* मोनिका गुप्ता
बदलत्या मोसमनुसार त्वचेवरही अनेक बदल पहायला मिळतात. त्वचेत होणाऱ्या बदलांना पाहून आपण कॉस्मेटिकची निवड करतो. जसे की हिवाळयात मॉइश्चरायझरचा वापर भरपूर केला जातो. मात्र उन्हाळा येताच त्याचा वापर कमी होतो. उन्हाळयात त्वचा चिपचिपित होण्याच्या भीतीने बहुतेक महिला मॉइश्चरायझरचा वापर बंद करतात. पण खरोखरच उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर बंद करायला हवा का? नाही, मुळीच नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा याचा वापर त्वचेसाठी खूपच गरजेचा आहे.
चला, जाणून घेऊया, उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर गरजेचा का आहे :
तज्ज्ञांच्या मते, ‘‘बहुसंख्य महिलांना असे वाटते की, उन्हाळयात मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिपचिपित होते. त्यामुळेच उन्हाळयात याचा वापर त्या टाळतात. प्रत्यक्षात तापमान वाढल्यानंतर मॉइश्चरायझर त्वचेसाठी आणखी गरजेचे होते. विशेष करुन त्यांच्यासाठी ज्या एसीत खूप वेळ असतात.’’
त्वचा रुक्ष असल्यास
उन्हाळा सुरू होताच त्वचेवर उन्हाचा परिणाम दिसू लागतो. हा मोसम स्वत:सोबत स्विमिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससारखी मौजमजाही घेऊन येतो. रखरखीत ऊन, स्विमिंग पूलमधील पाण्यात असलेल्या क्लोरीनसारख्या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. विशेष करून तेव्हा ज्यावेळी तिची योग्य काळजी घेतली जात नाही. योग्य काळजी घेतल्यास त्वचेला हानिकारक गोष्टींपासून वाचवता येईल.
जेव्हा प्रखर उन्हाचा होतो कहर
उन्हाळयातील प्रखर ऊनाचे चटके त्वचेला जाळत असतात. यामुळे सनबर्न, टॅनिंगसारखे स्किन प्रॉब्लेम होतात. अशा वेळी सनस्क्रीनचा वापर त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. पण त्वचेच्या देखभालीसाठी एवढेच पुरेसे नाही. सनस्क्रीननंतर त्वचेला चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा मुलायम होते. उन्हाळयात तुम्ही मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीनचाही वापर करू शकता.
केमिकलपासून वाचण्यासाठी
उन्हाळा सुरू होताच आपण खूप सारे बेत आखतो. जसे की, कधीतरी वॉटरपार्कला फिरायला जायचे, पूल पार्टी करायची किंवा मुलांसोबत स्विमिंग क्लास करायचा. पण आपण हे विसरतो की स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन नावाचे केमिकल मिसळले जाते, जे त्वचेसाठी हानिकारक असते. तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवला असाल तर आपले शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. ते त्वचेच्या खोलवर जाऊन तिला पोषण देते. ते त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते.