मान्सून स्पेशल : मान्सून ब्युटी केअरच्या ९ टीप्स

* प्रतिनिधी

मान्सून काळात त्वचेत संक्रमण, चेहऱ्यावरची त्वचा फाटणे, शरीरावर चट्टे येणे, पाय अथवा नखांना बुरशी येणे इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. सादर आहे, या सर्व समस्यांपासून दूर राहण्याचे उपाय :

* त्वचेला स्वच्छ करण्यासाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि नंतर मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. केसांना गुंतण्यापासून आणि रुक्ष होण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना पौष्टीकतेचा पुरवठा करणं गरजेचे आहे.

* घराबाहेर जाण्याआधी केसांवर अँटिपोल्युशन स्प्रे वापरा. त्वचेलासुद्धा सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. म्हणून सनस्क्रीन व एलोवेरा जेल आणि सुरक्षित ठेवणाऱ्या स्किन प्रोटेक्टर्सचा आपल्या त्वचेवर सुरक्षित थर तयार करून त्वचेसंबंधी समस्यांपासूनसयाचा वापर करू शकता. हे स्किन प्रोटेक्टर्स तुमच्या त्वचेच्या रोमछिद्रांना ६-७ तास बंद ठेवतात आणि प्रदूषणामुळे होणारे नुकसान नियंत्रित करण्यात मदत करतात.

* त्वचा हायड्रेटेड आणि रिजूव्हिनेट ठेवण्याकरीता नियमितपणे एक्सफौलिएशन आणि स्क्रबिंग करणे तसेच ग्लो पॅक लावणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही घराबाहेर निघाल तेव्हा विषारी प्रदुषणाचा सामना करण्याकरिता घरी बनवलेले पॅक वापरणे चांगले असते.

* मान्सूनच्या या काळात भिजल्याने केस अस्वच्छ आणि अनहेल्दी होतात, कारण पावसाच्या पाण्यात अनेक प्रकारची रसायनं व विषारी घटक मिसळलेले असतात. अशावेळी चांगल्या शाम्पू व कंडिशनरचा वापर करावा. हे केसांना मुलायम ठेवतात आणि त्यांचा दमटपणा बाहेर जाऊ देत नाही. केसांना नियमित तेलाने मालिश करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे, कारण पावसाळी वातावरणात दमटपणाचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे केसांची मुळं बंद होतात.

* तेल लावल्यावरसुद्धा केसांचे स्टीमिंग आणि मास्किंग करायला हवे. जर तुम्हाला घरीच मास्क करायचा असेल तर सर्वात उत्तम पर्याय आहे एवोकाडोसोबत केळे आणि ऑलिव्ह ऑइल किंवा आवळा, रिठा आणि शिकेकाईसारखे साहित्य वापरायला हवे.

* मान्सून काळात सिथेंटीक व घट्ट कपडे वापरणे टाळा. सैल आणि सुती कपडे घाला अन्यथा तुम्हाला स्किन इन्फेक्शन आणि चट्टे येणे यासारख्या त्रासांचा सामना करावा लागतो. सर्वात महत्वाचे हे की आपल्या त्वचेवर सगळया किटाणुनाशक उत्पादनांचा जसे साबण, पावडर, बॉडी लोशन वगैरेंचा वापर करा, ज्यामुळे घाम आला तरीही त्वचेला सर्व प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यात मदत करतो.

* मुरूम आणि चट्टे येणे थांबवण्यासाठी चेहरा नेहमी स्वच्छ ठेवा. जास्त ऑयली मेकअप उत्पादनांचा वापर टाळा. तुमची मेकअप उत्पादनं पावडर बेस्ड असायला हवीत, जी स्किन फ्रेंडली असतात. याशिवाय चांगली गुणवत्ता असलेलीच मेकअप उत्पादनं वापरा, कारण त्वचा अति तापमान व दमटपणा यामुळे लवकर इन्फेक्शनचे भक्ष्य ठरते.

* फास्ट फूड अथवा अनहेल्दी आहार घेऊ नका, जर  तुम्ही फास्ट फूड खाऊ इच्छित असाल किंवा खाण्याशिवाय पर्याय नसेल तर तुम्ही ताजे आणि गरम भोजनाचे सेवन करणे आवश्यक आहे.

* आपले शरीर निरोगी राहावे यासाठी रोज १० ते १२ ग्लास पाणी अवश्य प्या, जेणेकरून शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर पडतील. शरीर स्वच्छ ठेवा. यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा अंघोळ करा.

मान्सून स्पेशल : पावसाळ्यातील लिपस्टिकच्या ५ शेड्स

* पारुल भटनागर

एका मुलीच्या जीवनात लिपस्टिकची महत्वाची भूमिका असते, कारण ती रोज याचा वापर करुन आपले सौंदर्य वृद्धिगत करत असते.

या पावसाळ्यात कोणत्या शेडची लिपस्टिक लावावी, याबाबत एल्प्सच्या फाउंडर व डायरेक्टर डॉ. भारती तनेजा सांगतात, ‘‘असे कोण असेल जो सुंदर रंगांवर मोहित होत नसेल आणि ज्याला समोरच्याच्या नजरेत आपल्या प्रति प्रशंसा बघू इच्छित नसेल. जेव्हा आपण लिपस्टिकच्या जगात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला त्यांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात जसेकी चमकदार, दीर्घकाळ टिकणारा, मॅट आणि न जाणे कोणकोणते वेगळेपण घेऊन अनेक प्रकारच्या लिपस्टिक असतात. पण मला नेहमी मॅट लिपस्टिक आवडते, कारण हे ऑफिस आणि कॉलेजला जाताना वापरण्याचे अगदी अचूक सौंदर्यप्रसाधन आहे. मॅट लिपस्टिक दीर्घ काळ टिकणारे सौंदर्य प्रसाधन आहे आणि ग्लॉसी लिपस्टिकप्रमाणे सहज फिके होत नाही.’’

तर या जाणून घेऊ पावसाळ्यात कोणती मॅट लिपस्टिक वापरून पाहावी :

गुलाबी आणि कोरल इम्प्रेशन लिपस्टिक

गुलाबी आणि कोरल रंग दोन्ही सर्वात चांगले मॅट लिपस्टिकचे रंग आहेत. गुलाबी आणि कोरल अंडर टोन्ससोबत हा सुपर गॉर्जियस शेड तुम्हाला एक सुंदर इफेक्ट देईल. उन्हाळयानानंतर पावसाळ्यात या थंडावा देणाऱ्या एकदम अचूक लीप कलर शेडला स्वत:साठी निवडा. न्यूड लुक देणाऱ्या या शेडच्या लिपस्टिकला कमी देखभालीची आवश्यकता असते. म्हणून तुम्हाला पावसाळ्यात टचअपची आवश्यकता भासणार नाही.

वेलवेट कलर मॅट लिपस्टिक

मॅट लिपस्टिकमध्ये वेलवेट कलर एक वेगळाच लुक देतो. आता जुना न्यूड ब्राऊन कलर सोडून वेलवेट कलरला आपलेसे करा. गोऱ्या रंगाच्या मुलींवर हे वेलवेट रंगाची लिपस्टिक छान दिसते. तुम्ही हे जाणून घ्यायला हवे की वेलवेट कलर तोच शेड आहे, जो तुमच्या लुकमध्ये फन आणि ग्लॅमर आणतो. मग बिनधास्त होऊन वापरा हा रंग

पीच कार्नेशन मॅट लिपस्टिक

एकीकडे सुंदर ब्युटी प्रोडक्ट पीच कार्नेशन मॅट लिपस्टिक आहे. हे पिंक ब्राऊन कलरमध्ये उपलब्ध आहे आणि हे लावल्यावर न्यूड लुक दिसतो. पीच कार्नेशन कलर एक असा रंग आहे, जो केवळ सावळया रंगाच्या मुलींवर खास खुलतो. हा रंग नि:संकोचपणे कॉलेज आणि ऑफिसमध्ये जाताना लावता येतो. तुमच्या कोणत्याही रंगाच्या ड्रेससोबत हा रंग छान दिसेल. जेव्हा तुम्हाला कळत नसेल की ओठांवर कोणती लिपस्टिक लावावा तेव्हा तुम्ही हा रंग वापरून पाहू शकता.

