* गरिमा पंकज
चहाच्या घोटासोबत, या जोडूया काही निवांत क्षण, मैत्रीचा सुगंध आणि आपलेपणातल्या आनंदाचे क्षण.’
आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर त्या बहाण्याने, कधी पावसाचे टपोरे थेंब पडू लागले की गरमागरम भजी सोबत पिण्याच्या बहाण्याने किंवा कधी शरीराचा थकवा, मरगळ दूर करण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी, चहा पिण्यासाठी कारण लागत नाही. अतिशय सुंदर क्षणांचा सोबती होतो चहाचा कप. म्हणूनच तर ढाबा असो की मोठमोठी रेस्टॉरंट्स, चहा सगळीकडे मिळतोच. फक्त तो बनवायच्या पद्धती वेगवेगळया असू शकतात. चीनमध्ये याला वेलकम ड्रिंकचे नाव दिले आहे तर जपानमध्ये पाहुणे आल्यावर ‘टी सेरेमनी’ केला जातो.
चहाचा इतिहास
चहाचा इतिहास फार जुना आहे. सर्वात प्रथम चीनमध्ये चहा पिण्यास सुरुवात झाली. नंतर सहाव्या शतकात चीनमधून चहा जपानमध्ये पोहोचला. तिथे चहाला फार पसंती मिळाली. एशियामध्ये चहाचे आगमन हे १९व्या शतकात झाले. आज भारत हा चहाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.
चहाचे फायदे
चहा हृदय तंदुरुस्त ठेवतो. हा अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी डायबिटिक अशा गुणांनी परिपूर्ण आहे. दातांसाठीही चहा चांगला असतो. चहामध्ये पोटॅशिअमसह इतर अनेक खनिज पदार्थ असतात. चहात असेलेले कॅटेचिन, पॉलिफिनॉल आणि अँटी ऑक्सिडंट्स याला आरोग्यपूर्ण बनवतात. भारतात चहाची लागवड ही प्रामुख्याने उत्तर भारतात कौसानी, दक्षिणमध्ये निलगिरीचे पठार क्षेत्र, उत्तरपूर्वेचे दार्जिलिंग आणि आसाम आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी केली जाते.
ब्लॅक टी : ब्लॅक टी हा पूर्ण ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेने निर्माण होतो. यात कॅफिनचे प्रमाण हे ५० ते ६५ टक्के असते. ब्लॅक टी ही चहाची सर्वात कॉमन व्हरायटी आहे आणि संपूर्ण जगात ७५ टक्के लोक याचा वापर करतात.
फायदे : हा चहा हृदयरोगाचा धोका कमी करतो. डायबिटीजच्या रुग्णांनाही हा फायदेशीर असतो. ब्लॅक टी रोमछिद्रांमध्ये तरतरी आणतो आणि लाल रक्त पेशींचे रक्षण करतो.
ओलोंग टी : चीनी भाषेत ओलोंगचा अर्थ आहे ब्लॅक ड्रॅगन. यात कॅफिन कन्टेन्टचे प्रमाण हे ग्रीन टी आणि ब्लॅक टी यांच्या मधले असते. याला स्वत:चा असा वेगळा सुगंध असतो. तसा तर हा ब्लॅक टी सारखाच असतो, पण याचे फर्मेंटेशन हे कमी वेळ केले जाते ज्यामुळे याचा स्वाद फार सुंदर लागतो.