* पूनम पाठक
फिल्म ‘सुपर थर्टी’मध्ये रितिक रोशनद्वारे केल्या गेलेल्या जबरदस्त अभिनयाने त्यांना यशाच्या शिखरावर आणून उभे केले. त्यांचा पुढला चित्रपट ‘वॉर’नेदेखील बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली, पण खूप कमी लोक हे जाणत असतील की गेल्या काही काळापासून ते पुष्कळ मानसिक तणावाच्या काळातून जात आहेत. प्रथम कंगना सोबतच्या त्यांच्या वादाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनाला चर्चेत आणले होते. नंतर पत्नी सुजान सोबतच्या घटस्फोटाने त्यांच्या वैवाहिक जीवनात गोंधळ माजवला. यानंतर बहिणीचे डिप्रेशन आणि वडिलांच्या गंभीर आजारानेदेखील त्यांना पुष्कळ तणावात ठेवले. स्वत: त्यांना अॅक्शन थ्रिलर फिल्म ‘बैंगबैंग’च्या सेटवर एक्सीडेंटमुळे सर्जरीतून जावे लागले.
रितिकच्या मते छोटया-मोठया मानसिक तणावांच्या दरम्यान जर त्यांची कुणी पुष्कळ साथ दिली असेल तर तो त्यांचा जिम ट्रेनर क्रिस गर्थिन आहे, ज्याने ना केवळ त्यांना स्ट्रेसमधून बाहेर आणले, तर त्यांना फिजिकली फिट होण्यातदेखील त्यांची मदत केली. स्ट्रेस दूर पळवण्यासाठी रितीक एक्सरसाइजलाच सर्वात उत्तम मार्ग मानतात. कित्येक अन्य स्टारदेखील वेगवेगळया प्रकारांनी आपल्या स्ट्रेस किंवा दडपणापासून रिलॅक्स होतात, जसे शिल्पा शेट्टी आपला स्ट्रेस दूर करण्यासाठी कुकिंग करणे पसंत करतात, तर बिपाशा बासू आपल्या फेवरेट संगीतासोबत मसाज घेणे. वरून धवन आपले टेन्शन संपवण्यासाठी परिवारासोबत सुट्टया घालवणे पसंत करतात, तर शाहिद कपूरचा स्ट्रेस बस्टर आहे लाँग ड्राईव्ह.
काय आहे तणाव
मुळात काय आहे हा मानसिक दबाव किंवा तणाव आणि सोबतच जाणून घ्या याची कारणे आणि उपाय :
तज्ज्ञांच्या मते तणाव व्यक्तीच्या मन आणि मेंदूची निर्माण होणारी ती अवस्था आहे ज्यात तो जीवनाच्या प्रत्येक बाजूवर नकारात्मक पद्धतीने विचार करणे सुरू करतो. मानसिक दबावाची ही स्थिती जर दीर्घकाळापर्यंत अशीच राहिली तर व्यक्तीचे मन कोणत्या कामात लागत नाही. तो छोटया छोटया गोष्टींवर आक्रमक होऊन उठतो. कधीकधी ही समस्या वाढत जाऊन आत्महत्येच्या स्थितीपर्यंतदेखील पोहोचते. जीवनात तणाव वेगवेगळया कारणांमुळे होऊ शकतो, उदाहरणार्थ वैवाहिक, प्रेम आणि कौटुंबिक संबंधांमध्ये कटुता येणे, करियरमध्ये योग्य ग्रोथ न करू शकणे, कार्यभार आणि जबाबदाऱ्यांचे अधिक्य, आर्थिक अडचणी इत्यादी. परंतु जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. जर समस्या आहे तर कुठे ना कुठे त्याचे उपायदेखील असतील. आपली इच्छा असेल तर या तणावातून मुक्तीचा उपायदेखील आपण शोधू शकतो.