रोल करणे खूपच गरजेचे आहे, कारण फूड हायजीनसाठी हे आवश्यक समजले जाते. कीटक जास्त करुन फ्रिजच्या कोपऱ्यात, स्वयंपकाघर, तेथील कपाट इत्यादी ठिकाणी लपून राहतात. कधी ते स्वयंपाकघरात फिरताना दिसतात तर कधी भांडयात जाऊन बसतात. त्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनही होऊ शकते. तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती कमजोर होते. प्रत्यक्षात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी इम्युनिटी वाढवणे खूपच गरजेचे आहे. म्हणूनच वरचेवर अशा सर्व जागा स्वच्छ करा.

स्वच्छ पाण्याचाच वापर करा

फूड हायजीनसाठी जेवण बनवण्यापूर्वी स्वच्छ पाण्याचा वापर करणे खूपच गरजेचे आहे, कारण दूषित पाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. यामुळे उलटी, डायरिया आणि पोटासंबंधी समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेव्हा जेवण बनवाल त्याआधी भाजीपाला, डाळी स्वच्छ पाण्यात धुवायला विसरू नका.

स्वयंपाकगृह ठेवा स्वच्छ

खाण्याच्या हायजीनकडे लक्ष देण्यासोबतच स्वयंपाकघराच्या स्वच्छतेकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे,  कारण कुटुंबाचे आरोग्य त्यावरच अवलंबून असते. त्यामुळेच हे गरजेचे आहे की, दररोज त्या सर्व गोष्टी स्वच्छ करा जिथे बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. जसे की, प्लेट, ग्लास, वाटी इत्यादी वापरल्यानंतर हे सर्व लगेच धुवून ठेवा. वापरात नसले तरी वरचेवर धुवा. सोबतच प्रत्येक वेळी वापरल्यानंतर विळी, चाकू डिसइन्फेक्टेटने व्यवस्थित धुवा. स्पंज आणि स्वयंपाक घरातील कपडयांना रोज रात्री गरम पाण्यात डिसइन्फेक्टेट घालून १५ मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे ते स्वच्छ होण्यासोबतच त्यातील किटाणूही नष्ट होतात. अशाच प्रकारे संपूर्ण स्वयंपाकघरही चांगल्या कपडयाने नेहमी स्वच्छ करा, कारण स्वयंपाकाची प्रत्येक गोष्ट स्वयंपाकघरातच असते आणि त्याला सतत हात लागल्यामुळे त्यावरील किटाणू खाद्यपदार्थात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात. सिंक गरम पाणी आणि साबणाने रोज स्वच्छ करा. आठवडयातून एकदा स्वयंपाकघरातील प्रत्येक कोपरा, भांडी ठेवायचे कपाट, स्टोव्ह इत्यादी वस्तू चांगल्या प्रकारे डिसइन्फेक्टेड किंवा गरम पाण्यात साबणासह लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून व्यवस्थित स्वच्छ करा. यामुळे स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर दिसू लागेल आणि न दिसणारे बॅक्टेरिया मरुन जातील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें