बालगोपाळांच्या कपड्यांची काळजी

* गरिमा पंकज

आईवडील जेव्हा आपल्या छोटयाशा बाळाला रुग्णालयातून घरी घेऊन येतात तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. बाळाच्या जन्माआधीच छोटया, सुंदर, रंगीबेरंगी कपडयांनी घर भरून जाते. पण त्यांची खरेदी करताना आणि बाळाचे कपडे धुताना काही गोष्टींकडे लक्ष देणे खूपच गरजेचे असते, कारण कपडयांवरच बाळाचे आरोग्य आणि सुरक्षा अवलंबून असते.

कपडे खरेदी करताना सावधान

कापड : लहान मुलांसाठी नेहमी मऊ, आरामदायक कपडे खरेदी करा. ते सहज धुता येतील असे हवे. बाळाच्या त्वचेचे नुकसान होणार नाही, असेच कापड हवे. मुलांसाठी सुती कपडे सर्वात चांगले असतात, पण लक्षात ठेवा की सुती कपडे धुतल्यावर थोडे आकसतात.

लांबी-रुंदी : मुलांचे कपडे ३ महिन्यांच्या फरकाने तयार केलेले असतात. ०-३ महिने, ३-६ महिने, ६-९ महिने आणि ९-१२ महिने अशा प्रकारे शिवलेले असतात. मुलांना खूप मोठे कपडे घालू नका. ते सतत गळा आणि डोक्यावर येतात. यामुळे श्वास कोंडण्याची भीती असते.

सुरक्षा : बी एल कपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे नवजात बाळांचे सल्लागार, तज्ज्ञ डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, लहान मुलांसाठी नेहमी साधे कपडे खरेदी करावेत. फॅन्सी, वजनदार कपडे विकत घेणे टाळा. ज्याला बटन, रिबीन, गोंडा नसेल, असे कपडे खरेदी करू नका. मुले बटण गिळू शकतात, ते त्यांच्या घशात अडकू शकते. ज्याला ओढायच्या दोऱ्या असतील, असे कपडेही खरेदी करू नका. त्या दोऱ्या कशात तरी अडकून ताणल्या जाऊ शकतात.

आरामदायी : असे कपडे खरेदी करा, जे मुलाला सहज घालता येतील, जेणेकरून कपडे बदलताना त्रास होणार नाही. पुढून उघडता येणारे सैल कपडे चांगले असतात. असे कपडे खरेदी करा जे स्ट्रेचेबल म्हणजे ताणले जातात. ते मुलाला घालणे आणि काढणे सोपे असते. ज्याला चैन असेल असे कपडे खरेदी करू नका.

कपडे धुण्याच्या टिप्स

डॉक्टर कुमार अंकुर यांनी सांगितले की, मुलांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. म्हणूनच त्यांचे कपडे धुताना कपडे धुण्याची साधी पावडर वापरू नका. रंगीत आणि सुवासिक पावडर तर अजिबात वापरू नका. लोकरीचे कपडे धुण्यासाठी वापरली जाणारी सौम्य पावडर वापरणे जास्त चांगले असते. मुलांचे कपडे खूप वेळा पाण्यातून काढा, जेणेकरून पावडर किंवा साबण पूर्णपणे निघून जाईल. मुलाची त्वचा जास्तच संवेदनशील असेल तर लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली पावडरच वापरा.

मुलांचे कपडे लहान आणि मऊ असतात. म्हणूनच ते वॉशिंग मशीनऐवजी हाताने धुणे जास्त चांगले असते. मशीनमध्ये धुणार असाल तर ड्रायर वापरू नका. मोकळया जागेवर, ताजी हवा आणि सूर्यप्रकाशात कपडे सुकवा. तुम्ही फॅब्रिक सॉफ्टनर वापरणार असाल तर खास मुलांसाठी असणाऱ्या सॉफ्टनरचाच वापर करा.

कपडे धुण्याच्या अन्य टिप्स

त्वचा किंवा अन्य कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये यासाठी मुलांचे कपडे कसे स्वच्छ ठेवायचे, हे माहिती करून घेऊया :

* कपडयांवर लावलेले लेबल नीट वाचा. लेबलवर मुलांच्या कपडयांसाठी ज्या सूचना असतील त्यांचे पालन करा.

* बरेचसे कपडे जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. म्हणूनच कपडे धुताना जास्त गरम पाणी वापरू नका. कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवा.

* रंग, कापड आणि लागलेले डाग पाहून त्यानुसार मुलांचे कपडे वेगवेगळे धुवायला ठेवा. एकसारखे असलेले कपडे एकत्र धुवा. यामुळे कपडे धुणे सोपे होईल आणि ते सुरक्षितही राहतील.

* मुलांच्या कपडयांवर डाग लागले असतील तर बेबी फ्रेंडली सौम्य पावडर लावून हलक्या हातांनी चोळून कपडे धुवा. यामुळे डाग हलका होईल. त्यानंतर व्यवस्थित पाणी वापरून कपडे नीट धुवा.

* मुलांचे कपडे किटाणूमुक्त ठेवण्यासाठी काही महिला कपडे अँटीसेफ्टिक सोल्यूशनमध्ये भिजवतात. हे चुकीचे आहे. यामुळे मुलाच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

* कपडे लादीवर ठेवून चोळण्याऐवजी हात किंवा मशीनच्या झाकणावर ठेवून धुवा.

* मुलाचे कपडे घरातील इतरांच्या कपडयांसोबत धुवू नका. बऱ्याचदा मोठयांचे कपडे जास्त मळलेले असतात. सर्व कपडे एकत्र धुतल्यामुळे त्यांच्यातील किटाणू मुलाच्या कपडयांमध्ये जाऊ शकतात.

* कपडे सुकल्यावर ते नीट इस्त्री करा, जेणेकरून उरलेले किटाणूही मरून जातील.

* कपडे नीट घडी करून कव्हरमध्ये किंवा कॉटनच्या कपडयात गुंडाळून ठेवा.

जबाबदारी तुमची छंद आमचे

* ऋतू वर्मा

अतुल एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर होता. महानगरातील राहणीमानाच्या तऱ्हा इतक्या महाग होत्या की त्याला इच्छा असूनही काही बचत करता येत नव्हती. जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकच इच्छा होती की त्याची पत्नीदेखील आर्थिकदृष्टया स्वावलंबी असावी जेणेकरून पुढील आयुष्य सुरळीत चालू शकेल. बघता बघता शोध संपला आणि प्रीती त्याच्या प्रेमाच्या नात्यात बांधली गेली.

प्रीती आल्यावर घर-गृहस्थीचा खर्चही वाढला, पण प्रीतीने घरखर्च किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च वाटून घेण्यात अजिबात रस दाखवला नाही, परिणामी वाढलेले अनेक खर्च अतुलच्या डोक्यावर आले.

अतुलने प्रीतीला घर-गृहस्थीत हातभार लावण्यास सांगितल्यावर ती रडू लागली. म्हणाली, ‘‘बायकोच्या कमाईवर गृहस्थीचा गाडा चालवणारा तू कसा पुरुष आहेस?’’ प्रितीच्या या वागण्याने अतुलला धक्काच बसला.

पल्लवी आणि सौरभच्या घरचीही अशीच परिस्थिती होती. कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च ही सगळी जबाबदारी

सौरभची होती, इतकेच काय तर कधी-कधी जर इतर काही खर्च अजून आला तर सौरभला मित्रांकडे कर्ज मागावे लागत असे, पण याचा पल्लवीवर काहीही परिणाम होत नसे. प्रत्येक बायकोचा दृष्टिकोन असाच असेल असे नाही. नितीन आणि ऋचाच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळीच आहे.

ऋचाच्या नोकरीच्या जोरावर नितीनने पैसे उलट-सुलट व्यवसायात गुंतवले आणि मग ठणठण गोपाल. असे अनेकवेळा घडले. मग ऋचाला वाटू लागले की लग्नानंतर नवऱ्याला बळ देण्यासाठी नोकरी करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती.

दोघांच्या कमाईवरच गाडी चालणार

आता काळ बदलला आहे आणि जगण्याची पद्धतही बदलली आहे. ती पूर्वीच्या काळाची गोष्ट होती जेव्हा नवरा नोकरी करायचा आणि बायको घर आणि मुलं सांभाळायची. आता महानगरांमध्ये महागाईच्या राक्षसाने इतके भयंकर रूप धारण केले आहे की २ जणांच्या कमाई शिवाय घर-गृहस्थीचा गाडा ओढणे अशक्य आहे.

जबाबदारी अशी वाटून घ्या

तुम्ही आणि तुमचा नवरा दोघेही नोकरी करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :

* घर तुम्हा दोघांचे आहे, त्यामुळे जबाबदारी समान वाटून घ्या. संपूर्ण महिन्याचे बजेट बनवा आणि समान योगदान द्या, तुमच्या कमाईवर तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पगाराची वारंवार धमकी देऊन तुमच्या पतीला कमीपणाची जाणीव करून देऊ नका, घराप्रती त्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती तुमचीही आहे.

* ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे छंद पूर्ण करता, त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदारालाही छंद असतात. पगाराचा किती भाग हा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आणि किती भाग इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च करायचा हे तुम्ही दोघांनी परस्पर संमतीने ठरविले जाण्याची आवश्यकता आहे.

* आजच्या काळाची मागणी आहे की पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकताही असावी, अनेक वेळा पत्नी पतीला आपल्या पगाराबाबत चुकीची माहिती देते असेही दिसून येते. यामागचे मुख्य कारण हे असते की जर पत्नीने आपल्या पगारातून घर चालवले तर पती त्याची सर्व कमाई मित्रांवर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर उधळेल, जे प्रत्येकवेळी योग्यही नसते.

* अनेक वेळा असेही पाहायला मिळते की पत्नी तिच्या मैत्रिणींचे बघून तिच्या पगाराच्या बाबतीत असुरक्षित राहते, भविष्यासाठी आपला पगार वाचवून ठेवावा असे तिला वाटते. कारण नवऱ्याचा काही भरवसा नसतो, पण जर नवराही असाच विचार करू लागला तर तुम्ही काय कराल? जर नात्यात विश्वासच नसेल तर अशा वैवाहिक जीवनाचा काही उपयोग नाही.

* तुम्ही आजच्या स्त्री आहात जी कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. मग जबाबदाऱ्यांना खंबीरपणे सामोरे जा, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आधीपासूनच तुमच्या जीवनसाथीबद्दल कोणतेही गृहितक बांधू नका

* तुमचा नवरा कंजूष असो वा शाही खर्च करणारा, पण तुम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे ठरवून घ्या की तुम्ही दोघेही पगाराची किती टक्के बचत करणार.

चला खेळण्यांच्या ट्रेनमध्ये मजा करूया

* गृहशोभिका टीम

कधी सुंदर मैदानातील घनदाट जंगलातून, कधी बोगदे आणि चहाच्या बागांमधून जाणारा टॉय ट्रेनचा प्रवास आजही लोकांना खूप भुरळ घालतो. जर तुम्ही कुटुंबासह अशाच सहलीला जाण्याचा विचार करत असाल, तर जागतिक वारसामध्ये समाविष्ट असलेल्या शिमला, उटी, माथेरान, दार्जिलिंग या टॉय ट्रेनपेक्षा चांगली काय असू शकते?

कालका-शिमला टॉय ट्रेन

हिमाचल प्रदेशातील सुंदर दरी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. पण कालका-शिमला टॉय ट्रेनबद्दल काही औरच आहे. 2008 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. कालका शिमला रेल्वेचा प्रवास ९ नोव्हेंबर १९०३ रोजी सुरू झाला. कालका नंतर, शिवालिक टेकड्यांमधून वळण घेत असलेली ट्रेन शिमला, सुमारे 2076 मीटर उंचीवर असलेल्या सुंदर हिल स्टेशनला पोहोचते. हे 2 फूट 6 इंच नॅरोगेज लेनवर चालते.

या रेल्वे मार्गात 103 बोगदे आणि 861 पूल आहेत. या मार्गावर सुमारे ९१९ वळणे आहेत. काही वळणे अगदी तीक्ष्ण आहेत, जिथे ट्रेन 48 अंशाच्या कोनात वळते. शिमला रेल्वे स्टेशनबद्दल बोलायचे झाले तर ते एक छोटेसे पण सुंदर स्टेशन आहे. इथे प्लॅटफॉर्म सरळ नसून किंचित फिरवलेला आहे. इथून एका बाजूला शिमला शहराचे सुंदर नजारे आणि दुसऱ्या बाजूला दऱ्या आणि टेकड्या दिसतात.

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (टॉय ट्रेन) ला डिसेंबर 1999 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला होता. हे न्यू जलपाईगुडी ते दार्जिलिंग दरम्यान धावते. यामधील अंतर सुमारे 78 किलोमीटर आहे. या दोन स्थानकांमध्ये सुमारे 13 स्थानके आहेत. हा संपूर्ण प्रवास सुमारे आठ तासांचा आहे, पण हा आठ तासांचा रोमांचक प्रवास तुम्हाला आयुष्यभर विसरता येणार नाही. ट्रेनमधून दिसणारी दृश्ये अप्रतिम आहेत. तसे, जोपर्यंत तुम्ही या ट्रेनमधून प्रवास करत नाही तोपर्यंत तुमचा दार्जिलिंगचा प्रवास अपूर्ण समजला जाईल.

शहराच्या मध्यभागातून जाणारी ही ट्रेन डोंगरात वसलेल्या छोट्या गावातून, हिरव्यागार जंगलातून, चहाच्या बागांमधून फिरते. त्याचा वेगही खूप कमी आहे. कमाल वेग 20 किमी प्रति तास आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही धावत जाऊन ट्रेनही पकडू शकता. या मार्गावरील स्थानकेही आपल्याला ब्रिटिशकालीन आठवण करून देतात.

दार्जिलिंगच्या थोडं आधी घूम स्टेशन आहे, जे भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. हे सुमारे 7407 फूट उंचीवर वसलेले आहे. इथून पुढे बटासिया वळण येते. येथे हुतात्मा स्मारक आहे. येथून संपूर्ण दार्जिलिंगचे सुंदर दृश्य दिसते. हे 1879 ते 1881 दरम्यान बांधले गेले. टेकड्यांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दार्जिलिंगमध्ये पर्यटकांसाठी खूप काही आहे. दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरात तुम्ही हॅपी व्हॅली टी इस्टेट, बोटॅनिकल गार्डन, बटासिया लूप, वॉर मेमोरियल, केबल कार, गोम्पा, हिमालयन माउंटेनियरिंग इन्स्टिट्यूट म्युझियम इत्यादी पाहू शकता.

निलगिरी माउंटन रेल्वे

दार्जिलिंग हिमालयन रेल्वेप्रमाणे, निलगिरी माउंटन रेल्वेदेखील जागतिक वारसा स्थळ आहे. ‘दिल से’ या प्रसिद्ध चित्रपटातील ‘चल छैयां-छैयां’ हे गाणे या टॉय ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मेट्टुपलायम – उटी निलगिरी पॅसेंजर ट्रेन ही भारतातील सर्वात धीमी ट्रेन आहे. ते ताशी 16 किलोमीटर वेगाने प्रवास करते. काही ठिकाणी त्याचा वेग ताशी 10 किलोमीटरपर्यंत जातो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आरामात उतरून थोडा वेळ फिरू शकता, परत येऊन त्यात बसू शकता. मेट्टुपलायम ते उटी दरम्यानच्या निलगिरी माउंटन ट्रेनमधून प्रवास करण्याचा थरार काही औरच आहे. यादरम्यान सुमारे 10 रेल्वे स्थानके येतात.

मेट्टुपालयम नंतर उगमंडलम हा टॉय ट्रेनच्या प्रवासाचा शेवटचा थांबा आहे. जेव्हा ही टॉय ट्रेन हिरव्यागार जंगलातून उटीला पोहोचते तेव्हा तुम्ही 2200 मीटरपेक्षा जास्त उंचीवर पोहोचलात. मेट्टुपालयम ते उदगमंडलम म्हणजेच उटी हा प्रवास सुमारे ४६ किलोमीटरचा आहे. हा प्रवास सुमारे पाच तासांत पूर्ण होतो. जर आपण इतिहासाबद्दल बोललो तर, 1891 मध्ये मेट्टुपलायम ते उटीला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग बांधण्याचे काम सुरू झाले. पर्वत कापून बनवलेल्या या रेल्वे मार्गावर 1899 मध्ये मेट्टुपलायम ते कन्नूर अशी ट्रेन सुरू झाली. जून 1908 हा मार्ग उदगमंडलम म्हणजेच उटीपर्यंत वाढवण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये हा रेल्वे मार्ग दक्षिण रेल्वेचा भाग झाला. आजही या टॉय ट्रेनचा सुखद प्रवास सुरूच आहे.

नरेल-माथेरान टॉय ट्रेन

माथेरान हे महाराष्ट्रातील एक लहान पण विलक्षण हिल स्टेशन आहे. ते सुमारे 2650 फूट उंचीवर आहे. नरेल ते माथेरान दरम्यान टॉय ट्रेनमधून हिल टॉपचा प्रवास खूपच रोमांचक आहे. या रेल्वे मार्गावर सुमारे 121 छोटे पूल आणि सुमारे 221 वळणे आहेत. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा वेग ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त नाही. सुमारे 803 मीटर उंचीवर माथेरान हे या मार्गावरील सर्वात उंच रेल्वे स्थानक आहे. हा रेल्वे वारशाचा अप्रतिम नमुना आहे.

माथेरान रेल्वे 1907 मध्ये सुरू झाली. पावसाळ्यात खबरदारी म्हणून हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला आहे. पण जेव्हा हवामान चांगले असते तेव्हा ट्रेन चालवली जाते. माथेरानचे नैसर्गिक दृश्य नेहमीच बॉलिवूडच्या निर्मात्यांना आकर्षित करते.

धार्मिक कट्टरवाद माणुसकी धोक्यात

* शाहनवाज

आपण एखाद्यावर नाराज असलो तर ती नाराजी व्यक्त करतो. वेगवेगळया प्रकारे मनातील नाराजीला वाट मोकळी करून देतो. एखाद्यावर नाराज झाल्यास काही लोक त्याच्याशी बोलणे बंद करतात. काही जण बोलतात, पण त्यांचा स्वर नाराजीचा असतो. काही लोक त्या व्यक्तीच्या समोर त्याला भलेबुरे ऐकवून आपल्या मनावरील ओझे कमी करतात. आधुनिक समाजातही लोकांना एकमेकांचे विचार पटतात किंवा पटतही नाहीत, पण ज्या लोकांना धार्मिक कट्टरतावादाच्या आजाराने ग्रासलेले असते ते नाराज झाल्यास आपल्याला स्वत:ला त्यांच्यापासून कसे वाचवता येईल, याचा विचार आपल्याला करावाच लागेल.

होय, कारण धार्मिक कट्टरतावादाचा आजार बळावलेले लोक तुमच्यावर नाराज झाले, रागावले किंवा तुमचे विचार त्यांना पटेनासे झाले तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात. पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. कुठल्याही धर्माचे कट्टरपंथी हे मानसिक आजारामुळे वेडयाच्या रुग्णालयात दाखल असलेल्या लोकांपेक्षाही समाजासाठी जास्त धोकादायक असतात.

हल्ल्याचे संपूर्ण प्रकरण

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी असे काही घडले ज्याची चर्चा संपूर्ण जगात सुरू आहे. एका १८ वर्षांच्या विद्यार्थ्याने शाळेतील इतिहासाच्या शिक्षकावर हल्ला केला, कारण इतिहासाचे शिक्षक सॅम्युअल पॅटी यांनी वर्गात फ्रीडम ऑफ एक्स्प्रेस म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्याशी संबंधित एक कार्टून अर्थात व्यंगचित्र दाखवले होते. यामुळे इस्लाम धर्माला मानणारा हा विद्यार्थी नाराज झाला होता.

१८ वर्षीय या तरुणाने कॉम्प्लेक्स सो होनरी नावाच्या एका शाळेजवळ सॅम्युअल पॅटी या शिक्षकांवर हल्ला केला. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तरुणाला चहूबाजूंनी घेरले. त्यावेळी खिशातले पिस्तूल काढून तरुण पोलिसांना धमकावू लागला. अखेर पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, यात त्याचा मृत्यू झाला.

व्यंगचित्रावरून यापूर्वीही वाद

शार्ली हेब्दो यांनी २००५ मध्ये डेन्मार्कच्या एका वृत्तपत्रात धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावादी विचारधारेवर प्रहार करत पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. ते प्रकाशित होताच संपूर्ण जगभरात प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ मध्ये शार्ली हेब्दो या व्यंगचित्र पत्रिकेत ते व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आणि पुन्हा गोंधळ उडाला.

काही इस्लामी बंदुकधाऱ्यांनी २०१५ मध्ये फ्रान्सच्या शार्ली हेब्दोच्या कार्यालयातील संपादकीय विभागावर हल्ला केला. यात १२ जणांना जीव गमवावा लागला. जीव गमावणाऱ्यांमध्ये ५ व्यंगचित्रकार, १ अर्थशास्त्रज्ञ, २ संपादक, १ साफसफाई करणारा, १ पाहुणा आणि २ पोलीस होते. याशिवाय ११ जण गंभीर जखमी झाले. हल्ल्यावेळी हल्लेखोर धार्मिक घोषणा देत होते. ‘आम्ही पैगंबरांचा बदला घेतला’ असे आसुरी आनंदाने बोलत होते.

या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास असणारे विद्यार्थी आणि अन्य लोकांनी मिळून ‘मीही शार्ली’ असा नारा देत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आवाज बळकट केला.

लोकांची सहनशीलता संपत चालली आहे

ही घटना शार्ली हेब्दो यांनी काढलेल्या व्यंगचित्राची होती, पण आपणही आपल्या जीवनात अशा अनेक लोकांना भेटतो जे टीका सहन करू शकत नाहीत. जे अपल्याला सर्वात जास्त जवळचे असतात त्यांच्यावर केलेली टीका बऱ्याचदा लोक सहन करू शकत नाहीत.

धार्मिक लोक सर्वसाधारणपणे लोकांचे प्रश्न टाळतात, कारण त्यांना आपल्या धर्माबद्दल संपूर्ण ज्ञान नसते. असे सखोल ज्ञान कदाचित मशिदीत बसलेल्या मौलवींना किंवा मंदिरात बसलेल्या एखाद्या पूजाऱ्यालाही नसते. डोळे बंद करून ते फक्त त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात जी त्यांना कोणीतरी धर्माच्या नावावर शिकवली किंवा समजावलेली असते.

माझ्या शालेय जीवनातीळ विज्ञानाचे एक शिक्षक त्यांच्या हातातील सर्व बोटांमध्ये अंगठया घालायचे आणि त्यांच्या गळयात रुद्र्राक्षाची एक मोठी माळ असायची. एके दिवशी शाळेत सामाजिक विज्ञान शिकवणाऱ्या एका नव्या शिक्षकांसोबत त्यांचा वाद झाला. त्यांच्या हातातली सर्व बोटांमध्ये अंगठया पाहून नवीन शिक्षकांनी फक्त एवढेच विचारले होते की, या अंगठया तुम्ही आवड म्हणून घालता की, एखाद्या बाबा-बुवाने त्या तुम्हाला घालायला सांगितल्या आहेत?

त्यांचा हा प्रश्न ऐकून विज्ञानाचे शिक्षक प्रचंड चिडले. शब्दाला शब्द भिडला आणि रागाच्या भरात विज्ञानाच्या शिक्षकांनी नवीन शिक्षकांवर हात उगारला. .

तरीही लोकांच्या मानगुटीवरून रुढीवादी समाजाचे भूत अजूनही उतरलेले नाही. मग तो कुठल्याही देशाचा आणि कुठल्याही धर्माचा धार्मिक कट्टरतावादी का असेना, त्याच्यासाठी तोच पूर्वीचा, धर्माला कायदा मानणारा समाज अजूनही सर्वोत्तम आहे. म्हणूनच तो त्याच्या धर्माविरोधात उठणारा प्रत्येक आवाज बंद करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलायला तयार असतो.

हेच कारण आहे की, लोकांना कुठल्याही प्रकारच्या वादात पडायचे नसते. त्यांना टीका करायची नसते किंवा अशा वादाचा त्यांना कुठलाही अर्थ लावायचा नसतो. पॅरिसमध्ये इतिहासाच्या शिक्षकांसोबत घडलेली घटना हेच सांगते की, लोक खूपच असहनशील झाले आहेत. ते तर्कवितर्काना पटेल असे उत्तर द्यायचे सोडून थेट लोकांवर हल्ला करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात.

खरंच धर्म इतका कमकुवत आहे?

पॅरिसमध्ये सॅम्युअल पॅटी यांच्यासोबत घडलेल्या घटनेतून असे निदर्शनास येते की, आधुनिक आणि प्रगत देशांमध्येही धार्मिक अंधश्रद्धा आणि कट्टरतावाद कायम आहे. पॅरिसमध्ये घडलेल्या घटनेचे आपण नव्याने पुनरावलोकन केले तर आपल्या लक्षात येईल की, सॅम्युअल पॅटी वर्गातील मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी पैगंबर मोहम्मद यांच्यावर काढलेले व्यंगचित्रच तर दाखवत होते.

जर यात कुठल्याही व्यक्तीला काही आक्षेप होता तर पॅटी यांनाही त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार होता. पण हल्लेखोरांनी याबाबत कुठलाही सारासार विचार न करता सॅम्युअल पॅटी यांना जीवानिशी मारले.

अखेर असे काय झाले होते की, हल्लेखोरांनी हिंसेचा आधार घेतला? धर्मावर टीका केल्यामुळे धर्माचे अस्तित्व धुळीत मिसळते का? स्वत:वर करण्यात आलेली टीका सहन करू न शकण्याइतका लोकांचा देव कमकुवत आहे का? जर खरंच लोकांचा देव कमकुवत असेल तर मग लोक अशा कमकुवत देवाला पूजतातच का?

फ्रान्स जगातील एक असा देश आहे जिथल्या लोकसंख्येतील प्रत्येक पाचवी व्यक्ती पूर्णपणे नास्तिक असते. याचा अर्थ फ्रान्स एक असा देश आहे जिथे लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे पाहातात. ती समजू घेण्यासाठी चर्चा करतात. सारासार विचार करतात.

धार्मिक कट्टरतावाद्यांसाठी एकच उपचार

धर्माला मानणारा प्रत्येक व्यक्ती कट्टरपंथीच असतो, असे मुळीच नसते. खरी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्ती स्वत:ला सर्वात जास्त समजूतदार समजत असतो आणि दुसऱ्या कोणाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. धार्मिक कट्टरतावादाची मुळे तोपर्यंत समाजातून मुळापासून उपटून फेकता येणार नाहीत जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी शिक्षण अनिवार्य केले जात नाही.

फक्त शिक्षण अनिवार्य करून ही समस्या संपुष्टात येईल, याचीही हमी देता येणार नाही. आपली शिक्षण व्यवस्था वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित असणेही तितकेच गरजेचे असते. अशा शिक्षण व्यवस्थेत शिक्षकही असेच हवेत जे वैज्ञानिक विचारधारेला मानणारे प्रगतीशील असतील. आपल्या विज्ञानाच्या शिक्षकांप्रमाणे नसतील जे व्यवसायाने विज्ञान शिकवत असले तरी स्वत:च्या आयुष्यात मात्र ज्यांचा विज्ञानाशी काडीचाही संबंध नसतो.

आपल्या सरकारने असा आदर्श समाजात प्रस्थापित करायला हवा जो तर्काशी सुसंगत, विज्ञानवादी असेल. अंधश्रद्धेला मूठमाती देणारा असेल. मात्र आपण भारताला नजरेसमोर ठेवून असा विचार करतो तेव्हा तो विचार खूपच चुकीचा वाटू शकतो, कारण इथले सरकारच अंधश्रद्धा पसरवण्यात पारंगत आहे.

म्हणूनच आपण स्वत:पासून सुरुवात करायला हवी. आपण सुशिक्षित, समजूतदार समाज (लोकांचा समूह) म्हणून एक पाऊल पुढे टाकून कमीत कमी आपल्या जीवनात पसरलेल्या अंधश्रद्धेला तरी निर्बंध घालू शकतो. पॅरिसमध्ये कट्टरतावाद्यांनी केलेली सॅम्युअल पॅटी यांच्या मृत्यूची व्याख्या ही मानवतेच्या इतिहासातील सर्वात किळसवाणे कृत्य म्हणून करायला हवी. इतकेच नव्हे तर समाजात पुन्हा कधीच असे घडू नये म्हणून आपल्याला आजपासूनच कट्टरपंथाविरोधात आवाज उठवण्याची सुरुवात करायला हवी.

आर्थिक तणाव सेक्सवर ताबा तर मिळवला नाही ना?

– शैलेंद्र्र सिंह

सेक्स अर्थात संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही. यामागे भावनिक ओढही असते. आर्थिक तणावाचा दुष्परिणाम खास करून भावनांवर होतो. चिंतेने ग्रासलेले मन शरीराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही. याचा परिणाम संभोगावर होतो. फक्त नवरा-बायकोवरच नाही तर घर, कुटुंब, समाजावरही याचा परिणाम होतो. व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते.

प्रत्येक प्रकारचा तणाव सेक्स जीवनावर परिणाम करतोच. आर्थिक तणावाची चिंता स्वत:सोबत जोडीदारालाही असते, कारण पैशांअभावी डॉक्टर आणि औषध, दोन्हीही अवघड होते.

जोडीदाराला पैशांअभावी खुश ठेवण्यासाठी भेटवस्तू घेता येत नाही. जे वर्षानुवर्षे सोबत असतात तेही तुमच्यातील उणिवांचा पाढा वाचू लागतात. कोविड-१९ काळात घरभाडे, नोकरी जाणे, पगार कपात, पगार वेळेवर न मिळणे अशा काही चिंता आपल्याला सतावत आहेत.

कर्मचाऱ्याने नोकरी सोडावी यासाठी कंपन्या त्यांना विविध प्रकारे त्रास देत आहेत. मंदीचे कारण काहीही असले तरी याचा परिणाम सेक्स जीवनावर आहे. यामुळे नवरा-बायकोत दुरावा निर्माण होत आहे.

सामाजिक जीवनावर परिणाम

आर्थिक चणचण जाणवू लागल्यामुळे लोक मोठे शहर, प्रशस्त घर विकून साध्या ठिकाणी राहू लागले आहेत. भरपूर फी, शाळेचा इतर खर्च परवडणारा नसल्यामुळे नाईलाजाने त्यांना मुलांना साध्या शाळेत प्रवेश घेऊन द्यावा लागत आहे. पैशांअभावी चांगले जगण्याचा स्तर खालावल्यामुळे तणाव वाढत आहे.

आर्थिक तणाव दूर करण्यासाठी लोक जास्त काम करू लागले आहेत. त्यामुळे सेक्स संबंधांसाठी वेळ मिळेनासा झाला आहे. थकवा वाढत आहे. त्यातच सेक्स संबंधातील समस्या जैसे थे आहे.

तणावाचा महिलांवर सर्वाधिक परिणाम

आर्थिक तणावाचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त होतो. त्यांना पैशांची चिंता जास्त सतावत असते. त्यामुळे संभोगात रमणे आणि त्याचा आनंद घेणे त्यांच्यासाठी अवघड होते. आर्थिक तणावाचा सेक्सच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम होतो. काहीच करण्याची इच्छा होत नाही.

तणावामुळे डोकेदुखी, पोट बिघडणे, उच्च रक्तदाब किंवा छातीत दुखणे असे अनेक प्रकारचे रोग बळावतात. या आजारांचा परिणाम सेक्सवर होतो. मेंटल हेल्थ अर्थात मानसिक आरोग्य बिघडल्यास तणाव, चिंता, हृदरोगाचा झटका सोबतच भावनिक समस्या यांचाही सेक्स जीवनावर परिणाम होतो.

तणाव वाढल्यामुळे शरिरातील हार्मोन्स मेटाबॉलिज्मवर दुष्परिणाम होतो. तणावामुळे मनात नकारात्मक विचार घर करतात. कोणत्याच गोष्टीत मन रमत नाही. याचा परिणाम सेक्स जीवनावर होणे स्वाभाविक असते.

मानसिक आरोग्य बिघडते

जेव्हा मन दु:खी असते, काहीच आवडेनासे होते तेव्हा मनाची घालमेल वाढते. संभोगाची इच्छा होत नाही. याचा परिणाम जोडीदाराच्या सेक्स जीवनावरही होतो. आर्थिक तणावाचा परिणाम सर्वात आधी मानसिक आरोग्यावर होतो. डोक्यात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत असतात. मानसिक तणाव वाढतो. आपल्याच माणसांवर संशय घेण्याची वृत्ती बळावते. जोडीदाराचे मन भावनिकदृष्ट्या अस्थिर असेल तर त्याच्याकडून सेक्सची अपेक्षा ठेवणे निरर्थक असते.

सेक्स जीवन उत्तम राखण्यासाठी तणावापासून दूर राहणे किंवा नकारात्मक विचारसरणी बदलणे गरजेचे असते. हे सांगायला सोपे आहे, पण प्रत्यक्ष कृतीत आणणे बरेच अवघड असते. म्हणूनच तणावाचा आपल्या आयुष्यावर कमीत कमी परिणाम होईल यासाठी प्रयत्न करायला हवा, जेणेकरून तणाव आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकणार नाही. व्यायाम, समुपदेशनाद्वारे हे शक्य होईल.

यामुळे तणावाची पातळी कमी करता येईल, जेणेकरून त्याचा दुष्परिणाम सेक्स जीवनावर होणार नाही. म्हणूनच असे सांगितले जाते की, जेव्हा तुम्ही जोडीदारासोबत बेडरूममध्ये जाल तेव्हा इतर सर्व चिंता बाहेरच ठेवायला हव्यात.

अडचणींमुळे बिघडते हार्मोन्सचे संतुलन

तणावात असल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते. कोर्टिसोल आणि एपिनेफ्रिनची पातळी वाढल्यामुळे सेक्स जीवन निरोगी राहत नाही. महिलांमधील संभोग क्षमता कमी होते. याचा परिणाम सेक्स जीवनावर होतो.

कोर्टिसोलची पातळी वाढल्यामुळे त्याचा परिणाम सेक्स हार्मोनवर होतो. त्यामुळे संभोगाची इच्छा होत नाही. म्हणूनच अस्वस्थ न होता स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

तणावाचा दुष्परिणाम महिलांच्या मासिक पाळीवरही होतो. मासिक पाळीत अनियमितता येते. त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात. परिणामी चिडणे, चट्कन रागावणे असे बदल स्वभावात होतात. या बदलांमुळेही तणाव वाढतो.

आर्थिक तणाव शरीराच्या हार्मोनल समतोल बिघडवतो, सोबतच जेव्हा शरीर तणावात असते तेव्हा भावनांवरही त्याचा परिणाम होतो. माणूस कोणाशीही न बोलण्याची, लोकांपासून दूर राहण्याची संधी शोधू लागतो.

वाढत्या तणावामुळे छोटीशी गोष्टही वेदना देते. संभोग ही केवळ एक शारीरिक कृती नाही तर त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. त्यामुळेच आर्थिक तणाव असताना संभोगासाठी स्वत:च्या मनाला तयार करणे अवघड असते. आर्थिक तणावामुळे संभोग करूनही समाधान मिळत नाही. यामुळे नात्यातील प्रेमाची वीण टिकवून ठेवणे अवघड होते.

तणावाचा सामना कसा कराल?

पैशांची अडचण वेळीच सोडवणे, हे आर्थिक तणावापासून दूर राहण्यासाठी गरजेचे असते. जोपर्यंत आर्थिक स्थिती चांगली नसते तोपर्यंत एकमेकांच्या प्रेमळ साथीने परिस्थितीचा सामना करा. मन कणखर बनवा आणि लवकरच काहीतरी तोडगा निघेल, असा सकारात्मक विचार करा. ज्या गोष्टींमुळे तणाव वाढतो त्या गोष्टींपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा. पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.

आपल्या जोडीदाराला वेळ द्या. त्याला प्रेमळ साथ द्या, त्याला विश्वासात घ्या. तुम्हाला परवडणाऱ्या ठिकाणी फिरायला जा, फिरल्यामुळे तणाव कमी होतो. प्रसन्न वाटते. तणावमक्त राहण्यासाठी व्यायाम हा सर्वात चांगला उपाय आहे. शांत, सुमधुर संगीतही मनावरचा ताण कमी करते.

आर्थिक तणावाच्या काळात मानसिकदृष्ट्या खंबीर असणे गरजेचे असते. अशावेळी जोडीदाराचा स्वभाव आणि वागणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे समस्यांचा सामना करणे सोपे होते. आपल्या जोडीदाराशी संवाद साधून त्याला समजवा की, दिवस एकसारखे नसतात. कठीण प्रसंगी तुमच्यासाठी त्याची प्रेमळ सोबत किती गरजेची आहे, हे त्याला पटवून द्या.

तुम्हाला ज्यामुळे आनंद मिळतो ते काम करा. पुस्तक वाचणे, बागकाम, चित्र काढणे, स्वयंपाक करणे, अशा तुमच्या एखाद्या छंदासाठी वेळ द्या. यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तणाव जास्तच असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसोपचारतज्ज्ञाला भेटा. समुपदेशन खूपच उपयुक्त ठरते.

किती अपडेट आहात तुम्ही

* स्नेहा सिंह

आजकाल जिथे जावे तिथे हेच ऐकायला मिळते की हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे. तुमच्याकडे जितकी जास्त माहिती असेल तितके अधिक यश तुम्ही कुठल्याही कामात अगदी सहज मिळवू शकता.

इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. सरळ सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आपल्या आजूबाजूच्या परिसरापासून ते अगदी शहर, राज्य आणि देश तसेच जगात काय सुरू आहे या सर्वांची माहिती करून घेणे. फॅशनपासून ते व्यसनांपर्यंत आणि नोकरी-व्यवसायापासून ते शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्राची माहिती करून घेणे.

या सर्व क्षेत्रांमध्ये काय नवीन सुरू आहे, याची दररोजची माहिती असणे आजच्या युगात अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या विषयाचे सखोल ज्ञान असणे हे तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश मिळवून देते, पण याव्यतिरिक्त जर तुम्हाला अवतीभवतीच्या जगाची संपूर्ण माहिती असेल तर सोन्याहून पिवळे.

तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या व्यतिरिक्त अन्य सर्व विषयांचे असलेले ज्ञान जीवनातील इतर आघाडयांवरही यश मिळवून देऊ शकते.

प्रत्येक विषयाची माहिती

नोकरदार महिला असो किंवा गृहिणी, जर तुम्हाला जगभरात काय सुरू आहे याची माहिती असेल तर ती सक्षम निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.

जीवनात छोटया-छोटया गोष्टींची माहिती तुम्हाला परिपूर्ण बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. आपल्या आवडीशिवायच्या अन्य क्षेत्रांची माहिती करून घेणे महिलांना विशेष आवडत नाही. पण आज जेव्हा माहिती हीच ताकद समजली जात आहे तेव्हा सर्व प्रकारच्या माहितीपासून दूर राहून चालणार नाही.

सर्व विषयांची माहिती असणाऱ्या महिलांना सर्वत्र आदर मिळतो. त्यांचे भरपूर कौतुक होते.

समजा एका कुटुंबात २ महिला आहेत. त्यातील एकीला फक्त खाणे, मजेत रहायला आवडते. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरच्या जगाशी तिला काही देणेघेणे नसते. कुटुंबाची चांगली काळजी घेत असल्याबद्दल तिला आदर मिळू शकतो, पण कुटुंबाबाहेरील एखादे काम असल्यास किंवा बाहेरच्या एखाद्या विषयावर बोलणे सुरू असल्यास तिला सहभागी करून घेतले जात नाही.

याउलट जी दुसरी महिला घरातील कामाव्यतिरिक्त बँक, औषधे, विमा यासह नवीन गॅझेट्स आणि तंत्रज्ञानाची माहिती करून घेते, संपूर्ण जगात घडणाऱ्या घटनांची जिला माहिती असते तिला जास्त महत्त्व मिळते. तिला सर्व विषयांची माहिती असल्यामुळे तिच्या पतीलही तिचे सर्व म्हणणे व्यवस्थित ऐकून घ्यावे लागते.

सोशल मीडिया विश्वासार्ह नाही

आजूबाजूच्या सर्व विषयांची जास्तीत जास्त माहिती करून घेण्याविषयी आपण बोलत आहोत. त्यामुळे येथे एक खुलासा करणे गरजेचे आहे की, आजकालच्या बहुसंख्य महिला व्हॉट्सअप, फेसबूकवरून जी माहिती मिळते तीच प्रमाण मानतात. त्यांना वाटते की, त्या माहितीमुळे त्यांना सर्व विषयांचे भरपूर ज्ञान मिळाले आहे. पण प्रत्यक्षात असे मुळीच नसते. व्हॉट्सअप, फेसबूक इत्यादी सोशल मीडियावरून वाटण्यात येणारे ज्ञान विश्वासार्ह नसते. ते अर्धवट आणि वरवरचे असते.

या माहितीची सत्यता पडताळून तिच्या उपयोग केला तर काही हरकत नाही. अन्यथा अशा प्रकारची अर्धवट माहिती तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. म्हणूनच यापासून दूर रहाणेच योग्य ठरेल.

बऱ्याच महिला अजूनही जेवण बनवायलाच प्राधान्य देतात. मात्र आरोग्यासाठी कोणती गोष्ट चांगली आहे, कोणत्या पदार्थांपासून किती जीवनसत्त्वे आणि प्रथिने मिळतात, कोणत्या ऋतूत कोणते पदार्थ खाणे चांगले असते, कोणत्या ऋतूत कोणत्या पदार्थांमध्ये कुठले मसाले घालावे, या सर्वांची माहिती करून घेणे तुम्हाला आदर्श गृहिणी बनवेल.

परंतु, अजूनही बऱ्याच महिलांना याची माहिती नाही. प्रत्यक्षात चवीसोबतच आरोग्य राखणे, ही आजच्या काळाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्हाला अपडेट रहावेच लागेल.

हे आहे गरजेचे

वित्त हे एक असे क्षेत्र आहे ज्याची माहिती असणे गरजेचे असते. यात बँक, गुंतवणूक, बचत किंवा विमा यासारखे अनेक घटक येतात. अजूनही १०० पैकी ५० महिलांना त्यांच्या बँक खात्याची माहिती नसते.

गृहिणीचे बँक खाते शक्यतो तिचा नवराच हाताळत असतो. गुंतवणूक, बचतीसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, ही फार लांबची गोष्ट झाली, पण कुटुंबाची एकूण गुंतवणूक किती आहे, याबाबतही तिला काहीच माहिती नसते. विम्याबाबतही तिची काहीशी अशीच गत असते.

३५ वर्षांच्या अंजलीच्या पतीचा अपघात झाला. तिच्या पतीने मागील २ वर्षांपासून जीवन विम्याचे हप्ते भरले नव्हते. पतीच्या मृत्यूनंतर तिला २० लाख मिळाले. अंजली घर कामात अशी काही अडकून गेली होती की, या सर्वांची माहिती करून घ्यायचे विसरून गेली होती.

पतीच्या लाखो रूपयांच्या शेअर्सचा हिशोब ठेवणे तिला जमत नव्हते, कारण तिच्याकडे काहीच माहिती नव्हती. म्हणूनच घराच्या बजेटपासून ते बचतीपर्यंतची सर्व माहिती करून घ्यायला हवी.

आरोग्याची माहिती

अशाच प्रकारे औषधे आणि औषधांच्या दुकानांबाबत माहिती असणे गरजेचे असते. जर याबाबत तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता.

घाबरल्यामुळे त्रास अधिक वाढतो. सर्वसाधारणपणे महिलांना आजारांबाबत माहिती असायलाच हवी. कोणते आजार साधे असतात आणि कोणत्या आजारांकडे गांभीर्याने पाहायला हवे, याचा निर्णय त्या आजारांबाबत अधिकची माहिती असल्यास सहज घेता येतो.

बऱ्याच महिला थायरॉइडला घाबरून तणावात येतात तर बऱ्याच महिला कर्करोग होऊनही चांगले जीवन जगू शकतात. तुमचा संयम आणि तुमच्याकडे या आजारांसंदर्भात असलेली परिपूर्ण माहिती, ही यामागचे महत्त्वपूर्ण कारण आहे. छोटया-मोठया रोगांवर उपचार करण्यासाठीची अद्ययावत माहिती मिळवणे आणि यासंदर्भातील तुमचे ज्ञानच तुम्हाला बळ देते.

तंत्रज्ञानाची माहिती मिळवताना काय असते गरजेचे?

आज तंत्रज्ञान सर्वात महत्त्वाचे समजले जाते. तुम्हाला जर फेसबूक किंवा इन्स्टाग्रामचा वापर करायला येत असेल तर याचा अर्थ तुम्ही तंत्रज्ञानातील तज्ज्ञ झालात, असा होत नाही. टायपिंग, एडिटिंग, फोटो एडिटिंग, बेसिक अकाउंटिंग, ई मेल करणे, ऑनलाईन पेमेंट, नेट बँकिंग, ऑनलाईन बुकिंग किंवा जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी सर्व माहिती असणे आज अत्यंत गरजेचे आहे.

एका स्मार्टफोनद्वारे तुम्ही संपूर्ण जग फिरू शकता, कारण एक बटण दाबून तुम्ही जेवण, तिकिटाचे आरक्षण, जगातील विविध स्थळांची माहिती करून घेणे, पैसे पाठवणे असे सर्व करू शकता. पण जर हे करताना थोडी जरी चूक झाली तरी मोठया संकटात सापडू शकतात. म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे असते. या ज्ञानामुळे जीवन जगणे सोपे होते.

 

जर नवरा फ्लर्टी असेल

* पूनम अहमद

रेखाने लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे नमूद केले होते की तिचा पती अनिलला इतर महिलांसोबत फ्लर्टिंग करण्याची सवय आहे. आधी तिला वाटलं की लग्नाआधी सगळी मुलं फ्लर्ट करतातच. अनिलची सवय हळूहळू दूर होईल, पण तसे झाले नाही.

रेखाला आश्चर्य वाटत होते की तिच्या उपस्थितीतही अनिल इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांना २ मुलेही होती.

रेखाला वाटायचे, जेव्हा ही अवस्था माझ्यासमोरच आहे, तर मग ऑफिस किंवा बाहेर काय-काय करत असतील. अनिलची कृती पाहून ती विचित्रशा नैराश्यात राहू लागली.

एक दिवस तर खूपच झाले. तिच्याच सोसायटीत राहणारी खास मैत्रीण रीना ही संध्याकाळी त्यांच्या घरी आली. अनिल घरीच होता. जोपर्यंत रेखा रीनासाठी चहा आणते तोपर्यंत अनिल उघडपणे रीनाशी फ्लर्ट करत होता. रेखाला खूप राग आला.

रीना निघून गेल्यावर तिने अनिलला रागाने विचारले, ‘‘रीनाशी इतके फालतू बोलायची काय गरज होती?’’

अनिल म्हणाला, ‘‘मी फक्त तिच्याशी बोलत होतो. ती आमची पाहुणी होती.’’

जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होईल

पुन्हा हा प्रकार घडला, अनिलने तिचे बोलणे नाही मानले. अनिल घरी असतांना जेव्हा केव्हा रीना घरी यायची तेव्हा तो तिथेच टिकून असायचा.

एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने रीनाचा हात मस्करीत पकडला. जेव्हा ती घरी जाण्यासाठी उठली तेव्हा अनिल तिचा हात धरून म्हणाला, ‘‘अहो, अजून थोडा वेळ बसा. इथे सोसायटीतच तर जायचं आहे.’’

रीना तर खजील होत निघून गेली पण रेखाला तिच्या पतीच्या या कृत्याची खूप लाज वाटली. रीना निघून गेल्यावर तिचं अनिलशी खूप भांडण झालं. पण अनिलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

रेखा आणि रीना खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखाने आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल एकांतात तिची माफी मागितली आणि तिला असेही सांगावे लागले, ‘‘रीना, अनिल घरी असतांना तू येत जाऊ नकोस. मला फोन कर, मीच येत जाईन.’’

एक दु:खद परिस्थिती बनते

त्या दिवसापासून रीना अनिलच्या उपस्थितीत रेखाच्या घरी कधीच आली नाही. त्यात आणखीनच दु:खद परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा रीनाने अनेकांना सांगितले की रेखा तिच्या नवऱ्याच्या रुपलोभी स्वभावामुळे सुंदर स्त्रियांना घरी येण्यास नकार देते.

अनिल एका कंपनीत अधिकारी म्हणून होता आणि रेखा साध्या स्वभावाची होती. अनिलच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे तिची प्रतिमा डागाळली. ही गोष्ट रेखा कधीच विसरली नाही आणि दु:खी होत राहिली. दोघांमध्ये वारंवार बेबनाव होत राहिला.

एके दिवशी मुलगीही असे म्हणाली,  ‘‘बाबा, माझ्या मैत्रिणी येतील, तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीतच राहा.’’

मुलाचे लग्न झाले. आता सून घरात आली, तेव्हा अनिल कधी बोलता-बोलता नव्या सुनेचा हात धरून बसवायचा, तर कधी तिच्या खांद्यावर हात ठेवायचा. रेखाला हे सर्व सहन होत नव्हते.

एके दिवशी ती खाजगीत कडक शब्दात म्हणाली, ‘‘तुम्ही जर ही सवय कुठल्याही प्रकारे सोडली नाही, तर आता परिणाम खूप वाईट होईल, विचार करा.’’

रीनाशी गप्पा मारताना तिने तिच्या आयुष्यातील या सर्व गोष्टीही सांगितल्या, ‘‘मी अनिलची फ्लर्टिंगची सवय आयुष्यभर सोडवू शकले नाही. मला माहित नाही काय कारण असेल की एवढया वयातही अनिल इतर महिलांशी फ्लर्टिंगची संधी आजही सोडत नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे मी माझ्या माहेरच्या घरीही कधीच शांततेने जाऊन राहू शकले नाही आणि सासरी तर जणू त्यांना त्यांच्या वहीनींसोबत फ्लर्ट करण्याचा परवानाच होता. त्यांच्या या सवयीने मला आयुष्यभर दु:खाने भरून ठेवले आहे.’’

त्याचवेळी आरतीही तिच्या नवऱ्याच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे खूप नाराज आहे. ती म्हणते, ‘‘जर कुठे एखाद्या काउंटरवर मुलगा-मुलगी दोघेही असतील, तर माझा नवरा कपिल मुलीच्या काउंटरवरच अडकतो. माहित नाही की त्याला बोलण्यासाठी किती बहाणे सापडतात.

‘‘हे बघून मला लाज वाटते, जेव्हा मला त्या मुलीच्या डोळयात चिडचिड दिसते. एखाद्या मुलाशी बोलत असताना केवळ कामाबद्दल बोलतो आणि फोन ठेवतो, पण जर एखाद्या मुलीचा फोन असेल तर त्याचा टोनच बदललेला असतो.’’

नातेसंबंधात निर्माण झाला असंतोष

सेक्स रोल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनानुसार पुरुष या कारणांसाठी फ्लर्ट करतात – सेक्स करण्यासाठी, नातेसंबंधात राहण्यासाठी, एखादे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, एखादी गोष्ट ट्राय करण्यासाठी, आत्मसन्मान वाढवण्यासाठी  किंवा मग मौजमस्ती करण्यासाठी, कौटुंबिक थेरपिस्ट कासेंडा लेन यांच्या मते, ‘‘पुरुष आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो, परंतु तो उत्साह किंवा अहंकार वाढवण्यासाठी फ्लर्टदेखील करू शकतो.’’

लाइफ कोच आणि लव्ह गुरू टोन्या म्हणतात की फ्लर्टिंग फसवणूक नाही, परंतु फ्लर्टिंग समस्या देऊ शकते, फ्लर्टी जोडीदारासह आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

अशा परिस्थितीत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुमच्या जोडीदारावर आरोप न करता त्याच्याशी बोला. त्याला सांगा तुम्हाला काय लक्षात येतं? त्याच्या फ्लर्टिंग सवयीबद्दल लोक तुम्हाला काय सांगतात? तुम्हाला काय वाटते? कधीकधी फ्लर्टी पार्टनरला हे जाणवतच नाही की त्याच्या कृतीमुळे त्याच्या पार्टनरला त्रास होत आहे. जर एखादी व्यक्ती आनंदी नसेल तर ती अशा प्रकारे आनंदाच्या शोधात फ्लर्टिंग करू शकते, स्वत:वर लक्ष केंद्रित करा, संपूर्ण परिस्थिती काळजीपूर्वक समजून घ्या.

महिलांचे शोषण

* प्रतिनिधी

मुलगे निर्माण करण्यासाठी स्त्रियांवर किती दबाव असतो, याचा नमुना दिल्लीतील एका गावात पाहायला मिळाला, त्यात एका आईने आपल्या 2 महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिला काहीही सुचले नाही, तर खराब ओव्हनमध्ये लपून बसायला सुरुवात केली. मुलाची चोरी झाल्याची बतावणी करणे. या महिलेला आधीच एक मुलगा होता आणि सामान्यतः स्त्रिया एका मुलानंतर आणि मुलीसह आनंदी असतात.

आपला समाज सुशिक्षित झाला असेल, पण तरीही धार्मिक कथांचे दडपण इतके आहे की जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला ओझे वाटू लागते. आपल्या पौराणिक कथांमध्ये, मुलींना इतका शाप दिला जातो की प्रत्येक गर्भवती स्त्रीला मुलगा होण्याची कल्पना येऊ लागते. रामसीतेच्या कथेत राम शिक्षा झाला, पण सीमासोबत नेहमीच भेदभाव केला गेला. महाभारत काळातील कथेत, कुंती असो वा द्रौपदी असो वा हिडिवा, सर्वांना त्या गोष्टी कराव्या लागल्या ज्या फारशा सुखावह नव्हत्या.

या कथा आता आपल्या शिक्षणाचा भाग बनत चालल्या आहेत. स्त्रियांना त्यागाच्या देवीचे रूप म्हणत त्यांचे प्रचंड शोषण केले जाते आणि त्या आयुष्यभर रडत राहतात. काँग्रेसच्या राजवटीत केलेल्या कायद्यात महिलांना हक्क मिळतात, पण त्याचा फटका महिलांना सहन करावा लागतो कारण प्रत्येक हक्काचा उपभोग घेण्यासाठी पोलीस आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो आणि भाऊ किंवा वडिलांना सोबत जावे लागते. त्याला, मग त्यांना त्या दिवशी जावे लागेल. कन्या जन्माला आल्यावर शिव्याशाप. या पौराणिक कथांमधून, स्त्रियांच्या उपवास, सण-उत्सवांमधून प्रत्येक स्त्रीच्या अवचेतन मनात आपण हीन आहोत आणि आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो, अशी विचारसरणी निर्माण होते.

गमतीची गोष्ट म्हणजे धर्माचे वर्चस्व असलेल्या जवळपास सर्वच सुसंस्कृत समाजात स्त्रिया कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडतात. श्रीमंत पाश्चिमात्य देशांमध्येही महिलांचे स्थान पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आहे आणि समान पात्रता असूनही त्या विशेष बिलिंगला बळी पडतात आणि एका आवाजानंतर त्यांची बढती थांबते. संपूर्ण जगावर पुरुषांचे वर्चस्व असताना, दिल्लीतील चिराग दिल्ली गावातील नवख्या आईने मुलाच्या जन्माला दोष देऊन चूक सुधारण्यासाठी त्याची हत्या केली यात नवल आहे का?

आता या महिलेला शिक्षा करण्यापेक्षा तिला काही दिवस मानसिक रुग्ण रुग्णालयात ठेवावे. तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या अपहरणप्रकरणी त्याला तुरुंगात पाठवले तर पती आणि मुलाचे जगणे कठीण होईल. नवरा दुसरं लग्न करू शकत नाही किंवा एकटाच घर चालवू शकत नाही.

अंमली पदार्थांचा व्यापार, तरुणांची चिंता

* संदीप मित्तल

आता तरुणांच्या नसांमध्ये रक्ताऐवजी ड्रग्ज धावत आहेत. पूर्वी केवळ शहरांमध्येच फोफावणारा अमली पदार्थांचा व्यवसाय आता गावकऱ्यांनाही वेठीस धरला आहे. या बेकायदेशीर आणि जीवघेण्या कृत्यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याची बाबही चिंताजनक आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या प्रकरणाने बरेच लक्ष वेधले, परंतु तरुणांना ड्रग्जपासून वाचवण्याऐवजी ते राजकीय सूडाचे हत्यार आणि कमाईचा एक भाग बनले.

भारतासह संपूर्ण जग अंमली पदार्थ आणि अमली पदार्थांशी संबंधित काळ्या धंद्याने हैराण झाले आहे. अंमली पदार्थांचे अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांना सामोरे जाणे हे आपल्यासाठी चिंतेचे आणि आव्हानाचेही आहे. आज बेकायदेशीर औषधे जगाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा बनली आहेत.

पंजाबच्या निवडणुकीत हा एक मोठा मुद्दा बनला आहे कारण ड्रग्जमुळे होणाऱ्या मृत्यूमुळे गावकरी त्रस्त आहेत आणि येणाऱ्या सरकारने हा आजार दूर करावा अशी त्यांची इच्छा आहे. कुमकलन नावाच्या छोट्या गावात 10 वर्षात 55 तरुण ड्रग्जमुळे अकाली मृत्यूच्या खाईत पडले.

या अवैध धंद्याने देशाला कसे वेठीस धरले आहे, याचे ताजे उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईत अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) देशातील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत आहे. मात्र, एनसीबी हे आता राजकीय हत्यार बनले असून खऱ्या उद्देशापासून भरकटले आहे.

युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज (UNODC) च्या अहवालानुसार, दक्षिण आशियाई देशांमध्ये ड्रग्ज वापरणाऱ्यांपैकी 60 टक्के एकट्या भारतात आहेत, ज्यात बहुतांश तरुण आहेत. अशा परिस्थितीत, एचआयव्ही संक्रमणाचा धोका देखील वाढतो, कारण सुमारे 72 टक्के भारतीय औषध वापरकर्ते संक्रमित सुयांमधून औषधे घेतात.

अंमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवाद हे एक आव्हान आहे

त्याचे जाळे भारतातच नाही तर परदेशातही पसरत आहे. यामुळे दहशतवादालाही प्रोत्साहन मिळते. अंमली पदार्थांच्या व्यवसायातून दहशतवादी नेटवर्कला मोठ्या प्रमाणात पैसा, शस्त्रास्त्रे इ. या अवैध धंद्याला पूर्णपणे आळा घालायला हवा.

अफगाणिस्तानातील तालिबानच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत ड्रग्ज हेरॉइन आहे. आजही सरकार याबाबत फारसे गंभीर नाही. उदा., जे बंदी घातलेले औषध पकडले जाते त्याचा काही उपयोग होत नाही. ते चुकीच्या हातात पडू नये म्हणून ते जाळून नष्ट केल्याचा दावा केला जातो, पण पुन्हा बाजारात विकला जाऊ नये यासाठी स्वतंत्र वॉचडॉग नाही.

आंतरराष्ट्रीय एजन्सी मदत करतात आणि जेव्हा जेव्हा एखादी मोठी खेप असते तेव्हा ते पूर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच, आम्ही या एजन्सीच्या मदतीने भारतात आणि परदेशात एकत्रितपणे छापे टाकले.

अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवन

भारत-म्यानमार सीमा आता पुन्हा सक्रिय झाली आहे. अफगाणिस्तानातही तालिबानी सरकार स्थापन झाल्यापासून भारतात अमली पदार्थांच्या व्यापारात मोठी वाढ झाली आहे. अफूवर आधारित जी औषधे भारतात येत आहेत, ती पुन्हा परदेशात जाण्यासाठी येतात. राजधानी दिल्लीतही अमली पदार्थांच्या व्यापाराच्या रॅकेटचा दररोज पर्दाफाश होत असला तरी देशातही त्याचा वापर वाढत आहे.

ग्रामीण भागात त्यांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. राजधानीत, पदपथावर अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनांचा समूह राहतो, तर दुसरीकडे कौल सेंटर आणि क्रिएटिव्ह आर्ट्सशी संबंधित फॅशन डिझायनर्स, फिल्म एड्स बनवणारे तरुण व्यावसायिक आहेत. गरिबीमुळे एका वर्गाला अंमली पदार्थांच्या व्यसनातून सावरता येत नसेल, तर दुसरा वर्ग बघण्याच्या नादात किंवा लुटण्याच्या नादात अंमली पदार्थांच्या आहारी जातो.

अंमली पदार्थांच्या विक्रीत मुलींची वाढती संख्या हीदेखील एक मोठी चिंता आहे. या व्यवसायात गुंतलेले माफियादेखील मुलींचा वापर करतात कारण त्यांना वाटते की अनेकदा मुली पोलिसांना फसवण्यात यशस्वी होतात.

दुसरे म्हणजे, यातील बहुतांश विक्रेते मुली आहेत, ज्यांना अंमली पदार्थांचे व्यसन आहे आणि ते फक्त खरेदी करण्यासाठी ते विकण्याच्या व्यवसायात सामील आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून ड्रग्जचा व्यवसायही वाढत आहे.

अशा कॉल सेंटर्स आणि वेबसाइट्सचा भरभराट होत आहे जिथे व्यवहार होण्याची शक्यता असते आणि क्रेडिट कार्ड आणि बिटकॉइनद्वारे पैशांचे व्यवहार होतात. ब्राऊन शुगर आणि स्मॅकला इतर मादक पदार्थांपेक्षा जास्त मागणी आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांना अत्यल्प किंमतीचे नशा घेता येत नसल्याने ते स्मॅक खरेदी करतात.

त्याच वेळी, हेरॉइन हे सर्वांत महाग औषध आहे. सर्वप्रथम, खसखसच्या रोपातून पावडर हेरॉईनच्या स्वरूपात मिळते. यानंतर उरलेल्या पदार्थात इतर गोष्टी मिसळून ब्राऊन शुगर तयार केली जाते आणि त्यानंतर उरलेल्या पदार्थात लोखंड, लाकूड भुसा आणि इतर अनेक प्रकारची रसायने आणि इतर गोष्टी मिसळून ती अधिक मादक बनवली जाते.

अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थांची लागवड, उत्पादन, उत्पादन, वितरण, विक्री, आयात आणि निर्यात करणे हा गुन्हा आहे. विशेष न्यायालयाने ठरवून दिलेल्या शिक्षेत 10 ते 30 वर्षांच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडाचा समावेश आहे.

औषध वैयक्तिकरित्या सेवन केले जात असल्याचे सिद्ध झाल्यास, कमीत कमी 6 महिने आणि एक वर्षापेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 2022 मध्ये डार्कवेबद्वारे अंमली पदार्थांची तस्करी नियंत्रित करण्याचे मार्ग शोधण्यासाठी कार्यक्रम सुरू केला. चांगल्या अटींवर अडीच लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस देण्याची घोषणा आहे, मात्र जगात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या व्यवसायावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

गंमत म्हणजे दिल्लीत जिथे एनसीबीचे कार्यालय आहे, तिथल्या शेजारी आंबेडकर बस्ती आहे जिथे अमली पदार्थांचा व्यापार जोरात चालतो. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, या वस्तीच्या रस्त्यांवर माचिसच्या काठ्या, फॉइल, सिगारेटचे तुकडे आरामात दिसत आहेत, जे आमच्या ड्रग्ज नियंत्रणाच्या प्रयत्नांचा पर्दाफाश करतात. पंजाबमध्ये, गरीब मजुरांकडून काम घेण्यासाठी त्यांना मुद्दाम अंमली पदार्थ बनवले गेले, परंतु नंतर ते पैसेवाले, जमीन मालकांच्या लहान मुलांनाही पकडले गेले.

लहान मुले, तरुण आणि महिलांमध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या मोहिमेत विविध मंत्रालयांचे मंत्री, महिला आणि विकास विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि यूएनओडीसीचे प्रतिनिधी, क्रीडा आणि चित्रपट कलाकारही सहभागी होतात. मोहिमेला आकर्षित करण्यासाठी धावणे, पथनाट्य, थीमवर आधारित नृत्यनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचाही समावेश आहे.

अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींपासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम त्यांना समुपदेशनाची गरज आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रेही राबवावीत, जेणेकरून त्यांची या व्यसनातून सुटका होऊन ते जबाबदार नागरिक बनू शकतील.

लग्नात किती असावा हस्तक्षेप?

* शैलेंद्र सिंह

लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पसंत करताना आता त्यांचा भाऊ किंवा बहिणीची पसंत लक्षात घेणेही गरजेचे होऊ लागले आहे.

लग्नानंतर एकमेकांशी जुळवून घेणे सोपे व्हावे, हे यामागचे कारण असते. समवयस्क असल्यामुळे त्यांच्यात लवकर मैत्री होऊ शकते, त्यामुळे त्यांची पसंती सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत गरजेची होऊ लागली आहे.

हरदोई जिल्ह्यात राहणाऱ्या प्रतीकने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो गुरुग्राममध्ये नोकरी करू लागला. तिथे त्याचा चांगला मित्रपरिवार झाला, ज्यामध्ये मुले आणि मुलीही होत्या. त्यांच्या ग्रुपमधील अनेक मित्र- मैत्रिणींची मैत्री पुढे प्रेम आणि लग्नात बदलली. प्रतीकची त्याच्याच मित्रपरिवारातील झारखंडमध्ये राहणाऱ्या स्वातीशी ओळख झाली. आपण मेकअप आर्टिस्ट असल्याचे स्वातीने सांगितले होते. स्वाती दिसायला सर्वसामान्य होती, पण तिचे नीटनेटके राहणे, वागणे-बोलणे इतके प्रभावी होते की, प्रत्येक जण तिचे कौतुक करत असे.

प्रतीक आणि स्वातीची ओळख त्यांच्याच एका मित्राच्या पार्टीत झाली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. काही महिन्यांनंतर त्यांनी लग्न करायचे ठरवले.

स्वाती आणि प्रतीक दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाबाबत काहीच माहीत नव्हते. त्यामुळे प्रतीकने त्याच्या कुटुंबाबाबत सर्व माहिती स्वातीला दिली. स्वातीने मात्र तिच्या कुटुंबाबाबत अगदी त्रोटक माहिती दिली. कधीच कोणाशी ओळख करून दिली नाही. प्रतीक मल्टिनॅशनल कंपनीत काम करतो, हे स्वातीला माहीत होते. प्रतीकच्या मित्रांकडून तिने त्याच्या नोकरीबाबत सर्व माहिती करून घेतली होती. मात्र प्रतीकला फक्त एवढेच माहीत होते की, स्वाती एका मोठया मेकअप ब्रँडसोबत तिचा व्यवसाय करत आहे.

दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांचे कुटुंबीय एकमेकांना त्यांच्या लग्नात भेटले. तिथे त्यांना समजले की, स्वाती एका साध्या ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. तिचे कुटुंब मजुरी करण्यासाठी झारखंडहून दिल्लीला आले होते. स्वातीला २ भाऊ आणि १ बहीण आहे. तिचे कुटुंब तिच्या आयुष्यात विशेष हस्तक्षेप करत नव्हते.

बदलली आहे वागणूक

दुसरीकडे प्रतीक गावाला राहणारा असला तरी त्याने स्वातीला जे काही सांगितले होते ते खरे होते. गावात त्याचे कुटुंब शेती करायचे. तिथे त्याच्या कुटुंबाला प्रतिष्ठा होती. मुलाचे म्हणणे ऐकून प्रतीकचे कुटुंबीय प्रतीक आणि सुनेला घेऊन गावी आले, जेणेकरून गावातल्या लोकांना समजेल की, त्यांच्या मुलाने लग्न केले आहे. स्वाती आणि प्रतीक गावी जास्त दिवस राहणार नव्हते. प्रतीक हे समजून चुकला होता की, त्याच्या कुटुंबियांची विचारसरणी आणि स्वातीच्या विचारांमध्ये खूपच फरक आहे. त्यामुळेच कसाबसा एक आठवडा व्यवस्थित जावा आणि चांगले संबंध ठेवून दिल्लीला परत यावे, असा त्याचा विचार होता.

पती ‘परिवार कल्याण’ नावाची संस्था चालवणाऱ्या इंदू सुभाष यांनी सांगितले की, ‘‘आता मुलींची वागणूक पूर्वीपेक्षा जास्त बदलली आहे. लग्नाची जबाबदारी समजून घ्यायला त्या तयार नसतात. त्यामुळेच त्या नवऱ्यासोबतच त्याचे कुटुंब विशेष करून नवऱ्याच्या बहिणी, त्याची आई आणि इतर जवळच्या नातेवाईकांसोबत चांगल्या वागत नाहीत.’’

जावई शोधण्यापेक्षा अवघड काम आहे सून शोधणे

येथे प्रश्न फक्त स्वाती आणि प्रतीकचा नाही. मुलींची वागणुकीतील सहनशीलता पूर्वीपेक्षा कमी होत चालली आहे, हे सांगणारी कितीतरी उदाहरणे आहेत. आता त्या नवऱ्याच्या कुटुंबापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळेच मुलासाठी मुलीचा शोध घेणे खूपच अवघड काम झाले आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आकांक्षा जैन यांनी सांगितले की, ‘‘लग्नानंतर नवऱ्याच्या कुटुंबाशी कसे जुळवून घ्यायचे, हे जाणून घेण्यासाठी माझ्याकडे अशी कितीतरी मुले आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन येतात. त्यावेळी आम्ही अनेकदा असा सल्ला देतो की, लग्नापूर्वी होणाऱ्या बायकोची आपल्या कुटुंबाशी विशेषत: आपल्या भावंडांशी ओळख करून द्यायला हवी, जेणेकरून त्यांना एकमेकांशी चांगले संबंध निर्माण करायला मदत होईल.

भाऊ-बहीण त्यांच्याच वयाचे असतात. त्यामुळे ओळख वाढवणे, एकमेकांना समजून घेणे सोपे होते. यामुळे मुलीलाही अनोळख्या घरात एकटे असल्यासारखे वाटत नाही. ती सासरी चांगल्या प्रकारे नांदू शकते. लग्नाआधी केवळ नवऱ्याशीच नाही तर त्याच्या भावंडांशीही बोलायला हवे. हेच योग्य पाऊल ठरेल.’’

लाडात वाढलेल्या मुली

मागील काही वर्षांत मुलींबाबत घर, कुटुंब आणि समाज सर्वच चांगल्या दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. मुलींना लाडात वाढवले जाते. मिळालेल्या या स्वातंत्र्यामुळे मुलींच्या स्वभावातही बराच बदल झाला आहे. यामुळे त्या मुलगी बनून आरामात राहतात, पण जेव्हा सून बनून त्यांना सासरी जावे लागते आणि तेथील नियमांप्रमाणे दडपणाखाली रहावे लागते तेव्हा त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होऊ लागतात. अशा वेळी स्वाभाविकपणे आधी नवरा-बायको दोघांमध्ये दुरावा वाढतो आणि त्यानंतर भांडणे वाढू लागतात.

सासरी पतीपत्नीमध्ये होणाऱ्या भांडणांचा परिणाम पतीपत्नीसोबतच त्यांची भावंडे आणि आईवडिलांवरही होतो.

बाराबंकी जिल्ह्यात राहणाऱ्या विकासचे लग्न नेहासोबत झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनंतर विकास नोकरीनिमित्त कानपूरला गेला. नेहाला त्याच्यासोबत जायचे होते पण ती जाऊ शकली नाही. नेहाची सासरी भांडणे होऊ लागली. सुरुवातीला सर्व घराच्या चार भिंतींआड होते. त्यानंतर बाहेरच्या लोकांनाही त्यांच्या भांडणांबाबत समजले. एके दिवशी नेहा रागाने आपल्या आईकडे निघून गेली. तिकडे गेल्यानंतर तिने आपल्या सासरच्या लोकांना जेलमध्ये पाठवायची तयारी सुरू केली. नेहाचा सर्वात जास्त राग तिचा दीर रमेशवर होता. तिने रमेशवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा खटला दाखल केला.

‘पती परिवार कल्याण’ नावाची संस्था चालवणाऱ्या इंदू सुभाष सांगतात, ‘‘लग्नापूर्वी मुलीचे समुपदेशन करणे खूपच गरजेचे असते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यावेळी घरातील मोठया माणसांकडून मुलींना नकळत बरीच चांगली शिकवण मिळत होती. आता घरात फक्त आई असते. नातेवाईक केवळ लग्नाच्या दिवशीच येतात. त्यावेळी ते तिला काहीही समजावून सांगण्याच्या मनस्थितीत नसतात. काही सुशिक्षित कुटुंब मुलांचे लग्नाआधी समुपदेशन करतात, जे अनेकदा परिणामकारक ठरते.’’

लग्नाआधी नवरा-नवरी दोघांचेही पालक आणि भावंडांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतले तर लग्नानंतर होणारी भांडणे थांबवता येतील.

महत्त्वाची असते भाऊ-बहिणींची भूमिका

अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे भाऊ-बहिणींनी आपली होणारी वहिनी किंवा भाओजींसोबत मैत्रीचे नाते आधीच निर्माण केलेले असते. त्यामुळे आपलेपणा वाढतो आणि लग्नानंतर कोणालाच परकेपणा जाणवत नाही.

ज्योतीचे लग्न राजकुमारसोबत ठरले होते. लग्नाआधीच तिने आपल्या सर्व नातलगांसोबत चांगले संबंध ठेवले होते. त्यामुळे लग्नानंतर घरात असे काही मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले की, आपले घर सोडून ती नवऱ्याच्या घरी आली आहे, याची तिला कधीच जाणीव झाली नाही. मैत्री असल्याने नणंद आणि दिरासोबत ज्योती हसूनखेळून राहते. ज्योती सांगते की, आमच्यात इतके चांगले नाते आहे की, त्यामुळे मला माझ्या भावंडांची उणीव कधीच जाणवली नाही.

ज्योतीसारखाच काहीसा अनुभव रिताचाही आहे. रिता सरकारी नोकरी करते. त्यामुळे सुरुवातीला कामावर जाणे आणि घरातील कामांचा ताळमेळ साधणे तिच्यासाठी त्रासदायक ठरत होते. मात्र रिताने आपली नणंद आणि दिरासोबत चांगली मैत्री केली. दोघांचे शिक्षण, करियर आणि त्यांच्यासोबत खरेदीला जाणे, अशा सर्व कामांत ती हौसेने पुढाकार घेऊ लागली. त्यामुळे त्यांच्यातील मैत्री घट्ट होत गेली.

रिता सांगते की, नवऱ्याची भावंडे जेव्हा आपल्याच वयाची असतात तेव्हा एकमेकांना समजून घेणे जास्त सोपे होते. समवयस्क लोकांची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. एकमेकांना समजून घेणे चांगले असते. मला असे वाटते की, भाऊ किंवा बहिणीसाठी जोडीदाराची निवड करताना घरातील इतर लोकांसोबतच नवरा आणि नवरीच्या भावंडांनीही पुढाकार घेणे गरजेचे असते. यामुळे एकमेकांशी जुळवून घेणे सोपे होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें