* गरिमा पंकज
घर म्हणजे स्वप्नांचे निवासस्थान जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत जीवनातील सुख-दु:ख वाटून घेता. या घराची सजावट अशी असावी की जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभवती शांततेची अनुभूती मिळेल.
घर मालकीचे असो किंवा भाडयाचे, तुम्ही एकटे राहात असाल किंवा कुटुंबासोबत, जर ते घर आकर्षक आणि आरामदायी असेल तर मनाला आनंद आणि आराम देते. त्या घरात तुम्ही जो काही वेळ घालवता तो तुमचा असतो. त्यामुळे घराची देखभाल आणि सजावटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. घराच्या सजावटीत वेळोवेळी मोठे बदल करा आणि चांगल्या इंटीरियरचा आनंद घ्या. विशेषत: सणासुदीच्या काळात घर आकर्षक बनवण्याचे तुमचे छोटे छोटे प्रयत्न सणाचा आनंद द्विगुणित करतात.
चला तर मग, तुमच्या घराचे आतील भाग आकर्षक कसे बनवायचे ते जाणून घेऊया :
भिंतीना रंगकाम करा
तुम्ही असे केल्यास, तुम्हाला फार कमी खर्चात अतिशय सुंदर बदल दिसतील. पेंटिंगसाठी असा रंग निवडा जो तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करेल आणि खोलीला साजेसा ठरेल. जर तुमचा स्वभाव चैतन्यदायी असेल तर तुम्ही सोनेरी, पिवळा किंवा चमकदार हिरवा रंग निवडा. तुम्ही शांत आणि संयमी स्वभावाचे असाल तर राखाडी किंवा निळा रंग अधिक शोभून दिसेल.
वेगवेगळया खोल्यांना वेगवेगळे रंग लावा. खोलीच्या सर्व भिंतींवर एकच रंग लावण्याचा ट्रेंडही संपला आहे. भिंती वेगवेगळ्या शेड्सने रंगवा आणि लुक किती वेगळा वाटतो ते स्वत:च अनुभवा.
प्रत्येक भिंतीला वेगळा रंग द्यायचा नसेल तर दिवाणखान्याची एक भिंत इतर रंगांपेक्षा वेगळया रंगात रंगवून तुम्ही नाविन्याची अनुभूती घेऊ शकता. अधिक प्रकाशासाठी आणि घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी खोलीची एक भिंत गडद रंगात रंगवा.
तुम्ही काही डिझाइन्स करून तुम्ही याला क्रिएटिव्ह लुकही देऊ शकता किंवा लक्ष वेधण्यासाठी खोलीच्या कोणत्याही भिंतीवर तुम्ही वॉलपेपर लावू शकता. वॉलपेपर तुमच्या इंटीरियर डिझाइनला वेगळा लुक देऊ शकतो. त्यासाठी जास्त खर्च येणार नाही आणि भिंतींनाही छान लुक मिळेल. बाजारात सर्व प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध आहेत.