साटन जजबेरी जॅम

हा सुपर क्रिमी न्यूड लिपस्टिक रंग असा रेग्यूलर रंग आहे, जो कोणत्याही स्कीन टोनवर छान दिसतो. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तुम्ही बेरीच्या या लिपस्टिकच्या गडद रंगांना समाविष्ट करू शकता. लिपस्टिकच्या गडद रंगांची स्वत:ची अशी एक जादू असते.

फ्युशिया पिंक मॅट लिपस्टिक

काही असे खास आहे या लिपस्टिकच्या रंगांमध्ये. म्हणूनच तर अख्ख्या जगात मुली या लिपस्टिकच्या मागे वेडया झाल्या आहेत. हा लिपस्टिकचा एक अतिशय सुंदर रंग आहे, जो प्रत्येक स्किन टोनमध्ये आणखी ग्लॅमर आणतो. जर तुमचा रंग सावळा असेल तर हा शेड तुमच्या त्वचेला पूर्णपणे सूट होईल. या रंगात तुम्ही गडद पासून ते फिक्कट रंगांपर्यंत कोणत्याही शेडची लिपस्टिक वापरू शकता, विश्वास ठेवा फ्युशिया रंगाची लिपस्टिक तुमच्या लुकला पार बदलेल.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसाळ्यातील मेकअप रूल्स

– शैलेंद्र सिंह

वॉटरप्रूफ मेकअपची सगळयात विशेष गोष्ट म्हणजे पाणीही याचे काही बिघडवू शकत नाही. लग्नात आणि पार्टीमध्ये कॅमेऱ्यासमोर किंवा प्रखर लाइट्ससमोर उष्णतेमुळे मेकअप विस्कटू लागतो.

अशावेळीही वॉटरप्रूफ मेकअप खूप चांगला असतो. रेनडान्स, स्विमिंग पूल आणि समुद्र किनाऱ्यावर उन्हाळयाच्या सुट्टीची मजा घेतानाही वॉटरप्रूफ मेकअपची कमाल दिसून येते.

आहे तरी काय वॉटरप्रूफ मेकअप

बॉबी सलूनच्या स्किन, हेयर आणि ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तवचे म्हणणे आहे, ‘‘घाम आल्यावर मेकअप ओला होऊन त्वचेच्या रोमछिद्रामध्ये जातो, ज्यामुळे मेकअप बेरंग दिसू लागतो. मेकअप रोमछिद्रांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू नये हीच काळजी वॉटरप्रूफ मेकअपमध्ये घेतली जाते. त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करून केला गेलेला मेकअपच वॉटरप्रूफ मेकअप म्हणून ओळखला जातो. रोमछिद्रांना २ प्रकारे बंद केले जाते. पहिला नैसर्गिक वॉटरप्रूफ आणि दुसरा प्रकार प्रॉडक्ट वॉटरप्रूफचा असतो. नैसर्गिक वॉटरप्रूफ पद्धतीत त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करण्यासाठी थंड टॉवेलचा उपयोग केला जातो. ज्याप्रकारे वाफ घेतल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडली जातात, त्याचप्रकारे थंड टॉवेल ठेवल्याने रोमछिद्र बंद होऊन जातात. यासाठी बर्फाचा उपयोग केला जाऊ शकतो. यानंतर केलेला मेकअप घामाने पुसत नाही.’’

वॉटरप्रूफ मेकअपची वाढती मागणीला बघून मेकअप प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट बनवणे सुरु केले. या प्रॉडक्टमध्ये अशा काही घटकांचा समावेश केलेला असतो, जे मेकअप करताना त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करतात. वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्समध्ये क्रीम, लिपस्टिक, फेसबेस, रुब, मस्कारा, काजळ यासारख्या अनेक वस्तू आता बाजारात मिळू लागल्या आहेत.

वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टस सिलिकॉनचा उपयोग करून बनवले जातात. यात वापरलेले डायनोथिकॉन ऑइल त्वचेला चमकदार बनवते. हे वाटरप्रूफ मेकअपला सहजपणे पसरण्यास मदत करते. जेथे वॉटरप्रूफ मेकअपचे एवढे सगळे फायदे आहेत तेथे काही दोषही आहेत. ज्यांना जाणून घेणे आवश्यक आहे. वॉटरप्रूफ मेकअप हटवण्यासाठी पाण्याचा उपयोग पर्याप्त नाही तर बेबी ऑइल किंवा सिलिकॉन ऑइलचाही उपयोग करावा लागतो. याचा वापर त्वचेवर वाईट प्रभाव टाकतो. यासाठी वॉटरप्रूफ मेकअपचा उपयोग विशेष प्रसंगीच करावा. रोज याचा वापर करू नये.

मेकअप टीप्स

ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तव सांगत आहेत काही विशेष टीप्स :

* या मोसमात मेकअप करताना डार्क शेडचा वापर कधीच करू नये. फाउंडेशनही लाईटच लावावे. मुरुमे किंवा डागांना लपवण्यासाठी वॉटरबेस्ड फाऊंडेशनचा वापर करावा. जर याने चमक जास्त येत असल्यास पावडरच्या ऐवजी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

* आपल्या गालांना गुलाबी दाखवण्यासाठी लाईट ब्लशरचा वापर करा. थोडीशी शिमर पावडर डोळयांच्या अवती-भोवती लावून त्यांना आकर्षक बनवू शकता. ओठांवर लिपकलर लावल्यानंतर चमकवण्यासाठी हलका लिपग्लॉस लावावे. लॅक्मे मेकअप प्रॉडक्ट्समध्ये अशाप्रकारचे सगळे सामान मिळते.

* मस्कारा दिवसभर टिकून राहण्यासाठी पापण्यांच्या केसांवर मस्कारा लावावा. असं केल्याने तो पसरत नाही.

* संध्याकाळच्या पार्टीचे मेकअप करतांना नैसर्गिक मेकअपच करावा. संध्याकाळी ऊन नसते. त्यामुळे चेहऱ्यावर शिमरचा वापर करू शकता. जर तुम्ही उन्हात निघत असाल तर एसपीएफ-१५ युक्त सनक्रीम किंवा लोशनचा वापर जरूर करावा. यामुळे त्वचेवर सनबर्नचा प्रभाव कमी होतो.

* स्विमिंग पूलमध्ये जाण्याअगोदर आणि नंतर किटाणूनाशक साबणाने अंघोळ अवश्य करावी.

* या ऋतूत पूर्ण शरीराची डीप क्लिंजिंग करावी. आठवड्यात १ वेळा बॉडी मसाज करावा, आणि एकदा स्टीमबाथ घ्यावी. स्टीम घेतांना पाण्यात हलके बॉडी ऑइल मिसळून घ्यावे.

* बाथटबमध्ये पाणी भरून त्याच्यात मिनरल सॉल्ट मिसळावे. १०-१५ मिनिटे त्यात राहावे. मग बघा, त्वचेत चमक अवश्य येईल.

* जेव्हा पण कडक उन्हातून परताल, थंड पाण्यात पातळ सुती कपडा बुडवून, पिळून घ्यावा आणि मग त्याला उन्हाने प्रभावित जागेवर थोडया-थोडया वेळेसाठी ठेवावे.

* एका टबमध्ये पाणी भरून मीठ सिळून हात आणि पायांना १० मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा. यामुळे मृत त्वचा कोमल होईल. यानंतर रगडून सहजपणे सोडवले जाऊ शकते. यानंतर मॉइश्चराइजर लावावे. पायांना दोन मिनिटे गरम पाण्यात आणि दोन मिनिटे थंड पाण्यात आळीपाळीने बुडवावे.

हेयर केयर टिप्स

* जर केस छोटे असतील तर हलके कर्ल करू शकता. केस मिडिअम साईजचे असतील किंवा मोठे असतील तर त्यांना बांधलेली हेयर स्टाईल देण्याचा प्रयत्न करा. केस मोकळे ठेवायचे असतील तर त्या हिशोबाने कापलेले असावेत. आजकाल केसांना कलर करण्याचा ट्रेंडही चालू आहे. जर कलर करायचे असतील तर ब्लौन्ड हेयर किंवा नॅच्युरल ब्राऊन कलर करावा.

* केसांमध्ये नियमितपणे चांगल्या प्रकारच्या कंडिशनरचा उपयोग अवश्य करा. यामुळे केस चमकदार आणि कोमल होतात. कंडिशनर लावायची सगळयात चांगली पद्धती ही असते की केसांच्या वरच्या भागापासून खालपर्यंत लावावे.

* केसांना चमकदार बनवण्यासाठी नैसर्गिक मेंदीचा वापर करावा. यामुळे केसांना कमकुवत होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

मान्सून स्पेशल : पावसातही चमकेल केशसंभार

* एस. घोष

पावसाळयात केसांवर सतत पाणी पडल्याने ते चिकट होणे, त्यांचा गुंता होणं व गळणं यांसारख्या समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. अर्थात, हा मोसम कुठल्याही प्रकारच्या केसांसाठी त्रासदायकच असतो. मात्र, तेलकट केसांसाठी या समस्या जास्त क्लिष्ट बनतात. तेलकट केसांमध्ये वातावरणातील धूळमाती, प्रदूषण चटकन आकर्षित होत असल्याने, असे केस वेगाने गळू लागतात. याबाबत केशतज्ज्ञ कांता मोटवानी सांगतात की, पावसाळयाच्या दिवसांत केस ओले होतात. पावसाचं प्रदूषणयुक्त व अॅसिडमिश्रित पाणी केसांना नुकसान पोहोचवितं. म्हणून पावसात भिजल्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. त्यामुळे केसांना होणारा धोका कमी होईल.

या मोसमात कोणत्याही प्रकारचं हेअर जेल आणि हेअर स्टायलिंग प्रसाधनाचा वापर करू नका. या दिवसांत रसायनविरहित नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करणं उपयुक्त ठरतं. सतत केसांना कंडिशनर व शाम्पू लावल्याने डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस रुक्ष होऊन गळू लागतात.

केशतज्ज्ञ असगर साबू सांगतात की, निरोगी केसांसाठी नेहमीचे तेच-तेच हेअर रूटीन सोडून खालील नवीन रूटीनचा अवलंब करा :

  • तुम्ही जर रोज शाम्पू करत असाल, तर सौम्य शाम्पूचा वापर करा. मात्र, केसांना सतत शाम्पू करण्याने केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे कोंडयाची समस्या निर्माण होऊ शकते. पावसाळयात केस ओले व चिकट होत असल्याने, आठवडयातून केवळ दोन ते तीन वेळा शाम्पू करा. तोही केवळ केसांच्या मुळाशी लावून केस धुवा.
  • सौम्य कॅरॉटिनयुक्त शाम्पू या मोसमात लाभदायक ठरतो. त्यामुळे केस स्वच्छ, चमकदार व निरोगी राहातात. कॅरॉटिन केसांना पोषण देतं. त्यामुळे त्यांचा गुंता होत नाही. याबरोबरच केसांना कंडिशनिंग करून सिरम लावणे फायदेशीर असतं.
  • शाम्पूनंतर केसांना मास्क लावणं आवश्यक आहे. जर तुमचे केस फिजी असतील, तर अँटीफिजी मास्कचा वापर करा. मात्र, मास्क जास्त वेळ केसांवर लावून ठेवू नका, अन्यथा केस अधिक तेलकट होतील. हा मास्क केवळ ५ ते ७ मिनिटं लावून ठेवणं पुरेसं असतो.
  • पावसाळयात केसांना तेल लावणं आवश्यक असतं. खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलामध्ये केसांना पोषण देण्याची क्षमता असते. आठवडयातून एक ते दोन वेळा केसांना शाम्पू करण्यापूर्वी, ही तेलं कोमट करून बोटांनी केसांच्या मुळाशी हलके मालीश करा. आपल्या वेळानुसार, पाच मिनिटांपासून ते अर्धा तास केसांना चांगलं मालीश केल्यानंतर टॉवेलने डोकं झाकून घ्या. शाम्पू केल्यानंतर ड्रायरने केस वरवर सुकवा. त्यामुळे केस चमकदार दिसतील.
  • केस ओले असतील, तर ते मुळीच बांधू नका. मोठया दातांच्या कंगव्याने ते व्यवस्थित विंचरा. निरोगी केस मिळविण्यासाठी जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. तुम्ही शाकाहारी असाल, तर हिरव्या भाज्या, बिन्स होलग्रेन्स, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स इ. चे सेवन करू शकता. मात्र, तुम्ही जर मांसाहारी असाल, तर मासे, अंडी यांचे सेवन जास्त प्रमाणात करू शकता. तुम्ही जर कामकाजी असाल, तर या दिवसांत आपल्यासोबत एक टॉवेल अवश्य ठेवा. जेणेकरून केस ओले झाल्यास ते टॉवेलने चांगल्याप्रकारे कोरडे करता येतील. काही वेळा छान हेअरकट करून केसांना आकर्षक लुक द्या.
  • पावसाळयात केसांना प्रोटीन ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. अंडे, मध व दही यांचा पॅक केसांसाठी लाभदायक प्रोटीन पॅक आहे. कृती जाणून घ्या :
  • दोन अंडयांच्या घोळात दोन मोठे चमचे दही मिसळा. अर्ध्या लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब टाकून चांगल्याप्रकारे एकजीव करा व नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाका.
  • कोमट पाण्यात दोन मोठे चमचे व्हिनेगर मिसळून केसांना लावल्याने, केसांना चमक येते व केस सुळसुळीत होतात.
  • वसाच्या दिवसांत छत्री घ्यायला विसरू नका, जेणेकरून केसांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होईल व त्यांचे सौंदर्य अबाधित राहील.

