* शैलेंद्र सिंह

अनेक नोकरदार पालकांची चिंता असते की नोकरी सोबतच मुलांच्या शाळेची वेळ कशी सांभाळायची. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा हा त्रास अधिक असतो. यामुळे अनेक मुलं उशिरा शाळेत जातात, तर अनेकदा आयांना त्यांची नोकरी सोडावी लागते. ज्या स्त्रिया प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत लग्नानंतर त्यांच्यावरती हा दबाव असतो की त्यांनी नोकरी सोडावी. अनेकींना तर असं करावं देखील लागतं. ज्यामुळे त्या वर्किंग लेडीवरून हाउसवाइफ बनतात. यामुळे स्त्रियांच्या पूर्ण क्षमतेचा लाभ देश, समाज आणि कुटुंबासाठी मिळू शकत नाही.

आज मुलींवरदेखील शिक्षणासाठी चांगला पैसा खर्च होतो. यानंतर लग्न करून त्या हाऊस वाईफ बनून राहतात. तेव्हा शिक्षण वाया जातं. महिला सशक्ति करण्यासाठी गरजेचं आहे की स्त्रियांनी आपल्या क्षमतेनुसार काम करावं. यासाठी देश आणि समाजालादेखील असं वातावरण तयार करायला हवं, ज्यामुळे कुटुंबासह मुलांसोबतच स्त्रिया आपलं करियरदेखील करू शकतील. शाळेच्या वेळेमध्ये बदल या दिशेत एक क्रांतिकारी बदल होईल.

ऑफिस आणि शाळेची वेळ एकच असावी

जर शाळेची वेळ आणि ऑफिस वर्किंग अवर्समध्ये समानता असेल तर स्त्रियांना कामासोबतच मुलांना शाळेत सोडण्यास त्रास होत नाही. शाळेचा टाइमिंग सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरू व्हावा आणि संध्याकाळी ५ वाजता बंद व्हावा. हीच वेळ ऑफिसचीदेखील असावी, ज्यामुळे नोकरदार स्त्रिया आपल्यासोबतच मुलांना घेऊन शाळेत सोडतील आणि जेव्हा ऑफिसमधून परतताना शाळेतून घरी आणू शकतील.

अशावेळी स्त्रियांना ऑफिसला जातेवेळी ही चिंता सतावणार नाही की मुलाची देखभाल कशी होईल?

सुरक्षित राहतील मुलं

काही आई-वडील मुलांना क्रेचमध्ये सोडतात. अनेक शाळांची ही व्यवस्था      असते की शाळेनंतरदेखील काही मुलांना जेव्हा आई-वडील आणण्यासाठी येत नाही तेव्हा ते शाळेतच थांबतात. ही प्रत्येक व्यवस्था  कायमची आणि चांगली नसते. लोकांच्या भरवशावर सोडण्यामध्ये त्रास होतो. त्यांना वेगळे पैसेदेखील द्यावे लागतात. क्रेच अनेक जागी नसतात. जिथे देखील असतात ते चांगले नसतात. शाळा सुटल्यानंतर मुलं अनेकदा सुरक्षित राहत नाहीत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...