- डॉ. नुपूर गुप्ता, कंसल्टंट ऑस्ट्रेशिअन अँड गायनोकोलॉजिस्ट, संचालक, लॅव वूमन क्लिनिक, गुरगाव
ज्या महिला लग्न करत नाहीत किंवा घटस्फोट वा पतीच्या मृत्यूमुळे एकटया राहतात, त्यांच्यात वय वाढताना एकटेपणाची भावना घर करू लागते कारण जेव्हा त्या चाळीशी पार करतात तोपर्यंत त्यांचे भाऊबहीण, कजिन्स, मित्र यांची लग्न होऊन ते आपापल्या कुटुंबात व्यस्त झालेले असतात. ज्यामुळे अशा स्त्रिया एकटया पडतात आणि त्यांच्या तणावाची पातळी वाढू लागते, जो त्यांना अनेक आजारांचे शिकार बनवतो. त्यांच्यात वजन कमी किंवा जास्त झाल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग, मज्जासंस्थेचे आजार एवढेच नाही तर अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची संभावना वाढते.
एकल जीवन व्यतीत करणाऱ्या महिलांनी आपले आरोग्य अधिकच जपले पाहिजे. त्यांनी असा विचार करणे टाळले पाहिजे की हेल्थ चेकअप करणे म्हणजे वेळ आणि पैसा यांची बरबादी आहे. कारण अनेक गंभीर आजारांची लक्षणे प्राथमिक टप्प्यात लक्षात येत नाहीत. त्यामुळे मेडिकल टेस्ट जरुरी आहेत, ज्यामुळे आजाराविषयी कळल्यास वेळीच योग्य ते उपचार करता येतात.
प्रमुख मेडिकल चेकअप
ओव्हेरियन सिस्ट टेस्ट : जर तुमच्या ओटीपोटात वेदना होतात किंवा अनियमित मासिक पाळी असेल किंवा मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्राव होत असेल तर ओव्हेरियन सिस्ट टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. जर सामान्य पेल्विक परीक्षणादरम्यान सिस्ट आहे असे समजले तर अॅबडॉमिनल अल्ट्रासाउंड केली जाते. लहान आकाराचे सिस्ट आपोआप ठीक होतात, पण जर ओव्हेरियन ग्रोथ किंवा सिस्टचा आकार १ इंचाहून अधिक असेल तर तुम्हाला ओव्हेरियन कॅन्सर असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत डॉक्टर काही आणखी टेस्ट करण्याचा सल्ला देतात.
मॅमोग्राम : ही महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट आहे. जेव्हा कॅन्सर झाल्यावरही कोणतीही बाह्यलक्षणे दिसून येत नाहीत, तेव्हा ही टेस्ट कॅन्सर आहे की नाही हे निश्चित करते. क्लिनिकल ब्रेस्ट एडमिनेशन (सीबीई) ही कोणत्याही डॉक्टरद्वारे केली जाणारी ब्रेस्टची फिजिकल एडमिनेशन असते. यात स्तनांच्या आकारातील बदल, जसे गाठी, निपल जाड होणे, निपलमधून डिस्चार्ज होणे, दुखणे आणि स्तनांच्या बनावटीत कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्याची तपासणी केली जाते.