कलर केलेल्या केसांची काळजी

  • केस ओले असल्यास बाहेर जाणं टाळा. कारण त्या वेळी केसांची रंध्रं उघडलेली असतात. बाहेरील वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक मिनरल्स उदा. सल्फेट, फॉस्फरस, पोटॅशियम व सोडियम ओलाव्यात मिसळतात. त्यामुळे केस कमजोर तर होतातच, पण केसांच्या रंगाला धोका पोहोचू शकतो. केस धुतल्यानंतर केसांना सिरम जरूर लावा. त्यामुळे केसांची उघडलेली रंध्रं बंद होतील. त्याचबरोबर, केस मऊ व चमकदारही होतील. शिवाय सीरमच्या वापराने कलरला शाइनही येईल.
  • आपल्याला गॉर्जिअस लुक मिळविण्यासाठी केसांना कलर करायची इच्छा असेल किंवा केसांचा कलर बदलायचा असेल, तर जरा थांबा; कारण पावसाळी मोसमात कलर लवकर उडून जाण्याची भीती असते. केसांना नरिशमेंट देण्यासाठी आठवडयातून एकदा हेअर मास्कही लावू शकता. यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून पावडर करा. त्यात मेयोनीज व अंडे मिसळून केसांना लावा आणि काही तासांनंतर धुऊन टाका. या पॅकमधील कडुलिंबाचे अँटिसेप्टिक गुण आपल्या केसांचं कोणत्याही इन्फेक्शनपासून संरक्षण करतील. अंडयातील प्रोटीनमुळे केसांना मजबुती मिळेल. त्याचबरोबर, कलरही जास्त दिवस टिकून राहील, तर मेयोनीजमुळे केसांना कलरफुल चमक मिळेल.
  • तुम्ही केलेला कलर स्टायलिश दिसावा, असं वाटत असेल, तर तुम्ही वेण्याही घालू शकता. स्टायलिश व फॅशनेबल ब्रँड्समधील कलरफुल बटा खूप सुंदर दिसतील. त्याचबरोबर, तुम्ही केसांचा मॅसी साइड लो बनही बनवू शकता. चेहऱ्याला मेकअप लुकपेक्षा, नैसर्गिक लुक मिळविण्यासाठी काही बटा जरूर काढा. त्यामुळे चेहऱ्याला बनावटी लुक न मिळता, खरा लुक मिळेल.

बॉडी सुंदर बनवण्याची क्रेझ

* डॉ. करुणा मल्होत्रा, कॉस्मॅटिक स्किन अँड होम्योक्लीनिक

बोटोक्स किंवा फिलरच नव्हे, तर अनेक प्रकारची सर्जरीही परफेक्ट लुक देण्यात प्रभावी आहेत. चेहऱ्यावरील डाग दूर करून चेहऱ्याला चमक आणण्यासाठी केमिकल पील करवून घेणेही खास पॉप्युलर आहे. परमनंट हेअर रिमूव्हल आणि टमी टक काही असे उपाय आहेत, ज्यामुळे पर्सनॅलिटी खूप आकर्षक होते. मात्र, लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की या सर्वासाठी लग्नाच्या काही महिने आधीच प्लान करणे आवश्यक आहे.

वाटल्यास आपण लग्नाच्या एक महिना आधी बोटोक्स व लिप फिलर इंजेक्शन जरूर लावून घेऊ शकता. बोटोक्समुळे आपले वय कमी दिसते, तर लिप फिलरमुळे ओठांना आकर्षक उभार येतो.

डर्माब्रेशन, लेजर स्किन रीसफेंसिंग व केमिकल पीलसारख्या ट्रीटमेंटच्या उत्तम परिणामांसाठी काही वेळा त्या पुन्हा कराव्या लागतात. ज्या महिलांना स्वत:मध्ये खास बदल पाहायची इच्छा असेल, त्या फेस लिफ्ट, लाइपोसक्शन व बॉडी कंटुरिंगही करू शकतात. ज्यांना आपल्या ब्रेस्टला योग्य आकार द्यायचा असेल, त्या ब्रेस्ट सर्जरीचा आधार घेऊ शकतात.

अर्थात, या सर्व सर्जरी एका दिवसात होणाऱ्या आहेत आणि आपण त्याच दिवशी घरीही जाऊ शकता. परंतु सर्जरीच्या खुणा जाण्यास थोडा वेळ लागू शकतो. म्हणून लग्नापूर्वी सर्जरी करायची असेल, तर ३ ते ६ महिने आधी करणे योग्य होईल.

बोटोक्स व फिलर प्रक्रिया

जर तुम्ही ही ट्रीटमेंट घ्यायचा विचार करत असाल, तर आधी चेहऱ्याला चांगल्याप्रकारे स्वच्छ करा. इंसुलिन इंजेक्शनसारखी छोटी बोटोक्सची इंजेक्शन्स चेहऱ्यावर लावली जातात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. याचा लगेच प्रभाव पडत नाही. ३ ते ७ दिवसांत याचा चेहऱ्यावर प्रभाव दिसू लागतो, जो ३ ते ६ महिन्यापर्यंत तसाच टिकून राहतो.

रिंकल्स, पिंपल्स, डार्क सर्कल्स, ल्यूकोडर्मासारख्या कॉमन ब्युटी प्रॉब्लेम्सचा उपाय आज कॉस्मॅटिकच्या अॅडव्हान्स ब्युटी ट्रीटमेंटने शक्य झाला आहे. या ट्रीटमेंटसचा आधार घेऊन आपल्या त्वचेचा रंग उजळण्यासोबतच, ओठ, गाल, नाक, कान, आयब्रो इ.च्या आकारातही कायम स्वरूपाचे मनाजोगे परिवर्तन करू शकता. हे परिवर्तन सौंदर्य दिगुणित करेल.

काय आहे राइनोप्लास्टी

जर आपल्या नाकाचा शेप प्रॉपर नसेल, तर आपण १-२ तासांत होणाऱ्या या ट्रीटमेंटच्या मदतीने योग्य शेप देऊ शकता. एवढेच नाही, यासोबतच आपला वरील लिप पार्ट आणि नाकाच्यामधील नोज पॉइंटचा अँगलही ठीक करवू शकता. वाटल्यास हे फेस लिफ्टसोबतही करू शकता.

यासाठी आपल्याला केवळ एका दिवसासाठी अॅडमिट व्हावे लागेल. हो, सूज पूर्णपणे उत्तरण्याला २ महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, आपल्या कामावर  २-३ आठवडयांनतर जाऊ शकता. यावर जवळपास ५० ते ७० हजार खर्च येतो.

प्लास्टिक सर्जरीही आहे पर्याय

शरीराच्या कुठल्याही भागाला मार लागल्याने किंवा जळल्यामुळे जो भाग खराब दिसतो, तो प्लास्टिक सर्जरीद्वारे ठीक केला जाऊ शकतो. या ट्रीटमेंटमध्ये मांडीची त्वचा काढून त्या जागी लावली जाते.

प्लास्टिक सर्जरीच्या या प्रक्रियेला स्किन ग्राफ्टिंग म्हणतात. तरुणी नाक, ओठ, चेहऱ्याची रुंदी, ब्रेस्ट इ.ची सर्जरी अदिकिने करतात.

पुरुषांची आजकाल हेयर ट्रान्सप्लांट आणि छाती इ.ची कॉस्मॅटिक सर्जरी जास्त केली जाते.

ट्रीटमेंटपूर्वी या गोष्टीची काळजी घ्या

ट्रीटमेंट घेण्यापूर्वी ६-७ तास आधी ग्रीन टी घेणे टाळा. जर आपली त्वचा अॅलर्जीक असेल, तर आधी आपल्या डॉक्टरांना याची माहिती जरूर द्या. आपण जर प्रेगनंट असाल किंवा कोणत्याही प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असेल, तर जरूर याबाबत डॉक्टरांना सांगा. वयाची साठी उलटत असेल, तर ट्रीटमेंट घेण्याच्या २ दिवस आधीपासून अल्कोहोल किंवा स्मोकिंग करू नका. ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिलांनीही यापासून दूर राहिले पाहिजे.

नंतरही लक्ष देणे आवश्यक

* डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मसाज किंवा चेहऱ्यासाठी इतर ब्युटी ट्रीटमेंट घ्या.

* काही दिवस वाकून सफाई करणे किंवा मग सामान उचलणे टाळा.

साइड इफेक्ट

* तसा बोटोक्सचा कुठल्याही प्रकारे साइड इफेक्ट होत नाही. मात्र, सर्वांची त्वचा एकसारखी नसते. त्यामुळे कोणाला तरी त्याचे वेगळे परिणाम मिळू शकतात.

* चेहऱ्यावर जळजळ आणि मार्क्स होऊ शकतात.

* डोकेदुखी, सर्दी-पडसे आणि डोळयांच्या आजूबाजूची त्वचा लाल होऊन त्यामध्ये खाज किंवा मग फेशियल पेनही होऊ शकते.

खर्च

आपल्या चेहऱ्यावर योग्य खर्च अवलंबून असतो. आपल्याला जर आपल्या डोळयांच्या भागापर्यंतच खर्च करायचा असेल, तर ४ हजारांपासून ते ७ हजारांच्या दरम्यान याचा खर्च येतो. ज्यांना डोळयांच्या वरील भाग म्हणजेच कपाळावर ट्रीटमेंट करायची असेल, तर आपल्याला १२ हजारांपासून ते २० हजारांपर्यंत खर्च येऊ शकतो. शिवाय प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी याहून अधिक खर्च करावा लागू शकतो.

सर्जरीचा वाढता बाजार

कॉस्मॅटिक किंवा प्लास्टिक सर्जरीसारखे उपाय त्या लोकांसाठी वरदान आहेत, ज्यांना काही कारणामुळे शरीर किंवा चेहऱ्याच्या विकृतीचा सामना करावा लागतो. परंतु आता मानसिक संतुष्टी आणि आकर्षक दिसण्याच्या स्पर्धेने याला एक वेगळया प्रकारचा बाजार उपलब्ध करून दिला आहे.

या बाजाराचा सर्वात मोठा ग्राहक आहे युवावर्ग. भारतासारख्या देशात ही सर्जरी लोकांसाठी वरदान बनली आहे. एवढेच नाही, केवळ लग्नाच्या मुख्य दिवसासाठी तरुणांचा एक मोठा वर्ग आता मोठी रक्कम खर्च करून, चेहरा आणि शरीराचा कायापालट करण्यात मग्न आहे.

नेलआर्ट वाढवी सौंदर्य

* पारूल  भटनागर 

लग्न असो वा साखरपुडा, आपलं सर्व लक्ष चेहऱ्याच्या सौंदर्याकडेच असतं कारण आपल्याला सेंटर अट्रैक्शन बनायचं असतं, फोटो छान हवे असतात, परंतु तुम्हीच विचार करा की तुमचा चेहरा तर सुंदर दिसतोए, परंतु रिंग सेरेमनीच्या दरम्यान तुम्ही तुमचा हात पुढे केला आणि तुमचा हात पाहून तुमच्या जोडीदाराला जो आनंद व्हायला पाहिजे तो झाला नाही तर तुम्हाला कसं वाटेल? तुमचा सर्व फोकस चेहरा सुंदर दिसण्यावरच होता. या नादात तुम्ही नेल्सचं सौंदर्य उजळविण्याकडे जरादेखील लक्ष दिलं नाही.

जर तुम्हाला हा क्षण आठवणीत ठेवायचा असेल आणि सर्वांनी तुमची स्तुती करावी असं वाटत असेल तर ऐंजल मेकअप स्टुडिओच्या आर्टिस्ट सुमन यांच्या नेल आर्ट आणि ब्यूटी टिप्स नक्कीच लक्षात ठेवा.

नेलआर्ट

नेलआर्ट नखांचं सौंदर्य वाढविण्याबरोबरच आपलं व्यक्तिमत्त्व अधिक चार्मिंगदेखील बनवतं. हे साकारणं खूप कठिण नाहीए आणि ना ही यासाठी अधिक साधनांची गरज लागते.

मग चला जाणून घेऊया, कशाप्रकारे सहजपणे घरीदेखील नेलआर्ट करता येऊ शकतं.

दोऱ्याने नेलआर्ट : तुम्ही विचार करत असाल की दोऱ्याने नेलआर्ट कसं होऊ शकतं, तर ते खूपच सहजसोपं आहे.

यासाठी तुमच्याकडे ३-४ गडद रंगाच्या नेलपेण्ट हव्या आणि थोडासा पातळ दोरा हवा.

सर्वप्रथम तुम्ही नखांवर गडद रंगाची नेलपेण्ट लावून घ्या. त्यानंतर क्रॉस स्टाईलने त्यावर दुसरी गडद रंगाची नेलपेण्ट लावा. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या रंगाची कोटिंग करा. आता दोऱ्याने क्रॉस स्टाइलमध्ये वा तुम्हाला जे डिझायनिंग करायचं आहे त करावं. या माध्यमातून तुम्ही खूपच सुंदर नेलआर्ट करू शकता.

रंगीत नेलआर्ट : रंगीत नेलआर्ट नेलपॉलिशने नव्हे तर वाटर कलर्सच्या मदतीने केलं जातं आणि यासाठी झिरो पाँइटच्या ब्रशची गरज लागते.

यासाठी सर्वप्रथम नखांवर सफेद रंगाचा वॉटर कलर लावा. नंतर तो थोडासा ड्राय करा. तेव्हाच व्यवस्थित नेलआर्ट होईल. नंतर वेगेवेगळे रंग घेत कोणंतही डिझाइन तुमच्या कल्पनेनुसार वापरा.

लक्षात ठेवा, सुकल्यानंतर टॉप कोट जरूर लावा म्हणजे शाइनबरोबरच नेलआर्ट दीर्घकाळपर्यंत टिकू शकेल.

वाइन नेलआर्ट : वाइन नेलआर्ट नाव ऐकायला जेवढं विचित्र वाटतं बनल्यानंतर तेवढंच ते सुंदर दिसतं. कीनू नावाने मिळणारी बियर वापरल्यावरच हे शक्य होऊ शकेल.

यासाठी सर्वप्रथम जे डिझाइन तुम्ही नखांवर प्रिंट करु इच्छिता ते स्ववेअरमध्ये कापून घ्या. त्यानंतर नखांवर पांढऱ्या रंगाचं नेलपेण्ट लावा आणि ते सुकू द्या त्यानंतर तुम्ही जे न्यूजपेपरने कटींग केलंय ते बियरमध्ये व्यवस्थित डिप करा आणि ते नखांवर लावून थोडावेळ सुकण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर पेपर हळूवारपणे काढून प्रिण्ट नखांवर उमटलंय का ते पाहा. जर उमटलं असेल तर ते काढून टाका अन्यथा नखांवर तसंच राहू द्या. प्रत्येक नखावर वेगवेगळे डिझाइन ट्राय करू शकता. अशाप्रकारे तुम्ही नखांना यूनिक लूक देऊ शकता.

ब्रायडल नेलआर्ट : ब्रायडल म्हणजेच नववधूचे हात पाहून सर्वजण चकीत व्हावेत, यासाठी तिची नखं सुंदर करणं तेवढंच गरजेचं आहे, जे नेलआर्टने शक्य आहे.

सर्वप्रथम नववधूच्या नखांवर बेस कलर लावून घ्या. नंतर हलकं ड्राय झाल्यानंतर एखादं आवडतं डिझाइन बनवा आणि त्यावर हळूवारपणे ग्लिटर वा छोटेसे स्टोन लावा. यामुळे नववधू अधिक सुंदर दिसेल.

नेलआर्ट करण्यापूर्वी

* फक्त पाहून नेलआर्ट करायला घेतलं, तर रिजल्ट चांगला येणार नाही, यासाठी नेलआर्ट करण्यापूर्वी आपली नखं व्यवस्थित स्वच्छ ठेवा. नंतर स्क्वेअर वा ओव्हल जो देखील आकार तुम्हाला पसंत असेल त्यामध्ये नखं कापून फायलरच्या मदतीने शेप बनवा म्हणजे तुमची नखं क्यूटीक्यूटी दिसू लागतील.

* मनात ब्रँडचा विचार करू नका अन्यथा नेलआर्ट चांगलं होणार नाही. याउलट तुम्ही नेलआर्ट कसं चांगलं करू शकाल याचा विचार करा. यासाठी विविध ब्रँडच्याविविध नेलपेण्ट्स ट्राय करा आणि वाटर कलर्स वापरायलादेखील विसरू नका. कारण हे स्वस्त असण्याबरोबरच रिजल्टदेखील चांगला देतात.

