* पूनम अहमद

अंजू जेव्हा सांगते की मला घरच्या कामांमधून सोशल मीडियावर राहायला फुर्सतच मिळत नाही, मला याची अजिबात आवड नाही आहे, तेव्हा तिच्या मैत्रिणी रेणू आणि दीपा मनातल्या मनात हसत होत्या. त्यावेळी दोघी गप्प बसल्या, परंतु नंतर दोघी या गोष्टीवर अंजूची खेचत राहिल्या, अंजूने जर ऐकलं असतं तर या दोघींसमोर कधीच भोळी बनण्याचं नाटक केलं नसतं.

यावेळी हेच होतंय अंजूच्या बोलण्यावर दोघी मागून हसत आहेत. दीपा म्हणतेय, ‘‘यार ही काय आपल्याला मूर्ख समजते, प्रत्येक वेळी फेसबुकवर ऑनलाइन दिसते. ना कधी कोणाच्या पोस्टवरती लाईकचं बटन दाबते ना कमेंट करते, नोकरी तर करत नाही, मुलं मोठी झाली आहेत, वाचनाची तर काही आवड नाही, दिवसभर हिच्या नावासमोर ग्रीन लाईट सुरू असते. विचार करते की एक दिवस एक स्क्रीन शॉट घेऊन तिलाच दाखवायचं. तेव्हाच या खोटयातून आपला पिच्छा सुटेल. यार, हिला माहित नाही की आता कोणाचंही आयुष्य खाजगी राहिलं नाहीए.’’

रेणू हसली, ‘‘सोशल मीडिया कमालीची गोष्ट आहे. लोकं स्वत:ला हुशार समजतात. त्यांना हे माहीत नाही की त्यांच्यावरती कोण कोण नजर ठेवतंय. आता सपनावासूचंच बघा ना,’’ एवढं बोलून दोघी पुन्हा खो-खो हसू लागल्या.

रहस्य उघड होण्याची भीती

रेणू आणि दीपा दोघी एका शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या शाळेमध्ये ग्रंथपाल दीपक आणि ड्रॉइंग टीचर आहे सपना. दोघांचं वय ५५ च्या आसपास आहे. दीपक जरासा दिलफेक आशिक आहे. स्त्रियांशी गप्पा मारायला त्याला खूप आवडतं, कोणत्याही वयाची स्त्री असो त्याला काहीच फरक नाही. फक्त बाई असायला हवी. सपनाची दोन्ही मुलं परदेशात आहेत. तिथे तिच्या निवृत्त पतींसोबत राहतात. वय ५५ झाले आहे परंतु अजूनही मन अजून विशी वरतीच अडकलं  आहे.

एके दिवशी सपना ग्रंथालयात एक पुस्तक घ्यायला गेली तेव्हा दीपकला पाहिलं आणि प्रेमातच पडली की, आज रेणू आणि दीपासारख्या सैतान आणि मस्तीखोर शिक्षकांनी त्यांचं नाव सपनावासू ठेवलंय. त्यांची चोरी सर्वानी फेसबुक आणि इंस्टाग्राम वरतीच पकडली. आता तर लोकं फेसबुकवरती एकमेकांचे फ्रेंड्स आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...