* सोनिया नारंग

गरमीच्या दिवसांत शरीरातून भरपूर विषद्रव्य (डिटॉक्स) बाहेर पडत असतात. यामुळे उन्हाळा डिटॉक्स होण्यासाठी उपयुक्त मानला जातो; कारण या दिवसांत ताजी फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.

लिव्हर आपलं अॅण्टिऑक्सिडंट स्वत:च तयार करत असते. पण निरोगी राहाण्यासाठी त्याला खाद्यपदार्थांतील स्त्रोतांद्वारे अॅण्टिऑक्सिडंट मिळवावं लागतात. म्हणूनच असे पदार्थ खा ज्यामुळे लिव्हर आणि पचनसंस्थेला स्वस्थ राहाण्यात मदत होईल. अॅण्टिऑक्सिडंटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरातील विषद्रव्यांशी लढण्यास मदत मिळते. डिटॉक्ससाठी खालील टिप्स शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करतील.

* उन्हाळ्यात डिटॉक्स करण्यासाठी कलिंगड हा उत्तम पर्याय आहे. याच्या सेवनाने शरीरात भरपूर प्रमाणात क्षार निर्माण होतात आणि यात भरपूर प्रमाणात सायट्रोलाइन असतं. यामुळे आर्जिनिन बनण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील अमोनिया तसेच इतर हानिकारक तत्त्व शरीराबाहेर पडतात. सोबतच कलिंगडात भरपूर पोटॅशियम असतं, जे आपल्या शरीरातील सोडिअमचं प्रमाण संतुलित ठेवतं आणि आपल्या किडनीला मदत होते.

* शरीरातील हानिकारक तत्व बाहेर फेकण्यासाठी काकडी फारच फायदेशीर आहे. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मूत्रविकार होत नाहीत.

* लिंबू लिव्हरसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. हे यूरिक अॅसिड आणि इतर रसायने एकत्र करतो. शरीरात क्षारांचे प्रमाण संतुलित राखतं. त्यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहाते.

* पुदिन्याची पाने उन्हाळ्यात थंडावा देतात. अन्न पचवण्यासाठी याचा उपयोग होतो. लिव्हर, पित्ताशय व छोटी आतडी यामध्ये पित्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. तसेच शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते.

* अमिनो अॅसिड प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये उपलब्ध होते. ते शरीरातील हानिकारक घटक बाहेर फेकण्यासाठी फारच उपुयक्त आहे.

* भाज्या वाफेवर शिजवणं किंवा थोड्याशा परतणं हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे भाज्यांमधील पोषक द्रव्यं टिकून राहातात.

* शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्यासाठी काही व्यायाम करणे आवश्यक आहे. डिटॉक्स करताना आम्लीय पदार्थ आणि कॅफिन यांचं सेवन करू नका.

* दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून घ्या. कारण त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता होण्यापासून बचाव होतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...