* नेलआर्ट कुठंही, कोणाकडूनही करता येऊ शकतं हा चूकीचा समज आहे. म्हणूनच नेलआर्ट करतेवेळी जरादेखील चूक झाली तरी घाबरू नका. उलट शांततेने काम करून तुम्ही उत्तम डिझाइन साकारू शकता.

* लक्षात ठेवा की नेलआर्ट केल्यानंतर टॉप कोट करायला विसरू नका, कारण यामुळे नेलआर्ट दीर्घकाळ राहील आणि तुमची नखं अधिक चमकदार दिसतील.

हायलाइटेड केसांची अशी घ्या काळजी

* अमित सानदा, मॅनेजिंग डायरेक्टर, सोलफ्लॉवर

केसांची एक मोठी समस्या म्हणजे केसांवर ऊन पडणं. ऊन्हामुळे केसांचा रंग फिका पडतो. ऊन्हात खूप वेळ राहिल्यामुळे केसांचं हायलाइट ऑक्सिडाइज होऊ शकतं, ज्यामुळे नको असलेले शेड्स निर्माण होऊ शकतात. म्हणूनच हायलाइटेड केसांची काळजी घेण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या

* फक्त सोडियम लॉरिल सल्फेट विरहीत शॅम्पूचा उपयोग करा, जे कलर्ड किंवा हायलाइटेड केसांना ट्रिट करण्यासाठी असतात. केसांचा रंग खूप काळ टिकून राहण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. यासह कलर स्पेसिफिक शॅम्पूचा अल्टरनेट प्रयोग करा. जो विशेषत: केसांचा विशिष्ट रंग अबाधित ठेवण्यासाठी डिझाइन केलेला आहे.

* केसांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी सल्फेट विरहीत हेअर कंडीशनरचा वापर करा. यामुळे केसांना चांगले पोषण मिळेल, जे अधिक काळ टिकेल.

* ज्यांचे केस गडद रंगाचे आहेत, त्यांनी शाइन एनहांसिंग स्टायलिंग उत्पादनांचा प्रयोग केला पाहिजे.

हे जाणणे ही गरजेचे आहे की ही चमक किती काळ टिकेल आणि केस कितपत स्वस्थ राहतील, जे पूर्णपणे या गोष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही केसांची किती काळजी घेता.

हायलाइटेड केसांसाठी कोणत्या प्रकारची देखभाल करणे जरुरी आहे. हे समजण्यासाठी ३ गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

तुमचे केस किती वेगाने वाढतात?

बहुतेक घटनांमध्ये निरोगी डोक्यावरील केसांची प्रतिमहिना सरासरी वाढ ५ मि.मी. ते १० मि.मी. दरम्यान होते. केसांची वाढ तुमच्या मेटाबॉलिज्म, आहार तसेच केसांसाठी कोणते उत्पादन वापरता यावर अवलंबून असते.

कलर्ड केस नैसर्गिक शेडपासून किती वेगळे असतात?

आपल्या केसांसाठी कोणता रंग निवडता, यानुसार काही विशेष गरजा असू शकतात.

डीप कंडीशनिंग

केसांना हायलाइट केल्यानंतर त्यांचं डीप कंडीशनिंग करणं सर्वाधिक गरजेचं आहे. याचं कारण असं की हायलाइटेड केस बरेच छिद्रयुक्त होतात. म्हणूनच आठवडयातून एकदा तरी हे करणे गरजेचे असतं. केसांचं कंडीशनिंग करण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे की केसांना हायड्रेट करून त्यातील आर्द्रता अबाधित राखणं, ज्यामुळे ते अधिक चमकदार आणि सुंदर दिसतात.

तेलयुक्त कंडिशनर डीप कंडिशनिंग हेअर मास्कची निर्मिती करतं. हे आठवडयातून २ वेळा केस धुतल्यावर लावावं.

बेबी ट्रीम्स

केमिकल्सच्या सर्वाधिक प्रयोगामुळे हायलाइट करताना केस खूपच रुक्ष होतात, ज्यामुळे केसांची मुळं कमकूवत होतात आणि केस तुटू लागतात. मग ८ ते १० आठवडयांतून एकदा केस ट्रीम करा जेणेकरून केस स्वस्थ राहतील. तुटलेल्या केसांवर कॅस्टर ऑईलसह लव्हेंडर इसेन्शिअल तेल मिसळून लावा.

रोकथाम

केसांवर ऊन, उष्णता, धूळ, पाणी इत्यादींचा प्रभाव पडतो. ज्यामुळे हायलाइट क्षतिग्रस्त होण्याची संभावना अधिक असते. या प्रकारचे बाहेरील तत्त्व रंगांना फिके पाडतात. तसेच केसांमधील मॉइश्चर त्यांना रुक्ष आणि मृत बनवतात. म्हणून केस पाण्याने धुवा आणि मग डीहायड्रेशनपासून वाचण्यासाठी बाहेर जाण्याआधी तेल लावा.

सुरक्षा

हिटेड स्टायलिंग टूल्ससारखे स्ट्रेटनर, ब्लो ड्रायर, कर्लिंग आयरनच्या वापराने हायलाइटेड केसांना हानी पोहोचू शकते. त्यांची मजबूती आणि आरोग्य अति तापमानापासून सुरक्षित राखणं जरूरीचं आहे.

केसांना ऑर्गन तेल लावा. यामुळे केसांना अतितापमानापासून सुरक्षा मिळण्यास मदत होईल.

आफ्टरकेअर टिप्स

फॉयल हायलाइटींग ट्रीटमेंटनंतर २ कामे करावी लागतील. पहिलं तर बराच काळ रंग टिकून राहण्यासाठी त्यांची सुरक्षा करणं आणि दुसरं त्यांची मजबूती, चमकदारपणा आणि स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्यांचं पोषण करावं लागेल.

ओल्या केसांवर कॅस्टर ऑईल लावा. केसांवर टॉवेल बांधा. १० मिनिटांनंतर केस धुवा. या प्रक्रियेने केस अधिक निरोगी आणि चमकदार होतील, कारण कॅस्टर तेल केसांमध्ये मॉइश्चर निर्माण करतात.

स्टायलिंग टीप्स

हिट स्टाइलिंग टूल्सचा प्रयोग कमी करा. जर हे उपकरण वापरणं गरजेचं असेल तर पहिल्यादा डोक्यावर हिट प्रोटेक्टर स्प्रे करा आणि मग वापरा.

वॉशिंग टिप्स

क्लोरीन : जर तुम्ही सातत्याने स्विमिंग पूलमध्ये जात असाल तर तिथे जाण्यापूर्वी केसांना कंडीशनर किंवा तेल लावा. यामुळे स्विमिंग पूलमधील क्लोरीनयुक्त पाणी केसांचं नुकसान करणार नाही.

पाण्याचं तापमान : थंड किंवा कोमट पाण्याने केस धुवा. कारण गरम पाणी केसांचा रंग विलग करतं.

शॅम्पूची फ्रिक्वेंसी : केस रोज शॅम्पूने धुतल्यास नुकसान होते. त्यामुळे शॅम्पू तेव्हाच वापरा, जेव्हा खरंच गरज असेल. तसेच शॅम्पू एसएलएस विरहीत असला पाहिजे. केस हायलाइट केलेले असोत वा नसोत दोन्ही स्थितींमध्ये नैसर्गिक शॅम्पू सर्वात चांगला समजला जातो.

समर-स्पेशल : उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइश्चरायझर

* मोनिका गुप्ता

बदलत्या मोसमनुसार त्वचेवरही अनेक बदल पहायला मिळतात. त्वचेत होणाऱ्या बदलांना पाहून आपण कॉस्मेटिकची निवड करतो. जसे की हिवाळयात मॉइश्चरायझरचा वापर भरपूर केला जातो. मात्र उन्हाळा येताच त्याचा वापर कमी होतो. उन्हाळयात त्वचा चिपचिपित होण्याच्या भीतीने बहुतेक महिला मॉइश्चरायझरचा वापर बंद करतात. पण खरोखरच उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर बंद करायला हवा का? नाही, मुळीच नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा याचा वापर त्वचेसाठी खूपच गरजेचा आहे.

चला, जाणून घेऊया, उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर गरजेचा का आहे :

तज्ज्ञांच्या मते, ‘‘बहुसंख्य महिलांना असे वाटते की, उन्हाळयात मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिपचिपित होते. त्यामुळेच उन्हाळयात याचा वापर त्या टाळतात. प्रत्यक्षात तापमान वाढल्यानंतर मॉइश्चरायझर त्वचेसाठी आणखी गरजेचे होते. विशेष करुन त्यांच्यासाठी ज्या एसीत खूप वेळ असतात.’’

त्वचा रुक्ष असल्यास

उन्हाळा सुरू होताच त्वचेवर उन्हाचा परिणाम दिसू लागतो. हा मोसम स्वत:सोबत स्विमिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससारखी मौजमजाही घेऊन येतो. रखरखीत ऊन, स्विमिंग पूलमधील पाण्यात असलेल्या क्लोरीनसारख्या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. विशेष करून तेव्हा ज्यावेळी तिची योग्य काळजी घेतली जात नाही. योग्य काळजी घेतल्यास त्वचेला हानिकारक गोष्टींपासून वाचवता येईल.

जेव्हा प्रखर उन्हाचा होतो कहर

उन्हाळयातील प्रखर ऊनाचे चटके त्वचेला जाळत असतात. यामुळे सनबर्न, टॅनिंगसारखे स्किन प्रॉब्लेम होतात. अशा वेळी सनस्क्रीनचा वापर त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. पण त्वचेच्या देखभालीसाठी एवढेच पुरेसे नाही. सनस्क्रीननंतर त्वचेला चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा मुलायम होते. उन्हाळयात तुम्ही मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीनचाही वापर करू शकता.

केमिकलपासून वाचण्यासाठी

उन्हाळा सुरू होताच आपण खूप सारे बेत आखतो. जसे की, कधीतरी वॉटरपार्कला फिरायला जायचे, पूल पार्टी करायची किंवा मुलांसोबत स्विमिंग क्लास करायचा. पण आपण हे विसरतो की स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन नावाचे केमिकल मिसळले जाते, जे त्वचेसाठी हानिकारक असते. तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवला असाल तर आपले शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. ते त्वचेच्या खोलवर जाऊन तिला पोषण देते. ते त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते.

उन्हाळयात रुक्ष त्वचा

बहुतांश महिलांना असे वाटते की, उन्हाळयात त्वचा कोरडी होत नाही. पण हा त्यांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात उन्हाळयात त्यांचा वेळ जास्त करुन ऊन, स्विमिंग पूल, एअर कंडीशनिंगमध्ये जातो. काही जणी अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा उपयोग करतात ज्यात क्लोरीनची मात्रा जास्त असते. त्यामुळे त्यांची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसू लागते. हे टाळण्यासाठी त्वचेला सौम्य आणि मुलायम बनवणारे प्रोडक्ट वापरायला हवेत. जसे की दररोज मॉइश्चरायझरचा वापर त्वचेसाठी उपयोगी ठरतो. यात त्वचा मुलायम होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म असतात, जे त्वचेला रुक्ष, कोरडी होण्यापासून वाचवतात आणि तिला उजळ बनवतात. त्वचा विशेषज्ज्ञही मॉइश्चरायझर वापण्याचा सल्ला देतात, कारण हे त्वचेवर सुरक्षा कवच तयार करुन तिला किटाणू आणि अन्य हानिकारक गोष्टींपासून वाचवते.

जेव्हा असेल ओपन पोर्सची समस्या

चांगल्या, सुदृढ त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग खूपच गरजेचे असते. महिलांना असे वाटत असते की, उन्हाळयात घामामुळे त्यांची त्वचा ओलसरच राहणार. पण घामामुळे त्वचेतील छिद्र उघडतात. त्यांना पुन्हा बंद करण्यासाठी टोनर वापरणे गरजेचे असते आणि टोनरनंतर मॉइश्चरायझर वापरल्यामुळे त्वचा खुलते.

जेव्हा त्वचेतून येईल जास्त घाम

उन्हाळयाच्या मोसमात त्वचा तेलकट होऊ शकते, पण याचा असा अर्थ होत नाही की त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते. प्रत्यक्षात उन्हाळयाच्या मोसमात जास्त घाम येत असल्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. उकाडा आणि उन्हामुळे त्वचेतील पाणी निघून जाते. अशावेळी त्वचेला हायड्रेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि पाण्याच्या जास्त प्रमाणात जेवण जेवणे एवढयावरच अवलंबून राहू नका. उलट योग्य मॉइश्चरायझरचा उपयोग करायला हवा, जो त्वचेतील मॉइश्चरचे प्रमाण कायम ठेवेल.

मॉइश्चरायरचा वापर कसा करावा?

उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर कधी करावा हे माहिती करुन घेणेही गरजेचे आहे :

* अंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा. तो बॉडी हायड्रेड करतो व त्वचेतील ओलावा कायम ठेवतो. खूप घाम येत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर आणि टोनरचाही वापर करू शकता.

समर-स्पेशल : प्रखर उन्हापासून करा त्वचेचं संरक्षण

* उपेंद्र भटनागर

उन्हाळ्यात सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट किरणांपासून स्वत:चं संरक्षण करणं खूपच गरजेचं आहे. आता तर कामानिमित्ताने घराबाहेर पडावंच लागतं. अशामध्ये त्वचेवर प्रखर किरणांमुळे रॅशेज येतात. उन्हाचा परिणाम प्रामुख्याने चेहरा, मान आणि हातांवर होतो; कारण शरीराचा हा भाग कायम उघडा असतो. यांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात ते जाणून घेऊया :

* छत्रीशिवाय घराबाहेर पडू नका तसंच चांगल्या ब्रॅण्डच्या साबणाने दिवसातून दोन वेळा अंघोळ करा.

* दिवसातून दोन वेळा सनब्लॉक क्रीमचा वापर करा. हे क्रीम यूव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतं.

* सुती वस्त्रांचा वापर करा.

* सन ब्लॉक क्रीम विकत घेतेवेळी सनप्रोटेक्शन फॅक्टर म्हणजेच एसवीएफ पाहून घ्या.

कपड्यांची निवड

* कपडे नेहमी हलक्या रंगाचे वापरा. यामुळे गरम कमी होतं आणि व्यक्तिमत्त्वदेखील आकर्षक दिसतं.

* या दिवसात घट्ट कपडे वापरू नका. पॅण्ट वा स्कर्ट अथवा साडी गडद रंगाची असू शकते, परंतु कंबरेच्या वरचे कपडे हलक्या रंगाचे असावेत याची खास काळजी घ्या.

* नोकरदार असाल तर सुती कपडेच वापरा.

* शक्य असेल तर सिफॉन, क्रेप आणि जॉर्जेटचा अधिक वापर करा. मोठी फुलं असणारा तसंच पोल्का असलेले पेहरावदेखील या ऋतूत आरामदायी वाटतात.

* ग्रेसफुल दिसण्यासाठी कॉटनबरोबरच शिफॉनचादेखील वापर करू शकता.

* अजून एक फॅब्रिक आहे, लिनेन. याचा क्रिस्पीपणा याला खास बनवितो.

* कपड्यांचा राजा म्हणजे डेनिम. याचं प्रत्येक ऋतूमध्ये अनुकूल असणं हे याला खास बनवितं. परंतु या ऋतूमध्ये वापरलं जाणारं डेनिम पातळ असायला हवं. जाडं डेनिम हिवाळ्यात वापरायला हवं.

मेकअप

* जेलयुक्त फाउंडेशनचा वापर करा. यामुळे चेहरा चमकतो.

* गालांवर क्रीमयुक्त साधनांचा वापर करा. परंतु ते ग्रीसी नसावेत याची खास काळजी घ्या.

* या ऋतूत हलका गुलाबी वा जांभळ्या रंगाच्या वापराने सौंदर्य अधिक उजळतं.

* या ऋतूत चांदी आणि मोत्याचे दागिनेच घालावेत.

हेअरस्टाइल खास उन्हाळ्याकरता…

* भारती तनेजा

उहाळ्याच्या मोसमात हेअर कट आणि हेअर डू असा असला पाहिजे की सातत्याने केस नीट करावे लागणार नाहीत आणि स्टाइलही अबाधित राहील. या, आपण जाणून घेऊ अशाच काही हेअरस्टाइल्स…

लॉब कट

खूप लहानही नाहीत आणि खूप मोठेही नाहीत. अशा केसांच्या स्टाइलला लॉब कट म्हणतात. ही स्टाइल त्या स्त्रियांकरता खूप खास आहे, ज्या उकाड्यापासून बचावही करू इच्छितात परंतु त्यांना केस अधिक आखूड नको आहेत. अशा स्टाइलला तुम्ही बँग्स वा रोलर्ससह फ्लोट करू शकतात.

एसिमिट्रिक बॉब कट

या कटमुळे तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो. यात मागचे केस लहान आणि पुढचे केस मोठे असतात. अलीकडे या कटमध्ये डाव्या बाजूच्या तुलनेत उजव्या बाजूस मोठे केस ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. तसं बघता या कटसोबत साइडला एक मोठी फ्रिंजही ठेवू शकता.

बॉब वेव्स

शॉर्ट हेअर्सची ही आधुनिक स्टाइल अलीकडच्या काळात पसंत केली जाते. रोमॅण्टिक लुक निर्माण करणाऱ्या वेव्स आता लहान केस ठेवूनही कॅरी करता येतात. या स्टाइलद्वारे तुम्हाला सॉफ्ट लुक आणि कुल फिलिंग मिळेल.

क्रॉप स्टाइल

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी केस छोटे ठेवू इच्छिता, सोबतच एखादी स्टाइलही कॅरी करायची असेल तर क्रॉप स्टाइल करून पाहा. यात केसांची टोकं ब्रोकन एम स्टाइलमध्ये कापलेली असतात आणि हे मेंटेन करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही.

३ डी मॅजिक

केस मोठे ठेवून कोणतीही स्टाइल कॅरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ३ डी मॅजिक हेअर कट नक्कीच पसंत पडेल. यामध्ये वरचे केस लहान, खालचे केस मोठे आणि मधले केस सामान्य लेन्थचे कापलेले असतात.

या कटमुळे केस मोठे आणि घनदाट दिसतात. ही स्टाइल तुम्हाला स्मार्ट लुक देते. ३ डी मॅजिक कटची जादू मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही पेहरावांसोबत शोभून दिसते.

साइडलेअर कट

स्वत:ला वेगळ्या लुकमध्ये पाहू इच्छित असाल तर केसांना साइड लेअरिंग स्टाइल देऊ शकता. हा तर एसिमिट्रिकल ढंगात दिसतो. यासाठी कटला वेट ड्रायरद्वारे हलकेच सेट करण्याची गरज असते. परंतु लक्षात घ्या, केस शोभून दिसतील त्याच साइडला सेट करा. साइड लेयरिंग तुम्हाला मॉडर्न आणि चेहऱ्याला यंग लुक देतं. जर केस कलर केले तर हे लेयरिंग खूप स्टायलिश दिसतात.

सॉक बन

मोठे केस कुणाला बरं आवडत नाहीत? परंतु कडकडीत उन्हामुळे व घामामुळे ते सांभाळणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळे या सीझनमध्ये सॉक बन बनवणं क्विक व ईझि आहे. सोबतच ट्रेण्डीसुद्धा आहे. फॅशनबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळात बाहेरच्या रॅम्प शोजमध्ये ही स्टाइल खूप हिट आहे. ही स्टाइल बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतीही अॅक्सेसरी खरेदी करण्याची गरज नाही. केवळ घरी असणाऱ्या जुन्या मोज्यांद्वारे ही स्टाइल बनवता येते. ही स्टाइल खूप रीजनेबल असते, सोबतच केसांमध्ये व्हॉल्यूमही दिसून येतो.

फिशटेल

फिशटेल पाहायला थोडी कठीण वाटते, परंतु ही तुम्ही ५ मिनिटात सहजी बनवू शकता. ही बनवण्यासाठी केस दोन भागांमध्ये विभाजित करा. आता एका साइडचे थोडे केस घ्या, त्यानंतर दुसऱ्या साइडचे घ्या आणि वेणी घाला. अशाप्रकारे खालपर्यंत वेणी बनवा. ही वेणी वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारच्या ड्रेसवर शोभून दिसेल.

स्लीक्ड बॅक पोनी

पोनीटेल बनवण्याचा हा लेटेस्ट पॅटर्न केवळ तुमच्या फॉर्मल आउटफिटवरच नव्हे, तर कॅज्युअलवरही छान शोभून दिसेल. केसांना प्रेसिंग मशिनद्वारे स्ट्रेट लुक द्या आणि त्यानंतर त्यात हलकेच जेल लावा. असं केल्याने लुक स्लीक्ड दिसेल आणि स्टाइलही बराच काळ टिकून राहील. यानंतर क्राउन एरियापासून केस विंचरत केस उचला आणि खालच्या बाजूस कानांपर्यंत टाइट पोनीटेल बांधा.

कॉर्पोरेट बन

आपल्या लुकला कॉर्पोरेट स्टाइल देण्यासाठी हे जरूर आहे की केस एकदम व्यवस्थित बांधलेले असतील, जेणेकरून ते सतत चेहऱ्यावरही येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम कंगव्याने केसाचा गुंता सोडवून जेल लावून ते सेट करून घ्या, जेणेकरून ते सहज चिकटतील. यानंतर साइड पार्टीशन करून पुढून फिंगर कोंब करा आणि सर्व केस मागे घेऊन जात बन बनवा आणि बॉब पिनने व्यवस्थित बांधा.

बनला हलकेच फॅशनेबल टच देण्यासाठी ते स्टायलिश अॅक्सेसरीजद्वारे सजवा वा मग कलरफुल पिनने सेट करा. या स्टाइलमुळे सगळे केस बांधलेले राहातील आणि तुम्ही उकाड्याने त्रासणारही नाही.

पन

हाफ बन हाफ पोनीची ही लेटेस्ट स्टाइल उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या पसंतीस उतरेल. ही स्टाइल ऐकायला जितकी मजेदार आहे, तितकीच करण्यासाठी सोपी आहे, तर मग वाट कसली पाहाता, क्यूट व कूल स्टायलिंगसाठी या उन्हाळ्याच्या मोसमात पन स्टाइल करून पाहा.

रीवर्स वेज

गायिका रिहानासारखे या हेअरस्टाइलमध्ये मागचे केस लहान आणि पुढचे मोठे असतात. ही हेअरस्टाइल करून तुम्ही सडपातळ व तरुण दिसाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें