* चंद्रकला

धूळ, तणाव आणि हार्मोनल बदलांमुळे तरुणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात, जे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे होतात. मुरुम किंवा पुटकुळ्या त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जातात. ती फुटल्यानंतर, कोलेजनची निर्मिती होऊ लागते, ज्यामुळे त्वचेवर मुरुमांचे डाग किंवा चट्टे दिसू लागतात, ज्याला अँक्ने स्कारदेखील म्हणतात.

पुरळ फुटल्यानंतर येणारे चेहऱ्यावरील डाग हाताळणे देखील एक मोठी समस्या बनते. मुरुमांचे चट्टे, जे गडद काळ्या डागांसारखे दिसतात, ते बहुतांश करून मुलींना त्रासदायक ठरतात.

हे डाग अनेक महिने टिकू शकतात. साधारणपणे, अनेक प्रकारचे मुरुमांचे डाग स्वत:हून निघून जाणारे नसतात. मुरुमांचे डाग घालवण्यासाठी खालील डाग किंवा स्कार रिमूव्हर्स वापरता येऊ शकतात :

ग्लायकोलिक अँसिड

ग्लायकोलिक अँसिड हा अल्फा हायड्रॉक्सी अँसिड (एएचए)चा एक प्रकार आहे, जो खाद्यपदार्थांमध्येदेखील आढळतो. ग्लायकोलिक अँसिड मृत त्वचेच्या पेशींचा वरचा थर काढून टाकण्याचे काम करते.

चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग आणि मुरुमांच्या खुणा दूर करण्यासाठी ग्लायकोलिक अँसिडचा वापर केला जातो. हे अनेक दैनंदिन फेस क्लीनर्स, लोशन किंवा स्पॉट ट्रीटमेंट क्रीममध्येदेखील वापरले जाते. बहुतेक पील ऑफ मास्कमध्येही ग्लायकोलिक अँसिड असते.

सॅलिसिलिक अँसिड

सॅलिसिलिक अँसिड हे एक शक्तिशाली एक्सफोलिएंट आहे, जे मुरुमांचे डाग काढून टाकण्यासाठी मदत करते. याचा वापर मृत पेशींमधील घट्ट बंध तोडून टाकतो आणि त्यांना त्वचेतून काढून टाकतो, ज्यामुळे नवीन पेशी मोकळ्या होतात. एक्सफोलिएशन त्वचेच्या छिद्रांना अडकण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे मुरुम होतात. याचा वापर विशेष करून तेलकट त्वचेवर फायदेशीर ठरतो.

मुरुमांचे डाग हाताळण्यासाठी सॅलिसिलिक अँसिड उत्तम ठरते. ते जळजळ आणि लालसरपणा कमी करून त्वचेची चिकटलेली छिद्रे उघडते आणि मुरुम कमी करण्यासाठी देखील मदत करते. याच्या वापराने मृत पेशी मऊ आणि पांढऱ्या होऊन गळून जातात, ज्यामुळे डाग सौम्य होतात.

लॅक्टिक अँसिड

लॅक्टिक अँसिड हे अल्फा हायड्रॉक्सी अँसिड आहे जे वापरल्यानंतर कडक पेशी वेगळ्या होतात जे सालपटं निघाल्यामुळे होते. असे एएचएच्या संपर्कात येण्यामुळे आणि मृत पेशी बाहेरील थरातून बाहेर पडल्यामुळे होते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेचा पृष्ठभाग अधिक स्वच्छ होतो. हे त्वचेवर एक्सफोलिएटरसारखे काम करते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...