होऊन जाऊ दे दोन कप चहा

* गरिमा पंकज

चहाच्या घोटासोबत, या जोडूया काही निवांत क्षण, मैत्रीचा सुगंध आणि आपलेपणातल्या आनंदाचे क्षण.’

आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर त्या बहाण्याने, कधी पावसाचे टपोरे थेंब पडू लागले की गरमागरम भजी सोबत पिण्याच्या बहाण्याने किंवा कधी शरीराचा थकवा, मरगळ दूर करण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी, चहा पिण्यासाठी कारण लागत नाही. अतिशय सुंदर क्षणांचा सोबती होतो चहाचा कप. म्हणूनच तर ढाबा असो की मोठमोठी रेस्टॉरंट्स, चहा सगळीकडे मिळतोच. फक्त तो बनवायच्या पद्धती वेगवेगळया असू शकतात. चीनमध्ये याला वेलकम ड्रिंकचे नाव दिले आहे तर जपानमध्ये पाहुणे आल्यावर ‘टी सेरेमनी’ केला जातो.

चहाचा इतिहास

चहाचा इतिहास फार जुना आहे. सर्वात प्रथम चीनमध्ये चहा पिण्यास सुरुवात झाली. नंतर सहाव्या शतकात चीनमधून चहा जपानमध्ये पोहोचला. तिथे चहाला फार पसंती मिळाली. एशियामध्ये चहाचे आगमन हे १९व्या शतकात झाले. आज भारत हा चहाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.

चहाचे फायदे

चहा हृदय तंदुरुस्त ठेवतो. हा अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी डायबिटिक अशा गुणांनी परिपूर्ण आहे. दातांसाठीही चहा चांगला असतो. चहामध्ये पोटॅशिअमसह इतर अनेक खनिज पदार्थ असतात. चहात असेलेले कॅटेचिन, पॉलिफिनॉल आणि अँटी ऑक्सिडंट्स याला आरोग्यपूर्ण बनवतात. भारतात चहाची लागवड ही प्रामुख्याने उत्तर भारतात कौसानी, दक्षिणमध्ये निलगिरीचे पठार क्षेत्र, उत्तरपूर्वेचे दार्जिलिंग आणि आसाम आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी केली जाते.

ब्लॅक टी : ब्लॅक टी हा पूर्ण ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेने निर्माण होतो. यात कॅफिनचे प्रमाण हे ५० ते ६५ टक्के असते. ब्लॅक टी ही चहाची सर्वात कॉमन व्हरायटी आहे आणि संपूर्ण जगात ७५ टक्के लोक याचा वापर करतात.

फायदे : हा चहा हृदयरोगाचा धोका कमी करतो. डायबिटीजच्या रुग्णांनाही हा फायदेशीर असतो. ब्लॅक टी रोमछिद्रांमध्ये तरतरी आणतो आणि लाल रक्त पेशींचे रक्षण करतो.

ओलोंग टी : चीनी भाषेत ओलोंगचा अर्थ आहे ब्लॅक ड्रॅगन. यात कॅफिन कन्टेन्टचे प्रमाण हे ग्रीन टी आणि ब्लॅक टी यांच्या मधले असते. याला स्वत:चा असा वेगळा सुगंध असतो. तसा तर हा ब्लॅक टी सारखाच असतो, पण याचे फर्मेंटेशन हे कमी वेळ केले जाते ज्यामुळे याचा स्वाद फार सुंदर लागतो.

फायदे : हा वजन कमी करायला मदत करतो. फॅट कमी करतो. त्वचेवर वयाचा दिसणारा प्रभाव कमी करतो.

ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये केवळ १० ते ३० टक्के कॅफिनच असते. यात स्वादासाठी लिंबू, पुदिना किंवा मध मिसळता येतो, पण साखर घातली जात नाही.

फायदे : कॅटेचिन नामक अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असलेला हा चहा तुम्हाला कॅन्सरपासून हृदय रोगासारख्या आजारांपासून वाचवतो. एका अभ्यासानुसार दररोज १ कप ग्रीन टी घेतल्याने कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका १० टक्क्यांपर्यंत कमी करतो. लट्ठपणा कमी करायचा असेल तर दिवसातून ३ वेळा ग्रीन टी जरूर प्या.

मसाला टी : मसाला चहा हा काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी इ. वाटून बनवला जातो. यात मसाला पहिल्यापासूनच तयार ठेवला जातो. चहा बनवायचा असतो  तेव्हा तयार मसाल्यातील थोडासा कपात टाकला जातो.

व्हाइट टी : व्हाइट टी हा अगदी माइल्ड फ्लेव्हरवाला असतो. याचा स्वादही शानदार असतो. याच्या एका कपात फक्त १५ मिलिग्रॅमपर्यंतच कॅफिन असते.

फायदे : हा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजपासून संरक्षण देतो आणि कॅन्सरशी लढायलाही सहाय्य करतो. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायलाही मदत करतो.

हर्बल टी : हर्बल टी हे खरंतर काही ड्रायफ्रुट्स आणि हर्ब्स यांचे कॉम्बिनेशन आहे. यात कॅफिन नसते आणि साखरेची आवश्यकताही नसते. याला वेगळाच सुगंध आणि स्वाद असतो.

फायदे : जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार दररोज २ ते ३ कप हर्बल टी चे सेवन केल्यास हायपर टेन्शनच्या रुग्णांना ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतो.

लेमन टी : लेमन टीसुद्धा फॅशनमध्ये आहे. यात साखर किंवा मध, पुदिना, सुंठ किंवा पावडर, काळे मीठ जे काही आवडत असेल ते घालून पिता येतो. हा चहाही फायदेशीर असतो. यातून लिंबाचे होणारे लाभ शरीराला मिळतात.

निरोगी नात्यात स्वच्छतेचं महत्त्व

* लव कुमार सिंह

राणी आणि रजनी खास मैत्रिणी. दोघीही मध्यमवर्गीय, सुशिक्षित, उदार, सहिष्णू, मितभाषी, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या, नवनवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक.

फक्त दोघींमध्ये एकच अंतर. ते अंतर म्हणजे देह प्रेमाबाबतचं. एका छताखाली राहात असूनदेखील राणी आणि तिच्या पतीमध्ये शारीरिकसंबंध जुळण्यास खूप वेळ लागतो. महिने असेच निघून जातात.

इकडे रजनी आणि तिचा पती आठवड्यातून १-२ वेळा तरी शारीरिकसंबंध ठेवतात. राणी तर या संबंधांना घाणेरडंदेखील समजते, तर रजनी मात्र असा विचार करत नाही. दोघी एकमेकींमधल्या या अंतराच्या गोष्टी जाणून आहेत.

तुम्ही आता म्हणाल हे कसलं बरं अंतर? होय, हेच तर खूप मोठं अंतर आहे. काही दिवसांपूर्वी या एका अंतराने दोघी मैत्रिणींमध्ये अनेक अंतरं निर्माण केली होती.

या एका अंतरानेच राणी शरीर स्वच्छ ठेवण्यात संकोचली होती. एवढंच नाही तर, तिच्या पतीचीदेखील अशीच काहीशी अवस्था होती. त्याला त्याच्या व्यवसायातून फुरसत नव्हती. तो सतत गुटखादेखील चघळत असायचा.

सेक्स स्वच्छता शिकवतं

इकडे रजनी पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक बाबतीत सतर्क होती. योग्य ताळमेळ, प्रेम, सुसंवाद आणि नियमित सहवासामुळे रजनीला याची जाणीव होती की एकांत, वेळ आणि सहवास मिळाल्यावर पती कधीही तिला मिठीत घेऊ शकतो. तो कधीही तिच्या कोणत्याही शरीराच्या भागाचं चुंबन घेऊ शकतो. कधीही दोघांच्या लैंगिक अंगांचं मीलन होऊ शकतं. अशा परिस्थितीत ती शरीराच्या आंतरिक स्वच्छतेबाबत बेपर्वा होऊ शकत नव्हती. रजनीकडून या प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया तिच्या पतीलादेखील आंतरिकरित्या स्वच्छ ठेवण्यात मदत करायची.

या एका अंतरामुळे राणी तिचा देह आणि खानपानाबाबतदेखील निष्काळजी झाली होती. जेव्हा तुमचं शरीर न्याहाळणारं, देहाची स्तुती करणारं कोणी नसेल तर अनेकदा लग्नानंतर अशा प्रकारचा निष्काळजीपणा वागण्यात येतो. राणी याचं अगदी ठळक उदाहरण होती. अशाप्रकारे काळाबरोबरच तिने चरबीच्या अनेक थरांना जणू निमंत्रण दिलं होतं. इकडे रजनीचं स्वत:वर व्यवस्थित नियंत्रण होतं. त्यामुळे ती छान सडपातळ होती.

या अशा त्यांच्या अंतरामुळेच राणी एक दिवस डॉक्टरच्या समोर बसली होती. रजनीदेखील सोबत होती. राणीला जननेंद्रियाच्या भागात वेदनेची समस्या होती, जी बऱ्याच दिवसांपासूनची होती. डॉक्टरांनी सांगितलं की इन्फेक्शन आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली होती.

राणीची ही गोष्ट रजनीच्या पतीलादेखील समजली होती. खरंतर तशी प्रत्येक गोष्ट रजनी आणि तिच्या पतीला तशी समजायचीच. दोघेजण यावर चर्चादेखील करायचे. रात्री जेव्हा रजनीने पती राजेशला ही गोष्ट सांगितली तेव्हा राजेश म्हणाला, ‘‘तू तुझ्या मैत्रिणीला समजवायला हवं की समागम ही वाईट गोष्ट नाहीए. मला असं नाही म्हणायचंय की अशी सर्व विवाहित लोक जी संबंध ठेवत नाहीत, ती शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहात असतील. परंतु एक गोष्ट मी गॅरण्टीने सांगू शकतो की जर पतिपत्नी नियमितपणे समागम करत असतील तर दोघेही आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहू शकत नाहीत. म्हणजेच जर ते एकमेकांच्या सहवासात आनंद घेत असतील तर ते अधिक निरोगी आणि स्वच्छ राहातात.’’

सेक्स औषध आहे

राजेश अगदी बरोबर म्हणाला होता. खरंतर जेव्हा पतिपत्नींना ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना शारीरिकरित्या लवकर जवळ यायचं असतं, याची जाणीव असते तेव्हा ते दोघेही स्वाभाविकपणे आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत सचेत राहातात. यामुळे दोघांचं व्यक्तिमत्त्व दृढ होतं आणि दोघांमध्ये मधुर संबंधदेखील निर्माण होतात. तसंच अनेक रागांपासूनदेखील शरीर दूर राहातं. याउलट जी जोडपी शारीरिकसंबंधांबाबत उदासीन राहातात, ते त्यांच्या स्वच्छतेबाबतदेखील बेपर्वा असू शकतात.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वैवाहिक जीवनात पतिपत्नीमध्ये शारीरिक संबंधाचे २ प्रमुख उद्देश्य असतात. पहिलं म्हणजे गर्भवती होणं आणि दुसरं म्हणजे आनंद मिळवणं. परंतु बारकाईने पाहाता सहवासामुळे अजून एक तिसरं उद्दिष्टदेखील साधता येतं. याला आपण असंदेखील म्हणू शकतो की जर पतिपत्नीमध्ये नियमित अंतराने शारीरिकसंबंध बनत असतील तर ते अधिक निरोगी असतात.

नक्कीच, पतिपत्नीमध्ये सेक्सला अनेक प्रकारचे त्रास दूर करण्याचं औषध असल्याचं सांगण्यात आलंय. सेक्सबाबत जगभरात खूप संशोधन करण्यात आलंय आणि केलं जातंय. विविध शोधानंतर जगभरातील तज्ज्ञांनी सेक्सचे फायदे अशाप्रकारे सांगितले आहेत.

* पतिपत्नींमध्ये नियमितपणे शारीरिकसंबंध निर्माण झाल्याने तणाव आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो; तेव्हा इतर अन्य रोगदेखील आजूबाजूला फिरकत नाहीत.

* आठवड्यातून १-२ वेळा केलेला सेक्स रोगप्रतिरोधकक्षमता वाढवितो.

* सेक्स खुद्द एक शारीरिक व्यायाम आहे आणि तज्ज्ञांनुसार अर्ध्या तासाचा सेक्स जवळजवळ ९० कॅलरीज कमी करतो म्हणजेच सेक्सच्या माध्यमातून वजन कमी करण्यासदेखील मदत मिळते.

* एका संशोधनानुसार जी व्यक्ती आठवड्यातून १-२ वेळा सेक्स करते त्यांच्यामध्ये हृदयविकाराची शक्यता खूपच कमी असते. कारण शारीरिक प्रेम हे एकप्रकारे भावनात्मक प्रेमाचं बाहेरचं रूप आहे, म्हणून जेव्हा आपण शारीरिक प्रेम करतो, तेव्हा भावनांचं घर म्हणजेच आपलं हृदय निरोगी राहातं.

* वैज्ञानिकांच्या मते सेक्स, फील गुडच्या अनुभूतीबरोबरच स्वसन्मानाची भावना वाढविण्यास सहाय्यक ठरतो.

* शारीरिकसंबध हे प्रेमाचं हार्मोन ऑक्सीटॉसिन वाढविण्याचं काम करतं; ज्यामुळे स्त्रीपुरुषाचं नातं मजबूत होतं.

* सेक्स शरीरातील अंतर्गत अशा उपजत पेनकिलर एण्डोर्फिसला उत्तेजन देतं, ज्यामुळे सेक्सनंतर डोकेदुखी, मायग्रेन आणि अगदी सांधेदुखीपासूनदेखील आराम मिळतो.

* वैज्ञानिकांच्या मते ज्या पुरुषांमध्ये नियमित अंतराने स्खलन (वीर्यपतन) होत असतं, त्यांच्यामध्ये वय वाढताच प्रोटेस्टसंबंधी समस्या वा प्रोटेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. इथे नियमित अंतराने म्हणजे एका आठवड्यातून १-२ वेळा समागम करण्याशी आहे.

* झोप न येण्याचा त्रास हा सेक्समुळे कमी होतो; कारण सेक्स केल्यानंतर खूप छान झोप येते.

* समागम एक औषध आहे. औषधदेखील असं की ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. म्हणूनच पतिपत्नींनी निरोगी राहाण्यासाठी या औषधांचं नियमित अंतराने सेवन आवर्जून करायला हवं.

सेक्स लाइफमध्ये यांना प्रवेश निषिद्ध

* रूचि सिंह

दिलीप जेव्हा रूहीला म्हणाला की ती आता बिछान्यावर पूर्वीसारखी सोबत करत नाही, तेव्हा हे ऐकून ती बैचेन झाली. त्यानंतर रूहीने सेक्स एक्सपर्ट डॉ. चंद्रकिशोर कुंदरांशी संपर्क साधला.

डॉ. कुंदरा यांच्या मते, सेक्स हा सुखी संसाराचा महत्त्वपूर्ण आधार आहे. याच्या अभावामुळे पतिपत्नीमध्ये दुरावा येतो. पतिपत्नीची एकमेकांबाबतची ओढ, प्रेम, आकर्षण संपण्याची अनेक कारणं आहेत जसं की शारीरिक, मानसिक, लाइफस्टाइल. हे सेक्स ड्राइव्हला कमी करतात.

तणाव : ऑफिस, घराचं वर्कलोड, आर्थिक समस्या, अवेळी खाणं-पिणं इत्यादींचा थेट परिणाम तणावाच्या रूपात दिसून येतो, ज्याचा आरोग्याबरोबरच सेक्स लाइफवरदेखील प्रभाव पडतो.

