- मोनिका गुप्ता
पूर्वी टॅटू गोंदवून घेणे जेवढे महागडे आणि वेदनादायक होते तेवढेच आज आता ते वेदनारहित झाले आहे. तसेही सध्या लोक कूल आणि आधुनिक दिसावे यासाठी असह्य वेदना सहन करतात.
टॅटू काढणे तर जणूकाही अलीकडे रिवाजच झाला आहे. टॅटूचा हा वेडेपणा असा आहे की जोडपी आपले प्रेम व्यक्त करायला त्वचेवर एकमेकांची नावं लिहून घेतात. काही जण आपले व्यक्तिमत्व टॅटूद्वारे व्यक्त करण्यास प्राधान्य देतात तर काही जण आपल्या शरीरावर.
आजकाल तर आईवडिलांवरील प्रेमसुद्धा टॅटू काढून व्यक्त केले जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की हे टॅटू न जाणे किती जणांच्या प्रेमाचे प्रतीक आहे, पण तुमच्यासाठी ते हानिकारक असू शकते. जे टॅटू आज तुमचे स्टाईल स्टेटमेंट आहे आणि जे आज लोकांच्या शरीरावर दिसू लागले आहेत, त्याच टॅटूमुळे त्वचेसंबंधी समस्या उदभवू लागल्या आहेत.
त्वचा समस्या
टॅटूचे सध्या इतके चलन आहे की जवळपास प्रत्येकाच्या शरीराच्या भागावर हा गोंदवलेला दिसतो. पण टॅटूमुळे आपल्या त्वचेवर लालसरपणा, पू, सूज यासारखे अनेक त्रास सुरु होऊ शकतात.
याशिवाय अनेक प्रकारच्या त्वचेच्या इन्फेक्शनचा धोका संभवतो. कायमस्वरूपी त्वचेच्या टॅटूच्या वेदनेपासून दूर राहण्यासाठी अनेक लोक नकली टॅटूचा आधार घेतात. पण असे करू नका. यामुळे तुम्हाला आणखीनच समस्यांना तोंड द्यावे लागेल.
कँसर होण्याची भीती
टॅटू बनवताना आपण अनेकदा असा विचार करतो की आपण खूपच कूल दिसत आहोत. टॅटूमुळे सोरायसिस नामक आजार जडण्याची भीती निर्माण होते. अनेकदा आपण दुर्लक्ष करतो आणि दुसऱ्यावर वापरलेली सुई आपल्या शरीरावर वापरण्यात येते. त्यामुळे त्वचेसंबंधित रोग, एचआयव्ही व हेपिटायटस यासारख्या आजाराच्या संभावना वाढतात. टॅटू काढल्याने कॅन्सरची शक्यतासुद्धा वाढू शकते.
शाई त्वचेसाठी हानिकारक
टॅटू बनवण्यासाठी आपल्या शरीरावर वेगवेगळया प्रकारच्या शाईचा वापर केला जातो, जो आपल्या त्वचेसाठी अतिशय धोकादायक असतो. टॅटू बनवण्यासाठी निळया रंगाची शाई वापरली जाते, ज्यात अल्युमिनियमसारखे अनेक धातू मिसळलेले असतात, जे त्वचेसाठी हानिकारक असतात. हे त्वचेच्या आत शोषले जातात.