डिप्रेशन : हा सेक्सचा सर्वात मोठा शत्रू आहे. हा पतिपत्नीच्या संबंधावर परिणाम करण्याबरोबरच कुटुंबात कलहदेखील निर्माण करतो. डिप्रेशनमुळे सेक्सची इच्छा कमी होते. डिप्रेशनच्या औषधांमुळेदेखील कामेच्छा कमी होते.

झोप पूर्ण न होणे : ४-५ तासांच्या झोपेने आपल्याला फ्रेश वाटत नाही; ज्यामुळे हळूहळू आपला स्टॅमिना कमी होऊ लागतो. एवढंच नाही तर, सेक्समध्येही आपली रुची राहात नाही.

चुकीचा आहार : वेळीअवेळी खाणं आणि जंक फूड व प्रोसेस्ड फूडचं सेवनदेखील सेक्स ड्राइव्हला संपवतं.

टेस्टोस्टेरॉनचा अभाव : शरीरातील हे हार्मोन आपल्या सेक्सच्या इच्छेवर नियंत्रण आणतो. याच्या अभावामुळे पतिपत्नी दोघेही प्रभावित होतात.

बर्थ कंट्रोल पिल्स : बर्थ पिल्स स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतो, ज्यामुळे स्त्रियांमध्ये सेक्ससंबंधांबाबत विरक्ती येते. जेव्हा सेक्समध्ये दोघे एकमेकांना सहकार्य करतील तेव्हाच पतिपत्नीचा संसार यशस्वी होतो.

तुमचं सेक्स लाइफ उत्तम असेल तर याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावरही पडतो.

जाणून घ्या, सेक्सचे आरोग्याशी संबंधित काही फायदे :

शारीरिक तसंच मानसिक त्रासातून दिलासा : सेक्सच्या वेळी शरीरात हार्मोन्स निर्माण होतात, जे वेदनेची अनुभूती थोड्या वेळासाठी का होईना कमी करतात.

सर्दीखोकल्याचा प्रभाव कमी करतो : सेक्स उष्णता, सर्दीखोकल्याचा प्रभाव बराच कमी करतो.

मानसिक ताण कमी करतो : सेक्स मनाला शांती देण्याबरोबरच मूड वाढविणाऱ्या हार्मोन एंडोकिसच्या उत्पादनात वाढ करतो. यामुळे मानसिक तणाव कमी होतो.

मासिकपाळीत थकवा दूर करतो : सेक्समध्ये सततच्या उष्णतेमुळे एस्ट्रोजन स्तर खूपच कमी होतो. या दरम्यान शरीरात थकव्याची जाणीव खूपच कमी होते.

हृदयरोग आणि अॅटॅकची शक्यता कमी होते : अनेकदा हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना सेक्ससंबंधांपासून दूर राहाण्याचा सल्ला दिला जातो परंतु अपोलो इस्पितळाचे जेष्ठ हृदयरोग तज्ज्ञ, डॉ. के. के. सक्सेना यांच्या मते, पत्नीसोबत सेक्ससंबंध ठेवल्याने पूर्ण शरीराचा योग्य व्यायाम होतो, ज्यामुळे मन तणावरहित राहातं. हृदयविकाराची शक्यता कमी होते.

या घरगुती उपायांनी अॅसिडिटीपासून सुटका मिळेल

*गृहशोभिका टीम

तुम्हाला माहित आहे का की तुमच्या पोटात हायड्रोक्लोरिक नावाचे acidसिड पाचन तंत्राच्या सर्व कार्यासाठी जबाबदार आहे? जेव्हा आपण काहीतरी गुंतागुंतीचे खातो, तेव्हा ते पचवण्यासाठी पोटाचे आम्ल सामान्य पातळीवर असणे फार महत्वाचे आहे. जेव्हा शरीरात या acidसिडचे प्रमाण कमी होते, तेव्हा पचन व्यवस्थित होत नाही. या व्यतिरिक्त, पोटात acidसिडचा अतिरेक असला तरीही, पचन प्रक्रियेत अस्वस्थता असते, याला अॅसिडिटी म्हणतात.

अॅसिडिटी होण्याची कारणे

*  तळलेले आणि जास्त घन पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटी होतो आणि हे अॅसिडिटीपणाचे मुख्य कारण आहे.

* जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीवर ताण येत असेल, तर ते अॅसिडिटीचे कारणदेखील बनू शकते.

* सिगारेट आणि अल्कोहोलच्या अति सवयीमुळे अॅसिडिटीदेखील उद्भवते. या व्यतिरिक्त, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्यानेदेखील अॅसिडिटी वाढतो.

* चहा, कॉफी आणि जास्त बीडीच्या सेवनामुळे अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.

* लोणचे, व्हिनेगर, तळलेले अन्न, मिरची-मसालेदार इत्यादी गोष्टी खाल्ल्याने अॅसिडिटी होते.

अॅसिडिटीचे घरगुती उपाय

* अन्न खाल्ल्यानंतर लगेच कोणत्याही प्रकारचे पेय घेऊ नका.

* अन्न घेतल्यानंतर थोडा गूळ घ्या आणि चोखत रहा.

* जीवनसत्त्वे युक्त अधिक भाज्या खा.

* सकाळी उठून व्यायाम करा आणि दिवसभर शारीरिक क्रिया करत रहा.

* सकाळी उठून 2-3 ग्लास पाणी प्या.

* बदाम खाल्ल्याने आम्लपित्तामुळे तुमच्या छातीत जळजळ कमी होते.

* दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2-3 किलोमीटर चालण्याची सवय लावा.

लहान वयातच हृदयविकाराचा झटका का येतो?

* प्रेक्षा सक्सेना

अलीकडेच, बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले आहे. बातमी ऐकून प्रत्येकजण हैराण झाला आहे.

याआधी वृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक दिसून येत होता, पण गेल्या दोन वर्षांत तरुण लोक याला बळी पडू लागले आहेत. एक अभ्यास आहे की प्रत्येक मिनिटाला 30 ते 50 वयोगटातील 3 ते 4 भारतीयांना तीव्र हृदयविकाराचा झटका येतो. दक्षिण आशियातील लोकांना इतर कोठेही लोकांपेक्षा जास्त हृदयविकाराचा त्रास होतो. या उच्च रक्तदाबामुळे, प्रकाराने ग्रस्त असतात 2 मधुमेह आणि वाढलेले कोलेस्टेरॉल. अखेर एवढे काय कारण आहे की तरुण एवढ्या लहान वयात हृदयरोगी बनत आहेत, तर चला याचे कारण जाणून घेऊया.

मानसिक ताण

आजकाल तरुण अधिक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत. कामाच्या दरम्यान संयमाचा अभाव आणि तणावामुळे उद्भवणारी चिंता विकार ही एक सामान्य समस्या बनली आहे. चिंतामुळे, तणावासाठी जबाबदार हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

जीवनशैली

आजच्या तरुणांची जीवनशैली खूप वेगळी झाली आहे, ज्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते, ज्यामध्ये हृदयविकाराचा झटकादेखील एक आहे. रात्री उशिरापर्यंत उठणे आणि सकाळी लवकर झोपल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. बराच काळ शारीरिक श्रम न केल्याने आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. आजकाल वेळेअभावी चालणे हालचाल नगण्य झाली आहे. व्यायामाच्या अभावामुळे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा गुठळ्या होण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. घरातून ऑफिसला जाणे आणि तिथे बसून काम करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच आपला देश मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जातो.

बदलत आहे खाण्यापिण्याच्या समजुती

* शिखर चंद जैन

अलीकडच्या काही वर्षांत खाण्यापिण्याशी निगडित अनेक समजुती प्रचलित झाल्या आहेत पण त्यामध्ये आता नवीन शास्त्रोक्त रिसर्च आणि विचारांमुळे बरेच बदल घडत आहेत. वर्षांनुवर्षांचा अनुभव आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्यानंतर आता शास्त्रज्ञ पुन्हा त्याच गोष्टींवर परतले आहेत जे पूर्वी आपले पूर्वज म्हणायचे. जसं की नेहमी स्वस्थ राहाण्यासाठी ते तूप, दूध, दही, कडधान्य, नैसर्गिक तेल (रिफाइंडरहित), कच्च्या भाज्या, फळं इत्यादींचं सेवन करायला सांगायचे, तसंच आता हेल्थ एक्सपर्टही म्हणू लागले आहेत.

मग या, जाणून घेऊया अलीकडचे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या सर्वेक्षणात, खाण्यापिण्याच्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल काय काय म्हटलं गेलं आहे.

शेकमध्ये दुधाचा वापर

पूर्वधारणा : लाभदायक.

तज्ज्ञांचं मत : आयुर्वेदानुसार दुधाबरोबर आंबा, केळी, नारळ, बोर, अक्रोड, डाळिंब, फणस आणि आवळ्याचा वापर करू नये. आयुर्वेद ग्रंथांमध्ये याला आहाराच्या विरूद्ध म्हटलं गेलं आहे. अशा प्रकारचं सेवन केल्याने बेशुद्धी, पोटफुगी, जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी भरणं, भगंदर, रक्ताची कमतरता, शरीर सुकणे, ताप, जुनी सर्दी, नपुंसकता आणि आंधळेपणा यांसारखे रोग होऊ शकतात.

लोणी

पूर्वधारणा : लोणी अपायकारक असतं. म्हणून शक्यतो हे खाणं टाळलं पाहिजे. त्याच्याऐवजी लो फॅट असलेलं पॉलीअनसॅचुरेटेड स्प्रेड घ्या.

नवीन सल्ला : ‘‘कमी प्रमाणात लोणी खाणं फायदेशीर ठरतं. कमी प्रमाणात डेरी फॅट घेतल्याने कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : सामान्य प्रमाणात.

अंडी

पूर्वधारणा : अंड्यांमध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल असतं.

नवीन सल्ला : ‘‘अंडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. डाएटरी कोलेस्ट्रॉलने रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही. यामध्ये न्यूट्रीएंट आणि व्हिटॅमिन असतात,’’ मेल बेकमॅन, सीनियर व्याख्याता न्यूट्रीशन, बर्मिंघम सिटी यूनिव्हर्सिटी.

किती घ्यावं : आठवड्यातून ३-४ वेळा.

दूध

पूर्वधारणा : दूध कायम सेमीस्किम्ड किंवा स्किम्ड (मलईरहित) घ्यावं.

नवीन सल्ला : फुल फॅट दुधामध्ये हेल्दी फॅट असतात, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. फॅट म्हणजे ते अन्न अपायकारक असतं हे जरुरी नाही.

किती घ्यावं : दिवसभरात साधारणपणे अर्धा लीटर.

ब्रेड

पूर्वधारणा : ब्रेड आरोग्यासाठी चांगला असतो.

नवीन सल्ला : ‘‘फक्त होलग्रेन ब्रेडच चांगला असतो. मैद्यापासून निर्मित ब्रेड अपायकारक असतो. कायम लेबल वाचूनच ब्रेड घ्या,’’ मेल बेकमॅन, वरिष्ठ पोषणतज्ज्ञ.

किती घ्यावं : दिवसभरात २-४ स्लाइस खाणंच योग्य ठरतं.

ऑलिव्ह ऑइल

पूर्वधारणा : ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी खूप चांगलं असतं.

नवीन सल्ला : ‘‘ऑलिव्ह ऑइल कोशिंबिरीवर तर ठीक आहे, पण हे फ्राय करण्यासाठी वापरल्यावर हे कार्सनोजेनिक (कॅन्सरकारी) होऊ शकतं. फ्राइंगसाठी रेपसीड ऑइल चांगलं असतं. याचेही अनेक फायदे आहेत,’’ डॉ. ग्लेनीज जोन्स, न्यूट्रीशनिस्ट.

किती घ्यावं : ‘‘दिवसभरात एक मोठा चमचा; पण फ्राइंगसाठी नाही.’’

फ्रूट ज्यूस

पूर्वधारणा : फळांचा रस आरोग्यासाठी खूप चांगला असतो.

नवीन सल्ला : डबाबंद फळांचा रस साखरेने भरलेला असतो. त्यामध्ये नैसर्गिक रंग आणि चव असण्याचीही शक्यता असते. अनेक फ्रूट ज्यूसमध्ये तर सॉफ्ट डिंकसारखं शुगर कंटेंट असतं.
किती घ्यावं : डबाबंद अजिबात घेऊ नका. ताज्या फळांचा रस तेही स्वत: बनवून घ्या.

कार्बोहायडे्रट

पूर्वधारणा : दिवसभरात जेवणामध्ये ५० टक्के कार्बोहायडे्रट सामील करावं.

नवीन सल्ला : ‘‘ब्राउन कार्बोहायडे्रट चांगले असतात. पण पांढरे खूपच अपायकारक असतात. कार्बोहायडे्रट घ्या, पण अख्ख्या धान्याच्या रूपात. पांढरा स्पॅगेरी, ब्रेड, तांदूळ हे सगळं चांगलं नाही,’’ मेल बॅकमॅन, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ.

किती घ्यावं : होलग्रेन कार्बोहायडे्रट दिवसभरातील अन्नाच्या ५० टक्के असावं.

योगर्ट

पूर्वधारणा : दही कायम लो फॅटचं घ्यावं.

नवीन सल्ला : ‘‘फुल फॅट जास्त चांगलं असतं. फुल फॅट योगर्टने डायबिटीज आणि हार्ट डिसीझचा धोका कमी असतो. फुल फॅट योगर्टने वेट लॉस करण्यासाठी मदत मिळते,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : नियमितपणे फुल फॅट योगर्ट घ्यावं.

सुपर फूड

पूर्वधारणा : सुपर फूडसारखी कोणतीच गोष्ट नाही.

नवीन सल्ला : ‘‘काही विशेष आहार, जसं की फळं आणि भाज्या भरपूर पोषक असतात, पालक आणि बीटसारख्या तर व्हिटॅमिन आणि मायक्रो न्यूट्रीएंटने पुरेपूर असतात,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : हवं तितकं खा.

डार्क चॉकलेट

पूर्वधारणा : चॉकलेट आरोग्यास अपायकारक असतं.

नवीन सल्ला : डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर असतं. एका नवीन सर्वेक्षणानुसार डार्क चॉकलेटचं कमी प्रमाण खाल्ल्याने ब्लडप्रेशर कमी होतं. पण मिल्क चॉकलेट खाऊ नका. कारण त्यामध्ये कोकोआ कमी आणि फॅट व शुगर जास्त असतं.

किती घ्यावं : ७० टक्के कोकोआ असलेल्या डार्क चॉकलेटचे २ तुकडे पुरेसे असतात.

जेवणानंतर पाणी आणि मिठाई खाणं

पूर्वधारणा : कसलीच हरकत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला : आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी प्यायल्याने शरीर बारीक होतं, तर जेवणानंतर पाणी प्यायल्याने शरीर लठ्ठ होतं. जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी पिणं योग्य ठरतं. त्याचबरोबर जेवताना सर्वात आधी गोड पदार्थ, त्यानंतर आंबट आणि खारट पदार्थ आणि सर्वात शेवटी तिखट, कडवट आणि तुरट पदार्थ खावेत. त्याने जेवण चांगल्या प्रकारे पचतं. आहाराच्या सुरुवातीला फळामध्ये पेयद्रव्य आणि सर्वात शेवटी खायच्या वस्तू घ्याव्यात.

दुधाबरोबर फरसाण

पूर्वधारणा : चालतं.

तज्ज्ञाचा सल्ला : आयुर्वेदात दुधाबरोबर मिठाचं सेवन निषेध आहे. फरसाण, बिस्किटं, भजी आणि इतर तेलकट, खारवलेले पदार्थ दुधाबरोबर खाऊ नयेत. असे बरेच पदार्थ बनवताना क्षार म्हणजे खायच्या सोड्याचा वापर होतो. त्यामुळे केवळ केस आणि डोळ्यांवरच परिणाम होत नाही तर आयुर्वेदानुसार खाण्याच्या सोड्यामुळे पुरुषाची पौरूष शक्ती जितकी कमी होते तितकी इतर कोणत्याच पदार्थाने होत नाही.

मध आणि पाण्याचं सेवन

पूर्वधारणा : फायदेशीर.

तज्ज्ञाचा सल्ला : मध गरम पाण्यात मिसळून पिण्याचा अर्थ आहे रोगांना आमंत्रण देणं. मध कधीही गरम वस्तूबरोबर सेवन करणं आहाराच्या विरूद्ध असतं. ताज्या पाण्यात जुनं मध मिसळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो. समप्रमाणात देशी तूप आणि मध पिणंही आहाराच्या विरुद्ध असतं.

ब्रेकफास्ट सीरियल्स

पूर्वधारणा : डबाबंद, ईजी टू यूज ब्रेकफास्ट सीरियल सकाळच्या नाश्त्याचे चांगले पर्याय आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला : डबाबंद सीरियल्समध्ये हाय फ्रक्टोस कॉर्न सिरपचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याच प्रोसेड फूडमध्ये स्वीटनर म्हणून याचा वापर केला जातो. ज्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. अगदीच नाइलाज असेल तरच प्रोसेस्ड फूडचा वापर करा.

कनोला ऑइल

पूर्वधारणा : हे शरीरासाठी फायदेशीर असतं.

तज्ज्ञांचा सल्ला : न्यूट्रीशनिस्ट सांगतात की, हे एक जेनेटिकली मॉडीफाइड तेल आहे, म्हणून हे आरोग्यासाठी चांगलं नाही. याच्या रिफाइनिंग प्रोसेससाठी भरपूर केमिकलचा वापर केला जातो जो शरीरासाठी फारच अपायकारक असतो. उत्तम पर्याय म्हणून राईचं तेल, बदामाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल (कोल्ड प्रेस्ड) याचा वापर करावा.

सिंगल वुमनसाठी ७ जरूरी मेडिकल टेस्ट

– डॉ. नुपूर गुप्ता, कंसल्टंट ऑस्ट्रेशिअन अँड गायनोकोलॉजिस्ट, संचालक, लॅव वूमन क्लिनिक, गुरगाव

ज्या महिला लग्न करत नाहीत किंवा घटस्फोट वा पतीच्या मृत्यूमुळे एकटया राहतात, त्यांच्यात वय वाढताना एकटेपणाची भावना घर करू लागते कारण जेव्हा त्या चाळीशी पार करतात तोपर्यंत त्यांचे भाऊबहीण, कजिन्स, मित्र यांची लग्न होऊन ते आपापल्या कुटुंबात व्यस्त झालेले असतात. ज्यामुळे अशा स्त्रिया एकटया पडतात आणि त्यांच्या तणावाची पातळी वाढू लागते, जो त्यांना अनेक आजारांचे शिकार बनवतो. त्यांच्यात वजन कमी किंवा जास्त झाल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग, मज्जासंस्थेचे आजार एवढेच नाही तर अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची संभावना वाढते.

एकल जीवन व्यतीत करणाऱ्या महिलांनी आपले आरोग्य अधिकच जपले पाहिजे. त्यांनी असा विचार करणे टाळले पाहिजे की हेल्थ चेकअप करणे म्हणजे वेळ आणि पैसा यांची बरबादी आहे. कारण अनेक गंभीर आजारांची लक्षणे प्राथमिक टप्प्यात लक्षात येत नाहीत. त्यामुळे मेडिकल टेस्ट जरुरी आहेत, ज्यामुळे आजाराविषयी कळल्यास वेळीच योग्य ते उपचार करता येतात.

प्रमुख मेडिकल चेकअप

ओव्हेरियन सिस्ट टेस्ट : जर तुमच्या ओटीपोटात वेदना होतात किंवा अनियमित मासिक पाळी असेल किंवा मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव होत असेल तर ओव्हेरियन सिस्ट टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जर सामान्य पेल्विक परीक्षणादरम्यान सिस्ट आहे असे समजले तर अॅबडॉमिनल अल्ट्रासाउंड केली जाते. लहान आकाराचे सिस्ट आपोआप ठीक होतात, पण जर ओव्हेरियन ग्रोथ किंवा सिस्टचा आकार १ इंचाहून अधिक असेल तर तुम्हाला ओव्हेरियन कॅन्सर असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत डॉक्टर काही आणखी टेस्ट करण्याचा सल्ला देतात.

मॅमोग्राम : ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे. जेव्हा कॅन्सर झाल्यावरही कोणतीही बाह्यलक्षणे दिसून येत नाहीत, तेव्हा ही टेस्ट कॅन्सर आहे की नाही हे निश्चित करते. क्लिनिकल ब्रेस्ट एडमिनेशन (सीबीई) ही कोणत्याही डॉक्टरद्वारे केली जाणारी ब्रेस्टची फिजिकल एडमिनेशन असते. यात स्तनांच्या आकारातील बदल, जसे गाठी, निपल जाड होणे, निपलमधून डिस्चार्ज होणे, दुखणे आणि स्तनांच्या बनावटीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्याची तपासणी केली जाते.

किती कालांतराने करावी : सीबीई वर्षातून एकदा, आणि मॅमोग्राम दोन वर्षांतून एकदा.

कोलेस्ट्रॉल स्क्रिनिंग टेस्ट : कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅटी अॅसिड असते. ही तपासणी हे सांगण्यासाठी आवश्यक असते की तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता किती आहे. कोलेस्ट्रॉल २ प्रकारचे असते – एचडीएल अर्थात हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आणि एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. या टेस्टमध्ये रक्तातील या दोन्हींच्या स्तराची तपासणी केली जाते.

किती कालांतराने करावी : ३ वर्षांतून एकदा, पण जर तपासणीत हे आढळून आले की तुमच्या रक्तात कोलेस्ट्रॉलचा स्तर नॉर्मलहून अधिक आहे तर किंवा तुमच्या कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास आहे तर डॉक्टर तुम्हाला दर ६ ते १२ महिन्यांच्या अंतराने या टेस्ट करण्याचा सल्ला देतात.

ब्लड प्रेशर टेस्ट : नियमित स्वरूपात ब्लड प्रेशरची केलेली तपासणी ही शारीरिक स्वास्थ्याकरता अतिशय जरुरी आहे. जर तुमचे ब्लड प्रेशर हे ९०/१४० पेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तुमच्या हृदयावर ताण येतो. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोक, हार्ट अॅटेक किंवा किडणी फेल होण्याची शक्यता वाढते.

किती कालांतराने करावी : वर्षातून एकदा, पण जर तुमचे ब्लड प्रेशर सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला ६ महिन्यातून एकदा करण्याचा सल्ला देतात.

ब्लड शुगर टेस्ट आणि डायबिटीस स्क्रिनिंग : ब्लड शुगर टेस्टमध्ये युरिनची तपासणी करून रक्तातील शुगरची पातळी तपासली जाते. डायबिटीस स्क्रिनिंगमध्ये शरीराची ग्लुकोज अवशोषण क्षमता तपासली जाते.

किती कालांतराने करावी : ३ वर्षातून एकदा, कौटुंबिक इतिहास असल्यास दर वर्षी.

बोन डेन्सिटी टेस्ट : बोन डेन्सिटी टेस्टमध्ये एका विशिष्ट प्रकारच्या एक्सरेद्वारे स्पाइन, मनगट, कुल्ल्याचे हाड यातील डेन्सिटी मोजून त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो. ज्यामुळे हाडे तुटण्याआधीच वेळीच उपचार केले जाऊ शकतात.

किती कालांतराने करावी : दर ५ वर्षांनी.

पॅप स्मिअर टेस्ट : याच्याद्वारे गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी केली जाते. जर वेळीच याचे निदान झाले तर याच्यावर उपचार करणे सोपे होते. यात योनीत एक यंत्र स्पेक्युलम टाकले जाते. सर्विक्सच्या काही कोशिकांचे नमुने घेतले जातात. या कोशिकांची तपासणी केली जाते. की त्यांच्यामध्ये काही असमानता तर नाही.

किती कालांतराने करावी : ३ वर्षांतून एकदा.

उपयुक्त गुणांनी परिपूर्ण भाज्या आणि फळं

* आभा कश्यप मेड स्पा

ए फॉर अॅप्पल (सफरचंद) : सफरचंदाविषयी असं म्हटलं जातं की दररोज एका सफरचंदाचं सेवन केल्याने डॉक्टरला दूर ठेवता येतं. सफरचंद कापून आणि चावून खाल्ल्याने तोंडात जी लाळ तयार होते ती चांगली असते. हे अल्जायमर रोगापासून व कॅन्सरपासून बचाव करतं शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि मलावरोध व जुलाब यांसारख्या त्रासातून वाचवतं.

बी फॉर बीटरूट (बीट) : बीट पोटॅशिअम, मॅग्निशिअम, आयर्न, व्हिटॅमिन बी-६, ए. सी, नायटे्रट वगैरेंचा उत्तम स्त्रोत आहे. हे हार्ट अॅटॅक, हार्ट स्ट्रोक आणि रक्तदाबाचा धोका कमी करण्यास सहाय्यक ठरतं. हे एक उत्तम अॅण्टिऑक्सिडण्टही आहे, त्यामुळे कोलेस्ट्रॉल व रक्तात असलेल्या शर्करेचा स्तर नियंत्रित राखण्यास मदत होते.

सी फॉर कॅरेट (गाजर) : गाजर व्हिटॅमिन एचा उत्तम स्त्रोत आहे. यात त्वचा सुंदर बनवण्यासोबत कॅन्सर रोखण्याचे गुणही आहेत. हे डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यास सहाय्यक ठरतात. गाजरामध्ये आढळून येणारे अॅण्टिऑक्सिडण्ट्स सूर्यकिरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात. याचा उपयोग फेस मास्कच्या रूपातही केला जातो.

डी फॉर डेट (खजूर) : आयर्न आणि फ्लोरीनने युक्त खजूर व्हिटॅमिन आणि खनिजाचा उत्तम स्त्रोत आहेत. हे नियमितपणे खाल्ल्याने कोलॅस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासोबत अनेक आरोग्य समस्या दूर ठेवण्यास मदत होते. खजूरामध्ये नैसर्गिक शर्करा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्हाला एनर्जीसुद्धा मिळते. याउलट सोडिअम कमी प्रमाणात असतं. नैसर्गिक तत्वांनी परिपूर्ण खजूर आपल्या नर्व्हस सिस्टिमचं कार्य सुरळित करण्यास आणि पोटाच्या कॅन्सरपासून रक्षण करण्यास सहाय्यक ठरतो.

ई फॉर एगप्लांट (वांगी) : वांग्यामध्ये काही पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. मेंदूला पोषण मिळतं. वांग्यामध्ये कॅलरी खूप कमी प्रमाणात असते, त्यामुळे याच्या सेवनाने लठ्ठपणा अजिबात वाढत नाही. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे तुम्हाला कायम आपलं पोट भरलेले जाणवतं. वांगीमधुमेह नियंत्रित करण्यात आणि हृदयाची देखभाल करण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका निभावतात.

एफ फॉर फिग्स (अंजीर) : अंजीर पोटॅशिअमचा अतिशय चांगला स्त्रोत आहे. याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत मिळते. अंजीर फायबरच्या आहाराचाही उत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे वेट कंट्रोलरवर सकारात्मक परिणाम होतो. अंजीरचा हृदयावर अतिशय चांगला प्रभाव पडतो. हे त्वचेवर पडणाऱ्या डागांपासून बचाव करतं.

जी फॉर गार्लिक (लसूण) : लसूण भारतीय खाद्यपदार्थात सर्रास आढळून येते. परंतु जेवणाला चविष्ट बनवण्याव्यतिरिक्त लसणीमध्ये जीवाणूरोधक आणि विषाणुरोधक दोन्ही गुण असतात. त्यामुळे हिचा वापर त्वचा संसर्गावरील उपचारांसाठीही केला जातो.

एच फॉर हनी ड्यू मेलन (टरबूज) : टरबूज व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असतो, त्यामुळे त्वचा स्वस्थ राखण्यासाठी ही खूप उपयोगी आहे. टरबूज उत्तम आहाराची पूर्तता करतो. हा पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे हृदयाची स्पंदनं नियंत्रित करण्यातही सहाय्यक ठरतो.

आय फॉर आइसबर्ग लेट्युस (हिमशेल लेट्युस) : हिमशेल लेट्युसमध्ये कॅलरी आणि मेदाची टक्केवारी खूप कमी असते. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा हे खूप उपयुक्त ठरतं, म्हणजे हिमशेल लेट्युसचं दैनंदिन सेवन वजन घटवण्याच्या उपचारांसाठी खूप उपयुक्त आहे.

जे फॉर जॅकफ्रूट (फणस) : फणसाच्या गरांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर आढळून येतं. याशिवाय फणसामध्ये व्हिटॅमिन, खनिज, इलेक्ट्रॉलाइट्स, फायटोन्यूट्रीऐंट्स, कार्बोहायडे्रट, फायबर, मेद, प्रोटीन आणि अन्य पोषक तत्त्वांचं प्रमाण भरपूर असतं. फणस कॅलरीचा स्त्रोत आहे, परंतु यामध्ये सॅचुरेटड फॅट वा कोलेस्ट्रॉल नसतं. हे अॅण्टिऑक्सिडण्ट असल्यामुळे कॅन्सर आणि अन्य अनेक रोगांपासून संरक्षण करते. हे डोळ्यांसाठी चांगलं असतं आणि मोतीबिंदूपासून वाचवतं. यातही पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत आहे तसंच हाडं आणि त्वचा निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरतं.

के फॉर कीवी (कीवी) : सर्व प्रकारच्या कीवी फळांचं आणि भाज्यांचं सेवन केल्याने हृदय रोग, मधुमेह, कॅन्सर आणि इतर प्रकारच्या आजारांतील धोका कमी होतो. कीवीचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जसं की सुंदर त्वचा, चांगली झोप आणि हृदयाचं आरोग्य. हे मलावरोधसारख्या समस्येतही सहाय्यक ठरतं.

एल फॉर लेमन (लिंबू) : लिंबू व्हिटॅमिन ई चा उत्तम स्त्रोत आहे, त्यामुळे याची ईम्यून सिस्टिममध्ये सुधारणा करण्यास मदत होते. हे केवळ जेवणाची लज्जत वाढवत नाही तर त्वचा निरोगी व चमकदार राखण्यास सहाय्यक ठरते.

एम फॉर मँगो (आंबा) : आंबा व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅराटिनचा उत्तम स्त्रोत आहे. आंब्यामध्ये असलेले अण्टिऑक्सिडण्ट ल्यूकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून रक्षण करतं. आंबा ओपन पोर्स आणि मुरुमं नाहीशी करण्यास सहाय्यक ठरतो. कॅरी हार्ट अटॅक रोखण्यासाठी उत्तम उपाय ठरतो. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ने परिपूर्ण असल्यामुळे आंबा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास अतिशय उपयुक्त मानला जातो.

एन फॉर नट्स (नट्स) : सर्व नट्स व्हिटॅमिन ई व पोटॅशिअमने परिपूर्ण असतात. यात खनिज, कॅल्शिअम, आयर्न, मॅग्निशिअम आणि झिंकसारखे पदार्थही मोठ्या प्रमाणावर असतात. हे फोलेट, व्हिटॅमिन आणि उच्च कॅलरीचाही उत्तम स्त्रोत असतात, त्यामुळे सर्व नट्स आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.

ओ फॉर आलिव्ह (ऑलिव्ह) : ऑलिव्ह रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यात आणि ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर आहे. हे फळांच्या आणि भाज्यांच्या पर्यायाच्या रूपात फायबर आणि व्हिटॅमिन ‘इ’चासुद्धा उत्तम स्त्रोत आहेत. सोबतच हे अॅण्टिऑक्सिडण्ट असल्याने पेशींचे संरक्षण करण्यातही सहाय्यत ठरतं.

पी फॉर पेपर (मिरी) : मिरीमध्ये कॅरोटिन व व्हिटामीन सी चे प्रमाण अधिक असते. यामध्ये बायो फ्लेवोनॉयड्स तत्व मोठ्या प्रमाणात असतात, जे कर्करोग होण्यापासून बचाव करतात.

क्यू फॉर क्वींस (बेलफळ) : बेलफळाच्या गरात व सालीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ आढळतात. हे एक कमी कॅलरी असणारे फळ आहे. पिकलेल्या बेलफळात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते.

क्यू फॉर क्वींस (बेलफळ) : बेलफळाच्या गरात व सालीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतूमय पदार्थ आढळतात. हे एक कमी कॅलरी असणारे फळ आहे. पिकलेल्या बेलफळात मोठ्या प्रमाणात व्हिटामीन सी असते.

आर फॉर रेडिश (मुळा) : मुळ्यामध्ये फायटोकेमिकल आणि अॅण्टीऑक्सीडेंट तत्त्व असतात. त्याशिवाय मुळ्यात व्हिटामिन सीसुद्धा आढळते. जे एका शक्तीशाली अॅण्टीऑक्सीडेंटच्या रूपात कार्य करते.

एस फॉर स्ट्रॉबेरी (स्ट्रॉबेरी) : स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सीचा मिळण्याचे एक उत्तम स्त्रोत आहे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते व कॅन्सरशी लढण्यासही मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असून कोलोजनच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, जे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. वाढत्या वयाबरोबर कोलोजनचे प्रमाण कमी होत जाते. पण व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ जर आपण खाल्ले तर त्वचेवर त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो. त्वचा पूर्वीपेक्षा अधिक नितळ, निरोगी दिसू लागते.

टी फॉर टामॅटो (टोमॅटो) : व्हिटामीन ए, सी, के फोलेट आणि पोटॅशिअमचा उत्तम स्त्रोत म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये सोडिअम, संतृप्त चरबीयुक्त पदार्थ, कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.

यू फॉर उगली (उगली) : हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब याचे प्रमाण कमी करण्यासाठी हे फळ सहाय्यक ठरते आणि स्नायूयूंशी संबंधित विकारांमध्ये ही खूप लाभदायी आहे. त्वचेसंबंधी रोगांसाठी हे खाण्याचा सल्ला दिला जातो.

व्हि फॉर व्हिक्टोरिया प्लम (व्हिक्टोरिया बोर) : व्हिटामीन्स, खनिज व अॅण्टीऑक्सीडेंटचे भरपूर प्रमाण या बोरांमध्ये असते. यात कॅलरी खूप कमी प्रमाणात असते व चरबीयुक्त कुठलाही पदार्थ नसतो. व्हिटोरिया बोर हे तंतूमय पदार्थांचा समृद्ध स्त्रोत आहे. याला प्रतिक्रियाशाली ऑक्सीजन प्रजातीपासून (आरओएस) आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी ओळखले जाते.

डब्लू फॉर वॉटरमेलन (कलिंगड) : कलिंगडमध्ये पोटॅशिअम, अॅण्टीऑक्सीडेंट, व्हिटामीन बी.ए, बी-६, सी, कॅल्शिअम, थायमिन, सोडिअम आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हृदयविकार, कर्करोग, पाचनविकार आणि केस गळणे अशा आजारांपासून कलिंगड आपल्याला वाचवते. यामुळेच रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते.

वाय फॉर याम (रताळे) : रताळे कंदवर्गीय ज्या भांड्यांमध्ये येते त्यात कार्बोहायडे्रटचे प्रमाण भरपूर असते. रताळ्यात उर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. कारण फक्त १०० ग्रॅम रताळ्यात ११८ कॅलरी असते. रताळ्यामुळे व यात असलेल्या कार्बोहायेडे्रटचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे रक्तातील साखरेचे वाढणारे प्रमाण नियंत्रित करते.

झेड फॉर किनी (दोडका) : दोडक्यात ९४ टक्के पाण्याचे प्रमाण असते व कॅलरीचे प्रमाण कमी असते. यातील तंतूमय पदार्थांमुळे पचनास मदत होते. रक्तातील शर्करा कमी करून मलावरोध कमी करतो. कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठी ही दोडक्याचा उपयोग होतो व सूज कमी करण्याचेही यात गुण असतात. म्हणून दमा, हाडांचे आजार व गाठी अशा आजारांपासून हे वाचवते.

निरोगी राहायचे असेल, तर या सवयी लावा

* सोमा घोष

मुलांना अगदी सुरुवातीपासूनच साफसफाई आणि हायजीनबाबत सांगितले पाहिजे. ही सवय लहानपणापासूनच लावल्यास, ती मुलांच्या अंगवळणी पडते. केवळ मुलांनाच नव्हे, तर आईवडील दोघांनी अशी सवय स्वत:लाही लावून घेतली पाहिजे. साफसफाई व हायजीनमुळे अनेक आजारांपासून मुलांचे संरक्षण होते. उन्हाळा आणि पावसाळयात संक्रमणाचे आजार आपले डोके वर काढतात. अशावेळी या मोसमांत हायजीनची काळजी घेणे आवश्यक आहे.

एका सर्व्हेनुसार, भारतामध्ये ४७ टक्के मुले कुपोषणाची शिकार आहेत. याचे कारण म्हणजे, पोटातील इन्फेक्शन. पोटात सतत इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो. एवढेच नव्हे, पुअर हायजीनमुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

मुंबईच्या एसआरव्ही हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बालदुवांच्या मतानुसार, निरोगी शरीरात नेहमीच निरोगी विचारांचा वास असतो आणि हे खरेही आहे. कारण हायजीन अनेक प्रकारचे असतात. त्यात खास आहेत, दात, नखे, केस आणि संपूर्ण शरीर.

साफसफाईशी संबंधित खालील टिप्स आईवडील मुलांना देऊ शकतात :

* जेव्हा मूल थोडेसे मोठे होईल, तेव्हा त्याला ब्रश आणि पेस्ट द्या. ब्रश करण्याची क्रियाही सांगा. सोबत तुम्हीही ब्रश करा. म्हणजे तुम्हाला पाहून, त्यालाही स्वत:हून ब्रश करण्याची इच्छा होईल. असे केले नाही, तर कमी वयात कॅविटी होण्याची शक्यता असते. कॅविटी हिरडयांपर्यंत गेल्यास, दुधाचे दात पडूनही नवीन येणाऱ्या दातांसाठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे, काही मुले मोठी झाल्यानंतरही बाटलीने दूध पितात. अशावेळी दूध प्यायल्यानंतर त्यांना थोडे पाणी प्यायला दिले पाहिजे.

* नेल्स हायजीनबाबत मुलांना अवश्य सांगा. मुले धूळ-मातीत खेळतात. त्यामुळे त्यांचे हात व नखांच्या माध्यमातून जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. घाणेरड्या हातांनी शरीर किंवा डोके खाजविल्याने फोड किंवा पुरळ येतो, याला स्कॅबिज इन्फेक्शन म्हणतात. जर एक दिवसाआड मुले नखे कापायचा कंटाळा करत असतील तर दोन दिवसांआड नखे कापा. मात्र, नखे कापताना मुलांना त्याचे फायदेही समजावून सांगा. त्याचप्रमाणे, जेवायला बसण्याअगोदर हात धुवायची सवय लावा.

पुअर हायजीनमुळे मुलांना अनेक आजार होतात. त्यामध्ये कॅविटी, टायफाइड, हगवण, हॅपेटाइटिस ए आणि इ हे कॉमन आहेत. याचा अर्थ, मुलांनी खेळण्यासाठी बाहेर जाऊ नये, असा नव्हे. त्यांना बाहेर जाऊ द्या, खेळू द्या. मात्र, घरात आल्यानंतर त्यांना अंघोळीची सवय लावा. नेहमी मेडिकेटेड साबणाचा वापर करा. उन्हाळा आणि पावसाळयात हायजीनची खास काळजी घ्या. जेणेकरून, आपले मूल योग्य सवयींमुळे नेहमी निरोगी राहील. जर आपले मूल निरोगी राहिले, तर त्याचा मानसिक विकासही उत्तमप्रकारे होईल.

पब्लिक स्पेसमध्ये हायजीन

संक्रमणामुळे पसरणाऱ्या आजारांच्या कचाटयात सापडण्याचा धोका घराबाहेर जास्त प्रमाणात असतो. खास करून तेव्हा, जेव्हा तुम्ही किंवा तुमची मुले सार्वजनिक शौचायलाचा वापर करता. आजकाल बाजारात अशी उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये हायजीनची काळजी घेऊ शकता. स्प्रेच्या रूपात मिळणाऱ्या उत्पादनांना कॅरी करणेही सोपे असते. पब्लिक स्पेसमध्ये शौचालयांचा वापर करण्यापूर्वी सीटवर स्प्रे फवारा आणि संक्रमणापासून स्वत:चा बचाव करा.

मासिकपाळी आजार नाही

* प्रतिनिधी

पिरिएड्स म्हणजेच मासिकपाळीबाबत आपला समाज आजदेखील मोकळेपणाने बोलायला घाबरतो. याबाबत आजदेखील सर्वांच्या समोर न बोलण्याची गोष्ट समजली जाते. पॅड्स लपवून आण, मुलांना याबाबत सांगू नकोस आणि घरात यादरम्यान सर्वांपासून दूर रहायचं यासारख्या गोष्टी मुलीला शिकविल्या जातात.

पिरिएड्स तसं लपविण्यासारखी गोष्ट नाहीये. ही एक नैसर्गिक क्रिया आहे जी प्रत्येक स्त्रीला मासिकपाळीच्या रुपात येते. परंतु पिरिएड्सच नाव ऐकताच अनेकजणं ऐकून न ऐकल्यासारखं करतात जणू एखाद्या वाईट शब्दाचा वापर केलाय.

अनेक स्त्रियांच्या मनात पिरिएड्सबाबत अनेक समस्या, अडचणी, अनेक प्रश्न असतात, ज्याबाबत त्या मोकळेपणी बोलत नाहीत. आज आपला समाज आधुनिकतेकडे वेगाने चालला आहे, परंतु समाजाची मानसिकता अजूनदेखील जुन्या खुंटीला बांधलेली आहे. आजदेखील स्त्रियांना मासिकपाळीच्या काळात देवळात जाऊ दिलं जात नाही, लोणच्याला हात लावू दिलं जात नाही, वेगळी वागणूक दिली जाते. हे विचार बदलण्यासाठी आणि समाजाला जागरूक करण्यासाठी दरवर्षी २८ मेला वर्ल्ड मस्त्रुयल हायजीन डे साजरा केला जातो जो यावर्षी देखील अलीकडेच साजरा करण्यात आला.

मासिकपाळी कोणता आजार वा घाण नाही

वर्तमानपत्र, टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला विविध स्वरूपाची माहिती मिळू लागलीय ज्यामुळे समाजाच्या विचारसरणीत सुधारणा पहायला मिळतेय. पूर्वी जेव्हा टीव्हीवर सॅनेटरी पॅडची जाहिरात यायची तेव्हा चॅनेल बदललं जायचं. परंतु आता हे असं होत नाही. मात्र अजूनही लोक याबाबत मोकळेपणाने बोलत नाहीत. अगदी स्त्रियांदेखील याबाबत खाजगीत बोलताना दिसतात.

एकाच घरात राहत असूनदेखील पिरिएड्सला अनेक सांकेतिक नावानी संबोधलं जातं कारण एकच कोणाला समजू नये. पॅडला काळया प्लास्टिक वा पेपरमध्ये कव्हर केलं जातं. जणू काही एखादं प्राणघातक हत्यार लपवलं जातंय. लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे की मासिकपाळी कोणता गुन्हा नाहीये याउलट निसर्गाकडून स्त्रियांना मिळालेली एक अनमोल भेट आहे. अशावेळी त्यांच्याशी वेगळं वागण्यापेक्षा स्त्रियांची खास काळजी घेण्याची गरज आहे.

सॅनेटरी पॅडचा वापर किती सुरक्षित

पिरिएड्सच्या दरम्यान स्त्रियांच्या शरीरात विविध प्रकारचे बदल होतात, ज्याबाबत त्यांना माहीतच नसतं. जेव्हा पहिल्यांदा मुलींना पिरिएड्स येतात तेव्हा आईचं पाहिलं कर्तव्य म्हणजे याबाबत मोकळेपणाने बोलायला हवं. परंतु असं काही होत नाही. पिरिएड्सला फक्त लाजेत गुंडाळलं जातं. आजदेखील खेडेगावात स्त्रिया मासिकपाळीत फडकं वापरतात. काही स्त्रिया सॅनेटरी पॅड्सचा वापर करतात खऱ्या परंतु त्यांना योग्यप्रकारे वापर करता येत नाही.

सॅनेटरी पॅड्सचा वापर करणं खूप सहजसोपं आहे परंतु हे आजारालादेखील निमंत्रण देतं. खरंतर, सॅनेटरी पॅड्मध्ये डायोक्सीन नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो. डायोक्सीनचा वापर नॅपकिन पांढरा ठेवण्यासाठी केला जातो. याचं प्रमाण जरी कमी असलं तरी हे तसं नुकसानदायकच आहे. ज्यामुळे अनेक आजार होण्याची भीती असते. जसं ओवेरियन कॅन्सर, हार्मोनल डिसफंकशन, म्हणून स्त्रियांनी यादिवसात ऑरगॅनिक क्लॉथच्या पॅड्सचा वापर करायला हवा, हे पॅड्स रुई आणि जूटने बनलेले असतात. वापर करण्यातदेखील आरामदायक असतात आणि पुन्हा स्वच्छ धुवून वापरता येतात. यासोबतच हे पर्यवारणाचं नुकसान करत नाहीत.

दीर्घकाल पॅडचा वापर धोकादायक

सॅनेटरी पॅडचा वापर केल्याने स्त्रियांमध्ये इन्फेक्शन आणि जळजळच्या तक्रारी साधारणत: आढळतात. या सर्व समस्या अनेकदा पिरिएड्स संपल्यानंतर आढळतात. जेव्हा अधिककाळ पॅड्सचा वापर केला जातो, तेव्हा यामुळे एयर सर्क्यूलेशन खूप कमी होतं आणि वेजाईनामध्ये स्टेफिलोंकोकास ओरियस बॅक्टेरियाची वाढ होते. हेच बॅक्टेरिया पिरिएड्सच्या काही दिवसानंतर एलर्जी वा इन्फेक्शनला कारणीभूत ठरतात.

पिरिएड्सच्या काळात स्वछता गरजेची

* पिरिएड्सच्या काळात दर चार तासानंतर पॅड बदलायला हवं.

* कॉटन पॅडचा वापर करावा.

* जर तुम्ही टेम्पोनचा वापर करणार असाल तर ते दर दोन तासांनी बदला.

* वेळोवेळी तुमच्या योनीची स्वच्छता करत रहा, यामुळे पिरिएड्सच्या काळात येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात अनेकदा खूप वेदना होतात, म्हणून याकाळात कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे वेदनेपासून दिलासा मिळेल.

* पिरिएड्सच्या काळात टाईट वा लोवेस्ट पॅन्ट घालू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें